एका साहित्यिकाचा खून
हो हे खरे आहे. मी एका साहित्यिकाचा खून केलाय. आपल्यातलाच एक साहित्यिक होता, आंतरजालावर काही काही छान लिहीत होता. लक्षाधीश व्हिजिट्सचा मालक होता. पुरस्कार प्राप्त ब्लॉग होता. नियमितपणे आपले सायकलप्रेम पण जोपासत होता. आपल्या गोड मुलाचे छान फोटो जमेल तसे काढत होता. पण एक दिवस अचानक काय झाले? त्याच्या छंदी लेखनाला दृष्ट लागली. विस्मयकारक घटनांची मालिकाच घडत गेली. त्याचे असे झाले की, त्याच्या आणि अशाच काही एक्स्ट्रा "खाज" असणाऱ्या त्याच्या चार-पाच मित्रांना मराठी ब्लॉगर्सबद्दल प्रेमाचे भरते आहे. आणि त्यांनी एक मराठी ब्लॉगर्स मीट भरवली. त्या मीटच्या आयोजनासंदर्भात एक-दोन वेळा त्याची एका विचित्र मिशीवाल्या भटक्याशी भेट झाली. तेव्हा त्याने एक सुतोवाच केले की त्याला ब्लॉगव्यतिरिक्त भलत्याच एका गोष्टीचा "नाद" आहे. मग काय त्या मिशीवाल्या भटक्याला आयते सावज हाती सापडले हाती. मग त्याने त्या साहित्यिकाला "ती" गोष्ट आणि त्यासाठी लागणारी हत्यारं यांची इत्थंभूत माहिती पुरवली. वर पुन्हा स्वतःकडील हत्यारांची यादी पण सांगितली. मनातल्या मनात (आणि मिशीतल्या मिशीत) हसत या थोर साहित्यिकाला "नादी" लावण्याचा विडा उचलला. त्या साहित्यिकाला त्याच्या साहित्यकृतीला मिळालेल्या एका पुरस्कारवितरणासाठी मुंबईला जायचे होते. मग त्या विचित्र मिशीवाल्या भटक्याने त्याच्या इतर साहित्यिक साथीदारांशी संधान साधून एक कट केला. अक्षरशः सुपारीच दिली म्हणा ना... ते इतर साहित्यिक पण दिल्या सुपारीला जागले. गाडीत जाता जाता डाव साधला. इतर साहित्यिकांनी बरेच प्रयत्न करुन आपल्या प्रथितयश साहित्यिकाचा "हाप मर्डर" केला. उरलेला गेम पुढल्याच आठवड्यात मिशीवाल्याने थंड डोक्याने वाजवला.
हा.. हा... हा...!!! ही मर्डर मिस्टरी आहे की नाही आपल्या "त्या" साहित्यिकाच्या रहस्यकथा स्टाईलने? घाबरु नका... कुठेही काहीही खून वगैरे झालेला नाही. पण एका साहित्यिक प्रतिभेला आपण काही अंशी तरी मुकणार असे दिसतंय. त्याचे झाले काय की...
मराठी ब्लॉगर्स मीटसंदर्भात आमची एक बैठक झाली बालगंधर्वच्या कॅफेटेरियामध्ये बसलेलो असताना मला अनिकेत म्हणाला, "पंकू, राव मला पण SLR कॅमेरा घ्यायचा आहे, पण पैसे जमवतोय आणि घरी बायकोला पटवतोय". झाले मग माझा तर या अशा गोष्टींमध्ये हातखंडा आहे. कुणीही जरा हाय-एंड कॅमेरा घ्यायचा म्हटले की मी त्याच्या मागे एकच भुणके वाजवतो... SLR घे. आजवर अनेक म्हणले किमान सहा-सात मित्रांना मी SLR आणि (त्यातून माझेवाले मॉडेल) घ्यायला उद्युक्त केले आहे. इथे तर आयते सावजच (आपला साहित्यिक) SLR घ्यायचे म्हणत होते. शिवाय मी त्याचा ब्लॉग आणि त्यातले फोटो, त्याचा पिकासा अल्बम चाळून सगळ्या जगातून SLR साठी तू एकटाच कसा लायक आहेस हे समजावून सांगितले. आमच्या गौराईच्या ब्लॉगच्या कॉमेंट्समध्येपण या विषयी चर्चा झडली. पण इथे जरा एक गोची होती. सावज मात्र जरा आर्थिक विवंचनेत (tight cash stripped situation) होते. निदान तो तरी असेच (खोटे-खोटे) म्हणत होता. "एका गरीब, होतकरू मुलाला DSLR घेण्यासाठी Non-refundable मदत हवी आहे" असेही ट्वीट केले होते. म्हणून मग मी मॉडेलची अट सोडून दिली आणि त्याच्या बजेटमधला कॅमेरा शोधू लागलो.
मिशीवाल्याच्या एका मित्राचा एक युज्ड कॅमेरा चांगल्या डीलमध्ये मिळत होता. पण अनिकेतचे primary interest होते बॅकग्राऊंड झक्कास आऊट ऑफ फोकस असणारे पोर्ट्रेट्स आणि फुलांचा किंवा इतर ऑब्जेक्ट्सचा "इन फोकस-आऊट ऑफ फोकस"चा (Depth of field-DoF) खेळ. म्हणून मी त्याला काही उदाहरणात्मक प्रकाशचित्रे दाखवली. आणि तो एकामागोमाग एक फोटो हावरटासारखे पाहत खलास होत गेला. त्याची आपली एकच प्रतिक्रिया "बास बास... अगदी अस्संच हवंय मला...!!!" म्हणजे मला कळून चुकले की याला ५० मिमीची लेन्स हवीच. म्हणून मग ते चांगले डील मागे पडले. त्यानंतर अनिकेतने माझी एक परीक्षाच घेतली. मग त्यात सगळ्या लेन्सबद्दलचे प्रश्न, फोटोग्राफीचे प्रश्न, फास्ट लेन्स
म्हणजे काय, DoF कशी मिळते, झूम आणि प्राईम लेन्सचा फरक, ऍपर्चर, ऑटो-मॅन्युअल फोकस, मग त्याचे फायदे-तोटे असे बरेच काही होते. जोडीला उदाहरणादाखल काही फ्लिकरच्या लिंक्सची फोडणी होतीच. रोज कमीत कमी ३०० ओळींचे चॅट होई. त्यात किमान वीस वेळा "बास बास... अगदी अस्संच हवंय मला...!!!" अनिकेतला प्रश्न विचारणे सुद्धा कंटाळवाणे वाटू लागले असेल एवढे मी त्याला सांगत सुटलो. शेवटी एकदाच्या त्याच्या सगळ्या शंका दूर झाल्या (की निस्तरल्या?).
आता कॅननचा एक कॅमेरा फायनल केला. किट लेन्स आणि ५०मिमीची लेन्स अशा दोन लेन्स पण. म्हणजे त्याच्या गरजेनुसारच. आधीच आपल्याला काय करायचंय हे माहीत असले की असे निर्णय घेणे फार सोप्पे असते. अनिकेतला असेच आधी आपल्याला काय शूट करायचंय हे माहीत होते. म्हणून मग इक्विपमेंटचा निर्णय घेणे सोपे गेले. आणि अनिकेतनेही माझावर पूर्ण विश्वास ठेवून होकार भरला. दिवस फायनल झाला. इतर साहित्यिकांना आमंत्रणे रवाना झाली. कटाचा सूत्रधार (म्हणजे मी का?) जरा जास्तच भाव खात होता. त्याला वेळ मिळत नव्हता. शनिवारचा म्हणजे आजचा दिवस नक्की केला. तत्पूर्वी बुधवारी अनिकेतला सांगून ठेवले की राहिलेले दोन दिवस "बेटर हाफ"शी खूप बोलून घे, नंतर वेळ मिळणे अवघड आहे. आणि वेळ मिळाला तरी वहिनींना घरात सवत आणल्याची टोचणी सतत लागलेली असेल (इतर मित्रांचा पुर्वानुभव आहे). स्वतः अनिकेत तर तर स्वप्नातच गेला होता. आपण गळ्यात कॅमेरा घेऊन मॉडेल्सचे फोटोशूट करतोय असे काहीबाही स्वप्नात दिसत होते त्याला (आवरा...!!!). अंतर्बाह्य SLRमय झाला आपला साहित्यिक कथाकार. दुसरे काहीच सुचेना. शेवटी शेवटी तर मलाच रेफरन्स लिंक्स देऊन माझ्या तोकड्या ज्ञानात भर घालायला लागला.
आता त्याचे त्या दरम्यानचे ट्वीट्स पहा...
पण मध्येच थोडा प्रॉब्लेम झाला. शुक्रवारी वहिनींना थोडे बरे नव्हते. त्यामुळे कदाचित त्यांना हॉस्पिटलाईझ करावे लागेल म्हणून प्लॅन थोडा पुढे ढकलू असे मेल आले त्याचे. मग आम्ही पण पुढल्या वीकेंडपर्यंत जाईल याच विचारात होतो. मी पण शनिवारी सकाळी पुणे मंडईत शूट करुन आलो. पण त्या कालावधीत अनिकेतने शहाण्या नवऱ्याचे कर्तव्य बजावून, वहिनींना व्यवस्थित घरी आणले आणि कॅमेरा संध्याकाळी घेऊ असा निरोप दिला. सगळी आला एकदाचा "अजि सोनियाचा दिनु" उगवला. अनिकेत नवीन सणासुदीचे कपडे घालून आल्यासारखा वाटत होता. इतर साहित्यिक मात्र प्लॅन ऐनवेळी बदलल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण एकाने आजच्या सोहळ्यासाठी चक्क एक फ्ले़क्स बनवला होता.
मी तर हजर होतोच ... बकरा हलाल होताना पाहायला. दुकानात पोचल्याबरोबर मागणी दिली कॅनन १००० डी. धीर धरवत नव्हता. शिवाय अन्याच्या QUOTE पेक्षा ५०० रुपये स्वस्त. "अन्या" तर एवढा खुश की काही विचारता सोय नाही. कॅमेरा घेऊनच निघाला. नंतर मलाच मागे उरलेला कचरा म्हणजे बॉक्स, केबल्स, मॅन्युअल्स, वॉरंटी कार्ड, पिशव्या गोळा करुन आणावे लागले. परत जाताना त्या साहित्यिकाला कॅमेरा वापरायचे धडे देता देता मी चहाचा पेग रिचवून साजरा केला.
आता "ते’ आपले साहित्यिक म्हणे सध्याच्या त्यांच्या हिट लक्षाधीश ब्लॉगवर काहीही लिहिण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आता एक फोटोब्लॉग सुरु करणार आहे म्हणे. बहुतेक केलाय पण. मग केलाय ना मी एका साहित्यिकाचा खून? "एका साहित्यिक प्रतिभेचा अस्त (?) होणार का?" नाही आम्ही असे नाही होऊ देणार. पण त्याच्या दुसऱ्या प्रतिभेचा उदय मात्र साजरा केला आम्ही :-D
"बास बास... अगदी अस्संच हवंय मला...!!!"
आता उद्या एक पेपरात जाहिरात देतोय... आपण यांना पाहिलेत का? बेपत्ता आहेत. प्रतिभाशाली लेखक आणि सायकलस्वार. वर्ण गोरा, उंची साधारण पाच फूट चार इंच, मजबूत बांधा, केस काळे आणि थोडे गायब, चष्मा वापरतात. ओळखण्याची खूण: गळ्यात कॅननचा SLR कॅमेरा, कदाचित तो मिशीवाला भटक्यासुद्धा बरोबर असू शकतो. कुठे आढळल्यास तात्काळ "मनातले" या पत्त्यावर संपर्क साधावा. योग्य ते बक्षीस दिले जाईल.
अनिकेत, राजा, जिथे असशील इथून लवकर परत ये... रसिक वाचक आणि ती अर्धवट राहिलेली कथा वाट पाहत आहेत.
पण आता अजून एक मोठ्ठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. आम्ही अनिकेतच्या घराच्या आसपास फिरकत नाही. त्या रस्त्यावरुन जात असलो तरी वहिनी लाटणे घेऊन आमच्या मागे लागल्याचा आम्हांला सारखा भास होतो. खरे आहे का हो हे वहिनी?

एका गरीब, होतकरू मुलाला DSLR घेण्यासाठी Non-refundable मदत हवी आहे, धनादेश पाठवण्याचा पत्ता आणि अधीक माहीतीसाठी संपर्क.
पंकजचे डोकं खातोय गेले ४दिवस DSLRच्या प्रश्नांनी डोकं खाल्लं आहे मी त्याचे really appreciate all the help he provided thnk u so much pankajz
Hussh finalized finally Canon 1000D + 18-55mm kit lens + 50mm lens on Saturday morning.. feel so good साहीत्यीक ह्या सोहोळ्यास जरुर हजर रहा
Hussh finalized finally Canon 1000D + 18-55mm kit lens + 50mm lens on Saturday morning.. feel so good साहीत्यीक ह्या सोहोळ्यास जरुर हजर रहा
आतुर आहे DSLR घेउन 'जादुच्या पत्यावर' जाण्यासाठी :-)
विठ्ठलाssss कोनता कॅमेरा घेऊ हाती????
पाना चाहु रात दिन जिसे, वो जो मुझे खाब मै मिले, रब्बा उसे दिला दे मुझे, तेनु दिल दा वास्ता
To: Canon EOS Rebel XS DSLR, हमको हमी से चुरालो, दिल मै हमे तुम छुपालो... पास आओ गले से लगालो
http://twitpic.com/11h5b7 - मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तु?
पण मध्येच थोडा प्रॉब्लेम झाला. शुक्रवारी वहिनींना थोडे बरे नव्हते. त्यामुळे कदाचित त्यांना हॉस्पिटलाईझ करावे लागेल म्हणून प्लॅन थोडा पुढे ढकलू असे मेल आले त्याचे. मग आम्ही पण पुढल्या वीकेंडपर्यंत जाईल याच विचारात होतो. मी पण शनिवारी सकाळी पुणे मंडईत शूट करुन आलो. पण त्या कालावधीत अनिकेतने शहाण्या नवऱ्याचे कर्तव्य बजावून, वहिनींना व्यवस्थित घरी आणले आणि कॅमेरा संध्याकाळी घेऊ असा निरोप दिला. सगळी आला एकदाचा "अजि सोनियाचा दिनु" उगवला. अनिकेत नवीन सणासुदीचे कपडे घालून आल्यासारखा वाटत होता. इतर साहित्यिक मात्र प्लॅन ऐनवेळी बदलल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण एकाने आजच्या सोहळ्यासाठी चक्क एक फ्ले़क्स बनवला होता.
मी तर हजर होतोच ... बकरा हलाल होताना पाहायला. दुकानात पोचल्याबरोबर मागणी दिली कॅनन १००० डी. धीर धरवत नव्हता. शिवाय अन्याच्या QUOTE पेक्षा ५०० रुपये स्वस्त. "अन्या" तर एवढा खुश की काही विचारता सोय नाही. कॅमेरा घेऊनच निघाला. नंतर मलाच मागे उरलेला कचरा म्हणजे बॉक्स, केबल्स, मॅन्युअल्स, वॉरंटी कार्ड, पिशव्या गोळा करुन आणावे लागले. परत जाताना त्या साहित्यिकाला कॅमेरा वापरायचे धडे देता देता मी चहाचा पेग रिचवून साजरा केला.
आता "ते’ आपले साहित्यिक म्हणे सध्याच्या त्यांच्या हिट लक्षाधीश ब्लॉगवर काहीही लिहिण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आता एक फोटोब्लॉग सुरु करणार आहे म्हणे. बहुतेक केलाय पण. मग केलाय ना मी एका साहित्यिकाचा खून? "एका साहित्यिक प्रतिभेचा अस्त (?) होणार का?" नाही आम्ही असे नाही होऊ देणार. पण त्याच्या दुसऱ्या प्रतिभेचा उदय मात्र साजरा केला आम्ही :-D
"बास बास... अगदी अस्संच हवंय मला...!!!"
आता उद्या एक पेपरात जाहिरात देतोय... आपण यांना पाहिलेत का? बेपत्ता आहेत. प्रतिभाशाली लेखक आणि सायकलस्वार. वर्ण गोरा, उंची साधारण पाच फूट चार इंच, मजबूत बांधा, केस काळे आणि थोडे गायब, चष्मा वापरतात. ओळखण्याची खूण: गळ्यात कॅननचा SLR कॅमेरा, कदाचित तो मिशीवाला भटक्यासुद्धा बरोबर असू शकतो. कुठे आढळल्यास तात्काळ "मनातले" या पत्त्यावर संपर्क साधावा. योग्य ते बक्षीस दिले जाईल.
अनिकेत, राजा, जिथे असशील इथून लवकर परत ये... रसिक वाचक आणि ती अर्धवट राहिलेली कथा वाट पाहत आहेत.
पण आता अजून एक मोठ्ठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. आम्ही अनिकेतच्या घराच्या आसपास फिरकत नाही. त्या रस्त्यावरुन जात असलो तरी वहिनी लाटणे घेऊन आमच्या मागे लागल्याचा आम्हांला सारखा भास होतो. खरे आहे का हो हे वहिनी?
बास रे बास.. सेट झालो आता मी. उद्याचा दिवस वेताळ टेकडी, मुंजाबाचा बोळ, तळजाई नाही तर पर्वती. सगळी बटण वापरुन पहाणार आणि मग तुला छळणार. आत्ताशीक कुठे एक स्वप्न पुर्ण झालयं.. अजुन ५०एम.एम येते आहेच तो वर
ReplyDeleteमी? ब्लॉगर? नाय बा! ते काय असतया? आम्ही आपले DSLR वाले.
आत्ता रात्रीचे ११.४० झाले आहेत, सगळे झोपले आहेत आणि मी मागच्या खोलीत दार लावुन फोकस-फोकस खेळतो आहे, विविध प्रकारांनी फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. नशिब बाहेरुन कोणी बघत नाहीये नाहीतर फ्लॅशचा प्रकाश बघुन म्हणतील ह्यांच्या घरात रात्री १२ ला फोटो काढतात की काय?
च्यायला ही रात्र लवकर संपत का नाय? सकाळ कधी होणार???
:) :P :D
ReplyDeleteते योग्य बक्षीस काय आहे??? कॅननचा SLR कॅमेरा का??
ReplyDeleteफ्लिकरच्या लिंक्सची फोडणी चांगली बसलीय आणि आता तर काय साहित्यिक स्वतःच मान्य करताहेत... तुमच्या चांडाळ चौकडीला वहीनीच्या लाटण्यापास्नं वाचण्यासाठी शुभेच्छा........:)
ReplyDeleteमस्तच रे टायटल आणि तुझा लेख ही......hummmm...तर अश्याप्रकारे त्या साहित्यिकाचे सावज बनवलेस तर!!!!!!!!!!
ReplyDeleteबाकि वहिनींना नाही सापडले तुम्ही तर तुम्हाला पकडून त्यांच्यासमोर उभे करण्याची जबाबदारी आमची....(स्वघोषीत).....काय मग अनिकेत लागू का कामाला!!!!
अभिनंदन!
ReplyDeleteहेत्तिऽऽच्याऽऽ... पंक्या, तु भेटच, मायला तोही हाड्डी-पसली एक करतो की नही ते पाहाय तू फक्त...! साला, अनिकेत दादासारख्या महान ब्लॉगरला आमच्यापासून हिणावून घेऊन त्याला कसल्या-कसल्या बिनकामाच्या सवयी लावल्यात रे...! बिच्चारा अनिकेत दादा, आता त्येला रोज वहिनींची फुकट मार खाणं पडत्ऽऽतज्जाईन... अन ते बी लाटण्यानं..! शिऽऽटऽऽ, तोह्या सारख्या मर्डररला जो कोणी पकडून दाखविन, अन त्येचा DSLR चा माज उतरून दाखविन, त्येला मह्याकडून एक मोट्टंच्या-मोट्टं बख्शिस...! आणखी माहितीसाठी मह्याशी खालिल पत्त्यावर संपर्क साधावा...
ReplyDeleteविशाल तेलंग्रे, suruwat[ऍट]twitter.com, तालुका, जिल्हा, इत्यादी तिठं गेल्यावरच कळंण...!
- विशल्या!
आता काय खरं नाय बा. तो अनिकेत कुठे गेला? ’मला तर बाब्बा आता रोजच्या रोज लिहायला जमणार नाही’ म्हणत होता ना? तेव्हाच तयारी केली असणार त्याने ह्याची. पंकज तू तर काय ’सावज’ हाती लागायची वाटच पहात होतास ना! अभिनंदन! तुझ्यासारखाच आणखी एक वेडा तुला मित्र म्हणून मिळाल्याबद्दल.
ReplyDeleteमाझा पण जुना कॅमेरा मी विकलाय. आता नवीन कॅमे-यासाठी प्लॅटफॉर्म बनवणं चालू आहे. आता अनिकेतने सुद्धा कॅमेरा घेतला हे पाहून थोडं जळकुकडं असल्यासारखं वाट्लं मला.
अन्या, तुझं काही खरं नाही बाबा. तेवढे वहिनींना माझे नाव कळू देऊ नकोस बाबा. तुझ्या ५०मिमी ची मी पण वाट पाहतोय.
ReplyDeleteप्रीतम, राम धन्यवाद.
अपर्णा, साहित्यिक आणि वहिनी, दोघेही समजूतदार आहेत.
"सहजच", साहित्यिकच सावज बनून हाती सापडलाय मी काही केले नाही.
विश्ल्या, हड्डी-पसलीपर्यंत हात पोचतो का रे तुझा? थोडा मोठा हो, तुझी पण सुपारी देऊन गेम करतो ("नादी लावतो"). आणि आता DSLRचा माज उतरणे? स्वप्न बघ!
कांचन, अनिकेत आता त्याच्या फोटोब्लॉगवर भेटेल. अरे वा, जुना कॅमेरा विकलाय? भारी मग. आमच्या ’सुपारी’वीरांची मुंबई-ठाण्य़ात शाखा आहे का ते पाहतो. एका दिवसात काम तमाम करतात ते एकदम एफिशियंटली. कधीपासून कामाला लागू?
हाव काय??? आत्ताच पोलिस स्टेशनमंधी तोह्या ह्या पोस्टची प्रिन्ट घेऊन जातो, अन फिर(FIR...!!!) नोंदून येतो... मंग कसा मव्हा गेम करशीन तू...! अन राती झोपतांना बी घराला मंधून कुलुप लावून झोपतो, तुला चान्सच नही भेटणार..! हे.. हे..! मी वहिनींना (अनिकेत दादाची सौ.) बी तोव्हं नाव सांगासाठी ट्राय करतोय, पण नंबर "डोज नोट एक्जिस्टंऽऽऽ" अश्या त्या वहिनी किती वेळपासून सांगताहेत, मला काही कळाणासं झालंय, बॅलेन्स बी संपत आलंय राव मोबाईलमंधलं..! शिऽऽट्ट..
ReplyDeleteसाला तुम्ही ज्याची सुपारी घेता त्याच्याच खिशाला खडडा पाडता. असो मला हे वाचून हलाल होण्याची इच्छा झालीय. खिसा भरला की कळवतो. मग आमच्या ऐपतीप्रमाणे हलाल करा.
ReplyDelete@कांचन, खरंच घेऊन टाक DSLR फोटोग्राफी आणि ते पण with DSLR जे सुख आहे ना ते वापरणाराच जाणे
ReplyDelete@तन्वी - नको गं, जाऊ देत उलट खुप मदतच झाली आहे त्याची. तो होता म्हणुनच माझं वर्षापासुनचे स्वप्न सत्यात उतरु पहात आहे
@विशाल - अरे कसली FIR, जेथे तु ज्याच्या वतीने फिर्याद देणार तोच जर तुझ्या बरोबर नसेल तर? :-) बाकी 'महान ब्लॉगर' वगैरे काही नाही बरं का, हा पण महान फोटोग्राफर व्हायचे आहे
@सिध्दार्थ - लेका वाट नको बघु जास्ती, डोक्यात जातं रावं, रातीला स्वप्न पडायला लागतात, तहान भुक लागेनाशी होते, घेऊन टाक टका टक
@पंक्या - येनार, ५०एम.एम. लवकरच येनार
:) :) किलर लेख आवडला
ReplyDeletenamaskar . jara tumchi madat hawi ahe ....slr ghenyababat ....mi ithe mumbai maadhye ahe .....number milele ka?
ReplyDeleteअभिनंदन!!! अखेरीस गळाला मासा लागला तर :) पण तू खरंच एका साहित्यिकाचा खून केला आहेस ... कितीतरी दिवसात मनातलं काही ब्लॉगवर उमटलेलंच नाहीये, आणि आता नवं खेळणं मिळाल्यावर ती शक्यता अजून कमी होणार !!! अर्थात आता अजून सुंदर फोटो बघायला मिळतील म्हणा :)
ReplyDeleteया मिशीवाल्या भटक्याने माझा पण खून करण्याचा प्रयत्न केला होता....आणि अजुनही आहे... :)
ReplyDeleteबाय द वे, ब्लॉग झक्कासच...
चांडाळा, कुठे फेडशील हे पाप? आणि आम्हालापण या कटात सामील करून आमच्याही नरकवासाची सोय केलीस...
ReplyDeleteयाची शिक्षा मिळालीच पाहिजे तुला, नराधमा...
तुला पुढचे सहा महिने मटण खायला न मिळो आणि एक वर्ष कुठल्याही गडाची ट्रेक करायला न मिळो....
सिद्धार्थ, ऐपतीपेक्षा जरा जास्तच हलाल होतो माणूस... वेड लागले की.
ReplyDeleteस्मिता, LEobON: धन्यवाद!
गौरी, आता ते "मनातले" विसरुनच गेलेले बरे, असे तो ब्लॉगर म्हणतोय.
कपिल, तू तर आधीपासून हिटलिस्टवर आहेस. कवडी-पाट बद्दल माहिती विचारली होती तेव्हापासून.
विक्रांत, कटात झालेली तुमची मदत मी विसरणार नाही. अरे पाप नाही ते. पुण्य आहे. आणि पापच म्हणणार असशील तर तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, "ते" पाप केल्यावर लागोपाठ दोन दिवस तीन वेळा मटण खाल्ले आहे.
PANKAJ SAHEB ...AMHALA DHANYAWAD NAKO HO ..........KHARACH SLR GHAIYCHA AHE .....NO JOKES
ReplyDeleteहा हा . खूप छान वर्णन. प्रत्येक DSLR इच्छुक प्राण्याच असच होत. Canon 1000D ? .. वाह माझा वाला Camera घेतला तर मग सावजानी :)
ReplyDelete- Prashhant
Hi,
ReplyDeleteCame across your blog through P@P...good blog and great snaps..
Between I am also planning to buy a DSLR for some time but I am all confused..can you help me as well..ofc if it is fine with you? (I know we don't know each other, bt read this post and thought you could help)
-Anuya
LEobON, करा की मेल मग मला... pankajzarekar[AT]Gmaildotcom
ReplyDeleteधन्यवाद प्रशांत.
अनुया, ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद. I wud definitely like to help. Do mail pankajzarekar[AT]Gmaildotcom
भार्रीच्च! लय झ्याक लिवलंस...
ReplyDeleteअनिकेतराव नविन कॅमेरासाठी शुभेच्छा...फोटोब्लॉगवर करामत पहायची लवकर संधी द्या...
पंकजसाठी तर आताच सावजं स्वत:हुन येत आहेत ... :)
मस्त रे पंक्या, एक DSLR विक्रीची एजंन्सी घेऊन टाक आता, साईड बिझ. चांगला होईल.
ReplyDeleteअसेच अनेक लोकं फोटोग्राफीत जॉईन होत राहोत हीच ॥श्रीं॥ची इच्छा
I work with Aniket and sit next to him.
ReplyDeleteMr. Killer you really murdered him.
Nice job.
असे अजून किती खून पचवलेस? सुपारी कोणी दिली? फायदा कोणाचा झाला? माझा नेहमीच व्यावसायीक फायदा बघणे असते. खुन ज्याचा झाला त्याचा पण फायदा झाला पाहिजे. पुढच्या खुना करता.....
ReplyDeleteअसं का केलंत तुम्ही? आमच्या अनिकेत दादाला तरी सोडायचं ना!! त्याच्या ऐवजी मला बकरा बनवलं असत तर. असो तुम्ही नशीबवान आहात कारण तुम्ही तुमची हौस पूर्ण करताय. नाहीतर आम्ही photography ची हौस mobile च्या कॅमेर्याने ने पूर्ण करतो. माझ्या ब्लोग वर टाकलेले फोटो बघा आणि काही सल्ला असला तर द्या. बाकी post एकदम भारी होती .
ReplyDeleteअचुक पडली ठिणगी, प्येटलं सारं रानं
ReplyDeleteकाळ येळ इसरलं गडी, राहील नाही भानं
aaj baryach divsani online aalo aani ha dandanit lekh
ReplyDeletekrutyabaddal nishedh
aani lekhabaddal abhinadan
आनंद, सावजं स्वतः आली तरी त्यांची योग्यता पाहूनच सुपारी दिली जाते.
ReplyDeleteअनिकेत, धंदा नाही माझा तो. तुझा फायदा झाला आणि तू SLR घेतलास हेच आमचे समाधान. अधिकाधिक छान फोटो पहायला मिळणार.
निखिल, तू खूप दिवसांपासून ओळखतोस त्याला. आणि मग तुला त्याचे फोटोग्राफीचे वेड माहिती असेलच.
रानडे काका, मी फोटोग्राफीमध्ये तरी कधी व्यायसायिक फायदा पाहिला नाही. पोटापाण्याचा धंदा म्हणजे कीबोर्ड बडवणे, आणि आयुष्यात लागलेला एकमेव नाद म्हणजे भटकंती (जोडीने फोटोग्राफी). जो काही फायदा झालाय तो विकत घेणाराचा (या केसमध्ये अनिकेतचा) झालाय. थोडा स्वस्त मिळाला, बाजारभावापेक्षा.
अनिकेत, सांभाळ रे स्वतःला. डोकं फिरलंया, या पोराचं डोकं फिरलया... लेन्स धरलीया या पोराने लेन्स धरलीया.
विनायक, आता त्याचा फोटोब्लॉग पाहिलास की कृत्याबद्दल माझे अभिनंदन करशील, खात्री आहे मला.
jabardast... :-)
ReplyDelete