मी भटकंती का करतो?
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!!
हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-)] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून. बऱ्याच उत्तरांमध्ये खाज, माज, मस्ती, रग आणि तत्सम शब्दही ऐकू आले :-) आणि ते नाही आले तरच नवल... कारण त्याशिवाय काही माणूस पहाटे साडेतीनला उठून गाडी दामटवत सह्याद्रीच्या ऊन-वाऱ्यात झोकून द्यायचा नाही.
मला आठवतंय जेव्हा मी पहिला ट्रेक (?) केला... चौथीतच होतो. शेंबूड पुसायची पण अक्कल नव्हती. शेजारच्या काही मंडळींबरोबर मी आणि पप्पा डबे घेउन सिंहगडावर निघालो होतो. त्या वेळी सिंहगड म्हणजे "अबब... किती दूर आहे" अशी अवस्था होती. स्कूटरमधे (Bajaj Cub - 1987 model) कँपात सिल्व्हर ज्युबिलीच्या पंपावर पेट्रोल टाकले आणि आम्ही स्वारगेटवरुन व्हाया सिंहगड रोड खानापूरला पोचलो. तिकडे पप्पांनी सांगून टाकले की मी गाडीवर वरती येणार आणि तुम्हांला चालत यायचे तर या. आजच्या एवढीच खाज होती त्यावेळी ना... मग आम्ही चालत वर गेलो होतो. येही सरळ रस्त्याने न जाता शॉर्टकट मारत मारत. वरती पोचता पोचता पप्पा रुमाल हलवून आम्हांला प्रोत्साहन देत होते. आजही मला वाटचाल करताना ते आज नसले तरी त्यांचीच मूर्ती समोर दिसते, प्रोत्साहन देणारी. हा माझा पहिला धडा. त्यानंतर चौथीला प्रतापगड पाहिला. सहावीला असताना शाळेत असताना बाईंनी विचारले होते सहलीला कुठे जायचे तर माझे उत्तर सिंहगड होते. आणि माझ्या सांगण्यावरुन गेलोही तिकडे. सगळ्यात आधी मीच.. वर चढण्यात, सगळी ठिकाणे दाखवण्यात आणि खाली उतरण्यात पण (कारटं पहिल्यापासूनच आगाऊ आहे).
खरा ट्रेक केला तो लोहगड... सन-२००० च्या पावसाळ्यात. पहिलटकरणीसारखी अवस्था होती. ट्रेक म्हणजे नक्की काय करायचे असते ते माहीतही नव्हते. पण वरती पोचल्यावर जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते. आम्ही जात असतानाच लोहगडवाडीतून परत येणारा ग्रुप दिसला आणि त्यात एक अंध मुलगा...
लोहगडावर मुक्कामी ट्रेक करुन ते परत निघाले होते. तेव्हाच वाटले हे की बास इथून पुढे कधीच थकायचं नाय, दमायचं नाय. आजवर जे काही ट्रेक केलेत, किल्ले पाहिलेत त्यात प्रत्येक वेळी तो अनामिक मुलगा माझे स्फूर्तिस्थान राहिला. असाच अनुभव मला गेल्या वर्षी पुरंदर-वज्रगडाच्या ट्रेकमधे आला. पायाने अधू असणारा एक अनामिक ट्रेकर गड चढून वर आलेला मी पाहिला. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." आता सांगा हे असे शिक्षण कुठल्या विद्यापीठात आणि किती पैसे फेकून मिळेल?
लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.
शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा
भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याची सर KFCला नाही.
या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
(बाजूचा माझा फोटो सुहासने काढला आहे.)
आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!

रोहनच्या ब्लॉगवरुन साभार
गोनीदा सांगतात ना...
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"
(बाजूचा माझा फोटो सुहासने काढला आहे.)
आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
अजून काही आहे तुमच्यासाठी:
घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक
माझ्याबद्दल थोडेसे
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक
सुरक्षित ट्रेक
ट्रेकर्सचे वाक्प्रचार
धन्य झालो आम्ही हि पोस्ट वाचून . . शब्दच संपले यार . . तुला तोड नाही . . . जय सह्याद्री - जय पंकजची भटकंती!
ReplyDeleteही खाज अशीच पसरो आणि माझ्यासारख्या आळशी लोकांना लागो...
ReplyDeleteसलाम तुला!!
भन्नाट पोस्ट! एवढ्या दिवसांत अगदी बेंबीच्या देठापासुन जो संदेश पाठवायचा प्रयत्न केला.. तो या पोस्टच्या सु-रुपाने वाचण्यात आला.
ReplyDeleteदोस्ता, अगदी मनातलं बोललास लिहिलंस! रोहनसारखाच आणखी एक भेटला.. धन्य झालो!
जास्त लिहित नाही.. भावना पोहोचल्या आणि पोहचवल्याचं समाधान झालं!
शतशः धन्यवाद आणि अभिनंदन!
अप्रतिम पोस्ट. क्या बात है !!
ReplyDelete"ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो."
ReplyDeleteअप्रतिम पंकज भाऊ..
काय लिहितोस तू..जबरदस्त !!
जसा एखादा ट्रेक/गड वर उंचावर असतो तसाच हा लेख एका उत्तुंग थराला आहे..
म्हणजे मी लेख वाचत खाली जात होतो पण माझे मन वर सह्याद्रीत भटकत होते... :)
तू भाग्यवान आहेस पुण्यात राहतोस सह्याद्रीच्या कुशीत.. मनात आल कि एखादा गड/ ट्रेक सर केलास..
आम्ही इकडे जाऊन आलेलो परत तिथेच जायचं म्हणून कंटाळा करतो..
आत्तापर्यंत धोडप, रतनगड, कळसुबाई, वणीच्या समोर मार्कंडेय, मांगी-तुंगी आणि असेच बाकीचे रान तुडवले आहेत..
आता मी चालता होणार.....
One of the greatest post I ever read on any marathi blog is this.
ReplyDeleteUltimate
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
ReplyDeleteवा. काय लिहीलं आहेस. तोडच नाही. बर्याचदा आपल्यालाच पडणारा प्रश्न आणि त्यापेक्षाही हे उत्तर अगदी पटण्याजोगे. ही खाज, हा माज, ती नशा, अशी सहजासहजी सुटणार नाही, सुटूही नये. तुझ्या व आपल्या भटकंत्या अश्याच चालू राहतील ही खात्री.
तु वर लिहील्यासारखं बर्याचदा असे अनुभव येउन जातात की आपण अजाणतेपणे गप्प होतो. सह्याद्री असं काही शिकवतो की ते कधीच विसरु शकत नाही.
फारच मस्त लिहीलं आहेस. लिहीत राहा. बर्याच जणांना लिहीता चांगलं येत नाही इच्छा असूनही. तु लिहीतोस छान, अगदी मनापासुन, अगदी मनातलं. माझ्यासारख्या ठोंब्यांना यातुन प्रोत्साहन मिळून कधीतरी लिहायची उमेद राहील.
ध्रुव
पंकज शब्दच नाहीत आता इतकं छान लिहिलंस....५३ किल्ले...सही...हा आकडा असाच वाढो आणि अशाच अनेक उत्तम पोस्ट्सनी तो आमच्यापर्यंत पोहोचो...
ReplyDeleteआपल्यात एक साम्य आहे मी पण लोहगड २००० मध्येच केला होता. पण नंतर खूप ट्रेकिंग असं नाही केलं...नुस्तंच भटकलो...
काय भारी लिवलंय राव. भटकंती काय काय शिकवते ना! लकी माणूस आहेस बाबा. भटकंती करत रहा. फोटो काढत रहा आणि लिहीता रहा. खळ्याच्या बैलाचं उदाहरण समर्पक.
ReplyDeleteहे दुर्ग, हे निसर्गसौंदर्य हीच आपली संपत्ती आहे. तुझा ब्लॉग मी फॉलो करत नव्हते, हे लक्षातच आलं नव्हतं.
माझ्या उभ्या आयुष्यात मी फक्त दोनच स्थळं पाहिली. माथेरान आणि गणपतीपुळे. नाटकाच्या दौरांच्या निमित्ताने भटकले पण ती भटकंती नाही. तुझं, भुंगोबाचं लेखन वाचलं की स्वत: त्या स्थळी गेल्याचा अनुभव येतो. तुला भटकंती साठी शुभेच्छा.
मस्तच लिहीलं आहेस मित्रा. आम्हाला कळतंय हे, पण वळतच नाही ना! सुट्टीच्या दिवशी अंथरूणात लोळत पडत टि.व्ही बघायची जुनी सवय जाता जात नाही बघ.
ReplyDeleteApratim lihilay...
ReplyDeleteपंकज ...दिपक तूला खरे सांगतोय. जे आम्ही पोस्टवर-पोस्ट करून मांडायचा प्रयत्न करतो ते तू ह्या एका पोस्टमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडले आहेस... सह्याद्रित असे अनेक प्रसंग येतात.. अशी अनेक दृश्य घडतात जेंव्हा आपला कण अन कण शहारतो. सर्सरत एक काटा अंगावरून निघून जातो. आणि आपण त्या आपल्या लाडक्या सह्याद्रीच्या प्रेमात विलीन कधी होतो ते आपल्याला कळत सुद्धा नाही. अर्थात हे अनुभवायला पक्के भटके, उनाडके असावे लागते.
ReplyDeleteसह्याद्रित असताना कामाच्या 'डेडलाइन्स' वर गप्पा मारणाऱ्याला मी लाथा घालतो. इतके आले की कसे सह्याद्रीबद्दल भरभरून बोलावे.. भरभरून ऐकावे.. अक्षरशह: भरून घ्यावे स्वतःला. खरच तो देतोय त्याच्या अगणीत बाहुंनी आपल्याला भरभरून.
इतक्या वर्षात तू असेच सर्व काही भरभरून घेतलेस आणि आज तुझी ओंजळ तू आमच्यापुढे रिती करतो आहेस ... ह्यासाठी सुद्धा एक सच्चा सह्यवेडाच लागतो बरं का...
आज आपण जे काही आहोत ते ह्याच सह्याद्रीमुळे ही जाणीव कायम राहावी हिच एकमेव इच्छा...
>...रोहन ... पक्का भटक्या ... >
वाचता वाचता नकळत डोळे भरून आलेत मित्रा... खरच धन्य झालो... दिपक आणि तू असे दोघे सह्यवेडे ब्लोग्गर्स भेटले. आता आपल्याला लवकरात लवकर एक ट्रेक मारायला हवा मित्रा... :)
ReplyDeleteतुषार, धन्यवाद. जय सह्याद्रीपर्यंतच ठीक आहे.
ReplyDeleteआनंद, चालते व्हा.
भुंगा, रोहन: मी पण अशा साथीची वाटच पाहत आहे.
मंदार, नाशिक प्रांती अजून बरेच बाकी आहे आमचे. येऊच स्वारे घेऊन कधी तरी. कुमक तयार ठेवा.
हेरंब, सलील: धन्यवाद.
ध्रुवा: अरे पुढे तूच मार्गदर्शक आहेस. मी ’हिटविकेट’ झाल्यावर :-)
अपर्णा, पुन्हा ’चालते व्हा’.
अनिकेत, टीव्ही काही देत नाही आपल्याला. सह्याद्रीकडे भरभरुन आहे. शेवटी आपलीच झोळी दुबळी पडेल.
आदिती, शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आता फॉलो करायला लागलात ना? हरकत नाही. मी कमीत कमी बोअर करण्याचा प्रयत्न करेन.
रोहन, अरे सांगूनही डोळ्यांतले पाणी दाखवलेस. ट्रेक मारूच आपण.
आपले रक्तच रांगडे आहे. कड्या-कपार्यांतून, दर्या-खोर्यांतून, नदी-नाल्यांतून आणि प्रतिकूल परिस्थतीत आपले पूर्वज हिंडले असतील. जर ते तसे होते, तर आपणही तसे असायलाच हवे. एक आदर्श उदाहरण म्हणजे तुझ्या ट्रेक्स... आपल्या छत्रपतींनी आणि पूर्वजांनी किती हालापेष्टा सहन करून हे दुर्ग, गड सर केले होते. तुझ्या ट्रेक्स मधून अगदी तेच दर्शन नेहमी होते. एक मोठा (लाईफ सेट झालेला) माणूस, नोकरीची ती चैनी सोडून राना-वनांत फिरतो... अशा माणसाला खरंच "भटक्या"च म्हणता येईल... तुझे सगळे भाव कळाले या पोस्टच्या मदतीने...
ReplyDeleteतुझी सगळी बैचेनी ही फक्त सह्याद्रीच्या कुशीत जाण्यासाठीच असते, हे देखिल कळालं...
तु याप्रमाणेच सातत्याने पुढेही अशाच ट्रेक्स कराव्यात (तू करशीलच म्हणा...!) ही सदिच्छा...!
- विशल्या!
Mitra,
ReplyDeleteare kai lihila ahes !!!!!!
Wah wah, wah wah.........
Man ani dole, donhi bharun ala....
Asach lihit raha....
Aaj sahyadrit ani himalayat 84 trek ani 60 kille kelyawar malahi asach vatta.......
Ahes tarun tar ghe karun !!!!!!
नादखुळा एकदम जबऱ्या पोस्ट
ReplyDeleteआतापर्यंत जेवढे पोस्ट वाचले आहेत त्यातील सर्वात आवडलेला आणि आपला वाटलेला हा पोस्ट
एकदम झाक पंक्या :)
sahi lihilay. mi dekhil geli 7-8 varsha sahyadrimadhe asach bhatakatoy. to khul nadach lagalay. asa vatatay ki lagalich bhidava ekhadya tashiv katal-kadyala kinva java 'rede khindichya' ghanadat jangalat vanya pashunchi sobat karayala. ya weekend la janar nakki janar kuthe-tari. baki kuthe nahi tar nidan javalchya javal dhak-bahiri la tari.
ReplyDeletePankaj, tula bhatakantisathi anek shubhecha.
saurabh.a.joglekar@gmail.com
http://thoughtfacet.blogspot.com
Beautiful!!!! simply amazing
ReplyDeleteइतकं सुंदर लिहिलं आहेस, की आज तिसऱ्यांदा वाचतोय.. अप्रतीम..
ReplyDeleteएकदम जबरी लिहल आहे...आमच्यासारख्या आळाश्यांसाठी खुपच प्रेरणादायी आहे हा लेख..मनापासुन आवडला...
ReplyDeleteपंकज अप्रतिम. प्रतिक्रियेसाठी शब्द नाहीत माझ्याकडे. दोन दिवसात दोन भन्नाट पोस्ट होत्या तुझ्या. कधी संधी मिळाली तर तुझ्याबरोबर सह्याद्रीची सैर करायला नक्की आवडेल.
ReplyDeleteमस्तच लिहिलयस...
ReplyDeleteआणी हो ही खाजच असते जी भर OCTOBER HIT मध्ये ही ओढत नेते सह्याद्रिकडे रग जिरवायला... :-)
तूच रे तो!!!
ReplyDeleteHats off to you sir !
ReplyDeleteविश्ल्या, हो रे सगळी बेचैनी तीच आहे. कसे होणार?
ReplyDeleteट्रेकरसिड, गुरु आहात तुम्ही. आवडले आपल्याला- "आहेस तरुण तर घे करुन"
विक्रम, धन्यवाद. एकदा तुमचे शाम्त वादळ घुमू द्या की सह्याद्रीत.
भावना, धन्यवाद. ’धूमकेतू’सारखी आलीस आज?
महेंद्रजी, मी पण दहा वेळा वाचतोय माझीच पोस्ट.
दवबिंदू, उठा, चालते व्हा.
सिद्धार्थ, करु रे प्लॅन एक. तू, मी, भुंगा, रोहन आहेतच.
योगेश, तुषार: धन्यवाद. असेच येत राहा.
सुहास, सर..!!!
पंकज अतिशय अप्रतिम शब्द व त्यातून मनास भिडलेली तुझी कळकळ, भटकंतीचे प्रेम. प्रवास म्हटला की माझ्याही अंगात नुसता संचार होतो.:) अर्थात मी फार ट्रेक्स केलेले नाहीत. पण सहा-सात गड सर केले आहेत... रोहनला तर आधीच सांगितले आहे आता तुला वेळ झालाच तर तुझ्याबरोबरही एखादा ट्रेक करायला मला आवडेल.खूप खूप आवडले हे पोस्ट.
ReplyDeleteकाय बोलावं आता??
ReplyDeleteAs usual... मस्त लिहिलयेस. तुझी पोस्ट वाचुन आता मला पण माझा पेंडींग ब्लॉग कंम्प्लीट करायला प्रोत्साहन मिळालंय....आजच सुरु करतो बघ.
ReplyDeletejabardast post!!!!!!!
ReplyDeletesahyadrichi galabhet karun dilit apan!
Toofan lihale aahes... Khush jhale vachun.... Abhaar.
ReplyDelete- Nayana
पोस्ट एकदा वाचून समाधान होइना म्हणुन पुन्हा पुन्हा वाचलय.........
ReplyDeleteभन्नाट, मस्त............
नासिक प्रांतीच्या वारीत मी पण येणार आहे...हे मी रोहनला ही सांगितलेय,,,,आता तुलाही!!!
तुम्हा भटक्यांना सलाम!!!
फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.
ReplyDeleteHi Pankaj,
ReplyDeleteI visit your blog often but most of the times to see the photographs you click (I am your fan for your photography skills). Today just while navigating ur site I came across this blog. Its too good. Ek number. The description of the way you derive motivation to trek is fantastic. Khup sahi post ahe ha.....
jabardast post... once again !
ReplyDeletejaast naahi lihit... just keep it up !!
~ Samyak.
भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा. गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी. प्यार मला हे कभिन्न कातळ ,प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला.
ReplyDeleteतो मी नव्हेच... कुठल्या तरी अज्ञात शक्तीने ही पोस्ट माझ्याकडून लिहून घेतली असावा. अशी पोस्ट मला नाही वाटत मला पुन्हा जमेल आता. ती शक्ती सह्याद्रीची तर नसावी? नक्की तीच असेल. मीही थरारलो होतो ही पोस्ट लिहिताना. आणि मी आजवर दहा-पंधरा वेळा वाचलीये... पण प्रत्येक वेळी अंगावर शहारा आल्यावाचून राहत नाही.
ReplyDeleteSahii... 1 no..
ReplyDeleteKiti vela wachla tari punha punha wachnyachi iccha hotey, manatlya goshti itkya sahajpane lihilyat! saglyana nai jamat he, tumche barech blog wachle, ha saglyat chhan!!
ReplyDeleteआज कितव्यांदा वाचला बरे हा पोस्ट??? माहित नाही... च्यायला आता राहवत नाही... शनिवारी हल्लाबोल नाणेघाट... :)
ReplyDeleteमलापण आठवत नाही किती वेळा मी ही पोस्ट वाचली असेन..तुझ्या ह्या शब्दाचा नेहमीच आभारी राहीन मित्रा..नेहमीच :)
ReplyDeleteधन्यवाद वृंदा, मनीषा, रोहन आणि सुहास.
ReplyDeletesuperb..naad naay karayacha gadya
ReplyDeleteनमस्कार .. मी सुद्धा असाच एक भटक्या आहे.. तुमच्या इतका नसेल पण कुळ तेच :)
ReplyDeleteया पोस्टमधील प्रत्येक वाक्य वाचताना मला असा जाणवलं कि "खाज" शमवायला म्हणून मी माझ्या समविचारी मित्रांबरोबर ट्रेकला जातो तेव्हा मी हेच विचार करतो .. कितीही संकट येऊ दे चालत राहा हि शिकवण खरोखर भटकंती शिकवून जाते .. योगायोग असा कि माझाही पहिला ट्रेक असाच डबे घेऊन आई-बाबांबरोबर सिंहगड .. नंतर शाळकरी मित्रांबरोबर लोहगड :) कळसुबाई ट्रेकचे तर वर्णन वेळेसकट तंतोतंत :) असो.. फार आनंद झाला हा पोस्ट वाचून .. मी ट्रेक का करतो ह्याचं मी स्वतःला जे उत्तर देत होतो त्यावर कोणीतरी शिक्कामोर्तब केलं असंच वाटलं..
संदीप नाशिककर , पुणे
वाचतांना प्रत्येक शब्द अनुभवत होतो. मनात अस सतत कुठे तरी वाटत रहात आपण शिवाजीच्या काळात त्याच्या सोबतीने कुठे तरी असु. एकदा तरी त्यांना जवळून पाहीले असेल. गडाच्या भितींना, दरवाजांना हात लावतांना एक अनामिक हुरहुर असतए. की कधी तरी शिवाजींनी किंवा त्याच्या जिवलगांनी इथेच स्पर्श केला असेल. शरीर रोमांचित होत अशावेळेला.मग अशाच आनंदाने डोळे झरझर वाहायला लागतात,
ReplyDeleteधन्यवाद या सर्वांची आठवण करुन दिल्या बद्दल