लडाख ड्रीम्स-2 (केलॉन्ग-जिस्पा-पांग)
लडाख ड्रीम्स तर कालपासूनच सुरु झाले होते. आमचे फोटोग्राफर मित्र
मैत्रिणी म्हणजे देवेंद्र आणि त्याची सौ. मंजिरी, सौमित्र, चैतन्य, स्वाती
हे तर कालपासून नुसते फोटो काढत सुटले होते. एकामागून एक कल्पनातीत फ्रेम्स
मेमरी कार्ड्समध्ये कैद होत होत्या. कालच्या मनाली-रोहतांग-केलॉंग
प्रवासाने अंग असे काही शेकून निघाले होते पडल्या पडल्या झोप आणि स्वप्ने
एकदमच सुरु झाली होती. आणि फोटोग्राफर कितीही थकलेला असला तरी झोपताना
सुर्योदयाची वेळ पाहणार, सुर्योदयाचे फोटो कुठून मिळतील याची जागा हेरुन
ठेवणार आणि वेळेआधीचा गजर लावून मगच झोपणार. केलॉंगची सकाळ तर काहीशी
वेगळीच असणार याची खात्रीच होती. दरीच्या टोकाशी वसलेले चिमुकले केलॉन्ग
चिमुकले केलॉन्ग, दरीच्या पलीकडे समोर पर्वतरांग, डोंगर उतारांवर शेती आणि
एका कोपर्यातून पलीकडल्या खोर्यात जाणारा मनाली-लेह हायवे.
पहाटे जाग आली ती पाखरांच्या आवाजाने. समोरच्या खोर्यात हालचाल
सुरु झाली होती. हिमाचली लोक शेतांच्या वाफ्यांच्या मधून येजा करत होते.
दरीच्या पलीकडल्या गोम्पामध्ये प्रार्थनांचे आवाज घुमत होते. गावावर उठलेली
धुरांची वलयं आणि उंचावलेला मोबाईल टॉवर ते दृश्य अधिकच सुंदर करत होता.
सूर्य जसजसा वर चढू लागला तसे ते खोरे एका वेगळ्याच झळाळीने लकाकू लागले.
आम्ही हॉटेलरुमची बाल्कनी, वरचे टेरेस अशा मिळेल तिथून फोटो काढत होतो.
मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही आन्हिकं उरकून नाश्ता केला. काल गाडी
स्टार्ट व्हायला थोडा किरकोळ त्रास देत होती. स्टार्टर खूप वेळा मारावा
लागत होता. रस्त्यात पुन्हा त्रास नको म्हणून टॉमने ती रिपेअर होते का ते
पाहून आला. पण त्यात काही यश आले नाही. टॉमने कालचे आमचे हाल पाहून
टॉमीणबाईंना आधीच बसने पाठवून दिले होते. त्यामुळे आम्हांलाही आता गाडीत
जरा व्यवस्थित बसता येणार होते. सामान लोड करुन आम्ही केलॉंग सोडले. त्या
कोपर्यातल्या रस्त्याने निघून जिस्पाच्या दिशेने गाडी दौडू लागली.
आजचा प्रवासाचा पल्ला बराच मोठा होता. जवळपास
साडेतीनशे-पावणेचारशे किलोमीटरचा टप्पा पार करुन लेहला पोचायचं होतं, तेही
अतिशय वाईट अवस्थेतल्या रस्त्यावरुन. लडाखमध्ये अंतर हे किलोमीटरमध्ये मोजत
नाहीतर ते तासांमध्ये मोजतात. टॉमच्या हिशेबाने तो प्रवास बारा-तेरा
तासांचा आहे. जिस्पा हे असेच एक चिमुकले खेडे. उजवीकडे केलॉंगकडून जाताना
खांगसर आणि पुढे जिस्पा अशी खेडी येतात. डावीकडे पर्वतापर्यंत गवताळ मैदाने
आणि उजवीकडे तशाच गवताळ मैदानांपलीकडे खोलवर भागा नदीचे खोरे. सकाळच्या
उन्हात चमचमते पाणी, गिरिशिखरे आणि मैदानांत उठावलेली लहानखुरी घरं,
हिरव्या गवताच्या पार्श्वभूमीवर पांढरे कॅंपसाईट्स आणि कायम साथ करणारे
पांढर्या ढगांची झालर ल्यालेले निळेशार लडाखी आकाश. काही ठिकाणी अगदी
दरीच्या तळाशी असलेले गोम्पा. खाली अर्थातच कुठल्याही फोटोग्राफरसाठी
आदर्शवत. म्हणजे प्रत्येक वळणावर टॉमला "रुको" असं म्हणणं आलंच. प्रत्येक
रुको नंतर गाडीतून उतरणे, कॅमेरे सरसावणे, फोटो काढणे, पुन्हा गाडीत बसणे
असे सोपस्कार होतच होते. त्यात वेळ जात होता. शिवाय गाडीही बंद करता येत
नव्हती कारण तिइ पुन्हा चालू होण्यास त्रास देत होती. पण टॉमची अजिबात
तक्रार नव्हती. "आप फिकीर मत करो. मैं आपको लेह पहुँचाता हूँ" असं सांगून
आम्हाला प्रोत्साहन देत होता. लडाख फोटोग्राफी टूरसाठी चांगला ड्रायव्हर
मिळणे फार महत्त्वाचे आहे. कारण आयुष्यात अशा टूर्स फार कमी होतात आणि
आपल्याला फोटो काढायचे असतात आणि ड्रायव्हरला रस्ता कापायचा असतो. त्याने
कदाचित खटके उडून ट्रिपची मजा निघून जाते. शिवाय दोन्ही बाजूंचे आपापल्या
कामांवरुन लक्ष उडून परिणाम अधिक वाईट होऊ शकतात.
केलॉंगपासून पुढे झिंगझिंगबारपर्यंत रस्ता थोडा बरा आहे. झिंगझिंगबार हे नावच आम्हांला फार आवडले. बहुतेक इथे सगळे झिंगण्याचे बार असावेत असंही वाटून गेलं. पण खरं तर तो बीआरओतर्फे रस्त्याचे काम करणार्या मजुरांचा कॅंप आहे. लहानसे तात्पुरते चहाचे रेस्टॉरंट आणि खायला मॅगी वगैरे मिळते. थोडे पुढे गेलो की काही पडक्या सोडून दिलेल्या लष्करी इमारती दिसतात. इथेच सूरजताल आहे. आरशासारखे लख्ख स्थिर पाणी त्यात आपले प्रतिबिंब पाहणारी गिरिशिखरांची रांग. आणि तेथून पुढे आपण उंचावर चढत जातो. दारचा-लाच्या दिशेन. (ला म्हणजे खिंड, दारचा खिंड). खिंडीच्या आधी नदीवर प्रचंड पुलाचे काम सुरु आहे. तो पूर्ण झाला की सर्व ऋतूंमध्ये वाहतूक निर्वेध होऊ शकेल. सध्या बर्फ वितळला की नदीचे पात्र रोरावते आणि वाहतूक बंद पडते. दारचा गावातून आपण जसजसे खिंडीत चढत जातो तसतशी गार हवा जाणवायला लागते. हवेतील ऑक्सिजन पातळी घटल्याने थोड्या श्रमानेही थकायला होते. काहींचे डोके चढते. पण ते तात्पुरतेच, खिंड ओलांडून मैदानात उतरलो की पुन्हा पूर्ववत. इथून पुढे हिमालयाच्या रांगा अंगावर आल्यासारख्या दिसतात. इंग्लिशमध्ये टॉवरिंग पीक्स (towering peaks) ज्याला म्हणतात तसेच. रस्ता खराब होऊ लागतो. प्रत्येक उंचावरच्या खिंडीत रस्त्याची हीच अवस्था आहे. सतत कोसळणार्या दरडी आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचे लोंढे यांसमोत रस्त्याचा टिकाव लागणे कठीणच. पण त्याही परिस्थितीत ते चालू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. दारचा-ला उतरुन आपण पुन्हा सारचूच्या मैदानात उतरतो. सारचू नदी डावीकडे आपली साथ करत असते ती अगदी सारचू गावापर्यंत. सारचू हे हिमाचल प्रदेशातले शेवटचे ठाणे. इथून पुढे हिमाचलचा लाहौल-स्पिती संपूण जम्मू-काश्मीर राज्याची हद्द सुरु होते. अर्थातच चेकपोस्ट आहे आणि आपले परमिट दाखवावे लागते. नदीवरचा पूल ओलांडून गावात प्रवेश केला तेव्हा दुपार झाली होती. आणि आम्ही ऑफिशियली भूनंदनवन काश्मीरमध्ये प्रवेश करत होतो. सारचूमध्ये लहानलहान हॉटेल्स आहेत. तिथे नूडल्स, चहा, दालरोटी, सब्जी अशी खाण्याची बरी सोय आहे. मागे सारचू नदी, पलीकडे गिरिशिखरे, त्याच्या पार्श्वभूमीवर सुंदर भडक रंगांत रंगवलेली हॉटेल्स आणि तिबेटी झेंडे, दूरवर रंगीबेरंगी कॅंप्सचे तंबू, समोर नागमोडी काळाशार डांबरी रस्ता. कुठल्याही फोटोग्राफरला हवीहवीशी वाटणारी फ्रेम.
नदीच्या उजव्या काठाकाठाने आपण एका टोकापर्यंत जातो आणि पुन्हा
पुलावरुन वळसा घालून तिच्या काठाने गटा लूप्स (घटा लूप्स, २१ लूप्स अशी
पर्यायी नावे) नावाच्या घाटाशी पोचतो. २१ हेअरपिन बेंड अशी वळणं असलेला
लेहच्या मार्गावरील हा सर्वात अवघड घाट. अतिशय अरुंद रस्ता आणि चुका करायला
एक टक्काही जागा नाही.परिसर संपूर्ण अंगावर आलेल्या शिखरांनी व्यापलेल.
"एक फोटो तो बनता है बॉस" म्हणत आम्ही बरेच वेळा ब्रेक घेऊन फोटो काढत
होतो. पण जशी गाडी घाटाला भिडली तशी आम्ही जोरजोरात वळणं मोजायला सुरुवात
केली. निसर्ग माणसातलं लहान मूल कसं जागं करतो त्याचाच एक नमुना. अगदी
आम्ही मोठ्याने ओरडून व...न, टू...., थ्री...., फो....र करत होतो. नवव्या
वळणावर मात्र गाडी आचके देत बंद पडली. पण टॉम असल्यावर कसली चिंता. आम्ही
थोडासा धक्का मारुन त्या अरुंद रस्त्यांवर यू टर्न केला आणि उतारावर गियर
टाकून ती चालू झालीही. पुन्हा गाडीत बसलो आणि प्रवास सुरु झाला. पण तीन
वळणांनंतर पुन्हा तेच. पहिले पाढे पंचावन्न. परत धक्का, यू टर्न, उतार,
गियर, चालू ! घाट संपता संपता किमान चार वेळा असे करायला लागलं. उंचावरच्या
हवेत शारीरिक श्रम जड जात होते, पण इलाजही नव्हता. घाट संपल्यावर
पठारावरुन जाताना लडाखच्या प्राणिजीवनाचं दर्शन घडलं. लडाख उरियल या अतिशय
दुर्मिळ जातीच्या हरणासारख्या प्राण्याचं! त्याचे फोटो काढून नकी-ला (खिंड)
ओलांडून आम्ही पुन्हा खाली सपाटीला उतरलो. तिथल्या नाल्याचे नाव फारच
मजेशीर होते. "व्हिस्की नाला" ! नक्की काय आहे त्यात पाहिले तर साधेच पाणी
वाहत होते, पण नाव मात्र मजेदार. यापुढे पुन्हा पर्वतरांग आणि लाचुचुंग-ला
ओलांडून आम्हांला पांगला पोचायचे होते. दुपार टळून गेली होती आणि गाडीचे
त्रास देणे चालूच होते. आम्ही धक्का मारुन मारुन हैराण झालो होतो. पांगच्या
अलीकडे "कांगला जल" नावाच्या अतिशय निर्जन जागी आमच्या गाडीने दम सोडला.
बॉनेट उघडून पाहिले तर फॅन आणि फॅनबेल्ट दोन्ही तुटले होते. छातीत धस्स
झाले. पण टॉम आपल्या नेहमीच्या स्वरात म्हणाला ठीक है, पांग में जाकर देखते
है. व्हा मिलिटरी कॅंप है, वहा कर सकते है रिपेअर. नही हुआ तो आज पांग में
रुकेंगे". पण पांगपर्यंत कसा पोचवशील बाबा? "अरे... मैं किसलिये हूँ? मैं
पहुचाऊंगा आपको पांग". थोडक्यात आता काय बिघाड आहे ते तर समजले होते.
म्हणजे गाडी गरम होऊन बंद पडत होती. पांगच्या एक किलीमीटर अलीकडेपर्यंत जरी
ओबडधोबड असला आणि नदीपात्रातून असला उताराचा रस्ता होता. चालू इंजिनावर
गाडी न्य़ुट्रलवर ठेवून उताराच्या कलाकलाने घेत गाडी तेथवर आणली. आम्ही
अक्षरशः प्रत्येक मैलाच्या दगडावर पांग किती राहिलंय आहे ते वाचत होतो.
कसेबसे पांगला पोचलो आणि पद्मा आंटीच्या हॉटेलसमोर टॉमने गाडी उभी केली.केलॉंगपासून पुढे झिंगझिंगबारपर्यंत रस्ता थोडा बरा आहे. झिंगझिंगबार हे नावच आम्हांला फार आवडले. बहुतेक इथे सगळे झिंगण्याचे बार असावेत असंही वाटून गेलं. पण खरं तर तो बीआरओतर्फे रस्त्याचे काम करणार्या मजुरांचा कॅंप आहे. लहानसे तात्पुरते चहाचे रेस्टॉरंट आणि खायला मॅगी वगैरे मिळते. थोडे पुढे गेलो की काही पडक्या सोडून दिलेल्या लष्करी इमारती दिसतात. इथेच सूरजताल आहे. आरशासारखे लख्ख स्थिर पाणी त्यात आपले प्रतिबिंब पाहणारी गिरिशिखरांची रांग. आणि तेथून पुढे आपण उंचावर चढत जातो. दारचा-लाच्या दिशेन. (ला म्हणजे खिंड, दारचा खिंड). खिंडीच्या आधी नदीवर प्रचंड पुलाचे काम सुरु आहे. तो पूर्ण झाला की सर्व ऋतूंमध्ये वाहतूक निर्वेध होऊ शकेल. सध्या बर्फ वितळला की नदीचे पात्र रोरावते आणि वाहतूक बंद पडते. दारचा गावातून आपण जसजसे खिंडीत चढत जातो तसतशी गार हवा जाणवायला लागते. हवेतील ऑक्सिजन पातळी घटल्याने थोड्या श्रमानेही थकायला होते. काहींचे डोके चढते. पण ते तात्पुरतेच, खिंड ओलांडून मैदानात उतरलो की पुन्हा पूर्ववत. इथून पुढे हिमालयाच्या रांगा अंगावर आल्यासारख्या दिसतात. इंग्लिशमध्ये टॉवरिंग पीक्स (towering peaks) ज्याला म्हणतात तसेच. रस्ता खराब होऊ लागतो. प्रत्येक उंचावरच्या खिंडीत रस्त्याची हीच अवस्था आहे. सतत कोसळणार्या दरडी आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचे लोंढे यांसमोत रस्त्याचा टिकाव लागणे कठीणच. पण त्याही परिस्थितीत ते चालू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. दारचा-ला उतरुन आपण पुन्हा सारचूच्या मैदानात उतरतो. सारचू नदी डावीकडे आपली साथ करत असते ती अगदी सारचू गावापर्यंत. सारचू हे हिमाचल प्रदेशातले शेवटचे ठाणे. इथून पुढे हिमाचलचा लाहौल-स्पिती संपूण जम्मू-काश्मीर राज्याची हद्द सुरु होते. अर्थातच चेकपोस्ट आहे आणि आपले परमिट दाखवावे लागते. नदीवरचा पूल ओलांडून गावात प्रवेश केला तेव्हा दुपार झाली होती. आणि आम्ही ऑफिशियली भूनंदनवन काश्मीरमध्ये प्रवेश करत होतो. सारचूमध्ये लहानलहान हॉटेल्स आहेत. तिथे नूडल्स, चहा, दालरोटी, सब्जी अशी खाण्याची बरी सोय आहे. मागे सारचू नदी, पलीकडे गिरिशिखरे, त्याच्या पार्श्वभूमीवर सुंदर भडक रंगांत रंगवलेली हॉटेल्स आणि तिबेटी झेंडे, दूरवर रंगीबेरंगी कॅंप्सचे तंबू, समोर नागमोडी काळाशार डांबरी रस्ता. कुठल्याही फोटोग्राफरला हवीहवीशी वाटणारी फ्रेम.
पांग म्हणजे सियाचीनला येणार्या जाणार्या सैनिकांना वातावरणाचा सराव व्हावा उंचावर केलेला एक ट्रान्झिट कॅंप होता. आर्मी क्वार्टर्स आणि एकमेव हॉटेल. बाकी सर्वत्र भयाण शांतता. अचानक सगळीकडे अंधारुन आले होते. ढग पांगला घेरत होते. पावसाची चिन्हं होती. लडाखमध्ये वर्षातून चार-पाच दिवस पाऊस पडतो आणि त्याला आजचाच दिवस सापडला होता. दिवसभर अवेळी खाणे, उंचावरची हवा आणि गाडी ढकलण्याचे कष्ट यांमुळे सगळ्यांनाच हाय अल्टिट्यूडचा त्रास (विरळ ऑक्सिजनमुळे डोके गरगरणे,डोके दुखणे, उलटी होणे) झाला होता. सौमित्रला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मंजिरीची तब्येतही अधिकच खालावली होती. काहीही खाल्लेले उलटून येत होते, अगदी औषधाची गोळीही. फोन चालत नव्हते. पाऊस, थंड हवा, अंधारलेले वातावरण. एक भयाण संध्याकाळ आमची वाट पाहत होती. पद्मा हॉटेलमध्ये एक आर्मी कॅंपमधले थापाजी आले होते, ते म्हणाले काही मेडिकल मदत लागली तर कॅंपवर डॉक्टर आहे, सॅटेलाईट फोन आहे. आज आम्ही लेहला पोचल्यावर घरी फोन करणार होतो. घरच्यांना काळजी लागली असेल म्हणून सॅटेलाईट फोनवरुन का होईना कुणा एकाच्या घरी सांगून पुण्यात निरोप पोचवावा अशा हिशोबाने प्रयत्न केला तर सॅटेलाईटही खराब हवामानामुळे रुसलेले. कसेबसे काहीतरी पोटात ढकलले. तोवर टॉम मिलिटरी कॅंपमध्ये जाऊन आला. बेल्ट उपलब्ध होता पण स्कॉर्पिओ लष्करात वापरत नसल्याने फॅन मात्र नाही. म्हणजे आजची रात्र इथेच काढावी लागणार होती. पद्मा आंटीने मोठ्या आस्थेनं आमच्या सगळ्यांची काळजी घेतली. प्रत्येकाला चहा, नाश्ता, खायला जेवण, पिण्यासाठी गरम पाणी, रात्री झोपण्यासाठी एका मोठ्या रुममध्ये ऊबदार बिछाने... सगळं तयार केलं. लडाखी मायेचा अनुभव घेत होतो. सगळ्यांची अवस्था एवढी वाईट होती की सहा-साडेसहा वाजताच सगळे झोपून गेले.
बाहेर पाऊस कोसळत होता. लाईट गेले होते. बाहेर अतिशय बोचरा गारठा. कोसळत्या पावसात आर्मी कॅंपच्या चेकपोस्टचा दिवा मिणमिणत होता. काळरात्र अवतरली. मध्यरात्री कधीतरी जाग आली तर देव्या आणि स्वाती (जे त्यातल्या त्यात बरे राहिले होते) यांनी बॅगा गाडीतून उतरवून आत आणलेल्या होत्या आणि ते दोघे थकून झोपी गेलेले. सौमित्रची तब्येत जरा नरमच होती, पण आडवा झाला की नाक बंद होऊन श्वास घेता येत नसे म्हणून बसल्या जागीच झोपला होता. मंजिरी कण्हत होती. इकडे पुण्यात कुटुंबियांना नक्कीच काळजी लागली असणार. पण आमचाही इलाज नव्हता. इथे पद्मा आंटी आमची कुटुंबासारखीच काळजी घेत होती. Home away from Homeचा अनुभव आम्ही घेत होतो.
दुसर्या दिवशी हॉटेलच्या अंगणात बसून पद्मा आंटीच्या हातचा
गरमागरम चहा घेत होतो तेव्हा चकचकीत सकाळ झाली होती. पुन्हा एकदा लडाखे
निळे आकाश, पांढरे कापशी ढग दिसत होते आणि हॉटेलच्या माथ्यावरुन पलीकडे
डोंगर चढत जाणारा लडाखी ड्रीम्सकडे नेणारा लेहचा रस्ता. एक वाईट ड्रीम
संपले होते आणि पुढच्या सुखद ड्रीमची वाट पाहत टॉमने केलेल्या पर्यायी
गाडीने लेहकडे निघालो. टॉम तिथेच थांबला. जाताना सगळेच तसे पेंगत होते.
एकदा माथ्यावर "मोरेय" नावाच्या मैदानी जागी पोचलो तसा रस्ता सुधारला आणि
जगातल्या तिसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीच्या टांगलांग-ला (१७,४८०
फूट) खिंडीमार्गे रुमत्से, लाटो, मिरु अशी गावं मागे टाकत आम्ही उपशी/उप्शी
गावी पोचलो. हे गाव लेहचे प्रवेशद्वार म्हणू शकतो. कारण तिथल्या चौकातून
बर्याच ठिकाणी जाणार्या पाट्या आहेत, मोठ्या कमानी आणि त्यावर अंतरं
लिहिली आहेत. अगदी बीजिंगचेही अंतर लिहिलंय. व्यवस्थित जेवण देणारी हॉटेल्स
आहेत. आणि मुख्य म्हणजे मोबाईल फोनला रेंज आहे. घरी फोन करुन घेतला. सगळे
व्यवस्थित असल्याची बातमी कळवली आणि साग्रसंगीत पोटपूजा केली. रस्त्यातली
अनेक गावे, दूरवर दिसणारी थिकसे गोम्पा, शे पॅलेस असं सगळं गाडीतून नजरेत
साठवत लेहमध्ये प्रवेश केला तेव्हा दुपारचे दोन वाजले होते आणि आजचा एककलमी
कर्यक्रम होता, तो म्हणजे आराम करणे, झोपा काढणे. लेहमध्ये तर पोचलो होतो.
प्लानमधून एक दिवस वाया गेला होता. पण सगळं नियोजनानुसार झालं तर ती लडाख
टूर कसली?
आज आराम केल्यानंतर उद्यापासून सुरु होणार होते सुखद लडाख ड्रीम्सचा पुढला एपिसोड, तब्बल दहा दिवसांचा !
0 comments