साद सागराची, सफर किनारपट्टीची - 'पूर्वावलोकन'

मागच्या वेळी बरोबर २ ऑक्टोबरची सुट्टी जोडून सागराच्या हाकेला प्रतिसाद देत भटक्या टोळीचे १२ शिलेदार, सहा मशिन्स आणि अमर्यादित उत्साह घेऊन पुण्याहून निघालो होते. अलिबाग, कोर्लई, रेवदांडा, काशीद, मुरुड, जंजिरा, दिघी, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, बाणकोट, हर्णे, दापोली-मुरुड असे पल्ले गाठत महाड, ताम्हिणी घाट मार्गे पुण्यात पोचता पोचता बाईक्सचे ८०० किमी रनिंग झाले होते.
तो एक भन्नाट अनुभव गाठीशी बांधला होता. तेव्हाचे बोटीतून बाईक्स घेऊन जाणे, पाहिलेले सागरकिनारे, आडवा हात मारुन खाल्लेले मासे, भन्नाट राइड्स अश्या सगळ्या आठवणी मनात वर्षभर रुंजी घालत होत्या. उरलेला तळकोकणचा किनारा साद घालतोय असे जाणवत होते.
मग मे-जूनमध्येच सगळ्या आधीच्य भटक्यांना आणि काही नवीन सदस्यांना मेल टाकुन ’मन की गिटार छेड़ दी’! मागल्या वेळी दापोलीहून निघून सिंगल लॅप पुणे गाठण्याचा अनुभव होता. त्यामुळे या वेळी आधी तळकोकणात २ ऑक्टोबर कोल्हापूर-राधानगरी-फोंडा घाटमार्गे उतरुन उलट दिशेने गुहागरपर्यन्त ३ दिअवसांत येऊन चौथ्या दिवशी परत पुणे सिंगल लॅप करायचा विचार पक्का केला. इतरांनाही हा प्लॅन पसंत पडला. पण त्यासाठी आम्हांला २ ऑक्टोबरला पहाटे कोल्हापूरहून निघणे आवश्यक होते. आदल्या दिवसाची कुणाला सुट्टी पण नव्हती. मग बाईक्स ट्रकने पुढे पाठवून आम्ही रात्रीतुन कोल्हापूरला पोचायचे नक्की केले. म्हणजे पहाटेच्या प्रहरी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन तिच्या आशीर्वादाने वाटचाल सुरु करणार आहोत.
पण हा प्लान काही एवढा सहाजासहजी नाही झाला. ५-६ वेगवेगळ्या झूम लेवलचे नकाशे, इंटरनेटचा खजिना, अखंड चालणारे फोन, चार डोकी आणि रात्रीचे अखंड ४-५ तास. एवढी गुंतवणूक करून निश्चित केलय. पाहू आता पुढे काय होईल ते.

- १ ऑक्टोबर: रात्री पुणे -कोल्हापूर.
- २ ऑक्टोबर:कोल्हापूर - राशीवडे - राधानगरी - फोंडा - कणकवली - कसाल - मालवण - सिंधुदुर्ग - मालवण - हाडीआचरे - शिरगाव - देवगड
- ३ ऑक्टोबर: देवगड - विजयदुर्ग - पूर्णगड - पावस - रत्नागिरी
- ४ ऑक्टोबर: रत्नागिरी - गणेशगुळे - रत्नागिरी - भगवती - रत्नदुर्ग - जयगड - जाखादेवी - राई - भातगाव - आबलोली - हेदवी - वेलानेश्वर
- ५ ऑक्टोबर: गुहागर - धोपावे - दाभोल - दापोली - पुणे.
पण हा प्लान काही एवढा सहाजासहजी नाही झाला. ५-६ वेगवेगळ्या झूम लेवलचे नकाशे, इंटरनेटचा खजिना, अखंड चालणारे फोन, चार डोकी आणि रात्रीचे अखंड ४-५ तास. एवढी गुंतवणूक करून निश्चित केलय. पाहू आता पुढे काय होईल ते.
प्लान मस्तच दिसतोय :)
ReplyDeleteहा मात्र व्यवस्थित - सेफ - ड्रायविंग करा... !
शुभेच्छा!
I will miss all this fun guys.....
ReplyDeleteWill join you in some next plan
Have a safe and Nice trip
best of luck :)
ReplyDeletebest of luck
ReplyDeletekolhapur radhanagari ghat ekdam awesome, pavsalyat bike varun jaun dakhvayache dhadas karun paha!
ReplyDeleteOne suggestion...
ReplyDeletePlease prefer Karool ghaat than Fondaa. It takes you to Talere (Taralaa) in Kokan, which is just 88 Kms from Kolhapur. The ghaat is awesome... Road would not be in very good condition.
From Talere (Taralaa), VijayDurga is 1.5 hours, Deogad is 1 hour and so on. I think, this way might be better.
If your detailed plan is fixed and are not flexible about changes, go ahead with your plan. It is good, too.
Do enjoy and let us know the fun.
Great going,
Shekhar S Dhupkar
Best wishes.. maja kara. ani nantar photo pan post kara.
ReplyDeleteपंकज ... तगडा आणि जबरा प्लान आहे ... पण इतक्या कमी दिवसात इतक्या जागा म्हणजे भोज्जा करत पळावे लागेल रे :(
ReplyDeleteनुसते विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जयगड हे किल्ले करायचे म्हणजे किमान 'अर्धा दिवस' एकाला हवा ... आणि हो सुवर्णदुर्ग नाही आहे का प्लानमध्ये ???
>>> •४ ऑक्टोबर: रत्नागिरी - गणेशगुळे - रत्नागिरी - भगवती - रत्नदुर्ग - जयगड - जाखादेवी - राई - भातगाव - आबलोली - हेदवी - वेलानेश्वर
ReplyDeleteखूप धावपळ होणार आहे. रत्नदुर्ग किल्ला आणि रत्नागिरी परिसरच खूप वेळ लागेल कारण बघण्यासारखे खूप आहे. रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये समुद्रकिनारा आहे तोदेखील छान आहे.
sorry ha plan vachayala mala thoda ushir zala nahitar mi ha peksha chan sangitale asate...
ReplyDelete