मुळशीत चालू आहे निसर्गाची ‘सरकारी’ कत्तल
By
Unknown
सकाळी सकाळी देव्याचा मेसेज आला. "Aplya mulashi spot chi vaat lagli. Read pune mirror for details'. मनात म्हटले काही काम नाही का याला. अजून मी झोपेतच आहे आणि हा मेसेज पाठवतोय. फक्त "aata dusara spot shodhava lagnar" असा रिप्लाय करुन मोकळा झालो. सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो आणि पुणे मिररचा ऑनलाईन अंक उघडला. आणि तळपायाची आग मस्तकात गेली. आमच्या लाडक्या मुळशी-ताम्हिणीच्या सिक्रेट लेकची बातमी होती. ज्या लेकला आम्ही पहाटे तीन वाजता उठून फक्त एक सूर्योदय टिपण्यासाठी सत्तर-ऐंशी-नव्वद किलोमीटर जात होतो त्याच्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या जागेवर राज्यशासनाने तथाकथित पर्यटन विकासाच्या नावाखाली मुळशीमध्ये खाजगी हिलस्टेशनला मान्यता दिली होती. शासनाच्या नगरविकास विभागाने २१ ऑक्टोबरच्या अधिसूचना क्रमांक १८१०/१५५१/पीसी२३८३/२०१०/यूडी-१३ अन्वये या स्वर्गीय जागेच्या विनाशाला मान्यता दिली. या अधिसूचनेनुसार सालतूर, माजगाव, एकोले, भांबर्डे, आडगाव अशा पाच सहा गावांची जमीन संपादित करुन निसर्गाला कुरतडून हे हिलस्टेशन बनवले जाणार आहे.
शासनाने यापूर्वीच लवासा, अँम्बी व्हॅली अशा ठिकाणी निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या असलेल्या सह्याद्रीची आधीच वाट लावली आहे. त्यात ही आता नवीन भर. अँम्बी व्हॅली तर अशी काही अक्राळविक्राळ पसरली आहे की कोराईगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत धनिकांचे बंगले उभारले आहेत. बेलाग कड्यावर उभारलेले बंगले म्हणजे इतिहासाच्या साक्षीदाराच्या अंगावर लागलेली बांडगुळे दिसू लागलेली आहेत. असेच आता घनगडाच्या डोक्यावर रिसॉर्ट किंवा तेलबैलाचा माथ्यापर्यंत रोपवे झाला तर आश्चर्य वाटणार नाही. आता या अध:पतनाला विकास आणि रोजगार निर्मितीचे गोंडस नाव देऊन हे लोक वनसंपत्तीची कत्तल करणार, रस्त्यांच्या नावाखाली माझा सह्याद्री खोदून काढणार, हवे तसे नद्यांचे पाणी वळवणार, धबधबे आता त्यांच्या रिसॉर्टमधून वाहणार. मग हौसे-नवसे-गवसे पर्यटक त्यात बियरच्या बाटल्या घेऊन नंगा नाच करणार, त्यांना सुविधा पुरवण्याच्या नावाखाली बिडी-सिगारेटचे स्टॉल लागणार. विकासाच्या नावाखाली अशा नैसर्गिक साधनसंपत्तीची कत्तल करुन आपल्या तुंबड्या भरण्याचा उद्योग चालवलेल्या राज्यशासनाचा, शासनकर्त्यांचा आणि त्यांच्या दलालांचा जाहीर निषेध...!!! निषेध...!!! निषेध...!!!
पूर्ण बातमी इथे वाचायला मिळेलः Pune Mirror

अवांतरः
परवाच मिलिंद गुणाजी यांनी नाणेघाटाच्या एका कड्याला आणि पळूजवळच्या धबधब्याला स्वतःचे आणि मित्राचे नाव दिल्याचे ऐकले. अहो, कुठल्या तरी किल्ल्याला शिवाजी महाराजांनी स्वतःचे नाव दिलंय का? हिरोजी इंदुलकरांनीही जागा मिळवली ती जगदीश्वराच्या पायाशी. "सेवेशी तत्पर, हिरोजी इंदुळकर"
आयचा घो यांच्या!!
ReplyDeleteत्या लावासा सिटीच्या नावाखाली यांनी आधीच निसर्गाची वाट लावली.. आता ही नवीन जागा....!
निषेध निषेध..!
अजून निसर्गाची वाट लावा !! लवासा काय कमी होतं !! च्यामारी, शब्द नाहीत माझ्याकडे !!! biodiversity hot spot असलेल्या सह्याद्रीचा निसर्ग ओरबाडून खाताय हे हरामखोर !! पर्यावरणाचे किती नुकसान होतंय!! आदर्शपणे सह्याद्रीत कुठल्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाला,बांधकामाला सरळ मनाई पाहिजे.. दूरचे परिणाम विचारात घेतच नाहीयेत..
ReplyDeleteमित्रा पंकज,
ReplyDeleteमी सकाळ मध्ये आपले सदर वाचतो, आपल्या निसर्गप्रेमाविषयी मला खुप आदर आहे. सध्याचे सत्ताधारी खरच विकासाच्या नावाखाली निसर्गाची वाट लावत आहेत, यांना कोण थांबवणार, आणि कसचा विकास अन कसचं काय यांना फक्त पैसा पाहीजे आहे, सगळं विकुन झाल्यावर शेवटी हे हवा, पाणी, यांचाही लिलाव करतील, आणी तो दिवस दुर नाही,
या पैसापिपासू वृत्तीच्या सत्ताधा-यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध !!
http://aapplimarathi.blogspot.com
http://mazigandhigiri.blogspot.com
अमोल देशमुख
कुठे ते सुंदर धबधबे अन कुठे ते कृत्रिम रिसोर्ट्स.. निसर्गाचं व्यापारीकरण चालू आहे अन काय.. खरच तळपायाची आग मस्तकात गेली..
ReplyDeleteThe plans are
ReplyDeleteExpressway from New Mumbai Airport via Tamhini up to Lavasa and then up to New mahabaleshwar.
Complete privatisation and thus destruction of western ghats in Pune district.
I recently also saw a big resort/hotel built right on the Tung fort. It has completely defaced the beautiful mountain.
aaila kharch khup faltugiri chalu ahe...awara hya lokanna...
ReplyDeleteअरेरे.. हेच दिवस यायचे बाकी होते.
ReplyDeleteऐतिहासिक स्थळे (उ.दा पन्हाळा) हनीमून spots आणि सिक्रेट लेक चा परिसर आता हिल स्टेशन....
णीशेध.
----------------------------------------------
राहून-राहून वाटतय माणसा !
आता तरी जाग रे !
मनुष्य जातीची लाज तू थोडी तरी राख रे!
[संदर्भ : मी माणूस शोधतो आहे]
ya haramyana mara...thecha bhad@@$$na..Far far vaiit martil he useless lok
ReplyDeleteसुधारणेच्या नावाखाली काहीही चाललाय ...
ReplyDeleteहाणायला पाहिजे ह्यांना ..
फार उद्वेगजनक आहे हे ! अस्वच्छ मनाच्या असंवेदनशील माणसांना कसला निसर्ग, कसले संवर्धन आणि कसली सौंदर्यदृष्टी ! अर्थात हे सर्व क्षेत्रातच चालू आहे. निसर्गाला असे ओरबाडणा-यांना वठणीवर कोण आणणार हाच कळीचा मुद्दा आहे.
ReplyDeletePlease raise your voice using this link
ReplyDeletehttp://moef.nic.in/modules/contact-ministry/contact-ministry/
Not sure if this will help, but may be Jayram Ramesh really would read this and do something. Just a hope.
मला तर वाटते पूर्ण राज्य सरकार बरखास्त करून त्याचे खाजगीकरण केले पाहिजे...आणि सगळा कारभार केंद्र किंवा सैन्य सरकार कडे द्यायला हवा...मला वाटते आहे हीच वेळ आहे आपण सगळे एकत्र येऊन भ्रष्ट राज्य सरकारच्या टिंब टिंब वर लाथ मारायची.
ReplyDeletesarkar barkhsta karun upyog kay?sarech rajya karte
ReplyDeletebhrashta,eak upay jase hagandari mukta gav,tya
pramane bhrshtachar youkta maharashtra.ashi ani
anek prakare yojana amlat anlya pahijet.