दृष्टिकोन २०१०
अज्ञातच पायवाट
कुणी चेहरा निनावी
उडी उंच किटकाची
कैसी कुणी पहावी ?
उडी उंच किटकाची
कैसी कुणी पहावी ?
चिमुकले असे हे विश्व
देखणेच संध्यारंग
ना पुन्हा पुन्हा येतील
क्षण गहिरे घेऊन रंग
देखणेच संध्यारंग
ना पुन्हा पुन्हा येतील
क्षण गहिरे घेऊन रंग
रंगात चिंब जणु कविता
कल्पनेमधील प्रवास
अशी भाषा सुंदरतेची
परतून याल पाहण्यास
क्षणचित्रांची ही रूपे
जणु अबोल काही उखाणे
बोलतील ’तुमच्या’ संगे
शब्दांचे लाख तराणे
अवती भवतीची कविता
चित्रबद्ध अवधी केली
द्या ’खुली दाद’ रसिकांनो
ही तुम्हास अर्पण केली
ही तुम्हास अर्पण केली
शब्दः प्रिया हळबे
गेल्या सलग तीन वर्षांच्या उदंड प्रतिसादानंतर ‘दृष्टिकोन २०१०’ हे प्रदर्शन पुन्हा एकदा या वर्षी नव्या छायाचित्रांसह पुणेकरांच्या भेटीस येत आहे. फोटोग्राफर्स@पुणे यांनी आयोजित केलेले हे प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर दरम्यान न्यू आर्ट गॅलरी, घोले रोड पुणे इथे भरवण्यात येणार आहे.
फोटोग्राफर्स@पुणे किंवा P@P या नावाने ओळखला जाणारा हा ग्रुप दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करतो. छायाचित्रणाबद्दल हौशी छायाचित्रकारांमध्ये आवड निर्माण करणे याबरोबरच तत्संबंधी परिसंवाद आणि चर्चांचे आयोजन, नवोदितांना अनुभवी छायाचित्रकारांकडून मार्गदर्शन, आपल्या कॅमेरामधून जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा मूळ हेतू असला तरी ग्रुपच्या सदस्यांना समाजाबद्दल आपुलकी आहे, जबाबदारीची जाणीव आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘फोटोग्राफर्स@पुणे’ने सामाजिक बांधिलकीचे भान राखून विद्या महामंडळाच्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निधी उभा करण्याचा संकल्प केला आहे. प्रदर्शनात सहभागी होणार्या प्रत्येक सदस्याने आपला खारीचा वाटा तर उचलला आहेच, पण प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतला काही निधीही विद्या महामंडळाकडे सुपूर्त केला जाणार आहे.प्रदर्शनात निवडली गेलेली छायाचित्रे छायाचित्रण क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी अनेक निकष लावून निवडली आहेत. या छायाचित्रांचं वैशिष्ट्य असे की ती कधी तुम्हांला बोलती करतात तर कधी हसवतात. कधी डोळ्यांतून आसवांचे मोती वसूल करतात तर कधी हळुवार फुंकरीचे दानही टाकतात. अशा अनेकविध पैलूंनी नटलेल्या या प्रदर्शनात निसर्गचित्रे, वन्यजीवदर्शन, दुर्गदर्शन, प्रवासचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त छायाचित्रण अशी अनेक प्रकारची इंद्रधनुषी छायाचित्रे पाहायला मिळतील.
२००६ साली फ्लिकर.कॉम या इंटरनेटवरील वेबसाईटच्या माध्यमातून एकत्र आलेले सदस्य फोटोग्राफर्स@पुणे या छत्रीखाली एक झाले. छायाचित्रण आणि आमचे पुणे या दोन गोष्टींशी नाळ जोडून असलेले एकापेक्षा एक सरस असे २००० छायाचित्रकार या ग्रुपचे सदस्य आहेत. छायाचित्रणाचा छंद जोपासणारे असे शालेय विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, कॉर्पोरेट पदाधिकारी असे समाजातील विविध प्रवर्गातील हौशी छायाचित्रकारांनी या ग्रुपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. नियमित कालावधीनंतर पूर्वनियोजित ठिकाणी एकत्र भेटणे, संवाद साधणे, आपल्या कलेतील त्रुटी-उणिवा जाणून घेऊन त्या सुधारणे, नविन तंत्र समजावूण घेणे, वरिष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन मिळवणे असे काही या ग्रुपचे नियमित उद्योग सुरु असतात. ऑनलाईन चर्चांबरोबरच ग्रुपच्या सदस्यांमध्ये आपसांत समन्वय राखून नियमित फोटोग्राफी सहली आणि मार्गदर्शनपर सत्रे आयोजिली जातात. आणि तेही अगदी विनामूल्य. यासाठी ग्रुपच्या सदस्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. अशा या सतत नवनवीन कार्यकल्पानांमुळे ग्रुपमध्ये कायम उत्साहाचे वातावरण असते, प्रत्येक सदस्यांत एक सळसळता उत्साह असतो. त्या उत्साहाच्या ऊर्जेला समाजविधायक रुप देण्याचाच हा ‘फोटोग्राफर्स@पुणे’चा प्रामाणिक प्रयत्न... ‘दृष्टिकोन २०१०’.
यंदाच्या प्रदर्शनासाठी ‘फोटोग्राफर्स@पुणे’ला इंकफ्लोट प्रिंट्स, ग्रुपग्यान.कॉम, रेडिओ मिरची अशा काही आस्थापनांचे सहकार्य लाभले आहे.
संपर्क: ९९२१८४५१५१, ९८९०४९२८१९, ९८५००३६२७५

Kiti chan lihilayas.. :)
ReplyDeleteho amhi nakki yeu!!
ReplyDeleteमाशीची सर्दी काही बरी होत नाही. पुन्हा शिंकली, माझा प्रवासाचा प्लॅन बदलला. त्याचा फायदा म्हणजे मी आता या दिवशी पुण्यात आहे ... प्रदर्शन बघायला येऊ शकेन!
ReplyDeleteनक्की या सगळे. गौरी, आलीस की भेट.
ReplyDeleteKhup ch chan photos hote. Ekdum sahi hote exhibition. Kahi photos tar itke apratim capture kele hote ki pahilya kshani ch chehryavar ek smit hasya thevun jayche, kiti vel pahu n nako asa jhala hota. Purn 2 tas keval mantra mugdha houn sagle photos pahile. Gr8 effort :) n lavkarach amhala parat exhibition pahayla milo.
ReplyDelete