असेही एक स्वप्न
एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगावीच. वाघाला घेऊन मी जिथे गेलो ती एक कसलीशी बागसदृश जागा होती. तिथला वाघ हाताळणारा जो एक्सपर्ट मॅन होता तो रविवार असल्यामुळे होता सुट्टीवर. वाघाला मी तसेच सोडले बागेत. पुढे वाघ माझ्यापासून डावीकडे झाडीत गेला आणि थोड्याशा अंतरावर जरासा उंचावर (झाडाची फांदी की असेच काहीसे होते) जाऊन बसला. मी त्याला तसाच सोडून घरात गेलो. आता बागेत घर कुठून आले माहीत नाही, पण होते. थोडेसे खाऊन चक्कर मारायला बाहेर पडलो. बाहेर पडलो ते सरळ एका रेल्वे स्टेशनवर पोचलो. तिथे एकदम कडक सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांचा पहाराच. तंबू लावून. बहुतेक अतिरेकी हल्ला नुकताच होऊन गेला होता की होणार असल्याची टिप मिळाली होती. मी काही वेळ तिथेच रेंगाळलो आणि परत घरी आलो. इकडे वाघाने चारपाच जनावरे खाल्ली होती. आता वाघाला फिरवण्याचे लायसन्स माझ्याकडे नसल्यामुळे माझ्यावर पोलिस केस होणार, मला अटक करुन घेऊन जाणार. स्थानिक पोलिस चौकशीला आले. मी मान खाली घालून विचार करतोय की, काहीही बोलण्याआधी वकिलाला फोन करावा का? समोर ते पंचनामा करत असतानाच मला माझ्या मोबाईलवर फोन येतो. कुठलासा +571XX असा काही तरी पाच आकडी नंबर होता. पोलिस पण स्काईप वापरायला लागले की काय असा माझ्या मनात विचार. पलीकडून त्यांचा आवाज, लवकरात लवकर जवळच्या पोलिस ठाण्यात हजर व्हा. मी म्हणालो, "दापोली पोलिस स्टेशन मला जवळ पडेल, तिकडे येतो". माझा एक संधिसाधू नातेवाईक (ज्याने आतापर्यंत आमचा बराच वापर करून घेतलाय) तो म्हणाला, "घेऊन जा त्याला, नियमानेच होणार आता सगळे."
मला दरदरुन घाम फुटला आणि जाग आली. काल रात्री पडलेले हे 'कैच्याकै' स्वप्न. सहसा स्वप्ने लक्षात राहत नाहीत, पण हे तेव्हाच (रात्री अडीच वाजता) मोबाईलच्या नोट्स मध्ये टाईप करुन ठेवलेले. काय निरर्थक स्वप्न होते. नाही? स्वप्नांना काही अर्थ असतो का? असेल तर कुठे वाचायला/पहायला मिळेल? नसेल तर मग रोजच्या जीवनात कधीकधी अशा अनेक गोष्टी घडतात की असे वाटते, अरे, हे तर आधीच घडून गेलंय आपल्याबाबतीत. तुम्हांला असं वाटलंय का कधी? हा वाघ मला प्रत्यक्ष भेटतो की काय पुढील आयुष्यात? भेटलास तर कॅमेरा हाती असताना भेट रे वाघोबा. चांगला शॉट मिळेल म्हणतो.
मला दरदरुन घाम फुटला आणि जाग आली. काल रात्री पडलेले हे 'कैच्याकै' स्वप्न. सहसा स्वप्ने लक्षात राहत नाहीत, पण हे तेव्हाच (रात्री अडीच वाजता) मोबाईलच्या नोट्स मध्ये टाईप करुन ठेवलेले. काय निरर्थक स्वप्न होते. नाही? स्वप्नांना काही अर्थ असतो का? असेल तर कुठे वाचायला/पहायला मिळेल? नसेल तर मग रोजच्या जीवनात कधीकधी अशा अनेक गोष्टी घडतात की असे वाटते, अरे, हे तर आधीच घडून गेलंय आपल्याबाबतीत. तुम्हांला असं वाटलंय का कधी? हा वाघ मला प्रत्यक्ष भेटतो की काय पुढील आयुष्यात? भेटलास तर कॅमेरा हाती असताना भेट रे वाघोबा. चांगला शॉट मिळेल म्हणतो.
मागच्या भेटीत तु कॅमेराने चिंकारा मारलास का???
ReplyDeleteस्वप्नांचा खेळ हा आपल्या मनात चाललेल्या अनेक विचारांचा घोळ असावा!
ReplyDeleteमला तर बर्याचवेळा स्वप्नं लक्षात रहात नाहीत.. मात्र एखाद्या ठिकाणी यापुर्वी आल्यासारखं वाटणं किंवा घडुन गेल्यासारखं वाटणं हे मी बर्याचदा अनुभवलंय!
असे होते बऱ्याचदा.. 'देजावू' होतो की आपण अनेकदा.. पण स्वप्ने भन्नाट असतात... कसे काय कुठे काही सुचत नाही. बस पडतात आणि शेवटी आपल्याला उठवतात... :D
ReplyDeleteहे पण स्वप्न भन्नाट कसलाच कोणाला ताल नाही. मला पडलेल्या स्वप्नांपैकी ३ स्वप्ने मला अजूनही लक्ष्यात आहेत.. लिहेन कधीतरी... :)
(स्वगत : च्यायला अजून एक ब्लॉग सुरू करावा काय ???)
हाहा! स्वप्नं अशीच असतात वाटतं! मला गेल्या आठवड्यात पडलेलं स्वप्नं. ऑफीसमधला प्रोग्रामर, ऑफिसमधल्या एका मुलीशी (विवाहीत) सेक्स करतोय, ते पण खाटेखाली! आता काय बोलावं!? काय संबंध? पण हे विचित्र आहे हे नक्की. कोणाला सांगितलं नव्हतं. आता तु विषय काढलास म्हणुन बोलतोय.
ReplyDeleteअरे पडतात अशी कैच्याकै स्वप्ने...सगळ्यांना पडतात..
ReplyDeleteते ’दापोलॊ’ पोलिस स्टेशन मात्र कहर..
Deja Vu... Not this dream, but many incidences like 26/11, watching any space-resembling documentary or science fiction/fantasy movie, anyone talking with me, lectures in college, accidents happen beside/in-front of me... All these time, like the feeling of deja vu, I also face similar dreams not only while sleeping but also when eyes been opened. Though it's a involuntary and psychological process many people like me faces at any instance, anywhere, they are really amazing to experience, they take you a pleasure of extra-ordinariness you're having unlike super-heroes of mysterious stories have!
ReplyDeletePankya, never mind, but I'm just felt strange while reading your dream, how you miss your SLR there, as it's a one of part of you?
झकास ! अरे स्वप्नांचा लॉग ठेवण हा एक गमतिदार प्रकार आहे, माझ्या डायरीमधे मीअशा -जवळजवळा प्रत्येक आठवणाऱ्या स्वप्नाचा लॉग ठेवला आहे .. तू स्वप्न आठवून मस्त लिहिलस :).. तुझा पुर्वजन्मावर विशवास आहे का ? आसपासच्या प्रत्येक घटनेचा, माणसाचा, स्वप्नाचा आणि पूर्वायुश्याचा/भविश्याचा संबंध आहे का ? यावर् 'many lives many masters' पुस्तका आहे .. वाचुण पहा .. त्यच लेखकाच - only love is real' पण छान आहे
ReplyDeleteएखाद्या ठिकाणी यापुर्वी आल्यासारखं वाटणं किंवा घडुन गेल्यासारखं वाटणं हे मी बर्याचदा अनुभवलंय!
ReplyDeleteमस्तच स्वप्न आहे
ReplyDeleteMala awdle he swpn means kharch ekhadya gostisarkhe hote mala maze swpn kadhich purn athvt NY.aaj bhavala mala padlele swapn ha eassay hava hota te shodht sodht he vachnyat Al
ReplyDeleteReally nice
Creative
DeleteVaaaaaa
ReplyDelete