Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

पाऊसवेडा !

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in 2013 Blog पाऊसवेडा भटकंती
2 comments
पाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड झालेल्या दर्‍याखोर्‍यांत अमिट जीवनाची साक्ष देणारा सोहळा सुरु झालेला असतो. धरित्रीच्या उदरात लुप्त झालेले गवताच्या, रानफुलांच्या बिया पहिल्या पावसांचे पानी पिऊन टरारुन फुगतात. कधी तरी एखादा इवलासा कोंब हळुवार त्या बीचे कवच फाडून धरतीची शिवण उसवून वर निघतो आणि आकाशाच्या दिशेने दोहो हात घेऊन झेपावतो. पुढे कधी त्या तुर्‍याच्या डोक्यावर कळी धरते आणि ती उमलून सारे रान रंगीत सुगंधाने हरखून जाते. सृष्टीचा अजोड सोहळा साजरा करायला घरी बसून टीव्ही पाहण्याचा करंटेपणा करणारा सह्यभ्रमरकधीच नसतो.
वळवाच्या पहिल्या सरी कोसळल्या की एकदा तरी अमृतेश्वराचे दर्शन घडावे अशी आस त्याच्या मनी असते. सांधणच्या घळीत जाऊन निसर्गाचा अजोड चमत्कार भर उन्हाळ्यातही आपली आब राखून असतो. वळवाच्या पावसाच्या सरींसरशी रतनगडाच्या पायथ्याशी दाट रानांत काजव्यांची झाडं उठतात. एखाद्या झाडाला लक्ष लक्ष काजवे लागलेले. अशी रानात शेजारी शेजारी दहावीस झाडं. रात्रीच्या वेळी जरा वरच्या बाजूने पाहिले की एका लयीत काजवे चमकत असतात. काळोखाच्या समिंदरातून प्रकाशाची लाट उसळावी तशी, या टोकापासून त्या टोकापर्यंत. पुन्हा मागोमाग दुसरी. निरभ्र आकाशाच्या तारकामंडळाच्या धरतीवर भूमीवरचे हे तारे. जणू ब्रम्हांडात दिवट्या घेऊन फिरणारे लक्ष लक्ष यक्षगणच ! दुसरे कुठलेच भान उरत नाही. अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !
पावसाची चाहूल लागताच तो निघतो तो सरळ राजगडाचा बालेकिल्ला गाठतो. पद्मावतीच्या चोर दरवाजाने पोचतो. देवीचे दर्शन घेऊन पद्मावतीच्या पाण्यात आपले बिंब न्याहाळणार्‍या आकाशाकडे मोठ्या आशेने पाहतो. त्या घुमटीत श्यामल मेघांचे झुंबर हळूहळू जमा होऊ घातलेले असतात. गडराज्ञी पद्मावतीचे दर्शन घेऊन इतिहासाची जाग सांगणार्‍या सदरेवरुन सरळ कड्याच्या खालून बालेकिल्ल्याकडे निघतो. शेजारची डावीकडली वाट डुब्यावरुन सुवेळेकडे धावत असते. ती तशीच सोडून आपला गडी बालेकिल्ल्याच्या पायट्या चढू लागतो. कुठल्याही महाद्वाराशी पोचल्यावर जसे प्रत्येक भटक्याला जसे कृतकृत्य वाटते तसेच त्यालाही वाटत असते. कितीदा आला असेल तो या द्वाराशी, एका अनामिक सुखाचा जोगवा मागत… कधी त्याला या बालेकिल्ल्याने रिकाम्या हाती परत पाठवले नाही. उलट प्रत्येक वेळी नवनव्या अनुभवांचे दान पदरात पाडून त्याला समृद्ध केले आहे. अफजुल्याचे शिर इथेच कुठे पुरले असेल का? राजे आग्र्याहून सुखरुप परतले येव्हा त्यांचे औक्षण इथेच घडले असेल का?संभूच्या निधनाची वावडी इथूनच उठवली असेल का? एक ना अनेक प्रश्न आणि इतिहासाचे सांगावे पुन्हा आठवतील. बालेकिल्ला चढून वर पोचतो तसा मघा पद्मावतीवर पाहिलेले मेघांचे झुंबर आता चंद्रतळ्यावर डोकावू लागलेले असतात.बुरुजाशी उभा राहून आपला गडी दूरवर नजर टाकतो. खाली पद्मावती तलाव-मंदिर,माची, त्यावर रेखलेली वाट, चोरदिंडी, बुरुज, पलीकडे धरणाचे पाणी, अर्ध्या गुंजणमावळावर धरलेले मेघांचे छत्र, अर्ध्यावर सोवळे ऊन, त्यामुळे नारायणाने श्यामल मेघांना घातलेला रुपेरी जरीचा काठ. शालीन स्त्रीच्या लुगड्याच्या घोळावर तिच्या हालचालीसरशी वेलबुट्ट्या चमकतात तशी लक्ककन चमकणारी एखादी वीज. थंड हवेने त्या मेघांशी थोडी लगट करण्याचा अवकाश की तो अगदी तिच्या स्पर्शाला वेडापिसा होऊन तिच्यामागे धावून बरसू लागतो. वर ढगांचा एक मोठ्ठा गोळा, त्यातून चमकणारी वीज, बरसणार्‍या जलधारा, अर्ध्या भागात सोनसळी ऊन,खाली तळाशी रेखलेली नदी, हिरवे सभोवताल… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !

मळवली स्टेशनला उतरला की पहिला दिसतो तो धुकटातला विसापूर आणि आडरस्त्याने पुढे जाऊन सामोरा येतो तो लोहगड. दूरच्या डोंगरात भाज्याची लेणी आपल्या चौकटी पावसात भिजवीत अंग चोरुन उभ्या दिसतात. कोसभराचे अंतर चालून गेलो की लोहगड-विसापूरच्या खिंडीत पोचतो.रस्त्याने असंख्य धबधबे बोलू लागलेले असतात. माथ्यावर पडणार्‍या पावसाचा अंदाज पाण्याच्या गढूळपणाबरोबर दर अर्ध्या तासाने बदलत असतो. खिंडीतली एक वाट विसापूराला वळसा घालून पुढे जाते. पहिल्यांदाच वाटाड्याशिवाय विसापूर करणारे भटके हमखास चुकून पुढे जातात आणि मग पाठी येऊन पाण्याच्या वाटेने गड चढतात. एखादा भटका इकडे लोहगडाच्या दिशेने जाऊन हिरव्या पार्श्वभूमीवर पडणारी तटबंदी आणि दरवाजाची वळणदार नक्षी डोळ्यांत साठवत माथ्यावर पोचतो.एका टेकाडाला वळसा घालून धुक्यातून चालत पावसाची रिपरिप अंगावर नाचवत विंचूकाट्याकडे सुटतो. विंचूकाट्याच्या टोकावरुन धुक्याच्या पडद्याआड धुवट नवा पुणे-मुंबई हमरस्ता आणि पलीकडे त्या हिरवट-पांढर्‍या पडद्यावर रेघा ओढत गेलेली रेल्वेलाईन. भर पावसात एखादी आगीनगाडी तिच्यावर स्वार प्रवाशांच्या स्वप्नांची भाग्यरेषा हवेत उमटवीत धावत असते. चहूवार पवनमावळाचा भावना चिंब करणारा परिसर, अंगावर कोसळ्णार्‍या धुवांधार सरी, अंगावरुन गुदगुल्या करत जाणारे पांढुरके ढग, धबधब्यांसवे त्यांवर स्वार होऊन कड्यांवरुन झेप घेणारे ओलेते वेडे मन… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !
लोणावळ्याला उतरुन हा पायीच राजमाचीकडे निघातो. लोणावळ्याचा पाऊस म्हणजे अगदी कहर. एकदा लागला की झोडून काढणार.मैलोनमैल चालत जांभळी फाट्यावरुन वळून राजमाचीला पोचणार. वाटेत ओढ्याला जरासे पाणी असते. राजमाचीच्या पायथ्याकडून समोरच्या दरीतले ढग हटले की पलीकडून हळूच तो धबधबा डोकावतो. राजमाचीची वार्षिक वारी आटोपली की उधेवाडीत पिठलं-भाकरी चापून हा परत जायला निघतो तेव्हा हमखास ओढ्याला पाणी वाढलेले असते. सोबत्यांच्या मेळाने एकमेकांना आधार देत ओढा पार करुन पुन्हा लोणावळ्यात पोचतो. गरम-गरम भजी खाऊन घरच्यांसाठी चिक्कीचे पार्सल घेऊन अर्धवट पेंग डोळ्यांवर घेऊन भिजट कपड्यांनिशी शेवटच्या लोकलने पुण्यात पोचतो. त्या रात्री जी काही सुखझोप लागते… तिला कशाचीच सर नाही. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !
धो धो पावसात लोणावळ्याची गर्दी टाळून हा जीपने शहापूरला येतो. कधी त्यासाठी कधी मुळशीकडून निघतो. वाटेत मुळशीचे गढुळलेले पाणी निवळत असते. वीसेक किलोमीटरचा धरणाच्या पाण्याच्या कडेचा रस्ता त्याला जगात सर्वात सुंदर रस्ता दिसतो. पल्याड कैलासगडावर ढग टेकलेले. पिंप्रीच्या घळीसमोरुन जाताना मुद्दाम वाट वाकडी करुन थांबावे वाटते. समोर अंधारबनातून आपण कधी तरी भर उन्हाळ्यातही शीतल जंगलरान तुडवत गेलेलो असतो. त्यावेळी पाहिलेली रानडुकरांची उकर आठवते. कोकणच्या बाजूने ढग उठत असतात, कधी त्यातून खिडकी उघडली तर अगदी समोर असलेला घळीतला प्रचंड जलप्रपात दर्शन देतो. कधी त्याच्या पायथ्याशी जाण्याचे भाग्य नशिबी लाभेल का? घनगडाला राम राम घालत आणि तेलबेलच्या जुळ्या भिंतींना पावसापाण्याचे हाल पुसत सालतर खिंड ओलांडली जाते. शहापूरला गाडी लावून समोर दिसणार्‍या कोराईगडाच्या चढणीला लागायचे. समोरच्या रांगेत कित्येक उफराटे धबधबे वार्‍यासवे मस्ती घालीत असतात. सहारा लेक सिटीच्या खुणा डोळ्यांत बोचर्‍या,पण घासातला एखादा खडा काढून टाकावा तशा त्या वगळल्या जातात. एक आडवण पार केल्यावर समोर येतात त्या दगडी पायर्‍या. अगदी रुपेरी पायघड्या घातल्यागत त्यावरुन पाणी कोसळत असते. घोटा-गुडघा पाण्यातून त्या चढून गेलो की दरवाजातून आत. एक विस्तीर्ण पठार, त्यात ठिकठिकाणी साठलेले पाण्याचे तलाव,त्यात वाकून-डोकावून आपले रुपडे न्याहाळणारी झाडं, दाटलेले ढग, कुंद हवा सारे सारे कायम लक्षात राहणारे. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !
खंडाळ्याचा घाट उतरुन धुक्यात हरवलेला श्रीवर्धन-मनरंजन न्याहाळीत प्रबळाच्या पायथ्याची ठाकुरवाडी गाठतो. गाडीतून बाहेर येताच कोकणचा पाऊस अंगावर येऊन आदळतो. नागमोडी पायवाटेने दमछाक करत प्रबळमाची गाठायची. जरा विसावून पाठच्या रानातून चिंब पावसातून कलावंतिणीच्या सुळक्याच्या खिंडीत पोचायचे. जीव मुठीत घेऊन त्याच्या निरुंद कमरेएवढ्या उंच पायर्‍या चढायच्या आणि नंतर निसरड्या मातीच्या पायवाटेवरुन माथा गाठायचा. पावसाने कधीच उसंत घेतलेली नसते. तो आपला बरसतच असतो.समोरचा प्रबळगड आपले प्रचंड धूड घेऊन सामोरा दिसतो. मुसळधार पावसात तेवढीच दिसणारी पुसटशी आकृती, बाकी त्या धुक्यात आणि कोकणी पावसात कुठले आलंय स्वच्छ दृश्य? इथवर पोचून रग जिरली, अतिशय जिगरबाजीचा कस लावणारा कलावंतिणीचा सुळका. चित्रातून धडकी भरवणारा, पण इथे आल्यावर आपली तेवढीच आपुलकीने काळजी घेणारा… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !

भर पावसात रतनगड चढून जायला निघतो.पायथ्याची नदी दोनतीनदा सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन ओलांडायची. दाट रानांतून वाट काढून कात्राबाईच्या वाटेवरुन उजवीकडे वळून शिड्या चढून थेट गणेश दरवाजाशी उभे राहतो. पाऊस मी म्हणत असतो. हा नखशिखांत भिजलेला. निथळती वस्त्रे गुहेच्या कोपर्‍यात टांगून कपडे बदलून चार काटक्यांवर चहा उकळायचा. तोवर बुटांत भिजट झालेले पाय शेकत बसायचे. वाफाळला कप दोहों हाती घेऊन फक्त बनियन-चड्डीवर उभा राहतो. समोर सगळा मुलुख पावसात निथळत असतो.डावीकडे खुट्ट्याकडे फक्त त्याची शेंडी ढगांतून वर आलेली. भंडारदर्‍याचे पाणी फक्त इतर भेटींत पाहिलंय म्हणून माहित असते. कड्यावरले पाणी उड्या टाकून ओढ्या नद्यांनी धरणाच्या पाण्यात मिसळत असते. पण ते सारे मेघांच्या पटलाआड असूनही त्याला ते सारेच जाणवते. रात्री मुक्कामाला शिजवलेली खिचडी आणि सोबत आणलेल्या लोणच्याची भिजलेले पुडी… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !
पाऊस जरा उताराला लागला की पठारं धुंडाळतो. सगळीकडे एक रंग सोहळालागलेला. रानफुलांचा बहर आलेला. हा रायरेश्वराला नमन घालून नुसतेच वेड्यासारखे सगळे पठार पालथे घालायला निघतो. घोटा-घोटा पाण्यातून ओहळ तुडवत वाटेच्या दुतर्फा फुलांचे गालिचे न्याहाळत हुडकतो. तेरडा, सोनकी, चिरायत,कवळा अशी ओळखीची काही, रानहळद-गौरीहार-भंडिरा अशी नवलाची काही.ऑर्किड-कळलावी अशी देवाच्या कौलाची (दुर्मिळ) काही. त्यावर साचलेले पावसाचे थेंब पायांना मऊशार गुदगुल्या करतात, रंग डोळ्यांना सुखावतात, मन फुलपाखरु होते. या फुलावरुन त्या फुलावर बागडते. नितळ पाण्याच्या डोहांत डुंबते.कापूसढगांसवे रानभर उंडारु पाहते. रिमझिम पावसात झिम्माडते. अगदी अगदी…याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !

एखादा मोठा बेत करुन बागलाणात जायला निघतो. मुल्हेरच्या इवल्याशा गुहेत कशीबशी रात्र काढतो. दुसर्‍या रात्रीला निवार्‍याला साल्हेरच्या कुशीत पोचतो. कड्याच्या पोटातून खोदलेल्या आडवणाने सगळा कडा पालथा घालून दरवाजाशी जातो. वाटेत कित्येक धबधब्यांनी, धारांनी चिंब केलेले असते. अगदी दक्षिण कड्यावर बसून निवांत ढगांआड होणारा सुर्यास्त पाहतो.तलावाशी येऊन फ्रेश होतो आणि साल्हेरच्या ऐसपैस गुहेतजाऊन मीठभाकर खाऊन निवांत आडवा होतो. बाहेर रात्री पावसाला जोर चढला की पुन्हा पागोळ्यांचा आवाज, पावसाचा नाद आणि पांघरुणाची खुसफूस. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !

अशा एक ना अनेक आठवणी. मन पाऊस होऊन जातं.पहिल्या पावसात मातीचा सुगंध लेतं, रानारानांत निनादतं, पानापानांतून ओघळतं, कड्यावरुन स्वच्छंदपणे स्वतःला झोकून देतं, ढगांसवे तरंगतं, फुलांचे रंग घेतं… पाऊसवेडं मन ! याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो !

Related Posts

2 comments:

  1. Anonymous26 May 2014 at 22:15

    Post wachali, majhyahi baryachshya aathawani jagya jhalya, khup kahi bolawese watate aahe aata, pan shabdanchi mandani ithe pureshi basnaar nahi, bas yewadhech sangu icchito ki Sir, tumhi "Inspirational" aahat..!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. विशाल विजय कुलकर्णी27 May 2014 at 01:37

    जियो...
    छायाचित्रांची गरजच भासू नये इतकं सुरेख उतरलय लेखणीतून सारं !!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1