मन माझे...
By
Unknown
/ in
Bhatkanti Unlimited
Blog
मन माझे... उगवतीचा रंग घेऊन हळूवार स्वप्न रंगवते,
पक्ष्यांच्या किलबिलाटातून कानांशी रुंजी घालते,
ऊबदार दुलईतून कुशीत तुला घेते,
आणिक कोवळे उन्हं होऊन तुला जागवते.
पक्ष्यांच्या किलबिलाटातून कानांशी रुंजी घालते,
ऊबदार दुलईतून कुशीत तुला घेते,
आणिक कोवळे उन्हं होऊन तुला जागवते.
मन माझे... कधी मेघदूत पाठवून गुज तुजला सांगते,
कधी अवचित बरसून चिंब भिजवते,
कधी हातावर धारा झेलून झिम्माडते,
तर कधी वीज कडाडून तुजला भिवविते.
मन माझे... कधी वार्यासवे तरंगत तुजपाशी येते,
कधी वाराच होऊन गालांशी सय घेते,
कधी हळूवार झुळूक बटांना लाडावून जाते,
तर कधी उधाणत येऊन विस्कटून सतावते.
मन माझे... कधी फुलपाखरु होऊन स्वच्छंद विहरते,
कधी ससा होऊन घाबरुन शहारते,
कधी मोरपिसारा लेऊन नाचू लागते,
तर कधी हरिण होऊन वेगे धावत तुजपाशी येते.
मन माझे... कधी एकांत आठवणीत वेडावते,
कधी कातरवेळी आठवणींनी तुला छळते,
कधी क्षितिजापार तुझी वाट पाहते,
तरी पाखरासारखे फिरुनि तुझ्याचकडे परतुनि येते, मन माझे...
झक्कास!
ReplyDeleteकाव्य म्हणजे मनातील घुटमळत असलेल्या विचारांची वा भावनेची उत्स्फूर्त आणि नैसर्गिक अभिव्यक्ति... तुझी यापूर्वीची "एक संध्याकाळ: तुझी नि माझी" आणि हे पद्य अगदी तुझ्या मनाशी गुज जुळवणारे... एकूणच, अतिशय छान जमलीय कविता... सदिच्छा!
ReplyDeleteसुंदर! खूप छान...हळुवार! :)
ReplyDeleteपंकजभाऊ,
ReplyDeleteजसजशी लग्नाची तारीख जवळ येत चालली आहे, तुमच्यातला कवि अधिकाधीक तरल होत चालला आहे. फोटो, ब्लॉग, ट्रेकींग आणि कविता.... च्या मारी, धूम फट्याक.... You know what, you have a problem of plenty.... तू जिकडे हात घालतोस, तिकडे सोने करतोस मित्रा !!!
कधी वाराच होऊन गालांशी सय घेते, वगैरे म्हणजे तर कहर.... तू आलास रे रंगात गड्या.... नादखुळा !!
सुंदर अन अगदी तलम...
ReplyDeleteekdam mast re
ReplyDeleteसही भौ.. :)
ReplyDeleteWaw.. Sundar... :)
ReplyDeleteझकास ! कवितेतल मला एवढ समजत नाही .. पण वाचल्यावर मस्त वाटलं.
ReplyDeleteआवडेश...फ़ुल्टु आवडेश
ReplyDeleteTodalas re mitra!!!
ReplyDeletetisara kadav ekdhum bhannat :)
कवितेतल शेवटच कडव खुप आवडल रे...
ReplyDeleteअप्रतिम....मस्तच!!
ReplyDeletechhan
ReplyDeleteक्या बात है!! मस्तच....
ReplyDeleteMast ch ... maan tuze ..
ReplyDeleteEkdam chan...
ReplyDeleteAchanak Katar weli Athawan Tujhi aali..
ReplyDeletePrit majhi Bedhundh Jhaali...
Hya mi lihilelya kahi oli ithe Share karawyashya watalyat...
http://ransangram.blogspot.com
वाह वा... क्या बात है. एकदम सही!!!
ReplyDeleteमाझी कमेंट बरेचदा उशिरानेच येते... तुला सवय असेलच... तसेही मी ट्रेक करताना पण शेवटीच असतो... :)
ReplyDeleteकाय भाऊ... आता एकदम कविता वगैरे... तुझ्या बरोबर ट्रेकचे जमवायलाच हवे आता... पण कसे... तू तर लटकणार आहेस लवकरच... आणि नंतर...............
खूप छान !!
ReplyDelete