Showing posts with label Bhatkanti Unlimited. Show all posts

मन माझे...
मन माझे... उगवतीचा रंग घेऊन हळूवार स्वप्न रंगवते,
पक्ष्यांच्या किलबिलाटातून कानांशी रुंजी घालते,
ऊबदार दुलईतून कुशीत तुला घेते,
आणिक कोवळे उन्हं होऊन तुला जागवते.

मन माझे... कधी मेघदूत पाठवून गुज तुजला सांगते,
कधी अवचित बरसून चिंब भिजवते,
कधी हातावर धारा झेलून झिम्माडते,
तर कधी वीज कडाडून तुजला भिवविते.
मन माझे... कधी वार्यासवे तरंगत तुजपाशी येते,
कधी वाराच होऊन गालांशी सय घेते,
कधी हळूवार झुळूक बटांना लाडावून जाते,
तर कधी उधाणत येऊन विस्कटून सतावते.
मन माझे... कधी फुलपाखरु होऊन स्वच्छंद विहरते,
कधी ससा होऊन घाबरुन शहारते,
कधी मोरपिसारा लेऊन नाचू लागते,
तर कधी हरिण होऊन वेगे धावत तुजपाशी येते.
मन माझे... कधी एकांत आठवणीत वेडावते,
कधी कातरवेळी आठवणींनी तुला छळते,
कधी क्षितिजापार तुझी वाट पाहते,
तरी पाखरासारखे फिरुनि तुझ्याचकडे परतुनि येते, मन माझे...
05:39
सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली. चार ओळींच्या चॅटमध्येच प्लॅन फायनल.
Devya: Pankya, Sandhan valley kaay place aahe rao
me: ho na. kadhi jayache? 2 divas lagatat.
Devya: Ya weekend la?
me: Done!
शुक्रवारी ऑफिसनंतर रात्री निघून वाटेत एखाद्या धाब्यावर कोंबडीला स्वर्गात पोचवून पोटपूजा करायची, तेवढाच तिचा जन्म सार्थकी लागेल. पुढे मध्यरात्री संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा) मार्गे साम्रद गावी पोचणे आणि पहाटे सांधण दरीत उतरणे असा बेत होता. मी आणि देव्या आणि मंजिरी (देव्याची बेटर हाफ) फायनल होतो. अन्य कुणी येतंय का ते विचारायला एक मेलामेली केली. सुहास आणि सौमित्र तयार झाले. त्यातच देव्याने नवीनच कार घेतलीये. म्हणून मग तिला डोंगरातल्या रस्त्यांची सवय लावणे जरुरीचे होते. पाच लोक आणि गाडी फुल. काही लोकांना ऐन वेळी नाही म्हणून सांगावे लागले. एक बरे होते. मंजिरी असल्यामुळे स्वयंपाकाची काळजी नव्हती. त्यामुळे खाण्याची ऐश होणार होती. पण नशीबच नव्हते कदाचित त्या दिवशी. काही कामास्तव तिचे येणे कॅन्सल झाले. त्यामुळे आता बरोबरच्या सुहास आणि सौमित्रला आम्ही केलेले खाणेच भाग होते (तसे खिचडी, मॅगी आणि सूप असला स्वयंपाक आम्हांला छान जमतो) पण फर्माइशी मेन्यू मिळणार नव्हता. असो...
शुक्रवारी ऑफिसला लवकरच कलटी मारून देव्याला कॉल केला. तो पण ऑफिसमध्येच होता. तिथून बाहेर पडून नूडल्स, सूप पावडर, चहाचे सामान असे काखोटीला मारुन बॅगा गाडीत कोंबल्या. सुहासच्या ऑफिसवरुन त्याला आणि सौमीला पिक केले आणि साडेनऊला वाजता गाडी नाशिक हायवेला लावली. नवीन गाडी आणि ऐसपैस जागा, त्यामुळे फारच भारी प्रवास वाटत होता. पोटात कावळे बोंबलत होते. राजगुरुनगरला आल्यावर आम्हांला माहीत असलेले चांगले हॉटेल म्हणजे स्वामिनी. गाडी लावली बाहेर आणि आत गेलो. घरी आणि ’तिकडे’ फोन करुन आता रेंज येणार नाही, फोन करु नका असे सांगून मोकळा (शब्दशः मोकळा) झालो. आत गेल्यावर आम्हांला मेनूकार्ड पहायची काय गरज, डोळे झाकून एक फुल्ल चिकन हंडी आणि रोटीची ऑर्डर. मस्त आडवा हात मारुन ताव मारला. ग्रेव्हीची टेस्ट फारच मस्त होती. तिथे एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा होता. माझे वजन केले आणि चक्क ते चार किलो अधिक झाल्याचे पाहून माझे मलाच मूठभर मांस चढले.
आता गाडी संगमनेरच्या रस्त्याला लागली. मागे बसलेल्या सुहास आणि सौमीच्या पोटातली कोंबडी पेंगायला लागली आणि आमची जास्त बडबड करायला लागली. पुणे नाशिक रोड म्हणजे खूप वाईट ड्रायव्हिंग अनुभव. समोरुन येणार्या गाड्या अचानक बाहेर निघून ओव्हरटेक करतात. मध्येच कुठे काम चाललेले, कुठे खड्डे. त्यात समोरच्या हेडलाईटचा त्रास. संगमनेरला पोचता पोचता दीड वाजला होता. अजून बराच टप्पा गाठायचा होता. पुढे काही मिळणार नाही म्हणून संगमनेर नाक्यावर चहा मारला. एसटी स्टॅंडला लागूनच अकोलेकडे जाणारा रस्ता आहे. तिथून गाडी डावीकडे वळवली. पूर्वी कळसूबाईच्या ट्रेकला येताना याच रस्त्याने गेल्यामुळे रस्ता माहीतच होता. पण रात्री थोडे पुढे गेल्यावर चौकात सगळेच रस्ते एकसारखे दिसू लागले. आता एवढ्या रात्री कोणाला विचारणार? एक शाळा (की सभागृह) दिसली. तिथून आवारातून एक बाईक ’टिब्बलशीट’ बाहेर येत होती. त्यांना विचारले. त्यांची गाडी ’टाईट’च होती (एवढ्या रात्री दुसरे कोण भेटणार). त्यांना रस्ता विचारला तर मागे बसलेल्या दोन जणांनी दोन दिशांना हात दाखवले. नशीब गाडी चालवणारा तिसरा होता त्याच्या हातात गाडीचे हँडल होते, नाहीतर त्याने तिसरी दिशा दाखवली असती. शेवटी तेच म्हणाले या आमच्या मागे. थोडे पुढे जाऊन बोर्ड दिसला "अकोले". रस्ता एकदमच सुपर. समोरुन गाड्या नाहीत आणि एकही खड्डा नाही. गाडी ९०-१०० ने जात होती. अर्ध्या तासात अकोले आणि पुढे राजूरचा रस्ता. थोडेफार ढग डोंगरांच्या माथ्यावर दिसत होते. अगदीच किरकोळ पुंजके. चंद्रप्रकाश एवढा होता की गाडीच्या हेडलाईट बंद करुनही गाडी चालवता येत होती. रंधा धबधब्याकडे जाणारा रस्ता मागे टाकून आम्ही जरा ब्रेक म्हणून प्रवरेच्या एका मोठ्या पुलावर गाडी थांबवली. गाडीतून बाहेर आलो आणि समोर जे दृश्य होते ते अभूतपूर्व होते. शीतल चांदण्यात खाली नदीचे पाणी चमचमत होते. जसे चांदणे खाली पाण्यावर अंथरुन ठेवले होते. मंद गार वारा वाहत होता. बराच वेळ तिथे थांबलो. आणि लवकर पोचायला पाहिजे असे बजावून निघालो.
कळसूबाईचे दर्शन झाले आणि थोडीफार रस्ता चुकल्याची जाणीव झाली. डावीकडे कळसूबाईच्या माथ्यावर आणि आजूबाजूच्या पर्वतरांगेवर अतिशय दाट ढगांनी आक्रमण केले होते. खाली स्वच्छ चांदणे आणि डोंगरमाथ्यावर दाट काळे ढग. आयुष्यात असे दृश्य पहिल्यांदाच पाहत होतो. रस्त्याच्या उजवीकडेही एका टेकडीवर तीच स्थिती. दोन्हीबाजूंनी भीतिदायक ढगांचे आक्रमण. आणि रात्री साडेतीन वाजता चुकलेला रस्ता.
तशातही समोरुन एक व्हॅन आलेली दिसली. आणि आतमध्ये एक भाऊ होते त्यांना रस्ता विचारला. "हं काय हितं, म्होरल्या साळेपास्नं लेप्ट मारा". तिथे सुहासने ढगांचे काही अद्वितिय फोटो काढले आणि पुढल्या गावातून ’म्होरल्या साळेपास्नं लेप्ट’ मारला. आता सुहासने ढगांसाठी एक नामी उपमा शोधली होती. "काय किलर ढग आहेत राव, एकदम छि***..." (छि*** = बायकांची ठेवणीतली शिवी). पुढे संपूर्ण ट्रिपमध्ये हीच उपमा ढगांना वापरली गेली. पंधरा मिनिटांत शेंडीला पोचलो. तिथून साम्रदला जायचे होते, पण रात्र बरीच झाली होती. एकवेळ तिथेच थांबावे का असा विचार केला पण सकाळी लवकर ट्रेक सुरु करायचा या हेतूने साम्रदला जायचा निर्णय घेतला. धरणाच्या उजवीकडून घाटघरच्या दिशेला वळालो आणि एक बोर्ड दिसला ’कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य’. अकोले-राजूर आणि भंडारदरा म्हणजे बिबट्यांचा पट्टा. तो एकवेळ तरी दिसावा अशी खूप दिवसांपासून इच्छा आहे पण काही पूर्ण झाली नाही. अर्ध्या तासात गाडी अतिशय खराब रस्त्यावरुन चालवत देव्याने उडदावणे गावाजवळ आणली आणि उजवीकडे ढगांमधली आजोबा-अलंग-मदन-कुलंग रांग सुरेख दिसत होती. अजून साम्रद साधारण सात-आठ किलोमीटर असेल, तेही नक्की रस्ता माहीत नव्हता. म्हणून तिथेच शाळेच्या खोखो ग्राउंडवर गाडी लावली आणि ट्रेकच्या आधी थोडातरी आराम हवा म्हणून तिथेच झोपायची तयारी केली. गावात एका घरात बाळ रात्री जागे होऊन रडून आईला जागे करत होते. त्याचा आवाज थांबला, बहुतेक माऊलीने अंगाई गाऊन पुन्हा झोपवले असणार. आम्हांलाही वार्याची अंगाई ऐकून झोप लागली आणि एका कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळेपर्यंतच तांबडे फुटले. गावातली कुत्री अंथरुणाच्या जवळ येऊन हुंगू लागली तसे आम्ही पटकन उठलो आणि पथारी सावरुन, एकदोन ठिकाणी रस्ता विचारत साम्रदच्या रस्त्याला लागलो. जाताना एका बंधार्याच्या कडेला थांबलो. रांगड्या अलंग-मदन-कुलंगशी ढग उगाचच सलगी करत होते. मधूनच उगवतीचे रंग त्यात भरले जात होते.
तिथे थोडी फोटोगिरी झाली आणि आम्ही अप्पर घाटघर कॉंक्रीट धरणमार्गे साम्रदला पोचलो. गावात एक लग्न होते. मांडव पडला होता. तिथे लगीनघाई चालली होती. बाया-बापड्या चुलीशी कसरत करत होत्या. एका काकांना विचारले "सांद्णात जायचंय, कुठून आहे रस्ता?" "रस्ता सापडणार नाही, सोबत घेऊन जा कुणी, दीप्या जा रे ह्यांच्यासंगती. सांदणाच्या तोंडाशी सोडून ये" इति काका. तसा दीप्या तयार झाला. त्याला गाडीत टाकून पुढल्या वाडीवर गाडी लावली आणि एक बिगरदुधाचा चहा मारला आणि तिथल्या एका भाऊंशी गप्पा मारत मारत सांदणाकडे निघालो.
वीसेक मिनिटे चाललो असेल आणि आम्ही दाट झाडांच्या दाटीतून एका अरुंद खिंडीशी आलो. उजव्या हाताला पाणवठा होता. नैसर्गिकपणे डोंदरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केली होती. ते अमृतासमान पाणी पिऊन आतापर्यंतचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. एक तप्पा उतरुन खाली आलो आणि समोर जे काही पाहिले त्याचे वर्णन शब्दांत शक्यच नाही. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत असावेत बहुतेक.
आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नव्हते, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी या उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी. तेही एकदम थंडगार गोठवणारे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी मुखाशी गेलो आणि समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसला त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप. आणि समोर करुळ घाटाचा कडा. तिथे साधारण तासभर थांबलो. निघावेसेच वाटत नव्हते. शीतल सावली आणि सह्याद्रीच्या दोन कड्यांच्या मध्ये, एका दरीच्या काठावर एका प्रचंड पाषाणावर आम्ही बसलो होतो. कुणाला निघावेसे वाटेल? तरी परत येणे भाग होते.
साधारण अकरा वाजले असतील, साम्रदला परत आलो. खूप थकवा आला होता. त्या भाऊंच्या घरीच पिठले भाकरी करायला सांगितली होती. गरमागरम पिठले-भकरी, हाताने फोडलेला कांदा, हातसडीच्या तांदळाचा भात असा मस्त बेत झाल्यावर छानपैकी शाळेच्या हवेशीर वर्गात तासभर ताणून दिली. ऊन मी म्हनत होते. आणि प्रचंड आर्द्रतेमुळे थकवा जात नव्हता. त्यामुळे रतनगडचा बेत रद्द केला. त्यातच माझ्या डोळ्यां काहीतरी कचरा गेला, जो जवळपास तीनतास सलत होता. डोळा सुजला होता. काहीच सुचत नव्हते. तसाच गाडीत बसलो आणि अमृतेश्वर मार्गे भंडारदरा धरणाजवळ आजचा मुकाम करायचे ठरले. अमृतेश्वरला दर्शन घेऊन मंदिर पाहून निघालो आणि आठ-दहा किलोमीटर पुढे आल्यावर कॅमेरा बॅग आतमध्ये ठेवलेल्या पाकीटासह अमृतेश्वरपाशी सरबत प्यायलो तिथे राहिल्यचे लक्षात आले. हृदयाचे कित्येक ठोके चुकले. पुन्हा तिथे गेलो तर बॅग मावशींनी जपून ठेवली होती. धन्यवाद मावशी. भंडारदर्याला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. धरणातून पाणी सोडणे चालू होते. तिथे थोडावेळ थांबलो आणि भिंतीकडे जायला निघालो तर अचानक आसपासच्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. कुणीतरी डिवचले होते. पांढरे कपडे घातलेल्यांना जास्त त्रास झाला. माझ्याशेजारून चाललेल्या एका शुभ्र ’खादी’ला चावून बेजार केले मधमाशांनी. आणि मला नोटीसही नाही केले. तिथे थोडेफार फोटो काढले आणि स्पिल-वे जवळ आलो तर पुन्हा अलंग-मदन-कुलंग रांग समोर दिसली आणि त्यापलीकडे सूर्यास्त. अहाहा... काय क्षण होता.
फोटो काढून तिथेच रात्रीचा मुक्काम करण्याचे निश्चित केले. देव्याने आणि सौमीने जाऊन सरपण आणले आणि आम्ही चूल पेटवली. अंधार पडता सूप तयार झाले आणि सर्वांनी ते फूर-फूर करुन गट्टम केले. स्पिल-वेच्या लोखंडी झडपांची काही दुरुस्ती चालू होती. रखवालदाराशी थोड्या गप्पा झाल्या. नंतर नूडल्स बनवले आणि पोटभर खाऊन गप्पा मारत पडलो. थंडी खूपच वाढली होती आता. माझे नाक जवळजवळ बंद झाले होते. म्हणून मी गाडीत जाऊन झोपलो. आणि तिघे वीर बाहेर गाडीच्या आडोशाला. एखादा घटका झोप झाली असेल तेच सुहासने तीन वाजता उठवले आणि म्हणाला थोडे उंचावर आहोत आपण, जरा खाली जाऊन ढगांचे फोटो काढू. काय नसती अवदसा आठवली त्याला फोटोंची. चरफडतच उठलो आणि गाडीत बसलो. सकाळ होईपर्यंत कुठेही फोटोसाठी चांगली जागा सापडली नाही आणि दिवस उगवता आम्ही कसारा घाट ओलांडून खाली आलो होतो. तिथे चहा पिऊन आम्ही मुरबाड-कर्जत-खंडाळा-लोणावळा मार्गे पुण्यात दुपारी बाराच्या सुमारास पोचलो...अजून एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधून!!
अधिक फोटो इथे आहेत. सौमित्रच्या अल्बमवर: http://picasaweb.google.com/soumitra.inamdar/SandhanValley
Devya: Pankya, Sandhan valley kaay place aahe rao
me: ho na. kadhi jayache? 2 divas lagatat.
Devya: Ya weekend la?
me: Done!
शुक्रवारी ऑफिसनंतर रात्री निघून वाटेत एखाद्या धाब्यावर कोंबडीला स्वर्गात पोचवून पोटपूजा करायची, तेवढाच तिचा जन्म सार्थकी लागेल. पुढे मध्यरात्री संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा) मार्गे साम्रद गावी पोचणे आणि पहाटे सांधण दरीत उतरणे असा बेत होता. मी आणि देव्या आणि मंजिरी (देव्याची बेटर हाफ) फायनल होतो. अन्य कुणी येतंय का ते विचारायला एक मेलामेली केली. सुहास आणि सौमित्र तयार झाले. त्यातच देव्याने नवीनच कार घेतलीये. म्हणून मग तिला डोंगरातल्या रस्त्यांची सवय लावणे जरुरीचे होते. पाच लोक आणि गाडी फुल. काही लोकांना ऐन वेळी नाही म्हणून सांगावे लागले. एक बरे होते. मंजिरी असल्यामुळे स्वयंपाकाची काळजी नव्हती. त्यामुळे खाण्याची ऐश होणार होती. पण नशीबच नव्हते कदाचित त्या दिवशी. काही कामास्तव तिचे येणे कॅन्सल झाले. त्यामुळे आता बरोबरच्या सुहास आणि सौमित्रला आम्ही केलेले खाणेच भाग होते (तसे खिचडी, मॅगी आणि सूप असला स्वयंपाक आम्हांला छान जमतो) पण फर्माइशी मेन्यू मिळणार नव्हता. असो...
शुक्रवारी ऑफिसला लवकरच कलटी मारून देव्याला कॉल केला. तो पण ऑफिसमध्येच होता. तिथून बाहेर पडून नूडल्स, सूप पावडर, चहाचे सामान असे काखोटीला मारुन बॅगा गाडीत कोंबल्या. सुहासच्या ऑफिसवरुन त्याला आणि सौमीला पिक केले आणि साडेनऊला वाजता गाडी नाशिक हायवेला लावली. नवीन गाडी आणि ऐसपैस जागा, त्यामुळे फारच भारी प्रवास वाटत होता. पोटात कावळे बोंबलत होते. राजगुरुनगरला आल्यावर आम्हांला माहीत असलेले चांगले हॉटेल म्हणजे स्वामिनी. गाडी लावली बाहेर आणि आत गेलो. घरी आणि ’तिकडे’ फोन करुन आता रेंज येणार नाही, फोन करु नका असे सांगून मोकळा (शब्दशः मोकळा) झालो. आत गेल्यावर आम्हांला मेनूकार्ड पहायची काय गरज, डोळे झाकून एक फुल्ल चिकन हंडी आणि रोटीची ऑर्डर. मस्त आडवा हात मारुन ताव मारला. ग्रेव्हीची टेस्ट फारच मस्त होती. तिथे एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा होता. माझे वजन केले आणि चक्क ते चार किलो अधिक झाल्याचे पाहून माझे मलाच मूठभर मांस चढले.
आता गाडी संगमनेरच्या रस्त्याला लागली. मागे बसलेल्या सुहास आणि सौमीच्या पोटातली कोंबडी पेंगायला लागली आणि आमची जास्त बडबड करायला लागली. पुणे नाशिक रोड म्हणजे खूप वाईट ड्रायव्हिंग अनुभव. समोरुन येणार्या गाड्या अचानक बाहेर निघून ओव्हरटेक करतात. मध्येच कुठे काम चाललेले, कुठे खड्डे. त्यात समोरच्या हेडलाईटचा त्रास. संगमनेरला पोचता पोचता दीड वाजला होता. अजून बराच टप्पा गाठायचा होता. पुढे काही मिळणार नाही म्हणून संगमनेर नाक्यावर चहा मारला. एसटी स्टॅंडला लागूनच अकोलेकडे जाणारा रस्ता आहे. तिथून गाडी डावीकडे वळवली. पूर्वी कळसूबाईच्या ट्रेकला येताना याच रस्त्याने गेल्यामुळे रस्ता माहीतच होता. पण रात्री थोडे पुढे गेल्यावर चौकात सगळेच रस्ते एकसारखे दिसू लागले. आता एवढ्या रात्री कोणाला विचारणार? एक शाळा (की सभागृह) दिसली. तिथून आवारातून एक बाईक ’टिब्बलशीट’ बाहेर येत होती. त्यांना विचारले. त्यांची गाडी ’टाईट’च होती (एवढ्या रात्री दुसरे कोण भेटणार). त्यांना रस्ता विचारला तर मागे बसलेल्या दोन जणांनी दोन दिशांना हात दाखवले. नशीब गाडी चालवणारा तिसरा होता त्याच्या हातात गाडीचे हँडल होते, नाहीतर त्याने तिसरी दिशा दाखवली असती. शेवटी तेच म्हणाले या आमच्या मागे. थोडे पुढे जाऊन बोर्ड दिसला "अकोले". रस्ता एकदमच सुपर. समोरुन गाड्या नाहीत आणि एकही खड्डा नाही. गाडी ९०-१०० ने जात होती. अर्ध्या तासात अकोले आणि पुढे राजूरचा रस्ता. थोडेफार ढग डोंगरांच्या माथ्यावर दिसत होते. अगदीच किरकोळ पुंजके. चंद्रप्रकाश एवढा होता की गाडीच्या हेडलाईट बंद करुनही गाडी चालवता येत होती. रंधा धबधब्याकडे जाणारा रस्ता मागे टाकून आम्ही जरा ब्रेक म्हणून प्रवरेच्या एका मोठ्या पुलावर गाडी थांबवली. गाडीतून बाहेर आलो आणि समोर जे दृश्य होते ते अभूतपूर्व होते. शीतल चांदण्यात खाली नदीचे पाणी चमचमत होते. जसे चांदणे खाली पाण्यावर अंथरुन ठेवले होते. मंद गार वारा वाहत होता. बराच वेळ तिथे थांबलो. आणि लवकर पोचायला पाहिजे असे बजावून निघालो.
कळसूबाईचे दर्शन झाले आणि थोडीफार रस्ता चुकल्याची जाणीव झाली. डावीकडे कळसूबाईच्या माथ्यावर आणि आजूबाजूच्या पर्वतरांगेवर अतिशय दाट ढगांनी आक्रमण केले होते. खाली स्वच्छ चांदणे आणि डोंगरमाथ्यावर दाट काळे ढग. आयुष्यात असे दृश्य पहिल्यांदाच पाहत होतो. रस्त्याच्या उजवीकडेही एका टेकडीवर तीच स्थिती. दोन्हीबाजूंनी भीतिदायक ढगांचे आक्रमण. आणि रात्री साडेतीन वाजता चुकलेला रस्ता.
वरील फोटो रात्री ३:३०वाजता काढला आहे. फोटोग्राफर: सुहास .
तशातही समोरुन एक व्हॅन आलेली दिसली. आणि आतमध्ये एक भाऊ होते त्यांना रस्ता विचारला. "हं काय हितं, म्होरल्या साळेपास्नं लेप्ट मारा". तिथे सुहासने ढगांचे काही अद्वितिय फोटो काढले आणि पुढल्या गावातून ’म्होरल्या साळेपास्नं लेप्ट’ मारला. आता सुहासने ढगांसाठी एक नामी उपमा शोधली होती. "काय किलर ढग आहेत राव, एकदम छि***..." (छि*** = बायकांची ठेवणीतली शिवी). पुढे संपूर्ण ट्रिपमध्ये हीच उपमा ढगांना वापरली गेली. पंधरा मिनिटांत शेंडीला पोचलो. तिथून साम्रदला जायचे होते, पण रात्र बरीच झाली होती. एकवेळ तिथेच थांबावे का असा विचार केला पण सकाळी लवकर ट्रेक सुरु करायचा या हेतूने साम्रदला जायचा निर्णय घेतला. धरणाच्या उजवीकडून घाटघरच्या दिशेला वळालो आणि एक बोर्ड दिसला ’कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य’. अकोले-राजूर आणि भंडारदरा म्हणजे बिबट्यांचा पट्टा. तो एकवेळ तरी दिसावा अशी खूप दिवसांपासून इच्छा आहे पण काही पूर्ण झाली नाही. अर्ध्या तासात गाडी अतिशय खराब रस्त्यावरुन चालवत देव्याने उडदावणे गावाजवळ आणली आणि उजवीकडे ढगांमधली आजोबा-अलंग-मदन-कुलंग रांग सुरेख दिसत होती. अजून साम्रद साधारण सात-आठ किलोमीटर असेल, तेही नक्की रस्ता माहीत नव्हता. म्हणून तिथेच शाळेच्या खोखो ग्राउंडवर गाडी लावली आणि ट्रेकच्या आधी थोडातरी आराम हवा म्हणून तिथेच झोपायची तयारी केली. गावात एका घरात बाळ रात्री जागे होऊन रडून आईला जागे करत होते. त्याचा आवाज थांबला, बहुतेक माऊलीने अंगाई गाऊन पुन्हा झोपवले असणार. आम्हांलाही वार्याची अंगाई ऐकून झोप लागली आणि एका कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळेपर्यंतच तांबडे फुटले. गावातली कुत्री अंथरुणाच्या जवळ येऊन हुंगू लागली तसे आम्ही पटकन उठलो आणि पथारी सावरुन, एकदोन ठिकाणी रस्ता विचारत साम्रदच्या रस्त्याला लागलो. जाताना एका बंधार्याच्या कडेला थांबलो. रांगड्या अलंग-मदन-कुलंगशी ढग उगाचच सलगी करत होते. मधूनच उगवतीचे रंग त्यात भरले जात होते.
तिथे थोडी फोटोगिरी झाली आणि आम्ही अप्पर घाटघर कॉंक्रीट धरणमार्गे साम्रदला पोचलो. गावात एक लग्न होते. मांडव पडला होता. तिथे लगीनघाई चालली होती. बाया-बापड्या चुलीशी कसरत करत होत्या. एका काकांना विचारले "सांद्णात जायचंय, कुठून आहे रस्ता?" "रस्ता सापडणार नाही, सोबत घेऊन जा कुणी, दीप्या जा रे ह्यांच्यासंगती. सांदणाच्या तोंडाशी सोडून ये" इति काका. तसा दीप्या तयार झाला. त्याला गाडीत टाकून पुढल्या वाडीवर गाडी लावली आणि एक बिगरदुधाचा चहा मारला आणि तिथल्या एका भाऊंशी गप्पा मारत मारत सांदणाकडे निघालो.
वीसेक मिनिटे चाललो असेल आणि आम्ही दाट झाडांच्या दाटीतून एका अरुंद खिंडीशी आलो. उजव्या हाताला पाणवठा होता. नैसर्गिकपणे डोंदरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केली होती. ते अमृतासमान पाणी पिऊन आतापर्यंतचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. एक तप्पा उतरुन खाली आलो आणि समोर जे काही पाहिले त्याचे वर्णन शब्दांत शक्यच नाही. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत असावेत बहुतेक.
आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नव्हते, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी या उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी. तेही एकदम थंडगार गोठवणारे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी मुखाशी गेलो आणि समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसला त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप. आणि समोर करुळ घाटाचा कडा. तिथे साधारण तासभर थांबलो. निघावेसेच वाटत नव्हते. शीतल सावली आणि सह्याद्रीच्या दोन कड्यांच्या मध्ये, एका दरीच्या काठावर एका प्रचंड पाषाणावर आम्ही बसलो होतो. कुणाला निघावेसे वाटेल? तरी परत येणे भाग होते.साधारण अकरा वाजले असतील, साम्रदला परत आलो. खूप थकवा आला होता. त्या भाऊंच्या घरीच पिठले भाकरी करायला सांगितली होती. गरमागरम पिठले-भकरी, हाताने फोडलेला कांदा, हातसडीच्या तांदळाचा भात असा मस्त बेत झाल्यावर छानपैकी शाळेच्या हवेशीर वर्गात तासभर ताणून दिली. ऊन मी म्हनत होते. आणि प्रचंड आर्द्रतेमुळे थकवा जात नव्हता. त्यामुळे रतनगडचा बेत रद्द केला. त्यातच माझ्या डोळ्यां काहीतरी कचरा गेला, जो जवळपास तीनतास सलत होता. डोळा सुजला होता. काहीच सुचत नव्हते. तसाच गाडीत बसलो आणि अमृतेश्वर मार्गे भंडारदरा धरणाजवळ आजचा मुकाम करायचे ठरले. अमृतेश्वरला दर्शन घेऊन मंदिर पाहून निघालो आणि आठ-दहा किलोमीटर पुढे आल्यावर कॅमेरा बॅग आतमध्ये ठेवलेल्या पाकीटासह अमृतेश्वरपाशी सरबत प्यायलो तिथे राहिल्यचे लक्षात आले. हृदयाचे कित्येक ठोके चुकले. पुन्हा तिथे गेलो तर बॅग मावशींनी जपून ठेवली होती. धन्यवाद मावशी. भंडारदर्याला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. धरणातून पाणी सोडणे चालू होते. तिथे थोडावेळ थांबलो आणि भिंतीकडे जायला निघालो तर अचानक आसपासच्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. कुणीतरी डिवचले होते. पांढरे कपडे घातलेल्यांना जास्त त्रास झाला. माझ्याशेजारून चाललेल्या एका शुभ्र ’खादी’ला चावून बेजार केले मधमाशांनी. आणि मला नोटीसही नाही केले. तिथे थोडेफार फोटो काढले आणि स्पिल-वे जवळ आलो तर पुन्हा अलंग-मदन-कुलंग रांग समोर दिसली आणि त्यापलीकडे सूर्यास्त. अहाहा... काय क्षण होता.
फोटो काढून तिथेच रात्रीचा मुक्काम करण्याचे निश्चित केले. देव्याने आणि सौमीने जाऊन सरपण आणले आणि आम्ही चूल पेटवली. अंधार पडता सूप तयार झाले आणि सर्वांनी ते फूर-फूर करुन गट्टम केले. स्पिल-वेच्या लोखंडी झडपांची काही दुरुस्ती चालू होती. रखवालदाराशी थोड्या गप्पा झाल्या. नंतर नूडल्स बनवले आणि पोटभर खाऊन गप्पा मारत पडलो. थंडी खूपच वाढली होती आता. माझे नाक जवळजवळ बंद झाले होते. म्हणून मी गाडीत जाऊन झोपलो. आणि तिघे वीर बाहेर गाडीच्या आडोशाला. एखादा घटका झोप झाली असेल तेच सुहासने तीन वाजता उठवले आणि म्हणाला थोडे उंचावर आहोत आपण, जरा खाली जाऊन ढगांचे फोटो काढू. काय नसती अवदसा आठवली त्याला फोटोंची. चरफडतच उठलो आणि गाडीत बसलो. सकाळ होईपर्यंत कुठेही फोटोसाठी चांगली जागा सापडली नाही आणि दिवस उगवता आम्ही कसारा घाट ओलांडून खाली आलो होतो. तिथे चहा पिऊन आम्ही मुरबाड-कर्जत-खंडाळा-लोणावळा मार्गे पुण्यात दुपारी बाराच्या सुमारास पोचलो...अजून एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधून!!
अधिक फोटो इथे आहेत. सौमित्रच्या अल्बमवर: http://picasaweb.google.com/soumitra.inamdar/SandhanValley
01:20
मी भटकंती का करतो?
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!!
हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-)] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून. बऱ्याच उत्तरांमध्ये खाज, माज, मस्ती, रग आणि तत्सम शब्दही ऐकू आले :-) आणि ते नाही आले तरच नवल... कारण त्याशिवाय काही माणूस पहाटे साडेतीनला उठून गाडी दामटवत सह्याद्रीच्या ऊन-वाऱ्यात झोकून द्यायचा नाही.
मला आठवतंय जेव्हा मी पहिला ट्रेक (?) केला... चौथीतच होतो. शेंबूड पुसायची पण अक्कल नव्हती. शेजारच्या काही मंडळींबरोबर मी आणि पप्पा डबे घेउन सिंहगडावर निघालो होतो. त्या वेळी सिंहगड म्हणजे "अबब... किती दूर आहे" अशी अवस्था होती. स्कूटरमधे (Bajaj Cub - 1987 model) कँपात सिल्व्हर ज्युबिलीच्या पंपावर पेट्रोल टाकले आणि आम्ही स्वारगेटवरुन व्हाया सिंहगड रोड खानापूरला पोचलो. तिकडे पप्पांनी सांगून टाकले की मी गाडीवर वरती येणार आणि तुम्हांला चालत यायचे तर या. आजच्या एवढीच खाज होती त्यावेळी ना... मग आम्ही चालत वर गेलो होतो. येही सरळ रस्त्याने न जाता शॉर्टकट मारत मारत. वरती पोचता पोचता पप्पा रुमाल हलवून आम्हांला प्रोत्साहन देत होते. आजही मला वाटचाल करताना ते आज नसले तरी त्यांचीच मूर्ती समोर दिसते, प्रोत्साहन देणारी. हा माझा पहिला धडा. त्यानंतर चौथीला प्रतापगड पाहिला. सहावीला असताना शाळेत असताना बाईंनी विचारले होते सहलीला कुठे जायचे तर माझे उत्तर सिंहगड होते. आणि माझ्या सांगण्यावरुन गेलोही तिकडे. सगळ्यात आधी मीच.. वर चढण्यात, सगळी ठिकाणे दाखवण्यात आणि खाली उतरण्यात पण (कारटं पहिल्यापासूनच आगाऊ आहे).
खरा ट्रेक केला तो लोहगड... सन-२००० च्या पावसाळ्यात. पहिलटकरणीसारखी अवस्था होती. ट्रेक म्हणजे नक्की काय करायचे असते ते माहीतही नव्हते. पण वरती पोचल्यावर जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते. आम्ही जात असतानाच लोहगडवाडीतून परत येणारा ग्रुप दिसला आणि त्यात एक अंध मुलगा...
लोहगडावर मुक्कामी ट्रेक करुन ते परत निघाले होते. तेव्हाच वाटले हे की बास इथून पुढे कधीच थकायचं नाय, दमायचं नाय. आजवर जे काही ट्रेक केलेत, किल्ले पाहिलेत त्यात प्रत्येक वेळी तो अनामिक मुलगा माझे स्फूर्तिस्थान राहिला. असाच अनुभव मला गेल्या वर्षी पुरंदर-वज्रगडाच्या ट्रेकमधे आला. पायाने अधू असणारा एक अनामिक ट्रेकर गड चढून वर आलेला मी पाहिला. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." आता सांगा हे असे शिक्षण कुठल्या विद्यापीठात आणि किती पैसे फेकून मिळेल?
लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.
शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा
भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याची सर KFCला नाही.
या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
(बाजूचा माझा फोटो सुहासने काढला आहे.)
आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-)] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून. बऱ्याच उत्तरांमध्ये खाज, माज, मस्ती, रग आणि तत्सम शब्दही ऐकू आले :-) आणि ते नाही आले तरच नवल... कारण त्याशिवाय काही माणूस पहाटे साडेतीनला उठून गाडी दामटवत सह्याद्रीच्या ऊन-वाऱ्यात झोकून द्यायचा नाही.
मला आठवतंय जेव्हा मी पहिला ट्रेक (?) केला... चौथीतच होतो. शेंबूड पुसायची पण अक्कल नव्हती. शेजारच्या काही मंडळींबरोबर मी आणि पप्पा डबे घेउन सिंहगडावर निघालो होतो. त्या वेळी सिंहगड म्हणजे "अबब... किती दूर आहे" अशी अवस्था होती. स्कूटरमधे (Bajaj Cub - 1987 model) कँपात सिल्व्हर ज्युबिलीच्या पंपावर पेट्रोल टाकले आणि आम्ही स्वारगेटवरुन व्हाया सिंहगड रोड खानापूरला पोचलो. तिकडे पप्पांनी सांगून टाकले की मी गाडीवर वरती येणार आणि तुम्हांला चालत यायचे तर या. आजच्या एवढीच खाज होती त्यावेळी ना... मग आम्ही चालत वर गेलो होतो. येही सरळ रस्त्याने न जाता शॉर्टकट मारत मारत. वरती पोचता पोचता पप्पा रुमाल हलवून आम्हांला प्रोत्साहन देत होते. आजही मला वाटचाल करताना ते आज नसले तरी त्यांचीच मूर्ती समोर दिसते, प्रोत्साहन देणारी. हा माझा पहिला धडा. त्यानंतर चौथीला प्रतापगड पाहिला. सहावीला असताना शाळेत असताना बाईंनी विचारले होते सहलीला कुठे जायचे तर माझे उत्तर सिंहगड होते. आणि माझ्या सांगण्यावरुन गेलोही तिकडे. सगळ्यात आधी मीच.. वर चढण्यात, सगळी ठिकाणे दाखवण्यात आणि खाली उतरण्यात पण (कारटं पहिल्यापासूनच आगाऊ आहे).
खरा ट्रेक केला तो लोहगड... सन-२००० च्या पावसाळ्यात. पहिलटकरणीसारखी अवस्था होती. ट्रेक म्हणजे नक्की काय करायचे असते ते माहीतही नव्हते. पण वरती पोचल्यावर जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते. आम्ही जात असतानाच लोहगडवाडीतून परत येणारा ग्रुप दिसला आणि त्यात एक अंध मुलगा...
लोहगडावर मुक्कामी ट्रेक करुन ते परत निघाले होते. तेव्हाच वाटले हे की बास इथून पुढे कधीच थकायचं नाय, दमायचं नाय. आजवर जे काही ट्रेक केलेत, किल्ले पाहिलेत त्यात प्रत्येक वेळी तो अनामिक मुलगा माझे स्फूर्तिस्थान राहिला. असाच अनुभव मला गेल्या वर्षी पुरंदर-वज्रगडाच्या ट्रेकमधे आला. पायाने अधू असणारा एक अनामिक ट्रेकर गड चढून वर आलेला मी पाहिला. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." आता सांगा हे असे शिक्षण कुठल्या विद्यापीठात आणि किती पैसे फेकून मिळेल?
लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.
शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा
भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याची सर KFCला नाही.
या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
रोहनच्या ब्लॉगवरुन साभार
गोनीदा सांगतात ना...
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"
(बाजूचा माझा फोटो सुहासने काढला आहे.)आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
अजून काही आहे तुमच्यासाठी:
घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक
माझ्याबद्दल थोडेसे
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक
सुरक्षित ट्रेक
ट्रेकर्सचे वाक्प्रचार
10:25
नववर्षाचे भटकंती स्पेशल कॅलेंडर.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आजवर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी भटकंती केली. ४०,००० किमी बाईकवर आणि काही वेळा कार, सार्वजनिक वाहने, एसटी, जीप अशा अनेक मार्गाने. आतापर्यंत फक्त ५३ (च) किल्ले झालेत. इथे लिहिलेल्या प्रत्येक ब्लॉगपोस्टला आपण गेल्या वर्षी भरभरुन प्रतिसाद दिलात. त्याच दुर्गतीर्थांच्या काही फोटोंचा वापर करुन बनवलेले हे एक नववर्षाचे कॅलेंडर आपणासाठी भेट म्हणून. असाच प्रतिसाद कायम राहू द्या. आम्ही भटकत राहूच...!!!
पहिल्या वर्षाचे पान इथे पोस्ट केले आहे. संपूर्ण PDF कॅलेंडर येथून डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड करा आणि लिंक इतरांबरोबर शेअर करा.
आजवरचे डाऊनलोड्स:
चिअर्स...!!!
Hello friends,
I have been wandering in Sahyadri for last few years, which includes 40,000km on bike and sometimes by other vehicles too. While writing a blog posts of those visits and treks of 53 forts I have been capturing the frames of nature through my lens. Here is the calendar made out of those pics for you. Hope you will like this. Keep visiting.
I have posted a first page of calendar here. Complete PDF calendar can be downloaded from THIS link. Download and share the link.
Total Downloads:
Cheres...!!!

हे सुद्धा...
घनगड- नववर्षाचा पहिला ट्रेक.
भटकंती २००९- मागे वळून पाहताना.
२००८- नववर्षाची बाईक ट्रिप.
20:50
घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक
च्यायला, (ही शिवी नाही हे जगजाहीर आहे आता. शंका असेल तर इथे वाचा)
सगळी दुनिया "A" म्हणाली की आम्ही "Z" म्हणणार. लोक "थर्टी फस्स" कुठे आणि कशी 'डोलवायची' याचा विचार करत होते आणि मी एक जानेवारीला भटकंती सीझन कसा जागा करायचा हे शोधत होतो. पण यंदा आमच्या तायडीचे 'वाजवायचे' असल्याने कामं पण चालू होणार होती. "फक्त याच वेळी जातो मग कामं करुच", "अर्ध्या दिवसात परत येतो" असे नेहमीप्रमाणे याही वेळी घरी पटवून बेत फिक्स केला. पण कुठे? ’कावळ्या’ किल्ला कसा आहे ते सौमित्राला विचारून घेतले. पण वरंधा घाटातली खिंड म्हणजे कावळ्या असे ऐकायला मिळाले. मग त्याने काही खाज जाणार नाही म्हणून जरा अजून स्पेशल किल्ल्याचा शोध लागला. तो म्हणजे ’घनगड’. मग शोधाशोध करुन एकमेव लिंक मिळाली. इतर लिंक्समध्ये तीच माहिती copy-paste केलेली. एक रॉक पॅच होता २० फूटांचा. म्हटले बास हेच तर पाहिजे होते आपल्याला. हर्क्युलस-वैभवला फोन केला. गडी एका न्यू इयर पार्टीत होता. त्याला एकच व्यसन आहे (नाही, नाही तीर्थप्राशन नाही)... हलणारी कोंबडी आणि बोकड दिसले की तो पिसाळतो. म्हणूनच एका पार्टीत गेला होता. रात्री अकरा वाजता ट्रेक फायनल झाला. म्हणजे लिटरली 11th hour ला. ट्वीट करुन टाकले. अजून एक तयार झाला- सचिन (शून्य). पण त्याचा प्रॉब्लेम होता की चार वाजता खूप लवकर होईल. म्हणून मग त्याला आख्खी १५ मिनिटे जास्त दिली :-)
सकाळी साडेतीनला सगळ्यांना फोन करुन उठवून दिले आणि मी परत थोडी झोप काढली (शेवटच्या १५ मिनटांचे सुख, दुसरे काय?). ब्रश करुन ’शंभो’ला सुट्टी देऊन गाडी चालू केली. कॅमेरा बॅग, दोरी आणि पाण्याची बाटली उचलली आणि वैभवला जंगली महाराजवर भेटलो. नळस्टॉपला अमृतेश्वरमध्ये चहा झाला (पहाटे साडेतीनपसून हमखास चहा मिळण्याचे ठिकाण). तिथे सगळे लोक रात्रीच्या तीर्थावर उतारा म्हणून चहा घ्यावा या उद्देशाने आलेले होते. तिथून चांदणी चौक. सचिनची वाट पाहता पाहता रस्त्याने नववर्षाची सरलेली रात्र झिंगत जाण्याची अनेक उदाहरणे दिसली. रात्री ’धारा’तीर्थी पडलेले वीर सकाळी आपापल्या घरची वाट चालू लागलेले होते. मग सचिन आला पण पेट्रोल नाही गाडीत अशी गूड न्यूज घेऊन. पंधरा मिनिटांत पेट्रोल पैदा करुन आम्ही निघालो मुळशीच्या दिशेने. शहरातून बाहेर पडताच थंडी मी म्हणायला लागली. कान पॅक करुन अशी काही गाडी बुंगवली म्हणता हर्क्युलसने की विचारता सोय नाही. टिपूर चांदणे पडले होते. त्याचा प्रकाश एवढा होता की हर्क्युलस मध्येच हेडलाईट बंद करुन त्या चांदण्यात गाडी चालवत होता. हाडं गोठवणारी थंडी, भरारलेला वारा आणि सत्तरच्या वेगाने उडनाऱ्या आमच्या गाड्या. काहीही करुन सुर्योदयापूर्वी गड गाठायचा होता. मुळशी जलाशय आणि ताम्हिणी गाव अंधारातच मागे सोडून आम्ही लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्याला वळालो. आता कोरसबारस मावळात प्रवेश केला होता. नेहमी आम्ही जिथे पडीक असतो तो ’सिक्रेट लेक’ मागे टाकून आम्ही भांबर्डे गावच्या रस्त्याला लागलो. एव्हाना तांबडे फुटले होते. गाडीखालचा रस्ता आता आपले रस्ता हे नाव सोडून ’मोटोक्रॉस ट्रॅक’ हे नाव धारण करू लागला होता. फक्त पसरलेली खडी आणि उखडलेले मोठे दगड... यालाच रस्ता म्हणायचे होते. नवरा-नवरी-भटजीला डावीकडे ठेवून आम्ही भांबर्डे गावात पोचलो. तिथे ’एकोले’ गावाची चौकशी केली. हेच ते घनगडाच्या पायथ्याचे गाव. गावात पोचलो तेव्हा चांगलेच उजाडले होते पण ढगांचे आच्छादन होते म्हणून सूर्यदर्शन घडले नव्हते. कदाचित निसर्ग पण आमच्या साथीला होता. सूर्यदर्शन आम्हांला गडमाथ्यावरुनच घडवायचे होते.
गावात चौकशी करुन गाड्या लावल्या. हेल्मेट्स एका काकांच्या घरात ठेवली. आणि त्या दोन घरांच्या मधून वरची वाट धरली. साडेसात वाजले होते. छान थंडगार वारा सुटला होता. तो बाधू नये म्हणून कान झाकले होते. दूरवर तेलबैलाची जुळी कातळभिंत आणि त्यामागे असणारी उगवतीची विरुद्ध दिशेची लाली मनाला भावली होती.
ती कॅमेराबद्ध करुन वर निघालो. पंधरा-वीस मिनिटांतच एका मंदिरापाशी पोचलो. "श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची" दर्शन घेऊन आम्ही मंदिराला डावी घालून वरच्या दिशेने निघालो. दहाच मिनिटांत एका दोन डोंगरांच्या बेचक्यात येऊन पोचलो. पलीकडचे विहंगम दृष्य दिस्त होते. विरळ धुक्याने भरलेली दरी आणि खाली कोकणाचा परिसर. वारा तर एवढा भर्राट होता की उभेही राहता येत नव्हते. खाली थोड्याच अंतरावर एक भलामोठे पाषाण एकावर एक रचून ठेवले आहेत असे निसर्गशिल्प दिसले. आणि या जादूगाराला सलाम केला. तिथून परत थोडे खाली उतरून उजवीकडची वाट दोन बुरुजांमध्ये असलेल्या दरवाजापाशी घेऊन जाते. तिथूनच थोडे वर चढून गेले की थोडीशी विसाव्यालायक मोकळी जागा आहे. समोर दोन गुहा आहेत.
येथून पुढे खरी चढाई सुरु होणार. विशेष नाही, फक्त एक २०-२५ फूटांचा कातळ आहे. वरती एक गुहा आहे. आधी वैभवने प्रयत्न केला. पण त्याला एके ठिकाणाहून पुढे जायला होल्ड्स मिळाली नाहीत. त्याच्या वजनासाठी तशीच मजबूत होल्ड्स पाहिजे होती. परिणामी तो परत खाली आला. मग मी सरसावलो. ५०-५२ किलोचाच देह, वजन ही एकमेव गोष्ट, जी मला फारच कमी मिळाली, पण त्यामुळे सरसर वर पोचलो. एक दगडात ठोकलेली रिंग होती, तिथे दोरी लावून खाली सोडली. सचिनने प्रयत्न सोडून दिले. वैभव वर आला. मग त्याच दोरीचा आधार घेऊन सातेक फूटांचा आडवा ट्रॅवर्स मारुन आम्ही सुरक्षित जागी पोचलो. तिथे एकावर एक अशा तीनचार गुहा होत्या. आता सोपी वाट होती. दहा मिनिटांमध्ये वरती पोचलो. वर दोनचार पाण्याची टाकी आणी जुन्या घरांची काही जोती आहेत. एक दोन बुरुजांचे अवशेषच काय ते सुस्थितीत म्हणता येतील. बाकी वारा मात्र मुबलक. पलीकडे कोकण, कोकणातल्या घाटवाटा, तेलबैला, सुधागड यांचे विहंगम दृश्य आहे.
आता निसर्ग पण प्रसन्न झाला आणि आम्हांस सूर्यदर्शन घडले. निळ्या बिछायतीवरुन पिसासारख्या ढगांच्या रजईआडून हलकेच सूर्य बाहेर आला आणि नववर्षाचा पहिला सुर्योदय आम्ही अनुभवला. मग टाकोटाक परतीचा मार्ग धरला आणि १५ मिनिटांतच खाली पायथ्याला उतरलो. सकाळी साडेनऊला संपणारा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच ट्रेक. रस्ता बदलण्यासाठी म्हणून लोणावळामार्गे परत येण्याचा निर्णय घेतला. ’रामकृष्ण’ मध्ये दाबून ब्रेकफास्ट केला आणि पुणे-मुंबई हायवे मार्गे पुण्यात पोचलो. येताना मंजिरीकडून मला या वर्षीचा सगळ्यात सुंदर न्यू इयर SMS मिळाला "जुन्या दिवसांची आठवण ठेवत आता नवीन कॅलेंडर टांगायचं, ’तूही सुखाच्या राशी घेऊन ये’ असं नवीन वर्षाला सांगायचं"... वा काकू, काय टायमिंग साधलंय...!!!
नववर्ष साजरे झाले आणि तो पण एका एकांत जागी, बेलाग कड्यावरुन वर गेल्यावर. सह्याद्रीच्या कुशीतल्या गडावरुन. आम्हां भटक्यांना यापेक्षा वेगळ्या न्यू इयर पार्टीचे काय अप्रूप असणार? अशी झिंग आणि नशा कुठल्या न्यू इयर पार्टीत कितीही पैसे फेकले तरी मिळेल काय? सगळी गात्रं उल्हसित झाली. नववर्षाची सुरुवात छान झाली. वर्षभरासाठी भर्राट रानवारा कानांत साठवून घेतला. आता आम्ही वर्षभर उधळूच कानांत वारा भरलेल्या वासरासारखे...
[पण एक झाले राव, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ’शंभो’ला दांडी. अरे बापरे... वर्ष असेच जाते की काय? डिओचा खप वाढणार यंदा बहुतेक :-) ]

Fact file:Name: Ghan-gad/Dhan-gadBase village: Ekole-Bhambarde, Tal- Mulashi-Maval Dist-Pune (actual fort is in Raigad district).Route: Pune-Pirangut-Mulashi-Tamhini-Pimpri-Bhambarde-Ekole OR Pune-Lonavala-INS Shivaji-Ambavane-Bhambarde-Ekole.Distance: around 100km from Pune.Tips: Avoid rainy season because of slippery rock patch. September to April.Stay: Not required. But can be done in Garjai temple on the way or in Ekole village. Caves not suitable coz of uneven flooring.
नववर्ष साजरे झाले आणि तो पण एका एकांत जागी, बेलाग कड्यावरुन वर गेल्यावर. सह्याद्रीच्या कुशीतल्या गडावरुन. आम्हां भटक्यांना यापेक्षा वेगळ्या न्यू इयर पार्टीचे काय अप्रूप असणार? अशी झिंग आणि नशा कुठल्या न्यू इयर पार्टीत कितीही पैसे फेकले तरी मिळेल काय? सगळी गात्रं उल्हसित झाली. नववर्षाची सुरुवात छान झाली. वर्षभरासाठी भर्राट रानवारा कानांत साठवून घेतला. आता आम्ही वर्षभर उधळूच कानांत वारा भरलेल्या वासरासारखे...
[पण एक झाले राव, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ’शंभो’ला दांडी. अरे बापरे... वर्ष असेच जाते की काय? डिओचा खप वाढणार यंदा बहुतेक :-) ]
आणखी काही ट्रेक्स:
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक
रायरेश्वराचे पठार आणि केंजळगड
ढाकोबाचा थ्रिलर
कळसूबाईचा नादखुळा ट्रेक
12:42
भटकंती-२००९: मागे वळून पाहताना...
हा हा म्हणता २००९ सरले. कित्येक बऱ्या वाईट गोष्टी घडल्या. काही तर अशा की जन्मभर लक्षात राह्तील अशा. कित्येक नवीन अनुभव, नवीन ट्रेक, नवीन फोटोशूट्स, बाईक सफरी, काही तरी शिकवणारे अनुभव (काही तर कायमचा धडा देणारे पण).
या वर्षी सुरुवातीलाच ठरवले होते की एवढा महागडा कॅमेरा अपग्रेड आहे तर किमान पातळीवर तरी फोटोग्राफीचा दर्जा उंचावला पाहिजे. थर्टी फस्सची रात्र जागवून न्यू इयर सेलिब्रेट करणारातला मी नाही. उलट त्या दिवशी वेळेवर झोपून नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यात काही औरच मजा आहे. हा शिरस्ता गेली काही वर्षं मी पालतोय. बरेच वेळा ट्रेकची आखणीच १ जानेवारीला धरुन झाली होती. पण यंदा घरीच होतो. १ जानेवारीला काही मित्रांबरोबरची संध्याकाळची कॉफी तेवढी झाली. पण त्याने काही भटकंतीचा माज (आणि खाज) काही जात नाही. म्हणून मग ३ जानेवारीला सौमित्रबरोबर एक मस्त बाईक ट्रेल टाकला.

पुणे-मुळशी-सहारा सिटी-लोणावळा-भाजे लेणी असा कार्यक्रम घेतला. कडाक्याच्या थंडीत, प्रसंगी गाडीच्या सायलेन्सरवर हात शेकत सूर्योदयाच्या आधी बाईक चालवण्यातले थ्रिल अनुभवले. तेव्हाच माझी एक लेन्स लेण्यांतल्या जमिनीवर आदळून जवळ-जवळ माझे प्राण कंठाशी आणून राहिली. हा जवळपास २००किमीचा ट्रेल सौमित्रासाठी पण थ्रिलिंग अनुभव होता. लोणावळ्यातून निघून पाऊण तासात पुणे गाठले होते त्या वेळी (त्यानंतर तो पुन्हा माझ्याबरोबर बाईकवर ट्रेलला आला नाही ही गोष्ट वेगळी).

जानेवारीमध्येच काही पक्षी निरीक्षणास्तव पानशेत आणि सिंहगड व्हॅलीला काही ट्रिप झाल्या. मग अनपेक्षितपणे दक्षिण गोव्याची ट्रिप ठरली. आधी गोव्याला कित्येकदा गेलेलो असलो तरी ही ट्रिप म्हणजे खऱ्याखुऱ्या पोर्तुगीज दक्षिण गोव्याची सफर होती. तीन दिवस निवांत आणि अगदी "आऊट ऑफ दि बॉक्स" ठिकाणांची भटकंती झाली. तिकडेच खेकड्याचे किंवा देवमाशाचे आंबटतिख, कालामारी आणी होममेड व्हिनेगार टाकून केलेला माशांचा रेषाद मसाला या स्वर्गीय पाककृतींचा शोध लागला.

खरा आणि authentic गोवा कशाला म्हणतात ते या ट्रिपमध्येच समजले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपला हॅप्पी बड्डे असतो (तुमच्या शाळेत खाऊ त्याचाच मिळत होता). त्त्यानंतरच्या वीकेंडला पुन्हा मुळशीमध्ये एक ट्रिप मारली (कुठेच जात नाही तेव्हा मला घरचे मुळशीमध्ये शोधायला येतात, तिकडेच पडीक असतो).
फेब्रुवारी महिन्यात महाबळेश्वरची पण एक वारी घडली. नाही म्हणायला पुणे जिल्ह्यात देवघर धरण परिसरात गेलो होतो. त्याला निमित्त होते माझी नवीन लेन्स. नुकतीच घेतलेली Canon 10-22mm घेऊन देवघरला काही फोटो काढले होते. लेन्स अगदीच सॉल्लीड आहे ही. मी स्वतःच मला दिलेले हे वाढदिवसाचे गिफ्ट बरं का!!
आता वेध लागले होते स्टारट्रेलचा फोटो घेण्याचे. बरीच खटपट करुन शटर रिलीज केबल मिळवली आणि फोटोसाठी इंटरेस्टिंग जागेचा शोध सुरु केला. रायगड सोडून दुसरे ठिकाण असणे शक्यच नव्हते. मग काय केले कूच. तिथे टकमक टोकावर घालवलेली रात्र, ऐकलेली आरडी, आशा, गुलजारची गाणी, सुखद गारठा... अहाहा.. स्वर्ग काय यापेक्षा वेगळा असतो का? आणि असला तरी पाहिजे कुणाला तो?

एव्हाना जोरदार ब्लॉगिंग चालू झाले होते. आणि फोटोगिरी पण. भुलेश्वरला जाऊन दोन वेळा तो शिल्प-खजिना पाहून आलो. सुट्ट्या शिल्लक होत्या म्हणून बंगळूर, मैसूर, उटीला चक्क एकटाच जाऊन आलो. एप्रिल हा सातारा जिल्ह्यासाठी राखीव होता बहुधा. वाई-मेणवलीला फोटोग्राफर्स@पुणेचा शूट झाला आणि लाईट चांगला मिळाला नाही म्हणून मी परत काही मित्रांना घेऊन दुसऱ्या दिवशी परत गेलो.मेच्या उन्हाळ्यात विशेष
भटकंती झाली नाही. पण हरिश्चंद्रगडाची खूप दिवस रखडलेली वारी मात्र घडली. सकाळी लवकर उठून कवडी, खराडी-मुंढवा पूल, EON IT Park, वीर धरण असे काही शूट
मात्र चालूच होते. जूनच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पानशेत आणि दुसऱ्या दिवशी दिवेआगार अशी छान ट्रिप झाली. पावसाळ्याच्या आधी जूनमध्ये मच्छीमार बांधव बोटी समुद्रातून बाहेर काढून किनाऱ्यावर लावून ठेवतात. त्याचे काही भरडखोलच्या किनाऱ्यावर सुंदर फोटो मिळाले.
जुलैला मात्र ट्रेक सीझन फुल फॉर्मात आणायचे नक्की केले होते. सुरुवात झाली खंडाळा-लोणावळा-मुळशी अशा एका लॉंग ड्राईव्हने. सगळीकडे हिरवी वनराई, दाट धुके आणि असंख्य धबधब्यांच्या साक्षीने झालेला तो ड्राईव्ह स्वर्गाची अनुभूती देणारा ठरला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ट्रेकचा फील येण्यासाठी सिंहगड, राजगड, तोरणा अशी एक दुर्ग-दूर-दर्शन भ्रमंती झाली.
मग काय जी काही गाडी सुटली आमची.. मग मिळतील ते सवंगडी घेऊन जुलै-ऑगस्टमध्ये पुरंदर-वज्रगड, तुंग, दाऱ्या घाट आणि बाळूगड, ढाकोबा आणि दुर्ग किल्ला असे एकेक किल्ले सर करत गेलो. पण दोन ट्रेकचे

नेहमी स्वप्न पाहिले होते मी.. ते म्हणजे महाराष्ट्रातले अत्युच्च शिखर कळसूबाई आणि राजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर. अशाच एका मस्तीत कळसूबाईचा नादखुळा ट्रेक झाला आणि पाठोपाठ रायरेश्वर-केंजळगड पण. दरम्यान ऑफिसमधली एक जवळची मैत्रीण resign करुन मुंबईला गेली, तेव्हा फार रिकामे-रिकामे वाटले होते. नंतर समजले की तेव्हाची ब्लॉगपोस्ट "आजूबाजूच्या रित्या खुर्च्या" वाचून तिच्या नवऱ्यालाही वाटले की उगाच आपण तिला मुंबईला शिफ्ट केले. तिनेही ती पोस्ट कौतुकाने घरच्या सगळ्यांना प्रिंट काढून दाखवली (माझी इंटरनेटच्या बाहेर गेलेली ती एकमेव पोस्ट असावी बहुधा).
सप्टेंबर उजाडला तोच काही विचित्र भटकंतीच्या आयडिया घेऊन. एका बाजूला फोटोग्राफर्स@पुणेच्या प्रदर्शनाची तयारी जोरात सुरु केली होती. एकदा मुळशीला फक्त धबधबे आणि वाहत्या पाण्याचे फोटो काढून आलो. पुन्हा एकदा पाबे घाटात जाऊन भटकून आलो. पण एक जबरी ट्रेक हवा होता. तो कंड शमवला पदरगडावर. तब्बल अकरा तासांचा तो भैसटलेला ट्रेक म्हणजे मी केलेला आजवरचा जरा ’स्पेशल’च होता.

सप्टेंबरच्या शेवटी वेध लागले ते किनारपट्टीच्या बाईक सफरीचे. मग पुढाकार घेऊन जोरदार प्लॅन आखणी करुन १४ जणांच्या साथीने एकूण ११५०किमीचा अविस्मरणीय "Coastal Prowl" मारला. त्याच ट्रिपमध्ये माझे किल्ल्यांचे अर्धशतक पूर्ण झाले. एकट्या ऑक्टोबरमध्ये मुळशी-ताम्हिणीत लपलेल्या स्वर्गीय तलावाकडे चार ट्रिपा झाल्या. अशी सुंदर जागा सगळ्या जगात कुठे सापडली नव्हती मला.
दरम्यान फोटोग्राफर्स@पुणेच्या प्रदर्शनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. तीनही दिवस पुणेकरांनी फोटोग्राफ्सना भरभरुन दाद दिली. आणि आम्ही केलेल्या कामाचे चीज झालेले पाहून एक वेगळे समाधान पण मिळाले.
असेच काही फोटो शूट्स होत राहिले आणि डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा कोकण वारी घडली. यावेळी मात्र अतिशय

वेगळी. एकदम निवांत, कुठेच कसली घाई नाही, चार दिवसांत फक्त वेंगुर्ला आणि आसपासचे काही बीच आणि कोकणी लोकजीवन अनुभवले. आजवर कधीच न पाहिलेला कोकण अनुभवता आला. माडबन आणि निळ्या समुद्राची गाज सर्वांगात साठवून घेतले. एक नवी ऊर्जा मिळाली अशीच भटकंती पुढील वर्षीही करायला.
सरते वर्ष माझ्यासाठी खूप काही देणारे ठरले. मी उत्साहाने ब्लॉगिंग करायला लागलो. खूप भटकंती घडली. आयुष्यात बरेच काही शिकवणारे प्रसंग घडले. किल्ल्यांचे अर्धशतक पूर्ण झाले. काही जबाबदाऱ्या पार पाडण्याची स्वप्नं पाहिली होती. ती आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. खूप काही शिकायला मिळाले. नवीन मित्र लाभले. जुन्यांचे प्रेम वृद्धिंगत झाले. एकंदरीत मी सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देतो आहे.
सगळी नावं इथे लिहिणे अवघड आहे. म्हणूनच २००९ मध्ये माझ्या सुख-दु:खात साथ देणाऱ्या, फोटोशूट्स आणि ट्रिप्समध्ये बरोबर असणाऱ्या, नियमितपणे भेट देऊन ब्लॉग वाचणाऱ्या, स्तुती (आणि निंदाही) करणाऱ्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...!!!

हेही वाचा:
Epilogue-2008
10:29
फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो.
मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.
तिकडे आपण पिरंगुट, माले, मुळशी, वारक, चाचवली अशी गावे मागे टाकत, मुळशी धरणाच्या पाण्याला वळसा घालून गेलो की एक रस्ता पुलावरुन उजव्या हाताला लोणावळ्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे गेले की
एक देवराई लागते. मग एक श्रीमंत लोकांचा योगा आश्रम आणि एक लहानसे पठार लागते. तिथे एक मोठी दरी (घळ) आहे जिथून खाली कोकणाचा नजारा दिसतो. थोडे अजुन पुढे गेलात की डाव्या हाताला एक-दोन तलाव आहेत. पहाटे सुर्योदयापूर्वी पोचले तर तलावाचे पाणी अगदी काच लावल्यासारखे संथ असते. माग हळूहळू जसा जसा सूर्य वर येतो तसातसा निसर्गाचा एक पट आपल्यसमोर उलगडतो.

तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.

तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...
© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com

13:00
साद सागराची, सफर किनारपट्टीची: दुसरा दिवस
घड्याळजींचे काटे (डिजिटल घड्याळातले आकडे) आणि अलार्म सकाळचे सात वाजलेत, आता उठा असा ठणाणा करताहेत. काल रात्री तुफान पाऊस बरसलाय. एकदोनदा तर दचकून जागे झालो एवढा मुसळधार पाऊस पडला. पण सकाळी थोडी उघडीप दिलीये. घंटासिंग, हैबती, मंगू वगैरे मंडळी लोक उठून बसलीत. अर्धा तास झाला घंटासिंग ’आतमधे’ बसलाय. बाकीचे ’खोळंबलेत’. कालचा पिझ्झा त्रास देत असावा बहुतेक :-)
आठला सगळे रेडी झाले. ’मेर वाला ब्लू’ म्हणत भावनाने आज मॅचिंग नेलपेंट लावली आहे. देवगडचा किल्ला आणि आणि लाईट हाऊस पाहून आल्यावर आम्ही चेक-आऊट करणार आहोत. त्यामुळे बॅगा गाडील बान्धायची घाई नाही. गावापासून जवळच असलेला देवगड ह सागरी किल्ला पहायला निघतोय आता. एसटी स्टॅंडसमोरुन जाणारा हा रस्ता सरळ देवगड बंदराच्या बाजूने किल्ल्यात जाईल. गावातून पुढे आल्यावर बंदरात सगळ्या मच्छीमार बोटी नांगरून ठेवल्यात. म्हणजे समुद्र खवळलेला आहे हे नक्की. आकाश भरलेलेच आहे. आम्ही किल्ल्यात पोचतो न पोचतो तेच पावसाची पीरपीर सुरू झाली.
गाड्या थेट किल्ल्यात घुसल्या. म्हणजे तसा रस्ताच आहे. पार्क करुन कॉंक्रीटच्या नागमोडी 'पाथवे' वरुन आम्ही आधी लाईट हाऊसकडे निघालो. वाटेत हे एक डावीकडे पुरातन गणपती मंदिर. त्या तटबंदीत बंदिस्त विस्तीर्ण माळावर असलेल्या मोजक्या इमारतींपैकी हे एक. बाकी आहेत त्या
दीपगृहाच्या कर्मचाऱ्यांची क्वार्टेर्स आणि थेट आकाशाला भिडलेले देवगड लाईट हाऊस. दर्शन घेऊन आम्ही दीपगृहाच्या गेटजवळ आलो. कुलुप आहे, पण आमचा आवाज ऐकून ते काका आले. खरंतर भरतातली सगळी दीपगृहे संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत जनतेला पाहण्यासाठी खुली असतात आणि आम्ही आलो होतो सकळी साडेआठला. पॅटने कालच त्यांच्याशी बोलून परवानगी मिळवली होती. अगदी रीतसर तिकीट काढून आम्ही आत दाखल झालो. गोल जिना चढून वर आलो. मग त्या काकांनी माहेती सांगायला सुरुवात केली. दीपग्रुहे, त्यांची रचना, त्यांचा प्रकाश सोडन्याचा खास कोड असलेला पॅटर्न, त्यावरून होणारे लाईट हाऊसचे आयडेंटिफ़िकेशन, मुंबईच्या कंट्रोल सेंटरमधून आणि उपग्रहाद्वारे होणारे नियंत्रण, विजेचा पुरवठा, बॅटरी बॅकप, स्टेपर मोटर, आतल्या मुख्य दिव्याची तीव्रता, इमर्जन्सी दिवा अशी सगळी उपयुक्त महिती मिळाली. वरुन दिसणारा नजारा अवर्णनीय होता. कुठे सुमात्रा बेटांवर झालेला भूकंप आणि समोआ बेटांवर त्यामुळे उद्भवलेली सुनामीची बातमी ताजी होती. त्यामुळेच अरबी सागरही आज खूपच अस्वस्थ दिसतो आहे हेही त्या गार्डने आम्हाला सांगित्ले. वरून कही फोटो घेऊन आम्ही खाले आलो आणि किल्ल्यच्या तटावरुन फेरी मारली आणि गाड्यांजवळ परत आलो. तिथेच आमच्या कोस्टल प्राउलची पहिली बाईक पंक्चर झाली- राकाची गाडी. बरे झाले आदरानातल्या रस्ताऐवजी मुख्य गावाजवळ झाला हा प्रताप. तडक राका तिला दवाखान्यात घेऊन गेलाय आणि उरलेले आम्ही एका गाडीवर ट्रिपल सीट करुन गेस्ट हाऊसला परत आलोय. गरमागरम पोहे आणि चहा झाल्यावर आम्ही आत विजयदुर्गकडे निघू. राका पण आला बाईक नीट करुन. बॅगा आवळल्या, पुन्हा एक CP- 2 , Day 2 ग्रुप फोटो झाला आणि आम्ही बाहेर पडलोय. माझ्या गाडीचा एक आरसा गायब झाल्याने मला एक डोळा झाकल्यासारखे वाटतय. (मला दोन्ही आरसे आणि हेल्मेट असल्याशिवाय गाडी चालवता येत नाही). म्हणून मग बजाजचे शोरुम-सर्व्हिस सेंटर पाहून गाडी आत घातली. मग सगळ्यांनी आपापल्या बाईक्स चेकप करून घेतल्या आहेत. हो हो... निघालो आम्ही विजयदुर्गाकडे. साधारण तीस-बत्तीस किमीचा लहानसा टप्पा आहे. त्यात
रस्ता एकदम सुपर. मग काय आम्ही गेम खेळल्याप्रमाणे बाईक्स बुंगवत, ७०-८०-९० ला गाड्या टच करत 'पडेल तिठा' या गावी लेफ़्ट मारून विजयदुर्गला सव्वाबाराला शिवलो. आत आलो, इथे भक्कम बांधणीचा किल्ला आहे. तितकाच मोठी पण. वळणदार दरवाजातुन(हत्ती किंवा लकडी ओंडक्याने तोडताना वेग घेता येऊ नये म्हणून किल्ल्याचे दरवाजे असे बांधतात) आत गेल्यावर समोर सदर आणि दारूखाना आहे. त्या दरवाजाला 'जिबीचा दरवाजा' म्हणतात. त्यात आमच्यातल्या एकाने रडू येणारा जोक मारला "किती GB चा?" (ओळखा पाहू कोण तो?)

आता गडतटावरोन एक फेरी मारू आपण. प्रचंड मोठे किल्ला आहे हा. पूर्ण फेरी मारायला एक तास लागणार. वर आकाशात असंख्य समुद्रगरोड, ब्राम्हणी घारी (मासेखाऊ!) घिरट्या घालत आहेत. समोर एका झाडावर Malabar Pied Hornbill (मराठी नाव धनेश) दिसतोय. पाहतो जरा लेन्स बदलून, नशीब असेल तर फोटो चांगला मिळेल. अरे पेअर आहे. वा... कडक फोटो मिळाले. एकतर इन फ़्लाईट. माझी मीच पाठ थोपटून घेतोय या यशस्वी फोटोसाठी.
गड्फेरी आटोपली. २ वाजलेत आणि पोट खाऊ मागतंय. जवळच्याच हॉटेलमधे घुसलो. आमची ऑर्डर म्हणजे मासे आणि मालवणी कोंबडी. तिकडे मॅन्गोच्या पोटात दुखायला लागले. शनिवार आहे म्हणून आज तो घासफूस खातोय. शेवटची फ़्रायची ऑर्डर तर आम्ही खास त्याला जळवायला म्हणून दिली. जेवण संपवून बाहेर आल्यावर आमच्या लक्षात आलय तो एरिया बरा नव्हता. एकदम चांदनी बार मोहल्ला होता. पटकन तिथून काढता पाय घेतला. आता पुढचा रन थोडा मोठा होता. जैतापूरची खाडी ओलांडून पूर्णगड आटोपून पावस मार्गे रत्नागिरीला पोचयचे आहे. पुन्हा पडेल तिठा वरुन जैतापूरला जाणारा रोड धरला. विजयदुर्गवरुन आल्यावर त्या तिठ्यावरून सरळ जायचे आणि लगेच पुढचा डावीकडचे वळण घ्यायचे. रस्ता थोडा (सध्यातरी) खराब आहे. फक्त खडीकरण झालेला. बरोबर आहे की नाही अशी शंका घ्यायला लावणारा. पुढे तर हा रस्ता अगदी कच्चा होतो. समोरुन स्पेंडरवर एक अतिलहान मुलगा येतोय त्याला विचारू. ए... ए... थांब जरा २ मिनि... त्याचे उत्तर आले "अहो अहो पाय टेकत नाहीत, थांबता येत नाही."
आणि पुढे जाऊन एका सिमेंट पाईपवर पाय टेकवून थांबला. आम्ही त्याच रस्त्याने पुढे निघतो. आता दोन्ही बाजूंना विस्तीर्ण हिरवीगार मैदाने मधोमध असणारा लाल मातीचा खासा कोकणी रस्ता. 'डोंगरतिठा' या गावातून उजवीकडे वळालो आणि रस्ता पुन्हा एकदम भारी झाला. पुन्हा बाईक्सनी वेग घेतला आणि आम्ही २ तासांचा प्रवास संपवून जैतापूरच्या खाडीच्या तीरावर पोचलो. आता काम आहे गाड्या पडावातून पलीकडे नेणे. पुलाचे काम चालू आहे, एक सहा महिन्यांआत काम पूर्ण होइलच. गाड्या उचलून पडावात ठेवयला लागणार. एक वेळी चारच गाड्या नेता येणार. मग सगळ्यात आधी बुलेट नावाचा राक्षस चढवायला जीव गेला. त्यात इंजिन आणि सायलेन्सर बेक्कार तापलेले. कशातरी गाड्या आणि आमचे वीर पल्याड आले. चहाने सर्वजण फ्रेश झाले।

आणि साडेपाचला ताज्या दमाने पुढे निघालो. आता टारगेट ’पूर्णगड’. पूर्णगडला पोचलो तेव्हा अंधारुन यायला लागले. गावात विचरले तेव्हा आमच्याकडे लोक वरपासून खालपर्यंत पाहून घ्यायचे आणि मगच सांगायचे. एकाने तर तुम्ही नक्की जाणार का? गाड्यांवर जाणार का? असे विचारून घेतले. मग आम्हाला पण पोहचू की नाही अशी शंका येऊ लागली. पण मनाचा हिय्या करुन आम्ही पूर्णगडाकडे निघालो. रस्ता फारच वाईट होता. मोठेमोठे दगड आणि निसरडा चिखल यांचा एकत्रित परिणाम होऊन सम्यक एकदोन वेळा घसरला. आता फार अंधार झाला. त्यामुळे आम्ही पावणेसातला प्रयत्न सोडून दिला आणि परत रत्नागिरीकडे निघालोय- करुच हा (अ)पूर्णगड पुन्हा कधी तरी!!
पावस मागे टाकत रत्नागिरीला रात्री पावणेआठला पोहोचलो. रस्ता फार सुरेख होता. काहीच त्रास झाला नाही. रत्नागिरीला आमच फोटोग्राफर्स@ पुणेचा मित्र- डॉ.गौरव पाटील राहतो. त्याने राहण्याचे सोय पाहून ठेवली आहेच. त्याला फोन लावला. त्याने आणि त्याच्या बाबांनी आम्हाला आणून सोडले. एका मंगलकार्यालयात उतरलो. रूम वगैरे अशी भानगडच नाही. स्वच्छ जमिनीवर मधोमध दोन ओळींत टाकलेल्या गाद्या आणि कडेला एकावर एक रचलेली खुर्च्याची चळत असा जंगी थाट. केअरटेकरने रात्री गरम पाणी द्यायला नकार दिल्याने थोडी कुरबुर झाली पण आता सगळ्यांनी एडजस्ट केलय (शेवटी अशा तडजोडीच कुठलीही ट्रिप यशस्वी करतात, त्याबद्दल सर्वांचे खास आभार). मग आम्ही सगळे फ्रेश होइपर्यंत कहीतरी टाईमपास म्हणून शिक्रांतला त्याच्या आज अजिबात नसलेल्या वाढदिवसाबद्दल बडव बडव बडवलय (बर्थडे बंप्स) आणि शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यांनी हातपाय साफ करुन घेतले. बिचारा घंटासिंग...!!!
आता रात्रीचे जेवण. घासफूस गॅंग आणि आजचा आमचा फितूर मॅन्गीने आज चेंज म्हणून डोसा, दाबेली, पाव-भाजी अशा पदार्थावर आडवा हात मारायचे नक्की केलंय आणि आम्ही उगाच पाप नको म्हणून 'प्युअर नॉन वेज' हॉटेल शोधत निघालोय. अरे हे काय, गौरवने सांगितलेले हेच की ते हॉटेल दरबार. शिवाजी स्टेडियम जवळ. आत बसलो तर लो़क बिर्याणी झोडताहेत. पण आम्हाला मासे हवेत. म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या चार थाळ्या ऑर्डेर केल्या. पाऊण तास लावला त्याने आणायला. आणले तर काय एकदम बकवास ग्रेव्ही, सगळ्या प्रकारच्या माशांसाठी एकच टाईपची... बिर्याणी बरोबर फूकट देतात ती. आणि चायनीज स्टाईलने कॉर्न फ़्लोअरमधे तळलेले मासे. एकंदरीत वाईट जेवण कसे असावे याचा एक उत्कृष्त नमुना म्हणजे दरबार मधले मासे (बिर्याणी बहुतेक खूप भारी असेल, कारण सगळे लोक येऊन तेच खात होते).
बाकी वेज मंडळी खूश होती. साधा डोसा, मसाला डोसा, भेळ, दाबेली, पाव-भाजी आणि मिल्कशेकने तृप्त झाले होते. चला त्यांना किमान आज तरी बरे जेवण मिळाले.
मुक्कामाच्या जागी आल्यावर सगळ्यांना गणेशगुळेचा बीच पहायचा असेल तर पहाटे पाचला उठा अशी तंबी दिली. पुन्हा एकदा पाच-सात कॅमेऱ्यांमध्ये दिवसाचा रिव्ह्यू घेउन मंडळी झोपी गेलीत. हा हैबती तर चक्क घोरायला लागलाय. आणि मी बसलोय ब्लॉगच्या नोंदी काढत, वाचकांनो तुमच्यासठी...!!!
आजचा प्रवास:
देवगड-लाईट हाऊस: ३ किमी
देवगड-विजयदुर्ग: ३० किमी
विजयदुर्ग-जैतापूर: ~६० किमी
जैतापूर-पूर्णगड: ~३० किमी
पूर्णगड-पावस: १६ किमी
पावस-रत्नागिरी: २० किमी
खादाडी पॉइंट्स:
देवगडमध्ये निवांत रेसॉर्टला नाष्टा.
विजयदुर्गला किल्ल्याच्या बाहेरचे हॉटेल.
जैतापूरला खाडी ओलांडली की समोरचे चहाची सोय करणारे घर/दुकान
रत्नागिरीला हॉटेल दरबार (अजिबात जाऊ नका) आणि भेळ चौपाटी.

21:11
साद सागराची, सफर किनारपट्टीची: पहिला दिवस

सगळी तयारी झाली. प्लॅन ठरलाय आणि एकदाची १ ऑक्टोबरचा वर्किंग वीकडे संपला.
आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि सातारा रोडवर मुंबईकर, नागपूरकर सगळ्या मंडळींनी वेळेवर हजेरी लावली आहे.
बाईक्स नुकत्याच ट्रकमध्ये लोड करुन कोल्हापूरला पाठवल्या आहेत. होपफुली त्या वन पीस पोचतील. एका जरी बाईकला काही झाले तर आमच्या वेळापत्रकाची टोटल ’लागणार’ आहे. तरी पहिल्या दिवशीच्या प्लॅन मध्ये बफर टाईम जरा सैल हातानेच ठेवलाय. पावसाच्या बातमीने जरा काळजी पण वाटते आहे.
थोड्याच वेळात आम्ही पुन्हा स्वारगेटला एकत्र भेटू आणि त्याचवेळी एक ओळखपरेड पण होइल. पहिलाच दिवस आहे तर खायला थोडे ’घासफूसच’ बरे राहील. म्हणून मग वैभव आणि मी 'प्युअर वेज' नावाचा प्रकार खाल्ला आहे. आणि त्याच्याच फ़्लॅटवर TP करतो आहे. मंगेश मुंबईवरुन आलाय. सॅंडी बॅगबरोबर झटापट करतोय. आणि यावेळी भावानाचा फोन आला. तिने एक स्टंट मारलाच. बस रात्री साडेअकराला सुटणार आहे आणि तिने मला दहा वाजता फोन करुन तिच्याकडे हेल्मेट नही अशी ’खुशखबर’ दिली आहे (टाळ्या...!!!). तरी मी तिला गेल्या रविवारीच विचारले होते की माझ्याकडे एक्स्ट्रा हेल्मेट आहे आणि ते तिला हवंय का? तेव्हा चांगली नाही म्हणाली की हो! पण काय करणार? तिची हेल्मेट वाली मैत्रीण आज ऑफिसलाच आली नाही. बाईक ट्रिपचा शून्य नंबरचा नियम आहे ’helmets compulsory’. मग तिथून पुढे धावपळ आणि शोधाशोध. दुकाने पण बंद झालीत. मग एक मित्राला फोन केला आणि मग सौरभने हेलमेट आता स्वारगेटला तिच्याकडे आणून दिलंय.
जेवण उरकले आणि सगळे बॅगा आणि भरलेली पोटे सावरत स्वारगेटला पोचलोय.
आता ओळखपरेड:
मी पंकज ऊर्फ पॅंकी ऊर्फ भटकंती unlimited
वैभव ऊर्फ बॅबो ऊर्फ हैबती
संदीप ऊर्फ सॅंडी
मंगेश ऊर्फ मॉंग ऊर्फ मॅंगी
भावना ऊर्फ मॅचिंग नेलपेंटवाल्या मॅडम
आम्रपाली ऊर्फ मॅंगोलिझर्ड ऊर्फ ’मुंडी तेरी’
पूजा मॅडम
निकुंज ऊर्फ निक
प्रतीक म्हणजे पॅट्रिक ऊर्फ पॅट
सुयोग भाई
राका डॉन
दीप म्हणजे बाबा अफगाणी
सम्यक भाऊ
आणि श्रीकांत म्हणजे घंटासिंग ऊर्फ शिक्रांत- रडू येईल असे जोक सांगणारा.
म्हणजे अवघा संयुक्त महाराष्ट्र हजर झाला. एक सो एक सगळे पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर...!!!
कोलापूरसाठी बस येइल आणि आम्ही बुकिंग आधीच केले असल्यामुळे ऐटीत बसुन रवाना होऊ.
अरे ही काय, आलीच बस. पण लहान पिक-अप बस... ती आम्हाला सिंहगड रोडच्या त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन चालली आहे आणि मग तिथून पुढे वॉल्वोने कोल्हापूर. बॅगा नीट ठेवून आम्ही (कमीत कमी बाईक्स चालवणारे गडी) मिळेल तेवढी झोप पदरात पाडण्याचा प्रयत्न करू. पण असे काही फोन असतात जे रात्रीच करावे लागतात, ते पण खुसर-फुसर करत बोलायचे असतात. तासाभरात ते संपून झोप लागली. कोंडुसकरांची ही नॉन स्टॉप पुणे-कोल्हापूर बस एक छान सेवा आहे. आणि त्याहून उच्च आहे पुणे-बंगलोर हायवे. पोटातले पाणीही न हलता आम्ही पहाटे साडेतीनलाच कोल्हापूरला पोचलोय. बऱ्यापैकी आरामशीर झोप झली. महामंडळाच्या बसपेक्षा जास्त दिलेले पैसे वसूल झाल्यासरखे वाटले. आता पुढचे काम आहे बाईक्स घेउन येणारा ट्रक शोधणे, बाईक्स उतरवणे आणि फ्रेश होऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणे.
नाक्यावर उतरलो. ट्रक समोर वाटच पाहत होता. आणि आल्यावर बाईक्स उतरवून घेतल्या. पण थोडी निराशा
झाली. माज़्या बाईकचा आरसा त्याच्या लोखंडी बार सहित कुणीतरी काढून नेला. दीपची गाडी खाली पडून थोडे फायबरचे आणि टेल-लॅम्पचे थोडे नुकसान झाले. पण राकेशची बाईकच्या टाकीची वाट लागली होती. एक वाईट डेंट पडला होता, कमीत कमी ४ इंच व्यासाचा आणि एक दीड इंच खोल. नशिबाने सगळ्या बाईक्स चालू स्थितीत आहेत.
स्टँडवर पोचल्या पोचल्या एकेक चहा आम्ही सर्रकन घशाखाली सोडला. सॅन्डीच्या घरी सगळे फ़्रेश झालो. सकाळी जसे काही विशिष्ट राग गायले जातात तसे सकाळी मारण्याचे जोक्स पण वेगळे असतात. त्यात वाघ मारणे, गाडी रद्द होणे, डाउनलोड एरर, त्यामुळे येणारे ऑडिबल अलर्ट्स असे शब्दप्रयोग चालतात. आमचा असा पाचकळपणा चालला होता. आमचा सॅंडी गडी नवीन घर बांधतोय. म्हणजे लवकरच विकेट पडणार हे आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटेल का? काकूंनी म्हणजे सॅंडीच्या आईने केलेले वाफाळते उपीट आणि कडक चहाने जीव सकाळपुरता का होईना तृप्त झाला. भावनाने मॅचिंग नेलपेंट लावली, आम्ही जड बॅगा गाडीला बांधल्या. त्याच वेळी आम्रपाली गाडीवर बसायच्या आधीच खाली पडली. शेजारी श्रीकांत होता. म्हणजे मुलींना खाली पाडण्याचा मागच्या Coastal Prowl चा रिवाज त्याने कायम ठेवला होता (मागच्या वर्षी थांबलेल्या गाडीवरुन २ जणींना पाडण्यात यश आले होते त्याला). हातावर साख्रर घेऊन आम्ही निघालो. गाड्या ओरडत होत्या "माझा खाऊ मला द्या". मग मोर्चा पेट्रोल पंपाकडे वळवला. टाक्या फुल्ल केल्या आणि मंदिराकडे कूच केले. सकाळी लवकर पोचल्यामुळे विशेष गर्दी नही आणि दर्शन पण व्यवस्थित घडले.
मंदिराच्या आवारात गाड्या ओळीने लावून नारळ फोडून श्रीगणेशा केला. सगळ्यांचा सुंदरसा ग्रुप फोटो काढला.

गाडीचे जेवाय-जेवाय करुन झाले होते. टाक्या फुल्ल करून झाल्यात. स्पीडोमीटर नोंदवून घेतलाय. आणि सव्वा आठला सुरु झाला आमचा खरा Coastal Prowl . टायरमधे हवा चेक करणे बाकी आहे पण. उजव्या हाताला पावसाने तुडुंब भरलेल्या रंकाळ्याला वळसा घालून आम्ही फोंडा घाटाकडे मार्गस्थ निघालोय. थोडे पुढे येऊन एक टायरची टपरी दिसली. कोल्हापूरच्या सगळ्याच गोष्टी दणदणीत-रांगड्या. आपण पुण्या-मुंबईत हवा भरताना पुढे आणि मागे अनुक्रमे २५-३५ युनिट भरतो, पण तिथल्या भाऊने प्रत्येक गाडीत ३५-४० युनिट हवा भरली. आम्ही पण दूरचा प्रवास म्हणून शांत राहिलोय.
रस्त्याची क्वालिटी सुपर भन्नाट आहे. गाड्या छान ७०-८० ने बुंगवता येताहेत. पण आमच्यातला एक १८०क्क चा राका डॉनवाला राक्षस स्पीड पकडत नाहिये. त्यामुळे थोडे अंतर जाऊन आम्हाला थांबावे लागतंय. टॉप क्वालिटी रोडवर असे होणे परवडणारे नाही. फोंडा घाटात प्रवेश करताच मन प्रफुल्लित झाले. गर्द हिरवे जंगल आणि थंड हवा लडिवाळ करून जात आहे. फोंडा गावात चहा मारला, राकाने कटिंगच्या दुकानाबाहेर जॉन अब्राहमच्या फोटोसमोर फोटो काढला आणि दाजीपूरच्या जंगलातून पुढे निघालोय आता. इथे रस्ता तर एकदमच सॉलिड आहे. वरून झाडांची छत्री आणि गाड्या ९० ला सहज टच करताहेत. राका सोबत पॅट्रिकची बुलेट सावकाश येतेय. सुयोग ती चालवत होता. एका वळणावर बुलेट रस्त्याच्या खाली उतरली आणि जरा घसरली. विशेष काही झाले नाही पण हा एक अलार्म कॉल आहे, गाड्या काळजीपूर्वक चालवण्यासाठी.
पुढे आल्यावर एक विस्तीर्ण तलाव लागला. तिथे एका खड्ड्यातून माझी गाडी थांबवताना फूटभर उडाली आणि पडता पडता वाचली. घाटाच्या मधोमध खिंडीत पोचलोय आता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीने
स्वागत केलंय, "येवा कोकण आपलाच असा..." आणि ती पार करताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. घाटातून खाली कोकणाचे अदभुत दर्शन घडतय. घाटातून गाड्या वळवत उताराने कोकणात उतरयचे आता. स्वागतच जोरदार पावसाने झाले. पावसाळी जॅकेट्स बाहेर आले. कॅमेरे आणि माणसे झाकली गेली. मुंबई-गोवा महामार्ग NH-17 वर पोचता पोचता पाऊस मुसळधार बनलाय. थांबण्याशिवाय पर्याय नाही. एका बंद टपरीच्या आडोशाला थांबलो. जोर कमी झाल्यावर पुढे निघू. पॅटची बुलेट काही तरी त्रास देतेय. एका बाजूला ओढतेय ती. पुढच्या फोर्कला काही वेल्डिंग करावे लागणार आहे. कणकवलीला पॅट थांबून ते काम करतोय. त्याचा SMS आलाय की तुम्ही मालवणला पोचा मी मागून येतो. कसाल या गावाजवळ आम्ही NH-17 सोडला आणि मालवणसाठी उजवीकडे वळालो. एव्हाना कोकणातला पाऊस म्हणजे काय चीज आहे याची प्रचिती आलीये. धूवून कढतोय तो एकदम. पण आम्ही तेवढेच निगरगट्ट. ३०-३५ किमीचा टप्पा पाऊण तासात पार करोन आम्ही दुपारी अडीचला मालवणात पोचलो आहे.
आता पहिले काम पोटोबा! दुपारी अडीचला जेवायला मिळणे कोकणातल्या मालवणसारख्या लहान गावात असते. आधी मालवणात दोन वेळा येण्याचा अनुभव असल्याने कुठे जेवायला मिळेल हे माहीत आहे आपल्याला. डायरेक्ट गाड्या बांबू हाऊसच्या अंगणात उभ्या केल्या. पावसामुळे पुढचा देवगडला पोचायचा बेत धोक्यात आला होता. त्यात पॅट आणि सुयोग कणकवलीत राहिलेत. त्यांन फोन करुन जेवून घ्यायला सांगितले. पावसामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या बोटी बंद आहेत. त्यामुळे इथे प्रथमच येणाऱ्या पब्लिकची जरा निराशा झाली. पण इलाज नाही. पावसामुळे ’मालवण पाण्यामधे किल्ला’ पाण्यामधेच राहिला. आता २ पर्याय आहेत आमच्याकडे. एकतर तातडीने जेवून देवगड गठणे किंवा मालवणात मुक्काम करुन पुढचा प्लॅन रि-शेड्युल करणे. आम्ही सर्वानुमते पहिला पर्याय निवडला. पॅट आणि सुयोगला डायरेक्ट देवगड गाठायला सांगितले आहे.
कोकणात येउन मासे न खाणे म्हणजे आमच्यासठी पातक, घोर पातक!!! घासफूस पब्लिकची जरा जेवणात निराशाच झाली आहे. पण कोकणात असे होतेच. भाज्यांची मजल पिवळा बटाटा, कोबीची भाजी, मटकीची उसळ अशा ’चवदार’ पदार्थांपलीकडे जात नाहे. कीडेखाऊ लोकांसाठी मात्र सुरमई, बांगडे, पापलेट, हलवा, कोलंबी, तिसर्या (शिंपले), वाम, कोंबडी वडे असे ’साधेसुधे’ खाणाऱ्याचा कलीजा खलास करणारे पर्याय असतात. तिथे आम्ही जेवण चापले आणि वर सोलकढी रेटून हाणली.

रस्ता विचारुन देवगडचा रस्ता धरला. डावीकडे समुद्रातल्या सिंधुदुर्गाचे दर्शन घेत आम्ही सुसाट निघालो. सोलकढी असर दाखवायला लागली आहे. गाडी चालवता चालवता डोळे झाकायला लागलेत. मग आचऱ्याला एकेक कडक कॉफी मारली. आणि ताजेतवाने होऊन पुढे कूच केले. काही अंतर गाड्या बुंगवून झाल्यावर कुणकेश्वराचा बोर्ड दिसल्यावर आपोआप थांबल्या. ८ किमीवरच आहे तर का सोडा म्हणून आत वळालो. मंदिर एकदम प्रशस्त आहे. फार सुंदर. देऊळवाड्याच्या तटालाच भरतीच्या लाटा न्हाऊ घालतात. सागरतीरी सुंदर मंदिर, उसळणाऱ्या लाटा, वाळूची पुळण, काही मासेमारीच्या बोटी, थोडी सागरी धुरकट हवा एकदम छान मूड जमलाय
बऱ्यापैकी फोटो मिळाले आहेत. मग तृप्त मन आणि कॅमेराने परत फिरलो आहे. आता देवगड गाठणे, तेही अंधार पडायच्या आत आवश्यक आहे. पुन्हा गाडीला किक/बटन दिला आणि नॉन स्टॉप देवगडला पोचलो.
पॅट्रिक आणि सुयोगने लवकर आल्यामुळे राहण्याची सोय शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला पण निवडणुकीमुळे MTDCशिल्लक नाही. तिथून एक नंबर मिळालाय पण शक्यता धूसरच आहे. पण तिथे जाऊन पाहतो तर छन रुम होत्या. ३ रुम्स मिळाल्या. पटकन रक्कम ठरवून सामान टाकले. कोरडे झालो आणि गरम पाण्याने अंघोळ करुन फ्रेश झालो आहोत सगळे. पुन्हा एकदा जवळच वसंत-विजय नावाच्या हॉटेलमध्ये आमचे जेवण विथ फिश झाले आणि तृप्त झालो. वेज लोकांनी पिझ्झावर काम भागवलंय.
सगळी मंडळी भरलेली पोटे सावरत कॅमेऱ्यात दिवसाचा रिव्यू घेऊन छान झोपी गेलीत आणि मे बसलोय ब्लॉगच्या नोंदी घेत.
आजचा प्रवास:
कोल्हापूर-कणकवली: ~८० किमी
कणकवली-कसाल-मालवण: ~४५ किमी
मालवण-देवगड: ~५० किमी
मुक्काम: निवांत रेसॉर्ट, कॉलेज रोड, देवगड.
खादाडी पॉइंट्स:
फोंडा गावतले टपरी हॉटेल
मालवणचे बांबू हाऊस
देवगडला वसंत-विजय (९४२०२६००७६)
सगळी तयारी झाली. प्लॅन ठरलाय आणि एकदाची १ ऑक्टोबरचा वर्किंग वीकडे संपला.
आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि सातारा रोडवर मुंबईकर, नागपूरकर सगळ्या मंडळींनी वेळेवर हजेरी लावली आहे.
बाईक्स नुकत्याच ट्रकमध्ये लोड करुन कोल्हापूरला पाठवल्या आहेत. होपफुली त्या वन पीस पोचतील. एका जरी बाईकला काही झाले तर आमच्या वेळापत्रकाची टोटल ’लागणार’ आहे. तरी पहिल्या दिवशीच्या प्लॅन मध्ये बफर टाईम जरा सैल हातानेच ठेवलाय. पावसाच्या बातमीने जरा काळजी पण वाटते आहे.
थोड्याच वेळात आम्ही पुन्हा स्वारगेटला एकत्र भेटू आणि त्याचवेळी एक ओळखपरेड पण होइल. पहिलाच दिवस आहे तर खायला थोडे ’घासफूसच’ बरे राहील. म्हणून मग वैभव आणि मी 'प्युअर वेज' नावाचा प्रकार खाल्ला आहे. आणि त्याच्याच फ़्लॅटवर TP करतो आहे. मंगेश मुंबईवरुन आलाय. सॅंडी बॅगबरोबर झटापट करतोय. आणि यावेळी भावानाचा फोन आला. तिने एक स्टंट मारलाच. बस रात्री साडेअकराला सुटणार आहे आणि तिने मला दहा वाजता फोन करुन तिच्याकडे हेल्मेट नही अशी ’खुशखबर’ दिली आहे (टाळ्या...!!!). तरी मी तिला गेल्या रविवारीच विचारले होते की माझ्याकडे एक्स्ट्रा हेल्मेट आहे आणि ते तिला हवंय का? तेव्हा चांगली नाही म्हणाली की हो! पण काय करणार? तिची हेल्मेट वाली मैत्रीण आज ऑफिसलाच आली नाही. बाईक ट्रिपचा शून्य नंबरचा नियम आहे ’helmets compulsory’. मग तिथून पुढे धावपळ आणि शोधाशोध. दुकाने पण बंद झालीत. मग एक मित्राला फोन केला आणि मग सौरभने हेलमेट आता स्वारगेटला तिच्याकडे आणून दिलंय.
जेवण उरकले आणि सगळे बॅगा आणि भरलेली पोटे सावरत स्वारगेटला पोचलोय.
आता ओळखपरेड:
मी पंकज ऊर्फ पॅंकी ऊर्फ भटकंती unlimited
वैभव ऊर्फ बॅबो ऊर्फ हैबती
संदीप ऊर्फ सॅंडी
मंगेश ऊर्फ मॉंग ऊर्फ मॅंगी
भावना ऊर्फ मॅचिंग नेलपेंटवाल्या मॅडम
आम्रपाली ऊर्फ मॅंगोलिझर्ड ऊर्फ ’मुंडी तेरी’
पूजा मॅडम
निकुंज ऊर्फ निक
प्रतीक म्हणजे पॅट्रिक ऊर्फ पॅट
सुयोग भाई
राका डॉन
दीप म्हणजे बाबा अफगाणी
सम्यक भाऊ
आणि श्रीकांत म्हणजे घंटासिंग ऊर्फ शिक्रांत- रडू येईल असे जोक सांगणारा.
म्हणजे अवघा संयुक्त महाराष्ट्र हजर झाला. एक सो एक सगळे पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर...!!!
कोलापूरसाठी बस येइल आणि आम्ही बुकिंग आधीच केले असल्यामुळे ऐटीत बसुन रवाना होऊ.
अरे ही काय, आलीच बस. पण लहान पिक-अप बस... ती आम्हाला सिंहगड रोडच्या त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन चालली आहे आणि मग तिथून पुढे वॉल्वोने कोल्हापूर. बॅगा नीट ठेवून आम्ही (कमीत कमी बाईक्स चालवणारे गडी) मिळेल तेवढी झोप पदरात पाडण्याचा प्रयत्न करू. पण असे काही फोन असतात जे रात्रीच करावे लागतात, ते पण खुसर-फुसर करत बोलायचे असतात. तासाभरात ते संपून झोप लागली. कोंडुसकरांची ही नॉन स्टॉप पुणे-कोल्हापूर बस एक छान सेवा आहे. आणि त्याहून उच्च आहे पुणे-बंगलोर हायवे. पोटातले पाणीही न हलता आम्ही पहाटे साडेतीनलाच कोल्हापूरला पोचलोय. बऱ्यापैकी आरामशीर झोप झली. महामंडळाच्या बसपेक्षा जास्त दिलेले पैसे वसूल झाल्यासरखे वाटले. आता पुढचे काम आहे बाईक्स घेउन येणारा ट्रक शोधणे, बाईक्स उतरवणे आणि फ्रेश होऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणे.
नाक्यावर उतरलो. ट्रक समोर वाटच पाहत होता. आणि आल्यावर बाईक्स उतरवून घेतल्या. पण थोडी निराशा
स्टँडवर पोचल्या पोचल्या एकेक चहा आम्ही सर्रकन घशाखाली सोडला. सॅन्डीच्या घरी सगळे फ़्रेश झालो. सकाळी जसे काही विशिष्ट राग गायले जातात तसे सकाळी मारण्याचे जोक्स पण वेगळे असतात. त्यात वाघ मारणे, गाडी रद्द होणे, डाउनलोड एरर, त्यामुळे येणारे ऑडिबल अलर्ट्स असे शब्दप्रयोग चालतात. आमचा असा पाचकळपणा चालला होता. आमचा सॅंडी गडी नवीन घर बांधतोय. म्हणजे लवकरच विकेट पडणार हे आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटेल का? काकूंनी म्हणजे सॅंडीच्या आईने केलेले वाफाळते उपीट आणि कडक चहाने जीव सकाळपुरता का होईना तृप्त झाला. भावनाने मॅचिंग नेलपेंट लावली, आम्ही जड बॅगा गाडीला बांधल्या. त्याच वेळी आम्रपाली गाडीवर बसायच्या आधीच खाली पडली. शेजारी श्रीकांत होता. म्हणजे मुलींना खाली पाडण्याचा मागच्या Coastal Prowl चा रिवाज त्याने कायम ठेवला होता (मागच्या वर्षी थांबलेल्या गाडीवरुन २ जणींना पाडण्यात यश आले होते त्याला). हातावर साख्रर घेऊन आम्ही निघालो. गाड्या ओरडत होत्या "माझा खाऊ मला द्या". मग मोर्चा पेट्रोल पंपाकडे वळवला. टाक्या फुल्ल केल्या आणि मंदिराकडे कूच केले. सकाळी लवकर पोचल्यामुळे विशेष गर्दी नही आणि दर्शन पण व्यवस्थित घडले.
मंदिराच्या आवारात गाड्या ओळीने लावून नारळ फोडून श्रीगणेशा केला. सगळ्यांचा सुंदरसा ग्रुप फोटो काढला.
गाडीचे जेवाय-जेवाय करुन झाले होते. टाक्या फुल्ल करून झाल्यात. स्पीडोमीटर नोंदवून घेतलाय. आणि सव्वा आठला सुरु झाला आमचा खरा Coastal Prowl . टायरमधे हवा चेक करणे बाकी आहे पण. उजव्या हाताला पावसाने तुडुंब भरलेल्या रंकाळ्याला वळसा घालून आम्ही फोंडा घाटाकडे मार्गस्थ निघालोय. थोडे पुढे येऊन एक टायरची टपरी दिसली. कोल्हापूरच्या सगळ्याच गोष्टी दणदणीत-रांगड्या. आपण पुण्या-मुंबईत हवा भरताना पुढे आणि मागे अनुक्रमे २५-३५ युनिट भरतो, पण तिथल्या भाऊने प्रत्येक गाडीत ३५-४० युनिट हवा भरली. आम्ही पण दूरचा प्रवास म्हणून शांत राहिलोय.
रस्त्याची क्वालिटी सुपर भन्नाट आहे. गाड्या छान ७०-८० ने बुंगवता येताहेत. पण आमच्यातला एक १८०क्क चा राका डॉनवाला राक्षस स्पीड पकडत नाहिये. त्यामुळे थोडे अंतर जाऊन आम्हाला थांबावे लागतंय. टॉप क्वालिटी रोडवर असे होणे परवडणारे नाही. फोंडा घाटात प्रवेश करताच मन प्रफुल्लित झाले. गर्द हिरवे जंगल आणि थंड हवा लडिवाळ करून जात आहे. फोंडा गावात चहा मारला, राकाने कटिंगच्या दुकानाबाहेर जॉन अब्राहमच्या फोटोसमोर फोटो काढला आणि दाजीपूरच्या जंगलातून पुढे निघालोय आता. इथे रस्ता तर एकदमच सॉलिड आहे. वरून झाडांची छत्री आणि गाड्या ९० ला सहज टच करताहेत. राका सोबत पॅट्रिकची बुलेट सावकाश येतेय. सुयोग ती चालवत होता. एका वळणावर बुलेट रस्त्याच्या खाली उतरली आणि जरा घसरली. विशेष काही झाले नाही पण हा एक अलार्म कॉल आहे, गाड्या काळजीपूर्वक चालवण्यासाठी.
पुढे आल्यावर एक विस्तीर्ण तलाव लागला. तिथे एका खड्ड्यातून माझी गाडी थांबवताना फूटभर उडाली आणि पडता पडता वाचली. घाटाच्या मधोमध खिंडीत पोचलोय आता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीने
आता पहिले काम पोटोबा! दुपारी अडीचला जेवायला मिळणे कोकणातल्या मालवणसारख्या लहान गावात असते. आधी मालवणात दोन वेळा येण्याचा अनुभव असल्याने कुठे जेवायला मिळेल हे माहीत आहे आपल्याला. डायरेक्ट गाड्या बांबू हाऊसच्या अंगणात उभ्या केल्या. पावसामुळे पुढचा देवगडला पोचायचा बेत धोक्यात आला होता. त्यात पॅट आणि सुयोग कणकवलीत राहिलेत. त्यांन फोन करुन जेवून घ्यायला सांगितले. पावसामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या बोटी बंद आहेत. त्यामुळे इथे प्रथमच येणाऱ्या पब्लिकची जरा निराशा झाली. पण इलाज नाही. पावसामुळे ’मालवण पाण्यामधे किल्ला’ पाण्यामधेच राहिला. आता २ पर्याय आहेत आमच्याकडे. एकतर तातडीने जेवून देवगड गठणे किंवा मालवणात मुक्काम करुन पुढचा प्लॅन रि-शेड्युल करणे. आम्ही सर्वानुमते पहिला पर्याय निवडला. पॅट आणि सुयोगला डायरेक्ट देवगड गाठायला सांगितले आहे.
कोकणात येउन मासे न खाणे म्हणजे आमच्यासठी पातक, घोर पातक!!! घासफूस पब्लिकची जरा जेवणात निराशाच झाली आहे. पण कोकणात असे होतेच. भाज्यांची मजल पिवळा बटाटा, कोबीची भाजी, मटकीची उसळ अशा ’चवदार’ पदार्थांपलीकडे जात नाहे. कीडेखाऊ लोकांसाठी मात्र सुरमई, बांगडे, पापलेट, हलवा, कोलंबी, तिसर्या (शिंपले), वाम, कोंबडी वडे असे ’साधेसुधे’ खाणाऱ्याचा कलीजा खलास करणारे पर्याय असतात. तिथे आम्ही जेवण चापले आणि वर सोलकढी रेटून हाणली.
रस्ता विचारुन देवगडचा रस्ता धरला. डावीकडे समुद्रातल्या सिंधुदुर्गाचे दर्शन घेत आम्ही सुसाट निघालो. सोलकढी असर दाखवायला लागली आहे. गाडी चालवता चालवता डोळे झाकायला लागलेत. मग आचऱ्याला एकेक कडक कॉफी मारली. आणि ताजेतवाने होऊन पुढे कूच केले. काही अंतर गाड्या बुंगवून झाल्यावर कुणकेश्वराचा बोर्ड दिसल्यावर आपोआप थांबल्या. ८ किमीवरच आहे तर का सोडा म्हणून आत वळालो. मंदिर एकदम प्रशस्त आहे. फार सुंदर. देऊळवाड्याच्या तटालाच भरतीच्या लाटा न्हाऊ घालतात. सागरतीरी सुंदर मंदिर, उसळणाऱ्या लाटा, वाळूची पुळण, काही मासेमारीच्या बोटी, थोडी सागरी धुरकट हवा एकदम छान मूड जमलाय
बऱ्यापैकी फोटो मिळाले आहेत. मग तृप्त मन आणि कॅमेराने परत फिरलो आहे. आता देवगड गाठणे, तेही अंधार पडायच्या आत आवश्यक आहे. पुन्हा गाडीला किक/बटन दिला आणि नॉन स्टॉप देवगडला पोचलो.
पॅट्रिक आणि सुयोगने लवकर आल्यामुळे राहण्याची सोय शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला पण निवडणुकीमुळे MTDCशिल्लक नाही. तिथून एक नंबर मिळालाय पण शक्यता धूसरच आहे. पण तिथे जाऊन पाहतो तर छन रुम होत्या. ३ रुम्स मिळाल्या. पटकन रक्कम ठरवून सामान टाकले. कोरडे झालो आणि गरम पाण्याने अंघोळ करुन फ्रेश झालो आहोत सगळे. पुन्हा एकदा जवळच वसंत-विजय नावाच्या हॉटेलमध्ये आमचे जेवण विथ फिश झाले आणि तृप्त झालो. वेज लोकांनी पिझ्झावर काम भागवलंय.
सगळी मंडळी भरलेली पोटे सावरत कॅमेऱ्यात दिवसाचा रिव्यू घेऊन छान झोपी गेलीत आणि मे बसलोय ब्लॉगच्या नोंदी घेत.
आजचा प्रवास:
कोल्हापूर-कणकवली: ~८० किमी
कणकवली-कसाल-मालवण: ~४५ किमी
मालवण-देवगड: ~५० किमी
मुक्काम: निवांत रेसॉर्ट, कॉलेज रोड, देवगड.
खादाडी पॉइंट्स:
फोंडा गावतले टपरी हॉटेल
मालवणचे बांबू हाऊस
देवगडला वसंत-विजय (९४२०२६००७६)
21:12
Coastal Prowl-Preview

परवाच कोकणात बाईक ट्रिप (Coastal Prowl) मारून आलो. सविस्तर ब्लॉग पोस्ट लिहायला वेळ लागणार आहे. पण लोकांची उत्सुकता मला सारखी पिंग करतेय... म्हणून ही एक फोटो लिंक्स असलेली पोस्ट टाकतोय.
ट्रिपचे काही ठळक मुद्दे:
एकानेही हेल्मेटचा नियम मोडला नाही. १४ लोक आणि १४ हेल्मेट्स होते.
कोकणात खूप पाऊस पडतो हे लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते. या चार दिवसात तो पाऊस प्रत्यक्ष जगलो.
फोंडा घाट उतरून कोकणात प्रवेश करताच तुफानी पावसाने आमचे स्वागत केले "येवा, कोकण आपलाच असा...!!!"
त्यामुळे आमचे फोनचे बिल वाढले. घरी सारखे अपडेट्स द्यावे लागत होते.
कोकणातले रस्ते खरंच फार भारी आहेत. फार कमी वेळा स्पीड ६० च्या खाली आणावा लागला. कॉंप्युटरवर गेम खेळल्यासारखे वाटत होते.
ट्रिपमध्ये कायम एक बकरा बरोबर असावा. आणि वेळोवेळी त्याची ’मारता’ येते. आमच्या बकऱ्याचे नाव नंतर तुम्हीच ओळखा, सगळ्या पोस्ट्स वाचून झाल्या की.
आमच्या बाईक्सनी कधीच जास्त त्रास दिला नाही. फक्त एक वेळा पंक्चर म्हणजे अगदी नगण्य.
माझ्या बाईकचे घरापासून घरापर्यंत रनिंग ८८८ किमी. प्लस त्यात पुणे-कोल्हापूरचे बसने केलेले २५० किमी असे साधारण साडेअकराशे किमी रनिंग झाले.
माझे अंजनवेलच्या गोपाळगडनंतर ५० किल्ले पूर्ण झाले.
आता आमचा नकाशात मुंबईच्या खाली दिसणारा सगळा कोकण पाहून झालाय. पण पब्लिकला पुढच्या ट्रिपचे वेध आतापासूनच लागलेत.
कोकणात कीडेखाऊ (non-veg) लोकांची चंगळ होते. आणि घासफूस पब्लिकचे हाल.
फोटोची लिंक:
http://picasaweb.google.co.in/coastalprowl2009/PankajUnlimited
22:53
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक
शनिवारी ताम्हिणी घाटात जवळपास आख्खा दिवस घालवल्यावर खरेतर मी रविवारी घरी राहणे अपेक्षित होते. म्हणजे मी तरी तशीच तयारी केली होती. पण संध्याकाळी ध्रुवला भेटलो तेव्हा त्याने एक प्रस्ताव ठेवला. भीमाशंकरजवळचा पदरगड म्हणजे ’कलावंतिणीचा महाल’. वर सांगितले की तोरणा एवढा आहे चढायला. झाले... माझा निग्रह ढळलाच. जरी मी त्याला तोंडावर सांगितले की रात्री उशिरापर्यंत सांगेन तरी माझे मन मात्र केव्हाच रविवारच्या कामांची सोय लावण्याचा विचार करू लागले. जी काही कामे होती (घरातले इंटिरियर आणि तत्सम) ती त्याच रात्री मार्गी लावली आणि ध्रुवला कन्फर्मेशन मेसेज टाकून मोकळा झालो.
भल्या पहाटे ४:३० ला ध्रुवच्या घरी पोचायचे होते. म्हणजे मी घर ४:०० वाजताच सोडले. तिथून निघालो आणि गाडी सगळ्या गड्यांना पिक अप केले. नविन भटक्या मित्रांची ओळख परेड झाली. मी, ध्रुव मुळ्ये उर्फ धुरड्या, सिद्धार्थ जोशी उर्फ सिड उर्फ ज्यो, दिलीप उर्फ डीडी आणि किणी असे एकूण पाच लोक होते. सकाळच्या चहाशिवाय तर डोकी आणि गाडी चालणार नव्हती. त्यात ’सिड’ला जेवाय-जेवाय करायचे होते. वर त्याने चार पराठे खाऊन दाखवले तर पूर्ण बिल आणि येण्या-जाण्याचा खर्च देणारे पुण्यातले हमजेखान चौकातले ’शाहजी पराठा हाऊस’ ची कहाणी ऐकवली. आणि मग आमची पण भूक जागृत झाली. पहाटे हमखास खायला मिळणारे ठिकाण म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कल. तिथे वाफाळणारे उप्पीट आणि वर गरम चहा... वा... याला म्हणतात दिवसाची चांगली सुरुवात!!!
एकदा पोट शांत केले की मग डोके आणि गाडी पळायला लागली. धुरड्याने गाडी नाशिक हायवेवर बुंगवायला सुरुवात केली. झकास गप्पांचे फड रंगले. एकेकाची खेचायला सुरुवात झाली. आधीचे ट्रेक्स, पुढचे बेत, मग केलेल्या ट्रेक्सचे भन्नाट अनुभव, मधेच कुणाला तरी आलेल्या कुरियर वरुन खेचणे असे करत आम्ही मंचर वरुन डावीकडे
वळून भीमाशंकराच्या रस्त्याला लागलो. रोड लहान झाला तरी विशेष गर्दी नव्हती. दुतर्फा बहारदार हिरवळ आणि या ऋतूत फुलणाऱ्या फुलांची रेलचेल. सकाळची प्रसन्न हवा आणि अवती भोवती सह्यद्रीच्या डोंगररांगा (टिपिकल नाशिक स्टाईलचे पार्किंग केलेले डोंगर)... लईच भारी मूड जमला होता. त्यात मधेमधे नविन नविन पक्षी दर्शन देऊन आम्हाला कॅमेरा आणि लेन्सशी खेळ करायला भाग पाडत होते. पण तसेच रिझल्टही बरे मिळत होते.

साधारण ८:३० वाजता आम्ही भीमाशंकरला पोचलो. दर्शन आणि मिसळपाव खाऊन सव्वानऊला भीमाशंकरची रेंज उतरायला चालू केली. पदरगडाला जाण्यासाठी भीमाशंकरची रांग उतरुन खाली पदराच्या वाडीत जावे लागते. गणेश घाट, शिडी घाट मार्गे भीमाशंकरला खालून खांडसहून चढून येणारे ट्रेकर्स याच गावातून वर येतात. वरून ती वाडी आणि तिथली घरे मुंगीएवढे दिसत होते. डीडी तर म्हणाला की हे खूपच जास्त हेक्टिक होणार आहे. अर्धा पर्वत उतरून गेल्यावर एक वळसा घालून आपण एका मोकळ्या दरीच्या समोर येतो. तिथूनच पुढे आडवा ट्रॅव्हर्स मारून एका पाणवठ्याशी पोचतो. आणि मग
पदरगड काय चीज आहे ते समोर येते. अगदी मळलेली पायवाट आहे. त्यामुळे इथे चुकण्याची शक्यता शून्य. तीच वाट पुढे खाली गावाशी उतरते. एकदोन झोपड्या उभारलेल्या आहेत, जिथे चहा, ताक अशी बेश्ट सोय होते. पुढे त्या वाडीला उजवीकडे ठेवून, नागफणी पॉइंटच्या बरोबर खालून जंगलातून वाट काढत दोनेक किलोमीटर चालले की पदरगड सामोरा येतो. त्याला प्रदक्षिणा घालून त्याच्या मागच्या बाजूने जंगलातून वाट काढतच त्याला बिलगावे लागते. अर्थातच माहितगार वाटाड्या अत्यावश्यक आहे.
आमचा ज्यो म्हणजे गिर्यारोहणातले आमचे सर. हिमालयात जाऊन माउंटेनियरिंगचा बेसिक कोर्स करून आलेले. त्यामुळे तोच वादातीत लीडर होता. त्याच्या मागोमाग आम्ही ११:१५ वाजता वाडीत उतरलो. ताक-चहा होऊन फ्रेश झालो. एक वाटाड्या घेतला. फक्त शर्ट, गुंडाळलेला टॉवेल, पायात स्लीपर आणि एक काठी असे 'ट्रेकिंग गियर' (?) असलेले काका होते ते... गणपत काका. त्यांच्या गतीने चालताना आमची चांगलीच दमछाक होत होती. पण डीडीला जोश चढला होता. काहीही करून एक वाजता पदरगड गाठायचा त्याचा निश्चय होता. तसाच भराभरा तो चालतही होता. एके ठिकाणी झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन आम्ही एका पठारावर आलो. तिथून समोर अर्धा डझन धबधबे आणि शिडी घाट दिसत होता. काही खांडसहून येणारे वीर घाट चढत होते. डावीकडे पदरगड सामोरा आला होता. दूरवरूनही त्याची गुहा स्पष्ट दिसत होती. आम्हांला तिथे पोचायचे होते. दृश्य एकदम स्फूर्तिदायी आव्हान देणारे. मग आम्ही भरभर पुढे निघालो.
आता खांडसहून येणारी वाट सोडून आम्ही पुन्हा डावीकडे वळलो. प्रदक्षिणा अर्धी झाली होती. अजून थोडे अंतर चालून निबीड जंगलात शिरायचे होते. साडेबाराच्या सुमारास आम्ही दाट अरण्यात घुसलो. गच्च झाडीतून वाट कढत काका पुढे आणि आम्ही मागे चाललो होतो. अंगाला झाडे घासून ओरखडे उमटत होते. आता सपाट जमीन संपून खडी चढण लागली. निसरडी चढण आणि दाट गवत यांनी काम आणखी अवघड केले होते. मला आणि सिड’ला कमी वजनाचा फ़ायदा होत होता. लहान लहान झुडपांचा आधार पण पुरेसा होता. पण बाकी मंडळी शर्थ करून वर येत होती. प्रत्येक पाच फुटांवर एक फूट खाली घसरण्याचा कार्यक्रम चालला होता. अर्ध्या तासात एका लहान कातळाला वळसा घालून आम्ही एक अरुंद खिंदीत येऊन पोचलो. एका वेळी एका व्यक्तीला कसेबसे रहता येइल एवढीच जागा होती तिकडे. लहानसे भुयार दुसऱ्या बाजूने वर आले होते. आम्हांला गणपत काकांनी सांगितले की ती दुसऱ्या बाजूने येणरी अवघड वाट होती. इथून पुढे आता फ़ार काळजीपूर्वक चढाई करावी लागणार होती. समोर ७०-८० अंशाची २० फूत उंच खडी कातळभिंत होती. एकही चूक करायला जागा नव्हती.
डीडी’ने सांगितले मला चढायला जमेल पण उतरणे अवघड होइल. मग उगाच बाकीच्यांना अजून त्रास होण्यापेक्षा मे इथेच थांबतो. आपल्या मर्यादा ओळखून वागणारे असे खरे ट्रेकर्सच ट्रेक यशस्वी करत असतात. (आणि मर्यादा न ओळखणारे ट्रेकचा बट्ट्याबोळ). या निर्णयाबद्दल डीडीचे अभिनंदन करून आणि त्याच्यासाठी पाण्याची बाटली ठेवून आम्ही कड्याला भिडलो. ठिसूळ झालेल्या खडकामुळे काही होल्ड्स धोकादायक बनले होते. त्याचा अंदाज घेत तो रॉक पॅच पार केला आणि एका रिजला लहानसा ट्रॅव्हर्स मारून वर निघालो. वर कही अंतर चलून गेल्यावर पुन्हा कडा उजव्या हाताला घालून, चालत राहिलो.
पुन्हा एक अति अरुंद बेचके आले. पण हे जरा जास्त अवघड होते. शेवाळलेले खडक, पाय ठेवायला होल्ड नाही आणि हात धरुन ग्रिप घ्यायला निसटणारे दगड. त्यातल्या त्यात आधार म्हणून एक पक्के झाड उगवले होते. मे झाडाखालून त्या बेचक्यात घुसून वर चढण्याचा प्रयत्न केला. पण तसे करताना हात धरलेला एक साधारण १५ किलोचा दगड निसटून हातावर आला. तो सोडून द्यावा तर खाली आमचेच सवंगडी होते, त्यांन धोका होता. कसाबसा तो बराच वेळ धरून ठेवला आणि सगळ्यांन सावध करुन तो सावकाश सोडला. पण त्यात थोडे मनगट दुखावले. आता घाई करणे गरजेचे होते. मी दोन्ही हात कोपरावर टेकून जोर देऊन पाठीच्या आधारे वर सरकण्याचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही. मग ध्रुव झाडावरुन जाऊन मग कोरड्या खडकावरुन बेचक्याच्या वर पोचला. एकएक करत मग सगळे वर आले. आता तर सरळ-सरळ खोदीव पायऱ्या होत्या. पण त्यानंतर खूप गवत माजले होते. ते काठीने झोडपत रस्ता कढत आम्ही चाललो होतो. एक पाण्याचे टाके दिसले. आमची चाहूल लागून चार फुटी घोरपड (Monitor Lizard) पाण्यातून निघून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गवतात दिसेनाशी झाली. माथ्यावर एक उघड्यावर मंदिर आहे भैरवनाथाचे. दर्शन घेऊन पुढे झालो. एरवी उजाड असलेला माळ छातीएवढ्या गवताने लादला गेला होता. आम्हाला त्या गुहेपर्यंत जायचे होते.

वाटेत दोन पाण्याची टाकी लगली. त्याच्या काठावरुन पुढे जायचे होते. पण एका बाजूला टाके आणि एका बाजूल चार-पाचशे फूट दरी. फार सावधानतेने जावे लागते. शेवटी एकदाची ति गुहा आली. आणि थोडे हायसे वाटले. तिथे पोचताच क्षणी जमिनीवर अक्षरश: लोळण घेतली. चौघेही फार दमलो होतो. पण दुर्दम्य आत्मविश्वास, टीमवर्क आणि सह्याद्रीची ओढ इथपर्यंत घेऊन आली होती. ज्यो आमचा राजेश खन्ना बनला होता. त्याने हार्मोनिकावर काही धून वाजवल्या आणि नंतर आम्ही सर्वांनी त्या दरीत शिवगर्जना घुमवली....
"प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज.... की जय!!!
जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!
जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!"
आता डीडी एकटा बसला असेल आणि आम्ही लवकर गेलो नाही तर घाबरुन जाइल म्हणून आम्ही झपझप परत फिरलो. १५ मिनिटांत पोचलो. तो थोडा वानरांच्या आवाजाने दचकला होताच. दचकणारच न त्या तशा जंगलात? आभाळ भरुन आले होते. पावसाची शक्यता होती. त्याच्या आधी आम्हाला पदरवाडीत तरी पोचणे गरजेचे होते. मग आम्ही उतरायची वाट धरली. उतरणे पण अवघडच होते. पाय घसरण्याची आता सवय झाली होती. ध्रुव, किणी आणि डीडी 'ग्रास स्किइंग' करत उतरत होते. कसेबसे खाली पोचलो आणि पदरवाडीची वाट कापु लागलो. पोचायला ४ वाजले. अजुन कमीत कमी २ तासांची चढण होती भीमाशंकरपर्यंत. तिथे बरोबरचे खाऊन घेतले. आता पाय आणि गुडघे बोलायला लागले होते. अर्धा तास विश्रांती घेऊन आम्ही चढाई सुरु केली. पण आता उभी चढण जीवावर आली होती. प्रत्येक ५०-१०० पावलांवर बसावे लागत होते. सगळ्यांचीच ’लागली’ होती- वाट. मध्येच ध्रुवला आम्ही काही तरी पदरगडावर परत जाऊन दाखव, किंवा एकाला उचलून भीमाशंकरला पोचव अशा अशक्य पैजा लावून 600mm, 800mm लेन्स देण्याचे कबूल करत होतो. पण त्याने चांगला चान्स सोडला. काहीच केले नाही. सूर्यनारायण आपला दिवसाचा प्रवास संपवीत नभांगण रंगीत करून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंगाखांद्यावर ढगाचे पुंजके नाचवत होता. पाठीमागे पदरगड त्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाला होता.

शेवटी अंधार पडता पडता पूर्णपणे थकलेले जवान संध्याकाळी ७:०० वाजता भीमाशंकरला पोचलो. भूक मेली होती, लगेच खाणे योग्यही नव्हते, म्हणून चहा आणि सगळ्यात मिळून एक Chilled भजी घेऊन आम्ही स्वतःला ड्रायक्लीन करुन गाडीत बसलो. डीडी’च्या डिओचा खुप उपयोग झाला :-)
सगळ्या ट्रेक्स मधल्या रथी-महरथी आणि अतिरथींनी मान्य केले की आजचा साडेनऊ तासांचा ट्रेक आतापर्यंतच्या ट्रेक्सपेक्षा ’जरासा’ अवघड होता. पण नशीब पाऊस आला नव्हता. नाहीतर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते.
तोरणा एवढा आहे चढायला? नाही... तोरणाच्या फक्त तिप्पट आहे...!!!
येताना किणीने कुठली कार घ्यावी यावर वाद-विवाद सत्र झडले. त्याचे रुपांतर मग Financial Planning session मधे झाले. पण सिड आणि माझे एकमत होते, जी गाडी पदरगडावर जाईल तीच गाडी भारी. ज्यो मधेच आम्हाला ट्रेक मधे नॉट आऊट राहणे म्हणजे काय याचे मौलिक विचार देत होता. मंचरला पोटाची आग रात्री ९:०० वाजता विझवली. आणि परत गाडी पुण्याकडे बुंगवली.
पुण्यात पोचल्यावर गाडीतून उतरताना पण मी सूचना देत होतो, हा आता पाय खालच्या होल्ड वर ठेव... पक्का बसला..? मग हात सोड... हा आता उतरलाच... बास झालंच...!!!
ज्यो’च्या भाषेत मी भैसटलोय... खरंय पण, रांगड्या सह्यद्रीच्या प्रेमाने आम्ही सगळेच भैसटलोय...!!!
भल्या पहाटे ४:३० ला ध्रुवच्या घरी पोचायचे होते. म्हणजे मी घर ४:०० वाजताच सोडले. तिथून निघालो आणि गाडी सगळ्या गड्यांना पिक अप केले. नविन भटक्या मित्रांची ओळख परेड झाली. मी, ध्रुव मुळ्ये उर्फ धुरड्या, सिद्धार्थ जोशी उर्फ सिड उर्फ ज्यो, दिलीप उर्फ डीडी आणि किणी असे एकूण पाच लोक होते. सकाळच्या चहाशिवाय तर डोकी आणि गाडी चालणार नव्हती. त्यात ’सिड’ला जेवाय-जेवाय करायचे होते. वर त्याने चार पराठे खाऊन दाखवले तर पूर्ण बिल आणि येण्या-जाण्याचा खर्च देणारे पुण्यातले हमजेखान चौकातले ’शाहजी पराठा हाऊस’ ची कहाणी ऐकवली. आणि मग आमची पण भूक जागृत झाली. पहाटे हमखास खायला मिळणारे ठिकाण म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कल. तिथे वाफाळणारे उप्पीट आणि वर गरम चहा... वा... याला म्हणतात दिवसाची चांगली सुरुवात!!!
एकदा पोट शांत केले की मग डोके आणि गाडी पळायला लागली. धुरड्याने गाडी नाशिक हायवेवर बुंगवायला सुरुवात केली. झकास गप्पांचे फड रंगले. एकेकाची खेचायला सुरुवात झाली. आधीचे ट्रेक्स, पुढचे बेत, मग केलेल्या ट्रेक्सचे भन्नाट अनुभव, मधेच कुणाला तरी आलेल्या कुरियर वरुन खेचणे असे करत आम्ही मंचर वरुन डावीकडे
साधारण ८:३० वाजता आम्ही भीमाशंकरला पोचलो. दर्शन आणि मिसळपाव खाऊन सव्वानऊला भीमाशंकरची रेंज उतरायला चालू केली. पदरगडाला जाण्यासाठी भीमाशंकरची रांग उतरुन खाली पदराच्या वाडीत जावे लागते. गणेश घाट, शिडी घाट मार्गे भीमाशंकरला खालून खांडसहून चढून येणारे ट्रेकर्स याच गावातून वर येतात. वरून ती वाडी आणि तिथली घरे मुंगीएवढे दिसत होते. डीडी तर म्हणाला की हे खूपच जास्त हेक्टिक होणार आहे. अर्धा पर्वत उतरून गेल्यावर एक वळसा घालून आपण एका मोकळ्या दरीच्या समोर येतो. तिथूनच पुढे आडवा ट्रॅव्हर्स मारून एका पाणवठ्याशी पोचतो. आणि मग
आमचा ज्यो म्हणजे गिर्यारोहणातले आमचे सर. हिमालयात जाऊन माउंटेनियरिंगचा बेसिक कोर्स करून आलेले. त्यामुळे तोच वादातीत लीडर होता. त्याच्या मागोमाग आम्ही ११:१५ वाजता वाडीत उतरलो. ताक-चहा होऊन फ्रेश झालो. एक वाटाड्या घेतला. फक्त शर्ट, गुंडाळलेला टॉवेल, पायात स्लीपर आणि एक काठी असे 'ट्रेकिंग गियर' (?) असलेले काका होते ते... गणपत काका. त्यांच्या गतीने चालताना आमची चांगलीच दमछाक होत होती. पण डीडीला जोश चढला होता. काहीही करून एक वाजता पदरगड गाठायचा त्याचा निश्चय होता. तसाच भराभरा तो चालतही होता. एके ठिकाणी झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन आम्ही एका पठारावर आलो. तिथून समोर अर्धा डझन धबधबे आणि शिडी घाट दिसत होता. काही खांडसहून येणारे वीर घाट चढत होते. डावीकडे पदरगड सामोरा आला होता. दूरवरूनही त्याची गुहा स्पष्ट दिसत होती. आम्हांला तिथे पोचायचे होते. दृश्य एकदम स्फूर्तिदायी आव्हान देणारे. मग आम्ही भरभर पुढे निघालो.
आता खांडसहून येणारी वाट सोडून आम्ही पुन्हा डावीकडे वळलो. प्रदक्षिणा अर्धी झाली होती. अजून थोडे अंतर चालून निबीड जंगलात शिरायचे होते. साडेबाराच्या सुमारास आम्ही दाट अरण्यात घुसलो. गच्च झाडीतून वाट कढत काका पुढे आणि आम्ही मागे चाललो होतो. अंगाला झाडे घासून ओरखडे उमटत होते. आता सपाट जमीन संपून खडी चढण लागली. निसरडी चढण आणि दाट गवत यांनी काम आणखी अवघड केले होते. मला आणि सिड’ला कमी वजनाचा फ़ायदा होत होता. लहान लहान झुडपांचा आधार पण पुरेसा होता. पण बाकी मंडळी शर्थ करून वर येत होती. प्रत्येक पाच फुटांवर एक फूट खाली घसरण्याचा कार्यक्रम चालला होता. अर्ध्या तासात एका लहान कातळाला वळसा घालून आम्ही एक अरुंद खिंदीत येऊन पोचलो. एका वेळी एका व्यक्तीला कसेबसे रहता येइल एवढीच जागा होती तिकडे. लहानसे भुयार दुसऱ्या बाजूने वर आले होते. आम्हांला गणपत काकांनी सांगितले की ती दुसऱ्या बाजूने येणरी अवघड वाट होती. इथून पुढे आता फ़ार काळजीपूर्वक चढाई करावी लागणार होती. समोर ७०-८० अंशाची २० फूत उंच खडी कातळभिंत होती. एकही चूक करायला जागा नव्हती.
डीडी’ने सांगितले मला चढायला जमेल पण उतरणे अवघड होइल. मग उगाच बाकीच्यांना अजून त्रास होण्यापेक्षा मे इथेच थांबतो. आपल्या मर्यादा ओळखून वागणारे असे खरे ट्रेकर्सच ट्रेक यशस्वी करत असतात. (आणि मर्यादा न ओळखणारे ट्रेकचा बट्ट्याबोळ). या निर्णयाबद्दल डीडीचे अभिनंदन करून आणि त्याच्यासाठी पाण्याची बाटली ठेवून आम्ही कड्याला भिडलो. ठिसूळ झालेल्या खडकामुळे काही होल्ड्स धोकादायक बनले होते. त्याचा अंदाज घेत तो रॉक पॅच पार केला आणि एका रिजला लहानसा ट्रॅव्हर्स मारून वर निघालो. वर कही अंतर चलून गेल्यावर पुन्हा कडा उजव्या हाताला घालून, चालत राहिलो.
पुन्हा एक अति अरुंद बेचके आले. पण हे जरा जास्त अवघड होते. शेवाळलेले खडक, पाय ठेवायला होल्ड नाही आणि हात धरुन ग्रिप घ्यायला निसटणारे दगड. त्यातल्या त्यात आधार म्हणून एक पक्के झाड उगवले होते. मे झाडाखालून त्या बेचक्यात घुसून वर चढण्याचा प्रयत्न केला. पण तसे करताना हात धरलेला एक साधारण १५ किलोचा दगड निसटून हातावर आला. तो सोडून द्यावा तर खाली आमचेच सवंगडी होते, त्यांन धोका होता. कसाबसा तो बराच वेळ धरून ठेवला आणि सगळ्यांन सावध करुन तो सावकाश सोडला. पण त्यात थोडे मनगट दुखावले. आता घाई करणे गरजेचे होते. मी दोन्ही हात कोपरावर टेकून जोर देऊन पाठीच्या आधारे वर सरकण्याचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही. मग ध्रुव झाडावरुन जाऊन मग कोरड्या खडकावरुन बेचक्याच्या वर पोचला. एकएक करत मग सगळे वर आले. आता तर सरळ-सरळ खोदीव पायऱ्या होत्या. पण त्यानंतर खूप गवत माजले होते. ते काठीने झोडपत रस्ता कढत आम्ही चाललो होतो. एक पाण्याचे टाके दिसले. आमची चाहूल लागून चार फुटी घोरपड (Monitor Lizard) पाण्यातून निघून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गवतात दिसेनाशी झाली. माथ्यावर एक उघड्यावर मंदिर आहे भैरवनाथाचे. दर्शन घेऊन पुढे झालो. एरवी उजाड असलेला माळ छातीएवढ्या गवताने लादला गेला होता. आम्हाला त्या गुहेपर्यंत जायचे होते.
वाटेत दोन पाण्याची टाकी लगली. त्याच्या काठावरुन पुढे जायचे होते. पण एका बाजूला टाके आणि एका बाजूल चार-पाचशे फूट दरी. फार सावधानतेने जावे लागते. शेवटी एकदाची ति गुहा आली. आणि थोडे हायसे वाटले. तिथे पोचताच क्षणी जमिनीवर अक्षरश: लोळण घेतली. चौघेही फार दमलो होतो. पण दुर्दम्य आत्मविश्वास, टीमवर्क आणि सह्याद्रीची ओढ इथपर्यंत घेऊन आली होती. ज्यो आमचा राजेश खन्ना बनला होता. त्याने हार्मोनिकावर काही धून वाजवल्या आणि नंतर आम्ही सर्वांनी त्या दरीत शिवगर्जना घुमवली....
"प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज.... की जय!!!
जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!
जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!"
आता डीडी एकटा बसला असेल आणि आम्ही लवकर गेलो नाही तर घाबरुन जाइल म्हणून आम्ही झपझप परत फिरलो. १५ मिनिटांत पोचलो. तो थोडा वानरांच्या आवाजाने दचकला होताच. दचकणारच न त्या तशा जंगलात? आभाळ भरुन आले होते. पावसाची शक्यता होती. त्याच्या आधी आम्हाला पदरवाडीत तरी पोचणे गरजेचे होते. मग आम्ही उतरायची वाट धरली. उतरणे पण अवघडच होते. पाय घसरण्याची आता सवय झाली होती. ध्रुव, किणी आणि डीडी 'ग्रास स्किइंग' करत उतरत होते. कसेबसे खाली पोचलो आणि पदरवाडीची वाट कापु लागलो. पोचायला ४ वाजले. अजुन कमीत कमी २ तासांची चढण होती भीमाशंकरपर्यंत. तिथे बरोबरचे खाऊन घेतले. आता पाय आणि गुडघे बोलायला लागले होते. अर्धा तास विश्रांती घेऊन आम्ही चढाई सुरु केली. पण आता उभी चढण जीवावर आली होती. प्रत्येक ५०-१०० पावलांवर बसावे लागत होते. सगळ्यांचीच ’लागली’ होती- वाट. मध्येच ध्रुवला आम्ही काही तरी पदरगडावर परत जाऊन दाखव, किंवा एकाला उचलून भीमाशंकरला पोचव अशा अशक्य पैजा लावून 600mm, 800mm लेन्स देण्याचे कबूल करत होतो. पण त्याने चांगला चान्स सोडला. काहीच केले नाही. सूर्यनारायण आपला दिवसाचा प्रवास संपवीत नभांगण रंगीत करून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंगाखांद्यावर ढगाचे पुंजके नाचवत होता. पाठीमागे पदरगड त्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाला होता.
शेवटी अंधार पडता पडता पूर्णपणे थकलेले जवान संध्याकाळी ७:०० वाजता भीमाशंकरला पोचलो. भूक मेली होती, लगेच खाणे योग्यही नव्हते, म्हणून चहा आणि सगळ्यात मिळून एक Chilled भजी घेऊन आम्ही स्वतःला ड्रायक्लीन करुन गाडीत बसलो. डीडी’च्या डिओचा खुप उपयोग झाला :-)
सगळ्या ट्रेक्स मधल्या रथी-महरथी आणि अतिरथींनी मान्य केले की आजचा साडेनऊ तासांचा ट्रेक आतापर्यंतच्या ट्रेक्सपेक्षा ’जरासा’ अवघड होता. पण नशीब पाऊस आला नव्हता. नाहीतर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते.
तोरणा एवढा आहे चढायला? नाही... तोरणाच्या फक्त तिप्पट आहे...!!!
येताना किणीने कुठली कार घ्यावी यावर वाद-विवाद सत्र झडले. त्याचे रुपांतर मग Financial Planning session मधे झाले. पण सिड आणि माझे एकमत होते, जी गाडी पदरगडावर जाईल तीच गाडी भारी. ज्यो मधेच आम्हाला ट्रेक मधे नॉट आऊट राहणे म्हणजे काय याचे मौलिक विचार देत होता. मंचरला पोटाची आग रात्री ९:०० वाजता विझवली. आणि परत गाडी पुण्याकडे बुंगवली.
पुण्यात पोचल्यावर गाडीतून उतरताना पण मी सूचना देत होतो, हा आता पाय खालच्या होल्ड वर ठेव... पक्का बसला..? मग हात सोड... हा आता उतरलाच... बास झालंच...!!!
ज्यो’च्या भाषेत मी भैसटलोय... खरंय पण, रांगड्या सह्यद्रीच्या प्रेमाने आम्ही सगळेच भैसटलोय...!!!
Fact file:
Name: Padargad Fort aka Kalavantinicha Mahal
In Bhimashankar Ranges of Sahyadri.
Difficulty Level: Medium to Ddifficult.
Base village: Padarachi Waadi.
Route: Pune-Nashik Road-Manchar-Bhimashankar-Trek down in the valley to Padarachi Waadi and climb to Padargad.
OR Mumbai-Karjat-Khandas-Ganesh Ghat-Padarachi Waadi-Padargad
Distance: around 120km from Pune.
Tips: tips: Avoid during rainy season. Carry own food after Padarachi Waadi. Have proper guide from the village. Do not attempt without guide because of dense forest.
Stay: Can be done in Bhimashankar or Padarachi Waadi
Surrounding: Peth Fort aka Kothaligad, Bhimashankar sanctuary.
01:07
Subscribe to:
Posts (Atom)