मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.
दिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली गाडी व्हाया लाडू, करंजी, अनारसे, झालंच तर गेला बाजार चिवडा, शेव, चकली मार्गे उरलेले मनुका, शंकरपाळे यांवर जाऊन थांबली. पूर्वी गोडावर तुटून पडणारा मी या दिवसांत त्याकडे पाहतही नव्हतो. जीभ काहीतरी भन्नाट चटकदार, खमंग, झटकेबाज, कानात बोटे घालून पडदा हलवून गुदगुल्या घालायला लागाव्यात असा मेन्यू मागत होती. कालच्या दुपारी असा विचार मनात आला आणि या वीकेंडला ’कावेरी’त जाऊन मटण-भाकरी चापायचे नक्की केले. पण ही जिव्हा आहे न, ती काही ऐकत नव्हती. तिची तात्पुरते का होईना शांती केली पाहिजे ना. म्हणून मग सध्या भेळ-पाणीपुरीकडे बघू जरा असे ठरवले.
आजकाल बरीच दुकाने झालीत भेळ-चाट वाली. पण गाडीवर (वर म्हणजे शब्दशः वर नाही, तर बाजूला) उभे राहून खाण्यात जी मजा आहे ना, ती त्या एसी दुकानांत नाही. चारचाकी झाकलेली हातगाडी, तिला चाकांना दगड लावून स्थिर केलेले, एक बाजूला पिंप, त्याखाली एक बादली, गाडीवर भलीमोठी काचेची पेटी,
त्यात चुरमुरे, शेव, वर ओळीने मांडलेले टोमॅटो आणि कांदे, शेजारी स्टोव्हवर वाटाणा-बटाटा मिश्रण, पुऱ्या आणि वाऱ्यावर डुलणारा बोर्ड ’***** भेळपुरी सेंटर’ असा एक साधारण सगळ्यांचा अवतार.
मी गेल्याबरोबर...
गाडीवाला: या भाऊ काय खाणार? भेळ,पाणीपुरी, रगडापुरी, रगडापॅतिस, शेवपुरी, .... (अजुन काय काय नावे घेतली त्याने, पण आपले लक्ष्य एकच पाणीपुरी).
मी: पाणीपुरी खिलाओ की (आपले पुणेरी हिंदी).
तो: भाऊ, मराठी न तुम्ही? (आयला, याला कसे माहीत? विचारीन नंतर)
मी: हो मराठीच!
तो: मग मराठी बोला की! (घ्या, पाणीपुरी खायच्या आधीच ठसका).
तोपर्यंत माझ्या हातात त्याने एक स्टीलची लहान प्लेट ठेवली आणि त्याने पहिला ’सा’ लावला. एक हाताने गल्ल्यातून सुट्टे पैसे देऊन आधीचे गिऱ्हाईक कटवले दुसऱ्या हाताने सराईतपणे दोन फूट उंचीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून एक पुरी उचलली, चार बोटांवर धरुन अंगठ्याने कर्रकन तिच्या वरच्या पापुद्र्याला भोक पाडले आणि वाटाणा-बटाट्याचे थोडे मिश्रण त्यात भरले.
तो: गोड, तिखट की कमी तिखट?
मी: नॉर्मल... (सरळ उत्तर द्यायची सवय नाही आपल्याला).
त्याने ती मिश्रण भरलेली पुरी आधी एका चिनीमातीच्या बरणीत हलकेच बुडवली आणि मग एका मडक्यात
बुचकळली. बाहेर काढून मडक्यावर दोनदा खालीवर केली. एक्स्ट्रा पाणी त्यात पडले आणि मग काढून पाण्याचे थेंब पाडत माझ्या प्लेटमध्ये येऊन विसावली. मी पण (अति)सराईतपणा दाखवत घाईघाई ती उचलून सरळ तोंडात टाकली आणि गपकन तोंड बंद केले. आतमध्ये हवा आणि पुरीतल्या पाण्याचे असे काही स्फोटक मिश्रण तयार झाले की जणू सुरुंग फुटावा. नाकातोंडात पुरी(चे) पाणे. डोळ्यातून पाणी. कानातून धूर यायचा तेवढा बाकी होता. असा काही ठसका लागला म्हणता की ब्रम्हांड आठवले. रुमाल, प्लेट आणि मे स्वतः या सगळ्यांना सावरता सावरता तारांबळ उडाली. काय पण ध्यान आहे अशा नजरेने पाहत त्या गड्याने दुसरी पुरी ठेवली. पण सगळे सावरून स्थिर होऊन तिला हात घालेपर्यंत ती जरा जास्तच भिजली. आणि उचलून खाताना तिचे पाणी प्लेटमध्येच राहिले. हे पुरीचे आवर्तनपण फसले. नशिबाने त्याचे लक्ष माझ्याकडे नव्हते.
त्याने तिसरी पुरी मांडली. आता जरा अंदाज आला. ही पुरी अगदी व्यवस्थित तिच्या गंतव्य स्थानी पोचली होती. आता तर सगळे टेकनिकच आत्मसात झाले. त्याने पुरी मांडली रे मांडली की लगेच झडप घालून उचलायची. वर आकाशाकडे पहायचे (आणि हा असा पदार्थ बनवल्याबद्दल ’त्या’चे आभार मानायचे) आणि हळूच पुरी तोंडात सोडायची. मग वरती पाहतच तोंडाच्या तळाकडून सुरु करुन वरच्या बाजूला येत हवा बाहेर कढत मुखगुहा बंद करुन पुरीला जखडून टाकयचे. मग सावकाश टाळू आणि जीभेच्या मध्ये पुरीची कत्तल. पाणी घशावाटे पोटात. कत्तलीचे उरले-सुरले काम दात करतात. की लगेच नेक्स्ट... आहे की नाही एकदम सोप्पे टेकनिक? खाताना सगळी दिवाळी साजरी होत असते मुखगुहेत. तिखट लवंगी फटाका, आंबट फुलबाजे, गोड भुईनळे आणि नमकीन रॉकेट्स अशी सगळी आतषबाजी आतल्या आत सुरु होते. ही जी काही सरमिसळ टेस्ट असते ना पाणीपुरीची, ती प्रत्येक पाणीपुरीवाल्याची युनिक आयडेंटिटी असते. जगात कुठेही भटकलात तरी तशी सेम टेस्ट मिळायची नाही. पण त्याची सवय होते न होते तोच एका प्लेटचा कोटा संपतो पण जिव्हा शांत होत नाही. मग शेवटची पुरी तोंडात घोळवत खुणेनेच ’लगे रहो’ म्हणून गाडीवाल्याकडे प्लेट पुढे करायची.
त्याने पण आता खुशीत येऊन वरचा ’सा’ लावला. एकदा ’लगे रहो’चा इशारा मिळाला की मग दुसरा कोटा संपला तरी तो थांबला नाही. कारण त्याने जाणले की समोर दर्दी रसिक आहे. मग अशी काहे तंद्री लागली की आजूबाजूचे सूर ऐकूच आले नाहीत. पोट आणि मन भरले की मी हार मानून प्लेटमधले खाली राहिलेले पाणी पिऊन ती गाडीवर ’म्यान केली’. आणि मग तो पण शेवटची मसाला पुरी देऊन समेवर आला. आणि मैफिल संपल्यावर जशी वाद्ये आवरायला घेतात तसे मडके, बरणी झाकून ठेवली आणि पडलेले पाण्याचे थेंब पुसायला लागला.
तो: अजुन काय खिलवू?
मी (मनातल्या मनात): आता चहा मारायचाय, जो तुझ्याकडे मिळत नाही.)
त्याल बहुतेक मनातले ऐकू येत असावे, कारण त्याने उगाचच गल्ल्याचे झाकण उघडले. ही त्यांची ’पैसे द्या’ची खूण असते.
मी: किती झाले?
तो: XX रुपये.
क्स्क्स रुपये कसे झाले हा हिशोब विचारण्याच्या भानगडीत मे पडलो नाही. सगळे टेकनिक कळल्यावर तंद्री लागली असताना मी तेवढे खाल्लेलेच असणार. पैसे देऊन जाताना...
मी: मी मराठी अहे हे कसे काय समजले तुम्हाला?
तो: नॉन मराठी लोक अजुन दिवाळीच्या सुट्टीवरुन परत आले नाहीत.
मी (मनातल्या मनात): वा... काय लॉजिक आहे? मान गये... आपण ’मानले बुवा!!!’ लवकरच मे तिथून ’जय महाराष्ट्र’ केला आणि चहाच्या टपरीकडे वळालो.
तुम्ही पाहिलेला फटाकेवाला... आपलं पाणीपुरीवाला, त्याची काहीतरी खासियत असेल की. ती इथे कॉमेंटमध्ये लिहिलायला हरकत नाही बरं! :-) तेवढेच आम्हाला पुढे लिहायला हुरुप येतो...
(पोस्टमधला फोटो मी काढलेला नाही. इंटरनेटवर मिळालाय.)

आवडली बर का गोष्ट. फोटो ढापलेलाच लावायचा होता तर निदान पाणी पुरी चा तरी लावायचा! SPDP कशाला?
ReplyDeleteएकदम जबऱ्या पोस्ट. पाणीपूरी खायची कशी त्याचे वर्णन तर एकदम भन्नाट.भूक लागली रे इकडे वाचताना. आता संध्याकाळी बाहेर पडून खादाडी करायला हवी ज़रा. :D
ReplyDeleteकाय चमचमीत लिहिलय राव.. अगदी दिवाळीच्या / फटाक्याच्या स्टाईलमध्ये.... पाणीपुरीचे वर्णन छक्कासच.. वाचतानाच अगदी तोंडातुन पाणी पड्तेय की काय असं झालं होतं... ;)
ReplyDeleteहा ऽऽऽऽऽ मला पण आता पाणीपुरी खायची इच्छा होतेय. असल्या चमचमीत गोष्टी गाडीवरच खायला ब-या वाटतात. तुला तिखट, चमचमीत आणि मसालेदार पदार्थ आवडत असतील तर ठाण्याला कधी गेलास ना, तर मामलेदारची मिसळ खाऊन पहा.
ReplyDelete"मैफिल संपल्यावर जशी वाद्ये आवरायला घेतात तसे मडके, बरणी झाकून ठेवली आणि पडलेले पाण्याचे थेंब पुसायला लागला." - वा!
ArSh, पाणीपुरीचा फोटो तू काढला असतास तर तोच टाकला असता. इंडियन करी सारखा पाणीपुरीचा पण काढ की.
ReplyDeleteरोहन, भुंगा, कांचन: धन्यवाद...!!! आपल्याला आवडली पाणीपुरी, बरे वाटले.
जबर्या....
ReplyDeleteफटाके इथे तोंडात वाजताहेत असं वाटतय. मस्त लिहील आहेस.
ध्रुव
khup chan post ....thodi diferent hoti ..loved it...
ReplyDeleteaata aathavla khup divsat pani pur khaale nahiye .. majya tondala pani sutlay ... me lagech challo aahe pani puri khayalaa ...
Too gud :)
ReplyDeleteRohan ni pathavli hoti mala hi link
pan kharach post vachalyavar lakshat aala mi pan khoop diwasaat panipuri khalli nahie aani aata aajach khaun yein :)
aani ho तो पण शेवटची मसाला पुरी देऊन समेवर आला. he khoopach jast aavadla :)
keep it up
च्यामारी धरून फटॅक... आडस!!! एकदम झणझणीत.
ReplyDeleteपाणीपुरीची गोष्ट खूपच छान आहे...आणि वरचा "सा" वगैरे म्हणजे काही पाहायलाच नको....तुझं ब्लॉग टेम्प्लेट खूप छान आहे....
ReplyDeleteअशा आपल्या इथल्या टिपिकल खाऊगल्लीतल्या गोष्टी वाचल्या की इतक्या लांबच्या देशात येऊन पडल्याचं वैट वाटतं...चालायचंच....
आणि फ़ॉर चेंज मराठी पाणीपुरीवाला भेटला म्हणजे प्रगती हो....
Cha mari .. Now what I will do here ... no “Panipuri wala”.
ReplyDeleteBut before coming to India, I will arrange one “Panipuri Party” here.
It will not have the taste you described ... but will do it.
This is amazing description of panipuri. Pankaya ... you are writing too good man ....
I loved this post "Zanzanit hota"
"Jai Maharashtra"
अरे तू तर एकदम सेहवाग सारखा ताबड़तोड़ फलंदाजी करायला लागलास !! फारच भारी आहे राव !!
ReplyDeleteI want to meet You!
ReplyDeleteThat was an amazing write up.....kuthey gela hota pani puri khayla... mala pan address de ;-)
ReplyDeleteLaaiii bhari gosht aahe tuzya pani purichi re bar kaa...keep the good work dude..
ReplyDeleteBhari gadya... me pahilyandach tuza blog vachala.. aavdla aaplyala aekda... aaj upas modun pani puri khavi lagnare. tyachya shivay aatmaram thanda honar nahi...
ReplyDeletePakau ... :)(PJ)
ReplyDeletemala naahi waatale ki evadhe chatakadar post asel without any pics of urs...
ReplyDeletejabraat warnan keles... aawadale post..
hurup kaayam thev.. ani lihit raha !
[ PS - chayla, next time swataache photo use karr ki.. dhaaptos kaay :P tu chaangle kaadhshil ! ]
~ Samyak.
प्रचंड भारी वर्णन आहे. तोंडाला पाणी सुटलं!!!!
ReplyDeleteलई भारी!!!
आईगं.. पाणीपुरीची गोष्ट वाचता वाचता तोंडाला पाणी सुटलं!!! :))
ReplyDeleteमाझ्या एका कवितेचे बोल अठवले..
तुझ्या माझ्या आनंदाला
एक पाणीपुरी पुरेशी
अजुन काय कशाला...
बरे झाले त्या `भावाला' हे वर्णन वाचायला दिले नाहीस ते, नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने `साहित्य सहवास ' वांद्रे, येथे गाडी लावायला सुरवात केली असती.
ReplyDeleteफटाक्यांची पाणीपुरी कि पाणीपुरीचे फटाके
ReplyDeletewhatever...
आवड्या :)
खतरनाक आवड्या!
ReplyDeleteLocation Please.
ReplyDelete