मराठीपण मिरवा दिमाखात
कधी तरी एकदा रस्त्यावर मराठी प्रेमसंदेश असलेले टीशर्ट पाहिले होते. तेव्हाच असे फर्मास मराठी टीशर्ट आपल्याकडे हवेतच अशी असूया निर्माण झाली. पण योग्य असे दुकान सापडत नव्हते. ऑनलाईन प्रिंट करुन देणार्या साईट्स होत्या, पण किंमत जास्त आणि त्यांच्या दर्जाची खात्री नव्हती. पण शिवराज्याभिषेकदिनी सातव्या रायगडवारीत एक महाराजांचे चित्र असलेले मस्त टीशर्ट मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी दृष्टिकोन-२०१० चे टीशर्ट तयार करायला त्या दुकानात गेलो तेव्हा एक ‘लय भारी’ टीशर्ट मिळाले होते. पण या टीशर्टच्या मराठीसाठी शब्दांचा आधार होता. मराठमोळा अभिमान शब्दांविना मिरवण्यासाठी शोध चालू होता.
ब्लॉगच्या आणि फ्लिकरच्या निमित्ताने झालेली अशीच एक इ-ओळख म्हणजे विशाल जगताप. त्याला साईट लॉंच करायची होती. आणि मी त्याला मदत केली असे त्याचे म्हणणे आहे. काय मदत केली, त्याचे त्यालाच ठाऊक. पण त्याबद्दल त्याने एक टीशर्ट गिफ्ट दिला. अस्सल मराठमोळा. शब्दांविनाच मराठीपण मिरवणारा. टीशर्ट आवडलाय हे सांगायला नकोच.
ही साईट आहे ओकाका. प्रथमदर्शनी एखाद्या जपानी साईटचे वगैरे नाव वाटेल, पण ही आहे अस्सल मराठी आदरार्थी दिलेली हाक "ओ काका..!!". गणपत, गंगू, गण्या, गोमू ही या साईटची ब्रँड अँबॅसेडर. साधी स्केचेस. पण मला मनापासून भावली (विशाल, लवकर कॉपीराईट करुन घे रे, चोरी होण्याची फार शक्यता आहे एवढी ही कॅरेक्टर्स भारी आहेत). या चार स्केचेसभोवती डिझाईन केलेली एकदम अत्युच्च दर्जाची टीशर्ट्स, बॅजेस, कॉफी कोस्टर्स, कॉफी मग्ज मला सगळीच आवडली. असे वाटले सगळीच गिफ्ट म्हणून घेऊन टाकावीत, पण थोडी लाज शिल्लक ठेवावी म्हणून एका टीशर्टवर समाधान मानावे. आपल्याला यातले काही हवे असेल तर हा इथे पूर्ण कॅटलॉग आहे. पहा आणि लवकर ऑर्डर्स नोंदवून टाका.

खरे तर कुठल्याच उत्पादनाची मी जाहिरात करत नाही. ही पण जाहिरात नाहीच. हा आहे मराठीपण मिरवण्याचा आग्रह. या उत्पादनांतून किंवा तुम्हांस माहित असलेल्या अन्य कुठल्या. नाही का?
ओकाका ! अप्रतिम डिझाईन आहे साईटचे व लोगोचे. मला खूप आवडले होते. जेव्हा पहिल्यांदा पाहिली तेव्हाच साईट मालकाला फोन केला ( विशाल ला ).
ReplyDeleteपुढील महिन्यात मीमराठी.नेटचा वाढदिवस आहे, मनात काहीतरी कल्पना आहे, पुढील आठवड्यात कॉलवायचेच म्हणत होतो.. :)
काका,
ReplyDeleteशतशाः धन्यवाद.
तू हे ब्लॉग वर टाकुंन मला खूप छान गिफ्ट दिलास संक्रांतिचा.
मी आपला खूप अभारी आहे.तुझा एक मस्त फोटो पाठव टी शर्ट घालु न.
छान डिझाईन्स आहेत..टी शर्ट आणि मग्स आवडले..:)
ReplyDeletethank you for sharing.
लिंकसाठी धन्यवाद.. :) आता काही टी-शर्ट मागवून घेतो.. :D
ReplyDeleteगेले तीन तास मी तुमचे ब्लोग आणि फोटोज पाहतोय !!केवळ अप्रतिम !!!
ReplyDelete