शब्दशलाका: "रात काळी..."
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात...
कसा सावळा होऊन जातो जीव,
जाणवून जाते त्या श्यामकांताची उणीव,
आठवत राहतात डोळ्यातल्या ओलाव्याचे विरहक्षण...
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात...
तोडून द्यावासा वाटतो एक अनिवार बंध,
फुलपाखराच्या गाण्यांचे आणि भिजलेल्या मातीचे लागतात छंद,
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्यांचे, आपल्यावरही उमटतात थोडे व्रण...
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात...
तेंव्हा सगळचं कसं होवून जातं ओलं, मिट्ट अन् गडद,
वीजांची बनतात चित्रं, वार्यातूनही ऐकू येतो एक स्पंद,
काळ्याभोर आठवणींमध्ये कोरडे मात्र राहून जातो आपण...
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात...
अप्रतिम! अतिशय सुंदर!
ReplyDeleteअतिशय सुंदर.
ReplyDeleteअप्रतिम....खुप सुंदर....
ReplyDeleteपंक्या...तुम्ही एखादा कार्यक्रम का नाही करत??? की त्याचा विचार चालु आहे..
अप्रतिम ... झकास...
ReplyDelete