दार्या घाट आणि ’बाळूगड’ ट्रेक
एकदा भटकंतीचे व्यसन लागले कि एखादा वीकेंड सुद्धा घरात खायला उठतो. अशाच वीकेंडच्या भटकंतीची चिंता गेला आठवडाभर लागली होती. शेवटी मिलिंद गुणाजीच्या 'Offbeat Tracks in Maharashtra' पुस्तकात वाचलेल्या दार्या घाटाचे नाव समोर चमकले.
झाले फटाफट मेला-मेली झाली, हो, नाही, नंतर सांगतो असे नेहमीचे सोपस्कार होवून चार जण आणि दोन बाईक्स ठरल्या. या वेळी सोबती होते मी, भूषण, श्रीकांत, सम्यक आणि लास्ट मोमेंट्ला अबोध. सगळ्यंना सोयीस्कर असा मीटिंग पॉइंट ठरला- भोसरी. भारतीय प्रमाणवेळेनुसार (म्हणजे अर्धा तास उशिरा) सगळे जमले.
सम्यकची नवीन बाईक एक्स्ट्रा झाली आणि ती चाकणमध्ये त्याच्या मित्राकडे पार्क करायचे ठरले, आणि आमच्या घोड्या (गाड्या) रस्ता दौडू लागल्या. चाकणमध्ये बाईक लावताना घरात येण्याचा आग्रह झाला, पण पुढ्यात असलेला बेत पाहुन परतीच्या वाटेवर भेट देण्याचे ठरले (आणि ते एका अर्थी बरे झाले, त्याचे वर्णन पुढे येइलच). नेहमीप्रमाणे राजगुरुनगरला ल स्वामिनी मधे मिसळपावचा नाश्ता झाला. खाताना श्रीकांत ने एक आयटम दिलाच. तो प्रत्येक वाक्याला ’बेसिकली’ लावत होता. त्याची खेचतच स्वारी जुन्नरच्या रोखाने निघाली. शिवनेरीच्या दर्शनाने सह्याद्रीच्या विराट रुपाची झलक मिळली होती. ऊजवीकडे माळशेज घाटरांगा श्रावणी उन्हात चकाकत होत्या. जुन्नर नंतर रस्त्याची अवस्था बदलून गेली. motocross अनुभव सुरु झाला होता. आधी बर्याचदा आल्यामुळे रस्ता तसा परिचयाचाच होता. आपटाळे गावातून मुख्य रस्ता सोडून गाड्या आणखी वाईट रस्त्याला लागल्या. आपटाळे-कोलदरे-उच्छल असे टप्पे गाठत अंबोलीला पोचलो. गावकरी पण मदत करणारे वाटले. व्यवस्थित रस्ता सांगितला. डावीकडे सह्याद्रीचा एक बेलाग कडा आव्हान देत होता, उजवीकडे एक वशिंड आणि एक सुळका थेट आकाशात घुसले होते. समोरच दार्या घाटाची खिंड कोकणातून येणार्या ढगांना वाट करुन देत होती. डझनभर मोठे आणि अनेक लहान जलप्रपात सह्याद्रीचे पाय धुण्यासाठी झेप घेत होते. त्यांच्या अवखळ प्रवाहाच्या नंतर संथ चंदेरी पायघड्या झाल्या होत्या. भातखाचरांमध्ये लावणीची लगबग चालली होती. तिन्ही बाजूंनी पर्वत श्रुंखला आणि अर्ध्या पर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हासित करीत होते.
गाड्या एक मावशींच्या घरासमोर लावून, रस्त्याची चौकशी करुन वाटचाल सुरु केली. अर्ध्या तासाच्या चढणीनंतर एका पठारावर पोचलो. थोडे फोटो काढून झाले आणि एक रुळलेली उजवी पायवाट पकडून उभी चढण सुरु केली.
गर्द झाडीतुन, दगड-चिखल तुडवत साधारण तासाभरात दार्या घाटाचे दर्शन घडले. थोडा श्वास घेतला आणि मन भरून मागे देश आणि समोर घाटातून खाली कोकण न्याहाळला. आत पुढे वाट शोधावी लागणार होती. दोन्ही बाजूंना सरळसोट उभे कडे होते. पण डावीकडे एक गर्द रानात झाकलेली पायवाट कड्याशी लगट करुन पुढे गेली होती. नाही-होय करता, तीच पकडून पुढे जायचे ठरले. जाताना कड्यावरुन पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर शिंपडले जात होते. शेवटी एका अशा जागी पोचलो की पुढे रस्ताच संपला. एक मोठा धबधबा आडवा आला. प्रचंड निसरडे शेवाळ होते आणि तीस फूटांची उभी अशक्य चढण होती. मग मात्र वाट चुकल्याची जाणीव ज़ाली. मागे वळुन पाहिले तर काही गुरे समोरच्या वशिंडाच्या काखेतुन वर चालली होती. वाटले की तो रस्ता असावा. झाले. फिरुन परत दार्या घाटात आलो. पहिल्यांदाच आमच्या बरोबर आलेला अबोध एव्हाना थकला होता. पण त्याला चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. विरुद्ध दिशेला चढाई चालू केली. काही अवघड वळणे पार करुन, झुडपांच्या आधाराने माथ्यावर आलो. काही फोटो काढले. भूषणला उड्या मारायला लावुन काही फोटो झले. मधेच श्रीकांताची ’बेसिकली’ बडबड सुरु होती. सम्यक त्याला शांत करण्याचे काम नेमून दिल्याप्रमाणे करत होता.
एवढ्यात काही बकऱ्यांचा आवाज ऐकू आला. हाका मारुन झाल्या आणि एक गुराखी समोर आला. पोरगेलासा, मिसरुड फुटलेला, डोक्यावर घोंगडी, हातात काठी आणि एकदम झक्कास स्माईल. राम-राम झाल्यावर जरा ढाकोबा आणि दुर्ग ची चौकशी केली. आणि त्याच्या उत्तराने आम्ही खाली लोळून हसायचोच बाकी राहिलो. ते दोन्ही ’इन क्वेश्चन’ किल्ले त्या समोरच्या बाजुला होते आणि जणू काही आम्हाला वाकुल्या दाखवत होते. पण मग आम्ही त्या सर केलेल्या डोंगराचे नाव विचारले, पण त्याल काही नावच नव्हते. मग आम्ही च त्याचे नामकरण त्या गुराखी मित्राच्या नावावरुन केले- ’बाळूगड’. त्या मित्राने मग थोडे धुके हटल्यावर आम्हाला ढाकोबा वर जाण्याची वाट लांबून दाखवली, पुढच्या वेळेसाठी.
एव्हाना २:०० वाजले होते. मग परतीचा रस्ता पकडला. तासाभरात पायथ्याला पोचलो. पुन्हा थोड़ी फोटोग्राफी झाली. आणि साधारण तीन वाजता परत जुन्नर कडे निघालो.
आपटाळ्याला एकदा विचार केला होता की चावंड जवळच आहे आणि मी आधी केलेला असल्याने लवकर होईल. जावे. पण तेव्हा अबोधचा चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला पाहून तो बेत रद्द केला. आता पोटातल्या कावळ्यांचे हत्ती झाले होते. सम्यकने आधीच चिकनचे नाव काढून हत्तींना उड्या मारायला लावले होते. जुन्नरमध्ये एक बरे हॉटेल माहीत होते. तिथे मस्त ताव मारला. घासफूस पब्लिकने पण काहीबाही खाल्ले आणि पुण्याचा रस्ता धरला.
चाकणला सम्यकच्या मित्राच्या घरी पोचलो. हा मित्र, अतुल एक विचित्र रसायन आहे, ज्याल सर्पमित्र (अर्थात परवानाधारक सर्पमित्र) म्हणतात. खोलीत जायच्या आधीच मनात शंका होती, पण गेलो. तर काय, पंख्याच्या पात्यावर एक हरणटोळ ठेवला होता. बाकी एक-दोन साप एकेका कोपऱ्यात पहुडले होते. एक लाकडी खोके दिसले. वरकरणी ते कुणाला बसायला असेल असे वाटले, पण त्याने ते फ़िरवले तर आमची बोबडीच वळाली. त्यातून एका सहा फूटी नागाने फुस्स्स... करुन फणा काढला. पण नशीब की तो काचेत बंद होता. भूषणने थोडा आगाऊपणा करुन काचेवर टकटक करत होता, पण नागराजाने असा काय काचेवर आतुन फणा मारला कि आमचे हे भूषण महाराज पाच फूट लांब उडाले आणि तिथून आम्ही लवकरच कढता पाय घेतला. तत्पूर्वी २-३ प्रकारचे नाग, एक मांडूळ, काही विषारी साप बरणीत असलेले दाखवले. खाली आल्यावर अतुलचा आणखी एक सर्पमित्र भेटला. त्याला अतुलने आपण "समोरच्या हूकाला किल्ली अडकवली आहे" जसे सांगतो, तशाच सहजतेने "पडद्याच्या रॉड वर हरणटोळ (Wine Tree Snake) ठेवलाय’ असे सांगितले. त्याने चहा पिताना आमच्या सर्पज्ञानात काही मौलिक भर घातली. ट्रेक करताना लागणार्या टिप्स दिल्या. सापांविषयीचे त्याचे काम सांगितले. सापांच्या अधिवासाच्या जागा सांगितल्या, ज्यात सह्याद्रीच्या जंगलांचा पण समावेश होतो.
आत मला सांगा की, जर आम्ही सकाळी त्या घरात गेलो असतो तर ट्रेक मध्ये त्या जंगलात जाउ शकलो असतो का?
From 'Offbeat Tracks in Maharashtra'
Darya Ghat was an important route for trade in cattle. Down below, there is an annual cattle fair in the village of Mhase. This region, encompassing the hills of of Meena Maval, Kukad Maval, are full of stories and legends. An oft-heard tale speaks of a man named Kondaji Navale. A rebel, he was some kind of a Robin Hood. Kondaji is said to have raised his voice against the atrocities of the dominant landlords. The years 1939-44 saw his fame spread far and wide. Even today, villagers sings paeans in praise of this man who had the courage of a lion and generosity of a saint. He was an expert at disguise and excelled in outwitting his pursuers time and again. Kondaji idolized by the locals but a thorn in the flesh of the authoriteies, gave many slip to the police, until he was finally arrested. In the end, it was betrayal by his own men that caused his arrest. Kondaji hailed from the little village of Ucchal at the base of the Darya Ghat. One can even visit the home of this legendary figure.
झाले फटाफट मेला-मेली झाली, हो, नाही, नंतर सांगतो असे नेहमीचे सोपस्कार होवून चार जण आणि दोन बाईक्स ठरल्या. या वेळी सोबती होते मी, भूषण, श्रीकांत, सम्यक आणि लास्ट मोमेंट्ला अबोध. सगळ्यंना सोयीस्कर असा मीटिंग पॉइंट ठरला- भोसरी. भारतीय प्रमाणवेळेनुसार (म्हणजे अर्धा तास उशिरा) सगळे जमले.
सम्यकची नवीन बाईक एक्स्ट्रा झाली आणि ती चाकणमध्ये त्याच्या मित्राकडे पार्क करायचे ठरले, आणि आमच्या घोड्या (गाड्या) रस्ता दौडू लागल्या. चाकणमध्ये बाईक लावताना घरात येण्याचा आग्रह झाला, पण पुढ्यात असलेला बेत पाहुन परतीच्या वाटेवर भेट देण्याचे ठरले (आणि ते एका अर्थी बरे झाले, त्याचे वर्णन पुढे येइलच). नेहमीप्रमाणे राजगुरुनगरला ल स्वामिनी मधे मिसळपावचा नाश्ता झाला. खाताना श्रीकांत ने एक आयटम दिलाच. तो प्रत्येक वाक्याला ’बेसिकली’ लावत होता. त्याची खेचतच स्वारी जुन्नरच्या रोखाने निघाली. शिवनेरीच्या दर्शनाने सह्याद्रीच्या विराट रुपाची झलक मिळली होती. ऊजवीकडे माळशेज घाटरांगा श्रावणी उन्हात चकाकत होत्या. जुन्नर नंतर रस्त्याची अवस्था बदलून गेली. motocross अनुभव सुरु झाला होता. आधी बर्याचदा आल्यामुळे रस्ता तसा परिचयाचाच होता. आपटाळे गावातून मुख्य रस्ता सोडून गाड्या आणखी वाईट रस्त्याला लागल्या. आपटाळे-कोलदरे-उच्छल असे टप्पे गाठत अंबोलीला पोचलो. गावकरी पण मदत करणारे वाटले. व्यवस्थित रस्ता सांगितला. डावीकडे सह्याद्रीचा एक बेलाग कडा आव्हान देत होता, उजवीकडे एक वशिंड आणि एक सुळका थेट आकाशात घुसले होते. समोरच दार्या घाटाची खिंड कोकणातून येणार्या ढगांना वाट करुन देत होती. डझनभर मोठे आणि अनेक लहान जलप्रपात सह्याद्रीचे पाय धुण्यासाठी झेप घेत होते. त्यांच्या अवखळ प्रवाहाच्या नंतर संथ चंदेरी पायघड्या झाल्या होत्या. भातखाचरांमध्ये लावणीची लगबग चालली होती. तिन्ही बाजूंनी पर्वत श्रुंखला आणि अर्ध्या पर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हासित करीत होते.
गाड्या एक मावशींच्या घरासमोर लावून, रस्त्याची चौकशी करुन वाटचाल सुरु केली. अर्ध्या तासाच्या चढणीनंतर एका पठारावर पोचलो. थोडे फोटो काढून झाले आणि एक रुळलेली उजवी पायवाट पकडून उभी चढण सुरु केली.
गर्द झाडीतुन, दगड-चिखल तुडवत साधारण तासाभरात दार्या घाटाचे दर्शन घडले. थोडा श्वास घेतला आणि मन भरून मागे देश आणि समोर घाटातून खाली कोकण न्याहाळला. आत पुढे वाट शोधावी लागणार होती. दोन्ही बाजूंना सरळसोट उभे कडे होते. पण डावीकडे एक गर्द रानात झाकलेली पायवाट कड्याशी लगट करुन पुढे गेली होती. नाही-होय करता, तीच पकडून पुढे जायचे ठरले. जाताना कड्यावरुन पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर शिंपडले जात होते. शेवटी एका अशा जागी पोचलो की पुढे रस्ताच संपला. एक मोठा धबधबा आडवा आला. प्रचंड निसरडे शेवाळ होते आणि तीस फूटांची उभी अशक्य चढण होती. मग मात्र वाट चुकल्याची जाणीव ज़ाली. मागे वळुन पाहिले तर काही गुरे समोरच्या वशिंडाच्या काखेतुन वर चालली होती. वाटले की तो रस्ता असावा. झाले. फिरुन परत दार्या घाटात आलो. पहिल्यांदाच आमच्या बरोबर आलेला अबोध एव्हाना थकला होता. पण त्याला चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. विरुद्ध दिशेला चढाई चालू केली. काही अवघड वळणे पार करुन, झुडपांच्या आधाराने माथ्यावर आलो. काही फोटो काढले. भूषणला उड्या मारायला लावुन काही फोटो झले. मधेच श्रीकांताची ’बेसिकली’ बडबड सुरु होती. सम्यक त्याला शांत करण्याचे काम नेमून दिल्याप्रमाणे करत होता.
एवढ्यात काही बकऱ्यांचा आवाज ऐकू आला. हाका मारुन झाल्या आणि एक गुराखी समोर आला. पोरगेलासा, मिसरुड फुटलेला, डोक्यावर घोंगडी, हातात काठी आणि एकदम झक्कास स्माईल. राम-राम झाल्यावर जरा ढाकोबा आणि दुर्ग ची चौकशी केली. आणि त्याच्या उत्तराने आम्ही खाली लोळून हसायचोच बाकी राहिलो. ते दोन्ही ’इन क्वेश्चन’ किल्ले त्या समोरच्या बाजुला होते आणि जणू काही आम्हाला वाकुल्या दाखवत होते. पण मग आम्ही त्या सर केलेल्या डोंगराचे नाव विचारले, पण त्याल काही नावच नव्हते. मग आम्ही च त्याचे नामकरण त्या गुराखी मित्राच्या नावावरुन केले- ’बाळूगड’. त्या मित्राने मग थोडे धुके हटल्यावर आम्हाला ढाकोबा वर जाण्याची वाट लांबून दाखवली, पुढच्या वेळेसाठी.
एव्हाना २:०० वाजले होते. मग परतीचा रस्ता पकडला. तासाभरात पायथ्याला पोचलो. पुन्हा थोड़ी फोटोग्राफी झाली. आणि साधारण तीन वाजता परत जुन्नर कडे निघालो.
आपटाळ्याला एकदा विचार केला होता की चावंड जवळच आहे आणि मी आधी केलेला असल्याने लवकर होईल. जावे. पण तेव्हा अबोधचा चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला पाहून तो बेत रद्द केला. आता पोटातल्या कावळ्यांचे हत्ती झाले होते. सम्यकने आधीच चिकनचे नाव काढून हत्तींना उड्या मारायला लावले होते. जुन्नरमध्ये एक बरे हॉटेल माहीत होते. तिथे मस्त ताव मारला. घासफूस पब्लिकने पण काहीबाही खाल्ले आणि पुण्याचा रस्ता धरला.
चाकणला सम्यकच्या मित्राच्या घरी पोचलो. हा मित्र, अतुल एक विचित्र रसायन आहे, ज्याल सर्पमित्र (अर्थात परवानाधारक सर्पमित्र) म्हणतात. खोलीत जायच्या आधीच मनात शंका होती, पण गेलो. तर काय, पंख्याच्या पात्यावर एक हरणटोळ ठेवला होता. बाकी एक-दोन साप एकेका कोपऱ्यात पहुडले होते. एक लाकडी खोके दिसले. वरकरणी ते कुणाला बसायला असेल असे वाटले, पण त्याने ते फ़िरवले तर आमची बोबडीच वळाली. त्यातून एका सहा फूटी नागाने फुस्स्स... करुन फणा काढला. पण नशीब की तो काचेत बंद होता. भूषणने थोडा आगाऊपणा करुन काचेवर टकटक करत होता, पण नागराजाने असा काय काचेवर आतुन फणा मारला कि आमचे हे भूषण महाराज पाच फूट लांब उडाले आणि तिथून आम्ही लवकरच कढता पाय घेतला. तत्पूर्वी २-३ प्रकारचे नाग, एक मांडूळ, काही विषारी साप बरणीत असलेले दाखवले. खाली आल्यावर अतुलचा आणखी एक सर्पमित्र भेटला. त्याला अतुलने आपण "समोरच्या हूकाला किल्ली अडकवली आहे" जसे सांगतो, तशाच सहजतेने "पडद्याच्या रॉड वर हरणटोळ (Wine Tree Snake) ठेवलाय’ असे सांगितले. त्याने चहा पिताना आमच्या सर्पज्ञानात काही मौलिक भर घातली. ट्रेक करताना लागणार्या टिप्स दिल्या. सापांविषयीचे त्याचे काम सांगितले. सापांच्या अधिवासाच्या जागा सांगितल्या, ज्यात सह्याद्रीच्या जंगलांचा पण समावेश होतो.
आत मला सांगा की, जर आम्ही सकाळी त्या घरात गेलो असतो तर ट्रेक मध्ये त्या जंगलात जाउ शकलो असतो का?
Sahi Aahe!!!
ReplyDeleteLai Bhari
ReplyDeleteHarin tol solid ahe!! I always dream of coming with u for such a ride... but.. :)
ReplyDeleteTrek, photos ani likhan tinhi ekdam chan ahe!
ReplyDeleteवाचताना मजा आली राव ! असेच लिहीत रहा !!
ReplyDeleteपंकज,
ReplyDelete"एकदा भटकंतीचे व्यसन लागले कि एखादा वीकेंड सुद्धा घरात खायला उठतो. " - अगदी खरं!
अरे हां... ह्या बाळुगड बद्दल - म्हणजे जायच्या रस्त्याबद्दल जरा सांग ना... काही वर्षांपुर्वी चाकणचा किल्ला बघायला गेलो होतो... शोधा-शोध करण अवघड गेलं कारण जवळ जवळ सारा गावच किल्ल्याच्या आत - किल्ला पाडुन राहिलाय असं वाटलं. एका आजोबांनी सांगितल्यावर किल्ला सापडला!
मित्रा एकदम जबरी वर्णन लिहिले आहेस..
ReplyDeleteमन प्रसन्न झाले. फोटो वरचा क्लास आहेत मग ह्या वीकएंड ला कुठे जायचे ?
सुंदर वर्णन आणि सुंदर चित्रण... मित्रा .. फोटो भारीच ...
ReplyDeleteमी इकडे झक मारतोय. माझा मान्सून सुका जाणार बहुदा...
अरे विकेंड कसला इकडे कामाचे ५ आठवडे खायला उठतात. मग आलो की मात्र महिनाभर फुलऑन भटकंती करतो...
ReplyDeleteभुंगा, अरे (अरे म्हटले की जरा जवळचे वाटते), बाळूगड हा काही खरा किल्ला नाही. पोस्ट मध्ये लिहिलय ना की आम्ही रस्ता चुकून ज्या डोंगरावर गेलो तो कुठलाच किल्ला नव्हता. मग आम्हीच त्याचे त्या गुराख्याच्या नावावरुन नामकरण केले "बाळूगड"...!!!
ReplyDeletepankaj ji amhala hi gheun jat ja ki rav ...avad ahe amhala pn.
Deleteमित्रा,
ReplyDeleteफोटो भारी आणि भटकंतीपण जमली......
कधी येणार मझा कॅमेरा :(
Laaii sahi warnan re...
ReplyDeletephotography tar khatarnak aahech...
ReplyDeletepan trek cha sare varnan suddha jabari aahe agadi...!!
very interesting
ReplyDeletecame here from flickr मराठी छायाचित्रकार group. Nice blog.just glanced thru, quality of writeups as well as photographs has bettered over months. happy treaking,photographing,blogging
ReplyDelete