आता तरी येशील?
अरे आकाशीच्या नभा,
नकोय निळे आकाश,
नकोत कापशी ढग,
नकोत असे संध्यारंग,
नकोत अंदाज, नकोत आडाखे,
नकोत क्षितिजावर चाहुली,
कितीक देशील आता हुली,
नकोत नुसत्याच हुरहुरी.
बघ ना तूच,
रान कसेबसे राहिलेय तगून,
डोळेही शिणले वाट बघून,
ढगही चालले निघून,
जीवाला घोर राहिलाय लागून
काय मिळतंय तुला असे वागून?
रान कसेबसे राहिलेय तगून,
डोळेही शिणले वाट बघून,
ढगही चालले निघून,
जीवाला घोर राहिलाय लागून
काय मिळतंय तुला असे वागून?
Khup chan lihili ahes!
ReplyDelete--Amit Manohar
खरचं पावसा कधी येशिल.
ReplyDeleteह्या रणरणत्या उन्हात जीव सुकलाय रे माझा….
ReplyDeleteखरचं सांग पावसा तु कधी येशील…