आता प्रतिभेवरही डल्ला
By
Unknown
/ in
photo theft
plagiarism
मागच्या आठवड्यात महेंद्रजींनी शेरिल ऊर्फ व्हाईट इंडियन हाऊसवाईफचा फोटो ’सकाळ’ वृत्तपत्रात अगदी काहीही परवानगी न घेता अगदी गरीब पद्धतीने मॉर्फ करुन वापरला, यासंबंधी पोस्ट लिहिली होती. अर्थात तिथे किमान (गरीब का होईना) मॉर्फिंगचे कष्ट घेतले गेले होते. टाईम्स ग्रुप आणि त्यांच्यासाठी जाहिरात डिझाईन करणारी कंपनीदेखील या बाबतीत मागे नाही. आजच्या संडे टाईम्स आणि टाईम्स समूहाच्या इतर संलग्न वृत्तपत्रांमध्ये आज ’पुणे फेस्टिवल’ संदर्भात एक जाहिरात झळकली आहे. त्यामध्ये जे ग्राफिक्स वापरण्यात आले आहे त्यात फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांबरोबरच पुण्याची संस्कृती दाखवण्याच्या हट्टापोटी काही गणेशोत्सवाचे फोटो वापरले गेले आहेत.
काही फोटो ओळखीचे वाटत होते. फोटोग्राफर्स@पुणे या ग्रुपचा सदस्य (आणि मॉडरेटर) असल्याकारणाने बऱ्याच सदस्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो. त्यामुळे त्यांचे विशेष फोटो अगदी तोंडपाठ आहेत. अशाच काही पाहिलेल्या फोटोंपैकी हा एक सुहासचा फोटो. आयुष्यात अशा फोटोची संधी एकदाच मिळत असते, आणि त्या वेळी ती दवडली तर पुन्हा कधीही तो क्षण हाती लागणार नाही. ही संधी अचूक टिपल्यामुळे या फोटोमध्ये जो जल्लोश आणि ऊर्जा दिसून येते त्यामुळेच हा माझ्या काही आवडत्या फोटोंपैकी एक आहे.त्या फोटोमध्ये जो टकलू तरुण जल्लोशात ढोल वाजवतो आहे तो म्हणजे जगद्विख्यात शिवगर्जना ढोल पथकातील दीपक. तोही या फोटोमुळे सुहासचा चांगला मित्र झाला आहे. फोटोग्राफर्स@पुणेच्या २००८ च्या वार्षिक प्रदर्शानातही हा फोटो विजेता ठरला होता.
टाईम्सच्या जाहिरातीमध्ये हा फोटो ओळखायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सुहासने पण टाईम्स समूहाला किंवा अन्य कुठल्याही एजन्सीला या फोटोचे कॉपीराईट हक्क विकले नाहीत हे स्पष्ट सांगितले. मग सहज म्हणून इतर फोटोही चाळायला सुरुवात केली. तर दहा मिनिटांतच आणखी दोन फोटो चोरीचे सापडले. तो दुसरा ढोलवाला फोटो आहे किरण पाटील या मित्राचा. आणि तुतारीचा फोटो आहे चिन्मयचा. तुतारीचा फोटो मिरर करुन वापरला आहे. खाली दिलेल्या तिन्ही ओरिजिनल फोटोच्या लिंक्स:
सुहास (ढोल-१): http://www.flickr.com/photos/simplysuhas/2856502906/
किरण (ढोल-२): http://www.flickr.com/photos/ kiranppatil/3886544740/
चिन्मय (तुतारी): http://www.flickr.com/photos/ chinmaypatil/1441691133/
या तीनही फोटोग्राफर्सशी बोलून त्यांनी कुणालाही हक्क दिले नाहीत याची खात्री केली आहे. जर टाईम्स एक जबाबदार मिडिया म्हणून स्वतःला संबोधून घेण्यात धन्यता मानत असेल तर त्या फोटोचे हक्क त्या जाहिरात डिझाईन संस्थेकडे आहेत की नाहीत याची साधी तपासणीही त्यांनी करु नये? बरं थर्ड पार्टी जाहिरात संस्थेने डिझाईन केलेली जाहिरात जरी असली तरी ती जाहिरात टाईम्स ग्रुपच्याच प्रायोजित कार्यक्रमासाठी तयार केली गेली आहे. मग कमीत कमी एक जाहिरातीचे मालक म्हणून तरी त्यांनी ही जाहिरात आणि त्यातले फोटो तपासून पहावेत ना? एक सीरियस हॉबिस्ट फोटोग्राफर या नात्याने जो संताप व्यक्त करायचा तो अशासाठी की आपापले व्यस्त लाईफ सांभाळून फोटोग्राफीच्या छंदासाठी हजारो, प्रसंगी लाखो रुपये कॅमेरा आणि लेन्स मध्ये गुंतवून, पहाटे साडेतीन-चारला उठून गारठ्यात वाहने चालवून, गर्दीत धक्के आणि पोलिसांची क्वचित अरेरावी सहन करुन आम्ही जे फोटो काढतो ते काय अशा चोरांसाठी?
काही फोटो ओळखीचे वाटत होते. फोटोग्राफर्स@पुणे या ग्रुपचा सदस्य (आणि मॉडरेटर) असल्याकारणाने बऱ्याच सदस्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो. त्यामुळे त्यांचे विशेष फोटो अगदी तोंडपाठ आहेत. अशाच काही पाहिलेल्या फोटोंपैकी हा एक सुहासचा फोटो. आयुष्यात अशा फोटोची संधी एकदाच मिळत असते, आणि त्या वेळी ती दवडली तर पुन्हा कधीही तो क्षण हाती लागणार नाही. ही संधी अचूक टिपल्यामुळे या फोटोमध्ये जो जल्लोश आणि ऊर्जा दिसून येते त्यामुळेच हा माझ्या काही आवडत्या फोटोंपैकी एक आहे.त्या फोटोमध्ये जो टकलू तरुण जल्लोशात ढोल वाजवतो आहे तो म्हणजे जगद्विख्यात शिवगर्जना ढोल पथकातील दीपक. तोही या फोटोमुळे सुहासचा चांगला मित्र झाला आहे. फोटोग्राफर्स@पुणेच्या २००८ च्या वार्षिक प्रदर्शानातही हा फोटो विजेता ठरला होता.
टाईम्सच्या जाहिरातीमध्ये हा फोटो ओळखायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सुहासने पण टाईम्स समूहाला किंवा अन्य कुठल्याही एजन्सीला या फोटोचे कॉपीराईट हक्क विकले नाहीत हे स्पष्ट सांगितले. मग सहज म्हणून इतर फोटोही चाळायला सुरुवात केली. तर दहा मिनिटांतच आणखी दोन फोटो चोरीचे सापडले. तो दुसरा ढोलवाला फोटो आहे किरण पाटील या मित्राचा. आणि तुतारीचा फोटो आहे चिन्मयचा. तुतारीचा फोटो मिरर करुन वापरला आहे. खाली दिलेल्या तिन्ही ओरिजिनल फोटोच्या लिंक्स:
सुहास (ढोल-१): http://www.flickr.com/photos/simplysuhas/2856502906/
किरण (ढोल-२): http://www.flickr.com/photos/
चिन्मय (तुतारी): http://www.flickr.com/photos/
या तीनही फोटोग्राफर्सशी बोलून त्यांनी कुणालाही हक्क दिले नाहीत याची खात्री केली आहे. जर टाईम्स एक जबाबदार मिडिया म्हणून स्वतःला संबोधून घेण्यात धन्यता मानत असेल तर त्या फोटोचे हक्क त्या जाहिरात डिझाईन संस्थेकडे आहेत की नाहीत याची साधी तपासणीही त्यांनी करु नये? बरं थर्ड पार्टी जाहिरात संस्थेने डिझाईन केलेली जाहिरात जरी असली तरी ती जाहिरात टाईम्स ग्रुपच्याच प्रायोजित कार्यक्रमासाठी तयार केली गेली आहे. मग कमीत कमी एक जाहिरातीचे मालक म्हणून तरी त्यांनी ही जाहिरात आणि त्यातले फोटो तपासून पहावेत ना? एक सीरियस हॉबिस्ट फोटोग्राफर या नात्याने जो संताप व्यक्त करायचा तो अशासाठी की आपापले व्यस्त लाईफ सांभाळून फोटोग्राफीच्या छंदासाठी हजारो, प्रसंगी लाखो रुपये कॅमेरा आणि लेन्स मध्ये गुंतवून, पहाटे साडेतीन-चारला उठून गारठ्यात वाहने चालवून, गर्दीत धक्के आणि पोलिसांची क्वचित अरेरावी सहन करुन आम्ही जे फोटो काढतो ते काय अशा चोरांसाठी?
Tu 3 photos olakhu shaklas.. I am sure, bakihce 2 pan asech chorle astil!!
ReplyDeleteEkda P@P chya akhkhya group la gheun Times chya office madhe ghusayla hava... Ani coverage saathi Indian Express, Sakal la bolvava... Magach tyanna kalel!! :x (Actually, Ekhadhi P@P meet TOI chya office madhe ghyayla harkat nahi!! :) )
तुझी नजर अगदी (लयच लगे!) तीक्ष्ण आहे बे! हल्ली कॉपीरायटेड मटेरियल चोरीला जाण्याचे प्रकार रोजच्या-रोज उघडकिस येत आहेत. आतापर्यंत ब्लॉगपोस्ट्सची चोरी होत होती... पण फोटोग्राफरने एवढ्या कष्टाने घेतलेल्या फोटोंसोबत कशीही छेडा-छेडी करणं, तेही फोटोग्राफरच्या संमतीशिवाय... हा खुप मोठा गुन्हा आहे! "तुषार"च्या मताशी मी सहमत आहे. तुम्ही लोकांनी टाईम्स ऑफ इंडियाला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे भिकारचोट मिडियावाले वठणीवर येणार नाहीत.
ReplyDelete- विशल्या!
http://groups.google.com/group/say-no-to-plagiarism
ReplyDeletehere you can find how you can handle such issues. Ask our photographer friends to have a look at this as well.
हो काल ऐकले मी सुहासला बोलताना, जेंव्हा त्याला कोणीतरी फोन वरुन सांगत होते की त्याचा फोटो वापरला गेला आहे :-(
ReplyDeletethanks a lot pankaj , I was unaware with this thing done by TOI . I think we have to do something to stop such kind of things in future to anybody from our group.
ReplyDeleteते लोक एक अपॉलजी नोट छापतील. ते पण सुटले, तुम्हीही सुटलात. पुढे काय होतं राव, काही माहित आहे का?
ReplyDeleteप्रेस काउन्सिलला कम्प्लेंट करा... बस्स .. सगळं ठिक होईल..
ReplyDeleteSome one has to press charges against them. Maybe p@p if registered can put up a case. Because this is not going to be the end of it. They are going to steal again in future.
ReplyDeleteExcellent work Pankaj! Kudos to you for bringing this up and writing this post!
ReplyDeleteAlso, shame on TOI!
Apart from following up with TOI, we should contact other newspapers and tell them to print about it. May be then TOI will take it seriously!
nahi re, mi ha point mage pan mandla hota. chora chori hotach rahate. photoshop, movies, mp3s etc. hya welela fakta apan receiving end la hoto mhanun chidchid karun ghenyat kay point ahe? thambaycha asel tar saglyanni thambwayala pahije. what say?
ReplyDeleteMy dear friends, do u watch pirated movies? do you download pirated songs? Yes? then we have no right to complain! Yeh duniya gol hai.
ReplyDeleteAapan pan pirated Photoshop vaparto.
Aapan pan kuthetari chori karto aani tevha pan konalatari aasach raag yeto.
Secondly, the advertisement must be made by some ad-agency. The ad-agency is responsible for the copyright issues.
Re-visiting the original photos, I realise that I can download hi-res copies of the photos. Why cannot photographers not take care that they upload low-res photos? Make sure that they are not downloadable easily?
ReplyDeletePrecaution is better than cure :)
good catch Pankaj...whatever that cheap Advt. agency did is really horrible.
ReplyDelete@Thin Rhino Barobar aahe aapan vaparto pirated pan jar company ne pakadala tar te asach nahi sodun denar :) fine kartil kinva kahi tari kartil.
ReplyDeleteRights wagere he sagle updesh aahet
send a legal notice - chinmay bhave
ReplyDeleteAwesome!!! DUDE
ReplyDelete