आजवरचा (मराठी) ब्लॉग प्रवास
मराठीत ब्लॉग्ज वाचता यायला लागले आणि त्यानंतर काही काळाने लिहिताही यायला
लागले. साधारण जून २००९ मध्ये पहिली मराठी पोस्ट लिहिली होती. मी फिदा आहे नावाची. त्याचा पुढचा भागही
लागोपाठ प्रकाशित केला. त्यापूर्वी फक्त उसन्या इंग्रजीत ब्लॉग लिहायचो,
काही बरे वाईट फोटो काढायचो आणि ते ब्लॉगवर लावायचो. पण मराठी टायपिंग
जमायला लागले आणि नंतर हळुहळू शब्दांनाही धुमारे फुटले. पुढे बर्याचशा
पोस्ट मराठीत लिहायचा चंग बांधला. त्यात आपल्या भुंग्याने मदत केली. रोज
येऊन त्याचा ब्लॉग
वाचायचो. हळूहळू ओळख वाढली आणि चॅट करायला लागलो. मग त्याच्या ब्लॉगच्या
ट्रिक्स, टेंप्लेट्स समजायला लागले. विजेट कसे लावायचे हेही कळले.
त्याच्याकडून महेंद्र कुलकर्णींची ‘काय वाट्टेल ते’ ओळख झाली. सुंदर हस्ताक्षरवाल्या सोमेशचा ब्लॉग
सापडला. आदितीचा मोगरा फुलला. मिपा, उपक्रम, मनोगत कडे जाऊन वाचायचो. एखाद
दोन लेख लिहिलेही. पण तिथे सकस चर्चेबरोबर एकमेकांची खेचण्यातच जास्त
इंटरेस्ट. लवकरच तो उत्साह मावळला. मराठीब्लॉग्ज.नेटवर जाऊन यादी काढली.
माझ्या आवडीच्या विषयांवर लिहिणार्या ब्लॉग्जची. एक एकापाठोपाठ एकेक
रीडरमध्ये ऍड केले. प्रत्येक ब्लॉगरशी पर्सनली ओळख होत गेली.
अनिकेतच्या ब्लॉगवर मराठी रहस्यकथा वाचल्या. तशी कधी आपल्याला बापजन्मात जमणार नाही म्हणून प्रत्येक कथेसरशी त्याच्यावर जळत होतो. विशाल तेलंग्रे औरंगाबादेहून किल्ला लढवत होता. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असूनही त्याला ब्लॉगचं सगळं येतं म्हणून त्याचा हेवा. सगळ्यांशी एकदा भेटावे असे वाटून गेले. हे स्वप्न पहिल्या मराठी ब्लॉग मेळाव्याने प्रत्यक्षात आणले. स्टार माझा, सकाळ आणि इतर मिडियाशी जवळून ओळख झाली. मेळाव्याच्या निमित्ताने भुंगा, अनिकेत, विक्रांत यांच्या ओळखी आणि प्रत्यक्ष भेटी झाल्या. ब्लॉगर्सबद्दल first impression असे काहीसे होते.
भुंगा: अरे… केवढा मोठा (वयाने आणि शरीराने) आहेस तू… मी आपला माझ्या साईझचा अझ्युम करत होतो. पण नंतर माझा चांगला मित्र झाला. खूप गप्पा मारल्या आणि बर्याच आयुष्याच्या गोष्टी शेअर केल्या.
अनिकेत: कसली तरी भारीतली सायकल घेऊन आला होता. उगाच पुणेरी शब्द फेकत बोलायचा. फोटोग्राफीबद्दल विशेष प्रेम होते.
विक्रांत: एकदम सेलेब्रिटी व्यक्तिमत्त्व दिसतंय. खूप सारं प्रासादिक बोलतो. माझ्या डोक्यावरुन जाणारं.
एका मीटिंगमध्ये गौरीही भेटली. अनिकेतमधल्या साहित्यिकाचा खून पाडून
त्याला कॅमेराचे वेड लावले. “बास्स रे बास्स असंच हवंय मला” हा त्याचा
डायलॉग प्रसिद्ध झाला. काही खवचट लोकांनी कॅमेरा घेऊन दिला की डीलरकडून
किती कमिशन मिळते हेही विचारुन झाले. आपल्यासारखाच ट्रेकर म्हणून रोहन
सापडला. त्याचे दोन-तीन ब्लॉग होते. खादाडीपासून भटकंतीपर्यंत सगळेच विषय
माझ्या जिव्हाळ्याचे. मग त्याच्याशी मैत्री झाली.अनिकेतच्या ब्लॉगवर मराठी रहस्यकथा वाचल्या. तशी कधी आपल्याला बापजन्मात जमणार नाही म्हणून प्रत्येक कथेसरशी त्याच्यावर जळत होतो. विशाल तेलंग्रे औरंगाबादेहून किल्ला लढवत होता. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असूनही त्याला ब्लॉगचं सगळं येतं म्हणून त्याचा हेवा. सगळ्यांशी एकदा भेटावे असे वाटून गेले. हे स्वप्न पहिल्या मराठी ब्लॉग मेळाव्याने प्रत्यक्षात आणले. स्टार माझा, सकाळ आणि इतर मिडियाशी जवळून ओळख झाली. मेळाव्याच्या निमित्ताने भुंगा, अनिकेत, विक्रांत यांच्या ओळखी आणि प्रत्यक्ष भेटी झाल्या. ब्लॉगर्सबद्दल first impression असे काहीसे होते.
भुंगा: अरे… केवढा मोठा (वयाने आणि शरीराने) आहेस तू… मी आपला माझ्या साईझचा अझ्युम करत होतो. पण नंतर माझा चांगला मित्र झाला. खूप गप्पा मारल्या आणि बर्याच आयुष्याच्या गोष्टी शेअर केल्या.
अनिकेत: कसली तरी भारीतली सायकल घेऊन आला होता. उगाच पुणेरी शब्द फेकत बोलायचा. फोटोग्राफीबद्दल विशेष प्रेम होते.
विक्रांत: एकदम सेलेब्रिटी व्यक्तिमत्त्व दिसतंय. खूप सारं प्रासादिक बोलतो. माझ्या डोक्यावरुन जाणारं.
पुढे सुहास (अण्णा), दीपक, विद्याधर (बाबा), योमुं, सागर, सिद्ध्या, आपा, आका, सचिन असे बझ्झवर जमा झाले. चॅट होत राहिले. प्रत्येकाचे काही पैलू समजले. अनघाशी मैत्री झाली. तिचा ब्लॉग वाचायला त्या काळी दहा दिवस लागले होते. प्रत्यक्ष भेटायचा योग रोहन, शमिका, अनुजा, आका, सुहास, योमु, साबा, आकाश, दिप्या यांच्यासोबत आलाही. स्नेहलसोबत एक मस्तपैकी नळीच्या वाटेचा ट्रेक केला. फक्त ऑनलाईन ओळखीवर ती या मुक्कामी ट्रेकला माझ्यावर विश्वास टाकून आली होती. पण एवढी भटकंती करुनही सगळ्या ग्रुपसोबत ट्रेकचं अजून काही समीकरण जुळेना. माचाफुकोच्या मस्त कलंदर भटकंतीचा हेवा वाटू लागला. एकदा नक्की जाणार आहे मी त्याच्यासोबत. मग हळूहळू ज्याला हवं त्याला फोटोचं ग्यान पाज, कॅमेरा घ्यायला सजेशन्स दे, बळेच पकडून फोटो दाखव, ब्लॉग पोस्ट वाचायला लाव असं करता करता सगळ्यांशी जिव्हाळा वाढला. फोनवर जरी अनेकांशी बोलणं झालं असलं तरी प्रत्यक्ष भेटीत काही वेगळीच मजा असते. मुंबईकर ब्लॉगर्स एकमेकांना नेहमी भेटत असतात, पण पुण्याच्या नशिबी हे भाग्य कधी?
तरी न भेटलेल्या ब्लॉगर मित्रांनो, विभि, आपा, सचिन, सिद्ध्या, अनघा, सौरभ… कधी भेटताय? मस्त खूप गप्पा मारु, चहा ढोसू, खादाडी करु बास्स… बाकी काहीच अपेक्षा नाही.
माहितीच नाही तू हे लिहिलेलं !!!!! मला ह्या ब्लॉग प्रकरणात आपण सगळे एकमेकांना भेटलो हेच भारी वाटतंय !!! :D :D :D पाऊस सुरू झाला ! चला पेणला जाऊ !
ReplyDeleteहे लिहिल्यावर मी आणि योमु मुंबईला येऊन भेटलो होतो.
Delete