Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

मृगगड प्रदक्षिणा आणि शिवलिंग (मोराडीचा सुळका) दर्शन

By Unknown
/ in Trek मृगगड मोराडी
16 comments
पाऊस उंबरठ्यावर आलाय. थोडेफार शिंपण झालेही आहे. मातीचा वास घुमला, विजा कडाडल्या आणि आता दोनचार दिवस त्याने विश्रांती घेणे पसंत केलंय. साहजिकच "Hi"च्या नंतर "वीकेंडला काय" असा यमक जुळवून प्रश्न म्हणजे आजकाल चॅटची सुरुवात असते. सीझन हाय बाबा, चुकवायचे काम न्हाई. कांचन ऊर्फ बारीक [आम्ही दोघं पण एकमेकांना बारीकच म्हणतो :-)] हिला पण आजकाल पावसाळी ट्रेकचे वेध (की वेड?) लागले होते. किती दिवस पोरगी डोकं खात होती, ओय बारक्या, ट्रेकला कधी जाणार? मला घेऊन चल." सौरभबरोबर ट्रेक करुन पण बरेच दिवस झाले होते. जवळपास दीड वर्षं. म्हणून मग वरीलप्रमाणे चॅटची सुरुवात करुन भटकंतीतले अतिरथी श्रीकांत ऊर्फ शिक्रांत (वीकेंडला घरात राहिला तर फाऊल) consult केले. साहेबांनी मृगगड असे नाव घेतले. ओके. गुगल, माहिती आणि गाडी फायनल असे चक्र फिरले आणि शनिवार पहाट कन्फर्म.

सकाळी सकाळी म्हणजे भल्या पहाटे साडेचारला बारकीला फोन करुन उठवली आणि पाच वाजता तिला उचलून सौरभकडे टच. साहेबांच्या घराची दरवेळी नवेन शोधकहाणी असते. लोकमान्यनगरातल्या सगळ्या बिल्डिंग्ज सारख्याच. दरवेळी मी नवीनच बिल्डिंगसमोर उभा राहतो आणि फोन लावतो. या वेळी पण तेच झाले. पण साहेब उचलायलाच तयार नाहीत. आयला, झोपला की काय अजून? पण चौथ्या-पाचव्या प्रयत्नात उचलला. तर तो दुसर्‍याच (म्हणजे माझ्यासाठी दुसरी, त्याच्यासाठी तीच) इमारतीसमोर उभा, गाडी काढून वाट पाहत होता. गाडीत बसलो आणि औंधमधून शिक्रांतला उचलण्याआधी चहा मारला. तिथून जुन्या पुणे-मुंबई हायवेने बुंगाट. मारुती-८०० असूनही सौरभ ऐंशी-नव्वदने बुंगवत होता. पावसाने आज दडीच मारली होती. कामशेतनंतर पलीकडच्या इंद्रायणी खोर्‍यात गेलो की नेहमीच हवा एकदम पालटते. बाईकवर जाताना आजवर नेहमीच कामशेतची खिंड ते मळवली या पट्ट्यात रेकॉर्डब्रेक पावसाने आम्हांला झोडपून काढले आहे. पण आज तेही नव्हते. चकचकीत ऊन आणि डावीकडे उन्हात चमकणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी. त्यामागे दिसणारा तुंगचा सुळका. पावसामुळे धरणीची कूस उजवली होती. तिच्या अंगाखांद्यावरचे धबधबे पान्हवले होते तरी अजून धारावले नव्हते. वासरू पिताना जसे एक ढुशी देते तशी आकाशातून वरुणाच्या एका जोरदार ढुशीची गरज होती. त्यानंतर दुधाळत्या प्रपातांची नक्षीदार वेलबुट्टी कातळकड्यांवर उमटणार होती.

लोणावळ्याला पावणेसात वाजता पोचलो. नेहमीचा ब्रेकफास्ट पॉइंट म्हणजे मनशक्ती केंद्र, लोणावळा. पण एवढ्या अघोरी वेळेला कसले ते उघडलेले? मग आपल्या रामकृष्ण'मध्ये उडुपी नाश्ता झाला. पोटोबा शांत झाले, कडक फिल्टर कॉफीचा वरुन तडका दिला आणि पुढे निघालो. खंडाळ्याच्या पुढे असलेल्या नागमोडी वळणांवर नेहमी असणारे धुके दिसत नव्हते. पाऊस नसल्याची जाणीव अधिकच तीव्र झाली. पायलट सौरभने विचारले, राजमाची पॉइंटला थांबायचे आहे का? नाही म्हणालो, नेहमीच काय थांबायचे? पण जशी दरी समोर दिसली आणि खाली दरीत उतरलेले ढग दिसले तसे थांबावेच लागले. टुणकन उडी मारुन काही फोटो काढले. दरीत दाटलेले कुंद ढग आणि दूरवर श्रीवर्धन आणि मनरंजन हे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले.

अनेक ट्रेकर्सचा पहिला ट्रेक असलेल्या राजमाचीने मला नेहमीच हुलकावणी दिली आहे. आजवर पंच्चावन्न किल्ले होऊनही मी अद्याप राजमाचीला गेलो नाही हे वाचून समस्त ट्रेकर्स मंडळी माझा त्रिवार निषेध नोंदवणार यात शंकाच नाही. पण काय करु? आजवर तीन वेळा गेलो राजमाचीसाठी आणि दर वेळी असा काही तुफान पाऊस व्हायचा की हितचिंतक मंडळी सांगायची जाऊ नका, ओढ्याच्या पलीकडे अडकून पडाल. असो, राजमाची अजून राहिल्याची बोच आहेच, तो मला बोलावतो आहे आणि मी नक्कीच जाणारही आहे. तिथून पुढे निघालो आणि घाटतली नागमोडी वळणे घेत एक्स्प्रेस वेच्या पॅचवर आलो. खाली उतरताना सुरळीत वाहतूक चालू होती, पण वर चढत असलेल्या बाजूला वाहनांच्या दोन तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आतमध्ये बसलेल्या लोकांचे फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होते.

घाट उतरुन खोपोलीवरुन पालीच्या रस्त्याला लागलो. उंबरखिंडीकडे जाणार्‍या फाट्याला मागे टाकून, नागफणीचे रुप डोळ्यांत साठवत आणि जांभूळपाड्याच्या कमानीतून आत वळालो. रस्ता विचारत विचारत एका पुलावर आलो. खालून वाहणारी बहुतेक आंबा नदी असावी. पूल ओलांडून भेलिव नावाच्या गावात आलो. गावाच्या अलीकडेच एक अरुंद पूल आहे. त्यामुळे चारचाकी अलीकडेच लावून जावे लागते. तिथे गाडी लावली आणि समोरच्या डोंगररांगेचा आढावा घेतला. समोर कमी उंचीचा कातळकडा म्हणजे मृगगड ऊर्फ भेलिवचा किल्ला. आणि त्यामागे मोराडीचा सुळका म्हणजे लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरुन दिसणारा शिवलिंगासारखा एक विराट सुळका. निसर्गाची ही किमया मानवाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करुन देणारी. आजवर एकही मानव कदाचित तिथे पोचला नसेल.


उंची तशी बेताचीच. आधी वाचले होते की दगडात खोदलेल्या पायर्‍या आहेत, त्यामुळे म्हटले लवकर होईल आणि वाटाड्याची गरज नाही. गावात आलो. शाळेसमोरुन जाताना दोन गुरुजी व्हरांड्यात काही तरी चर्चा करत होते, पोरं एकासुरात म्हणत होती क.. का... कि.. की... कु.. कू.. आणि आम्हांला समोरुन जाताना पाहून पुढचे विसरुनच गेली. आवाजच विस्कळीत झाला. आम्ही गालातच हसत एका मावशींना रस्ता विचारुन पुढे झालो. पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी भाताच्या रोपांसाठी पाभर धरली होती. किणकिणत्या घंटा गळ्यात बांधलेल्या बैलांना दिलेले हाकारे घुमत होते. वाटेवर करवंदाची जाळी दिसली आणि आम्ही आमचे वय विसरुन उड्या मारुन मारुन करवंदं खायला सुरुवात केली. भानावर आलो तसा एका काकांना रस्ता विचारला आणि त्यांनी सांगितल्या वाटेवर पुढे झालो. तरीही स्पष्ट वाट दिसेना. म्हणून आता आपणच शोधावी या उद्देशाने निघालो.

अतिशय उष्ण आणि दमट हवा, ऊन यामुळे असह्य उकाडा होता. आणि समोरच दिसणारी एक चढण पार करुन एका खिंडीत पोचलो. पण समोर कुठेच पायर्‍यांचा मागमूस नव्हता. सौरभ तर शंका घ्यायला लागला की हा मृगगड नाहीच. अशातच शिक्रांत माहितीचे कात्रण गाडीतच ठेवून आला होता. त्याच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले आणि इतरांना म्हणालो जरा इथेच थांबा मी डाव्या हाताने कड्याच्या मागे जाऊन रस्ता आहे का पाहून येतो. एके ठिकाणी एक रॉक पॅच दिसला, वाटले कदाचित वरती पायर्‍या सुरु होतील, म्हणून दोन झाडांच्या आधाराने तो थोड्याफार कष्टाने चढून गेलो. पण वर परिस्थिती अधिकच बिकट होती. पाय ठेवायला जागा नाही, हातात फक्त बोटभर जाडीचे झाडाचे मूळ. परत उतरण्याशिवाय मार्गच नव्हता. तिथून उतरुन पुढे व्हायच्या आधी श्रीकांतला सोबतीला बोलावून घेतले. सौरभला आणि कांचनला आवाज देऊन तिथेच बसा रस्ता शोधून येतो असे सांगून आम्ही दोघे पुढे निघालो. एका निसरड्या वाटेवरुन खाली उतरुन पुढे जंगल तुडवत निघालो. अतिशय दाट जंगल, ऊन शिरायला जागा नाही. त्यात पाऊस पडून गेल्याने खाली चिखल आणि पालापाचोळ्याचा खच. मच्छरांसाठी एकदम आयडियल सिच्युएशन. ते पण नेहमीचे मच्छर नाहीत तर झेब्रा कलरचे काळे-पांढरे. किती वेळ चालत होतो काय माहीत, पण एक तास तर सहजच झाला असेल. कितीही थकलो तरी दम टाकायला खाली बसायची सोय नाही. चिखल, पालापाचोळा आणि जरा शांत बसले की मच्छरांचा त्रास.

परत जाण्यात आता अर्थ नव्हता. कारण असे वाटले की आता गडाला प्रदक्षिणा पूर्णच होणार आहे तर दुसर्‍या बाजूने रस्ता असेल तो पाहू. पण चालत चालत मोराडीच्या सुळक्याच्या पायथ्याला आलो. तिथे जरा झाडांच्या दाटीतून उघड्यावर आलो तर डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मृगगड हा सह्याद्रीच्या रांगेपासून वेगळा झालाच नव्हता. तो थेट लोणावळ्याच्या मागल्या लायन्स पॉइंटला जोडला गेला होता. आता इकडे आड आणि तिकड विहीर. जरा दम टाकायला बसलो. त्राण संपले होते. नशीबाने पाणी बरोबर होते. डोळ्यांवर अंधारी आली. शिक्रांतकडे इलेक्ट्राल होते. ते प्यायल्यावर जरा बरे वाटले. आता आलो तेवढे अंतर एकतर परत जाणे, किंवा समोरच्या धारेवर चढून मोराडीच्या सुळक्याच्या म्हणजे शिवलिंगाच्या पायाला स्पर्श करुन पलीकडे उतरणे. असेही सौरभ आणि कांचन गाडीकडे परत गेले असणार. मग दुसरा पर्याय निवडला. अतिशय दमछाक करत करत वर चढलो. एकदोन गरुड जवळच्याच झाडावरुन झपकन उडाले तसे मी दचकलो. आकाशात घिरट्या घालू लागले. कदाचित जवळच कुठतरी घरटे असावे. धारेवर चढून पलीकडे अंदाज घेतला. तर फक्त एके ठिकाणी मानवी पाऊलखुणा म्हणजे वाट दिसत होती, अवघड पांदीतून जाणारी. दुसरा मार्गही नव्हता. क्षणभर विश्रांती घेतली. आता डोंगरधारेच्या दोन्हीबाजूंनी वारा शीळ घालत होता.

आयएनएस शिवाजीचा तलाव भरुन वाहू लागला की इकडे सुंदर धबधबा या दरीत उतरतो. आताही तो नुकताच आपले अस्तित्त्व दाखवून द्यायला लागला होता. काळ्या आईची लेकेरं भाताची पेरणी करीत लाडक्या जिवाशिवाच्या बैलजोडीला हाळी देत होते. त्यांच्या गळ्यातल्या घंटेचाही आवाज स्पष्ट येत होता. आकाशातून गरुडाची साद दरीत घुमत होती. हे संगीतच सगळ्या नवनिर्मितीची प्रेरणा असेल असे क्षणभर वाटून गेले. मग तीच वाट घेऊन सावरत खाली उतरलो. पुन्हा गच्च झाडी आणि करवंदाच्या जाळ्या. दिसले करवंदाचे झाड की टाक दोनचार तोंडात, असे करत करत वाटचाल सुरु केली. लवकरच पुन्हा मृगगडाच्या समोर येऊन ठाकलो. आता ती सुप्रसिद्ध गुहा दिसायला लागली, पण पायर्‍या नाही. पण त्या आसपासच असणार याची खात्री होती. पण आता अंगात त्राणच उरले नव्हते. म्हणून मृगगड प्रदक्षिणा आणि मोराडीच्या सुळक्याला स्पर्श करुनच परत फिरायचे असा निर्णय घेतला आणि खालच्या जंगलातून पाचोळा तुडवत आणि करवंदं रिचवत पुन्हा भेलिव गावात उतरलो. येताना एका आजोबांना रस्ता विचारुन खात्री करुन घेतली, पुन्हा येण्यासाठी.

गावातून पुलावर आलो आणि सौरभ आणि कांचन त्या दमट उष्ण हवेत उन्हात गाडीच्या भट्टीत बसले होते, सगळे दरवाजे, अगदी मागचा आणि बॉनेटसह उघडे ठेवून. आल्या आल्या बॅग फेकली आणि पुलाखाली ओढ्यात बसकण मारली. थंद पाण्याने सगळा थकवा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यासारखे वाटले आणि पुन्हा मन उल्हसित झाले... एक नविन ट्रेक करण्यासाठी. बोला येताय?


उपयुक्त माहिती:

किल्याचे नाव: मृगगड (भेलिवचा किल्ला)
जाण्याचा रस्ता: खोपोली-पाली रस्ता-जांबूळपाडा-वासुंडे-भेलिव.
पाहण्यासारखे: कातळात खोदलेल्या पायर्‍या, गुहा, पाण्याचे टाके.
श्रेणी: सोपी ते मध्यम.
पुरातन उपयोग: घाटवाटांवर लक्ष ठेवणे.

Fact Files:
Fort Name: Mrug Gad aka Fort of Bheliv.
Route: Khopoli-Pali Road-Jambhulpada-Vasunde-Bheliv.
What to see: Rock cut steps, cave, water cisterns.
Grade: Simple to Medium difficult.
Historic significance: Watchguard to ghat routes.

Related Posts

16 comments:

  1. रोहन चौधरी ...21 June 2010 at 16:29

    "पावसामुळे धरणीची कूस उजवली होती. तिच्या अंगाखांद्यावरचे धबधबे पान्हवले होते तरी अजून धारावले नव्हते. वासरू पिताना जसे एक ढुशी देते तशी आकाशातून वरुणाच्या एका जोरदार ढुशीची गरज होती. त्यानंतर दुधाळत्या प्रपातांची नक्षीदार वेलबुट्टी कातळकड्यांवर उमटणार होती."
    .....वा.. राव.. काय लिहिलाय!!! पुन्हा एकदा उसाटून आलास ना... :) सही... काय म्हणतोय सह्याद्री... अजून रौद्रप्रतापी आहे की शांत-शितल झालाय??? कधी एकदा भेटतोय असे झाले बघ... :)

    आता आपला विसपुरनंतरचा ट्रेक ठरला... राजमाची विथ टायगर व्ह्याली... :) आणि ते झेब्रा कलरचे काळे-पांढरे मच्छर.. त्यांना मी 'चंदेरी मच्छर' म्हणतो... भारीच त्रास देतात ते.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. ध्रुव21 June 2010 at 20:57

    भारी लिहीले आहेस. तुमचा ट्रेक नक्की झाला, पण गड सर झाला का? की फक्त पायथा शिवलात?
    मी येतोच आहे रे पुढच्या आठवड्यात मग जाऊ द्या जोरात ;)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. दीपक परुळेकर21 June 2010 at 21:52

    छान वर्णन! एकदम भारी, नेक्स्ट टाईम जाताना मला सांग रे !मी कालच्या रविवारी राजमाची करुन आलो. पावूस नसल्याने फारच निराशा झाली आणि तुंगार्ली धरणापासुन चालुन आणि परत येईपर्यंत पाय गळ्यात आले. पण ट्रेक छान झाला...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Vikrant Deshmukh...21 June 2010 at 22:13

    पंकू, रंपाट रे एकदम !!!! असे लिखाण वाचून माझ्यासारख्या ’पर्वती’ही न चढलेल्या माणसालाही उत्साह येतो बघ.
    सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍या हेच तुझं खाद्य. आता ते सगळे फोटु टाक की जरा. आम्हालाही मग ’दूरदर्शन’ होईल.
    एखादा छोटा, सोपा ट्रेक करत नाही का रे तुम्ही? जवळचा?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. भुंगा21 June 2010 at 22:26

    तु काहीही म्हण.. च्यायला.... तु आयटी वाला नाहीच.... तु लेखक'च' आहेस. ही भाषा... वर्णन... शब्दरचना - सारं कसं भारावुन टाकणारं! दोस्त, 'तुझा मित्र' म्हणवुन घेण्यात, मला स्वतःचा फार अभिमान वाटतो!

    >> लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरुन दिसणारा शिवलिंगासारखा एक विराट सुळका. निसर्गाची ही किमया मानवाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करुन देणारी. आजवर एकही मानव कदाचित तिथे पोचला नसेल.
    ->नक्की हाच म्हणुन सांगता येणार नाही, मात्र लोणावळ्याचे दिपक पिसे, विशाल पिसे, संदिप पिसे यांनी शिवलिंगावर झेंडा लावला होता. मरणाच्या दारातुन ते परत आले होते. त्या नंतर आय.एन.एस. शिवाजीच्या काही छात्रांनी प्रयत्न केला होता. वरती पोहचले मात्र उतरण्यासाठी म्हण हेलिकॉप्टर मागवावे लागले होते.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Pankaj - भटकंती Unlimited21 June 2010 at 22:50

    रोहन, अरे सह्याद्री त्याच्यासमोर आपली मर्यादा ओळखलेल्या भटक्यांसाठी नेहमीच शांत-शीतल राहिलाय आणि राहणार आहे. आणि मर्यादा ओलांडलेल्या बेलगामांसाठी तितकाच रौद्रभीषण.

    ध्रुव, अरे लवकर ये की. वाटच पाहतोय.

    दीपक, ब्लॉग/फोटो दाखव.

    विक्रू, सोपा ट्रेक आहे ना, जुलैमध्ये विसापूरला.

    भुंगा, अरे आहे तुझ्यासारखाच आयटीवालाच आहे. मलाही 'भुंगा' माझा मित्र आहे हे सांगण्यास फार अभिमान वाटतो. शिवलिंग चढाईच्या माहितीबद्दल आभार. रियल डेअरडेव्हिल्स!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. अनाकलनीय21 June 2010 at 23:25

    अप्रतिम लेख आहे. शब्दांना लेखणीत आणि फोटोना चौकटीत बंदिस्त कसे करावे हे तुज्याक्डून शिकावे. दोन दिवसापूर्वीच ला खंडाला ला हा फोटो पाहून 'नतमस्तक' झ्हालो मी ! अवर्णनीय !
    शब्दच संपले माझे !
    दीर्घआयुष्य
    लाभो !!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Manisha22 June 2010 at 03:59

    राजमाचीचा फोटो खूप आवडला!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Vrinda22 June 2010 at 07:23

    Mastacha.. ho mi yenar.. :))

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. सिद्धार्थ22 June 2010 at 08:50

    कसलं सही लिहितोस रे. तुझे फोटोच विलक्षण बोलके असतात आणि वर्णन तर लय भारी. मस्तच.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Ruhi22 June 2010 at 09:33

    लई भारी!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. ------Vishal------22 June 2010 at 10:43

    HI PANKAJ,

    MI VISHAL (DIPAK SHINDE YANCHA MITRA), LONAVLA

    MI AANI MAZE MAZE MITRA MORADICHYA SULKYAVAR AATA PARYANT 5 VELA JAUN AALO AAHE, AANI ATISHAY KHADTAR CHADHAN AAHE, AANI JI KHALI HOTI TI AMBA NADI, ITHECH SHIVAJI RAJAANCHI LADHAI ZALI HOTI (AMBA NADICHA GHAT)

    TUZE LIKHAN FAR CHANGALE AAHE

    PARAT KADHI TREAK KARNAR ASSHIL TAR NAKKI SANG

    MI YEIL

    EK NISARG PREMI
    VISHAL

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. Maithili22 June 2010 at 23:52

    Photos aani Varnan sagalech bhariii....!!! :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. BinaryBandya™24 June 2010 at 02:52

    match ....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. linuxworld25 June 2010 at 04:18

    जबरदस्त....मी गेले ३ तास तुमचा blog office मध्ये बसून सलग वाचतोय...आणि खरोखर नेट विश्वात पहिल्यांदाच कुठल्या वेब साईटवर मी एवढा वेळ थांबलो असेल...
    Hats off to you.....great.....जर शक्य असत तर आख्खी वेबसाईटच घरी जाऊन रात्रभर वाचली असती पण ते शक्य नाहीये कारण घरी माझ्या नेट नाहीये पण आता नेट घ्यालच हव असं स्पष्ट मत बनू लागलंय..

    पुष्पराज

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. fromperiphery3 July 2010 at 20:04

    अप्रतिम वर्णन, जे तुझ्या फोटोनाही खुजे करते.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1