Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

कार: पेट्रोल की डिझेल?

By Unknown
/ in analysis Blog car
29 comments
आपल्या अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस पुढील मोठी स्वप्ने पाहू लागतो. असे़च काहीसे माझे झाले. घर आणि काही कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून झाल्यावर घरी आईला आमचे ‘वाजवायचे’ वेध लागले. आणि तसा आम्ही सहा वर्षांपूर्वीच ’बुल्स-आय’वर तीर मारुन ठेवल्यामुळे तो प्रश्नही तारखेसह लवकर निकाली निघाला. आता वेध लागले चारचाकीचे. प्रत्येक मध्यमवर्गीयाला पडणार्‍या स्वप्नापैकीच एक. बरं हा पांढरा हत्ती घेणे सोपे पण पुढे इंधन भरुन वापरणे जरासे अवघड. तरीही त्यातल्या त्यात जास्त मायलेज देणारी आणि आपल्या वापराच्या हिशोबाने कमीत कमी रनिंग कॉस्ट असणारी कार आपण निवडतो.

अशीच एखादी ‘क्ष’ कार समजा मी निवडली (समजायला काय जातंय). आता या ‘क्ष’कारचे (किंवा कुठल्याही कारचे) दोन ढोबळ प्रकार येतात. पेट्रोल इंजिनवाली आणि डिझेल इंजिनवाली. डिझेल पेट्रोलपेक्षा बरेच स्वस्त पडते आणि डिझेल इंजिनाचा मायलेजही पेट्रोलपेक्षा जास्त. त्यामुळेच डिझेल कार घेण्याचा मोह एक्वार होतो. पण थोडी किंमत कमी असल्यामुळे थोडी जास्त पॉवर देणारे, आणि स्मूथ चालणारे पेट्रोल इंजिनही भुरळ घालत असते. मार्केटला विचारले तर एकंदरीत जास्त रनिंग असेल तरच डिझेल गाडी घ्या असा सल्ला मिळतो, "पण थोडा मेंटनन्स जास्त असतो बरं का" असे कॅव्हेटही जोडले जाते. म्हणजे एकदा का तुम्ही कार घ्यायचे नक्की केले की तुमचे कन्फ्युजन ठरलेले. माझेही असेच काहीसे झाले. डोक्यात स्पार्क झाला की कार घ्यायला पाहिजे आणि इंटरनेट फोरमवर पेट्रोल की डिझेल असा ‘गाडीनामा’ वाचू लागलो. दुसरे काहीच सुचेना. पेट्रोल-डिझेलही एकमेकांना म्हणत असतील "रात्रंदिन आम्हां युद्धप्रसंग". मग एके दिवशी ठरवले की आज निकाल लावायचाच. कागद पेन घेतला आणि गणितं मांडायला सुरु केले.

‘क्ष’कार एका लिटर पेट्रोलवर १५किमी चालते. पेट्रोलचा दर ५५ रुपये प्रति लिटर, म्हणजे एका किलोमीटरसाठी रु. ३.६६.
आणि त्याचेच डिझेल इंजिन एक लिटर डिझेलमध्ये १८ किमी चालते. डिझेलचा दर ४० रुपये प्रति लिटर, म्हणजे एका किलोमीटरसाठी रु.२.२२.
याचाच अर्थ डिझेल इंजिनाची प्रति किलोमीटर बचत रु. १.४४.


माझे दिवसाचे रनिंग साधारण २० किमी. म्हणजे ऑफिसला जाण्याचे पाच दिवसांचे १०० किमी. असे वर्षात ५२ आठवडे. अगदी रोजच वापरली तर एकूण ऑफिससाठी रनिंग ५,२०० किमी.
मी पडलो भटकंती Unlimited. महिन्यातून सरासरी दोनवेळा प्रत्येकी २०० किमीची भटकंती. म्हणजे वर्षाला २६. त्याचे गणित आले ५,२०० किमी वर.
म्हणजे एका वर्षात एकूण १०,४०० किमी. सोप्या गणितासाठी १०,००० किमी धरले (त्यात मी रोज ऑफिसला कारने जाणार, त्याची शक्यता थोडी कमीच आहे).
वर्षाकाठी डिझेल इंजिनाची बचत झाली रु. १४,४००.


पेट्रोल इंजिनाला एका वेळच्या देखभालीसाठी (सर्व्हिसिंग) साधारण ३,००० रुपये खर्च आणि डिझेल कारला तोच खर्च ४,०००. अशा वर्षातून दोन सर्व्हिसिंग धरल्या तर एकूण फरक म्हणजे डिझेल इंजिनाला लागले २,००० रुपये जास्त. म्हणजे ते बचतीतून वजा करावे लागतील. याचाच अर्थ डिझेल इंजिनची बचत आली १४,४०० - २,००० = १२,४०० रुपये.


आता ‘क्ष’ कारच्या डिझेल इंजिन प्रकारच्या गाडीची किंमत पेट्रोल इंजिन व्हर्जनपेक्षा रु. ८०,००० ने जास्त आहे. कुठल्याही गाडीचे असेच असते, साधारण फरक असतो रु. ८०,०००. म्हणजेच मी डिझेल इंजिन घेतले तर त्याचा प्रत्यक्ष फायदा मला केव्हा मिळेल? जेव्हा मी आधी भरलेले जास्तीचे ८०,००० रुपये वसूल करेन तेव्हाच. ते कधी वसूल होतील? जेव्हा माझी एकूण बचत ८०,००० होईल. त्यासाठी मला आताच्या गणितानुसार ८०,००० / १२,४००० = ६.४५ वर्षे लागतील. सोप्या गणितासाठी ६ वर्षेच धरले. याचा अर्थ मी जेव्हा ६ वर्षे कार वापरेन तेव्हा माझे जास्तीचे टाकलेले ८०,००० रुपये वसूल झालेले असतील. पण जर मी आता ते न देता पेट्रोल कार घेतली तर समजा माझ्याकडे आताच ८०,००० रुपये (हातात कॅश) आहेत. त्या ८०,००० रु वर सहा वर्षाचे कमीत कमी ६% ने व्याज झाले रु.२८,८००. म्हणजे सहाव्या वर्षाच्या शेवटी एकूण ८०,००० + २८,८०० = रु. १,०८,८००. किंवा आता कॅश न ठेवता मी कारसाठी कमीतकमी ८% सरळव्याजाने कर्ज घेतले आहे. तर त्याची एकूण परतफेड होईल रु. १,१८,४००. शिवाय सहा वर्षांनंतर डिझेल कारची रिसेल किंमत पेट्रोल कारपेक्षा कितीतरी कमी असणार, कारण कालांतराने डिझेलचा मेंटनन्स वाढतो.

पण डिझेल कार वाईटच असते असे नाही. तुमचे रोजचे रनिंग ६० किमी आणि अधिक असेल तर तुमची डिझेल इंजिनमध्ये केलेली गुंतवणूक दोन-तीन वर्षांतच वसूल होईल.

याहून अधिक काय बोलू? मी कुठली गाडी घेईन ते इथे लिहीनच.

Related Posts

29 comments:

  1. swapnil26 August 2010 at 10:51

    mastach lihila aahe!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. vishaljagtap26 August 2010 at 11:24

    ddamalo ganit vaachun...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Saurabh26 August 2010 at 11:36

    अरे फार सुरेख... इतक्या साध्या पद्धतिन समजावलय की आता कोणीही लगेच निर्णय घेऊ शकतं. मस्तच... :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. रोहन चौधरी ...26 August 2010 at 17:21

    वा.. पंकज... गणित चांगले मांडले आहेस.. मी सुद्धा गेल्या नोव्हेंबरमध्ये असेच थोडेफार आकडे मांडून... 'पेट्रोल' घेतली.. :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. kale_v26 August 2010 at 19:15

    वाहने बनविणारयांपैकी असल्याने, हा माझा एक आवडीचा विषय आहे. मला हे गणित माहित असुन सुद्धा मी पेट्रोल वाहन घेतले. कारण,
    १) आडवाटेला चढणीवर, इमरजन्सी ओवरटेक करताना लागणारा लो एंड टॊर्क पेट्रोल वाहनात मिळतो, डिझेल मध्ये नाही.
    २) सुरुवातीला लागणारी कमी किंमत.

    मात्र तोटे आहेत,
    १) जास्त कार्बन डाय ओक्साइड उत्सर्जन (पेट्रोल)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. सिद्धार्थ26 August 2010 at 20:20

    कसलं जबरा गणित आहे मित्रा. आजपर्यंत तुझी भटकंती, फोटोग्राफी आणि शैलीदार लेखन पाहिले होते. पण आज आपण किचकट गणित सोप्पे करून दाखवलेत. ही पोस्ट वाचल्यामुळे मला तरी पुढे डिझेल की पेट्रोल हा प्रश्न १ मिनिटापेक्षा जास्त सतावणार नाही.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. भुंगा26 August 2010 at 21:08

    हुश्श..!
    खरंय रे तुझं गणित.. आपण यावर आधीही चर्चा मांडलेली... त्याचवेळी हे पटलेलं!

    आता गणित - गाडी ब्रँड - मॉडेल कोणतं घ्यावं त्याचं!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Hrushikesh Wakadkar26 August 2010 at 22:20

    Good One.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Kapss26 August 2010 at 22:55

    Consider Chevy Beat !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. विक्रम एक शांत वादळ26 August 2010 at 23:58

    रोजचा वापर कमी असेलतर तर पेट्रोल गाडी घेण्यात काहीच हरकत नाही

    वरील गणितात डिझेल गाडीचे मायलेज १८ घेतले आहे परंतु सध्या २० पेक्षाही जास्त मायलेज देणाऱ्या डीझेल गाड्या उपलब्द्ध आहेत असो

    कोणती गाडी घेतली हे सांगताना पार्टी कधी देणार आहे हे सांगायला विसरू नये हि नम्र विनंती :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Abhay Nirwan27 August 2010 at 01:13

    Am thinking of Ritz :-)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Pankaj - भटकंती Unlimited27 August 2010 at 05:30

    धन्यवाद स्वप्नील, विशाल, सौरभ, हृषिकेश.
    रोहन तुला तर इंधन फुकटच असेल ना, खोद विहीर की भर गाडीत :-) तुला काय फरक पडतो कुठलीही घेतली तरी?
    खरंय विवेक... लो एंड टॉर्कबद्दल.
    भुंगा, आपले हे गणित फार जुने आहे. तू कुठली घेणार आहेस?
    कपिल, बीट ... eeks.
    विक्रम, डिझेलचे मायलेज २० असले तरी सामान्य स्थितीत ते १८च मिळते. शिवाय मग पेट्रोलचेही मायलेज १८-१९ सांगते कंपनी आजकाल. 'पार्टी मागू नये' ही पुणेरी सूचना राहिलीच का?
    अभय मामू, कधी? पार्टी पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. SNEHA27 August 2010 at 08:10

    Hmm.. Good analysis. N LPG kit valya cars baddal kay? I know ki tyachyat choice far ch kami rahto, pan tyachi cost tar diesel peksha pan kami aahe ani jast running asel tar nakki ch worth aahe. Hya madhe existing car la hi Gas kit lavta yeu shakte, pan tyat risk factor jast aahe. Pan LPG kit wali navin Wagon R ha changla option asu shakto majhya mate.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. Somesh27 August 2010 at 10:29

    पेट्रोल-इस्टिलो..घेतली‌ !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. Pankaj - भटकंती Unlimited27 August 2010 at 10:38

    स्नेहा, एलपीजी डिझेलपेक्षा कमी रनिंग कॉस्ट नाही देणार. साधारण १५-२०% बचत होते. पण त्यासाठी आधी २२-२५ हजार इन्व्हेस्ट करावे लागणारच. शिवाय चढाचा रस्ता आणि अधिक लोड असताना हवा तसा परफॉर्मन्स मिळत नाही. शिवाय एलपीजीमुळे इंजिनची लॉंग टर्ममध्ये हानी होतेच, कारण ते इंजिन पेट्रोलसाठीच डिझाईन केलेले असते. त्यामुळे रिसेलमध्ये पण फटकाच ना?

    सोमेश, अभिनंदन हो!! कुठून घेतली रे? कुदळे कार्स का?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. SNEHA27 August 2010 at 13:20

    Accha, thanks for the info. Majha study jevha suru karel tyat he majors kami yetil.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  17. Umesh31 August 2010 at 02:33

    Wait for electrical car. Mahindra has taken over the Reva. Now electrical car or hybrid car will come with good economic models.
    But this is not for you cause, now it's shadi .. so get any car and give us a party .....
    Thanks buddy for nice analytical blog.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  18. अनघा31 August 2010 at 09:36

    बापरे! दमछाक झाली!! पण मग एव्हढं गणित केल्यावर गाडी घेण्याचा आनंद शिल्लक राहील ना?
    :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  19. अनघा31 August 2010 at 09:41

    मी आज तू काढलेले फ्लिकरवरचे फोटो बघितले... खूप छान आहेत!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  20. Pankaj - भटकंती Unlimited1 September 2010 at 06:21

    अनघा, कार घेतल्यानंतरचा आनंद खूप दिवस टिकावा आणि आपण आपली पहिली-वहिली (किमान माझी तरी) कार एकदम फुल्ल्टू एंजॉय करावी म्हणून आधी हा गणित-त्रास करावा लागतो.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  21. राजू झगडे1 September 2010 at 23:05

    बेस्ट ऑफ लक -- पेट्रोल गाडी साठी btw कोणती गाडी घेणार आहेस ?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  22. राजू झगडे1 September 2010 at 23:06

    बेस्ट ऑफ लक -- पेट्रोल गाडी साठी btw कोणती गाडी घेणार आहेस ?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  23. अनघा2 September 2010 at 08:30

    पंकज, लवकरच तुझ्या घराबाहेर तुझ्या मनाजोगती झक्कास गाडी उभी राहू दे! :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  24. Pankaj - भटकंती Unlimited2 September 2010 at 10:07

    अनघा, गणेश चतुर्थी :-)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  25. अपर्णा14 September 2010 at 10:29

    पंकज नवी गाडी घेतल्याच कळलंय..त्याबद्दल अभिनंदन...इतकडे च्यामारिकेत पेट्रोल डिसेलपेक्षा स्वस्त असता..(एका galen साठी तरी...) त्यामुळे हे calculation दोन्ही वेळा करावा लागला नाही...भारतात तर रोज कामाच्या ठिकाणी गाडी नेलेली बरी का हा प्रश्न नेहमीचाच आहे...आर्थात आमचा पाणी मुंबईच त्यामुळे पुण्यनगरीचे नियम अर्थात वेगळे असू शकतात....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  26. अनघा18 September 2010 at 03:19

    अरे वा!!! आली ना तुझी गाडी? अभिनंदन!!!! :D

    ReplyDelete
    Replies
      Reply
  27. Anonymous12 October 2010 at 04:54

    तुझं पोस्ट आवडलं आणि पटलं सुद्धा. कुतुहलापोटी विचारतो, कुठली गाडी घेतलीस मग? त्याचही असच विष्लेषण करा. तेवढीच आमच्या माहितीत भर पडेल.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  28. Pankaj - भटकंती Unlimited12 October 2010 at 05:16

    आपणां सर्वांचे आभार. मी शेवटी पेट्रोल गाडी घेतली. सुझुकी स्विफ्ट. हा तिचा एक गोंडस फोटो.

    http://www.flickr.com/photos/pankajz/5050212648/

    ReplyDelete
    Replies
      Reply
  29. nishikant2 November 2010 at 08:05

    Hi Pankaj,

    I am quite a reguler visitor and not sure how did I missed this post earlier . :) First of all. FANTASTIC writeup. Couple of points I would like to share about Diesel engines.

    1. Abt the low end torque : New generations of CRDi engines (Courtesy : FIAT) diesels are extremely fun to drive and peppy. (Self exp: SWIFT LDi and Palio Multijet). One myth that diesels are slow in picking up speed is now history

    2. Ownership Cost : In older generations of diesel engines it was definitely on higher side. But with this new generation engines which power MSIL, FIAT,TATA, HYUNDAI,MAHINDRA etc ownership cost has drastically reduced.

    3.Resale Value : My friends swift LDI which we used for 70k km and abused her in offroading (Read: Sudhagad,Torna,Rajgad and many more treks) . Still fetching him 3,75000. :) One happy customer

    Anyways Happy Motoring..Have a safe and wonderful journey with your baby. :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1