Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
Showing posts with label photo theft. Show all posts
Showing posts with label photo theft. Show all posts
आता प्रतिभेवरही डल्ला
photo theft plagiarism

आता प्रतिभेवरही डल्ला

मागच्या आठवड्यात महेंद्रजींनी शेरिल ऊर्फ व्हाईट इंडियन हाऊसवाईफचा फोटो ’सकाळ’ वृत्तपत्रात अगदी काहीही परवानगी न घेता अगदी गरीब पद्धतीने मॉर्फ करुन वापरला, यासंबंधी पोस्ट लिहिली होती. अर्थात तिथे किमान (गरीब का होईना) मॉर्फिंगचे कष्ट घेतले गेले होते. टाईम्स ग्रुप आणि त्यांच्यासाठी जाहिरात डिझाईन करणारी कंपनीदेखील या बाबतीत मागे नाही. आजच्या संडे टाईम्स आणि टाईम्स समूहाच्या इतर संलग्न वृत्तपत्रांमध्ये आज ’पुणे फेस्टिवल’ संदर्भात एक जाहिरात झळकली आहे. त्यामध्ये जे ग्राफिक्स वापरण्यात आले आहे त्यात फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांबरोबरच पुण्याची संस्कृती दाखवण्याच्या हट्टापोटी काही गणेशोत्सवाचे फोटो वापरले गेले आहेत.



काही फोटो ओळखीचे वाटत होते. फोटोग्राफर्स@पुणे या ग्रुपचा सदस्य (आणि मॉडरेटर) असल्याकारणाने बऱ्याच सदस्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो. त्यामुळे त्यांचे विशेष फोटो अगदी तोंडपाठ आहेत. अशाच काही पाहिलेल्या फोटोंपैकी हा एक सुहासचा फोटो. आयुष्यात अशा फोटोची संधी एकदाच मिळत असते, आणि त्या वेळी ती दवडली तर पुन्हा कधीही तो क्षण हाती लागणार नाही. ही संधी अचूक टिपल्यामुळे या फोटोमध्ये जो जल्लोश आणि ऊर्जा दिसून येते त्यामुळेच हा माझ्या काही आवडत्या फोटोंपैकी एक आहे.त्या फोटोमध्ये जो टकलू तरुण जल्लोशात ढोल वाजवतो आहे तो म्हणजे जगद्विख्यात शिवगर्जना ढोल पथकातील दीपक. तोही या फोटोमुळे सुहासचा चांगला मित्र झाला आहे. फोटोग्राफर्स@पुणेच्या २००८ च्या वार्षिक प्रदर्शानातही हा फोटो विजेता ठरला होता.

टाईम्सच्या जाहिरातीमध्ये हा फोटो ओळखायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सुहासने पण टाईम्स समूहाला किंवा अन्य कुठल्याही एजन्सीला या फोटोचे कॉपीराईट हक्क विकले नाहीत हे स्पष्ट सांगितले. मग सहज म्हणून इतर फोटोही चाळायला सुरुवात केली. तर दहा मिनिटांतच आणखी दोन फोटो चोरीचे सापडले. तो दुसरा ढोलवाला फोटो आहे किरण पाटील या मित्राचा. आणि तुतारीचा फोटो आहे चिन्मयचा. तुतारीचा फोटो मिरर करुन वापरला आहे. खाली दिलेल्या तिन्ही ओरिजिनल फोटोच्या लिंक्स:
सुहास (ढोल-१): http://www.flickr.com/photos/simplysuhas/2856502906/
किरण (ढोल-२): http://www.flickr.com/photos/kiranppatil/3886544740/
चिन्मय (तुतारी): http://www.flickr.com/photos/chinmaypatil/1441691133/

या तीनही फोटोग्राफर्सशी बोलून त्यांनी कुणालाही हक्क दिले नाहीत याची खात्री केली आहे. जर टाईम्स एक जबाबदार मिडिया म्हणून स्वतःला संबोधून घेण्यात धन्यता मानत असेल तर त्या फोटोचे हक्क त्या जाहिरात डिझाईन संस्थेकडे आहेत की नाहीत याची साधी तपासणीही त्यांनी करु नये? बरं थर्ड पार्टी जाहिरात संस्थेने डिझाईन केलेली जाहिरात जरी असली तरी ती जाहिरात टाईम्स ग्रुपच्याच प्रायोजित कार्यक्रमासाठी तयार केली गेली आहे. मग कमीत कमी एक जाहिरातीचे मालक म्हणून तरी त्यांनी ही जाहिरात आणि त्यातले फोटो तपासून पहावेत ना? एक सीरियस हॉबिस्ट फोटोग्राफर या नात्याने जो संताप व्यक्त करायचा तो अशासाठी की आपापले व्यस्त लाईफ सांभाळून फोटोग्राफीच्या छंदासाठी हजारो, प्रसंगी लाखो रुपये कॅमेरा आणि लेन्स मध्ये गुंतवून, पहाटे साडेतीन-चारला उठून गारठ्यात वाहने चालवून, गर्दीत धक्के आणि पोलिसांची क्वचित अरेरावी सहन करुन आम्ही जे फोटो काढतो ते काय अशा चोरांसाठी?
07:57
16
Older Posts
Subscribe to: Posts (Atom)

Popular Posts

  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • मी भटकंती का करतो?
    "मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव...
  • सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
    झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बे...
  • कार: पेट्रोल की डिझेल?
    आपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदा...
  • लवंगी मिरची कोल्हापूरची
    आता मात्र मराठी ब्लॉगस्फियर ढवळून निघाले असेल खादाडीच्या पोस्ट्सने. ढवळून नसले तरी वाचकवर्ग तर नक्कीच जळत असेल. महेंद्र, सिद्धार्थने आपल्या ...
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत
    शेवटी मी आणि भुंगा ने जी चर्चा केली होती आणि ब्लॉगवर मतदान घेतले होते ती ब्लॉगमीट सुरेश पेठे काका आणि अनिकेत समुद्र च्या भरीव कामाने फळास आ...
  • रायगडवारी सातव्यांदा
    रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, त...
  • मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
    दिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...
  • सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
    सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली...
  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
    बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?), मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
  • स्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
  • मी भटकंती का करतो?
  • पालखी सोहळा: अनुशासन आणि शिस्त

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1