Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

मी पाहतोय बाळा सारे काही...!!!

By Unknown
/ in letter marathi पत्र मराठी स्मरण
30 comments
बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?),

मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट सुटणे. काळजी वाटते रे. थोडी हळू चालवत जा ना गाडी. पण माझ्यामागे चांगले जमवले आहेस सगळे. पाहता पाहता आठ वर्षं झाली ना रे? सुरुवातीला तुमची फरपट झाली पण तेव्हापासून तुझ्या आईने आणि तू गाडा ओढलेला पाहिलाय. खूप माणसे होती ज्यांनी तुला मदत केली आणि तशीच काही होती ज्यांनी स्वार्थही साधू पाहिला. पण प्रत्येक वेळी तुझ्या आईला तुझाच आधार वाटतो रे. जरा तिच्या कलाने घेत जा. थोडी जास्त हळवी आणि काळजी करणारी आहे ती. म्हणून तिने कितीही वैताग केला तरी तू डोके शांत ठेव रे राजा.

माझ्यामागे आईने घराबाहेर पडून नोकरी सुरु केली. आणि सुरुवातीलाच आपल्या स्कुटरवरुन तुमचा अपघात झाला. पण तू तिला चालत्या ट्रकच्या चाकाखालून बाहेर ओढलेस आणि अक्षरशः रक्तामांसाचा चिखल हाताने थापून तू तिला एकटा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास. एरव्ही फक्त मित्राचे टाचेचे ड्रेसिंग करताना पाहून तुला येणारी चक्कर त्या वेळी कुठे गेली रे? ती दवाखान्यात काढलेली काळरात्र, तुझ्या आईचे ४०-४२ टाके... जाऊ दे रे, नको त्या आठवणी, त्रास होतो.

एका गोष्टीत मात्र तू चुकलास राजा. नातेवाईकांमध्ये जास्त मिसळला नाहीस. मला माहीत आहे तू एकटा स्वतःमध्ये रमणारा आहेस. पण अरे काही नातेवाईकांनी त्रास दिला असला तरी आपण ते विसरुन सगळ्यांशी चांगले बोलावे. समाजामुळेच तर आपल्याला ओळख आहे ना? आता बघ बरं, ताईच्य लग्नपत्रिका देण्यासाठी तुला काही नातेवाईकांची घरेही माहीत नाहीत. हीच सुरुवात समजून आता सगळ्या नातेवाईकांना धरुन रहा.



करिअर सुरु केलंस. घराचा वरचा मजला आई आणि तू मिळून बांधून काढला, समोर किती सुंदर ओपन टू स्काय टेरेस ठेवले आहेस. आपले मी लावलेले आंब्याचे झाडही आता छान मोठे झालंय ना रे. यंदा जास्त कैर्‍या लागलेल्या दिसत नाहीत. आपले घर सुंदर सजवले आहेस. अगदी माझ्या आवडीसारखे. कुठेही बोजड फर्निचर न करता. रंगही मी निवडले होते तेच. कसे रे तुझ्या एवढे लक्षात राहिले. रंगापासून ते आयुष्याच्या होणार्‍या साथीदाराची, सगळी निवड आईला समोर ठेवून केलीस. प्रत्येकाला दिवाळी, वाढदिवसाला नियमाने काही ना काही घेतोस, सगळे वाढदिवस लक्षात ठेवतोस. पण माझा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, मला निरोप घ्यावा लागला तो दिवस, हे सगळे कसे लक्षात असूनही आईसमोर काही झाले नाही असे विसरल्यासारखे दाखवतोस. मी पाहतोय, गेली आठ वर्ष तुझ्या आईला दिसू नयेत म्हणून किती अश्रूंचे कढ मागे सारलेस. ताईचे लग्न ठरले त्या दिवशी ओली केलेली उशी काय मला माहीत नाही? पण अरे असे मुळुमुळु रडून कसे चालेल? मग आईला कुणाचा खंबीर आधार राहील?

उठ बाळा, हे पुढचे आयुष्य आता तुझेच आहे. आव्हानं कितीही आली तरी धीराने सामोरा जा. डोके शांत ठेवत जा, गाडी हळू चालवत जा. जरा तब्येतीकडे पण पहा. अंगकाठी फारच बारीक दिसते तुझी. आईकडे लक्ष दे. समंजसपणे वाग. मी पाहतोय बाळा सारे काही...!!!

-तुझे पप्पा.

Related Posts

30 comments:

  1. Suhas Zele7 March 2010 at 11:02

    मन भरून आल यार. काळजी घे. छान लिहलयस.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. Veerendra7 March 2010 at 11:20

    अरे तू तर तुझ काळीजच या ब्लॉगवर काढून ठेवलस
    .. मित्रा, काळजी घे!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. हेरंब7 March 2010 at 11:33

    पंकज, खूप भावस्पर्शी लिहिलंयस !!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. अपर्णा7 March 2010 at 12:21

    पंकज अरे काय बोलु?? खरंच निःशब्द झाले....तुझ्यासोबत तुझं आमच्यासारखं मित्रमंडळ आहे हे लक्षात असू दे...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. मनमौजी7 March 2010 at 19:51

    डोळे भरून आले आहेत. . . बस्स एवढीच एक कमेंट!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Vaibhav7 March 2010 at 22:55

    मित्रा निशब्द करून टाकलेस...आणि हो काळजी घे जरा आता..भटकंतीला विश्रांती देऊन छान काम केले आहेस..सगळे व्यवस्थित पार पडले कि आपण सुरु करू परत

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Yogesh8 March 2010 at 10:38

    मनापासून लिहिलयस... मनातल्या भावना इथे उघड्पणे लिहाव्यात का अस वाटल असेल ना??
    पण तुझा हा मित्राचा गोतावळा इतका जवळचा आणि जीव देणारा आहे त्यामुळेच तू इतक सहज व्यक्त होऊ शकलास

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Umesh8 March 2010 at 23:57

    ............................
    ............................
    ............................
    ............................
    ............................
    ............................

    ......

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Rinksmasti10 March 2010 at 00:40

    I am speechless....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. GanesH11 March 2010 at 22:43

    Mitra vachun dolya madhe pani aale..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Vikrant Deshmukh...12 March 2010 at 04:43

    हे शेवटचं.... आणि एकदाच सांगतो.....परत असे काही लिहीलास तर टॉवर ५ मध्ये येवून फटके देईन...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. मनमौजी12 March 2010 at 04:59

    फोटो अगदी समर्पक असा आहे!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. विशाल तेलंग्रे12 March 2010 at 08:52

    घरच्यांची व स्वतःची काळजी घे रे दादा...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. manatale12 March 2010 at 10:04

    :-(

    Aniket

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. LEobON12 March 2010 at 20:06

    namaskar saheb....

    mala tumchya baddal kahin mahit nahin ...pan varche patr vachun thodi kalpana aali....

    mayechi savli harapli ki kai haal hotat te je tyatun gele ahet tech janno...

    neway tumhala itthe bhetun khup bare watle .....

    hopefully actually lavkarch bhet hoil ashi ashha ahe

    take care

    god bless

    Leonard Rebello

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. Pankaj - भटकंती Unlimited12 March 2010 at 22:06

    आव्हानांच्या सागाराशी लढण्यासाठी मुलाला प्रेरणा देणारे वडील. "जा बाळा, मागे वळून पाहू नकोस, मी पाहतो आहे तुला!!"

    सर्व मित्र-मैत्रिणींचे मनापासून आभार.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  17. Pritam19 March 2010 at 02:05

    मित्रा, तू ग्रेट आहेस... उशीत मुळुमुळु रडण काय असतं हे मला चांगलंच माहीत आहे, असो. ताई च्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  18. कृष्णा.....घोडके26 March 2010 at 02:20

    खुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

    ReplyDelete
    Replies
      Reply
  19. रोहन चौधरी ...28 March 2010 at 19:34

    इतके दिवस कित्ती तरी वेळा तुझ्या ब्लॉगवर आलो... पण प्रतिक्रया दिली नाही. काय लिहू काही सुचेना... इतकेच म्हणेन... "जगायचे आहे गड्या.. जगायचे आहे" ... :)

    आता मात्र तू थोड़ा मोकळा झाला आहेस आणि लवकरच येतो आहेस ब्लॉग्गिंग विश्वात...

    तुझी वाट बघतोय .. तुझा भटक्या मित्र.... आणि खादाड राज्याचा सरसेनापती...
    रोहन... !!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  20. सोनाली केळकर31 March 2010 at 11:34

    तुमचा ब्लॉग वाचते नेहेमी पण प्रतिक्रीया आज लिहीत्ये.
    खरच एकदम हळव व्हायला झालं वाचून, कायम असेच खंबीर रहा.
    मुंबई मेळाव्यात नक्की भेटू.
    http://aryanchidumiya.blogspot.com/

    ReplyDelete
    Replies
      Reply
  21. tanvi4 April 2010 at 20:59

    अरे ही पोस्ट कशी सुचली नजरेतून....

    खूप हळवे लिहीलेस अगदी आर्त...

    पण खरचं तुझ्या आई-बाबांच्या नजरेने हे पत्र वाचते ना तेव्हा आपला मुलगा सक्षम होताना पाहून त्यांचे डोळे अभिमानाने भरून येताना दिसतात रे मला!!! हेच तर सुख आहे त्यांचे!!! वयाने मोठे होणे आणि अंगी मोठेपणा येणे हे नेहेमीच होत नाही, पण तू ते साधतोयेस...

    अनेक अनेक शुभेच्छा!!

    आयूष्यात आज पहिल्यांदा असे वाटले की तुझ्यासारखा एक भाऊ हवा होता मला....असाच खोडकर, वरकरणी मस्तीखोर वाटणारा पण मनात खूप काळजी करणारा....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  22. Pankaj - भटकंती Unlimited4 April 2010 at 22:27

    प्रितम, कृष्णा: शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
    रोहन, येतोय हळूहळू.
    सोनाली, नक्की भेट होईल.
    तन्वी, आईने अजून वाचली नाही. मीच दाखवली नाही. उगाच हळवी होऊन रडत बसेल. बाबा तर आता...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  23. Ajay Sonawane15 May 2010 at 06:41

    स्पीचलेस...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  24. Santosh24 May 2010 at 03:17

    Thanks a lot... Ya patra madhun mala pan ek sandesh milala.

    Hope ankhi sudhha barech jan to ghetil :)

    Keep up dost... :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  25. Manya6 June 2010 at 13:46

    Mitra ! Tumche Blog ani Photostreams follow karnarya anekanmadhala me ek evdhich tuzee mazee olakh ! He ya adhipan vachala hota pan comment takaychi Chhati nahi zali. kay karnar pratyek veli bharoon ala hota. Apratim lihila ahes !! Tu ani Dev doghahi tuzya kutumbachi kalji ghyal yat shanka nahi. Lekh vachun ghayal matra kelas pan tyach barobar anek goshtinchi jan matr ali.

    Baki Natevaii kmhanshil tar changla ahe na! Are Dev manasalaa Natevaiik ka deto ? Mitranchi kimmat samajavi mhanun :) Cheers !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  26. sushma4 September 2010 at 10:51

    पंकज दादा,
    तुमच्या ब्लॉग वरिल मागील पोस्ट वाचते आहे पण प्रतिक्रीया आज पहिल्यांदा देत आहे....शब्दात काही सांगता येत नाही त्यामुळे डोळ्यातुन पाणी वाहायला लागल....घरच्यांची व स्वतःची काळजी घे रे दादा........

    ReplyDelete
    Replies
      Reply
  27. Pankaj - भटकंती Unlimited4 September 2010 at 22:46

    धन्यवाद अजय, संतोष, मन्या, सुषमा.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  28. अनघा8 September 2010 at 09:05

    :'(
    मला माहितेय हे तू मार्च मध्ये लिहिलयस....बरेच दिवस उलटून गेलेत...
    पण काही गोष्टी जश्याच्या तश्याच रहातात...धार कमी नाही होत..
    काळजी घे.
    :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  29. Unknown28 March 2018 at 21:07

    निःशब्द

    ReplyDelete
    Replies
      Reply
  30. gajanan chavan11 May 2018 at 06:15

    निःशब्द....

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1