Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

पालखी सोहळा: अनुशासन आणि शिस्त

By Unknown
/ in Blog दिंडी पालखी मराठी वारी
21 comments
आजकाल आषाढी वारीनिमित्त साम मराठी वाहिनीवर रोज सायंकाळी अतिशय सुंदर कार्यक्रम प्रसारित होतोय "पाऊले चालती पंढरीची वाट". ऑफिसमधून घरी जायला कितीही उशीर झाला तरी मी हा कार्यक्रम आवर्जून पाहतोच. कितीही थकवा आला असला तरी हा कार्यक्रम पाहून सगळा दिवसभराचा शीण कुठल्या कुठे पळून जातो. आज हा कार्यक्रम पाहूनच ही पोस्ट सुचली.

काही लाख वैष्णवजन जवळपास तीनशे किलोमीटरची पायी वाटचाल करुन सावळ्या विठूमाईच्या भेटीला एका अनामिक ओढीने जातात. आणि ही संपूर्ण वाटचाल काहीही गोंधळ-गडबड न होता पार पडते. याचा अर्थ या सोहळ्याला एक नक्कीच एक अनुशासनाचे अधिष्ठान लाभले असणार. म्हणून मग अन्य काही जेष्ठ जाणकारांकडून माहिती घेतली आणि काही उपलब्ध संदर्भ वाचून ही पोस्ट माऊलीचरणी अर्पण केली.

माऊलींचा पालखी सोहळा सुरु होण्यापूर्वी माऊलींच्या पादुका जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर पंढरीला जात असत. पण काही कालांतराने तत्कालीन सोहळा कमिटीमध्ये मतभेद झाल्याने हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ साली स्वतंत्र सोहळा सुरु केला. हैबतबाबा पवार-आरफळकर हे महादजी शिंदे यांच्या सैन्यात सरदार होते. साहजिकच सैन्याची शिस्त त्यांच्या नसानसांत भिनली होती. तीच त्यांनी या पालखी सोहळ्यात उतरवली आहे. प्रथम हैबतबाबा पादुका डोईवर घेऊन प्रवास करत. पण नंतर कर्नाटकातील अंकलीचे सरदार श्रीमंत शितोळे सरकार यांनी आर्थिक मदत केली. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. आजही पालखी सोहळ्यात माऊलींचा अश्व आणि शामियाना असतो तो शितोळे सरकारांचाच असतो.

इथूनच या सोहळ्याच्या अनुशासनाला सुरुवात होते. शितोळे सरकारांचा अश्व अंकलीवरुन निघून रोज तीस किलोमीटर अशी मजल मारत आळंदीच्या वेशीवर येतो. बिडकर सरदारांच्या वाड्यात त्याचे औक्षण करुन स्वागत केले जाते. हे बिडकर सरदार शीख संप्रदायाचे आहेत. वर्दी देऊळवाड्यात गेली की संस्थानचे प्रतिनिधी निमंत्रण घेऊन शितोळे सरकारांकडे येतात आणि मग अश्व माऊलींकडे निघतो.

सोहळ्यात माऊलींच्या पुढे मानाच्या बरोबर सत्तावीस (२७) आणि मागे १५१ दिंड्या असतात (याशिवाय नोंदणी न झालेल्या साधारण साडेतीनशे). नोंदणी करण्यासाठी किमान सात वर्षे सातत्याने वारीत सहभाग असावा अशी शिस्त आहे. प्रत्येक दिंडीत एक वीणेकरी असतो. त्याच्या निर्देशनानुसारच संपूर्ण दिंडी वाटचाल करते. वीणेकर्‍याबरोबरच मागे पखवाजवादक, किमान पाच तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेली स्त्री, पाच पताकाधारी आणि पन्नास टाळकरी असतात. वीणेकर्‍याने अभंगाची ओळ म्हणून अन्या वारकर्‍यांनी त्याला कोरस द्यायाचा, असे साधारण सूत्र असते. वीणेकर्‍याने हुश्शार अशी आरोळी देताच तोंडातला घास सोडून सर्व टाळकर्‍यांसह अवघी दिंडी अभंग म्हणायला उभी राहते. आणि शेवटी त्याने एक हात वर करताच अवघा टाळ-मृदंगाचा कल्लोळ शांत होतो.

उदरभरणाची अनेक स्वयंसेवी संस्थांनी सोय केलेली असते. तरीही प्रत्येक दिंडीची स्वतःची अशी सोय असते. मुक्कामाच्या ठिकाणी आधीच पोहचून (तंबू) पाल ठोकून दिंडीतल्या वारकर्‍यांची सर्ववेळच्या भोजनाची सोय केलेली असते. जराही कसूर न करता अधिकाधिक पौष्टिक जेवण पुरवण्याचा प्रयत्न असतो. कितीही पायपीट करुन थकवा आला आणि भूक लागली तरी "बोला पुंडलिका..." चा गजर झाल्याशिवाय एकही वारकरी मुखी अन्नाचा घास घेत नाही. मुक्कामाच्या ठिकाणीदेखील पालखी तळावर प्रत्येक दिंडीची यथायोग्य सोय केलेली असते. जागा ठरवून दिलेल्या असतात. त्यामुळेच अगदी निरक्षर वारकर्‍यांनादेखील आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा शोधण्यास सायास पडत नाहीत.

संपूर्ण सोहळा एका चोपदाराच्या आदेशावर चालतो. तीने वेळा जी आरती होते त्यासाठी चोपदाराने हातातला चांदीचा चोप (दंड) उंचावून एक आरोळी ठोकली की अवघा लाखोंचा विष्णुदासांचा मेळा शांत होतो. अगदी टाचणी पडावी तरी आवाज व्हावा एवढा शांत. सामुदायिक अनुशासनाचे याहून मोठे उदाहरण या भूमंडळी दुसरे आहे काय? सर्व टाळकरी चोपदाराच्या हाताच्या इशार्‍यावर टाळ-मृदंगाचा ताल वर-खाली करत असतात. टाळ वाजवत वाजवत, माऊली माऊली उच्चारत नाद टिपेला पोहोचतो आणि आता नाद भंगणार तोच चोपदाराच्या इशार्‍यावर पुढचा ठेका धरला जातो. अगदीच काही तक्रार असेल तर वारकर्‍यांची निषेध नोंदवण्याची पद्धत किती सुंदर आणि आगळी आहे बघा. सायंकाळी समाजाआरतीच्या वेळी टाळ वाजवले जातात. पण एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर त्यांचा टाळाचा आवाज सुरुच राहतो. अहाहा... काय सुंदर निषेध. मग पालखी सोहळा मालक आरफळकर आणि अन्य मान्यवर त्यांची तक्रार ऐकून तिचे निराकरण करतात. जगात एवढा सुंदर निषेध कदाचितच कुठे होत असेल. संपूर्ण वारीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना माऊली संबोधतो. अगदी बंदोबस्ताचा पोलिस आणि सार्वजनिक आरोग्यसेवा पथकातले डॉक्टर आणि इतकेच काय आम्ही फोटोग्राफरदेखील माऊलीच.

चौघड्याचा रथ, जरीपटका निशाणाचा अश्व, मग स्वाराचा अश्व, त्यामागे माऊलींचा अश्व त्यामागे काही अंतरावर रथ आणि मानानुसार दिंड्या हा क्रम संपूर्ण वाटचालीत पालला जातो. या अनुशासनाचा परमोच्च बिंदू गाठला जातो तो रिंगण सोहळ्याच्या वेळी. संपूर्ण समुदाय गोल रिंगण करुन उभा राहतो. मधल्या रिंगणातून मध्यभागी माऊलींची पालखी ठेवून सर्व दिंड्यांचे टाळकरी आणि पताकाधारक गोलाकार पालखीला प्रदक्षिणा घालून जातात. सर्व अश्व फेरी मारतात. मग शेवटी माऊलींचा अश्व रिंगणात येतो. तो पुढे गेला त्याच्या टापाखालची माती भाळी लावण्यासाठी वारकर्‍यांची लगबग उडते. पण कुठेही गोंधळ नाही, आरडाओरडा नाही. शेवटच्या टप्प्यात विठूरायाच्या कलशदर्शनानंतर सावळ्या इठूला भेटायला धाव घेतली जाते ती देखील किती शिस्तबद्ध.

या अनुशासनामुळेच आजवर संपूर्ण वारीदरम्यान एकही दुर्घटना घडल्याचे उदाहरण ऐकिवात नाही आणि खात्री आहे की असे कधी होणारही नाही. अखिल मानवजातीसाठी हा एक शिस्तीचा सुंदर दाखला आहे. तो शब्दबद्ध करण्याचा माझा हा खुजा प्रयत्न. घ्या गोड मानून. नाही आवडला तर मीच म्हणेन "भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला... मीच खरा अपराधी"


॥ रामकृष्ण हरी ॥

Related Posts

21 comments:

  1. मनमौजी19 July 2010 at 19:58

    खुप सुंदर लिहल आहेस....मस्त..

    रामकृष्ण हरी..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. ajinkya19 July 2010 at 20:04

    sunder !!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Pritam19 July 2010 at 21:31

    अनुभव आणि इतर उपलब्ध माहिती यांचे सुंदर गुंफण घातलेला लेख आहे, पालखी बद्दल एवढी माहिती आत्तापर्यंत कुठेच वाचली नव्हती. पुढच्या वेळेस जर माझया कडे चांगला कॅमेरा असेल तर नक्कीच हा सोहळा तुझया बरोबर अनुभवेन.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Vikrant Deshmukh...19 July 2010 at 21:55

    पंकू...नेहमीप्रमाणेच सुरेख लेख रे.. आणि फोटू सुद्धा !!!
    खरे आहे. मी गेली बारा वर्षे पालखीबरोबर थोडे का होईना चालतो. मी ही शिस्त पाहिली आहे, अनुभवली आहे. सगळा भाविकांचा जथा... पोलिसांचीही गरज नाही.. ते असतात ते मध्ये घुसणार्‍या बाकीच्या नागरीकांवर नियंत्रण ठेवायला. विठुच्या भेटीला निघालेल्या या हजारो वारकर्‍यांची शिस्त खरंच वाखाणण्याजोगी आहे.
    वारीच्या या aspect वर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद !!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. भुंगा19 July 2010 at 21:57

    छान माहिती आणि वर्णन लिहिलयंस भाऊ! मला वाटलं तुला सह्याद्रि - भटकंती आणि फोटोगिरी च माहितेय.. :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. विक्रम एक शांत वादळ19 July 2010 at 22:23

    खुप सुंदर आणि माहितीपूर्ण पोस्ट
    धन्यवाद
    रामकृष्ण हरी

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Pravin Kulkarni20 July 2010 at 01:29

    पंकज... अतिश्य सुन्दर लिहिल अहे.. माहिति पोचवल्या बद्दल धन्यवाद...

    thanks to Vikrant for posting on Facebook.. :-)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Maithili20 July 2010 at 03:43

    Khoop sunder zalay lekh...Mastach...!!! :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. विशाल तेलंग्रे20 July 2010 at 22:46

    अतिशय सुंदर व मुद्देसुद, वाचायला मोहक वाटणारी आणि आतापर्यंत कुठेच न ऐकलेली वा वाचलेली भरगच्च अशी माहिती... तुझ्या मराठी/संस्कृत भाषांतील अवजड शब्दांशी तुझे खेळण्याचे असामान्य कौशल्य अन् अप्रतिम छायाचित्रांसहित ती व्यवस्थितरित्या मांडण्याची शैली प्रत्येकालाच भुरळ घालू शकेल आणि तसे झालेही असेल, याची प्रचिती प्रत्येकाला हा लेख वाचतांना आली असेलच! मीसुद्धा त्याला अपवाद नाही, कारण मी यापुर्वीही ते अनुभवलेले आहे...

    बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. सागर पुन्हा नवीन.....21 July 2010 at 22:52

    खूपच छान माहिती दिलीस रे पंकज तू.............धन्यवाद...
    असाच लिहिती रहा.......

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. fromperiphery22 July 2010 at 04:44

    अतिशय छान.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Manisha23 July 2010 at 02:46

    खूप छान लिहिलंय, आणि फोटोज पण खूप सुंदर!! खरंच दरवर्षी पालखी येते, तेंव्हा सगळं वातावरणच बदलून जातं. सगळीकडे उत्साह आणि चैतन्य! पूर्वीपासून हे अनुभवलंय, सुरुवातीला शाळेत compulsary म्हणून आणि नंतर ओढ म्हणून आतापर्यंत पालखीला गेलेय. पण अनेक गोष्टीआज लेख वाचताना माहित झाल्या. भटकंती शिवाय हा तुमचा वेगळा लेख मनापासून आवडला.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. GanesH23 July 2010 at 06:04

    Pankaj
    Khoop chan ahe post...
    vri baddal eavadhi chan mahiti dilya baddal dhanyawad

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. Ruhi23 July 2010 at 10:52

    सुंदर लिखाण!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. hemantdabholkar23 July 2010 at 11:19

    khup chhan mahiti

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. Vaibhav25 July 2010 at 11:29

    Pankaj nehmipramane atisundar...yandacha palkhi sohala mastach jhala..next time nightout pan try kara

    ReplyDelete
    Replies
      Reply
  17. Umesh26 July 2010 at 00:57

    Nice post waterfallkar :) very informative.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  18. रोहन चौधरी ...29 July 2010 at 18:36

    माहितीपूर्ण पोस्टसाठी धन्यवाद पंकज...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  19. Anonymous14 October 2010 at 05:06

    Mauli!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  20. Anonymous3 December 2010 at 01:33

    Ek number!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  21. Shirish2 July 2015 at 07:35

    Tirth Vithal..shetra Vithal.. Mauli Mauli

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1