एक संध्याकाळ: फक्त तुझी नि माझी
By
Unknown
सागरतीरी तुझा हात हातात घेऊन दूरवर चाललेलो अंतर...
दमून-भागून एके ठिकाणी वाळूत मारलेली बसकण...
दोघांनी एकत्र ऐकलेली सागराची गाज...
चमचमत्या जलपटलावर रंगवलेले आयुष्याचे स्वप्न...
दूरवर शिडात वारा भरलेले जहाज...
आपल्या स्वप्नासारखेच... हेलकावत भेलकांडत क्षितिज गाठणारे
संधिप्रकाशी घेतलेल्या जन्मजन्मांतरीच्या शपथा...
परस्परांविषयी केलेल्या लडिवाळ तक्रारी...
कपाळावर ढळलेल्या तुझ्या केसांच्या लडी...
त्यांना मागे सारणारी माझी बोटं...
स्वप्नांत हरवत जाणारी संधिप्रकाशाची वेळ...
मग पडलेला अंधार...
अचानक आलेले वास्तवाचे भान...
आणि थोडीशीच घाबरुन कुशीत विरघळणारी तू...
खरंच हे सारे सगळे आपल्यासाठीच निर्माण झाली आहे ना... सारे असेच रहावे...
Fida...
ReplyDeleteतरल,भावोत्कुट. जियो!!!
ReplyDeletewa bhai wa.
ReplyDeletehmmmm..अरे व्वा! 'भटक्या' settle व्हायचं म्हणतोय वाटतं!! चालू द्या चालू द्या! :D
ReplyDeleteचाबूक रे.......... सुसाट काव्य !!!!! ही तुझी बाजू आम्हास माहीत नव्हती. च्यायला, सगळ्या कलांना दाटीवाटीने बसवलंय तुझ्यात देवाने
ReplyDeleteबाप..... कविता सुरेख आणि फोटो समोर नतमस्तक !!!
ReplyDeleteव्वाह व्वाह व्वाह... बोहोत खुब...
ReplyDeleteVishal :-
ReplyDeleteमित्रा लवकरच दोनाचे चार होतायत वाटते...
Tag बदलावा लागेल मग from पंकज "भटकंती अनलिमिटेड" to "घराची साफ सफाई अनलिमिटेड" ....
स्वानुभव आहे रे हा मित्रा....
सुरेख
ReplyDeleteसागरतीरी तुला हातातून कॅमेरा सोडवा लागेल या पुढे (माझे अनुभवाचे बोल (अन्यथा वाद होतात) )
ReplyDeleteअरे मित्र खूपच सही .. आपण अशा खूप कविता वाचतो पण कोणी ओळखीच्या व्यक्तीने लिहिलेली असेल तर खूप आनंद होतो .. मस्त आहे एकदम
ReplyDeletehummm, nice one :)
ReplyDeleteI think i will have to meet your mom.
December is too long isn't it?
Enjoy buddy, enjoy ... you will not get these days back. So enjoy each and ever moment of this.
ultimatum..
ReplyDeleteAha... farch sundar.. :)
ReplyDeleteपंक्या ....भटकंती सोबत तु आता कविता पण करायला लागलास...लग्न करणार आहेस म्हणुन हा बदल का???
ReplyDeleteफ़ोटु मस्तच आहे...कविता पण चाबुक आहे. :) :)
Ekdam Chan!!!
ReplyDeleteएकदम छान!!!
ReplyDelete"अखंड राहो प्रीत तुझी नि तीची,
ReplyDeleteआजवरी तू जिद्दीने आव्हाने पेललीस,
जरी आली संकटे वाटेने अजुनि,
भ्यायचे नाहीस, ताकद असेल तेव्हा तुज्यात हत्तीची...
साहजिकच आहे,
हरवशील पाहण्यात स्वच्छंद रम्य स्वप्ने तीची,
पण भाऊ, अजुन एकीवर* तू भाळलीय जिंदगी,
आठव अन् विसरु नकोस कदापि,
शपथ आहे तुला तुझ्या भटकंतीच्या खाजेची..."
एकीवर* ~ तुझी ट्रेकिंग, भटकंती रे भाऊ, उगाच अर्थाचा अनर्थ व्हायचा!
---
तथापि, तुझ्या काव्य-पंक्ती तर अविश्वसनीय... विक्रांताप्रमाणे मी देखील प्रथम चक्रावून गेलो की हा खरंच पंक्याचाच ब्लॉग आहे ना म्हणून... खरंच, तू एक शब्द-सामर्थ्यवान अन् सुंदर कवीदेखील आहेस... माझ्या सदिच्छा!
khup chan ahe kavita
ReplyDeleteawesome!
ReplyDeleteसही रे.
ReplyDeleteapratim !
ReplyDeleteMastach :)
ReplyDeleteKhupach sundar... :)
ReplyDelete