caravan-dreams
काल रात्री एक स्वप्न पडलं मला. एक कॅराव्हॅन घेतली मी. निघालो कुटुंबाला घेऊन. वाटेत ओढ्याच्या पुलावरुन जाताना खळाळणारे पाणी दिसले. त्यात उड्या मारल्या. गाडीवर पाणी मारले. टळटळीत दुपारी रस्त्याच्या कडेला झाडाखाली तीन दगडांची चूल करुन काहीतरी बनवून खाल्लं. पारंब्यांना लटकलो, शेतातून चाललेल्या पाटाचं पाणी प्यायलो, थोडी ताणून दिली. पुढे निघालो. संध्याकाळी दूर एका गावात कोरा चहा प्यायलो. रात्री उघड्या आकाशखाली तलावाकाठी तंबू लावला, अंगणात यथेच्छ हुंदडलो, शेजारची टेकडी चढून आलो. तलावाकाठी दगडावर पाण्यात पाय सोडून बसलो. दोन काजवे काचेच्या बरणीत ठेवले, त्यांच्या गंमत पाहून सोडून दिले, असेल नसेल ते खाल्ले, तंबूच्या जाळीतून आत येणार्या चांदण्या मुलीला दाखवल्या. रात्री उशिरापर्यंत चिऊकाऊच्या गोष्टी चालल्या. नंतर खास कुमार गंधर्व "सुनता है गुरु ग्यानी" आळवून आमच्यावर जादू करुन गेले. गार वार्यासवे निद्रेने अंगाई म्हटली...
रात्री केव्हा तरी दोन्ही हातांना मुंग्या आल्या म्हणून जाग आली तर माझ्या एका कुशीत बायको आणि पोटावर मुलगी झोपलेली. जाऊ द्या कशाला हालचाल. आलेल्या मुंग्याही जातील या अशा सुंदर tranquilizer इफेक्ट ने.
goosebumps!
ReplyDeletesundar... atisundar.
ReplyDeletesapne dekhne chahiye, jarur dekhane chahiye.
pata nahi kab kon sa sapna sach ho jaye...