स्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा असलेले.
मी दुसर्या प्रकारातला. हरिश्चंद्रगड नावाने केलेले गारुड दोन-तीन भेटींनंतरही तसेच आहे. त्यातच नळीच्या वाटेची भूल. प्रत्येक ट्रेकरच्या आयुष्यातला स्वप्नवत ट्रेक- नळीच्या वाटेने हरिशचंद्रगड. असाच एकदा आलेला चान्स हुकला होता. त्याचा पश्चात्ताप आजपर्यंत होत होता. त्यानंतर चार वर्षांनी योग जुळून आला. रोहनच्या मेलवर सुरुवात झाली होती खरी, खूप जण तयारही झाले होते. पण तोच येत नाही म्हटल्यावर एकएक शिलेदार गळून पडले. पण काहीही झाले तरी मी आणि देव्याने हा ट्रेक करायचाच असे नक्की केलेले. संदीपही (सँडी) कित्येक दिवसांपासून ट्रेकसाठी डोके खात होता. कळसूबाईच्या नादखुळा ट्रेकच्या वेळी त्याच्या अफाट नॉनस्टॉप स्टॅमिनाची खात्री पटली होती. पुण्याहूण तीन वीर तर नक्की झाले होते. मुंबईवरुन स्नेहल इरेला पेटली आणि आणखी तीन साथीदार घेऊन तयार झाली. असे एकूण "वेडात वीर मराठे दौडले सात..."
नळीची वाट म्हणजे तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाईंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक. त्यातच भर म्हणून आम्ही परतीसाठी तेवढाच खडतर साधले घाट निवडला होता. निव्वळ खाज, दुसरे काय? त्यामुळे ऊन चढायच्या आधी जास्तीत जास्त कव्हर करणे गरजेचे होते. म्हणजे रात्री प्रवास करुन सकाळी लवकर सूर्योदयाला बेलपाड्यातून सुरुवात करणे क्रमप्राप्तच. शुक्रवारी रात्री पहाटे दोन वाजता पुण्याहून निघायचे नक्की केले. मुंबईवरुन स्नेहल आणि कंपनीही रात्रीच निघाली. तिला एसटीनेच ये अशी तंबी दिली. जेवणानंतर थोडी झोप काढावी असा प्लान होता, पण स्नेहल आणि कंपनीचे फोनवर फोन चालू होते. मग कसली आली झोप? माळशेज घाटात रात्रीच्या लूटमारीचे काही किस्से ऐकले होते त्यामुळे आणि रस्ता चांगला मिळेल या हेतूने आम्ही लोणावळा-खोपोली-कर्जत-मुरबाड असा मार्ग नक्की केला होता. सँडीला घरुन पिक करुन देव्याकडे पोचलो आणि देव्याच्या कारने एक्स्प्रेस हायवेने खोपोली एक्झिटला बाहेर पडून उतरत असताना हायवेवर दोन स्पीडब्रेकर असे लागले की जणूकाही अख्खा हरिश्चंद्रगड वाटेत उभा केला. चहा प्यायला एका टपरीवर थांबलो तर तिथे तीन नमुने (बहुतेक शूटिंग स्पॉटबॉयचे काम करणारे असावेत) असे काही डेंजर डायलॉग मारत होते की बास्स... डोक्याला संगीत रुमाल, सिल्व्हर प्रिंटचे टीशर्ट, एम्ब्रॉयडरी केलेल्या जीन्स आणि तोंडात बिडी असतानाच हातात गायछापचा बार तयार करण्याचे कौशल्य पाहून आपण किती अडाणी आहे याची खात्री पटली. ‘भ’ आणि ‘म’ जडवून तयार केलेल्या शिव्या आणि बुगी-वुगी सारख्या विविध कार्यक्रमाच्या सेट्सची चर्चा रंगली होती. शिवाय त्या कार्यक्रमाचे अँकर कसे प्रत्यक्षात वाईट दिसतात आणि मेकपचे थर लावून कसे कॅमेरासमोर येतात हे ऐकून मी ते कार्यक्रम पाहत नाही याचे अपार समाधान वाटले. चहा संपवून कर्जतनंतर मुरबाड रोडवर लागलो आणि चांगला रस्ता असेल या अपेक्षेला सुरुंग लागला. खूप वाईट रस्ता, खड्डे, पुलाची कामे चाललेली असे करत कसेबसे मुरबाडला पोचलो. आणि मुरबाडवरुन काही मिनिटांतच नाणेघाटाला बायबाय करत मोरोशीला आलो. दरम्यान मुंबईकरही मोरोशी एसटी शेडमध्ये पोचले होते. त्यांची रात्रभर काही ‘धारा’तीर्थी लोकांनी चांगलीच करमणूक केली होती. कसेबसे ते लोक दोनेक तास झोपले.
अंधारातच त्यांना जागे केले आणि टॉर्चच्या प्रकाशात पुढील दोन दिवस एकत्र राहणार्या रानटी सह्य-भुतांची ओळखपरेड झाली. देवेंद्र, संदीप, चैतन्य, अमेय आणि कल्पक. एका दुधाच्या पिकप गाडीला रस्ता विचारुन घेतला आणि दोन लॉटमध्ये कारने बेलपाड्याला पोचायचे ठरले. मी, चैतन्य (बहुतेक तोच असावा, अंधारात दिसला नाही नीट) आणि स्नेहल आणि बॅगा घेऊन देव्या आम्हाला घेऊन वळणावळणाच्या रस्त्याने एका गावात टाकून गेला आणि दुसर्या लॉटला घेऊन आला तोवर फटफटले होते. गावाला जाग आली तसे आम्हाला समजले की आपण चुकीच्या गावात आहोत. मग काय पुन्हा स्वारी निघाली पुढल्या गावात. पण या वेळी सात जण एका फोर्ड कंपनीच्या फिगो‘वडाप’मध्ये सामानासहित कोंबून घेऊन गेलो. या गाडीला फक्त पिवळी नंबरप्लेटच लावायची बाकी आहे नाहीतर आमची ही नेहमीचीच स्टाईल आहे.
दिवस उजाडता बेलपाड्याला पोचलो आणि गावातल्या एका घरात चहा पिऊन आणि थोडे ब्रेड-बिस्किट खाऊन वाटाड्या घेतला. थोडी घासाघीस करुन नक्की केले आणि गाडी त्यांच्या हवाली करुन निघालो. पाठीवर अवजड सॅक्स, त्यात प्रत्येकी तीन लिटर पाणी, खायचे सामान, कपडे, मुक्कामासाठीचा शिधा, बेडिंग, रोप्स असा अंदाजे आठ-दहा किलोचा मामला.
अतिशय प्लेझंट थंडगार हवा, अंगात ताजा जोम, कोकणकड्याची आणि नळीच्या वाटेची ओढ, हरिश्चंद्रगडाचे वेध या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून की काय पहिला तासभर पावले झपझप पडली. खूपसे अंतर पार झाले आणि आम्ही नळीच्या तोंडाशी येऊन पोचलो. मध्येच गरुडांचे आवाज येत होते. देव्या एका गरुडाच्या जोडीच्या मागे गेलासुद्धा. पण बहुधा फोटो मिळाला नाही. नळीत गेल्यावर खायचे काढले तर वरुन माकडे गोळा होतात आणि मग तिथून दगड निसटून अंगावर पडतील म्हणून इथेच काहीतरी खायचे ठरवले. इथून पुढे वाटाड्याला निरोप देऊन पुढे जायचे होते. सरळ नळीने वर जायचे आणि वर गेले की उजवीकडची वाट घेऊन माथ्यावर निघायचे असा सल्ला मिळाला. म्हणजे तशी शोधायला सोपीच वाट असेल असे वाटले.
कोकणकड्याच्या मागून सूर्याची तिरपी किरणे शिखरांच्या मधून निघून खाली दरीला सोनसळी करत होते. पुन्हा एक ब्रेक घेऊन थोडेफार फोटो वगैरे काढले आणि वर कूच केले. एकदोन पॅच वगळता वाटचाल तशी सोप्पी वाटत होती. पण जसेजसे ऊन चढले तसे आजूबाजूचा खडक तापू लागला बारा वाजता आम्ही निम्मी उंची गाठली होती. या रेटने आम्ही लवकरच रेकॉर्ड ब्रेक वेळात नळीच्या वाटेने वर पोचणार असे वाटत होते. पण मध्ये एक २० फुटी रॉक पॅच आला. तसा सोप्पा वाटत होता पण सॅक घेऊन शक्य नव्हते. मग मी आधी वरती जाऊन रोप लावला.
हळूहळू सगळ्या सॅक वर ओढून घेतल्या आणि बाकी पब्लिक वरती पोचले. इथून पुढली वाट अतिशय खडतर होती. निसरडा खडक, जिथे पाय ठेवू तिधला दगड निसटून जायचा. हात लावू तो दगड हातात. एकही चूक करायला जागा नाही. चूक झाली की ती शेवटचीच समजायची. निसरडी माती आणि वरुन ऊन यामुळे खूप वेळ गेला. साधारण दीड वाजता आम्ही एका ‘वाय’ जंक्शनला पोचलो. तिथे काहीच ऍरोमार्किंग नव्हते. उजवीकडची वाट आहे असे ऐकले होते, पण डावीकडच्या रॉकफेसवरुन माथ्यावरचे झाड दिसत होते. तसे उजवीकडे काहीच चिन्ह नव्हते. म्हणून आधी तो डावीकडचा ट्राय करायचे नक्की केले. मग तिथे वरती ‘सेफ्टी बिले’ लावण्यासाठी रोप अँकर करणे गरजेचे होते. पण त्यासाठी काहीच मिळेना. जवळपास तासभर प्रयत्न केला. पण काहीच साध्य होईना. मी अर्धा वरती जाऊन एका हाताने होल्ड घेऊन पंधरा मिनिटे लटकत दुसर्या हाताने रोप फेकून अँकर करायचा प्रयत्न केला. पण फोल ठरला (खांदा अजूनही दुखतो आहे). देव्या दुसरीकडून कुठे रस्ता आहे का ते पहायला वर जाऊन आला. पण तिकडेही काही मार्ग दिसेना. परत तिकडून खाली येताना अगदी त्याच्या भाषेत सांगायचे तर "फाटून हातात आली". दरम्यान कल्पकने एक बसल्या बसल्या झोप काढली. चैतन्य, संदीप आणि मी रोप टाकायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण यश येत नव्हते. दीड-दोन तास एकाच ठिकाणी वाया गेले.
मग कुणीतरी पुन्हा बरेच खाली गेले आणि उजवीकडे एक मार्क पाहिला. मी पण आलेल्या इवल्याशा रेंजचा फायदा घेऊन सम्यकला फोन करुन खात्री करुन घेतली. आता मोर्चा उजवीकडे वळाला. झाडाला रोप फिक्स करायला लागणारच होता. तिथेपर्यंत पोचायला काहीच मार्ग नाही, होल्ड्स नाहीत, निसरडा खडक, उभे रहायला फक्त दोघांना जागा. एकवेळ माघारी जाण्याचाही विचार शिवून गेला. देव्या पूर्ण ड्रेन झाला होता. क्लाईंबला माझ्या आणि त्याच्याही हातात त्राण शिल्लक नव्हते. त्यानेही बसल्या बसल्या झोप काढली. सॅक मागे ठेवून फक्त दोघे तिघे उभे राहून दोर फेकत राहिलो. वीसेक प्रयत्नांनंतर रोप सुरक्षितपणे अँकर झाला असे वाटले. देव्याला उठवले आणि सगळ्यात कमी वजनाचा म्हणून चैतन्य दोरावरुन कॅरिबिनरचा बिले लावून वर गेला आणि रोप नीट बुंध्याला अँकर केला. देव्या वर जाऊन पुढील मार्ग पाहून आला. आणि एका अति-धोकादायक ट्रॅव्हर्सनंतर आपण पोचतोय असे त्याने जाहीर केले. जरा हुरुप आला. पण झाडाच्या तिथे फक्त दोघांना पुरेल एवढीच जागा. मग सॅक खाली ठेवून दोन-तीन जण चढवायचे, नंतर बॅगा ओढायच्या आणि त्यांना सेफ ठिकाणी पोचवून उरलेल्यांनी वर जायचे असे ठरले. चैतन्य, कल्पक वर केले. बॅगा पोचल्या. एका बॅगच्या हूकने दगा दिला आणि ती दोरावरुन तुटून थेट शंभर फूट खाली आदळत गेली. कॅमेरा बाहेर उडून पडला. नशिबाने जिवंत राहिला. संदीपने पुन्हा अफाट स्टॅमिनाचे उदाहरण देत ती बॅग आणली. स्नेहल वर जाताना पायाऐवजी हातावर जोर देत होती त्यामुळे हवा तेवढा पुश न मिळाल्याने मध्येच लटकत राहिली. पाय लटलट कापू लागले. थोडी घाबरली, पण ती रणरागिणी रडली नाही. देव्याने अचूक शब्दांत धीर दिला. काही झाले तरी आम्ही तुला पडू देणार नाही असे सांगितले आणि आम्ही तिला ‘बक-अप’ करत आणि देव्याने हात देत वर ओढून घेतले. पुढे तो अतिधोकादायक ट्रॅव्हर्स एकदम शंभर फूट दरीला एक्स्पोझ होता. पाय ठेवायला अर्धा फूट जागा. क्रॉस करताना उलटे वळून पहायचे नाही असे सांगूनही अमेय तीनदा तेच करत होता. शेवटी देव्याने असा काही झापला की बास्स... मी उरल्या सुरल्या बॅगा घेऊन रॅपअप करत शेवटी वर आलो. एकेक करत ट्रॅव्हर्स पार केला आणि अतिशय निसरड्या पॅचवरुन वर माथ्यावर पोचलो. एक ‘वाय जंक्शन’ आणि एक रॉक पॅच पार करायला तीन तास गेले.
पाच वाजता आम्ही दाट झाडीतून माथ्यावर पोचलो आणि डायरेक्ट आडवे झालो. कोकणकड्याचे दर्शन झाले. असे वाटले आलो आता. पंधरा मिनिटे सगळ्यांनी पॉवर नॅप मारली. पाणी सगळे संपले होते. घसे कोरडे पडले. पण आता इलाज नव्हता. एक लहान टेकडी पार करुन वर येऊन पाहतो तर काय? अजून एक रॉक पॅच आमची वाट पाहत होता. आता कुणातच त्राण शिल्लक नव्हते. सगळ्यांचेच अवसान गळून पडले. पण इलाज नव्हता. परतीचा मार्ग बंद होता. सुर्यास्त होण्याच्या आत तो पार करणे जरुरीचे होते. देव्याकडे अजिबात ताकद शिल्लक नव्हती. पाणी नसताना त्याने पंधरा-सोळा ग्लुकोजची बिस्किटे कशीबशी खाल्ली. तो पॅच एकदम कोकणकड्याच्या मुखाशी. म्हणजे तोल गेला किंवा चूक झाली तर एकदम तळाशी, एक किलोमीटर खोल. वरुन फक्त फुले वाहायची. चैतन्य बसाबसा वर पोचला. मागोमाग मी. पण होल्ड्सना स्नेहलचा हात पुरेना. मग मी पुन्हा अर्ध्यावर खाली येऊन तिला धरायला पाय देऊन दोन वेळा वर खेचले. एका कोकणकडा पहायला आलेल्या ग्रुपने पाणी दिले. आणि या वाटेने आलो हे ऐकून अगदी तोंडात बोटे घातली. एकेक करत वर पोचलो आणि सूर्यनारायण आपले दिवसाचे उरलेसुरले रंग आम्हांवर उधळीत आमचे अभिनंदन करत होते.
मुख्य कोकणकड्याला पोचल्यावर एक चहाचा स्टॉल होता त्याला एकदम पंधरा लिंबू सरबताची ऑर्डर दिली आणि जरा आमची देह-बॅटरी चार्ज केली. हळूहळू सुर्यास्तानंतर चालत साडेसातला मंदिराशी पोचलो. एक रिकामी गुहा शोधली, आतमध्ये ती टॉर्चच्या प्रकाशात चेक करुन घेतली (विंचू, मुंग्या, वटवाघळे यांसाठी) आणि थंडगार पाण्याने फ्रेश झालो. गुहापण अशी काही झक्कास होती की बास... डुप्लेक्स अपार्टमेंट, समोर टेरेस, आत एकात एक अशा दोन रुम्स, आधीच करुन ठेवलेली चूल. कोकणकडा चढून आल्याचे समाधान आणि आनंद म्हणून की काय आम्ही दोनतीन मेणबत्त्या लावून दिवाळी साजरी केली.
आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आधण ठेवले, सूपची पाकिटं फोडली, टोमॅटो आणि मिक्स व्हेज सूप एकत्रच केले. त्यातच ‘सूप्पी नूडल्स’ टाकल्याने अजूनच लज्जत वाढली. नवमीच्या चांदण्यात आकशातले तारे मोजत, थंडगार हवेत हरिशचंद्रगडाच्या गुहेच्या समोर बसून वाफाळलेले गरमागरम सूप पिण्यात काही औरच मजा असते. तो क्षण आम्ही सातही जण आयुष्यात कधीच विसरणार नाही. नंतर सावकाश पोटभर नूडल्स बनवून खाल्ल्या. आणि जमिनीला पाठ टेकली.
डोळे मिटले आणि विचार करु लागलो. एक स्वप्न चार वर्षांनी पूर्ण झालंय. नळीच्या वाटेने कोकणकडा चढून हरिश्चंद्रगडाचे. बारा तास आमची ‘वाट’ लागली म्हणून काय झाले नळीचीसुद्धा ‘वाट’ आहे. पुढच्या पिढीला सांगण्यासाठी काहीतरी गाठीशी बांधलंय. आयुष्यभरासाठी ठेवा मिळालाय. कधीही न विसरण्यासाठी. ट्रेकिंगमधले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. आज किती समाधान वाटतंय. दुखरे हातपाय काय उद्या परवा थांबतीलही, पण हा अनुभव दुसरीकडे कुठे मिळणार आहे का? उद्याचाही परतीचा प्रवास असाच नाट्यमय असणार आहे, साधले घाटातून. एक न पाहिलेली वाट... पाहू आपली किती वाट लावते. झोप कधी लागली ते समजलेच नाही...

एवढच बोलेन.- वाह रे वाह... मस्तच होता म्हणायचा हा ट्रेक.
ReplyDeleteपुढल्यावेळी पक्का ह्या वेळी ऑफीसने दगा दिला...
सही! यार सहीच!! अभिनंदन! ग्रेट जॉब!
ReplyDeleteआणि स्पेशली आमच्या स्नेहलचे अभिनंदन.. !!
मी परत नाही बोलणार की मी मिस्ड केला हा ट्रेक, बस्स आता करायचाच हा ट्रेक आणि यच वर्षी नळीच्या वाटेवरुन !! :)
जबरी
ReplyDeleteमी यायला हवे होते :(
apratim warnan!
ReplyDeletebravo pankaj and company !!
ReplyDeleteproud of u !! Ata Doctorate by Research karayala harkat nahi .
सुन्दर लिहिले आहेस रे मित्रा...मी सुद्धा दुसऱ्या प्रकारातलाच...पण नोकरी अणि सुद्धा फिरतिची म्हणून फारच दिवसात गेलो नाही कोकण कड्यावर
ReplyDeletenostalgic झालो रे बाबा...जुन्या दिवसांची आठवण आली...
अप्रतिम (खडतर) प्रवासवर्णन !!
ReplyDeleteपंक्या जाम भारी लिहिलंय एकदम लाइव ब्लॉग वेड्या.......... किलर :)

ReplyDeleteमस्तच !! अभिनंदन
ReplyDeleteलय भारी
ReplyDeleteट्रेक पण आणि फोटो पण
baas pankya, ata jasta jalavoo nakos :)
ReplyDeletemasta lihilay. sala kitiwela watat rahanar ahe ki ha suddha trek miss kela :(
aso...
terminator chya arnold sarakhe mipan mhanato: I will be back :)
पंकज,
ReplyDeleteमी आपली तू काढलेले फोटो बघत बसते!
अतिशय सुंदर आहेत....
नॅशनल जॉग्रफिकची एक फोटोग्राफर बाई मुंबईत आली होती. तिची मुलाखत वाचनात आली तेव्हा तुझी आठवण झाली होती.
अप्रतिम आहेत फोटो. सगळेच.
:)
खुप झक्कास झाला आहे ट्रेक पोस्ट आणी पण !
ReplyDeleteतुझ्या बोलण्याने आता पर्यंत अर्धा गड मी पार केला असे वाटले .लवकर पूर्ण कर. पाहुया माझे स्वप्न कधी पूर्ण होते ते
ReplyDelete{सुन्दर लिहिले आहेस }
सुन्दर लिहिले आहेस
ReplyDeleteपंकज आणि मंडळ!
ReplyDeleteसर्वप्रथम या कामगिरीबद्दल अभिनंदन!!
हरिश्चंद्र पुन्हा पाहण्याच्याच कॅटेगरीमधला मी - मात्र यावेळी'ही' नाही जमले. एक स्वप्न - अजुनही स्वप्नच ...
सही! भन्नाट ट्रेक, सुंदर फोटो, आणि भारी वर्णन.
ReplyDeleteआयुष्यात एकदातरी हरिश्चंद्रगड अनुभवायचाय ... मी तुझ्या ट्रेकर्सच्या पहिल्या प्रकारात मोडाते असं म्हणणार नाही ... सद्ध्याची परिस्थिती बघता मी ट्रेकर्समध्येही जमा होत नाही :(
खूप भारी :) !!!
ReplyDeleteथ्रिलिंग!!! खूप दिवसानी खररया "भटकंती" चा ट्रेक वाचायला मिळाला.....
ReplyDeleteखुप झक्कास झाला आहे ट्रेक पोस्ट आणी पण !
ReplyDelete+ लै हेवा वाटतो आहे तुमचा :)
रोमांचक... पुढच्या वेळेस नक्कीच येइन.
ReplyDeleteपंकज, सुंदर वर्णन केले आहेस... काही अनिवार्य कारणामुळे तुम्हाला जॉइन नाही करता आले... बट नेवर माइंड. तुझा ब्लॉग वाचून बरीच माहिती मिळाली... आणि हुरूपही आला. उन्हाळा जवळ येत चाललाय. पण एखादी विज़िट करेनच म्हणतो...
ReplyDeleteतुम्हा सर्व हिंमत बहाद्दारांचे अभिनंदन.
जबरी :)
ReplyDeleteसालं आमचं ट्रेकींग बंदच पडलय गेल्या दोन वर्षापासुन. दोन वर्षापुर्वी वासोट्याला गेलो असताना एक छोटासा अपघात झाला होता. त्यामुळे आता ट्रेकचं नाव काढलं तरी बायको आकांड त्तांडव करते. ऐश करा लेको !
आम्ही नुसतीच लाळ गाळत, मिटक्या मारत वर्णनं वाचतो. :(
अप्रतिम....जबरदस्त...पंक्या फ़ोटु लय भारी आले आहेत.
ReplyDeleteLaich bhari..
ReplyDeleteNad khula...mitra mumbai varun kuni yet asel tar amcha pan vichar karat ja...vel asel tar nakki yeyin..mayu3117@gmail.com
ReplyDeleteसर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्याला ब्लॉग आवडला, आनंद झाला. दुसरा दिवस पण पोस्ट केला आहे.
ReplyDeleteAwesome...!!!
ReplyDeletePankya jabrya re nehmipramane :)
ReplyDeleteasa Trek karnyachi khup divsachi echa aahe baghu kadhi hotay :(
Are leka....Lai bhari.......Agadi Lavangi Mirchi sarkaha skhamaswa.....ekdam "killler" zale ki re
ReplyDelete