बागलाण भटकंती: मुल्हेर आणि मोरा
दूर डोंगरात अनवट रानवाटांवर पाऊस घुंगुरतोय. आषाढातले वार्याचे घुत्कार आता नाहीसे होऊन अधूनमधून त्याची मधुर वेणू नादवतेय.लकाकणारी श्रावणी उन्हाची बिलोरी किरणं शेतांशिवारांतून हिरेमाणकांची उधळण करतायेत. अशा वेळी जोडून सुट्टीची संधी आली असताना एसी आणि पीसीच्या जगात घुसमटत बसणे म्हणजे आपला मानवी करंटेपणा सिद्ध करण्याचा प्रकार. चार मित्र जोडून, शिधा-पाघरुणाने भरलेल्या बॅगा पाठीला अडकावून तोच पाऊस जगतरानवाटांची भूल पदरात पाडून घ्यायची संधी साधून बागलाण प्रांतात भटकंतीचा बेत केला. बोक्याने त्यात अरे साल्हेरला या दिवसांत खूप विजा कोसळतात, घसारा फार आहे वगैरे सांगून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण गेली कित्येक वर्षे साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-हरगड-मांगी-तुंगी असे स्वप्न महिन्यात किमान एकदा तरी पडायचे. योग जमला नाही. यावेळी मात्र नेटाने मेलामेली करुन देव्या, ध्रुव, श्रीकांत आणि सोबतच शशांक, प्रवीण, योगेश अशी सांगड घालून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळीच पुण्याहून आम्ही सातजणांनी प्रस्थान ठेवले.
मुल्हेर हे योगेशच्या मामाचे गाव. त्यामुळे तिथल्या हवामानाची फर्स्टहॅंड माहिती मिळत होती. पण ती तितकीशी उत्साहवर्धक नव्हती. शिवाय नुकतेच तिकडून परतलेल्या काही ट्रेकर्सनेही बागलाणात पाऊस धुवून काढतोय अशी माहिती दिली होती. पण मनाचा हिय्या करुन ट्रेक आखलाच. संसारी ट्रेकर्सचा हा आगळावेगळा स्वातंत्र्यदिन. ;-) चार दिवसांचा शिधा एवढा होता की ध्रुवची स्कॉर्पिओ असूनही सात जणांसाठी ती एकच गाडी घेणे म्हणजे दोघांना कायम पाय डोक्यावर ठेवून चारशे किलोमीटरचा प्रवास करणे भाग होते. म्हणून दोन गाड्या काढल्या.
सकाळी सकाळी युनिव्हर्सिटी सर्कलला चहाची फोडणी देऊन स्टार्टर मारला आणि दुपारचा ब्रेक घेतला तो नाशिकच्या पुढेच मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारच्या जेवाय जेवाय जेवायकरिता. एका धाब्यावर बसलो असतानाच पलीकडच्या टेबलावर एक सुपरमॅन बसलेला दिसला. म्हणजे इम्पिरियल ब्लूची (ड्राय-डे असूनही त्याला मिळाली) एक क्वार्टर तब्बल आठ मिनिटांत संपवली. प्यायची ही पद्धत म्हणजे एकदा पटियाला ग्लास भरायचा, पाणी ओतायचे…एकदा तोंडाला लावला की अर्धा करायचा, पापड मोडून एक तुकडा तोंडात टाकला की पुढच्या घोटाला ग्लास फिनिश. अशा अडीच ग्लासमधेच क्वार्टर डाऊन. आम्ही पोट धरधरुन दात काढत होतो. तेच दुखरे पोट भरल्यावर सुस्तपणे सटाण्याकडे जाणार्या रस्त्याने पुढे निघालो.
समोर वणीची सप्तशॄंगी देवीची रांग सप्तशॄंगगड, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा, हंड्या, लेकुरवाळा,इंद्राई, राजधेर-कोळधेर असे देवीचे अलंकार दिमाखात मिरवीत होती. सोगरस फाट्याहून आत वळालो तसा एक टोल नाका आला. बहुधा सह्याद्रीचे अजोड दृश्य पाहण्यासाठीचे तिकीटच. टोल भरताचक्षणी समोर दोन तीन शिखरे, हिरवेगार गवत आणि त्यात चरणार्या म्हशी असे सुंदर दृश्य समोर आले. कॅमेरे बाहेर निघतील तरच नवल.
सटाणा-ताहराबादमार्गे आम्ही मुल्हेरगावाकडे वळालो तसे उजवीकडे मांगी-तुंगीचे सुळके वर काढून आकाशात घुसलेले दिसले. समोर आजचा टार्गेट मुल्हेर, डावीकडे शेजारी त्याला एका अरुंद भिंतीने जोडलेला मोरा आणि उजवीकडे मुल्हेरहून उंच गूढ भासणारा अजस्त्र हरगड. योगेश त्याच्या मामाची भेट घेऊन आला आणि आम्ही मुल्हेरच्या पायथ्याला निघालो. साडेचारच्या सुमारास पायथ्याशी गाड्या लावून जड बॅगा पाठीला अडकावल्या. समोर दिसत होते आजचे लक्ष्य, मुल्हेरमाची.तासा-दीड तासाची चढण. पण छातीवर येणारी. टिपिकल नाशिक स्टाईल. म्हणजे सुरुवातीला सौम्य चढण, मग माची आणि अचानक आकाशाशी स्पर्धा करणारे कातळकडे.त्यातूच मध्येच त्याच्या पोटातून शिखराकडे घेऊन जाणारी वाट. वाटेत एका दरवाजाशी मुल्हेर गावी नवीनच रुजू झालेली शिक्षक मंडळी भेटली. एवढ्या मोठाल्या बॅगा आणि पुण्याहून येऊन बागलाणात चारपाच दिवस भटकण्याचा निश्चय पाहून अचंबित झाले. त्यांच्या गुजरातीमिश्रित मराठीतल्या शुभेच्छांचा स्वीकार करुन पुढे निघालो. शरीराला वॉर्मअप होईपर्यंतच श्वास फुलले. दोन दरवाजे पार करुन आम्ही दीडतासात माचीवरल्या गणेश मंदिराशी आलो. समोर शांत पुष्करणी (गणेश तलाव), त्याच्या मधोमध तेवढाच शांत योग्यासारखा ध्यान लावून उभा असलेला एक स्तंभ, पलीकडे गणेश मंदिर, त्याच्या मागे काळ्या ढगांशी लगट करणारे मुल्हेर आणि मोरा.
गणेश मंदिराच्या समोरुन जरा वरच्या अंगाला निघालो की वाटेला दोन फाटे फुटतात. एक जातो दुर्गादेवीच्या मंदिराशी आणि दुसरा सोमेश्वर मंदिराकडे. याच मंदिरात आम्ही आज रात्रीचा मुक्काम करणार होतो. याच वाटेवर झाडीत लपलेली चंदनविहीर (चंदनबाव) आहे. सोमेश्वराला पोचलो तेव्हा तेच ओळखीचे वातावरण होते जे नेहमीच प्रत्येक शिवालयाशी असते. गूढ,अज्ञाताशी एकरुप होणारे गर्भगॄह, कोपर्यात ठेवलेले नगार्यासारखे चर्मवाद्य, भिंतीवर एक डमरु. सभोवार कुंद हवा, विशिष्ट धूपाचा दरवळणारा सुवास, यज्ञकुंड, शेजारी समिधांचा ढीग. या सोमेश्वराच्या शेजारीच एका खोपटात एक साधू राहतो. बाहेर कट्ट्यावर काही मंडळी बसली होती. तिथे विसावलो. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या. माहिती काढता समजले की वर एक मोठी गुहा आहे आणि तिथे मुक्काम करता येतो. अजून अंधारले नव्हते. तिथे जाणे सहज शक्य होते. तेवढाच उद्याचा थोडा वेळ वाचणार होता. वाट विचारुन घेतली. ती समजल्यासारखे झाले आणि घाणेरीच्या जाळीतून अक्षरशः रांगत जाणार्या गायवाटेनं आम्ही निघालो.
मुल्हेर-हरगडाच्या मधल्या खिंडीपर्यंत जाऊन आलो तरी गुहेचा थांगपत्ता लागेना. संधिप्रकाशात समोरचा मुल्हेर गाव रेंगाळत होता. पलीकडे मांगी-तुंगी डोकावून पाहत होते. हरगडच्या सोंडेवरुन पलीकडे हरणबारीच्या धरणाचे चमकत होते. अंधारुन यायला अजून थोडा वेळ होता आणि आम्हांला रस्ता चुकल्याची जाणीव झाली. मागे फिरलो. आता सरळ मुल्हेरच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. तासाभरात बालेकिल्ल्याच्या दरवाजाशी पोचलो. आता अंधारले होते. समोर एकदोन गुहा होत्या. पण त्या काही सोमेश्वराजवळ मिळालेल्या वर्णनाशी जुळेनात. सगळेच दमले होते. टॉर्च बाहेर आले. होत्या त्या गुहा टॉर्चच्या प्रकाशात निरखून घेतल्या.सगळे कोपरे चेक केले. (पावसाळ्यात कानाकोपर्यात किडूकमिडूक असू शकते). हा बॅकअप प्लॅन ठेवून श्रीकांत आणि देव्या वर जाऊन त्या वर्णनाशी जुळणार्या गुहा मिळतात का ते पाहून आले. त्या काही सापडल्या नाहीत. पुन्हा मग आम्ही सगळेच माथ्यावर जाऊन नव्या वाटेने सात टाक्यांच्या आसपास आणि पलीकडल्या फेसला एखादी गुहा आहे का ते पाहू लागलो. एक गुहा सापडली सुद्धा. पण तिचा तळ दरवाजापासून किमान वीसेक फूट खाली होता. अमावस्या दोन दिवसांवर आलेली. त्यामुळे ढग नसले तरी चंद्रप्रकाशही नव्हता. रात्री नऊ वाजेपर्यंत अंधारात टॉर्च मारुन मारुन डोळे आणि पाय थकले आणि शेवटी आम्ही बॅकअप प्लॅन अमलात आणला आणि पाठीवरली ओझी खालच्या गुहेत टाकली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. निम्म्या गुहेत ओला शेणमिश्रित गाळ भरलेला, उरलेली जागा ओलसर. बाहेर सात फुटांची ओसरी होती त्यात आम्ही सातजण झोपणार होतो.
पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.पुढली लढाई होती ती स्वयंपाक करायची. या दिवसांत सुके जळण नसल्याने आम्ही रॉकेलचा स्टोव्ह घेऊन आलो होतो. पण त्यानेही ऐन वेळी दगा दिला. योगेश “द फायर फायटर”ने लाख प्रयत्न करुनही स्टोव्हने काही नीट श्वास घेतला नाही.श्रीकांत बसल्या जागेवर डुलक्या काढत होता, दुखर्या गुडघ्याने शशांक रिटायर होऊन डाराडूर होऊन झोपला होता. मध्येच पाच किलोमीटरचे अंतर आपण पंधरा मिनिटांत चालत जाऊ शकतो असे अतिमहान वक्तव्य करुन श्रीकांतने धमाल उडवून दिली. त्याबद्दल त्याला Mr. Nut (Ussain Bolt चा भाऊ) अशी पदवी समस्त भटकंती परिवारातर्फे बहाल करण्यात आली. चमच्याच्या सहाय्याने उपलब्ध रॉकेलचा मारा एकमेव ओलसर लाकडावर करत टोमॅटो सूप, मॉनच्यॉव सूप, सूपी नूडल्स, मॅगी असं सगळं एकत्र करत रात्री अकरा वाजता काहीतरी खाण्यालायक(??) पदार्थ तयार केल्यावर तो कसाबसा पोटात ढकलला. तयार करताना त्यात थोडे रॉकेल पडले होते हे फक्त देव्या, मी आणि ध्रुवलाच माहित होते. सात फुटांत(ओसरीवरुन खाली पडू नये म्हणून) एकमेकांच्या हातात हात घालून, शेवटच्याला दोरी लावून झोपी गेलो.अर्धवट विझलेली चूल, त्यातून निघणारा ऊबदार धूर, समोर अंधारलेले अनामिक भासणारे गूढ नयनरम्य आकाश, त्याच्यावर दिसणारी मोरा किल्ल्याची सावली, खाली एखादा चुकार दिवा चमकावणारे मुल्हेर गाव, झोपेत स्वीट-पेनची अनुभूती देणारे थकलेले पाय… याहून सुंदर रात्र असूच शकत नाही. रात्री काही लोकांची थंडीने आणि बोचर्या वार्याने पार वाट लावली होती ती गोष्ट वेगळी. पण ओव्हरऑल पहिला दिवस एकदम भारीच गेला.
सकाळी उठलो एकेक जण वाघ मारुन आला.तेव्हाही सेम “रॉकेलमारा रेसिपी” वापरुन चहा तयार केला गेला आणि आम्ही फ्रेश झालो. हरगडाकडे घुसणारी सोंड ढगांच्या चादरीत होती. मोराच्या मागे ढगांआडून सूर्य ड्युटीवर येत होता. त्याची सोनसळी समोर मुल्हेर गाव आणि हरणबारी धरणाचा वेध घेत होती. न्हावी-मांगी-तुंगी अजूनही ढगांच्या दुलईआडच आळोखे-पिळोखे देत होते.
मोरा मात्र जागा होऊन टुकूर टुकूर आमच्याकडे पाह्त होता, बोलावत होता. बालेकिल्ला पहायला निघालो. हरगडाच्या दिशेने घुसलेल्या सोंडेवरुन तिकडे टोकाशी गेलो. समोर हरगड, डावी-उजवीकडे सुंदर हिरवीगार दरी.
गडफेरी आटोपून आम्ही मोराकडे जाणार्या खिंडीशी आलो.आतापर्यंत भग्न राजवाड्याचे अवशेष, अनेक दरवाजे, भडंगनाथाचे उद्ध्वस्त मंदिर असे पाहून झाले होते. मुल्हेरच्या कातळकोरीव पायर्या उतरुन आणि तशाच मोराच्या पायर्या चढून आपण मोरा किल्ल्यावर पोचतो. दरवाजाच्या उजव्या अंगाला एक कोरीव गुहा आहे. गुहेतील दोन स्तंभावर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या अंगाने गड पहायला सुरुवात करुन अनेक टाक्यांची साखळी पाहत असताना फेरी आटोपती घेताना एक मोठे टाके दिसते. एकदम दरीच्या मुखाशी असलेले हे टाके आणि त्यातील निर्मळ पाणी. त्यात दिसणारे आकाशीचे प्रतिबिंब. वेड लावणारे हे दृश्य.
लहानसा हा मोरा किल्ला मुल्हेरचा पहारेकरी म्हणून बांधलेला. अर्ध्या पाऊण तासात पाहून होतो. पुन्हा दरवाजातून बाहेर येऊन खालील दोन दरवाजांच्या साखळीतून आपण मधल्या खिंडीत पोचतो. खाली सोमेश्वराचे मंदिर स्पष्ट दिसते. त्याचा रोख करुन आम्ही झाडीतून वाट काढली आणि सोमेश्वराशी येऊन पोचलो. ध्रुव शशांकला घेऊन आला. त्याचा गुडघा अधिकच त्रास देत होता. त्याची बॅग घेऊन मी पायथा गाठला आणि पाठोपाठ इतर मंडळी आली. जरा वेळ आंब्याच्या झाडाखाली पारावर विश्रांतीसाठी अंग टाकलं आणि समोरमुल्हेर आणि त्याचे साथीदार निरोप देत होते. प्रत्येक मुक्काम गडावरल्या गुहेत करण्याचा आमचा मानस असल्याने आम्ही हरगडाचा बेत रद्द केला आणि आजच साल्हेरचा माथा गाठायचे ठरवले. शशांकला अर्थातच साल्हेर झेपणार नव्हता.पायाची काही मोठी हानी होऊ नये म्हणून त्याला कंपल्सरी रिटायरमेंट दिली आणि योगेशच्या मामांच्या घरी चहा घेऊन त्याला ताहराबादच्या जीपने रवाना केले.मामांच्या घरुन पुढल्या साल्हेर मुक्कामासाठी खिचडी करुन दिली आणि आम्ही उरलेले सुपर सिक्स साल्हेरच्या पायथ्याला दुपारी दीड वाजता दाखल झालो.

तुमचे ब्लोग्स फारच इंटरेस्टिंग असतात. मी हल्लीच जोइन्त झालो आहे
ReplyDeleteतसेच मलाही भटकंतीची आवड आहे. एखादा चांगल्या brandcha tent ४ माणसांचा सुचवा…
विनोद परब, मुंबई