Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

ढाकोबाचा थ्रिलर (खरं तर ढगोबाच)!!!

By Unknown
/ in Bhatkanti Unlimited bikeride dhakoba Sahyadri Trek
12 comments
मागल्या वेळी पाच जणांना ढाकोबाने हुलकावणी दिली होती. मागच्या आठवड्यात कळसूबाई ट्रेक करुन ट्रेकिंगमध्ये (so called) graduation झाले. लगेच दुसर्‍या दिवशी मी एकट्याने मल्हारगडचा बालवाडीचा धडा पण गिरवला. पण राहिलेला ढाकोबा खुणावत होता. मग या वेळी पुन्हा पाच लो़क निघालो. तीन गडी नवीन होते या खेपेला. देव, सम्यक आणि सुमीत यांचा समान दुवा म्हणजे ते मला ओळखत होते. आणि अमित फक्त सम्यकला. पण भटकंतीची हौस (खाज म्हणा हवं तर) ह सगळ्यांमध्ये समान दुवा. फोनाफोनी करुन प्लॅन फिक्स केला.



काहीही ओळख नसताना देव फक्त एका फोन नंबरवरुन अमितला शिवाजीनगरहून पिक करून घेउन आला. (याल म्हणतात टीमवर्क). भोसरी चौकात सगळे वेळेवर भेटलो आणि एक चहा मारुन "वेडात वीर दौडले पाच". रस्ता माहीत नसण्याचा प्रश्नच नव्हता. पंधरा दिवसांपूर्वीच तर येउन गेलो होतो. पुन्हा एकदा अंबोलीला पोचल्यावर सह्याद्री आणि धबधबे यांनी भुरळ घातली. कॅमेराचा क्लिकक्लिकाट सुरु झाला. आणि नंतर साडेदहाला चढाई सुरु केली. साधारण तासाभराची खडी चढण होती. अशातच जोरदार पाऊस सुरु झला. सगळा रस्ता निसरडा झाला होता, पाय सटकत होते. चालता चालता कही उपयोगी बुटांच्या ब्रॅँडसची चर्चा पण झडली. एक तासानंतर दोन टप्प्यात कोसळणारा धबधबा दिसला. पण इथे न थांबता पुढे सरकलो. थोडे आणखी चधून गेल्यावर एक प्रचंड मोठी गुहा दिसली. गुहा तरी बाहेरुन किती सुंदर. डोन डोंगरांच्या बेचक्यात लपलेली, अर्धचंद्राकार, कमीत कमी ७०-८० फूटांचा घेर, ५० लोकांना रात्रीचा सहज निवारा होइल अशी, आणि मधोमध तोंडावरुन कोसळणारा प्रचंड जलप्रपात. आतमध्ये मात्र अस्वच्छ होती. तिथे थोडावेळ काढून पुढे निघालो.



एका पठारावर पोचलो. एक लहान तलाव लागला. तिथे बरोबर आणलेले खाऊन घेतले आणि पुढे चाल केली. एका लहान टेकडीला वळसा घालून तिच्या मागे गेलो आणि दाट जंगलातून वाट काढून वर सरकलो.



माथ्यावर पोचलो तर काहीच अंदाज येत नव्हता. सर्वोच्च पतळीवर असल्या सारखे वाटत तर होते, पण इंटरनेट वर वाचलेले ढाकोबाचे मंदिर कुठेच दिसत नव्हते. मग पुन्हा दुसर्‍या वाटेने खालती उतरुन अंदाज घ्यायचे ठरवले. जाताना एक मामा भेटले. त्यांना ढाकोबाची आणि कोकणच्या बाजूच्या कड्याची वाट विचारली. आणि त्यानुसार चालत राहिलो. अर्धा तास पायपीट केल्यावर एका कड्याच्या edge वर पोचलो. पूर्ण ढग आणि धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. दिसत होता तो फक्त कड्यावरुन धुक्याचा समुद्र. याचा दुसरा अर्थ होता की पुढे रस्ता नाही. रस्ता पूर्ण चुकला असल्याची जाणीव झाली. मग मोबाइलच्या GPS ने ती पोजिशन मार्क केली. म्हणजे पुन्हा त्या दिशेला चुकून जाऊ नये म्हणून.



आता खूप भूक लागली होती. माघारी फिरलो. पुन्हा एका मळलेल्या पायवाटेने उलट निघालो. हेतू हा की ज्या डोंगराला वळसा घालून गेलो होतो तो उलट फिरून त्या तलावाजवळ पोचावे. चालुन चालुन आता कंटाळा आला होता. पुन्हा एकदा जंगलातून वाट काढत एका पठारावर पोचलो. वातावरण जरा नितळले. ढग हटले आणि पायथ्याचा गाव दिसू लागला. दूर valley मधे एक जलाशय पण दिसला. पण तो अंबोलीचा तलाव नव्हताच. आता मात्र खूप कष्ट करुन रस्ता शोधावा लगणार हे नक्की होते. म्हणजे ती valley अंबोलीची नव्हती. पुन्हा एकदा GPS markingकेले आणि backtracking सुरु केले.



एव्हाना ढाकोबाच्या डोंगराला दोन उलट-सुलट प्रदक्षिणा झाल्या होत्या. पोटातल्या ओरडणाऱ्या कावळ्यांचे पुन्हा एकदा हत्ती झाले होते. बरोबरचे सगळे खायचे कधीच संपले होते. पुन्हा अर्धा तास पायपीट केली आणि मग थोडे ढग क्लिअर झाले. सहज गप्पा मारता मारता मागे पाहिले तर एक झोपडीवजा मंदिर दिसले. हेच ते ढाकोबाचे मंदिर.







तिथे मग एक गुराखी काका पण भेटले, आणि त्यंनी रस्ता संगितला. आणि तो रस्ता आम्ही चाललो होतो त्याच्या बरोबर उलट दिशेला होता. म्हणजे ती भेट झाली नसती तर आम्ही नक्की अंधार होइपर्यंत भटकत राहिलो असतो. त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरुन तास भर चालल्यावर एकदाचा तो तलाव दिसला.



आणि मग तिथून खाली वाटचाल सुरू केली. येताना दोन टप्प्यात असलेला धबधब्याचे काही फोटो घेतले. तासाभरात खाली पोचलो. गाड्या काढून सुरू केल्या. सर्वात जवळचे हॉटेल किंवा दुकान असलेले गाव म्हणजे आपटाळे 14km दूर होते. पोचायला अर्धा तास लागला. एकमेव हॉटेल सापडले. सकाळी केलेली भजी अजुनही एका ताटात लोळत होती. गरम करुन द्यायला पण मालक तयार नव्हता. मग बिस्कीटे, भेळ, चहा असा बेत जमवला. तेवढाच पोटाला आधार.



नंतर सम्यक आणि अमित दुसर्‍या दिवशीच्या जीवधन ट्रेकसाठी नाणेघाटाकडे रवाना झाले आणि आम्ही तिघे पुण्याकडे, पुढच्या भटकंतीचे प्लॅन्स डिस्कस करत.




Fact file:
Name of the peak: Dhakoba.
Highest peak in the Ane-Malshej ridge.
Base village: Amboli, Tal-Junnar, Dist-Pune.
Route: Pune-Junnar-Apatale-Amboli
OR Mumbai-Kalyan-Malshej Ghat-Junnar-Apatale-Amboli (motorable road).
Distance: around 120km from Pune.
Tips: Carry enough food and water (in non-monsoon days). Avoid rainy season because of heavy fog atop.
Stay: Can be done in Dhakoba temple atop or in Amboli village. Cave not suitable for stay.
Surrounding: Darya Ghat, Durg fort, Chavand, Naneghat, Jivdhan, Kukdeshwar, Shivneri.


Related Posts

12 comments:

  1. vishaljagtap16 August 2009 at 23:10

    mastch...like the thrill of taking risk and finding the route...otherwise its irritating for others...wud u mind if i join u in sm trek?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. Pankaj - भटकंती Unlimited16 August 2009 at 23:28

    Vishal, why should I mind? As you read we were 5 ppl, few of them strangers to each other. But one moto "Bhatkanti chi khaaj". You are always welcome.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Vaibhav17 August 2009 at 00:05

    sahi re parat ek Nad Khula trek...i missed this one

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. भुंगा17 August 2009 at 00:23

    अरे वा! एकंदरीत ट्रेकिंग आणि फोटोगिरी ही मस्त झालेली दिसतेय...!
    काही महिन्यांपुर्वी आम्ही जीवधन [जीवघानी] ला गेलो होतो... मस्त परिसर आहे!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. @bhijeet17 August 2009 at 06:12

    apratim vatala vachun ... khara sangayach tar tula bharpur vela vicharnyacha rahun jatay ... bhatknatila jatana please sangat ja na ... malahi yayala aavdel

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Swapnil17 August 2009 at 19:54

    sahi re.
    asech lihit aani photography karat raha - Swapnil N

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Swapnil17 August 2009 at 19:54

    sahi re.
    asech lihit aani photography karat raha - Swapnil N

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Amit powar18 August 2009 at 00:07

    Whats the plan for this weekend(22-23)?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Anonymous18 August 2009 at 02:40

    tujha blog waachun punyala parat yaayachi ichha prabal hot jaate... baghu ya nashib kadhi parat bolaawate punyaat !

    Keep exploring... keep writing and keep clicking !

    ~ Samyak (trek madhala navhe, P@P wala :P )

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. vishaljagtap20 August 2009 at 23:14

    thanks pankaj...'khaj'..prachand aahe...kaalajee nasavi..me yeto call karun smtime...c ya

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Ganesh22 August 2009 at 03:21

    तुझ्या ब्लॉगचे RSS feed का बिघडले आहे? RSS link टाकली तरी पुन्हा Homepage वर वापस!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Shrirang23 August 2009 at 00:10

    पंकज, वर्णन अतिशय सुन्दर. परन्तु फोटो अधिक असते तर ते वर्णन जास्त खुलुन आले असते.

    तुला माहिती असेल की प्रसिद्ध सतार वादक विलायत खान व त्यांचा सुपुत्र शुजात खान छान गातात सुद्धा. कित्येकदा ते प्रथम गाऊन दाखवतात व मग त्या सुरांना सतारीवर तास, दोन तास खुलवतात. असे होते तेंव्हाच मजा येते. पण वाजवणे थोड़े व गाणे जास्त झाले की रसिकांचा विरस होतो, गाणे फार छान झाले तरीही.

    तसेच काहीसे झाले.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1