मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
बाळा (हो ना रे, मी तुला पप्पू किंवा पंकज म्हटलेच नाही ना?),
मी पाहतोय बरं तुझी धावपळ. आपल्या ताईची लगीनघाई, त्यासाठी तुझे बाईकवरुन सुसाट सुटणे. काळजी वाटते रे. थोडी हळू चालवत जा ना गाडी. पण माझ्यामागे चांगले जमवले आहेस सगळे. पाहता पाहता आठ वर्षं झाली ना रे? सुरुवातीला तुमची फरपट झाली पण तेव्हापासून तुझ्या आईने आणि तू गाडा ओढलेला पाहिलाय. खूप माणसे होती ज्यांनी तुला मदत केली आणि तशीच काही होती ज्यांनी स्वार्थही साधू पाहिला. पण प्रत्येक वेळी तुझ्या आईला तुझाच आधार वाटतो रे. जरा तिच्या कलाने घेत जा. थोडी जास्त हळवी आणि काळजी करणारी आहे ती. म्हणून तिने कितीही वैताग केला तरी तू डोके शांत ठेव रे राजा.
माझ्यामागे आईने घराबाहेर पडून नोकरी सुरु केली. आणि सुरुवातीलाच आपल्या स्कुटरवरुन तुमचा अपघात झाला. पण तू तिला चालत्या ट्रकच्या चाकाखालून बाहेर ओढलेस आणि अक्षरशः रक्तामांसाचा चिखल हाताने थापून तू तिला एकटा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास. एरव्ही फक्त मित्राचे टाचेचे ड्रेसिंग करताना पाहून तुला येणारी चक्कर त्या वेळी कुठे गेली रे? ती दवाखान्यात काढलेली काळरात्र, तुझ्या आईचे ४०-४२ टाके... जाऊ दे रे, नको त्या आठवणी, त्रास होतो.
एका गोष्टीत मात्र तू चुकलास राजा. नातेवाईकांमध्ये जास्त मिसळला नाहीस. मला माहीत आहे तू एकटा स्वतःमध्ये रमणारा आहेस. पण अरे काही नातेवाईकांनी त्रास दिला असला तरी आपण ते विसरुन सगळ्यांशी चांगले बोलावे. समाजामुळेच तर आपल्याला ओळख आहे ना? आता बघ बरं, ताईच्य लग्नपत्रिका देण्यासाठी तुला काही नातेवाईकांची घरेही माहीत नाहीत. हीच सुरुवात समजून आता सगळ्या नातेवाईकांना धरुन रहा.
करिअर सुरु केलंस. घराचा वरचा मजला आई आणि तू मिळून बांधून काढला, समोर किती सुंदर ओपन टू स्काय टेरेस ठेवले आहेस. आपले मी लावलेले आंब्याचे झाडही आता छान मोठे झालंय ना रे. यंदा जास्त कैर्या लागलेल्या दिसत नाहीत. आपले घर सुंदर सजवले आहेस. अगदी माझ्या आवडीसारखे. कुठेही बोजड फर्निचर न करता. रंगही मी निवडले होते तेच. कसे रे तुझ्या एवढे लक्षात राहिले. रंगापासून ते आयुष्याच्या होणार्या साथीदाराची, सगळी निवड आईला समोर ठेवून केलीस. प्रत्येकाला दिवाळी, वाढदिवसाला नियमाने काही ना काही घेतोस, सगळे वाढदिवस लक्षात ठेवतोस. पण माझा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, मला निरोप घ्यावा लागला तो दिवस, हे सगळे कसे लक्षात असूनही आईसमोर काही झाले नाही असे विसरल्यासारखे दाखवतोस. मी पाहतोय, गेली आठ वर्ष तुझ्या आईला दिसू नयेत म्हणून किती अश्रूंचे कढ मागे सारलेस. ताईचे लग्न ठरले त्या दिवशी ओली केलेली उशी काय मला माहीत नाही? पण अरे असे मुळुमुळु रडून कसे चालेल? मग आईला कुणाचा खंबीर आधार राहील?
उठ बाळा, हे पुढचे आयुष्य आता तुझेच आहे. आव्हानं कितीही आली तरी धीराने सामोरा जा. डोके शांत ठेवत जा, गाडी हळू चालवत जा. जरा तब्येतीकडे पण पहा. अंगकाठी फारच बारीक दिसते तुझी. आईकडे लक्ष दे. समंजसपणे वाग. मी पाहतोय बाळा सारे काही...!!!
-तुझे पप्पा.

मन भरून आल यार. काळजी घे. छान लिहलयस.
ReplyDeleteअरे तू तर तुझ काळीजच या ब्लॉगवर काढून ठेवलस
ReplyDelete.. मित्रा, काळजी घे!
पंकज, खूप भावस्पर्शी लिहिलंयस !!
ReplyDeleteपंकज अरे काय बोलु?? खरंच निःशब्द झाले....तुझ्यासोबत तुझं आमच्यासारखं मित्रमंडळ आहे हे लक्षात असू दे...
ReplyDeleteडोळे भरून आले आहेत. . . बस्स एवढीच एक कमेंट!!!!
ReplyDeleteमित्रा निशब्द करून टाकलेस...आणि हो काळजी घे जरा आता..भटकंतीला विश्रांती देऊन छान काम केले आहेस..सगळे व्यवस्थित पार पडले कि आपण सुरु करू परत
ReplyDeleteमनापासून लिहिलयस... मनातल्या भावना इथे उघड्पणे लिहाव्यात का अस वाटल असेल ना??
ReplyDeleteपण तुझा हा मित्राचा गोतावळा इतका जवळचा आणि जीव देणारा आहे त्यामुळेच तू इतक सहज व्यक्त होऊ शकलास
............................
ReplyDelete............................
............................
............................
............................
............................
......
I am speechless....
ReplyDeleteMitra vachun dolya madhe pani aale..
ReplyDeleteहे शेवटचं.... आणि एकदाच सांगतो.....परत असे काही लिहीलास तर टॉवर ५ मध्ये येवून फटके देईन...
ReplyDeleteफोटो अगदी समर्पक असा आहे!!!
ReplyDeleteघरच्यांची व स्वतःची काळजी घे रे दादा...
ReplyDelete:-(
ReplyDeleteAniket
namaskar saheb....
ReplyDeletemala tumchya baddal kahin mahit nahin ...pan varche patr vachun thodi kalpana aali....
mayechi savli harapli ki kai haal hotat te je tyatun gele ahet tech janno...
neway tumhala itthe bhetun khup bare watle .....
hopefully actually lavkarch bhet hoil ashi ashha ahe
take care
god bless
Leonard Rebello
आव्हानांच्या सागाराशी लढण्यासाठी मुलाला प्रेरणा देणारे वडील. "जा बाळा, मागे वळून पाहू नकोस, मी पाहतो आहे तुला!!"
ReplyDeleteसर्व मित्र-मैत्रिणींचे मनापासून आभार.
मित्रा, तू ग्रेट आहेस... उशीत मुळुमुळु रडण काय असतं हे मला चांगलंच माहीत आहे, असो. ताई च्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!
ReplyDeleteखुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
ReplyDeleteइतके दिवस कित्ती तरी वेळा तुझ्या ब्लॉगवर आलो... पण प्रतिक्रया दिली नाही. काय लिहू काही सुचेना... इतकेच म्हणेन... "जगायचे आहे गड्या.. जगायचे आहे" ... :)
ReplyDeleteआता मात्र तू थोड़ा मोकळा झाला आहेस आणि लवकरच येतो आहेस ब्लॉग्गिंग विश्वात...
तुझी वाट बघतोय .. तुझा भटक्या मित्र.... आणि खादाड राज्याचा सरसेनापती...
रोहन... !!!
तुमचा ब्लॉग वाचते नेहेमी पण प्रतिक्रीया आज लिहीत्ये.
ReplyDeleteखरच एकदम हळव व्हायला झालं वाचून, कायम असेच खंबीर रहा.
मुंबई मेळाव्यात नक्की भेटू.
http://aryanchidumiya.blogspot.com/
अरे ही पोस्ट कशी सुचली नजरेतून....
ReplyDeleteखूप हळवे लिहीलेस अगदी आर्त...
पण खरचं तुझ्या आई-बाबांच्या नजरेने हे पत्र वाचते ना तेव्हा आपला मुलगा सक्षम होताना पाहून त्यांचे डोळे अभिमानाने भरून येताना दिसतात रे मला!!! हेच तर सुख आहे त्यांचे!!! वयाने मोठे होणे आणि अंगी मोठेपणा येणे हे नेहेमीच होत नाही, पण तू ते साधतोयेस...
अनेक अनेक शुभेच्छा!!
आयूष्यात आज पहिल्यांदा असे वाटले की तुझ्यासारखा एक भाऊ हवा होता मला....असाच खोडकर, वरकरणी मस्तीखोर वाटणारा पण मनात खूप काळजी करणारा....
प्रितम, कृष्णा: शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteरोहन, येतोय हळूहळू.
सोनाली, नक्की भेट होईल.
तन्वी, आईने अजून वाचली नाही. मीच दाखवली नाही. उगाच हळवी होऊन रडत बसेल. बाबा तर आता...
स्पीचलेस...
ReplyDeleteThanks a lot... Ya patra madhun mala pan ek sandesh milala.
ReplyDeleteHope ankhi sudhha barech jan to ghetil :)
Keep up dost... :)
Mitra ! Tumche Blog ani Photostreams follow karnarya anekanmadhala me ek evdhich tuzee mazee olakh ! He ya adhipan vachala hota pan comment takaychi Chhati nahi zali. kay karnar pratyek veli bharoon ala hota. Apratim lihila ahes !! Tu ani Dev doghahi tuzya kutumbachi kalji ghyal yat shanka nahi. Lekh vachun ghayal matra kelas pan tyach barobar anek goshtinchi jan matr ali.
ReplyDeleteBaki Natevaii kmhanshil tar changla ahe na! Are Dev manasalaa Natevaiik ka deto ? Mitranchi kimmat samajavi mhanun :) Cheers !
पंकज दादा,
ReplyDeleteतुमच्या ब्लॉग वरिल मागील पोस्ट वाचते आहे पण प्रतिक्रीया आज पहिल्यांदा देत आहे....शब्दात काही सांगता येत नाही त्यामुळे डोळ्यातुन पाणी वाहायला लागल....घरच्यांची व स्वतःची काळजी घे रे दादा........
धन्यवाद अजय, संतोष, मन्या, सुषमा.
ReplyDelete:'(
ReplyDeleteमला माहितेय हे तू मार्च मध्ये लिहिलयस....बरेच दिवस उलटून गेलेत...
पण काही गोष्टी जश्याच्या तश्याच रहातात...धार कमी नाही होत..
काळजी घे.
:)
निःशब्द
ReplyDeleteनिःशब्द....
ReplyDelete