Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
Showing posts with label german bakery. Show all posts
Showing posts with label german bakery. Show all posts
सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
german bakery जर्मन बेकरी पुणे बॉंबस्फोट

सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे

झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बेकरी. देशी-विदेशी नागरिकांचे आवडते ठिकाण. पण पाहवली नाही हो त्यांना. आमच्या आजवर कधीही गालबोट न लागलेल्या पुण्यात थोड्या वेळापूर्वी कोरेगाव पार्क भागातल्या या बेकरीत बॉंबस्फोट घडवून आणला. माहितीची शहानिशा करता करता २-३ तास गेले. गृहराज्यमंत्री टीव्हीवर बाईट देता देता एक पोलीस त्यांच्या कानात काही तरी कुजबुजून सांगतो आणि ते तडक निघून जातात. त्यावरुनच काही तरी अमंगळ आहे याची कुणकुण लागते. काही वेळातच मुख्यमंत्री, केंद्रीय गृहसचिव हा घातपात असल्याची अधिकृत माहिती देतात.

पुण्याच्या नशिबी पण हे असले काही तरी रक्ताळलेले लिहिले असेल याची कल्पना खरे तर हेडलीला पकडले तेव्हाच यायला हवी होती. शिवाय तो राहून गेलेल्या ठिकाणीच आजचा स्फोट झाला. शेजारीच छाबड हाऊस (ज्यू प्रार्थनास्थळ) आहे. ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र आहे. असंख्य परदेशी पर्यटक तिथे वावरत असतात/ मग असे असताना तिथली सुरक्षा एवढी ढिली कशी झाली. मागल्या मार्चमध्ये हेडली पकडला त्यावेळी तिथे नॉर्थ कोरेगाव पार्क मेन रोडवर दोन ठिकाणी पोलीस चेक नाके होते. कालपरत्वे ते गायब झाले. उरले फक्त बॅरिकेड्स. ते पण रस्त्याच्या बाजूला ठेवलेल. का? काही दिवस उलटले की धोका संपतो का?

आता केंद्र शासन म्हणतेय ऑक्टोबरमध्येच हायअलर्ट दिला होता. मग राज्यशासन "नाही" म्हणेल. मग पुन्हा राज्य प्रशासन की केंद्र यावर वाद झडेल. पोलीस दोषी की इंटेलिजन्स. माय नेम इज खान विरुद्ध सेना या आंदोलनात पोलीस व्यग्र होते म्हणून इकडे मोकळे रान मिळाले असेही कुणीतरी नक्की म्हणणार. मिडियावाले उलटसुलट बातम्या पसरवतील. काही अफवा पसरतील. राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एक संधी सोडणार नाहीत. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला आणि सत्ताधारी विरोधकांच्या आंदोलनाला दोष देत बसणार. ही पोस्ट लिहून होईपर्यंत तर एखादा राजकारणी बरळलाही असेल काहीतरी. किमान यावेळी  तरी (आणि हीच शेवटची वेळ असावीअशी प्रार्थना) मिडियाला नियंत्रित ठेवण्याचे, त्यांना खात्रीशीर बातम्या पुरवण्याची व्यवस्था सरकारने किंवा संबंधित यंत्रणेने राबवावी. नाहीतर पुन्हा ते टीआरपीच्या वेडात काहीही बातम्या दाखवून, आकडे फुगवून, एखाद्याच्या तोंडची वाक्यं हवी तशी एडिट करुन दाखवणार आणि मूळ विषयाकडे दुर्लक्ष होणार. त्यासाठीच सरकार आणि पोलीस यंत्रणा यांच्यात सुसुत्रता ठेवून अधिकृत बातम्या पुरवण्यात याव्यात. राजकारण्यांनी पण जरासा तोंडाला लगाम लावावा. सर्व राजकीय पक्षांनी पुढील एकदोन दिवस आपली असेल नसेल तेवढी यंत्रणा अफवांचे निराकरण करण्यात, जखमींना रक्त आणि इतर मदत मिळवून देण्यात, पोलिसांना सहकार्य करण्यात, वेळ प्रसंगी वाहतूक नियंत्रित करण्यात खर्ची घालावी. आम्ही सामान्य नागरिक यथाशक्ती मदत करुच.

पण पोलीस आपले (धन्याने दिलेले) काम काम चोख बजावणार यात तिळमात्र शंका नाही. इस्पितळातील डॉक्टर, कर्मचारी आपापले कर्तव्य पार पाडणार. गरज आहे आपण सावध असण्याची. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अनोळखी बेवारस वस्तू पोलीसांच्या नजरेला आणून द्या. काही शंका आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.

पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२२८८०, ०२०-२६१२६२९६

शेवटचे आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे दाखवून द्या की आम्ही भ्याड नाही. हा हल्ला आम्ही गंभीरपणे घेतला असला तरी आम्ही घाबरलेलो मुळीच नाही. तुम्ही २६-११ ला डोक्यावर प्रहार केला. आज काळजाला भोक पाडलेत. पण हे मराठी काळीज आहे. एक दिवस दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे ते. सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे.
10:12
29
Older Posts
Subscribe to: Posts (Atom)

Popular Posts

  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • मी भटकंती का करतो?
    "मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव...
  • सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
    झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बे...
  • कार: पेट्रोल की डिझेल?
    आपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदा...
  • लवंगी मिरची कोल्हापूरची
    आता मात्र मराठी ब्लॉगस्फियर ढवळून निघाले असेल खादाडीच्या पोस्ट्सने. ढवळून नसले तरी वाचकवर्ग तर नक्कीच जळत असेल. महेंद्र, सिद्धार्थने आपल्या ...
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत
    शेवटी मी आणि भुंगा ने जी चर्चा केली होती आणि ब्लॉगवर मतदान घेतले होते ती ब्लॉगमीट सुरेश पेठे काका आणि अनिकेत समुद्र च्या भरीव कामाने फळास आ...
  • मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
    दिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...
  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
    बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?), मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट...
  • रायगडवारी सातव्यांदा
    रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, त...
  • सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
    सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
  • दिवाळी: आठवणींचे भुईनळे

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1