Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

हरिश्चंद्रगड आणि साधले घाट

By Unknown
/ in Blog Harishchandragad sadhale ghat साधले घाट
12 comments
काल दिवसभराचा थकवा आणि चांदण्या रात्री केलेल्या गरम गरम जेवणाचा एकत्रित परिणाम म्हणून की काय, डोळा कधी लागला ते समजलेच नाही. म्हणजे दोन लॉटमध्ये नूडल्स करावे लागणार होते तर पहिल्या लॉटमध्ये खाऊन उठलेले मुंबईकर वीर दुसरा तयार होईपर्यंत तर घोरायला लागले होते. सावकाशीने आम्हीही जेवून कधी दिवसाचा आढावा घेता घेता कधी झोपलो समजलेच नाही. देव्या आणि सँडी बाहेरच्या 'लिव्हिंग रुम'मध्ये आणि आम्ही बाकीचे आतमध्ये. मध्येच एकदा काही तरी खुडबुड वाजले. पण तो आवाज ऐकूनही त्याकडे ढुंकूनही पहायचे देव्याच्या अंगात त्राण नव्हते. रात्री दीड-दोन वाजता एक ग्रुप रिकामी गुहा शोधत आला होता. त्यातल्या एकाने म्हटलेही, "अरे इथे भांडी दिसत आहेत. ही गुहा रिकामी नसेल" पण शेवटी त्यानेच टॉर्च मारुन पाहिले. आता एकाने टॉर्च मारल्यावर बाकीच्यांना काय दिसले नसेल का? पण आळीपाळीने प्रत्येकाने टॉर्च मारुन पहायची खाज मिटवून घेतली. पण असो, त्यांना उठून "का रे?" विचारायचीही आमची इच्छा नव्हती. पहाटे थोडा गारठा वाढल्यावर एकदा जाग आली, पण पाचच मिनिटांत असे काही मेल्यासारखे पडलो की सकाळी साडेसात वाजल्याशिवाय डोळे उघडले नाही.

प्रत्येकजण आपापल्या सोयीने 'वाघ-ससे मारुन' आला. तोंडे खंगाळून आणि अंघोळीची गोळी घेऊन सगळे तयार झाले. वर असलेल्या त्या मामांनाच पोहे आणि चहा आणायला सांगून आम्ही उरल्या-सुरल्या ब्रेड, जाम, बिस्किटे यांवर ताव मारायला सुरुवात केली. पोहे आल्यावर अधाशासारखे तुटून पडलो. वर चहाची फोडणी बसली आणि सगळे घोडे दिवसाच्या मोहिमेसाठी तयार झाले. नळीच्या वाटेने आमची काल अशी काही 'वाट' लावली होती की तारामती वगैरे स्वप्नातसुद्धा नको वाटू लागले होते. म्हणून तो बेत काल रात्रीच रद्द केला होता. एकवेळ तोलारखिंडीच्या माणसाळलेल्या वाटेने जावे असे एकवार वाटून गेले. पण कीडा म्हणतात ना, तसलेच काहीतरी असावे म्हणून तो विचार फेटाळून लावला. शिवाय तिकडून गेले तर पुन्हा लिफ्ट घेऊन माळशेज घाट उतरुन कार घेण्यासाठी बेलपाड्याला सर्कस करत जावेच लागणार होते. म्हणून पाचनईने उतरायला एखादाच तास लागतो आणि पुढे साधले घाट उतरायला आणखी दोन-तीन तास, म्हणजे तीन वाजता बेलपाडा, असे टार्गेट सेट केले. आजची वाटचाल खूप सोप्पी असेल असे वाटले होते. पण कदाचित नियती ते चूक ठरवणार होती. सगळं आवरुन निघायला साडेनऊ झाले. ग्रुप फोटो काढून मग हरिश्चंद्रेश्वराचे आणि केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि साधारण पावणेदहाला पाचनईची वाट उतरायला चालू केले.



रस्ता उतरणीचा असल्याने सुखद वाटत होता. पहिली पंधरा-वीस मिनिटे उन्हाचा सोडल्यास पूर्णवेळ कड्याच्या आडोशाने वाटचाल थंडगार सावलीतून होती. वाट सुरु होते तिथेच उजवीकडे एक मिनी-कोकणकडा आहे. ठेवण अगदी कोकणकड्यासारखी पण आकार थोडासा लहान. तो पाहून देवाने इथे आधी कोकणकड्याचे स्केल्ड डाऊन मॉडेल इथे बनवले असेल, हे प्रोटोटाईप असेल असे फालतू जोक्स मारुन झाले. तिथेच एक कुत्री आमच्यासोबत चालू लागली. आता ही इथे बरोबर आली म्हणजे शेवटपर्यंत साथ देणार याची खात्री. प्रत्येक ट्रेकला असे एखादे कुत्रे सोबत असतेच.

कड्याला बिलगून जाणारी वाट सुरेख होती. अगदी त्याच्या अंगाशी लगट करुन जाणारी आणि डावीकडे एका घोड्याच्या नालेच्या आकाराच्या दरीचे दृश्य. कड्याला लागूनच काही वाटेवर तयार झालेल्या गुहासदृश्य रचना. कँपिंगसाठी आदर्श ठिकाण. पावसाळ्यात या दरीत चारपाच पदरी धबधबा, चारपाच टप्प्यात कोसळून डोळ्यांचे पारणे फेडत असेल. फक्त फोटोग्राफीसाठी म्हणून येत्या पावसाळ्यात यायचे असे मी आणि देव्याने कधीच नक्की केले होते. पावले झपझप पडत होती. खाली पायथ्याला चाललेल्या विहिरीवरच्या इंजिनाचा आवाज येऊन आपण माणसांच्या जगात आल्याची जाणीव झाली. मुंबईकरांपैकी एकाला SLR कॅमेराची गोडी लावण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. तो विविध कॅमेरांचे मॉडेल्सचे आणि लेन्सचे ऑप्शन्स विचारुन पाहत होता. बहुतेक हा कॅमेरा-बकरा हलाल होणार पुढल्या काही महिन्यांत. अशा काही पेसने आम्ही उतरत होतो की साधारण तासाभरातच पायथ्याच्या पुलाशी पोचलो. पुलाच्या अलीकडे असणारा डावीकडचा रस्ताच साधले घाटात जातो हे पक्के माहित होते, पण पुढे गावाशी जाऊन लिंबू सरबत आणि पर्यायाने एक ब्रेक घेऊन फ्रेश व्हावे असे ठरवून आम्ही जवळच हॉटेलशी पोचलो. प्रत्येकी दोन लिंबू सरबतांची ऑर्डर देऊन निवांत त्या नुकत्याच धुतलेल्या फरशीवर आडवे झालो. समोर दिसणारी विहीर पाहून चैतन्यने त्या काकांना पोहरा आहे का म्हणून विचारले. आता एवढा थकला असताना त्याला विहिरीतून पाणी काढायची का हौस असावे याचे आम्हांला कुतूहल वाटले. पण नंतर समजले की साहेबांना वाघ मारायला जायचे होते :-)

तिथे फ्रेश झाल्यावर काकांना विचारुन साधले घाटाचा रस्ता कन्फर्म करुन घेतला. देव्या तर भलताच खूष होता. साधले घाटात जायचे म्हणून. त्याचे आडनावच 'साधले', पण एवढा खूष की जणू घाटाचा सातबाराच त्याच्या नावावर आहे. पुढे एक ग्रुप भेटला आणि त्यातल्या एकाला माझी मिशी भलतीच आवडली. आपला ट्रेडमार्कच आहे म्हणा तो. असो. साधले घाटाच्या तोंडापर्यंत पोचायचे म्हणजे कच्च्या सडकेवरुन चारेक किलोमीटर तरी पायपीट होती. उन्हातान्हात आमची ती सात जणांची वरात त्या रस्त्याने निघाली. पुढे गेल्यावर एके ठिकाणी वाहते पाणी आणि आजूबाजूचा सपाट प्रदेश पाहून पुढल्या पावसाळ्यात चारपाच दिवस फक्त फोटोसाठी आल्यावर तंबू लावून कुठे मुक्काम करायचा याची जागाच नक्की केली. पाण्यात डुंबायचा मोह होत होता, पण वेळ जाईल म्हणून आवरता घेतला. त्यातच भर म्हणून त्या कुत्रीने आम्हांला खिजवायला डायरेक्ट पाण्यात बसकण मारुन पाणी प्याले आणि आम्हांला वाकुल्या दाखवल्या. जळफळाट झाला. पण इलाज नव्हता. डावीकडे मागे ज्या नळीच्या वाटेने आम्ही चढून आलो तिचे वरचे मुख दिसत होते. मागे हरिश्चंद्रगडाचे शिखर 'टाटा' करत होते. बरेच अंतर चालून गेल्यावर खिंडीच्या अलिकडे एक अस्पष्ट पायवाट डावीकडे झाडीत गेलेली दिसली. पण साधले घाटात जाणारी वाट ती हीच का हे नक्की नव्हते. मनाचा हिय्या करुन मी, देव्याने पुढे जाऊन दोन दिशांना वाटेची चाचपणी करायचे ठरवले आणि नक्की वाट सापडली की बाकीच्यांना बोलावून घ्यायचे ठरवले. थोडे पुढे जाऊन वाट दिसली आणि ही पाण्याची वाट आपल्याला बरोबर घाटाच्या तोंडाशी घेऊन जाणार याची खात्री पटली. बाकीच्यांना बोलावून घेतले आणि जरा ब्रेक घेऊन फ्रेश व्हायला सांगितले. दहा मिनिटे आराम करुन पुन्हा चाल सुरु केली. ओढ्याच्या मार्गातून जात जात एका टेकडीच्या पायथ्याला आलो. आता ती चढून पार करणे गरजेचे होते. गड उतरताना सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे एखादी चढण. कारण मनाची तयारी असते ती उतरण्याची आणि अशी एखादी चढण लागली की जीव मेताकुटीला येतो. असेच जीवावर आलेली चढण दाट झाडीतून एकदाची चढली आणि समोरचे दृश्य पाहून हरखून गेलो. समोर साधले घाटाची वाट आणि त्यापलीकडे दिसणारा कोकणतळ. एवढे दिवस इमेलमध्ये चर्चिला गेलेला, देव्याच्या नावावर सातबारा असलेला, आम्हांला परत घरी घेऊन जाणारा हाच तो साधले घाट.

मला जरा थकवा आल्यासारखे जाणवले. शरीरातल्या साखरेची लेवल करायची म्हणून मी पतापट एकदम चार लेमन गोळ्या कडामकुडुम चावून खाल्ल्या. स्नेहलने आणलेल्या गोळ्यांचा ब्रॅंड होता ‘हाय-हू’. त्या खाल्ल्यावर पाणी पिऊन मला तसेच हाय-हू वाटायला लागले. थोडावेळ त्या अरुंद खिंडीतली थंडगार हवा पिऊन घेतली आणि काही फोटो काढून कॅमेरा बॅगेत ठेवून दिला. आता पुढला रस्ता या कोरड्या झालेल्या पाण्याच्या वाटेने उतरायचा होता. पण पाण्याचा काही भरवसा नसतो. त्याला शंभर फुटांवरुनही उडी मारता येते. त्याचे थोडेच हातपाय तुटणार आहेत? शिवाय पाण्याची वाट मोठाल्या दगडधोंड्यांनी भरलेली असल्याने पाय आणि गुढघ्यांवर जास्त ताण येतो. म्हणून मग लीड करत असलेल्या चैतन्यला सांगून ठेवले होते की जशी पायवाट दिसेल तशी ही पाण्याची वाट सोडून पायवाटेला लागायचे. पण हा भलताच उत्साही प्राणी. पायवाट न पाहता सरळ उतरु लागला. तो पुढे गेल्यावर देव्याला ती पायवाट दिसली. मग चैतन्यला पुन्हा त्या वाटेला जॉन व्हायला सांगितले. झाडी आणि काट्याकुट्यातून त्याला यावे लागले. पायवाट तशी मातीने भरलेली आणि निसरडी होती. पण सुरक्षित. त्या पायवाटेने उतरताना त्या कुत्रीने मागून माझ्या बॅगला असा काही धक्का दिला की जवळजवळ माझा तोल जाऊन मी पडलोच होतो. हात-पाय तर नक्कीच मोडले असते. अशी काही सभ्य शिवी हासडली तिला की बास... नशीब, स्नेहल दूर होती :-)

पुढे ती पायवाट पुन्हा पाण्याच्या नाळेत उतरली आणि आम्ही मोठ्या मोठ्या शिळांवरुन उड्या मारत उतरु लागलो. एके ठिकाणी गुडघा असा मुडपला की मी खूप मोठ्याने कळवळलो. पण थांबून चालणार नव्हते. एके ठिकाणी वाहत्या पाण्याचा झरा आढळला. थंडगार पाणी पिऊन मन आणि शरीर ताजे झाले आणि रिकाम्या झालेल्या बाटल्या भरुन घेतल्या. मागचा ग्रुप सावकाश येत होता आणि त्यामुळे कुठे तरी थांबावे लागणार होते. त्यांना आवाज देऊन पाणी दाखवून दिले आणि आम्ही पुढे झालो. निम्मी घळ उतरुन आल्यावर गुडघा जास्तच त्रास देऊ लागला. मग ब्रेक घेणे भाग होते. सावली पाहून बॅगा टाकल्या आणि रेलिस्प्रे मारला. पोटात काही ढकलणे गरजेचे होते. सगळेच शिळी चपाती आणि जॅम खाऊन पाणी प्यायले. आता घड्याळात अडीच वाजले होते आणि अजून निम्मा टप्पा बाकी होता. घाई करणे गरजेचे होते. चैतन्यने लीड घेतला तेव्हा नाळेतून बाजूला झालेली एक पायवाट हुकली होती. बरेच खाली आल्यावर माणसांचा आवाज आला. त्यांना आरोळी देऊन रस्ता विचारला तेव्हा ते म्हणाले "तिकडं कुटं खाली चाललाय, इथे वरती वाट हाय". मग पुन्हा वर गेल्यावर पायवाटेचे दर्शन घडले आणि हायसे वाटले. मागे राहिलेल्या मुंबईकरांना आवाज देऊन वर बोलावले. अजून किती वेळ लागेल असे विचारता एक-दीड तास असे उत्तर आले. आता मात्र घाई करणे गरजेचे होते. मी, देव्या आणि सॅंडीने झपझप पावले टाकायला सुरुवात केली. अर्ध्या पाऊण तासातच नाळेच्या पायथ्याच्या पठारावर आलो. आता हे पठार उतरले की गाव दिसणार, मग मी थंडगार पाणी डोक्यावर घेणार, मस्त अर्धा तास ताणून देणार अशा सुखद विचारांत गुंतलो असतानाच वाटेवरचे लक्ष ढळले आणि खाच्चकन बुटाच्या बाजूने पायात काटा घुसला. कमीत कमी अर्धा इंज आत गेला असेल. ट्रेकच्या मध्येच बूट काढले तर मला परत घालवत नाहीत आणि पुढच्या ट्रेकचा बट्ट्याबोळ होतो, अशक्य कंटाळा येतो असा अनुभव होता. म्हणून बूट काढले नाहीत आणि फक्त काटा बाहेर उपसून टाकला. करवंदाचा काटा होता, म्हणजे काळजीचे कारण नव्हते. थोडेसे रक्त आले असेल या कल्पनेने पुढे चालत राहिलो. पण थोड्याच वेळात मोजा रक्ताने भिजला. बुटाच्या बाहेरुनही चांगला दोन इंच व्यासाचा रक्ताचा डाग दिसू लागला. पण बूट काढायला मन तयार होईना. तसाच रेटून पुढे गेलो आणि एका झाडाखाली जाऊन बसलो. थोडेसे बुटाच्या वरुनच दाब दिला तर हातालाही रक्त लागले. पाणी पिऊन तसाच पुढे निघालो.

आता बेलपाड्याची पाण्याची टाकी दिसू लागली. मग पायांनाही ओढ लागली आणि पायांच्या आधीच मन बेलपाड्याला जाऊन थांबले. डावीकडे वर कोकणकडा कालच्या सांजवेळच्या नाजूक भेटीच्या आठवणी काढत होता. पुन्हा कधी येणार भेटायला हे विचारत होता. त्याला उगवत्यी अर्धचंद्राच्या साक्षीने परत येण्याचे वचन देऊनच मनाच्या मागोमाग पाय ओढत ओढत आम्हीही बेलपाड्याला पोचलो.



कारवर पोरांनी रेघोट्या ओढल्या होत्या. पण नशिबाने पेंटला डॅमेज नव्हते. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ वगैरेमध्ये रस राहिला नाही. म्हणून फक्त हातपाय धुवून कपडे बदलून आम्ही पुन्हा बिगर पिवळी प्लेट फोर्ड-फिगो ‘वडाप’मध्ये बसून मोरोशीला आलो. तिथल्या टपरीवजा हॉटेलवर थोडे चिप्स आणि कोल्ड्रिंक्स घेऊन पुण्याने मुंबईला मुरबाडच्या दिशेने आणि मुंबईने पुण्याला माळशेजच्या दिशेला निरोप दिला. अवघा दोन दिवस आणि एका रात्रीचा सहवास, पण सह्याद्रीच्या प्रेमापोटी तयार झालेले ते एक अनामिक नाते आत आयुष्यभर जपले जाणार आहे. तिथून परतताना माळशेज घाटाच्या वर आल्यावर पुलाखाली सुर्यास्ताचे सुंदर फोटो मिळाले. तिथून नारायणगावला एक चहा मारला आणि पुण्यात रात्री नऊ वाजता डायरेक्ट ‘लवंगी मिरची’च्या दारात गाडी नेऊन उभी केली. सॅंडी, मी आणि देव्याने ‘काळं मटण थाळी’वर आडवा हात मारला आणि आपापल्या घरी निघालो.

घरी आल्यावर कडक गरम पाण्याने अंघोळ करताना साबण लागेल तिथे आग होऊन जाणवत होते... ओह, इथे घासले आहे! अरेच्च्या, इथे खरचटलंय! अरे वा, इकडे पण कापलंय. रात्री अंथरुणावर पडल्यावर रापलेला चेहरा, भेगाळलेले ओठ, लाल झालेले कान, सोलवटलेले हात, दुखरे पाय हरिश्चंद्राच्या कोकणकड्याची आठवण करुन देत होते. तोच हरिशचंद्रगड, सगळ्या सह्यभ्रमरांचे मोहोळ, जिथे पुन्हा पुन्हा जायचा सोस प्रत्येक ट्रेकरला असतो. तोच कोकणकडा जिथून आपल्याला सगळे जग खुजे वाटते. ज्याच्यासमोर आपली क्षुद्रातिक्षुद्रता कळून येते. ज्याच्या माथ्यावरुन सूर्यास्ताच्या वेळी ’आय-लेवल’च्या खालचे सूर्यबिंब आपल्यावर रंग उधळीत निरोप घेते. ज्याच्या साक्षीने चमचमत्या नदीने शेजारच्या दोन्ही तीराला भरभरुन प्रदान केलेल्या चराचर जीवनाचे पट उलगडत असतात. ती आठवण पुन्हा साद घालत असते... गड्या परत कधी येतोस?

Related Posts

12 comments:

  1. swapnil16 February 2011 at 09:18

    "थरारक" !!! बस्स थरारक!!
    अप्रतिम वर्णन केलेस मित्रा, नळीची वाट अगदी डोळ्यासमोर उभी राहते. खरतर मागच्या लेखाला comment देणार होतो पण तोपर्यंत Part 2 पण "release" झाला. आता भराभर साधले घाट इ. "सेक़ुएल" पण काढ.
    >>> तो पॅच एकदम कोकणकड्याच्या मुखाशी. म्हणजे तोल गेला किंवा चूक झाली तर एकदम तळाशी, एक किलोमीटर खोल. "वरुन फक्त फुले वाहायची"<<<<<

    एवढ्या थरारक प्रवासात हे 1 वाक्य हास्याची लकेर काढते. आणि भीतीचा ओरखडा पण!!
    overnight drive करून असा चाबूक ट्रेक करणे म्हणजे खायची गोष्ट नाही!! काळजी घे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. सुहास झेले16 February 2011 at 09:47

    ब्राव्हो... ग्रेट... :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. vishaljagtap16 February 2011 at 09:53

    '...आणि पायांच्या आधीच मन बेलपाड्याला जाऊन थांबले...'आतिसुन्दर वर्णन...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Ajit Satam17 February 2011 at 00:37

    awesome effort
    hats off to u guys!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Mahesh17 February 2011 at 01:26

    Mastach...pay kasa ahe aata mitra...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Mangesh17 February 2011 at 03:24

    Scheme madhe aamhala pan sms pathvaycha !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. विक्रम एक शांत वादळ18 February 2011 at 02:05

    Nice post pankya :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Vikrant Deshmukh...18 February 2011 at 07:18

    जबर्‍या वर्णन रे.... आम्हाला हे सगळे फक्त तुझ्या वर्णनातूनच वाचायला आणि अनुभवायला मिळणार. मी आत्तापर्यंत एकही ट्रेक केलेला नाही. त्यामुळे ’युध्यस्य कथा रम्या:’ च्या चालीवर फक्त तुमच्या रोमांचक हकीकती ऐकणेच श्रेयस्कर !!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Ransangram (swapnil d)26 February 2011 at 00:31

    Mast ekdum Mast

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. Naresh Patange26 February 2011 at 04:05

    Good post dude

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. mahesh1 March 2011 at 02:22

    मस्त यार

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Unknown30 November 2016 at 00:58

    1 no Mitra

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1