Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
Showing posts with label अमितकाकडे. Show all posts
Showing posts with label अमितकाकडे. Show all posts
no image
bedse flute अमितकाकडे बासरी बेडसे

एक अविस्मरणीय (सुरेल) सकाळ !

पुण्याहून दोन गाड्यांमधून सात जण निघाले. अगदी व्यवस्थित नाक्यावरचा चहा वगैरे सोपस्कार व्यवस्थित उरकून. कामशेतला मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळाली तेव्हा नुकताच कुठे सूर्य उगवण्याच्या बेतात होता. खिंड ओलांडून आलो तोवर त्याने आपला सोनेरी पट मांडायला नुकतीच कुठे सुरुवात केलेली. पूर्वेच्या टेकड्यांआडून त्याची तांबडे फुटलेले, काही क्षणांतच तांबड्याला सोनेरी झळाळी चढली आणि सारी सृष्टी त्यात न्हाऊ लागलेली. एरवी टुकार वाटलेले एक्सप्रेस-वेवरचे जाहिरातींचे मोठे फलकही आज किती सुंदर दिसू लागले. नेहमीचा कॅमेरांचा खडखडाट झाला. अर्थातच आमचे कान त्या नीरस आवाजाला कायमच सरावलेले.
Bedse_Morning
सूर्योदय
ते उरकून बेडसे लेण्यांच्या पायथ्याशी गाडी लावली. दहाच मिनिटांत लेण्यांशी जाऊन टेकलो. आधी कित्येकदा आलो होतो, पण त्या कित्येक फेर्‍यांना आजचे भाग्य कसले. थोडा दम टाकून आसपासचे सौंदर्य मनाशी साठवून घेतले. अजूनही लेण्यांना माणसाची जाग नव्हती. तिथे होतो ते आम्हीच फक्त. सात जण आणि बाकी सूर्याची कोवळी किरणे. काही भिरभिरती पाखरं. कदाचित लेण्यांना घडवणारे पवित्र आत्मेही आसपासच असतील, एका सुखाच्या जाणिवेची वाट पाहत. सातपैकी एक जण आधी मुख्य लेणीत जातो. काहीच न बोलता फक्त स्तूपाशी पद्मासन घालून बसतो. आम्ही उरले सुरले उगाच कॅमेरे सावरुन तयार. मांडी घालून बसलेला तो आपल्याकडल्या जादूच्या पिशवीतून जादूची छडी काढतो. हात्तिच्या… ही तर बासरी. मोबाईलवर तानपुरा गुंजन करायला सुरुवात करतो आणि एक त्याची फुंकर बासरीत शिरते. सुर्याच्या किरणांच्याबरोबरीन जादूगाराने पहिला सा लावलेला. आम्हांस अंगावर अक्षरशः शहारा येणे म्हणजे काय याची प्रचिती. गात्रं न गात्रं फुलून आलेली. पहिल्याच सुरावटीने अंगभर शहार्‍यांचे एव्हाना निवडुंगाचे काटे होत आले होते. चैतन्याची एक सळसळ कानांतून प्रवेश करुन सर्वांगातून सतत लहरत असते. पंधरा मिनिटांतच फोटो काढणे विसरुन आम्हीही मांड्या ठोकून समोर बसलो. पुढे अनेक रचना, राग यांतून लीलया संचार करत दोन तास फक्त आम्ही आणि त्या सुरावटी एकरुप झालो. आसपासचे पवित्र आत्मेही कदाचित याच सुखाच्या जाणिवेची आस ठेवून असणार. बासरीच्या स्वरलहरी समोरच्या सह्याद्रीच्या कुशीत चैतन्य सांडीत होत्या. आम्ही आपले कधी अंगावर शहारे, कधी तृप्त कान आणि कधी पापण्यांच्या आड आलेली समाधानी आसवं परतवून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न… अशा मनाच्या विविध अवस्थांमधून हेलकावत त्या सुरावटींच्या हिंदोळ्यावर आनंद लुटावा.
Besde_Amit_Pano
बेडसे लेण्यांतील स्तूप आणि अमित
एखाद्या नवपरिणित माहेरवाशीण वधूने आपले नवीन वस्त्रांचे गाठोडे मैत्रिणीच्या समोर मांडून तिला एक एक वस्त्र उलगडून दाखवावे. प्रत्येक नव्या घडीनिशी मैत्रिणीच्या अंगावर जणू मोरपीस फिरावे. हे रेशमी, हे बनारसी, हे आजीने दिलेले उबदार सुती, हे आईकडून आलेले मोरपिशी, हे सख्याने दिलेले चिंतामणी… असे तलम घड्या उलगडून दाखवत असताना शेवटचे वस्त्र एकदम भरजरी वेलबुट्टीच्या नक्षीचे, जरीकाठाचे रेशमी अंगाचे आणि आवडत्या रंगाचे असावे. त्याने आपले सर्वांग मोहरुन यावे, अचानक मन कुठल्याशा अनामिक जगात हरवून जावे असेच झाले जेव्हा त्या जादूगाराने सुरांची जादू केली. एकामागून एक विविध राग, स्पॅनिश ट्यून्स, पाश्चात्त्य आणि भारतीय संगीतातील फरक, सृष्टीच्या विविध आवाजांवरुन स्वर कसे निर्माण झाले याचे उदाहरणासहित विवेचन, विविध भजन रजना असे त्या सुरमयी वस्त्रांचे विविध पदर आम्ही आमच्या मनचक्षूंनी अनुभवत होतो. शेवटचा भरजरी वेलबुट्टीचा रेशमी पदर हा राग पहाडीचा होता आणि त्याची साथ घेऊन आम्ही पहाडी प्रदेशात कसे पोचलो हे आम्हांलाच समजले नाही. अगदी पहाडी प्रदेशात कित्येक मैलांवरुनही अशीच सुरावट स्पष्ट ऐकू येत असल्याचा साक्षात अनुभव बसल्या जागी आम्ही घेत होतो.

AmitKakde_Collage
अमित आणि त्याची जादुई बासरी

तर हा जादूगार होता अमित काकडे. पुण्याचाच आमचा मित्र आणि त्याची जादुई बासरी. त्याने सुरुवातीला घेतलेल्या पहिल्या सुरावटींपासून सुरुवात करुन पुढले “तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल” ही अभंग रचना ही थेट पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या पायाशी बसल्याचा अनुभव देणारी अद्वैताचा याहून सुंदर आविष्कार आणि अनुभव यापूर्वी कधीच घडला नव्हता. मल्हार रागातील विविध जागा, त्यातून केलेले सृष्टीचे वर्णन, पावसाळी हवा, ढगांची दाटी, कुंद हवा, विजांचा लखलखाट, मग हलकीशी पावसाची सुरुवात, त्यायोगे सॄष्टीत निर्माण झालेले चैतन्य आणि त्यासोबतच अमितने कोमल निषाद, शुद्ध निषाद, मींड (त्याला दिलेली लोहगड विसापूरच्या मधल्या गायखिंडीची उपमा) अशा मारलेल्या गप्पा या यापुढे प्रत्येक पावसाच्या वेळी नक्कीच आठवणार. पुढल्या प्रत्येक उत्तर पहाडी प्रदेशातल्या प्रवासात त्याचा राह पहाडी एक अनामिक रुखरुख लावत राहणार की आज अमित माझ्याशेजारी बसलेला का नाही? पण हे जे सोन्याचे दोनतीन तास अमितने आमच्यासाठी दिले ते खरंच वेड लावणारे.
हे थोडे वेड तुमच्यासाठी पिशवीत भरुन आणलंय… (सर्वाधिकार अमित काकडे). पण काहीही असले तरी “दुबळी माझी झोळीची” अवस्था इथेही झाली आमची.

>>ऐका<<
21:06
15
Older Posts
Subscribe to: Posts (Atom)

Popular Posts

  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • मी भटकंती का करतो?
    "मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव...
  • सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
    झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बे...
  • कार: पेट्रोल की डिझेल?
    आपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदा...
  • लवंगी मिरची कोल्हापूरची
    आता मात्र मराठी ब्लॉगस्फियर ढवळून निघाले असेल खादाडीच्या पोस्ट्सने. ढवळून नसले तरी वाचकवर्ग तर नक्कीच जळत असेल. महेंद्र, सिद्धार्थने आपल्या ...
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत
    शेवटी मी आणि भुंगा ने जी चर्चा केली होती आणि ब्लॉगवर मतदान घेतले होते ती ब्लॉगमीट सुरेश पेठे काका आणि अनिकेत समुद्र च्या भरीव कामाने फळास आ...
  • रायगडवारी सातव्यांदा
    रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, त...
  • मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
    दिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...
  • सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
    सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली...
  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
    बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?), मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
  • स्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
  • मी भटकंती का करतो?
  • पालखी सोहळा: अनुशासन आणि शिस्त

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1