आजची बेजबाबदार(?) तरुणाई
आजची तरुण पिढी ना… काही धरबंधच
राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही
पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घरी आलं की पुन्हा त्या कॉंप्युटरसमोर
जाऊन बसायचं. कानात हेडफोन लावून बसायचं. वैताग वैताग नुसता…!!!घरच्यांनाही
आणि तरुणांनाही.
पण खरंच तरुण (किंवा तरुणी) बेजबाबदार झालेत? तुम्हांला काय वाटतंय? काहीही मत मांडण्याऐवजी जरा अजून चारदोन मिनिटे पुढे वाचा.
मान्य आहे अमाप पैसा कमवतात. उधळपट्टी करतात. पण आजकाल जगात टिकून रहायला हे आवश्यकच नाही का? चार माणसांत गबाळे दिसावं का आम्ही? ब्रॅंडेड गोष्टी घेतल्या की त्या पुढली काही वर्षे हमखास टिकत नाहीत का? तेच जर नॉनब्रॅंडेड वस्तू घेतल्या तर चार सहा महिन्यांतच नाही का ते टाकून देण्याच्या लायकीचं होत? मग वर्षाला चार वस्तूंऐवजी दोनच घेतल्या जातात की नाही? मग त्याला थोडे जास्त पैसे गेले तर बिघडले कुठे? ही खरंच उधळपट्टी आहे की गुपचुप मनात केलेले व्यावहारिक गणित? अतिमहागडे फॅशन ब्रॅंड्स (म्हणजे चाळीस-पन्नास हजाराचा आरमानी सूटसारख्या गोष्टी) कधी तरी घेऊ का आम्ही? हातभर चित्रविचित्र टॅटू, ओठाजिभेला-बेंबटाला पिअर्सिंग तर नाही करत ना? “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हे हा युक्तिवाद काळाला धरुन जेष्ठांना तरी योग्य वाटतोय का? त्यावेळीही कुणाच्याही आर्थिक मिळकतीची किमान पाच टक्के रक्कम कपडे आणि तत्सम गोष्टींमध्ये खर्च होतच असेल ना? तसेच आजही चालू नाही का?

मग
फक्त याच अनुषंगाने बेजबाबदार हा ठपका लावून मोकळे झालात? का? आम्ही रोज
दारु पिऊन झिंगत घरी येता येता सगळ्या गल्लीत शिवीगाळ आणि तमाशा करतो?
आपल्या मागच्यांची कसलीही काळजी न करता गाड्या उडवतो? अहो अगदी बाईकवरही
आम्ही हेल्मेट वापरतो, वापरायला उद्युक्त करतो. वाहतुकीचे नियम पाळतो.
कुठल्याही वाहतूक नियमन किंवा जनजागरण संघटनेत सगळ्यात मोठा हातभार
तरुणांचाच असतो ना? काही दुर्दैवी अपवाद असतीलही आमच्यात, पण सगळ्या तरुण
पिढीलाच दोष देण्यात काय अर्थ आहे? त्यांचे हित त्यांना कळत नाही, गेले
खड्ड्यात. त्यांचे आई-वडिलांचे संस्कार त्यांनी उचलले नाहीत. पण
बाकीच्यांची वैचारिक बैठक तर पक्की आहे ना? मग सरसकट सारे एकाच तराजूत
तोलण्याचा तुमचा हट्टाहास का? अर्थात या छोट्याछोट्या गोष्टी झाल्या. आज
आमच्यापैकी बहुतेकांची स्वतःची (एक किंवा अधिक) घरं आहेत. दारात
गाडी/गाड्या आहेत. आईवडिलांना सुखात ठेवण्याची प्रचंड इच्छाशक्ती
आहे.त्यासाठी कायम मेंदूच्या एका कोपर्यात काहीना काही जुळवाजुळव सुरुच
असते.आता हे तुमच्या पिढीला आम्ही सांगावं का? मग सरसकट बेजबाबदारपणाचा
शिक्का लावून मोकळे झालात?
प्रत्येक
जण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहे. मला नाही वाटत तरुण पिढी
यातही मागे राहिली आहे. दगडूशेठ गणपतीला कुणाची गर्दी जास्त असते? शहराचे
भूषण म्हणून तुम्ही जे मिरवता त्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कुणाचा उत्साह
ओसंडून वाहतो. दारु पिऊन तिथे कुणी झिंगला, मुलींना त्रास दिला यासाठी
हातात दांडू घेऊन कोण उभा असतो?सवाई गंधर्व-वसंतोत्सवाला कुणाची गर्दी
जास्त असते? त्या सांस्कृतिक कार्यक्रमांत कुणाचे सादरीकरण अधिक भावते? आणि
दाद मिळाली तरी आपल्या जेष्ठ गुरुंचे स्मरण कुठल्या पिढीचे कलाकार करतात?
दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक कुठल्या पिढीचे आहेत?
गडकिल्ल्यांच्या पावित्र्य जपण्यासाठी कुणाचा पुढाकार असतो? तुमच्या पिढीने
उभ्या केलेल्या एनजीओंच्या आवारात कुठली पिढी राबते? नव्या युगाचे ज्ञान
तिथल्या स्पेशली एबल्ड मुलांना कोण देते? त्यांची पावतीपुस्तकं कुणाच्या
देणगीने भरत असतात? ऑफिसातल्या दिवाळीतही शेजारच्या वृद्धाश्रमाची आठवण
कुणाला राहते? आमच्याच पिढीला ना?
दर्जेदार
नाटक आणि चित्रपटांना जास्त गर्दी कोण करतं? संगीत महोत्सव डोक्यावर घेऊन
आपल्या फेसबुकवर शेअर करुन तिथे स्वयंसेवक म्हणून हजर कोण असतं? एकदा तो
हेडफोन कानाला लावून बघा, रॉक बरोबर वसंतराव, सगळे गंधर्व, खळेकाका,
बिस्मिल्ला खॉं, भीमसेनही ऐकू येतील. कधीतरी कॉंप्युटरमध्ये डोकवा.
डेक्स्टर आणि फ्रेंड्स सिरीजबरोबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, राजकपूर,
सुर्यकांत-चंद्रकांत-अरुण सरनाईकांचे चित्रपटही असतील. हे तर वानगीदाखल
काही दाखले दिले. पण ही यादी एवढीच आहे का? कदाचित याचे उत्तर तुम्हांलाच
अधिक चांगल्या प्रकारे माहित आहे.
तुमचा
आदर करण्यात ही पिढी कधीही कमी पडली नाही आणि पडणारही नाही. काही यशाची
शिखरं त्यांना तुमच्या पायाशी नतमस्तक करावयाची आहेत. तेव्हा फक्त थोडं
समजून घ्या, एकवार विश्वास ठेवा आणि प्रेमळ आशीर्वाद द्या. बास्स्स…!!!
Perfect....
ReplyDeleteThis is what I was searching..
Thank you