दृष्टिकोन २०१०: एक मागोवा
"आता आली वेळ. बॅटिंग करायची. डेट अनाउन्स करु. भूषण, वसंतोत्सव कधी? सवाई कधी आहे? पंक्या लग्न तुला थोडे उशिरा नाही का ठेवता आले? चल ठीकाय, ३,४,५ डिसेंबर."
"पंक्या, मंगेशला फोन केला का? त्याने थीम डिझाईन पाठवले का? त्याच्या मागे लाग. त्याला सांग लवकर बातमी पब्लिक करायची आहे. त्याला सतत पिंग करत रहा. लोकांना मेल केले का?"
"सौमी सर, ग्रुपवर पोस्ट टाका. मी सॅटरडे फाईव्ह पीएम मीट सुरु करतोय. बरिस्ता ला. फक्त गप्पा मारायला. नाही नाही, फक्त गप्पा मारायच्या. आपले प्लॅनिंग सनडे मॉर्निंगला करत जाऊ. गुडलकला बन-ऑम्लेट खायचे भो रविवारी."
"चैतन्य, अमित, किती बजेट होईल जरा आकडा काढ."
"स्वाती, पंक्या डॉक्युमेंटेशनला लागा. सगळे तयार ठेवा. मंगेशने पाठवले का डिझाईन. त्याला इनपुट्स देऊन दे."
"भूषण सर, हॉलचे बघा राव. ते जनगणना नंतर करा म्हणाव त्यांना. आम्ही येतो माणसं मोजायला. बालगंधर्व आणि न्यू आर्ट दोन्ही बुक करुन टाका. राहुल आहे का त्या तारखेला? कोण कोण अव्हेलेबल होईल? स्पॉन्सर कोण कोण असेल?"
"देव्या, घरी जाताना ऑफिसला ये. काम आहे. जाताना लवंगी मिरचीवरुन घरी जा मग. मी लवंगी मिरचीलाच मेस लावतो महिन्याची!"
"सर, तुम्ही थ्रेड सुरु केला का? किती रिस्पॉन्स आहे? एक मीट ठेवा, संभाजी पार्कला. पंक्या, इ-रजिस्ट्रेशनचे बघ लवकर. टेस्ट करु. मॅडम डॉक्युमेंटेशन द्या. मंगेशने काही ऑप्शन्स पाठवले आहेत. कुठला फायनल करायचा? टीशर्टवर पण छान दिसेल ते. त्या माणसाकडून कोटेशन मागव. सत्तर टीशर्टचे."
"वर्कशॉप्स जास्त ठेवू या वेळी. वैभव आणि आशयला देतो मॅनेज करायला. अंशुमला मॉड करुन टाकू. बेस्ट काम करतोय तो. तुमचे काय मत आहे? ठरले तर मग, सौमी, आजच डिक्लेअर करुन टाक. किती लोकांनी रजिस्टर केलंय? एंट्रीज यायला सुरु झाल्या का? तीन ब्रेड ऑम्लेट, दोन स्क्रॅंबल्ड एग्ज ऑन टोस्ट, नंतर सहा कॉफी. फोटो इन्फो टेम्पलेट मेल केले का? आदित्यचे पप्पा काही येत नाहीत आजकाल. पुढल्या महिन्यात चाललेत स्वित्झर्लंडला. काय बेस्ट आहे ऑम्लेट. खूप मान दुखतेय राव. ती स्पेशल खुर्ची घेऊन घेतो. फोटो प्रोसेस करायला पण बसता येत नाही. ए, कॉफी आण लवकर. पंक्या या वेळी लग्नामुळे तुला वेळ मिळणार नाहीये, तू ऑनलाईनच हेल्प करशील तो बोनस आहे आमच्यासाठी."
"दृष्टिकोन २०१०" ची तयारी ही अशी सुरु झाली होती. वन मॅन आर्मी सुहासच्या सगळ्या आघाडीवरुन सूचना. भूषणची कमी शब्दांची पण टू दि पॉईंट हमखास काम होणार असे आश्वासन देणारी साथ, सौमीचे शांत राहून प्रभावी ग्रुप को-ऑर्डिनेशन, मंगेशचे बिन्तोड डिझाईन, अमित-चैतन्यचे चोख अकाऊंटिंग, अंशुमचे मॅनेजमेंट स्किल आणि कंटेंट वर्डिंग, स्वातीचे फर्डे इंग्लिश, सगळ्या मेंबर्सचा सहभाग असा मसाला भरलेली रेसिपी "दृष्टिकोन २०१०" तयार होत होती. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे फोटोचे इमेल्स येऊन पडायला लागले. पहिल्या काही एंट्री निराशाजनक निघाल्या. पण नंतर असा काही बॅकलॉग भरुन निघाला की एक-सो-एक अशा तब्बल साडेसहाशे फोटो आले. त्यातून मग आम्हीच पहिली चाळण लावून चांगल्या एंट्रीज ज्युरींकडे दिल्या. लवकरात लवकर निकाल द्या अशी जवळपास ‘धमकी’ देऊनच. सकाळच्या '1000 Smiles' प्रोजेक्टमुळे पुण्यात ग्रुपचे नाव रिफ्रेश झाले होते. आणि लगेच त्यापाठी "दृष्टिकोन २०१०" मिडियात झळकू लागले. सुरुवातीला स्पॉन्सरचे बोंब होती, पण शेवटी शेवटी तेही झाले. अचानक इंकफ्लोट, रेडिओ मिरची, ग्रुपग्यान अशा काही आस्थापनांनी प्रदर्शन उचलून धरले. भूषणच्या मार्केटिंग टीमचे मोठे यश... सेलिब्रेशन करण्यासारखे.
आदल्या दिवशी दुपारी हॉल ताब्यात मिळाला तेव्हा अवस्था वाईट होती. साफसफाईपासून सगळी तयारी करावी लागली. पण सगळ्या ग्रुपने ‘घरचे कार्य’ अगदी तन-मन-धन लावून पार पाडले. कार्पेट टाकण्यापासून, फ्रेम लावणे, खिळे ठोकणे, टेबल उचलणे, इलेक्ट्रिशियनची कामं, लाईट्स लावणे, सजावट करणे, सगळे सगळे. त्याचा टाईमलॅप्स व्हिडिओ पाहणासारखा आहे.
रात्री रोज घरी जायला एक-दीड होत होते. पण कुणाचीच तक्रार नाही. प्रेस रिलीजमुळे प्रदर्शनाच्या ‘डी डे’ला झाडून सगळ्या वृत्तपत्रांनी बातमी छापली. मिडिया कव्हरेजमुळे आता व्हिजिटर्स पण वाढणार. तशी तयारी केली होती. प्रत्येक फोटो एक वेगळी कहाणी सांगत होता. मान्यवरांच्या हस्ते उदघाटनानंतर जो काही दर्शकांचा ओघ सुरु झाला तो काल रविवारी रात्रीपर्यंत कधीच आटला नाही. फ्रेम्सचा सेलही जबरी चालू होता. दुपारी जाऊन रोज बिर्याणी, चिकन असे काही काही आम्ही चापत होतोच. मला जमेल तसे मी हात बशीसारखा तोंडाववळ नेऊन सस्सस्सर्रर्ररर्रप्पप्प... म्हणून चहाच्या वेळेची आठवण करुन देत होतो. प्रत्येक दिवशी रात्री सगळे कार्यक्रम आटोपल्यावर भूषणची गिटार आणि गाण्यांची मैफिल रोज रंगत होती. त्या मैफिलीने तर सगळा दिवसाचा शीण निघून जात होता.
आजवरचे सगळ्यात यशस्वी प्रदर्शन, अफलातून फोटो, ७००० पेक्षा जास्त व्हिजिटर्स, २५% फ्रेम्सची विक्री आणि विद्या महामंडळासाठी रेकॉर्डब्रेक निधी. शेवटच्या रात्री प्रदर्शन आटोपल्यावर सगळी आवराआवर झाली. फ्रेम्स भिंतीवरुन उतरल्या. पॅक झाल्या. भूषणची मैफिल चालू होऊन संपतही आली. कसेसेच होत होते. पाय निघत नव्हता. उतरलेले चेहरे आणि भरुन आलेले डोळे एकमेकांना दिसू नयेत म्हणून की काय अचानकच लाईट गेली. गळाभेटी झाल्या आणि जड पावलांनी...
आता ‘दृष्टिकोन २०११’ पर्यंत काय? कुणाकडेच याचे उत्तर नाही. खरंच... सकाळीच चॅटवर सौमी, चैतन्यकडे म्हणून झाले चला चहा मारुन येऊ, चला ‘बाय द वे’ला, चला ‘करीम्स’ला बिर्याणी खाऊ. पण सगळ्यांना माहिती आहे... ते आता होणार नाही. आता मनात राहतील त्या आठवणी. एक प्रकारचे रितेपण, पण समाधानी रितेपण. पुण्यातले आजवरच सर्वांत यशस्वी फोटो प्रदर्शन आपण आयोजित केल्याचे समाधान आणि आता पुढे त्याबद्दल काहीच घडामोडी होणार नाहीत याचे रितेपण... निदान पुढले काही दिवसतरी... ‘दृष्टिकोन २०११’च्या मीट्स सुरु होईपर्यंत..!!

सिंप्ली ग्रेट..अजुन काहीच शब्द नाहीत दृष्टिकोनसाठी..तुम्ही केलेली मेहनत आणि चिकाटी हेच याच्या यशाच रहस्य..
ReplyDeleteहॅट्स ऑफ टू यू ऑल...
Superb mate!
ReplyDeleteHats Off To you guys !!
I missed this time !!!
अभिनंदन पंकज! खूप छान. :)
ReplyDeleteमस्तच!
ReplyDeleteहजर नाही राहता आलं... पण बातम्या - फोटो - व्हिडीओ या सर्वांवरुन तुम्हां सर्वाचा जोश - चिकाटी समजली!
अभिनंदन!
Kharach, Pankaj to Pankaj hai. Kya baat hai!!!
ReplyDelete:D
ReplyDeleteNicely written. Loved it.
तुमची सगळ्यांची मेहनत दिसत होती पंकज प्रदर्शनात. बाहेरून बघताना फोटोंची दर्जा, निवड, सादरीकरण, प्रसिध्दी - सर्व बाजूंनी प्रोफेशनल दर्जाचं वाटलं प्रदर्शन. आपली भेट नाही झाली तिथे ... पण खूप दिवसांनी इतके सुंदर फोटो इतके सुंदर मांडलेले बघितले. दृष्टीकोन २०११ ला नक्की येणार बघ मी! :)
ReplyDeleteधन्यवाद सुहास, दीपक, अनघा, भुंगा, किरण, पिक्सेलकीडा.
ReplyDeleteगौरी, त्या करीम्स बिर्याणीच्या इथे एवढा वेळ लागला की शेवटी आम्ही त्याच्याशी भांडून उपाशीपोटीच परत आलो.
By far the best exhibition held by P@P so far.
ReplyDeleteGood job, well executed.
(JimReeves)
पंक्या एकंदरीत खुपच छान होता तुम्हा सगळ्यांचा दृष्टिकोन.
ReplyDeletebintod!!
ReplyDeleteMasta.. :)
ReplyDeleteउतरलेले चेहरे आणि भरुन आलेले डोळे एकमेकांना दिसू नयेत म्हणून की काय अचानकच लाईट गेली
ReplyDeleteLaich bhari re pankaj
ReplyDeletesuperb work done pankaj..nicely written..i have been there for 2 days..for sessions..fantastic mast mehenat..ghetli saglyanni ani ekun maja ali..superb..f'11 la nakki helpo asel mazhi for sure..
ReplyDeleteZakkas... Keep up the great work...
ReplyDeleteFoto Aflatun Hote.
Panku kupach chan
ReplyDeleteअरेरे मी बझवर काय कुठेच नसतो ना ! आज चुकून वाट चुकलोय तर एव्हढ्या मोठ्या दृष्टीकोनाला चुकलो ह्याची चुटपुट लागून राहीलीय !
ReplyDeleteखुपच मस्त...पुढच्या वर्षभराचे inspiration मला दृष्टीकोन मध्ये मला तुमच्या सर्वान्च्य भेटीमुळे केवळ एका तासात मिळाले.
ReplyDeleteदेसलेंनीच जास्त फुटेज खाल्लय या पोस्टमध्ये :-)
ReplyDeletePankya Mitra !!! evadha premat padlas Sahyadricya ??? pan ekda aamcha Himalay baghun yech...m from Pune only (agadi shuddha MH-12)..Pan baghach to Manali to ladhakh way...Madhuchandrala jau makos tithe..nahitar sou na sodun photo kadhat basashil...
ReplyDeleteaamhala nahi kalale kahi!!! sarv zahale khote.nayan aale bharuni hote he pradarshan kothe !!!
ReplyDeleteAamhihi aalo aasato pan amhas kalpana nahi..dile aasate aamchehi photo jyala jag jagtat kimmat nahi...are sanga na sanga drushtanno kuthe aasate he sarv sare..aamhihi mhanu ki he aani hech aamche photo khare