Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
Showing posts with label responsible youth. Show all posts
Showing posts with label responsible youth. Show all posts
आजची बेजबाबदार(?) तरुणाई
Blog responsible youth

आजची बेजबाबदार(?) तरुणाई

आजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घरी आलं की पुन्हा त्या कॉंप्युटरसमोर जाऊन बसायचं. कानात हेडफोन लावून बसायचं. वैताग वैताग नुसता…!!!घरच्यांनाही आणि तरुणांनाही.
पण खरंच तरुण (किंवा तरुणी) बेजबाबदार झालेत? तुम्हांला काय वाटतंय? काहीही मत मांडण्याऐवजी जरा अजून चारदोन मिनिटे पुढे वाचा.
मान्य आहे अमाप पैसा कमवतात. उधळपट्टी करतात. पण आजकाल जगात टिकून रहायला हे आवश्यकच नाही का? चार माणसांत गबाळे दिसावं का आम्ही? ब्रॅंडेड गोष्टी घेतल्या की त्या पुढली काही वर्षे हमखास टिकत नाहीत का? तेच जर नॉनब्रॅंडेड वस्तू घेतल्या तर चार सहा महिन्यांतच नाही का ते टाकून देण्याच्या लायकीचं होत? मग वर्षाला चार वस्तूंऐवजी दोनच घेतल्या जातात की नाही? मग त्याला थोडे जास्त पैसे गेले तर बिघडले कुठे? ही खरंच उधळपट्टी आहे की गुपचुप मनात केलेले व्यावहारिक गणित? अतिमहागडे फॅशन ब्रॅंड्स (म्हणजे चाळीस-पन्नास हजाराचा आरमानी सूटसारख्या गोष्टी) कधी तरी घेऊ का आम्ही? हातभर चित्रविचित्र टॅटू, ओठाजिभेला-बेंबटाला पिअर्सिंग तर नाही करत ना? “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हे हा युक्तिवाद काळाला धरुन जेष्ठांना तरी योग्य वाटतोय का? त्यावेळीही कुणाच्याही आर्थिक मिळकतीची किमान पाच टक्के रक्कम कपडे आणि तत्सम गोष्टींमध्ये खर्च होतच असेल ना? तसेच आजही चालू नाही का?
मग फक्त याच अनुषंगाने बेजबाबदार हा ठपका लावून मोकळे झालात? का? आम्ही रोज दारु पिऊन झिंगत घरी येता येता सगळ्या गल्लीत शिवीगाळ आणि तमाशा करतो? आपल्या मागच्यांची कसलीही काळजी न करता गाड्या उडवतो? अहो अगदी बाईकवरही आम्ही हेल्मेट वापरतो, वापरायला उद्युक्त करतो. वाहतुकीचे नियम पाळतो. कुठल्याही वाहतूक नियमन किंवा जनजागरण संघटनेत सगळ्यात मोठा हातभार तरुणांचाच असतो ना? काही दुर्दैवी अपवाद असतीलही आमच्यात, पण सगळ्या तरुण पिढीलाच दोष देण्यात काय अर्थ आहे? त्यांचे हित त्यांना कळत नाही, गेले खड्ड्यात. त्यांचे आई-वडिलांचे संस्कार त्यांनी उचलले नाहीत. पण बाकीच्यांची वैचारिक बैठक तर पक्की आहे ना? मग सरसकट सारे एकाच तराजूत तोलण्याचा तुमचा हट्टाहास का? अर्थात या छोट्याछोट्या गोष्टी झाल्या. आज आमच्यापैकी बहुतेकांची स्वतःची (एक किंवा अधिक) घरं आहेत. दारात गाडी/गाड्या आहेत. आईवडिलांना सुखात ठेवण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे.त्यासाठी कायम मेंदूच्या एका कोपर्‍यात काहीना काही जुळवाजुळव सुरुच असते.आता हे तुमच्या पिढीला आम्ही सांगावं का? मग सरसकट बेजबाबदारपणाचा शिक्का लावून मोकळे झालात?

प्रत्येक जण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहे. मला नाही वाटत तरुण पिढी यातही मागे राहिली आहे. दगडूशेठ गणपतीला कुणाची गर्दी जास्त असते? शहराचे भूषण म्हणून तुम्ही जे मिरवता त्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कुणाचा उत्साह ओसंडून वाहतो. दारु पिऊन तिथे कुणी झिंगला, मुलींना त्रास दिला यासाठी हातात दांडू घेऊन कोण उभा असतो?सवाई गंधर्व-वसंतोत्सवाला कुणाची गर्दी जास्त असते? त्या सांस्कृतिक कार्यक्रमांत कुणाचे सादरीकरण अधिक भावते? आणि दाद मिळाली तरी आपल्या जेष्ठ गुरुंचे स्मरण कुठल्या पिढीचे कलाकार करतात? दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक कुठल्या पिढीचे आहेत? गडकिल्ल्यांच्या पावित्र्य जपण्यासाठी कुणाचा पुढाकार असतो? तुमच्या पिढीने उभ्या केलेल्या एनजीओंच्या आवारात कुठली पिढी राबते? नव्या युगाचे ज्ञान तिथल्या स्पेशली एबल्ड मुलांना कोण देते? त्यांची पावतीपुस्तकं कुणाच्या देणगीने भरत असतात? ऑफिसातल्या दिवाळीतही शेजारच्या वृद्धाश्रमाची आठवण कुणाला राहते? आमच्याच पिढीला ना?
दर्जेदार नाटक आणि चित्रपटांना जास्त गर्दी कोण करतं? संगीत महोत्सव डोक्यावर घेऊन आपल्या फेसबुकवर शेअर करुन तिथे स्वयंसेवक म्हणून हजर कोण असतं? एकदा तो हेडफोन कानाला लावून बघा, रॉक बरोबर वसंतराव, सगळे गंधर्व, खळेकाका, बिस्मिल्ला खॉं, भीमसेनही ऐकू येतील. कधीतरी कॉंप्युटरमध्ये डोकवा. डेक्स्टर आणि फ्रेंड्स सिरीजबरोबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, राजकपूर, सुर्यकांत-चंद्रकांत-अरुण सरनाईकांचे चित्रपटही असतील. हे तर वानगीदाखल काही दाखले दिले. पण ही यादी एवढीच आहे का? कदाचित याचे उत्तर तुम्हांलाच अधिक चांगल्या प्रकारे माहित आहे.
तुमचा आदर करण्यात ही पिढी कधीही कमी पडली नाही आणि पडणारही नाही. काही यशाची शिखरं त्यांना तुमच्या पायाशी नतमस्तक करावयाची आहेत. तेव्हा फक्त थोडं समजून घ्या, एकवार विश्वास ठेवा आणि प्रेमळ आशीर्वाद द्या. बास्स्स…!!!
08:50
1
Older Posts
Subscribe to: Posts (Atom)

Popular Posts

  • मी भटकंती का करतो?
    "मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
    झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बे...
  • कार: पेट्रोल की डिझेल?
    आपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदा...
  • लवंगी मिरची कोल्हापूरची
    आता मात्र मराठी ब्लॉगस्फियर ढवळून निघाले असेल खादाडीच्या पोस्ट्सने. ढवळून नसले तरी वाचकवर्ग तर नक्कीच जळत असेल. महेंद्र, सिद्धार्थने आपल्या ...
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत
    शेवटी मी आणि भुंगा ने जी चर्चा केली होती आणि ब्लॉगवर मतदान घेतले होते ती ब्लॉगमीट सुरेश पेठे काका आणि अनिकेत समुद्र च्या भरीव कामाने फळास आ...
  • मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
    दिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...
  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
    बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?), मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट...
  • रायगडवारी सातव्यांदा
    रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, त...
  • सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
    सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मी भटकंती का करतो?
  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत
  • माझ्याबद्दल थोडेसे...

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1