पुन्हा मिळतील का ते दिवस?
By
Unknown
/ in
आठवणी
आठवणीतले दिवस
ती सतरा वर्षे. कदाचित जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्षे... वडिलांचे रागावून पाहणे... मग कुठल्यातरी गोष्टीसाठी आईकडून त्यांच्याकडे शिफारस करणे, लहानसहान गोष्टींवर रागावून न जेवणं... शाळेतली आवडलेली पहिली मुलगी, ते गुपित माहित असणारे शाळेतले मित्र... रोज अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे आणि ते मोडणं... अगदी मित्रांना शपथ घेऊन वचन देणे, मग ती दिलेली वचने विसरुन जाणे... परीक्षेच्या आधी रात्रभर केलेली जागरणं... शेजारच्या उत्तरपत्रिकेत डोकावणं... वर्गात नेहमी तिच्याकडेच पाहत राहणं... शिक्षकांना नावं ठेवणं... हेडसरांनाही न घाबरणं... छोट्याछोट्या गोष्टींवरुन ’अ’ तुकडीतल्या पोरांशी पंगा घेणं, ’ड’ तुकडीतल्या पोरांकडं तुच्छतेने पाहणं... पीटीच्या खडूस मास्तरला घाबरणं...
शेजारच्या काकूंच्या घरी जाऊन बिनधास्त चरणं, मग घरी येऊन आईची बोलणी खाणं. सहलीसाठी पैसे भरायचे म्हणून स्वतःच घरी येऊन बाईंनी पाठवलं म्हणून खोटंच सांगणं, घरी जाताना एक डबडं लाथेने उडवत उडवत घरापर्यंत घेऊन जाणं, मित्रांशी खिसाबुक्की आणि स्टॅच्यू खेळणं... कधीतरी वडिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन दुसर्या दिवशी उगाच मित्रांच्यात भाव खाणं...
डायल करुन लावण्यापेक्षा पुशबटनचा फोन असलेल्या लांबवरच्या एसटीडी बूथवर जाणं, दहावीचा निकाल लागल्यावर बक्षीस मिळालेली पहिली शंभराची नोट, अकरावीला कॉलेजला गेल्यावर इमारतीकडे वर पाहत पाहत एका टग्या पोराला धडकणं, पहिल्यांदाच लेक्चर बंक मारणं, पहिला घरी न सांगता पाहिलेला पिच्चर, कॉलेजजवळच्या स्वीटहोममध्ये जाऊन सामोसे खाऊन सेलिब्रेट केलेला बर्थडे, डिसेक्शन बॉक्समधल्या चाकूने कापलेला केक... बुटाला लागलेली धूळ एक पाय वर घेऊन पोटरीवर पॅंटला पुसणं, घातलेली पहिलीच जीन्स आणि शूज... उसन्या आणलेल्या कॅमेरासमोर उगाच एक पाय पुढे करुन ऐटीत दिलेली पोज, मग कित्येक दिवस तोच फोटो निरखून बघणं, ओठ ओले करुन मिशी दिसतेय का ते आरशात पाहणं, लॅमिनेट केलेल्या आयकार्डवर फोटोला स्केचपेनाने मिशी काढून पाहणं...
सगळं कसं अगदी काल झाल्यासारखं आठवतंय... पुन्हा मिळतील का ते दिवस?
शेजारच्या काकूंच्या घरी जाऊन बिनधास्त चरणं, मग घरी येऊन आईची बोलणी खाणं. सहलीसाठी पैसे भरायचे म्हणून स्वतःच घरी येऊन बाईंनी पाठवलं म्हणून खोटंच सांगणं, घरी जाताना एक डबडं लाथेने उडवत उडवत घरापर्यंत घेऊन जाणं, मित्रांशी खिसाबुक्की आणि स्टॅच्यू खेळणं... कधीतरी वडिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन दुसर्या दिवशी उगाच मित्रांच्यात भाव खाणं...
डायल करुन लावण्यापेक्षा पुशबटनचा फोन असलेल्या लांबवरच्या एसटीडी बूथवर जाणं, दहावीचा निकाल लागल्यावर बक्षीस मिळालेली पहिली शंभराची नोट, अकरावीला कॉलेजला गेल्यावर इमारतीकडे वर पाहत पाहत एका टग्या पोराला धडकणं, पहिल्यांदाच लेक्चर बंक मारणं, पहिला घरी न सांगता पाहिलेला पिच्चर, कॉलेजजवळच्या स्वीटहोममध्ये जाऊन सामोसे खाऊन सेलिब्रेट केलेला बर्थडे, डिसेक्शन बॉक्समधल्या चाकूने कापलेला केक... बुटाला लागलेली धूळ एक पाय वर घेऊन पोटरीवर पॅंटला पुसणं, घातलेली पहिलीच जीन्स आणि शूज... उसन्या आणलेल्या कॅमेरासमोर उगाच एक पाय पुढे करुन ऐटीत दिलेली पोज, मग कित्येक दिवस तोच फोटो निरखून बघणं, ओठ ओले करुन मिशी दिसतेय का ते आरशात पाहणं, लॅमिनेट केलेल्या आयकार्डवर फोटोला स्केचपेनाने मिशी काढून पाहणं...
सगळं कसं अगदी काल झाल्यासारखं आठवतंय... पुन्हा मिळतील का ते दिवस?
माझा एक मावसभाऊ सध्या कॉलेजमध्ये आहे. मला नेहमी ’सेंटी’ एसएमएस पाठवतो. मी नेहमीच वाचतो असे नाही. पण आज एक एसएमएस आला आणि मी त्यात माझी काही भर घालून ब्लॉगपोस्ट लिहिली.->फोटो इंटरनेटवरुन साभार.
शाळा.. हे २ अक्षरे आठवली तरी किती काय काय आठवते ना... :)
ReplyDeleteशाळा म्हणल की त्यातच सार काही सामावलय......तेव्हाचा निरागसपणा...ती धमाल....भांडण....क्रिकेट, कबड्डी, खो -खो च्या मॅचेस.....त्यातील चुरस.....सुट्टीतील उणाडक्या......ते दिवसच रम्य होते.....मस्त लिहलय रे!!!
ReplyDelete....... :)
ReplyDeleteSahi ahe ekdam :)
ReplyDeleteTuzi writing skills ekdam touching ahe :)
Keep it up :)
मस्तच होते ते दिवस..!
ReplyDeleteआयुष्यात परत मागण्यासारखी एकच गोष्ट असावी - बालपण परत मागावं!... कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये एकच राहुन गेलय.... आयुष्यातही "अनडु" [कंट्रोल झेड] करता आलं तर!!
....... आठवणींच्या देशाची एक सफर झाली.... मस्तच!
खरच ते दिवस आठवले कि मन कस सुन्न होऊन जात....
ReplyDeleteखुरच पुन्हा येतील का ते दिवस.............?
ते सकाळची पहिली आगगाडी पाहण्यासाठी अंथरूणातून उठून पळत जाणं, उन्हाळा असो कि पावसाळा गावाबाहेरच्या पटांगणावर क्रिकेटचा सामना रंगवणं, शाळेतून घरी येताना एखाद्या पानपट्टीवरच्या रेडीओवर लागलेलं "नदीम-श्रवण" किंवा "आनंद-मिलींद"चं गाणं ऐकून पावलं जागच्याजागी थबकणं, परीक्षा संपली की पुर्नजन्म मिळ्याल्याचा आनंद होणं पण जूनमध्ये शाळा सुरू झाल्या की नव्या वही आणि पुस्तकांच्या वासाने तसंच वेड लागणं, बटाटा आणि फ्लॉवर सोडून अजून कुठलीही भाजी न आवडणे, कॉलेजमध्ये तिला पाहून नवनविन कविता सुचणे, पावसाळ्यात ग्रुपने भटकणं......
ReplyDeleteमित्रा, बर्याच गोष्टींची आठवण करून दिलीस.......नेहमीप्रमाणेच दणकून लेख !!!!!
शाळेत असताना वाटायचं की कधी एकदा मोठा होऊन ऑफीसला जातो. ऑफीस वरुन घरी आलं की टीव्ही पहा, मनात येईल तसं वागा, अभ्यास कर किंवा अभ्यास झाला का विचारणारं कुणी नसेल आणि काय नी काय....आत्ता वाटतं उगाच मोठा झालो. शाळेत असतो तर मस्त उद्या १ मे ला रिज़ल्ट लागला असता आणि मग आंबे, काजू, समुद्रावर वाळूतले किल्ले ह्यात सुट्टी कशी मजेत गेली असती.
ReplyDeletemastach !!
ReplyDeleteतुला जर अझुन ते दिवस अनुभवायचे असतील तर ..
ReplyDeleteतु अझुन वाचल नसशिल तर मिलिंद बोकील यांचे "शाळा" पुस्तक वाच... एकदम धम्माल पुस्तक आहे ते..
रोहन, खरं आहे रे.
ReplyDeleteमनमौजी, क्रिकेट, कबड्डी, खो-खो? फारच प्रगत बुवा तुम्ही, आम्ही तर आपा-रपी खेळायचो.
विशल्या, नुसताच हसलास. मला माहीत आहे, यातल्या काही गोष्टी तू अजूनही करतोस.
तेजस्विनी, आपले इथे स्वागत आणि धन्यवाद.
भुंगा, ते कंट्रोल झेड मिळाले की मला पण सांग. मागतील ती किंमत देऊ आपण.
विक्रांत, सागर, शुक्लेंदु, धन्यवाद रे.
सिद्धार्थ, अजून किती आठवणी असतील ना... आंबे, काजू बास बास, मला आता सुट्टी टाकावीशी वाटते.
आनंद, धन्यवाद. 'शाळा' दोन वेळा वाचले आहे. असे वाटत होते की मला समोर ठेवूनच लिहिलंय.
अरे तू ज्या काही गोष्टी या पोस्टमध्ये सांगितल्यास ना, त्यातल्या सर्वच शिवाय दुसरे केलेले कुटाने सुद्धा मला आठवतात. गावाकडे असतांना (१ली ते ४थी), शाळा बुडवून, आमच्या मळ्यात मित्रांसोबत नदीत पोहायला जाणं किंवा टमाटे, काकड्या, आंबे/शाका [झाडावरच पिकलेले आंबे/पाड?] (कैर्या म्हणजे काय असतं मग!!!), पिकलेल्या बोरांसाठी लोकांच्या बोरी हुळवणं, गौर्या पेटवून मोहळं हुळवणं (मधासाठी!).. इत्यादी हे तर आमचे रोजचेच प्रयोग असायचे, त्या त्या सिझनमध्ये!!! म्हणूनच बहुतेक गावाकडं असतांना (झेड.पी. शाळेत!) चौथीत जाईपर्यंत मला १ ते १० (म्हणजेच १, २, ३..., ९, १०) एवढी दहा अंकाची उजळणी सुद्धा म्हणता येत नव्हती, लिहिणे तर दूरच!!!! औरंगाबादेत आल्यानंतर थोडा हुशार झालो, पण नववीत जाईपर्यंत भरमसाठ लफडे (लहान मुलं करतात ती रे, नाहीतर दुसराच अर्थ काढशील!) करून बसलो होतो!!! दहावीला शाळेतून दुसरा आलो होतो तेव्हा निशिगंधा वाड (अभिनेत्री आहे का काय ही?) यांच्या हस्ते मला मिळालेलं बक्षिस, नंतर अजुन काही ठिकाणी मिळालेली बक्षिसे, जसे की मला मिळालेली एक भिंतीवरची घड्याळ अजुनही आमच्या घरातील भिंतीवर टांगलेली आहे... मम्मीचा रोज मार खाणं, गरज पडल्यास घरून ५-१० रू. चोरणं वगैरे प्रकार अनुभवलेय.. तुझी ही पोस्ट वाचून मलाही तुझ्याप्रमाणेच ते दिवस आठवले मी मागच्या प्रतिक्रियेत नुसतं स्मित नोंदवलं होतं!!
ReplyDeleteअरे पंकु....आपा रपी तर असायचचं रे पण ते सीझनल असायच....मी जे म्हणतोय ते ई.५-१० वी पर्यंतची गंमत.....४ थी पर्यंत असायच गोट्या, विट्टी दांडू, लिन्गोरचा हे अशे खेळ....काही असो त्या सगळ्यात खरी मजा होती
ReplyDeleteहे सगळं तर ठिक आहे रे.. पण ते मुलींच्या घरापर्यंत त्यांच्या सोबत सोबत चालत जाणं, तिच्या घरासमोरुन उगाच मोठमोठयाने बोलत जाणं- ( कदाचित ती येईल बाहेर म्हणून ) हे उद्योग पण केले असतील नां?
ReplyDeleteघरचे पैसे चोरून हॉटेलमधे वडा खायला जाणं- ( नुकतीच जाणिव झालेली असते, की आईच्या हातच्या वड्यापेक्षा बाहेरचा वडा वेगळा असतो, आणि तो आवडायला पण लागलेला असतो )
पतंग उडवणे, संध्याकाळी खेळत असतांना शेवटी आईने घराबाहेर येऊन पाठित धपाटे घालुन घरी नेल्याशिवाय घरात परत न जाणे. वगैरे वगैरे.. छान आहे पोस्ट!!
lahanpanachya athavani jagya zalya..lekh wachun khupach chan watle...lahanpan dega deva...
ReplyDeleteKhupach chan..!! :)
ReplyDeletebharabhar athwani taralun jatat dolupudhe..
plz keep ur writing continue.., just make so relax after reading such good article. Manatil sagale wichar dur houn ek navya kshanapasun suruwat hote..
was searching for good blog to read, eka frnd chya follower list madhe tujha blog pahila.. tya weles pasun wachatey!! :)
And will continue the same...
खरंच...छान होते नाही का ते दिवस? फक्त तेंव्हा कळलेच नाही... आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचे ते दिवस होते! :) आणि एक कळलं! ते म्हणजे 'शाळा म्हणजे शाळा असते...तुमची आमची सेमच असते!!' :D
ReplyDelete