Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

खा लेकहो... खा...!!!

By Unknown
/ in eateries food joints Pune
16 comments
फोटोशूट्स, विविध एव्हेंट्स आणि ट्रेक्सच्या दरम्यान पुण्यात आणि पुण्याबाहेर भटकंती करताना अनेकदा घराबाहेर खाण्याची वेळ येते. अशा वेळी मग नेहमीच्याच खाण्याला वेगळी चव देणारी ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न होतो. बऱ्याच वेळा आमची निवड चुकतेही. पण ज्या काही यशस्वी निवडी आम्ही शोधल्यात त्यातल्याच काही इथे मांडण्याचा एक चवदार उपद्व्याप.


सुरुवात करु सकाळच्या चहापासून. पहाटे साडेतीन-चारला पुण्यात २-३ ठिकाणीच चहा मिळतो. डेक्कन
चौकात पेपरवाल्यांसाठी एक चहावाला उगवतो. तसाच नळस्टॉप चौकात एका दुकानात मिळतो. तिथे रात्री नाईट मारून अभ्यास करणारे विद्यार्थी, आमच्या सारखे अवेळी हुंदडणारे भटके, रात्रीची उतरावयला आलेले तळीराम आणि गस्तीचे पोलीस सुद्धा इथे अमृततुल्य प्राशन करताना सापडतील. बहुतेक केदारेश्वर अमृततुल्य असे नाव आहे. असेच काही चहाचे गुत्ते टिळक रोड, स्वारगेट, युनिव्हर्सिटी रोड अशा भागांध्ये आहेत. चहाबरोबर काही तरी खायला हवेच. त्यासाठी ’मालपाणी’चे खुसखुशीत क्रीमरोल खरी मजा आणतात. रेशमी म्हणतात ना तसे हे क्रीमरोल आहेत. आधी फक्त सिटी प्राईडजवळ कुठेतरी मिळायचे, आता पुण्यात बऱ्याच जागी मिळतात. आमच्या फोटोग्राफर्स ऍट पुणेच्या बऱ्याच मीट्सना हाच खाऊ असतो. असेच चहाबरोबर खाण्यासाठी संतोष बेकरीचे पॅटीस. मस्त लेयर्समध्ये बेक केलेली भाजी चहाला लज्जत आणतात. सकाळे सकाळी पोटभरीचे खाणे होणे यासारखे सुख नाही. असाच एक फक्कड चहा चांदणी चौकातून खाली उतरताना कोपऱ्यावरच्या टपरीवर मिळतो.

पहाटेच्या वेळी युनिव्हर्सिटी चौकात एक अल्पोपाहार गृह उघडलेले असते. पोहे, उपमा, इडली असे वाफाळते पदार्थ पहाटे कुडकुडत खाण्यात एक वेगळीच मजा असते. जरा सोफिस्टिकेटेड जागा माणसांच्या वेळी (म्हणजे सकाळी आठनंतर) खाणार असाल तर ’वैशाली’ला ला पर्याय नाही. इडली-वडा, डोसा, सांबारमध्ये डुंबावे तर
वैशालीमध्येच. सुट्टीच्या दिवशी सकाळी तर अनेक आसपासच्या हेल्थ क्लबातली मंडळी पाठीला रॅकेट अडकावून इकडे गप्पा छाटत बसलेली असतात. वाडिया कॉलेजच्या मागे एक अण्णाची टपरी आहे. साऊथ इंडियन पदार्थ त्याच्यासारखे कुणीच बनवत नाही. कॉफी प्यावी ती मात्र ’गंधर्व’मध्येच. तिथल्या फिल्टर कॉफीसाठी तर मी कित्येकदा एका ठिकाणी खाऊन, वीस-वीस किलोमीटरची रपेट मारुन पोचलो आहे. उपवास असेल तर ’अप्पा’ची खिचडी काकडी अजिबातच चुकवू नका. पण आठवड्याच्या ठराविक दिवशीच ती मिळणार. इतर वेळी गेलात तर फक्त एक पक्का पुणेरी टोमणा पदरात पडेल. डेक्कन जिमखान्याचे कॅंटीन असणारे हे अप्पाचे हॉटेल सुनील गावसकरच्या ’सनी डेज’मध्ये उल्लेख केलेले आणि पुण्याचा क्रीडा इतिहासाचे साक्षीदार आहे. सध्य त्यांची ’चिरतरुण’ दुसरी पिढी पुण्याची क्षुधाशांती करत आहे. त्यांचे उसळपाव, इडली असे पदार्थ पण एकदम झकास. बरे हे हॉटेल केवढे? दीड-दोन फूट रुंदीचे ३-४ टेबलं आणि बसायला भिंतीला लागून असणारे सलग फळकुट. कळकटलेला पंखा आणि बाजूला लहानसा (खुराड्याएवढाच) भटारखाना. परतीच्या सुट्ट्या पैशांऐवजी काजू वडी मिळणार. जुन्या आणि नव्या पिढीतला एक समान दुवा म्हणजे ’गुडलक’. बन-मस्का, बन ऑमलेट आणि इराणी चहा- अजून काय पाहिजे नाष्ट्याला. असाच बन-मस्का कॅंपात डायमंडमध्ये मिळतो. पण ही इराणी हॉटेल्स प्रसिद्ध आहेत ती नॉन व्हेजसाठी, विशेषतः खीमा पाव साठी. लाकडी काच लावलेले काऊंटर, क्रीमरोलची बरणी, काचेतल्या कपाटात ठेवलेली बिस्कीटे, केक्स असा टिपिकल लूक असतो यांचा.

मिसळ खायला पुण्यात एसपी कॉलेजच्या समोर एक टपरी आहे. पेठेत बेडेकर मिसळ आणि ’काटा किर्र्र’ (हो, हे हॉटेलचे नाव आहे). अगदी फर्मास मिसळ पहिजे असेल तर सरळ चांदणी चौकातून पिरंगुट गाठा आणि घाट उतरल्याबरोबर उजवीकडे श्रीपाद हॉटेल आहे. राजगड, तोरणा मोहिमेवर असताना आमची स्वारी मिसळसाठी भोरच्या हॉटेल श्रीराममध्ये नाही विसावली तर नवलच. नाशिक हायवेवर राजगुरुनगरनंतर एक स्वामिनी नावाचे हॉटेल आहे. तिथेही छान मिसळ मिळते. केळकर म्युझियमजवळ बापटांची मिसळही नाकारण्याजोगी नाही. शिवाय सोबतीला खास जगद्विख्यात पुणेरी पाट्या पण असतात.

दुपारच्या जेवणाचा आणि आमचा संबंध ट्रेकदरम्यान कमीच येतो. आलाच तर वडापाव आणि चिवडा
यांवर काम भागते (घरुन डबा वगैरे कधीच बंद झालय. सुरवातीला कौतुकाने मिळायचा पण प्रत्येक वीकेंडलाच आम्ही उठून जायला लागल्यामुळे  "रोजचेच मढे, त्याला कोण रडे" अशी अवस्था आहे). तरी सिंहगडावर पिठलं भाकरी, भजी मिळते. आणि दुपारी सहसा व्हेज खात असल्यामुळे ते काय कुठेही खाल्ले तरी सारखेच लागते. पण तरीही वडापाव खावा तो सासवडला ’अस्मिता वडेवाले’ यांच्याकडे.

चटपटीत पदर्थांमध्ये पावभाजीचा नंबर पहिला. ती खावी ’मॉडर्न कॅफे’ला. तशी जंगली महाराज रोडच्या ’पांचाली’मध्ये पण बरी असते. पराठा खावा तो एफसीला ’चैतन्य’मध्ये. पाहिजे तो प्रकार मिळेल. पण त्यांनी नॉन व्हेज डिपार्टमेंट सुरु केल्यापासून माझे इतर पराठे बंदच झालेत.पराठ्यातले असेच नावाजलेले नाव म्हणजे ’शाहजी पराठा हाऊस’. तीन खाऊन दाखवले तर हा शाहजी तुमचा फोटो काढून ठेवतो, बिल घेत नाही आणि वर येण्याजाण्याचे रिक्षाचे पैसेही देतो.

मधल्या वेळचे खाणे म्हणजे बर्गर, पिझ्झा. बर्गरचे नाव काढल्यावर कॅंप आणि कोरेगाव पार्कातले बर्गर किंग कोण विसरेल? जंबो बर्गर आणि कोल्ड कॉफी घेतली की पुन्हा रात्री जेवायची इच्छाच राहणार नाही. असेच एक बर्गरचे पुणेरी व्हर्जन अलका चौकात मिळते. इथे सुप्रिया बेकरीत (लहान टपरी आहे) आले की संध्याकाळच्या भुकेची चिंता मिटते. कच्छी दाबेली साठी डेक्कनच्या कोपऱ्यावर एक दाबेलीवाल्याची गाडी आहे (देवकी नाव बहुतेक) तिथेच जावे. दाबेलीचे पाच-सहा प्रकार तर नक्की मिळतील. पौड रोडच्या दुर्गाचे नाव ऐकले नाही असा तरुण पुण्यात सापडणार नाही. अंडा भुर्जी आणि कोल्ड कॉफी पीत पीतच ही मुले कॉलेजमधून बाहेर पडली. अशीच अंडा भुर्जीची गाडी रात्री एसएनडीटीच्या मागे, कॅनॉल रोडवर लागते. पिझ्झा मी खातो ’स्मोकिन ज्यो’चा. अलीकडे ’ल पिझ्झेरिया’चे नाव पण बरेच ऐकलय.

रात्रीचे जेवण स्किप करायला निमित्त असावे कमला नेहरू पार्कासमोरच्या चिकन शोरमाचे (रोटीमध्ये रॅप केलेले चिकन आणि सॅलड). ’फासोज’चे रॅप पण ’सही’ असतात. रात्रीच्या जेवणाला जर मी बाहेर असेन तर
शक्यतो व्हेज खाण्याचे पाप मी करत नाही. मग त्यासाठी मग ’कावेरी’ची मटन-भाकरी (चार शाखा- वाघोली, खेड शिवापूर, चांदनी चौक आणि वाकड). ’पुरेपूर कोल्हापूर’ आणि आताच शोध लागलेले ’लवंगी मिरची’. लवंगी मिरची मध्ये आमचा मित्र सुहास तर आधीच सांगून ठेवतो, "आठ वाट्या पांढरा रस्सा पिल्याशिवाय उठायचेच नाही". पण मागच्या वेळी गोव्याला जाताना इस्लामपूर फाट्याला ’दत्त भुवन’मध्ये खाल्लेले मटण अजुनही आठवते. तसे परत कुठेच मिळाले नाही. चिकन साठी वाघोलीलाच एक ’पंजाब स्पाईस’ नावाचे हॉटेल आहे. तिथली तंदूरी कोंबडी फारच सही. मगरपट्ट्यातले ’रेड रोगन’ हॉटेल चिकन बिऱ्याणी मस्त द्यायचे, पण दुर्दैवाने बंद झाले ते. तिथेच ’डेक्कन हार्वेस्ट’ नावाचे हॉटेल आहे तिकडे चिकन चाट नावाचा अफलातून पदार्थ मिळतो. बाकी गुडलकमध्ये खीमा, चिकन-बेंगलोर स्टाईल मस्त मिळते. वाडिया कॉलेजजवळ ’ब्लू नाईल’चे बटर चिकन आणि बिर्याणी पण कधी चुकवू नये अशीच आहे. कॅंपमध्ये ’दोराबजीज’कडची दम बिर्याणीही छान असते. कबाब खावेत ’बार्बेक्यू नेशन’चे. थोडे महाग आहे पण तिथले अनलिमिटेड स्टार्टरवाले पॅकेज चुकवूच नये. चिकन, मटण, मासे, प्रॉन्स असे विविध प्रकारचे कबाब तुमच्या टेबलवरच बार्बेक्यु आणून मांडतात. हवे ते आणि हवे तेवढे खा. मग आम्ही काय सोडतो काय. वेटरला सांगून ठेवतो की व्हेज आणूच नको. दोन तास तर सहज जातात. एव्हाना आमचे तिकडे फोटो लावले असतील की हे लोक आले तर प्रवेश देऊ नये. खेकडे अतिशय सुंदर मिळतात तिथे. वर डेझर्टपण अनलिमिटेड. पैसे पुरेपूर वसूल. सी फूडसाठी कोकणाला पर्याय नाही. पण पुण्यात महेश लंच होम (कॅंप), मालवणी गजाली (बालेवाडी फाटा) यांनी थोडाफार कोकण आणलाय.

बाकी घासफूसवाल्यांसाठी जे-एम-रोडला बरीच हॉटेल्स आहेत. त्यातही शिवसागर, सुभद्रा, गंधर्व ही नावे जरा फेमस आहेत. थाळी साठी श्रेयस, दुर्वांकुर असे डायनिंग हॉल आहेतच, तसेच मंडईजवळ गोडसे उपहारगृहपण छान आहे.

डेझर्टसाठी विमाननगर आणि मगरपट्ट्यातले ’जलेबी जंक्शन’ आहेच. चितळे, काका हलवाई यांसारखे जगप्रसिद्ध मिठाईवीर आणि आइस्क्रीमसाठी नॅचरल्स, कावरे, गणू शिंदे, गुजर मस्तानी अशी अनेक नामांकित नावे आहेत.

आता किती वेळ वाचत बसणार आहात? डोळे झाकून एखादे ठिकाण निवडा आणि तिकडे पोचा. मी येतोच तुम्ही आमंत्रण दिलेत की... खा लेकहो... खा...!!!

या पोस्टमधील फोटो मी काढलेले नाहीत.

Related Posts

16 comments:

  1. Vaibhav22 November 2009 at 09:54

    भूक लागली राव आणि..खूप छान माहिती दिली आहे..लवकरच लवंगी मिरची ला भेट देतोय..बाकीचे पण होतील लवकरच

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. मंदार जोशी22 November 2009 at 10:00

    खातो लेका खातो पण तुला सोबत घेऊनच खाणार..!!! :)
    खादडण्याची संपूर्ण माहिती दिली आहेस..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. vikram22 November 2009 at 18:30

    फोटो पाहिल्यावर भूक लागली...
    :D

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Nikhil Joshi22 November 2009 at 19:59

    laeeee bhari!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. ArSh22 November 2009 at 21:57

    Kiti re non-veg bias to?
    aso, in non-veg itself, did you try polka dots? people tell me he has some good stuff.
    i like polka dots for the desserts, tiramisu to be specific. Lot of variety this guy has. Located at parihar chowk, Aundh.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Mohan Sathe22 November 2009 at 22:20

    aare mitra...adhich bhuk lagaleli aste aani tuze ase chatak dar blogs..
    :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. कांचन कराई22 November 2009 at 22:22

    सॉलीड लिहिलंयंस रे! भूक लागल्याची जाणीव झाली.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Saurabh Joshi22 November 2009 at 23:19

    Namsakar Pankaj,
    Lekh khupach chan ahe, Me Ghaspus wala aslya karnani ajun Pure Veg. thod cover kel astas tar challa ast.
    Pan 1 gosht Namud karawishi watate, Shri chya Khi-kaa sathi me 2-3 wela gelo khalli suddha, Pan darweli agdi wikshipt anubhav ala, ithe namud karawa as nahich, ani te dekhil kahi karan nastana, tyamule parat janaychi iccha nahi.
    Saurabh.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. ajinkya23 November 2009 at 06:38

    arrre mast re
    bhook lagali wachata wachata.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. सिद्धार्थ24 November 2009 at 01:28

    मस्तच रे. फोटो आणि वर्णन जबरा आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. रोहन चौधरी ...24 November 2009 at 13:29

    पुण्यामधल्या तश्या फारश्या जागा माहीत नाहीत पण पुणे स्टेशनच्या ST स्टैंडवर सुद्धा चहा आणि क्रिमरोल मस्त मिळतो रे ... एकदा तिकडे अचानकपणे भेटलेल्या मकरंद अनासपुरे आणि प्रसाद ओक बरोबर किस्सा झाल होता. कधीतरी लिहेन त्यावर तसेच त्या समोरच्या गल्लीमध्ये सुद्धा नाश्त्याचे पदार्थ मस्त मिळतात. (नाव लक्ष्यात नहीं आता जागेचे)

    भोरच्या हॉटेल श्रीराममध्ये मि सुद्धा गेलो आहे १-२ दा... :D सध्या तरी वाचण्यावाचून पर्याय नाही रे ... कामाहून परत घरी आलो की २-३ दिवस पुण्याला येउन मुक्काम ठोकावा म्हणतो ... :D

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Prashant4 December 2009 at 00:45

    चविष्ट लिहिल आहे. मजा आली. डेक्कन कॉर्नर चा दाबेलिवाला 'देवकी' नसून 'यशवंत' आहे. :)

    लिस्ट मधे थोडीशी अडिशन्स -
    *वहुमन कॅफे , जहांगीर हॉस्पिटल शेजारी - अप्रतिम चीज़ ऑमलेट.
    *अनारसे सामोसे - प्रबोधिनी जवळ
    *खानदेश - अस्सल खानदेशी भरित , चिकन आणि मटन रस्सा (2 शाखा - नल स्टॉप आणि उजवी भूसारी , कोथरूड डेपो)
    *कल्याण भेळ - ऑफ लॉ कॉलेज रोड - भेळ भारी आहे. कुल्फी पण मजेदार. रात्री जत्रा भरते तिकडे.
    *खवय्या मालवणी - आळंदी रोड - स्वस्तात मस्त मालवणी जेवण

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. David20 January 2010 at 06:45

    Nad khula lihla ahes bhavaaaaa,,june punyatale diwas athavle,, amha UK vasiyanaa ashe lekhach "gadya apla gavach bara,," chi athavan karun detat,,,many thanks,,,

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. प्रफुल्ल पारसकर8 April 2010 at 20:49

    संजीव कपूरचे yellow chillies (कोरेगाव पार्क), संजीव कपूरचे काही भारी पदार्थ खायला घालतात.... "त्तर्रीवाला मुर्ग" तर कळसच!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. Anonymous22 April 2010 at 09:30

    हे वाचून कसे तरी व्हायला लागले आहे. वाटते आहे की आत्ता च्या आत्ता एमआयटी कॉलेज पाशी जाऊन कोल्ड कॉफी प्यावी नि कॉलेजपाशी बसून रहावे - अगदी मध्यरात्रीपर्यंत !

    ता. क. : सध्या मी बंगलोरला वास्तव्यास आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. Aniruddha Enterprises27 February 2018 at 04:11

    Non Veg Mhatlyavar "JAGDAMB" hotel nakki add kara. Unlimited Thali Chickan and Mutton. Address: Near Shivapur Toll Naka. Sarv Padarth Sajuk Tupat Banavlele Astat.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1