ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी, मल्टीक्विझिन हॉटेल्स, दिमतीला गाड्या, सर्व रस्ते व्यवस्थित चालू झालेले. सगळ्या मुक्कामाच्या जागा निश्चित केलेल्या... म्हणजे अगदी आखीव रेखीव प्लॅन केलेला. क्षुल्लक(? ) अडचणी वगळता तो अगदी व्य्वस्थित पारही पडला होता. पण सगळं धोपट मार्गाने घडलं तर ती ‘भटकंती अनलिमिटेड’ कसली! जगावेगळं काहीतरी रानटी करायची खाज रक्तातच असल्याने जेव्हा सुट्ट्या जमून आल्या तेव्हा आम्ही धोपटमार्ग स्वीकारणार नव्हतोच. अशाच एका चर्चेतून ऐन हिवाळ्यात लडाखची ट्रिप करण्याची आयडियाची कल्पना आमच्या सुपीक डोक्यात उगवली. आता एखाद्याच्या डोक्यातून विचित्र कल्पना उगवली तर बाकीच्यांनी त्याला रोखावं ना! पण नाही, मित्रच असले हालकट भेटलेत की उगवलेल्या कल्पनेला पाणी घालायला सुरुवात केली. मी, ध्रुव, परिक्षित, तेजस चार टाळकी जमली, लडाखमधल्या गोम्पांचे महोत्सव कधी असतात त्याच्या तारखा काढल्या गेल्या. आमचा लडाखमधला brother from another mother तेन्झिंगला कसाबसा कॉंटॅक्ट करुन फक्त लेहमधल्या राहण्याची सोय बघायला सांगितली. खरं तर त्याच्या घरीच (फ्री) मुक्काम करण्याची त्याची इच्छा होती, पण घराचे चालू असलेले बांधकाम आणि त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही वेगळी सोय बघायला सांगितली. अर्थातच ऑफ सीझन असल्याने कुठल्याही होमस्टेसाठी ते additional incomeच होते. म्हणून तेही अगदीच स्वस्तात मिळाले. अंदाजे ९००-१००० रुपये चौघांना मिळून. दोन खोल्या. हिवाळ्यात लडाखला कुणीच जात नसल्याने विमानाची तिकीटेही ‘स्कीम’मध्ये मारली. आणि सुरु झाला आमचा प्रवास.
मुंबईहून दिल्ली, दिल्ली विमानतळावर १६ अंशात फुकाचं पैसे उधळून सकाळी केलेलं खाणं, टकामका पाहत आय व्हिटॅमिन घेणं वगैरे नेहमीचे सोपस्कार झाल्यानंतर आमचं गो-इंडिगो लेहच्या दिशेनं झेपावलं तेव्हा दिल्ली अजूनही दाट धुक्याच्या रजईतून बाहेर पडली नव्हती. तिला तसेच पहाटेच्या साखरझोपेत सोडून विमानाने उत्तर दिशा पकडली आणि उगवत्या सूर्याच्या झळाळीत न्हालेल्या गढवाल-कुमाऊच्या हिरव्या प्रदेशातून पुढे अतिउत्तरेच्या पांढर्या शुभ्र हिमालयाच्या दिशेनं होणारं ट्रान्झिशन देखणं दिसत होते. अगदी त्या उंचीवरुनही मोरेय प्लेन्स आणि त्यातून जाणारा गोठलेला मनाली-लेह हायवे ओळखता आला. एखादं दूरवरचं हिमशिखर ओळखता येतंय का ही कसतर करत असताना, जसजसं लडाखमध्ये प्रवेश केला तसतसा खालचा हिरवा प्रदेश नाहीसा होऊन वॉलनट ब्राऊनीवर पांढर्या आयसिंग शुगरचं डेकोरेशन दिसू लागलं. हे दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं. आणि विमानाच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्यांतून आम्ही आजूबाजूच्या प्रवाशांची पर्वा न करता आम्ही उड्या मारुन मारुन ते डोळ्यांत साठवत होतो. "crew, prepare for landing" हे पायलटचे शब्द हवाईसुंदरीआधी मीच ऐकले आणि कॅमेरा सरसावून बसलो तर ती बया आलीच "कुर्सी की पेटी बांध ले" करत. टचडाऊन झाल्यावर "लेह के कुशोक बकुला रिंपोचे हवाईअड्डेपर आप का स्वागत है। बाहर का तापमान शून्य से नीचे छ: डिग्री है!" हे सांगितल्यावर आम्ही उतरायला तयार झालो. परिक्षित प्रथमच आला असल्याने साहजिकच त्याला जास्त उत्सुकता होती. दरवाजाजवळचेच सीट्स असल्याने सगळ्यात पुढे हौसेने तो उभा राहिला. दरवाजा उघडल्यासरशी लेहच्या हवेनं असा काही हिसका दाखवला की त्या बोचर्या थंडीचा झटका सहन न होऊन चिंगाट मागे आला. एखादं जॅकेट सोबत ठेवून बाकी सगळे थंडीचं संरक्षण चेक-इन केलं असल्याने मांडीपासून पायांची खाली लाकडं झालीच होती. बॅगेज मिळेपर्यंत दुसरा काहीही पर्याय नव्हता. बाहेर आल्यावर तेन्झिनला कडकडून मिठी मारल्यावर त्याने पुढचे आठ-दहा दिवस आमच्या सोबत असलेली गाडी दाखवली. फक्त डिझेल भरुन वापरायला मिळणार होती. अर्थात तेन्झिन आमची सोबत करणार होताच.
होमस्टेवर पोचून आराम करणे एवढाच आजचा अजेंडा होता. फारतर आसपास फिरणे जेणेकरुन अतिउंचावरच्या विरळ हवेचा त्रास होऊ नये. आमच्या फोटोगिरीमुळे आम्ही तेन्झिनलाही त्याचं वेड लावण्यात यशस्वी झालो आहे. म्हणूनच त्याने एक लेन्स आणायला सांगितली होती ती त्याच्या हवाली केली. आम्हांला चार वाजता पिकअप करायला येतो या बोलीवर गेस्टहाऊसवर सोडून तो परत गेला. आम्ही आता थंड वातावरणाला सरावत होतो. दोन खोल्या दिल्या होत्या पण त्या एवढ्या मोठ्या होत्या की आम्ही चौघांनी एकाच खोलीत राहण्याचे ठरवले. मालकाने उदार मनाने खोलीत गॅसवर चालणारा हीटर आणून दिला. त्याच्या काही सूचना, लडाखी ड्राय टॉयलेट कसं वापरायचं याचं प्रशिक्षण (थेअरी, प्रॅक्टिकल नव्हे) वगैरे झाल्यावर सामान लावून आम्ही पुढचे बेत आखण्यात मग्न झालो. हळूहळू वातावरणाला सरावत होतो. प्रथमच लडाखी टॉयलेट वापरण्याची माझी वेळ होती. आत गेल्या गेल्या खिडकीच्या नसलेल्या झडपेतून असा काही हवेचा झोत आला की सगळं विसरुन परत यावं लागलं ते पुन्हा पूर्ण मनाची तयारी करुन धाडस करुनच जाता आलं. चार वाजता तेन्झिनभाऊ आला आणि आम्ही लेह मार्केटमध्ये आलो. मागच्या फेरीला पाहिलेलं लेह आज किती वेगळं भासत होतं. चांगस्पाचा मोठमोठ्या शिळांमधून खळाळता ओढा आता पूर्णपणे गोठला होता. गोव्यातल्या बागा-कलंगुट बीचचे मार्केट वाटावे असे चांगस्पा बाजार निर्जन झाला होता. सुंदर शांतता तिथे वास करत होती. कचर्याचे ढीग नाहीसे झाले होते. एक निर्मळता वातावरणात भरुन राहिली होती. लेह मार्केटमध्ये शंभर एक दुकानांपैकी मोजकी चार-दहा दुकानं उघडी होती. गरमागरम चणेवाला भट्टी लावून ऊब देणारं खाद्य पुरवत होता. खूप ऐकून असलेलं नेहा स्वीट्सच्या लहानशा ऊबदार लाकडी रेस्टॉरंटमध्ये घुसलो तेव्हा तिथल्या समोशाच्या दरवळाने सगळं विसरुन जायला झालं. दोन दोन समोसे, कॉफी रिचवून आम्ही शांती स्तूप बघायला बाहेर पडलो. सारथी अर्थातच तेन्झिनच होता. शांती स्तूपाहून स्टोक कांगरीची पर्वतरांग, लेह शहर आणि मावळलेल्या सूर्याचे मागे विसरलेले रंग असा सुंदर नजारा दिसतो. त्यात कमालीच्या गारठ्याने त्याला एक प्रकारची स्थितप्रज्ञता लाभली होती. हीच हिमालयाची भव्यता आणि स्थितप्रज्ञता! अंधार पडला तसे आम्ही गेस्ट हाऊसवर परतलो आणि जेवण करुन दिवसाचा आढाव घेत हीटर सुरु करुन ऊबदार पांघरुणांत झोपी गेलो.
दुसरा दिवसही तसा आरामाचाच होता. विशेष असा काही प्लॅन नव्हता. लेहजवळची चेमरी गोम्पा पाहून घेतली. तिथून परतताना थिकसे गोम्पा आणि तिचा सुप्रसिद्ध दोनमजली मैत्रेय बुद्धाचा पुतळा पाहिला. हा पुतळा एवढा सुंदर आहे की त्याने मला मागच्या ट्रिपने भुरळ घातली होती आणि त्याच भारावलेपणातून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलं होतं. त्यानंतर सुप्रसिद्ध आणि भव्य अशी हेमिस गोम्पा पाहिली. ही लडाख परिसरातली सगळ्यात मोठी गोम्पा आहे. प्रशस्त आवार, देखणी भित्तिचित्रे, भव्य पडदे, लाकडी बांधकाम यांमधून तिची भव्यता प्रतीत होत होती. शेकडो भिक्खू तिथं शिक्षण घेतात. प्रत्येक गोम्पाचं एक वैशिष्ट्य आहे की तिच्या अंतरालात फिरताना एक अगम्य मनःशांतीचा अनुभव येतो. एकूणच गोम्पांचे अंतरंग, त्याच्या मातीच्या भिंती आणि रंगशैली, विविध भित्तिचित्रे, पिवळे लाल पडदे, आसपास वावरणारे बौद्ध भिक्खू आणि छायाप्रकाशाचा खेळ ही फोटोग्राफरसाठी पर्वणीच असते.
दिवसभराचे हे अनुभव गाठीला बांधून आम्ही पुन्हा नेहा स्वीट्सच्या दारात उभे ठाकलो. एकंदर आजचा दिवस आरामातच गेला. तीन गोम्पा, लेह मार्केटमध्ये फेरफटका आणि रात्री जेवण करुन दिवसभराच्या फोटोंचा आढावा यात दिवस संपला. उद्याचा दिवस महत्त्वाचा होता. किंबहुना उद्याच्या दिवसासाठीच ही लडाख ट्रिप या ऐन बर्फाळ हिवाळ्यात आखली होती.
स्टोक-कांगरीच्या पायथ्याशी आज बरीच लगबग दिसत होती. गाड्या भरभरुन लोक त्या दिशेने निघाले होते. प्रसिद्ध स्टोक फेस्टिवलचा दिवस होता तो. आम्ही खास या महोत्सवांचे दिवस साधूनच ही ट्रिप गुंफली होती. लेहहून निघून लेह एअरपोर्टच्या ATCच्या शेजारुन स्टोक गावाकडे रस्ता जातो. एखाद्या लहान खोलीएवढे आणि जमिनीवर बांधलेले ATC पाहून नवल वाटले. स्टोक गोंपाच्या पायथ्याला जरा लवकरच पोचल्याने गाडी लावायला जागा शोधायला विशेष सायास पडले नाहीत. लगीनघाईसारखी लगबग सर्वत्र उठली होती. अनेक सामान्य नागरिक गाड्यांमधून, पायी येऊन स्टोकला थडकत होते. गोम्पाला एक नवी झळाळी चढली होती. सगळ्या भिंती नुकत्यात पांढर्या आणि तांबड्या रंगाने चमकवल्या होत्या. गोम्पाच्या मुख्य प्रेक्षागारातून (गॅलरी) तलम रेशमी रंगीबेरंगी पडदे खाली सोडले होते. विशिष्ट प्रकारचे ध्वज उभारले होते. गोम्पाच्या अंगणात मध्यभागी एक मुख्य ध्वज दिमाखात फडकत होता. स्वयंपाकघरात आल्यागेल्या सर्वांसाठी मोफत चहा, पिण्यास गरम पाणी, थुकपा (एक लडाखी वन मील डिश) रांधणे सुरु होते. मोठमोठाल्या पातेल्यांमध्ये आचारी त्यांचे झारे ढवळत होते. परदेशी पर्यटकांचीही संख्या विशेष जाणवण्याइतपत होती. आणि सर्व पाहुण्यांकरिता बसायला आवाराच्या बाजूने बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केली होती. विशेष म्हणजे आपल्याकडे होतं तसं त्या खुर्च्या स्थानिक टारगट पोरांनी व्यापल्या नव्हत्या. आम्हांला तिथं बसण्याचा भिक्खूंनी आग्रह केल्याने आम्ही फोटोसाठी चांगल्या सोयीच्या जागा पाहून स्थानापन्न झालो. तेन्झिनने आम्हांला काही उपयुक्त सूचना केल्या. स्थानिक चॅनेलचे, डीडी काश्मीरचे कॅमेरेही आले होते.
हळूहळू उत्सवाला सुरुवात झाली, मुख्य लामांचे आगमन झाले, विशिष्ट पूजा झाल्या. वाद्यांचे गजर झाले. विविध प्रकारची नृत्ये, नाटिका एक धीरगंभीर लयीत, खेळकर वातावरणात सगळे चालू होते. माझ्या मनात मात्र त्या वाद्यांच्या तरंगासोबत वेगळे विचार उमटत होते. आजवर लडाख आणि परिसरात दोन वेळा आलो पण अशी मनःशांती कधी लाभली नव्हती. पांढर्याशुभ्र बर्फाच्छादित पर्वतराजींच्या कॅनव्हासवर लडाखी जीवनशैलीचे विविध रंग आणि छटा ठळकपणे उमटत होते. त्यात ऐन पर्यटनाच्या मोसमातला कोलाहल अजिबातच नव्हता. त्यात वाद्यांचा ताल आणि सुशीरवाद्यांचा नाद मनात खोलवर पोचून एक आगळी शांतता लाभत होती. हिमालयात असलेला मूळ तिबेटचा बुद्धिझम आणि आपल्याकडे आढळणारा बुद्धिझम यांतला फरक प्रकर्षाने जाणवत होता. विविध मुखवटे, रंगीत झिलईचे वेश, हत्यारे, वाद्ये यांच्या सहाय्याने चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर विजय सार्थपणे सादर होत होता.
हे सर्व नृत्य आणि संगीत चालू असतानाच अचानक काही स्वयंसेवक येऊन आम्हांला कॅमेरे बंद करण्यास सांगून गेले. काही मार्ग मोकळे करुन गेले. तशी तेन्झिनने कल्पना दिलीच होती. आता "ओरॅकल" नावाचा प्रकार अवतरणार होता. म्हणजे आपल्याकडं अंगात येणं जसं असतं तसं काहीसं. तीन लोक अंगात आल्यासारखे करुन सगळ्या गोम्पात धुमाकूळ घालत पळतात, छतांवरुन उड्या मारतात, उअंचावरील अगदी अरुंद कठड्यांवरुन लीलया धावतात, चाकू-तलवारींने जिव्हा कापतात. काही अमानवी दैवी शक्ती असते अशी स्थानिकांची भावना असते. ते पुढील वर्षभराचं भविष्य, पंचांगासारखं सणवार वगैरे सांगतात अशी तेन्झिनने आम्हांला माहिती पुरवली. त्यांचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आणि ती एवढी काटेकोरपणे पाळली जाते की स्थानिक चॅनेलवाल्यांनीही त्यांचे कॅमेरे बंद केले होते. पुढे बोलता बोलता मागल्या वर्षी काही कॅमेर फोडल्याची माहिती तेन्झिंगने दिल्याने आम्ही गुपचूप पॅकअपच करुन घेतले. गोम्पाच्या बाहेर पडलो आणि थोडंफार खाऊन लेहच्या दिशेने निघणार होतो. पण तेन्झिन आम्हांला दुसर्याच एका रस्त्याने घेऊन जाणार होता. सिंधू नदीच्या बाजूने आम्ही एक वेगळा रस्ता निवडून फोटो काढत काढत लेहला रात्री पोचणार होतो...

22:52
सह्याद्रीतल्या देवता
कुठे
भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर
कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शिवाची तर
कपर्दिकेश्वर, कुकडेश्वर, रायरेश्वर, जगदीश्वर अशी कैक रुपे. शक्तीही
मेंगाई, शिरकाई, पद्मावती, भोराई, शिवाई अशा नानाविध रुपात. बलशाली मारुती
तर प्रत्येक किल्ल्यावर कुठे ना कुठे आहेच. हरेक दरवाजावर गणेश विराजमान
झालेले. कधी या देवतांना नुसतेच
शिळास्वरुप लाभले, कधी अर्धवट घडवलेला तांदळा, कधी अतिशय सुबक वज्रालंकित
अष्टभुजाधारी मूर्ती. कधी या दैवतांना नुसतीच कपार लाभली, कधी कातळाच्या
भिंतीत मारुतीरायांना कोरुन काढले. कधी अमृतेश्वरासारखे शिल्परुपी रत्नजडित
राऊळ त्यांच्यासाठी कुणी अनामिकाने निर्मिले तर कुणी नुसतीच घुमटी बांधली.
काहींच्या पदरात निळ्याशार अंबरानेच कळस धरला आणि पर्जन्यरुपी जलधारांचा
अभिषेक घडवला.
या दैवतांपाशी आसपाच्या मुलखातील गावकर्यांची
श्रद्धा फार. त्या वाटेने जाताना हमखास देव धुण्यासाठी पाण्याची बाटली, चार
अगरबत्त्या, चार रानफुलं आणि अबीर-भंडारा घेऊन जातील. याच देवतांनी आम्हां
भटक्यांना आजवर राखले. आम्ही भटकंती अनलिमिटेड करत असताना घरच्यांच्या
मागे आमची अदृश्य पाठराखण केली, कधी तहानलेल्या जीवाला कुशीतल्या टाक्याची
वाट दाखवली, कधी समोरचा नैवेद्य आमच्या भुकेल्या पोटाच्या स्वाधीन केला.
कधी प्रसाद म्हणून गोडसर खोबरे हाती दिले तर कधी भरपेट लापशी-भात-आमटी खाऊ
घातली.
म्हणूनच आमच्या या पाठीराख्या देवतांना शतशः प्रणाम!
21:51
रानावनातल्या श्रावणसरी
मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच. रानवाटा तुडवत हा श्रावणसोहळा अनुभवण्याची मजा औरच.
आकाशाच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरू लागले की आषाढ महिनाभरात सारी सृष्टी सजवून ठेवतो. मग पूर्ण महिनाभर त्याचा वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. हळूहळू हे निसर्गाचे इंटेरियर करून झाले की, निसर्ग पुढे येणाऱ्या सणांच्या स्वागतासाठी सज्ज होतो. मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे सृष्टीचे साजिरे रूप अजूनच खुलवितात. गाजावाजा करत कोसळणारे आषाढमेघ, धुवांधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा, वाकलेली झाडे.. या साऱ्यांतून आषाढातली सृष्टी नुकत्याच वयात आलेल्या आणि सगळ्या बंधनांना झुगारून देऊन बंड करण्यास उतावीळ अशा नवथर तरुणीसारखी भासते. पण श्रावणाचे तसे नाही. अगदी अलगद, सोज्वळपणे धारा बरसणार, मागून हलकेच उन्हाची तिरीप त्याला इंद्रधनुषी रंगात रंगवून टाकणार. त्या नाजूक सप्तरंगी कमानीआडून ढगांचे स्वप्नातले इमले रचले जाणार. सारा भवताल चमचमता होणार. जणू लग्न होऊन नुकतीच सासरी आलेली नववधूच. सारे कसे एकदम नजाकतदार, डोळ्यांत इंद्रधनुषी स्वप्नांची चमक असलेली लावण्यवतीच. तसाच लज्जासुलभ घरभर वावर. न्हालेल्या केसांतून निथळणाऱ्या पाण्यासहित दोन भुवयांच्या मध्ये हळद-कुंकवाचे बोट लावून तुळशी वृंदावनाशी हात जोडलेली आणि साऱ्या घरावर सात्त्विक मोहिनी घालणारी.
श्रावणात एखाद्या टेकडीवर जाऊन निसर्गाचे रूप न्याहाळण्यात एक वेगळीच गंमत आहे. सृष्टीवर धरलेले मेघांचे छत्र, तिच्या अर्ध्या अंगावर सोवळे ऊन, त्यामुळे नारायणाने श्यामल मेघांना घातलेला रुपेरी जरीचा काठ. थंड हवेने त्या मेघांशी थोडी लगट करण्याचा अवकाश की तो अगदी तिच्या थंडगार स्पर्शाने वेडापिसा होऊन तिच्यामागे धावून बरसू लागतो. वर ढगांचा एक मोठ्ठा गोळा, त्यातून चमकणारी प्रकाशाची तिरीप, बरसणाऱ्या जलधारा, अर्ध्या भागात सोनसळी ऊन, खाली तळाशी रेखलेली नदी.. अगदी वेड लागावे असे वातावरण. अशा श्रावणात छत्रीखाली दप्तर सांभाळत डबक्यांतून पाणी उडवत जाणारी शाळकरी पोरे, शाळेच्या स्कर्टच्या ओटीत रानभाजी भरून घरी आणणाऱ्या लाल रिबिनींच्या दोन वेण्या घातलेल्या पोरी, खाचरांतून भाताची मशागत करणारे बाप्ये.. श्रावणी व्रताचे सणवार उत्साहात करणाऱ्या भगिनी. सोमवारी शिवालयातून घुमणारा घंटेचा नाद, शनिवारी माळ करण्यासाठी रानातून पत्री गोळा करणाऱ्या परकरी पोरी. पंचमीच्या सणाला केवढा तो उत्साह. उंच झाडाला आकाशाशी लगट करू पाहणारे झोके, त्यासोबत खेळणाऱ्या तरुणी, त्यांचे खिदळणे.. या साऱ्यातून सृष्टीत सामावलेले श्रावणी चतन्यच वाऱ्यासवे आसपास विहरत असते. असे वातावरण अनुभवायला कूस उजवलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकायला तर हवेच. अशाच श्रावणातल्या सोवळ्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पुण्याजवळ कापूरहोळ-भोर रस्त्यावरचा नेकलेस पॉइंट हे ठिकाण अतिशय सुंदर. मुख्य रस्त्यावरून इंगवली गावाकडे जाणारा रस्ता फुटतो तिथून पायी चालत गेलो की नीरा नदीचे विस्तीर्ण खोरे सामोरे येते. हिरवाईच्या पाश्र्वभूमीवर नीरेचे पात्र असे काही घाटदार वळण घेते की जणू काही घरंदाज सृष्टीच्या गळ्यातला कंठाच. विस्तीर्ण आकाशात दाटलेले ढग, नदीचा विळखा पडलेले समृद्ध खोरे, पाणी भरलेली भातखाचरे, एक भातगिरणीची शेड, अधूनमधून विस्कटलेल्या वाडय़ावस्त्या.. एक खरेच नजरेचे पारणे फेडणारे दृश्य!
या श्रावणाच्या दिवसांत भटक्यांना खरे पाय फुटतात. पुण्यामुंबईच्या भटक्यांना एक हक्काची आणि अतिशय सोयीची जागा म्हणजे राजमाची. लोणावळा स्टेशनला उतरून तुंगार्लीच्या जलाशयाला वळसा घालून उधेवाडीची मळलेली वाट धरली की, चुकण्याची शक्यता नाहीच. साधारण पंधरा किलोमीटरची पायवाट प्रत्येक वळणावर सह्याद्रीचे एक आगळे रूपडे आपल्यासमोर ठेवते. या वाटेवर काय मिळत नाही? खळाळते निर्झर, हिरवाईने व्यापलेली पठारे, राकट सह्याद्रीचे कडे, तांबूस भिजट पायवाटा, उधाणलेले जलप्रपात, डोंगरांना फेटे बांधलेले ढग, चिंब पावसात न्हात उभ्या वाडय़ा, गोठय़ांच्या फटींतून पागोळ्यांचे पाणी जिभांवर झेलणारी जनावरे.. हे सारे मिळून पायपीट एवढय़ा मोठय़ा अंतराची असूनही त्याचा थकवा जराही जाणवू देत नाही. श्रावणाचा पाऊस काही आषाढासारखा धोधो करून अचानक ओढय़ांना पूर आणीत नाही, पण तरीही त्याचा अंदाज घेऊनच राजमाचीचे ओढेनाले पार केले तर ही आणि अशा अनेक रानवाटा एक आगळाच आनंद देतात. एवढय़ा पायपिटीनंतर संध्यासमयी माळावरल्या खोपटय़ात बसून कितीही अंधारून आले तरी हा श्रावणसोहळा अनुभवावा असा असतो. एखाद्या गवयाने रंगवून आणलेली सुरेल मफल जशी श्रोत्यांनी तल्लीन होऊन ऐकावी तसाच अनुभव. आपल्याला त्याच्याशी एकरूप करून टाकणारा, एक अजब मोहिनी घालून भुरळ पाडणारा आणि त्याच्या वेडात टाकणारा. ती असते शब्दश: अद्वैताची अनुभूती. आषाढात एक द्रुतताल धरून बराच वेळ जसा पाऊस कोसळतो तसे श्रावणाचे नाही. वेगवेगळ्या सतरंगी सुरावटींतले आलाप, बंदिशी, ठुमऱ्या यांच्या जडाव्याने मफल सजावी तसे श्रावणातल्या पावसाचे असते. मध्येच एखादी रिमझिम सर, अगदीच कधी तरी एखादा आभाळ फाटून यल्गार, कधी नुसतीच वीणेच्या तारेवर एकवार बोट फिरवावे तशी अलगद बुरबुर, कधी समेवर आल्यासारखा झिम्माड. पावसाचे हे सप्तसुरांचे गान आणि श्रोत्यांनी मुक्तहस्ते दाद दिल्यासारखा त्या मोकळ्या माळावरचा वाऱ्याचा उल्हासित उन्मेष!
अशीच एक आल्हाददायक अनुभव देणारी रानवाट म्हणजे महाबळेश्वर ते कास रस्ता. कच्चा गाडीरस्ता म्हणावा अशी ही सोप्पी वाट.. श्रावणात पायपीट करायला अतिशय सुंदर. दुतर्फा घनदाट जंगलांनी वेढलेली, धुक्यात लपेटलेल्या वळणावळणांच्या वाटेने आपण कासच्या दिशेने चालायला सुरुवात केली की सगळं भान हरवून जायला होतं. थोडं जास्त अंतर असलं तरी दिवसभर पायपीट करायला अतिशय सुंदर. अगदीच कंटाळा आला तर एखाद्या चुकार गाडी-टेम्पोला हात करून लिफ्ट मागून थोडे अंतर जायचे. घोटा-घोटा पाण्यातून ओहळ तुडवत वाटेच्या दुतर्फा फुलांचे गालिचे न्याहाळत रानात फिरणे म्हणजे एक आगळी मौज. तेरडा, सोनकी, चिरायत, कवळा अशी ओळखीची काही, रानहळद-गौरीहार-भंडिरा अशी नवलाची काही, ऑíकड-कळलावी अशी देवाच्या कौलाची (म्हणजे दुर्मीळ) काही. त्यावर साचलेले गुंजांसारखे पावसाचे थेंब पायांना मऊशार गुदगुल्या करतात, रंग डोळ्यांना सुखावतात, मन फुलपाखरू होते. या फुलावरून त्या फुलावर बागडते. नितळ पाण्याच्या डोहात डुंबते. कापूसढगांसवे रानभर उंडारू पाहते. रिमझिम पावसात झिम्माडते. श्रावणसरींत न्हाते, सोनसळी उन्हाने चमकून जाते, सतरंगी इंद्रधनुच्या रंगाने रंगून जाते. खरेच ‘खेळ मांडियेला..’ अनुभव!
काही वेगळ्या फोटोंसह पूर्वप्रकाशन: लोकसत्ता, लोकभ्रमंती (२६/७/२०१६).

07:38
हरवले हे रान धुक्यात…
चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर
शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर

आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल पाखरांची
चंद्रमौळी झोपड्यांत सुखे ऊबदार साखरझोप लेकरांची

धुराच्या वेलांट्या उमटल्या गावाकुसातुनी
धुक्याच्या मौनी कागदाला ऊबेचा रंग येई
धुक्याच्या मौनी कागदाला ऊबेचा रंग येई
हरवले हे रान धुक्यात, नदी रेखिली चमकदार
दहिवर रानोरानी, कुठे गवताशी दवाचा रत्नहार

आकाशात किरणे फाकली जणू सोने उधळी
रात्री जपलेली प्रकाशाची दौत उपडी केली नभाळी

उधळला सडा प्रकाशफुलांचा क्षितिजावरून
ऊबसुगंधी ओघळे चराचरात पानापानांवरून
ऊबसुगंधी ओघळे चराचरात पानापानांवरून
देवळातून उमटे काकडआरतीचा धूसर गजर
चेतन पावन होई पहिला मंगल प्रहर
चेतन पावन होई पहिला मंगल प्रहर
गोठ्यातली किणकिण आणि दूरवर कोंबड्याची बांग
धन्याच्या शिदोरीसाठी जात्यावरल्या गाण्यांचा संग

नसे ठावभर रिकामी हिरवी पिवळी सोनशिवारं
काळ्या आईचं दान जणू रातीचं सपान साजरं
काळ्या आईचं दान जणू रातीचं सपान साजरं
सकाळ अवतरली किलकिल्या डोळ्यांनी
मिठीत वेढले सृष्टीला सहस्त्र रेशीमधारांनी

22:15
दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच
मनही सह्याद्रीत विहरु लागते. मग काय आठवडाभर काड्या आणि वीकेंडला
बुडाखाली गाड्या असल्यावर त्या मनाला देहाची जोड लागायला असा कितीसा वेळ
लागणार? पाऊस अजूनही म्हणावा तसा विसावला नसल्याने तो उंबर्यातून आतबाहेरच
करत होता. रोज पेपरात कुठवर आलाय हे चाळण्यात आणि तो मनासारखा बरसल्यावर
कायकाय करायचे याचे मनसुबे रचले जात होते. तो इकडे म्हणावा तसा घाटावर येत
नाही म्हणूनच की काय त्याला भेटायला आपणच जराशी घाट उतरुन त्याचे स्वागत
करावे, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधीत किल्ले पालथे घालावेत असे मनाचे खेळ
मांडीत ट्रेकचा बेत आखण्यात आला होता. उन्हाचा त्रास आता सरल्याने तसा
जरासा ताणलेला बेत चालणार होता. म्हणून दोन-तीन दिवसांत वरंधच्या
माथ्यावरले दोन आणि महाड-माणगाव परिसरातले दोनतीन अशी दुर्गांची पंचरंगी
माळ ओवण्याचा प्लॅन तयार झाला.
मोहनगड-कावळ्या-सोनगड-चांभारगड-दासगाव-पन्हळघर. माऊलींच्या वारीसाठी
काढलेली सुट्टी आता ट्रेकला सत्कारणी लावायची हेही पक्के केले.
दोन दिवस, चार भटके, पाच किल्ले !
या वेळी अमित आणि अजयसोबतच शतदुर्गवीर
अनुप बोकीलबुवा बदलापूरकर हे नविन साथीदार होते. नुकताच त्यांनी
हरिश्चंद्रगडावर इंद्रवज्राचा पराक्रम केला होता. शुक्रवारी पहाटे अमितच्या
घरी पहिला चहा घेतच दिवसाचा प्लॅन आखला. बाईकवर भोरमार्गे निगुडघर आणि
दुर्गाडी म्हणजे मोहनगडाच्या पायथ्याचे गाव. झाडून सार्या ट्रेकर्सचा
नैवेद्य म्हणजे मिसळ-पाव. भोरच्या शिवाजी पुतळा चौकात स्वयंसेवा असलेल्या
हॉटेलात मिसळपाव खातानाच बोकीलबुवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उंचीची खात्री
झाली. टेबलाशी बसताच आले नाही. बसूनही गुडघे टेबलाच्या उंचीच्या वर.
साडेसहा फूट ताडमाड असल्यावर ट्रेक करायला किती सोप्पे जात असेल असा विचार
मी मिसळीवर ताव मारताना करत होतो. एका दूध डेअरीच्या ड्रायव्हरला रस्ता
विचारुन घेतला आणि निगुडघर हे देवघर धरणाचे गाव गाठले. तिथून दुर्गाडीला
दोन रस्ते जातात. एक थोडा कमी अंतर असलेला खराब रस्त्याचा रस्ता आणि दुसरा
दहाबारा किलोमीटर जास्त अंतर असलेला पण रस्ता चांगला असलेला महाड रस्त्याने
पुढे जाऊन शिरगावहून मागे फाटा येणारा. (©भटकंती अनलिमिटेड) साहजिकच दुसरा पर्याय स्वीकारुन
आम्ही महाड रस्त्याला लागलो आणि शिरगावच्या अलीकडे दुर्गाडी फाट्याला जरासा
ब्रेक घेतला.
समोर दोनतीन उंच डोंगर दिसत होते. त्यातला
नेमका मोहनगड कुठला हे माहित नव्हते. बाईकवर दहाच मिनिटांत वळणावळणांच्या
रस्त्याने दुर्गाडीत पोचलो. तिथे दुर्गाडी हा किल्ला आहे हे कुणालाच माहित
नव्हते. मग दुर्गामातेच्या मंदिरात कसे जायचे हे विचारुन घेतले. दुरुन
लोकांनी वाट सांगितली. नेमकी समजली नाही पण डोंगर तर पक्का झाला म्हणून
आम्ही माना डोलावल्या. एका मावशींच्या घरी जड बॅगा टाकल्या, पाणी प्यायलो
आणि जरुरीपुरते पाणी आणि काही खायचे सामान कॅमेरासह काखोटीला मारुन आम्ही
वाटचाल सुरु केली. दहा-पंधरा मिनिटे चालत पायथ्याच्या देवीच्या मंदिराशी
पोचलो. मंदिर मोठे सुरेख. गच्च झाडांच्या कौलारु गाभारा, पाषाणात घडवलेल्या
सुबक मूर्ती, समोर काही वीरगळांची मांडणी. एखाद्या पाचसहा लोकांच्या
मुक्कामास एकदम योग्य जागा. तिथून पुढे चाल सुरु केली आणि पहिल्याच खिंडीशी
वाट चुकलो. दोन वाटा पुढे जाऊन पाहिल्या, पण त्या माथ्याशी घेऊन जातील असे
वाटले नाही. म्हणून पुन्हा खिंडीतून डावीकडली वाट धरुन पुढे गेलो. तीही
भरकटली. मग समोर दिसणार्या निसरड्या घसार्यावरुन माथा गाठला. पुढे
रानातून जाणारी वाट घेत खड्या कातळाला बगलेतूनच वळसा घालत शेवटी एका
रुळलेल्या वाटेवर येऊन पोचलो. पुढे कातळात खोदलेल्या पायर्या चढून माथावर
पोचलो तर स्वागताला दुर्गेची प्रसन्न मूर्ती असलेले सुंदर मंदिर. (©भटकंती अनलिमिटेड) त्याआधीच
डावीकडे खाली जाणारी वाट पन्नास पावलांवर पाण्याचे टाके. खूप मधुर पाणी.
सगळा शिणवटा निघून गेला. मंदिरात जरासा विसावा घेतला. तेथून ढगांच्या
घरट्यातला वरंध्याच्या माथ्यावरला कडा स्पष्ट दिसत होता. त्यातून डोकावणारा
कावळ्याचा एक सुळका साद घालीत होता. पाठीमागे मंगळगड (कांगोरीचा किल्ला)
आणि (बहुधा) रायरेश्वराचे पठार. त्यापलीकडे महाबळेश्वराचा पाठीराखा
चंद्रगड. ते दृश्य डोळ्यांत साठवत गडाचा निरोप घेतला आणि परतीची वाटचाल
सुरु केली.
वाटेत अमितचा गुडघा चमकून दुखायला लागला.
कसाबसा तासाभरात पायथ्याला आलो. मावशींनी जेवणाचा आग्रह केला. नको नको
म्हणत असतानाच चहा केला. तो मग प्यावाच लागला. आम्ही सगळेच क्षुद्र
विचारांचे लोक, पैसे किती झाले म्हणून विचारते झालो. पण त्यांनी
पाहुण्यांकडून पैसे घेत नाही असे बजावून त्यास नकार दिला. मग घरातल्या
चिल्यापिल्यांसाठी बॅगेतला मोठ्ठा बिस्किटांचा पुडा खाऊ म्हणून हाती दिला.
तोही खूप आर्जवं केल्यावर घेतला. सह्याद्रीचा मोठेपणा या लोकांच्या
मनामनांत भरला होता. असे डोंगरातल्या माणसांच्या निरपेक्ष स्वभावरंगाचे
अनुभव घेण्यासाठीच तर ट्रेक करावेत.
मावशींचा निरोप घेताना आता पुढला टप्पा
होता कावळ्या किल्ला. अमितने गुडघ्याला जेल लावून जरा त्याला चालता केला.
वरंध्यात खेकडा भजी खाऊनच पुढे जायचे म्हणून एका मामांच्या टपरीवर विसावा
घेतला. भजी खात असताना़च मामांनी रस्ता सांगितला. जरा खाली पाहत जपून जा,
पावसाचं किडूक मिडूक गारव्याला बाहेर आलेलं असतं असा प्रेमळ काळजीचा
सल्लाही दिला. बॅगा त्यांच्याकडेच टाकून आम्ही पुन्हा जरुरीच्या सामानासह
वरंध्याच्या खिंडीतल्या सुळक्याला वळसा घालून कारवीच्या रानातून घसार्याची
वाट धरली. वाटला होता थोडा पण तसा कावळ्याने अपेक्षेपेक्षा अधिकच कस
काढला. पट्टीचे चालणारेही फासफूस करु लागले. मामांनी सांगितलेले
शिवरायांच्या नावे तयार केलेले एक वृंदावन दिसले. वाटेत साळिंद्राचा एक
काटाही सापडला. कसाबसा टेकड्यांना उजवी-डावी घालत जरीपटका लावलेल्या
निशाणाचा बुरुज गाठला.
तेथून समर्थांची शिवथरघळ आणि तिथला
सुंदरमठ दिसत होता. शिवथरनदीला अजून पाणी वाहते झाले नव्हते. समोरच्या
रांगेतले मढे, शेवत्या, गोप्या घाट कोकणात उतरायची शर्यत खेळत होते. पलीकडे
राजगड आणि तोरणा त्यांच्यावरुन डोकावून कावळ्याकडे पाहत होते. मावळतीला
निघालेल्या सुर्याची किरणे ढगांमधून पाझरुन एक सुंदर सोनेरी पट खाली
महाडच्या दिशेने उलगडला होता. तिथून परतताना पावसाची एक सर आली. पलीकडे
शिवथर खोर्याच्या दरीत सुंदर इंद्रधनुष्य उमटले. ते डोळ्यांत आणि मनांत
साठवत वरंध्यात परत आलो आणि पुन्हा एकदा मामांच्या हातचे लिंबू सरबत घेऊन
ताजेतवाने झालो. मामांनीही आमचा उत्साह पाहून हा ग्लास माझ्यातर्फे म्हणत
अजून एक लिंबूसरबत ऑफर केले. पुन्हा एकदा सह्याद्रीचा बुलंद मोठेपणा…
बोलण्यात, त्यांना वाटणार्या किडूक-मिडूकच्या काळजीत. आता घळीत मुक्कामी
जायचे होते. रस्ता ओळखीचाच होता. पारमाचीमार्गे कुंभे शिवथर असे करत समर्थ
रामदास स्वामींच्या सुंदरमठासमोर उभे ठाकलो.
मठातल्या सेवेकर्यांना आमची ट्रेकर्स ही
ओळख आणि निर्व्यसनीपणा पटवून देण्यासाठी अजयने प्रयत्नांची शिकस्त केली आणि
नशिबाने त्याला यश आले. तिथल्या सेवकाने आम्हांस सगळी व्यवस्था दाखवली,
जेवणाला काही तयार करु नका, आमच्यासोबतच करा असे सांगितले. शूचिर्भूत होऊन
जमेल तेवढा वेळ दैनंदिन उपासनेला हजर राहण्याचा नियमही समजावला. हातपाय
धुण्यास कडक गरम पाणी, लाईट-पंखा असलेली खोली, कॅमेरा चार्जिंगला पॉइंट्स,
झोपायला स्वच्छ सतरंजी म्हणजे आम्हां भटक्यांची अगदीच चैन. सगळा दिवसाचा
शीण नाहीसा झाला. प्रसन्न वातावरणात उपासना, मनाचे श्लोक, आरती करुन कसे
एकदम पवित्र वाटले. जेवणाला साधीच पण सुग्रास सोय. भाजी-पोळी, भात आमटी आणि
चक्क पुरण. आजवर ट्रेकमध्ये जिलेबी, बर्फी, पेठा, लाडू, गुलाबजाम खाल्ले
होते. पुरणाची हौस तेवढी शिल्लक होती, तीही आज पूर्ण झाली. मस्तपैकी ताक
प्यायल्यावर जमिनीला पाठ टेकल्याबरोबर झोप लागली तो जाग आली ती
सुंदरमठाच्या सकाळच्या घंटेनेच. रोजचाच दिवस असा सुरु झाला तर किती भारी
वाटेल असा विचार करतच आवरुन पुन्हा सकाळच्या काकडाआरतीच्या शेवटच्या चरणास
आम्ही पोचलो आणि प्रसाद आणि चहा घेतला. पुढे जाऊन घळ पाहून आलो, दर्शन
घेतले आणि पहिल्याच प्रहरी महाडच्या दिशेने चांभारगडास समोर ठेवून बाईक्स
दामटवल्या.
सकाळच्या पावसाळी कुंद हवेत महाडच्या
रस्ता तसा निर्मनुष्यच होता. त्या रस्त्याने जाणार्या कदाचित पहिल्याच
गाड्या आमच्या असल्याने तसा रस्ताही नुकताच झोपेतून उठला होता. शेतकरी
नुकतेच पावसापूर्वीच्या मशागतीला शेतात पोचले होते. वाटेतच एका हरणाच्या
पाडसानेही दर्शन दिले. आम्हाला पाहिल्याबरोबर ते आत रानात चौखूर उधळले.
बिरवाडी फाट्याला पुन्हा एकदा नाश्त्याला मिसळ चापली आणि हायवेवरुन
महाडच्या दिशेने चांभरखिंडीत पोचलो. पायथ्याला पोचलो, गावात रस्ता विचारुन
घेतला आणि शाळेसमोरुन जातानाच शाळेतल्या बाईंनी “एवढ्या जड बॅगा कशाला घेऊन
वर जाता, इथेच ऑफिसमध्ये ठेवा” असे हटकले. तीच पडत्या फळाची आज्ञा मानून
पुन्हा एकदा जरुरीचे सामान घेऊन चांभारगडाची माची गाठली. तिथून पुढे पुन्हा
एकदा वाट चुकली आणि घसार्यावरुनच वर चढाई सुरु केली. वरती थोड्याफार
खोदीव पायर्या, किल्ल्याचे अवशेष, बरीचशी पाण्याची टाकी आहेत. सगळी पाहून
दोनतीन तासांत पुन्हा पायथ्याला पोचलो. (©भटकंती अनलिमिटेड) पाणी पिऊन ताजेतवाने होऊन शाळेच्या
शिक्षकांशी थोड्याफार गप्पा करुन पुढे दासगावचा रस्ता विचारुन घेतला.
हायवेने अर्ध्या तासात दासगावात पोचलो. तिथेही बॅगा एका दुकानात ठेवून
शाळेच्या मागचा दासगाव किल्ला चढायला सुरुवात केली. वर पोचताच पाठीमागे
स्वप्नवत सुंदर दृश्य समोर ठाकले. पलीकडे कुठली तरी खाडीसदृश नदी,
विस्तीर्ण पात्र, हिरवीगार झाडी, पाण्यात मध्येच तयार झालेली बेटं, मधूनच
जाणारा कोकण रेल्वेचा पूल… एकदम टिपीकल कोकण. कदाचित या दृश्यासाठीच कुण्या
ब्रिटिश अधिकार्याने या किल्ल्यावर बंगला बांधला. त्या बांधकामाच्या
जोत्याचे अवशेष, एक दगडी घोडवाट, एक-दोन बुरुज, एक तलाव असे पाहून
पायथ्याला आलो.
पुढला किल्ला खरंतर सोनगड होता, पण अमितच्या दुखर्या गुडघ्यामुळे फक्त पन्हळघर किल्ला करुन पुण्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. लोणेरेहून पन्हळघर गावाकडे जाणारा रस्ता घेऊन पन्हळघर गावात पोचलो. गावाशेजारीलच आदिवासीवाडीवरुन किल्ल्यावर वाट जाते. किल्ला तसा खड्या चढणीचा, त्यात कोकणातला. म्हणजे घाम काढणारच. वाडीत रस्ता विचारुन घेतला. अनुपने खालीच आराम करणे पसंत केले. आणि मी, अमित, अजय वर निघालो. मोहिमेतला शेवटचा किल्ला असल्याने अगदी “सुलतानढवा” करतच माथा गाठला. किल्ल्यावर पाण्याच्या काही टाक्यांव्यतिरिक्त बाकी काही अवशेष शिल्लक नाहीत. पुस्तकात दिलेले खोदीव पायर्या आणि बांधकामाची जोती झाडीत शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. माथ्यावरुन दुर्गराज रायगड, लिंगाणा यांचे दर्शन घडले. वरुनच एक नदी दिसली आणि शिरस्त्याप्रमाणे ट्रेकचा शीण त्यात बुडवून टाकण्याचे नक्की केले. माघारी फिरलो. पायथ्याला आल्यावर त्या नदीच्या उथळ डोहात बराच वेळ डुंबलो आणि मग ताम्हिणीमार्गे परत येताना माणगावात जेवण करुन घेतले. ताम्हिणीत येताना पाऊस घाट आमच्यासोबतच चढला होता. अगदी पौडपर्यंत पावसानेही सोबत केली आणि आम्ही पुण्यात पोचल्यावर दुसर्याच दिवशी मागोमाग तोही पुण्यात दाखल झाला. पुढल्या भटकंतीचे बेत विचारात सध्या तो बाहेर कोसळतो आहे आणि मी ही मोहनगड-कावळ्या-चांभारगड-दासगाव-पन्हळघर पंचदुर्गांची माळ माझ्या सह्याद्रीस समर्पित करत आहे.
22:10
मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होते. सकाळी मंदिरापाशी पोचल्याबरोबर संजय कुठूनतरी आला आणि काल रात्री न आल्याबद्दल चौकशी केली. रात्री बराच वेळ आमची वाट पाहिल्याचेही त्याने नमूद केले. त्याची माफी मागून त्याच्यासोबतच मंदिर पहावयास सुरुवात केली. आम्ही मंदिर पाहत असताना त्याने मंदिराची आणि परिसराची झाडलोट केली, शिवलिंग पाण्याने धुवून काढले आणि सुंदर ताज्या फुलांनी त्याची पूजा बांधली. छानसा अगरबत्तीच्या दरवळ मंदिरात पसरला होता आणि आम्ही त्या वातावरणात तिथली शिल्पे निरखीत होतो. ताहाकारीच्या मंदिरासारखे या मंदिराचे छतही दगडात कोरलेल्या देठाला लगडलेल्या फुलांच्या आकाराच्या झुंबरांनी अलंकृत आहे. मंदिर भूमिज शैलीत बांधले असून शिखर विटांमध्ये रचलेले आहे. मुख्य सभामंडप, त्याला तीन दरवाजे आणि त्याच्या पुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गोदावरी नदीच्या अगदी तीरावरच असल्याने एखाद्या मोठ्या पुराचा फटका बसला असावा असे त्या परिसरातील लहान भग्न मंदिरे पाहून जाणवते. या मंदिराच्या मूळ बांधणीनंतर पडझड झालेली आणि त्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, याचे कारण म्हणजे मूळ दगडी मंदिरावर असलेले चुना आणि खडी यांचे मिश्रण असलेले बांधकाम. ते साधारण दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे असावे. पण त्या प्रयत्नांतही मूळ मंदिराचे सौंदर्य कायम राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
आजच्या काळातील राज्यकर्त्यांना अशी सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना त्या शंभूमहादेवाजवळ करुन आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला.
(अवांतर: या कोकमठाण गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी अक्षयतृतीयेला गोदावरीच्या पलीकडील संवत्सर नावाच्या गावाला शिव्या देण्याचा आणि गोफणीने दगडफेक करण्याचा रिवाज. या दिवशी दोन्ही तीरांवर त्या त्या गावांतील युवक एकत्र येऊन एकमेकांना यथेच्छ शिव्या देतात, एकमेकांवर दगडफेक करतात. दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच मुख्यत्वे भावना असते. नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून ५ दिवस दररोज सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. हे युध्द केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात होती.अलीकडच्या काळात दोन्ही गावांतील समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन ही शिव्यांची प्रथा अगदी उपचारापुरती सीमित केली असून गोफणगुंडा युद्ध पूर्णपणे बंद करवले आहे. व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?time_continue=49&v=G8KjATcJfxs).
तर आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला. आता कोपरगाव-वैजापूर-लासूर मार्गे औरंगाबादला पोचावयाचे होते. आम्ही आता मराठवाड्यात प्रवेश केला होता. सकाळी थोडे ऊन सुसह्य होते. मिळेल तिथे आणि मिळेत ते आम्ही खात होतो, परंतु साऊथ इंडियन कुठेच मिळाले नाही. कोपरगाव सोडल्यापासून पुढे तर फक्त पाववडा (बेसनपिठात बुडवून तळलेला पाव) आणि कुठेतरी कळकट मिसळ एवढे सोडले तर काहीच उपलब्ध नव्हते. खूप तेलकट आणि बेसन खाऊन त्रास होऊ नये म्हणून आम्ही चहा आणि बिस्किटांवर वेळा मारुन नेत होतो. त्यात तशा आमच्या दोघांच्याही गाड्या नवीन असल्याने आणि ही मॉडेल्स या भागात जास्त पोचली नसल्याने प्रत्येक ब्रेकला आमच्या बाईक्सभोवती बघ्यांचे कोंडाळे तयार होई आणि उगाचच हे बटन दाब, तो दांडा ओढून बघ, गियरच टाकून बघ, गाडीवरच बस असले उद्योग केले जात. त्यात आमच्या सॅडलबॅगही गाडीलाच बांधलेल्या असत. त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात निर्मनुष्य चौक शोधून टपरी गाठायचो आणि तिथे खायला काही तयार नसे. ते तयार होईपर्यंत गाड्यांभोवतीच्या गर्दीवर वॉच ठेवणे हाच एककलमी कार्यक्रम असे. हा रस्ता म्हणजे जीवघेणा होता. आमच्या बाजूचा औरंगाबादच्या दिशेने जाणारा अर्धा रस्ता चांगल्या गुळगुळीत अवस्थेत आणि अर्धा खडीकरण केलेला. त्यामुळे समोरुन येणारी जड वाहनेही आणि कारदेखील आमच्याच लेनमधून भरधाव चालत. समोरुन आलेली वाहने चुकवण्यासाठी रस्ता सोडून शोल्डरवरुन शिताफीने बाईक खाली घेऊन साइडपट्टीवरुन घ्यावी लागे. हे करण्यात थोडी जरी कुचराई झाली तरी समोरची गाडी बेफिकीरपणे आम्हांला घेऊन गेली असती. साधरण दुपारच्या सुमारास आम्ही डावीकदे दौलताबाद पाहत पाहत औरंगाबादेत प्रवेश केला. अडीच दिवसांत साडेसहाशे किलोमीटर प्रवास झालेला असल्याने माझ्या बाईकलाही भूक लागली होती. तिला भरपेट (टॅंकभर) खाऊ घातले आणि ध्रुवच्या आतेबहिणीच्या घरी पोचलो. आम्ही आता दोन दिवस तिथे मुक्काम टाकून बेसकॅंप करणार होतो आणि औरंगाबाद-सिल्लोड-अन्वा आणि औरंगाबाद-लोणार असे दोन लॅप्स मारणार होतो.
काय करावे? आज जावे की नाही? आराम करावा का? असे विचार सुरु होता. जवळपास अर्धा दिवस शिल्लक होता आणि औरंगाबाद अन्वा हे अंतर अंदाजे शंभर किलोमीटर होते. त्यात ते अजिंठा रोडवर असल्याने ती गर्दीही रस्त्यात असणार. तरीही थकलेल्या शरीराला फ्रेश करुन पुनःश्च घोड्यावर बसवून आम्ही अन्वाच्या दिशेन निघालो. वाटेत औरंगाबाद शहराच्या बाहेर पडता पडता पोटपूजा उरकून घेतली. आता मराठवाड्याचे ऊन चांगलंच जाणवत होतं. फुलंब्री-सिल्लोड बायपास असे करत आम्ही गोळेगाव नंतर अन्वा फाट्याला उजवीकडे वळालो. फाट्यापासून अन्वा गाव अंदाजे दहा किलोमीटर. पण तसल्या रस्त्यावरुन ते अंतर काटायला आम्हांला अर्धा तास लागला. गावात पोचलो तेव्हा मंदिर कुठे दिसेना. गावात अनेक चौकशा करत गल्लीबोळ-पेठा पार करुन एकदाचे आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोचलो.
मंदिराच्या अंगाखांद्यावर गावातली पोरं खेळत होती. त्या मंदिराचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. एकून मीटर दीड मीटर उंचीच्या पीठावर आयताकृती सभामंडप आणि ५० खांबांनी तोलून धरलेले घुमटाकार छत. एवढे जटिल शिल्पकाम असलेले हे आमच्या ट्रिपमध्ये पाहिलेले दुसरे मंदिर (याआधी सिद्धेश्वर मंदिराचे खांब असे अतिशय जटिल (intricate) शिल्पांनी नटवले होते. जरी हे मंदिर वैष्णव देवतांसाठीचे बनवले असले तरी कालौघात त्यात बदल होऊन सद्यस्थितीत तिथे शिवलिंग आहे. मंदिरात असलेली सारी शिल्पे विष्णूरुपातीलच आहेत. हे मंदिर पाहून आम्ही गोळेगावला परत आलो तेव्हा तिथल्या एका हातगाडीवर अंडाभजी नावाचा एक भारी पदार्थाचा शोध लागला. एका प्लेटमध्ये तीन उकडलेली अंडी अर्धी कापून बेसन पिठात बुडवून तळलेली. एकूणात पोटभरीचा आणि पौष्टिक नमुना. अशा दोन प्लेट आणि वर दोन अंडाभुर्जी पाव असे हलकेच (?) खाऊन आम्ही औरंगाबादला परतीचा रस्ता धरला. सिल्लोडला पोचता पोचताच अंधार पडला आणि पुढील सिल्लोड-औरंगाबाद हा परतीचा प्रवास सिंगल लेन रोडने समोरुन येणार्या गाड्यांच्या हेडलाईटचे बाण आमच्या डोळ्यांत खुपसून घेत, ट्राफिकच्या गर्दीतून मार्ग काढत काढत कसाबसा पूर्ण केला.
औरंगाबाद बेस कॅंपला (म्हणजे घरी) पोचलो तेव्हा मुस्तफाची खास मटण दम बिर्याणी आमची वाट पाहत होती. कडक पाण्याने अंघोळ केल्यानंतर बिर्याणीचा फडशा पाडला. अभू (म्हणजे ध्रुवचा भाऊ) सोबत रात्री गप्पा मारत मारत, त्याच्या अल्टोतून केलेल्या रेड-दि-हिमालयच्या आणि इतर ड्राइव्हच्या गोष्टी ऐकत मध्यरात्र कधी सरली समजलेच नाही.
सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजले होते. आजचा प्लॅन लोणारचा होता. तसा बराच लांबचा टप्पा. अंतरापेक्षा जास्त टेन्शन रस्त्याच्या क्वालिटीचे. जालन्यापर्यंत चार लेन्सचा, दुभाजक असलेला सुंदर रस्ता आणि त्यानंतर नसलेला रस्ता सिंदखेडराजापर्यंत. पुढे परत दोन लेनचा समोरुन अंगावर वाहने येणारा रस्ता. जालन्यात पोचताना बायपास घेण्यास चुकला आणि आम्ही जरा लांबचा सार्या जालना शहराला वळसा घालून सिंदखेडराजाच्या दिशेने निघालो. अतिशय वाईट चवीचा नाश्ता केला, तसाच अतिशय वाईट रस्ता पुढे सामोरा आला. दोन फुटावर दोन फूट खोल खड्डे, खडी, धूळ, अंगावर उलट येणारी वाहने. कधी एकदा असा रस्ता संपतोय असे झाले होते. त्यात उन्हानेही वैताग आला होता. कसेबसे सिंदखेडराजाला पोचलो, एक चहा मारुन आम्ही लोणारच्या दिशेने सुटलो. हो हो.. सुटलोच. कारण एकेरी रस्ता असला तरी जरा बरा होता. बाईक बुंगवता येत होत्या. लोणारच्या एसटी स्टॅंड आणि आजूबाजूची गर्दी चुकवत मधूसुदन मंदिराची चौकशी केली. अगदी गावात असलेले मंदिर, गल्ल्यांमधून वाट काढत एकदाचे आम्ही मंदिराशी पोचलो. मंदिर मात्र सुरेख होते. परिसर स्वच्छ ठेवलेला. प्रांगणात गरुडस्तंभाचे काही अवशेष पडले होते. मंदिरात कुणीच नव्हते, म्हणजेच एका अर्थी बरेच झाले. निवांतपणे आम्ही आमच्या पद्धतीने मंदिर पाहून घेतले. एक राउंड मारुन झाला आणी आता फोटो काढावेत असा विचार करत असताना एक आवाज आला. एक्सक्युज मी! मी आता मंदिराबद्दल काही माहिती सांगणार आहे. तुम्हांला ऐकायची असेल तर ऐकू शकता. औरंगाबादचा आनंद मिश्रा हा मराठी (होय मराठीच) पुरातत्त्व अभ्यासक त्याच्या मित्रांसाठी मंदिराची माहिती सांगणात होता. आमची मंदिर पाहण्याची पद्धत पाहून आम्हांलाही त्याने सहभागी करुन घेतले. पुढील दीडतास आम्ही त्याच्या तोंडून मंदिर, स्थापत्यशास्त्र, तेथील शिल्पे, अलंकार, मूर्तींचे विविध पैलू, भावभावना, शस्त्रे आदीसंदर्भात ज्ञानामृत प्राशन करत होतो.
लवणासूर नावाच्या दैत्याचा विष्णूने इथे वध केला म्हणून ओळखले जाणारे लोणारचे दैत्यसूदन मंदिर निजामाच्या राजवटीत धर्मांध रझाकारांच्या विध्वंसापासून वाचवण्यासाठी गावकर्यांनी एका प्रचंड मातीच्या टेकडीखाली गाडून टाकले होते म्हणून तिथली शिल्पं सद्यस्थितीत शिल्लक राहिली आहेत. परंतु या उपद्व्यापात मंदिराचे दगडी शिखर कोसळले. रझाकारानंतरच्या काळात त्याची डागडुजी करण्याचा जेव्हा घाट घातला गेला तेव्हा उपलब्ध साहित्य (विटा आणि चुना) तत्कालीन स्थानिक (निजामाच्या राजवटीतील मराठवाडा) कौशल्य म्हणजे फक्त मशिदी बांधण्याचा अनुभव. म्हणून नंतरच्या विटांच्या बांधकामात दरवाजांवरुन महिरपी आणि कमानी यांमध्ये मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसून येते. मंदिराच्या शिल्पांत तत्कालीन व्यापार, श्रद्धा आणि इराणी संस्कृतीशी असलेलेल आपले संबंध दिसून येतात. मंदिरातील दैत्यसूदन विष्णूची मूर्ती एका वेगळ्याच पाषाणाची बनवली असून त्यात चुंबकीय गुणधर्म असलेल्या धातूचा अंश आढळून येतो. बोटांच्या सहाय्य्याने ती मूर्ती वाजवल्यास तिच्यातून घंटेप्रमाणे नाद घुमतो. गर्भगृहाबाहेरच्या खोलीच्या छतावर विजेरीच्या (टॉर्चच्या) उजेडात आपल्या पुराण कथा मुर्तिरुपात चित्रीत केलेल्या दिसतात. ह्या अप्रतिम मुर्तींमध्ये आपल्याला कंस -कृष्ण, नरसिंह- कश्यप, रासक्रीडा, लवणासूरवध अशा अनेक कथा पहायला मिळतात. ह्या मुख्य मंदिराच्या शेजारी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या तीनही देवतांचे एक छोटे देऊळ आहे. ह्या देवळातील प्राचीन महेशाची मुर्ती चोरीला गेल्याने, तिथे सध्या गरुडाची मूर्ती आहे.
हे मंदिर पाहता पाहताच दुपार झाल्याने ऊन बरेच चढले होते. लोणार सरोवराच्या परिघावर बरीच प्राचीन मंदिरे आहेत. पण वेळेअभावी आम्ही ती न पाहता परतण्याचा निर्णय घेतला. परतीच्या वाटेवर जालन्यात सकाळी हुकलेला बायपास शोधून शोधून घेतला नंतर का घेतला याचा पश्चाताप केला. आख्खी बाइक गिळंकृत करतील असे मोठे खड्डे आणि त्यातून संध्याकाळच्या अंधारात वाट काढत आम्ही जालन्याच्या बाहेर हायवेवर चहा घेण्यासाठी टपरीवर थांबलो. तिथे दोन पोलिस उभे होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरात धार्मिक तणाव निर्माण करणारी काही तरी घटना घडली होती आणि म्हणून त्यांनी आम्हांला लवकरात लवकर जालना शहर सोडण्याचा सल्ला दिला. आम्हीही पटकन घोड्यांना टाच मारुन (म्हणजे गाडीला किक) तासाभरात औरंगाबादेत पोचलो.
चार-पाच दिवस राईड करुन आम्ही खरे तर थकलो होतो. त्या रात्री औरंगाबादच्या तारा पानवाल्याच्या समोर उभे राहून ध्रुवने ओंकारला फोन करुन अंतूर किल्ल्याची माहितीही मिळवली. पण शरीराचे उसासे ऐकून मी अहमदनगरला गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि ध्रुव एकटा दुसर्या दिवशी जाऊन जवळचा दौलताबाद किल्ला पाहून आला.
ध्रुव आणि माझ्यातले राइड कोऑर्डिनेशन सुधरवणारी ही एकूण १५०० किलोमीटरची राईड बरेच काही देऊन गेली. फक्त नजरेने एकमेकांना संमती देणे, खाण्याच्या बाबतीत एकमत होणे, बाइकचे संगीत ऐकणे, वर्षाखेरीस एक मोठा ब्रेक मिळणे, दूरवर बाईकवर असतानादेखील कुटुंबाची आठवण येणे... आणि असेच बरेच काही मिळाले.
काही गोष्टी पाहण्याचे राहून गेले. त्यासाठी परत तेथे जाण्याचा योग घडवायचा असतो. कारण अपूर्णतेतच मज्जा असते.
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
-Robert Frost

23:27
मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंतीचा मोठ्ठा बार करायचा आमचा दरवर्षीचा शिरस्ता. तशी तब्बल वीस दिवसांची पदरात पाडून घेतली होती. त्यात कुडाळचा एक शूट, मुंबईचा एक शूट आणि कुटुंबासमवेत नगर जिल्ह्यात देवदर्शन, नाशिक आणि आसपासच्या परिसरात भ्रमंती केल्यानंतर एक जंगी बाइक राइड करण्याचा प्लान शिजला. किमान हजार किलोमीटर तरी राइड करायचीच असेच मी आणि ध्रुवने ठरवले होते. त्या दृष्टीने प्लॅन आखायला सुरुवात केली. आम्हा दोघांचाही कॉमन इंटरेस्ट म्हणजे जुनी मंदिरे, त्यांची बांधणी, मूर्ती धुंडाळीत जमेल तसे त्यांचे कोडे उलगडत बसणे.
या महत्त्वाकांक्षी आणि ऑफबीट राइड प्लॅनसाठी बाइक्सचे सर्व्हिसिंग, हेल्मेट्स, राइडिंग जैकेट्स, सॅडलबॅग, तंबू अशी सारी तयारी आधीच करुन ठेवली होती.
ध्रुव ठाण्यातली कंपनी सोडून पुण्यात येणार होता, आणि २६ डिसेंबर हा त्याचा शेवटचा दिवस होता.तो उरकून पुण्यात येऊन पुन्हा त्याच दिवशी राइडला निघणे जवळपास अशक्य होते. म्हणून ठाण्याहूनच सुरु होणारा प्लॅन आखला. पहिल्या दिवशी ठाणे-घोटी-अकोले सिद्धेश्वर आणि मुक्काम असा इरादा ठेवून आम्ही पुण्याहून पहाटे साडेपाचलाच गाड्यांना सॅडलबॅग बांधून ठाण्याकडे कूच केले. पुणे-खंडाळा-खोपोली-पनवेल करत ठाण्याला ध्रुवच्या फ्लैटवर सामान टाकले आणि मी आराम केला. दरम्यान त्याने ऑफिसचे शेवटच्या दिवसाचे सारे सोपस्कार उरकले. लवकर लवकर म्हणालो तरीही सारे आटोपून ठाणे सोडायला संध्याकाळचे साडेचार झाले होते. म्हणजे काहीही झाले तरी आमचा आज सिद्धेश्वर मंदिर पाहून मुक्काम करण्याचा बेत फसला होता. अकोल्याच्या आधीच कुठेतरी मुक्काम ठोकावे असा विचार करतच ठाण्याच्या बाहेर पडलो. ठाणे-नाशिक रस्ता तसा चांगला असल्याने व्यवस्थित ८०किमी प्रतितासाच्या वेगाने क्रूज करता येत होते. अंधार पडण्याच्या आम्ही किमान घोटी-बारी यांच्या मधला घाट ओलांडण्याचे मनाशी ठरवले होते. पण घोटीत पोचता पोचता नारायणराव टाटा म्हणाले आणि हायवेवर असतानाच आकाशात संध्याकाळचा लालिमा पसरला.
घोटी नाक्यावर थोडावेळ चहाब्रेक घेऊन आम्ही घाट चढायला सुरुवात केली. रात्र पडल्याने अंधारात हेडलाइटच्या प्रकाशात सावधानतेने घाटांच्या वळणांशी लगट करत आम्ही बारीला पोचलो. मुक्काम करायचाच आहे तर मग रस्त्याच्या आजूबाजूला किंवा एखाद्या शाळेत झोपण्यापेक्षा भंडारदराच्या बॅकवॉटरलाच तंबू लावावा असे दोघांच्या 'एकमताने' ठरवले. दुसऱ्या मताला आमच्या दोघांत फारच कमी वाव मिळत असतो. तर ते असो... मुक्काम ठरला आणि आम्ही साडेआठच्या सुमारास शेंडीला पोचलो. रात्री अंधारात जेवणाची सोय शोधली, अर्थातच कोंबडी सोबत होती, पण ती ताटात. जेवण झाल्यावर मुक्कामाची जागा नक्की करुन सामान सोडले आणि पुन्हा एकदा आमच्या दोघांत आइस्क्रीम खाण्यावरुन एकमत झाले. हिवाळ्यात रात्री साडेदहा वाजता, ९-१० डिग्रीला आम्ही भंडारदरा सारख्या हिलस्टेशनला आइस्क्रीम शोधत फिरत होतो आणि गावकरी आमच्यावर हसत होते. शेवटी अर्धातास फिर फिर फिरलो तेव्हा कुणीतरी आमची कीव येऊन सांगितले एमटीडीसीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला आइस्क्रीम मिळेल. तिथे जाऊन पाहिले तर तिथेही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि आइस्क्रीम नसल्याची सुवार्ता दिली. पण हार मानू ते आम्ही दोघे कसे. फायनली आइस्क्रीमचे डोहाळे पावकिलो श्रीखंडावर भागवले आणि त्याच्या गुंगीने जलाशयाच्या काठावर सुखाने ताणून दिली.
सकाळी पक्ष्यांच्या आवाजानेच जाग आली. डिसेंबराची थंडी आणि त्यात भंडारदर्यासारख्या ठिकाणी जलाशयाची सोबत म्हणजे आपोआपच अंघोळीचा विचार गळून पडला. जलाशायच्या पार्श्वभूमीवर सुर्योदय आणि सकाळची लालिमा नभी पसरली होती. त्या दर्शनाने उत्साह दुणावला. आजचा टप्पाही तसा मोठाच होता. अकोले, ताहाकारी, सिन्नर एवढे सगळे पाहून कोपरगावशेजारील कोकमठाण इथे पोचायचे होते. आमचा फक्त बाईक चालवण्याचा निर्धार आणि अनोळखी गाव म्हणजे मुक्कामाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सुर्यास्तापूर्वीच पोचणे आवश्यक होते. ‘शंभो’ची गोळी घेऊन. तोंडं खंगाळली, बॅगा भरुन बाईक्सला आवळल्या आणि शेंडी गावातल्या एसटी स्टॅंडजवळील प्रसिद्ध गवती चहाच्या टपरीपाशी बाईक्स उभ्या केल्या. शाळकरी पोरं, युनिफ़ॉर्मातले कॉलेज कुमार सकाळच्या पहिल्या `यष्टी’ची वाट पाहत असताना आम्ही गवती चहा पिऊन थंडी पिटाळण्याचा प्रयत्न करत होतो. चहावाल्या मामांच्या बोहनीच्या वेळी प्रत्येकी एक पारलेजीचा पुडा आणि सोबत अडीच ग्लास चहा पिऊन झाला तेव्हा अर्धा सेल्सिअसने गरम झाल्यासारखे वाटले तेव्हा कुठे आम्ही पुन्हा बाईकला टांग मारली. पुढील टप्पा होता अकोले, अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे एक गाव.
शेंडी-राजूर-अकोले असा वळणावळणांचा दुतर्फा सुबत्ता असलेल्या उसाच्या शेतांच्या मधून जाणारा घाटदार रस्ता आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरु झालेली लगबग. रानातून घुमणारे मोरांचे आवाज, सोनकोवळ्या उन्हाला बसलेली गावकरी मंडळी, आसपासच्या गोठ्यांमधून चाललेली धारा काढण्याची लगबग, घराबाहेरील चुलींमधून उठणारी धुराची वलये, गावच्या कट्ट्यावर दूधगाडीची वाट पाहत बसलेली मंडळी, त्यांचे ऍल्युमिनिअमचे आणि काही शेंदरी रंगाचे प्लास्टिकचे कॅन, राखुंडीने दात घासत बसलेली पोरंसोरं असं सारं दृश्य डोळ्यांत साठवत आमच्या बाईक्स रस्ता कापत अकोल्याच्या दिशेने दौडत होत्या. त्यात आमचे रायडिंगचे पेहराव पाहून माना वळवून पाहणारे गावकरी आरशात दिसत होते. अकोल्यात पोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले असतील. चहाचे अजून एक आवर्तन करुन घेतले आणि नाश्त्याचा बेत थोडा पुढे ढकलत आधी सिद्धेश्वराचे मंदिर पाहण्याचा दोघांचाही बहुमताने निर्णय झाला. आम्ही दोघे असतो तेव्हा निर्णय बहुमतानेच होत असतो. जेव्हा दोघांची मते विरुद्ध दिशेला पडतात तेव्हा निर्णय कायम खाण्याच्या बाजूने लागतो ;-)
सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास विशेष सायास पडले नाहीत. बर्यापैकी लोकांना ठाऊक होते. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. गाड्या नीट पार्क करुन ठेवल्या. कॅमेरे काढून एकदम कुणाला भिववून टाकण्याऐवजी जरा आसपासचा आढावा घेतला.
पुजारी आणि दर्शनाला आलेल्या भक्तगणांशी गप्पा मारुन मंदिरात कुठे आणि काय काय आहे त्याची माहिती जाणून घेतली. एकंदर परिस्थिती पाहून थोडेफार समाधान वाटले. मंदिर कुठेही ऑईलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रीटचे आधार न लावता नीट जपले होते. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरु होता आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला होता.
खिडक्यांमधून डोकावले असता तिथे मोठा शिल्पखजिना आहे जे जाणवत होते. त्यामुळे काहीही करुन कुलूप उघडून आत जायला मिळाले पाहिजेच असे मनाशी ठरवले. मंदिराच्या पुजार्याकडे चावी असते आणि ती कुणाच्या तरी शिफारशीवर मिळेल अशी माहिती समजल्यावर आम्ही आसपास दर्शनास येणारे भक्त हेरु लागलो. एक जरा गावात वजन आहे असे वाटणारी व्यक्ती दिसलीच. रासने मामा. कॅमेरे पाहून त्यांचेही कुतूहल जागे झालेच होते. त्यांच्याशी बोलून आमच्या दौर्याचा कार्यक्रम थोडक्यात सांगितला, आम्हांला माहिती असलेल्या काही मूर्तींची माहिती त्यांना करुन दिली. आणि मग हळूच सभामंडपाच्या चावीचा विषय काढला. त्यांनीही तत्काळ पुजार्याला कुलूप उघडून देण्यास सांगितले. आमच्यासोबत पुन्हा नव्या नजरेने सभामंडप पाहिला. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्यभागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे दिसत होता.
रासने मामांनी आम्ही कसले फोटो काढतोय हे कुतूहलाने पाहिले, कौतुक केले. आणि बोलता बोलता गावातील आणखी एका पुरातन गंगाधरेश्वर मंदिराचा उल्लेख केला. मग तो धागा आम्ही कसला सोडतोय? अधिक माहिती विचारुन घेतली आणि त्यांनाच आम्हांला तिथे सोडण्याची गळ घातली. रासने मामा आम्हांला त्या मंदिरात घेऊन गेले नसते तर आम्हांला खरेच ते सापडले नसते. गावातल्या अगदी लहानशा गल्लीत घरासारखा दिसेल असा दरवाजा असलेले मंदिर असले तरी आतमध्ये मात्र प्रशस्त होते. पुण्यातील पोतनीस कुटुंबाच्या खाजगी मालकीचे असलेले हे मंदिर अलीकडच्या काळात म्हणजे साधारण पेशवाईत बांधलेले आहे. अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे, फरसबंदी प्रशस्त आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे.
गंगाधरेश्वरानंतर आता वेध लागले होते पोटार्थी क्षुधेश्वराचे. त्यामुळे तडक मोर्चा अगस्ती कॉलेजसमोरच्या चौधरी मामांच्या ‘हाटेला’कडे वळवला. तिथे तर्रीबाज मिसळपाव, डिसेंबराच्या थंडीत घाम काढणारा रस्सावडा असं काही चापून घेतले आणि त्याला वरुन चहाचा तडका लावला. पुढचा टप्पा होता ताहाकारी जगदंबा मंदिर. देवठाणमार्गे ताहाकारीला जाणारा रस्ता तसा थोडा खराबच होता. त्यात आता ऊनही चढायला लागले होते. देवठाण-सावरगावपाटच्या दरम्यान डावीकडे एक सुंदर जलाशय दिसला. हिवाळ्यात सोनेरी झालेली गवताळ कुरणे, काढणीला तयार असलेल्या गव्हाची शेते आणि त्यांच्या पलीकडे निळाशार जलाशय डोळे निववत होता. त्या जलाशयापासून वीसच मिनिटांवर ताहाकारी समोर दिसू लागले. मंदिर मोठे सुरेख. या मेगाराईडसाठी ध्रुवने जागाच अशा शोधून काढल्या होत्या की हरएक मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटावे. पण या मंदिरात मात्र तथाकथित जीर्णोद्धराच्या नावाखाली गावातल्या प्रगतीशील (?) कारभार्यांनी कॉंक्रीटचे खांब आणि वरुन तसलेच घुमट उभारले होते. त्यामुळे गावात शिरताना ’आढळा’ नदीच्या अलीकडून पाहूनही हीच ती मंदिरे अशी खात्री पटत नव्हती. बाईक्स पार्क करुन आधी थंड पाण्याने शिणवटा घालवला आणि मंदिरात प्रवेशते झालो. मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले होते.
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्या॔नी बा॔धलेले आहे. ह्या मंदिराची बा॔धणी हेमाडपंथी पध्दतीची असून मंदिरा बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत.
सभामंडपाच्या छताचा मी आजवर पाहिलेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरुपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेलं छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेलं आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. आजही उत्तम अवस्थेत आहे. सभामंडपाच्या बाह्यभागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून मंदिरसमूहाच्या बाह्यभिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली असल्याने कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची कॉंक्रीटची बेढब शिखरे चढवली गेली. मंदिराच्या भागातले ऑईलपेंटचे रंगकाम पदोपदी दाताखाली मिठाचा खडा चावला जावा असे नजरेत खुपते. परंतु सध्या पुरातत्त्वखात्याने मंदिर ताब्यात घेतल्याने पुढील कॉंक्रिटीकरण थांबले आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू समजायची.
ताहाकारीचे हे मंदिर पाहून आम्हाला पुढे पोचायचे होते सिन्नरला. प्रसिद्ध शिवपंचायतन बघायला. ताहाकारी-ठाणगाव-आशापूर-दुबेरे खिंड आणि सिन्नर हा रस्ता छान होता. बाईक्स पळवायला मज्जा आली. दुबेरे खिंडीत दुतर्फा वनविभागाने वृक्षारोपण केल्याने राईड एकदम सुसह्य झाली. पुढे दुबेरेच्या जवळच्या घाटात पाणी-ब्रेक आणि फोटोब्रेक घेऊन गाड्या बुंगवत आम्ही सिन्नरमध्ये पोचलो तेव्हा आम्हांला जाणीव झाली की सकाळपासून फक्त एकदाच खाणं झालंय. सिन्नरच्या हायवेवर वडापाव आणि चहा रिचवून आम्ही गोंदेश्वर मंदिर शोधण्याच्या कामी लागलो. खरंतर कुणाला विचारलं असतं तर लगेच सापडले असते. पण एक्श्ट्रा आत्मविश्वासाने गाड्या बुंगवून आम्ही बारगावच्या दिशेने पाचेक किलोमीटर पुढे गेलो आणि पुढे काहीच दिसेना तेव्हा वाट चुकल्याचा साक्षात्कार आम्हांस झाला. थांबून एके ठिकाणी जरा चौकशी केली तेव्हा समजले की मुख्य सिन्नर गाव सोडून येण्याची काहीच गरज नव्हती. तिथेच पंचायत समिती ऑफिसजवळून एक रस्ता आतमध्ये दोनशे मीटरवर गेला की मंदिर दिसेल. परत फिरलो आणि आता कुणालाही न विचारता थेट मंदिराच्या दारात गाड्या उभ्या केल्या. येताना एका पंपावर ध्रुव त्याच्या KTM Duke390ची टाकी फुल करुन आला. तिची टँक रेंज कमी असल्याने मिळेल तिथे आम्ही ती फुल करुन घेत होतो. दाराशीच गाड्या लावून ते मंदिर पहावयास निघालो. एवढे भव्य मंदिर मी प्रथमच पाहत होतो.
गोंदेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य सप्तस्तरीय (म्हणजे सात distinct थरांमध्ये असलेली रचना) मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. या मंदिराची रचना भूमिज शैलीत केलेली आहे. म्हणजेच मुख्य शिखराच्याच आकाराची लहान लहान शिखरे एकावर एक अशी रचना करत मंदिराचे शिखर बनवले जाते. मुख्य शिखर आणि त्याचे घटक असलेली उपशिखरे यांतील साम्य अतिशय लक्षवेधक असते. या रचनेलाच शिखर-शिखरी रचना असेही म्हणतात. सभामंडपातील खांब नक्षीने शिल्पालंकृत असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरात देखभालीचे काम चालू असल्याने तिथे वाळू-सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याचा राडा पडला होता. त्यामुळे आम्हांला ते व्यवस्थित पाहता आले नाही. आता खास त्यासाठी सिन्नरची वारी होईलच.
दुपारचे (की संध्याकाळचे) चार वाजून गेले होते. उन्हं आणि पोटातल्या वडापावचा डोलारा कलायला सुरुवात झाली होती. सकाळपासून काहीच नीट असे खाल्ले नव्हते. म्हणून आता सिन्नर-कोपरगाव रस्त्याचे एखादे चांगले हॉटेल पाहून वडा, पाव, मिसळ, भजी सोडून काहीतरी साऊथ इंडियन डोसा-उत्तप्पा-इडली-मेदूवडा असे काही पदरात पाडावे म्हणून रस्त्याने पाहत निघालो होतो. पण चार हॉटेलांत चौकशी करुनही कुठेच तसले काही मिळालं नाही. रस्ताही आमची परीक्षा पाहत होता. सुरुवातीचा पंचवीस किलोमीटरचा सुसाट रस्ता संपल्यावर काम सुरु असलेला, असंख्य डायव्हर्जन असलेला आणि फुटाफुटाला फुटाफुटाचे खड्डे असलेला रस्ता आमचा कस लावत होता. दिवसभराच्या राईडमुळे अंग आंबले होते आणि त्यात हा असा रस्ता आमच्या जिवावर उठलेला. शेवटी पाथरे गावाशी जिथे शिर्डी आणि पुण्याहून येणारे रस्ते एकत्र येतात तिथे साईराम, साईशाम, साईलीला, साईकृपा, साई अमुक तमुक अशी हॉटेल्स दिसली. तेव्हा थोडी आशा निर्माण झाली आणि लगेच धुळीसही मिळाली. जरा बऱ्या दिसणाऱ्या हॉटेल वजा टपरीवर थांबलो. पण तिथेही वडापाव, मिसळ असलंच उपलब्ध होते. शेवटी नाइलाज को क्या इलाज म्हणत पुन्हा वडापाव पोटात ढकलून कोपरगावच्या दिशेने दौड मारली. कोपरगाव हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार. तिथूनच पुढे मराठवाडा आणि विदर्भात रस्ते जातात. गोदावरी नदीच्या तीराशी असलेले कोकमठाणचे शिवमंदिर हे कोपरगावपासून साधारण १३ किलोमीटरवर आहे. संध्याकाळ होत आल्याने आधी मंदिर गाठून मुक्कामाची सोय लावणे आणि मगच रात्रीच्या जेवणाकडे पाहणे असे ठरले. मंदिर परिसरात पोचलो तेव्हा किमान चाळीस जणांचा एक ग्रुप मंदिराच्या परिसरात 'साइटसीइंग' करत होता. त्यामुळे आम्ही ते लोक जाईपर्यंत आवारातच बसकण मांडली. आवार तसे फरसबंदी. तंबू लावायला अत्यंत योग्य. म्हणून जागा हेरुन ठेवली आणि त्या मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या संजय नावाच्या तरुणाला तशी कल्पना दिली. त्याने बाहेर नका झोपू, रात्री फार थंडी पडेल असा सल्ला दिला. आमचे तंबू आणि स्लीपिंग बॅग पुरतील असे सांगूनही शेवटी तो म्हणाला जास्त थंडी वाजली तर दार उघडून मंदिरात जाऊन झोपा, मी कुलूप न लावता फक्त कडी घालून जाईन. बहुधा त्याला तिथल्या थंडीबद्दल जरा जास्तच खात्री होती.
अंधार पडला आणि आमच्या पोटात थंडी जरा जास्त थरथरु लागली. म्हणजेच आम्हांला भूक लागल्याचा साक्षात्कार घडला. खाण्याची बाब असल्याने एकमताचा प्रश्नच नव्हता. जरा आसपास चौकशी करता असे समजले की शिर्डी रोडवर स्वस्तिक पॅलेस नावाचे चांगले हॉटेल आहे. सॅडलबॅग गाडीलाच होत्या. तशाच मोटरसायकल पंधरा किलोमीटरवरच्या स्वस्तिककडे दामटल्या. त्या छोट्याशा प्रवासातही थंडीने आपले रंग दाखवले आणि मंदिरात झोपण्याबाबत आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले ;-)
त्या रात्री स्वस्तिक पॅलेसमध्ये प्रत्येकी दोन कडक कॉफी, प्रत्येकी तीन तीन रोट्या, आणि काहीतरी व्हेज भाज्या (व्हेज असल्याने आठवण्याचा संबंधच नाही) एवढे(च) खाल्ले. आमचे जेवण संपत आले तेव्हा सगळेच वेटर प्रत्येक टेबलवर पांढऱ्या रंगाची घमेली नेऊन ठेवताना दिसत होते. आणि चारेक लोक एक घमेले तोडून खात होते. त्याने आमचे कुतूहल चाळवले. वेटरला विचारता ती या हॉटेलची स्पेशालिटी रुमाली खाकरा असल्याची माहिती मिळाली आणि तद्सोबत वेटरला आधी न सांगितल्याबद्दल मनातून चार शिव्या. तर ते असो, त्या घमेल्यांसाठी कोपरगावला पुन्हा जावे लागणार.
बाहेर तद्दन भिकार क्वालिटीचे मघई पान रवंथ करताना स्वस्तिक हा पॅलेस निवासाचीही व्यवस्था करत असल्याचे वाचले आणि बाहेर जेवण झाल्यावर वाजणारी थंडी पाहून पुन्हा आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले आणि एकमेकांना स्माइल दिले. पुढच्या पाचव्या मिनिटाला आम्ही अतिशय किफायती असे डील ठरवून खोलीत तंगड्या वर करुन टीव्हीसमोर लोळत पडलो होतो. दोन दिवस अंघोळ मिळाली नव्हती. त्याची खरं तर अजिबातच खंत नव्हती, पण उगाचच एकमेकांना त्रास नको म्हणून रात्री गरम पाणी आणि तेही शॉवरमधून उपलब्ध झाल्याने मस्त कडकडीत पाण्याने स्नान उरकून घेतले. ते झाल्यावर अंग असे काही मोकळे झाले की विचारायची सोय नाही. जी काही सुरेख झोप लागली ती एकदम सकाळीच जाग आली.
21:06
मेघविभोर भोरगिरी
यंदा पुण्यात पावसाचे नुसतेच ढग दाटून येतायेत. उगा आपला एखादा थोडासा शिंपडून गेलाय. कैक मुहूर्त चुकवून सगळ्यांचे अंदाज फोल ठरवून तो अजूनही रुसलाच होता. एवढी पावसाची बेक्कार-खवट-कचकावून वाट कधीच नव्हती पाहिली. पण त्याला काही जोमदार पाझर फुटत नव्हता. नुसतंच दाटून यायचं, हवेच्या फुंकरीसरशी पुन्हा मेघ जुनेर कापडासारखे विरायचे. म्हणून आता त्याला भेटायला आपणच एखादा डोंगर जवळ करावा सोबत लहानसा ट्रेकही होईल, एखादी रात्र तपस्वी सह्याद्रीच्या निवार्याला जावं, आडोशाच्या जागेतून ढगांच्या दिंड्या पहाव्यात, चार घास स्वतः रांधून खावेत, रात्री उशिरापर्यंत पावसाच्या पानगळींच्या पार्श्वसंगीतावर निवांत गप्पा झोडाव्यात, सकाळी उठून ठेवणीतलं आलं घालून फर्मास चहा करावा आणि थोडक्या दिवसांसाठीची नवीन ऊर्जा गाठीला जोडावी म्हणून आम्ही जागा शोधायला लागलो. अजून ट्रेकचे दिवस सुरु झाले नसल्याने फारसा रांगडा ट्रेक करायची इच्छा नव्हती. त्यामुळे थोडी सोप्यातली जागा आणि वर निवारा असावा अशी माफक अपेक्षा होती. त्यात काजव्यांचे दिवस असल्याने ते दिसले तर बोनस असाही एक हालकट हेतू होताच.
सुरुवातीला मी आणि जिप्सी प्रिन्सेस श्रद्धा दोघेच होतो. त्यात मॅडम आदल्या दिवशी रात्री मुंबईहून बारा घरी वाजता येऊन बेत डळमळीत करणार होत्या. पण ती मध्यरात्री आल्यानंतरही आपण जायचंच असा मेसेज करुन कन्फर्मेशन दिलं आणि मी निवांत झालो. शनिवारी दुपारी निघायचं होतं आणि सकाळी प्राची आणि गणेश अशा अजून दोन भिडूंना मेसेज केले. हाय नाय हाय नाय करत दोघेही शेवटी तयार झाले. (©भटकंती अनलिमिटेड) पिकप पॉइंट्स ठरले, कुणी काय घ्यायचं याची जंत्री झाली आणि सॅक भरायला सुरुवात केली. आपला काळा चित्ता तयार होताच. गणेश त्याची सायलेन्सर काढलेली फटफटी घेऊन आला आणि गेटच्या आत पार्क केली. शिवाजीनगरला सिमला ऑफिस चौकात श्रद्धा पोटावर आणि पाठीवर अशा भल्यामोठ्या दोन बॅगा घेऊन गाडीत बसायला तयार होती आणि आम्ही तिच्यासमोर सिग्नलला बिनकामी व्हीआयपी ताफा जाण्याची वाट पाहत होतो. गाडी चौकात समोर दिसूनही तिचा अजब पुतळा झालेला आम्ही पाहिला. शेवटी व्हीआयपी ताफ्यांसोबतचा दहा मिनिटांचा स्टॅच्यू गेम झाल्यावर तिला गाडीत घेतले आणि पुढे नाशिक फाट्याला प्राचीला. (तिच्या) नियमाप्रमाणे ती अर्धा तास लेट करुन तिने तिचं रेकॉर्ड कायम ठेवले होते. तिथेच विकास आणि अमित भेटले, तेही भोरगिरीलाच निघाले होते, पण रात्री परत येण्याच्या प्लॅनवर.
नाशिक रोडच्या नेहमीच्या ट्राफिकला नेहमीच्या आणि काही ठेवणीतल्या शिव्या देऊन आणि टोल भरुन मोशी टोलनाका पार केला आणि रस्त्याची अवस्था, चाकणचा ट्राफिक जाम, उलट येणारे ट्रक अनुभवून असं वाटलं की कदाचित राजगुरुनगर नाक्यावर टोल परत मिळेल. पण तशी काही प्रोव्हिजन दिसली नाही. थोडं निराश झालेलं मन पुन्हा आनंदित झालं ते कोपर्यावरच्या वजडी-पावचा बोर्ड बघून.
आता आमच्या वजडीपावपायी सगळा रस्ता कशाला खोळंबून ठेवायचा म्हणून तसाच अर्धाएक किलोमीटर पुढे गेलो. पण चैन पडेना ना भाऊ. मग काय दिली जागा पाहून गाडी साईडला लावून आणि आलो अर्धा किमी चालत उलटं. त्याच्या समोर बेकरी, मग काय उद्याच्या गुहेतल्या चहासोबत हवीत म्हणून बिस्किटे घेतली. तब्बल दोन दोन पेस्ट्रीज खाल्ल्या आणि वजडीपाव (थोडं सात्त्विक हवं म्हणून भुर्जीपाव असं बरंच काय काय दाबून गाडीकडं परतलो. पण श्रद्धाला अजूनही भजी हवी होती आणि मला चहा. त्यात अजून पंधरा मिनिटे गेले. आता साडेपाच झाले होते. (©पंकज झरेकर) चासचा रस्ता धरला आणि चासकमान प्रकल्पाच्या आकसलेल्या डोहाच्या कडेने पावसाने आता लवकर येणे कसे गरजेचे आहे आणि आता जलाशयात किती टक्के पाणीसाठा असावा यावर गहन खल करत वाडा-डेहणे-शिरगाव अशी एकामागून एक गावं मागे टाकत "भोरगिरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे" पर्यंत येऊन पोचलो.
वातावरण आता मात्र एकदम खुलले होते. चहूबाजूंनी ढगांनी वेढून टाकले होते. भीमाशंकराच्या शिवलिंगाला अभिषेक घालून आलेले ढग भोरगिरीवर छत धरुन होते. छान सुपरसॉनिक वारा सुटला होता. पूर्वी झंज राजाने बांधलेल्या मध्ययुगीन मंदिराचा आता जीर्णोद्धाराच्या नावाखाली ‘उद्धार’ करुन टाकला आहे. थोडी खंत वाटणारच. अंधारुन यायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने कॅंप कुठं लावायचा यावर निर्णय होणे आवश्यक होते. गावाच्या अक्षातून घालत गाडी एकदम भोरगिरीच्या पायथ्याशी असलेल्या शेवटच्या घराच्याही पल्याड लावली आणि उतरुन सगळ्यांनी पहिली धूम करवंदाच्या जाळीकडे ठोकली. सीझन संपत आला असला तरी बर्यापैकी करवंदं अजून शिल्लक होती. एवढ्यात पावसाची सर आली आणि सार्यांची धावपळ झाली. घाईत गाडीत येऊन बसलो आणि आता कुठं तंबू लावायचा यावर पुन्हा एकदा राउंडटेबल झाली. माझ्या एकट्याच्या ‘बहु’मतावर गुहेत जाऊन मुक्काम करावा असे ठरले आणि सगळे सामान पाठीवर लादून आस्तेकदम सुरु झाले. बरेच दिवस ट्रेकमध्ये खंड पडल्याने आणि कॅमेरा इक्विपमेंट, तंबू, जड ट्रायपॉड एवढं(च) सामान असल्याने माझी जरा फेफे झाली, पण पुढच्या दमात गुहा गाठलीच.
गुहा मोठी सुरेख. एकात एक तीन भाग, चार खांबांवर तोलून धरलेली, अंतःपुरात शिवलिंग, मधल्या भागात भुईशी कोरलेले कमलदल, बाह्यभागात रिकामी सपाट जागा, लाकडी खांब उभे करण्याच्या उखळासारख्या जागा, कोपर्यात एक लहानशी खोली वाटावी अशी पाषाणात कोरलेली देवडीसारखी जागा. राहण्यास उत्तम जागा. जरा आराम आणि स्थिरस्थावर करुन झाल्यावर श्रद्धाने सुंदर कॉफी केली आणि कॉफीचे ग्लास हातात धरुन आम्ही गुहेच्या तोंडाशी गारव्याला येऊन बसलो. समोर अंधारुन आले होते. भीमाशंकरहून आलेले ढग समोरच्या खोर्यात पसरले होते. (©पंकज झरेकर)असंख्य काजवे समोरच्या दरीतून लुकलुकत वर येत होते. काय सुंदर अनुभव होता! निवांत बसलो असतानाच मांडीखाली काहीतरी वळवळ झाली म्हणून हात घातला तर एक खेकडा हाती लागला. पकडून भाजण्याचा बेत करुन त्याला पकडत असतानाच तो पोटात पिल्लांना घेऊन चाललाय हे ध्यानी आले आणि मग त्याला सोडून दिले. एवढ्यात खाली अंधारातून थोडा गलका ऐकू आला. दोनतीन हौशे-नवशे-गवशे ट्रेकर अंधारात रस्ता शोधत होते आणि तितक्यास आत्मविश्वासाने रस्ता चुकले होते. त्यांना मार्गदर्शन करुन आणि हात देऊन गुहेशी आणले आणि फक्त तीन मिनिटे टेकून ते खाली परतले. "हम कॅंपिंग का सामान लेके आये है" असं उत्तर ऐकून आम्ही ताडलेच की हे इथं ‘झिंगाट’ होणार आहेत आणि आम्ही त्यांना ते करु देणार नव्हतो. म्हणूनच त्यांनी पाय काढता घेतला असावा. गुहेच्या बाजूला पथारी अंथरुन बराच वेळ गप्पा झोडून झाल्या तेव्हा आणखी एक असाच ग्रुप (झिंगाट्गिरी वगळता) पुन्हा आत्मविश्वासाने रस्ता चुकून वर आले. त्यांनाही अर्ध्यावर जाऊन वर घेऊन आलो. तेही पाच मिनिटांच्या वर तिथे थांबले नाहीत.
रात्र आणि गप्पांना रंग चढले आणि आम्ही जेवण रांधायच्या तयारीला लागलो. कुणी तांदूळ धुतोय, कुणी कांदा चिरतोय, कुणी कोथिंबिर निवडतोय. सगळं एका पातेल्यात घालून अशी काय फर्मास खिचडी तयार झाली म्हणता, की काय सांगता. कच्चा कांदा कापून त्या वाफाळत्या खिचडीसोबत खाताना आपल्या पुण्यात आणि बाकी अनेक ठिकाणी असलं भारी जेवण काय कुठल्या हॉटेलात मिळत नाही असं घासागणिक जाणवत होतं. जेवणं उरकून भांडी आणि इतर सामानाची आवराआवर केली तेव्हा अकरा वाजत आले होते. पलीकडून भोरगिरी गावातल्या मंदिरावरचा सीएफएल आणि काही खांबांवरचे मिणमिणते दिवे फक्त गावाच्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत होते. जेवणं आवरल्याने आम्ही काहीवेळ फोटो काढण्याचे प्रयत्न केले आणि नंतर सगळं सोडून पुन्हा गप्पा मारायला म्हणून पुन्हा गुहेत निवांत पथार्या अंथरुन बसलो. भवताल फारच सुरेख जमून आला होता. चौदाशीचा चांदवा ढगांच्या पडद्याआडून प्रकाश पाझरीत होता. त्याच्या प्रकाशात मेघांची दिंडी घाटावर चाल करुन निघाली होती. सृष्टीच्या नवजीवनाचे संदेश घेऊन. त्यांच्या तालावर बेडकांचे सूरावर सूर उमटत होते. काजव्यांची प्रकाशयोजना त्याला शब्दशः चार(शे) चांद लावत होती. गुहेतल्या सार्या लाईट्स बंद करुन आम्ही त्या मैफिलीत तल्लीन झालो होतो. मध्यरात्र सरुन तीनच्या सुमारास पहाटेची चाहूल लागली तशी त्या गारव्याने आम्हांला झोप लागून आम्ही या जिवंत स्वप्नांच्या दुनियेतून त्या आभासी स्वप्नांच्या दुनियेत हरवलो होतो.
पहाटे उजाडता कधीतरी जाग आली ती थंडगार हवेने आणि शीळकरी कस्तुराच्या (whistling thrush) आवाजाने. एवढा सुरेल आवाज की रोजच्या घड्याळाच्या गजराने रोज चडफडत उठणारे आम्ही त्या सकाळी अतिशय प्रसन्नचित्तानं उठलो. सकाळी गुहेत एक भक्त तिथल्या पुजार्याला म्हणून चहा घेऊन आला होता. पण पुजारी लवकर खाली उतरुन गेल्याने आपसूकच तो आमच्या पदरात पडून पवित्र झाला. आवराआवरी करुन वर आलेल्या भक्तांशी गप्पा मारुन आम्ही किल्ला उतरुन ओढ्याच्या रस्त्याने पुन्हा पायथ्याला आलो. शिरगाव फाट्याला येऊन कढईतून प्लेटमध्ये असा शिर्के वडापाव दाबून खाऊन परतीचा मार्ग धरला.
हा ट्रेक लक्षात राहिला तो खास गुहेतून अनुभवलेल्या ढगांच्या दिंडीमुळे, काजव्यांच्या चमकीमुळे, आणि रात्रभर मारलेल्या गप्पांमुळे! ही शिदोरी आठपंधरा दिवस पुरेल आता... तोवर होईलच पुढल्या भटकंतीचं नियोजन!
सुरुवातीला मी आणि जिप्सी प्रिन्सेस श्रद्धा दोघेच होतो. त्यात मॅडम आदल्या दिवशी रात्री मुंबईहून बारा घरी वाजता येऊन बेत डळमळीत करणार होत्या. पण ती मध्यरात्री आल्यानंतरही आपण जायचंच असा मेसेज करुन कन्फर्मेशन दिलं आणि मी निवांत झालो. शनिवारी दुपारी निघायचं होतं आणि सकाळी प्राची आणि गणेश अशा अजून दोन भिडूंना मेसेज केले. हाय नाय हाय नाय करत दोघेही शेवटी तयार झाले. (©भटकंती अनलिमिटेड) पिकप पॉइंट्स ठरले, कुणी काय घ्यायचं याची जंत्री झाली आणि सॅक भरायला सुरुवात केली. आपला काळा चित्ता तयार होताच. गणेश त्याची सायलेन्सर काढलेली फटफटी घेऊन आला आणि गेटच्या आत पार्क केली. शिवाजीनगरला सिमला ऑफिस चौकात श्रद्धा पोटावर आणि पाठीवर अशा भल्यामोठ्या दोन बॅगा घेऊन गाडीत बसायला तयार होती आणि आम्ही तिच्यासमोर सिग्नलला बिनकामी व्हीआयपी ताफा जाण्याची वाट पाहत होतो. गाडी चौकात समोर दिसूनही तिचा अजब पुतळा झालेला आम्ही पाहिला. शेवटी व्हीआयपी ताफ्यांसोबतचा दहा मिनिटांचा स्टॅच्यू गेम झाल्यावर तिला गाडीत घेतले आणि पुढे नाशिक फाट्याला प्राचीला. (तिच्या) नियमाप्रमाणे ती अर्धा तास लेट करुन तिने तिचं रेकॉर्ड कायम ठेवले होते. तिथेच विकास आणि अमित भेटले, तेही भोरगिरीलाच निघाले होते, पण रात्री परत येण्याच्या प्लॅनवर.
नाशिक रोडच्या नेहमीच्या ट्राफिकला नेहमीच्या आणि काही ठेवणीतल्या शिव्या देऊन आणि टोल भरुन मोशी टोलनाका पार केला आणि रस्त्याची अवस्था, चाकणचा ट्राफिक जाम, उलट येणारे ट्रक अनुभवून असं वाटलं की कदाचित राजगुरुनगर नाक्यावर टोल परत मिळेल. पण तशी काही प्रोव्हिजन दिसली नाही. थोडं निराश झालेलं मन पुन्हा आनंदित झालं ते कोपर्यावरच्या वजडी-पावचा बोर्ड बघून.
आता आमच्या वजडीपावपायी सगळा रस्ता कशाला खोळंबून ठेवायचा म्हणून तसाच अर्धाएक किलोमीटर पुढे गेलो. पण चैन पडेना ना भाऊ. मग काय दिली जागा पाहून गाडी साईडला लावून आणि आलो अर्धा किमी चालत उलटं. त्याच्या समोर बेकरी, मग काय उद्याच्या गुहेतल्या चहासोबत हवीत म्हणून बिस्किटे घेतली. तब्बल दोन दोन पेस्ट्रीज खाल्ल्या आणि वजडीपाव (थोडं सात्त्विक हवं म्हणून भुर्जीपाव असं बरंच काय काय दाबून गाडीकडं परतलो. पण श्रद्धाला अजूनही भजी हवी होती आणि मला चहा. त्यात अजून पंधरा मिनिटे गेले. आता साडेपाच झाले होते. (©पंकज झरेकर) चासचा रस्ता धरला आणि चासकमान प्रकल्पाच्या आकसलेल्या डोहाच्या कडेने पावसाने आता लवकर येणे कसे गरजेचे आहे आणि आता जलाशयात किती टक्के पाणीसाठा असावा यावर गहन खल करत वाडा-डेहणे-शिरगाव अशी एकामागून एक गावं मागे टाकत "भोरगिरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे" पर्यंत येऊन पोचलो.
तुमच्यासाठी भोरगिरीहून मोबाईल वॉलपेपर |
गुहा मोठी सुरेख. एकात एक तीन भाग, चार खांबांवर तोलून धरलेली, अंतःपुरात शिवलिंग, मधल्या भागात भुईशी कोरलेले कमलदल, बाह्यभागात रिकामी सपाट जागा, लाकडी खांब उभे करण्याच्या उखळासारख्या जागा, कोपर्यात एक लहानशी खोली वाटावी अशी पाषाणात कोरलेली देवडीसारखी जागा. राहण्यास उत्तम जागा. जरा आराम आणि स्थिरस्थावर करुन झाल्यावर श्रद्धाने सुंदर कॉफी केली आणि कॉफीचे ग्लास हातात धरुन आम्ही गुहेच्या तोंडाशी गारव्याला येऊन बसलो. समोर अंधारुन आले होते. भीमाशंकरहून आलेले ढग समोरच्या खोर्यात पसरले होते. (©पंकज झरेकर)असंख्य काजवे समोरच्या दरीतून लुकलुकत वर येत होते. काय सुंदर अनुभव होता! निवांत बसलो असतानाच मांडीखाली काहीतरी वळवळ झाली म्हणून हात घातला तर एक खेकडा हाती लागला. पकडून भाजण्याचा बेत करुन त्याला पकडत असतानाच तो पोटात पिल्लांना घेऊन चाललाय हे ध्यानी आले आणि मग त्याला सोडून दिले. एवढ्यात खाली अंधारातून थोडा गलका ऐकू आला. दोनतीन हौशे-नवशे-गवशे ट्रेकर अंधारात रस्ता शोधत होते आणि तितक्यास आत्मविश्वासाने रस्ता चुकले होते. त्यांना मार्गदर्शन करुन आणि हात देऊन गुहेशी आणले आणि फक्त तीन मिनिटे टेकून ते खाली परतले. "हम कॅंपिंग का सामान लेके आये है" असं उत्तर ऐकून आम्ही ताडलेच की हे इथं ‘झिंगाट’ होणार आहेत आणि आम्ही त्यांना ते करु देणार नव्हतो. म्हणूनच त्यांनी पाय काढता घेतला असावा. गुहेच्या बाजूला पथारी अंथरुन बराच वेळ गप्पा झोडून झाल्या तेव्हा आणखी एक असाच ग्रुप (झिंगाट्गिरी वगळता) पुन्हा आत्मविश्वासाने रस्ता चुकून वर आले. त्यांनाही अर्ध्यावर जाऊन वर घेऊन आलो. तेही पाच मिनिटांच्या वर तिथे थांबले नाहीत.
रात्र आणि गप्पांना रंग चढले आणि आम्ही जेवण रांधायच्या तयारीला लागलो. कुणी तांदूळ धुतोय, कुणी कांदा चिरतोय, कुणी कोथिंबिर निवडतोय. सगळं एका पातेल्यात घालून अशी काय फर्मास खिचडी तयार झाली म्हणता, की काय सांगता. कच्चा कांदा कापून त्या वाफाळत्या खिचडीसोबत खाताना आपल्या पुण्यात आणि बाकी अनेक ठिकाणी असलं भारी जेवण काय कुठल्या हॉटेलात मिळत नाही असं घासागणिक जाणवत होतं. जेवणं उरकून भांडी आणि इतर सामानाची आवराआवर केली तेव्हा अकरा वाजत आले होते. पलीकडून भोरगिरी गावातल्या मंदिरावरचा सीएफएल आणि काही खांबांवरचे मिणमिणते दिवे फक्त गावाच्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत होते. जेवणं आवरल्याने आम्ही काहीवेळ फोटो काढण्याचे प्रयत्न केले आणि नंतर सगळं सोडून पुन्हा गप्पा मारायला म्हणून पुन्हा गुहेत निवांत पथार्या अंथरुन बसलो. भवताल फारच सुरेख जमून आला होता. चौदाशीचा चांदवा ढगांच्या पडद्याआडून प्रकाश पाझरीत होता. त्याच्या प्रकाशात मेघांची दिंडी घाटावर चाल करुन निघाली होती. सृष्टीच्या नवजीवनाचे संदेश घेऊन. त्यांच्या तालावर बेडकांचे सूरावर सूर उमटत होते. काजव्यांची प्रकाशयोजना त्याला शब्दशः चार(शे) चांद लावत होती. गुहेतल्या सार्या लाईट्स बंद करुन आम्ही त्या मैफिलीत तल्लीन झालो होतो. मध्यरात्र सरुन तीनच्या सुमारास पहाटेची चाहूल लागली तशी त्या गारव्याने आम्हांला झोप लागून आम्ही या जिवंत स्वप्नांच्या दुनियेतून त्या आभासी स्वप्नांच्या दुनियेत हरवलो होतो.
पहाटे उजाडता कधीतरी जाग आली ती थंडगार हवेने आणि शीळकरी कस्तुराच्या (whistling thrush) आवाजाने. एवढा सुरेल आवाज की रोजच्या घड्याळाच्या गजराने रोज चडफडत उठणारे आम्ही त्या सकाळी अतिशय प्रसन्नचित्तानं उठलो. सकाळी गुहेत एक भक्त तिथल्या पुजार्याला म्हणून चहा घेऊन आला होता. पण पुजारी लवकर खाली उतरुन गेल्याने आपसूकच तो आमच्या पदरात पडून पवित्र झाला. आवराआवरी करुन वर आलेल्या भक्तांशी गप्पा मारुन आम्ही किल्ला उतरुन ओढ्याच्या रस्त्याने पुन्हा पायथ्याला आलो. शिरगाव फाट्याला येऊन कढईतून प्लेटमध्ये असा शिर्के वडापाव दाबून खाऊन परतीचा मार्ग धरला.
हा ट्रेक लक्षात राहिला तो खास गुहेतून अनुभवलेल्या ढगांच्या दिंडीमुळे, काजव्यांच्या चमकीमुळे, आणि रात्रभर मारलेल्या गप्पांमुळे! ही शिदोरी आठपंधरा दिवस पुरेल आता... तोवर होईलच पुढल्या भटकंतीचं नियोजन!
10:30
ट्रेक आठवणीतला.
पाऊसभरल्या आकाशातल्या मेघरुपातल्या घटांना वार्याने गदागदा हलवले आणि विजांनी कडाका काढला की सरी सांडायला वेळ लागत नाही. आकाशातल्या मुळाक्षरांना ढगांच्या वेलांट्या आणि विजांच्या मात्रा लगडल्या की वार्याच्या हुंकारासंगे रानारानात, पानापानांत आणि मनामनांत पावसाचे काव्य रुणझुणते. अशा वेळी डोंगर भटक्यांना सभोवतालचे हिरवे रान खुणावू लागते. पहिल्या पावसातला रस्त्यावरचा चिकचिकाट, ट्राफिकचा खोळंबा, नेमका घरी येताना होणारा वैताग असले सगळे शहरी नखरे झाले की एसी आणि पीसीच्या युगातल्या भटक्यांना आडरानातले गडकिल्ले, आडोशाच्या गुहा, कपारी, चिखलणी होऊन लावणीला तयार झालेली भातखाचरे, सुपरसॉनिक वारा कधी एकदाचा अनुभवतो असे होते.
मग एकदा असाच सगळी जगरहाटीची ओझी झुगारुन देऊन भटक्या एखाद्या वीकेंडला ट्रेकला सज्ज होतो. पाठीवरच्या सॅकमध्ये एकात एक दोन प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये © कोरड्या कपड्यांचा सेट, खाऊचं सामान, रात्रीच्या स्वयंपाकाचा शिधा, आवर्जून घेतलेलं पापडाचं पाकीट, रेडिमेड सूप सॅशे, काही भांडी, मित्राच्या मित्राकडून उसना आणलेला स्टोव्ह असं सगळं पाठुंगळी मारुन एसटी स्टॅंडवर खुणेच्या जागी शुक्रवारी रात्री हजर होतो. मनात कित्येक ‘टूडू’ची लिस्ट असते, फोन बिल भरायची वेळ आलेली असते, आयटी रिटर्न पेंडिंग असतो, प्रोजेक्ट डिलिव्हरीजचं शेड्यूल कायमच टाईट असतं, बॉस डोक्यावर बसलेला असतो. पण आता कानात वारा शिरलाय, मागे हटणे नाही. शेवटी भिजट पावसात ट्रेक करुनच हे सगळं सहन करायला आणि तडीस न्यायला ऊर्जा मिळणार असते. ठरलेले भिडू (©भटकंती अनलिमिटेड) हजर होतात, ओळख नसलेल्यांची ओळख होते, मध्यरात्रीची गाडीची वेळ होते. आणि तिकीट काढून खिडकीच्या फटीतून येणारा गार वारा आणि पावसाचे चुकार थेंब अंगावर घेत घेत स्वप्नांच्या दुनियेत हळूहळू एकेक जण हरवून जातो. रस्त्यात कित्येक धक्के खात खात गाडी तालुक्याच्या गावी पोचते तेव्हा घड्याळात पहाटेचे अडीच-तीनच वाजलेले असतात. पायथ्याच्या गावाला जाणारी पहिली एसटी सकाळी सहाला. मग तिथेच स्टॅंडवर मच्छरांना हटवत काढलेल्या डुलक्या.
हवेतला गारठा, आकाशी कुंद ढग, रिमझिम पावसाच्या सरी अशा टिपिकल पावसाळी वातावरणात गाडी नाना प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांनी भरुन जाते. एक ग्रामीण महाराष्ट्राचे मिनिएचर रुपच तिथे अवतरलेले असते. शाळेला जाणारी खाकी चड्डीतली पोरं, आठवडे बाजारला निघालेली माय, तालुक्याच्या गावी कामानिमित्त निघालेला गडी, नातवांला भेटायला निघालेली म्हातारा-म्हातारी अशा एक ना अनेक रुपांत माणूसपण सामोरे येत असते. पायथ्याचे गाव आले की आपापल्या सॅक्स पाठुंगळी मारुन गर्दीच्या धक्क्यांमधून कसेबसे आपले मुटकुळे खाली घ्यायचे आणि पावसाचा पहिला शिडकावा डायरेक्ट अंगावर झेलायचा. यासाठीच तर आपण इथवर आलो, पावसात चिंब भिजायला. एक शहारा अंगावरुन सर्रकन फिरुन जातो. शहरातल्या पावसापेक्षा हा पाऊस किती वेगळा. अगदी भारुन टाकणारा. चहोबाजूंनी उठावलेल्या डोंगररांगा, त्यावरुन खाली झेपावणारे चंदेरी जलप्रपात, अंगाखांद्यावर खेळणारे कापशी ढग, खाली समोर हिरवे कार्पेट. (©पंकज झरेकर) चिखलणी करुन तयार केलेली खाचरे, लावणीच्या प्रतीक्षेतली भातरोपं, किती पाहू अन किती नको. गावात पोचेपर्यंत पाऊस चिंब करुन टाकतो. ओलेत्या अंगानेच गावाबाहेर शिवाराच्या वाटेवर एका खोपटात टेकायचं. जास्तीचं सामान तिथेच सोडायचं आणि गरजेपुरत्या वस्तू बांधून, बिनदुधाचा कोरा वाफाळता चहा घेऊन तरतरी आली की सोबतीला एखादा गावातला सडा गडी घ्यायचा आणि त्याच्याशी पाऊसपाण्याच्या गप्पा करत रिमझिम पावसातच गडाची वाट चालू लागायची. सभोवतालची खाचरं पाण्यानं तुडुंब भरलेली, त्या पाण्याला कुठून कुठून बांध फोडून वाट करुन दिलेली. भातरोपे काढणीला आलेली. काही ठिकाणी रोपे काढणारे भलरी दादा. त्यांना रामराम घालत बांधांवरुन उड्या मारत पुढे निघातचे. पायथ्याची एखादी नदी, ओढे, गुडघा-गुडघा पाण्यातून एकमेकांचे हात धरुन धडधडत्या हृदयाने ओलांडायचे आणि चढाला लागायचं. पहिली धाप लागलेली असते, नशिबाने पावसामुळे घामापासून सुटका असते. थोडाफार दम टाकत पहिल्या पठारावर जरा टेकायचं. भिजलेला ब्रेड-बटर, ब्रेड चटणी पोटात ढकलायची आणि पुढली वाट चालू लागायची.
रात्री सगळी आवराआवर होऊन ऊबदार स्लीपिंग बॅगच्या आडून पुन्हा गप्पा रंगतात. अरे अमुक अमुक ट्रेक कसला खतरी आहे, अरे त्या तमक्या गुहा पाहिल्यास का, अरे आपली अमुक अमुक घाटवाट राहिली आहे, अरे इतिहासात अमके अमके काही संदर्भ आहेत, तमुक तमुक हेमाडपंथी मंदिर फार सुंदर आहे... एक ना अनेक विषय. बाहेर पावसाने आता जोर धरलेला असतो, बेडकांची गाणी सुरु झालेली. अशातच झोप लागून जाते आणि पुन्हा इहलोकातल्या स्वप्नांच्या दुनियेतून आपण भासमान स्वप्नांच्या दुनियेत शिरतो. पहाटवार्यात गारठ्याने झोप चाळवते, बाहेर पावसाची रिपरिप चालूच, मनात एक ना अनेक विचार, काही आयुष्यातल्या भरारीची स्वप्ने, त्या सगळ्यांसाठी बांधून घेतलेल्या ऊर्जेच्या अस्तित्त्वाची जाणीव... आणि त्या सर्वांना सामावून घेऊन पावसातही स्थितप्रज्ञ असा सह्याद्री... हा अनुभवच फार सुंदर असतो. अगदी कायम हवाहवासा वाटणारा.
उजाडते तसे सकाळचा पुन्हा एक चहाचा राउंड होतो, नाश्त्याला कोरडा खाऊ पुरतो, आवराआवर होते आणि उतरणीला लागतो. दुपार होईतो पायथ्याला पोचतो. मग पुन्हा वाटाड्याच्या खोपटावर ओले कपडे बदलून पिठलंभात ओरपायचा. त्याच्या पोराबाळांना खाऊ आणि आणलेली वह्या-पुस्तकं-पेन्सिली देऊन टाकायची, त्यांच्या डोळ्यांतली चमक बघून दोन दिवसांत कमावलेल्या ऊर्जेला इग्नाईट केलं की आपण पुन्हा जगरहाटीची आव्हानं नव्याने स्विकारण्यास तयार! मग परतीच्या एसटीत बसलो तरी मन मात्र मागेच रेंगाळत राहतं... त्या पठारावर फिरतं, त्या गुहेत विसावतं, धबधब्यांसवे कड्यावरुन झेपावतं, ढगांसारखं डोंगरांवरुन फिरुन येतं, खोपटातल्या पोरांसोबत हुंदडतं, आणि त्यांच्या डोळ्यांसारखं निरागस होतं. मग त्याला चिकटलेली अनेक व्यावहारिकतेची जळमटं निघून गेलेली असतात. पुढल्या ट्रेकपर्यंत शहरी जगण्याला नक्कीच एक नवा अर्थ गवसलेला असतो.
23:26
Subscribe to:
Posts (Atom)