उद्धव ठाकरेंचे "महाराष्ट्र देशा"
"महाराष्ट्र देशा" बरेच दिवस झाले पुस्तक वाचून आणि पाहून. पहिल्याच दृष्टिक्षेपात आवडले पुस्तक. एक रिव्ह्यू लिहावा असे वाटून गेले. पण एखादा प्रकाशक रिव्ह्यूसाठी भेट म्हणून पाठवत नाही किंवा जोपर्यंत स्वत:ची प्रत विकत घेत नाही तोवर लिहायचा हक्क प्राप्त होत नाही. पहिला पर्याय पूर्ण होण्याच्या लायकीचे आपण नाही हे आधीच ताडून गेल्या आठवड्यात शिवराज्याभिषेकदिनी केलेल्या सातव्या रायगड वारीच्या वेळी रायगडावर पुस्तक विकत घेतले (एवढा उशीर झाला कारण पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकातल्या सगळ्या दुकानांमध्ये ते "आऊट ऑफ स्टॉक" होते).
पाहिल्याक्षणी प्रेमात पडावे हातात घेऊन सगळे पहावे असे बाह्यरुप आहे. आणि हातात घेतल्यावर अजिबात निराशा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलीये. मुखपृष्ठाची सजावट अतिशय उच्च प्रतीची आणि त्याला उत्तम दर्जेदार पुस्तकबांधणीची जोड लाभली आहे. "महाराष्ट्र देशा" सुंदर सोनेरी फाँटमध्ये एम्बॉस केलंय. मुखपृष्ठावरचा लोणार सरोवराचा फोटो तांत्रिकदृष्ट्या एकदम अजोड... पण एकवेळ असे वाटून गेले की (कदाचित माझ्या किल्ल्यांच्या प्रेमामुळे असेल) एखाद्या किल्ल्याचा (रायगड?) किंवा अतिप्रसिद्ध वास्तूचा फोटो अधिक उचित झाला असता का?
पुस्तक पहिल्या पानापासून भावते याचे आद्य कारण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रस्तावनेआधी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे केलेले स्मरण. पुढील पानांवर बाळासाहेब ठाकरेंचे आभार आणि पुढे उद्धवजींची स्वतःची या पुस्तकामागची प्रस्तावनावजा भूमिका. पहिल्याच वाक्याला माझा मराठी सलाम. "इतर प्रांतांना भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे"... वाह!! क्या बात है!!! उद्धव ठाकरेंचा फोटोही एकदम किलर पोजमध्ये. दोन्ही हातात दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचे फुल फ्रेम कॅमेरे आणि एकदम महागड्या लेन्सेस (कॅननची लेन्स बहुतेक EF 24-105 f/4 L IS आहे). माझ्या सारख्याचा जळफळाट होणारच. पुढे पुस्तक पाच-सहा भागांमध्ये विभागले आहे.
कणखर देशा: सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची आभूषणे, दुर्गरत्नांचे फोटो. या पुस्तकातला सर्वांत विस्तृत विभाग असला तरी कधी संपतो तेच कळत नाही. समर्पक संदर्भ वर्णन आणि सुंदर फोटो असे वाटते हा विभाग संपूच नये (पुन्हा कदाचित याला कारण माझी किल्ल्यांची आवड असू शकते). प्रत्येक किल्ल्याची भव्यता (Grandeur) अतिशय योग्य फ्रेम कंपोझिशन्समधून जाणवते. मला विशेष आवडलेले फोटो म्हणजे धोडप आणि साल्हेर. बहुतेक योग्य ऋतूमध्ये घेतल्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक दुणावतले आहे. आणि न आवडलेला फोटो म्हणजे अजिंक्यतार्याचा. काहीतरी पंच मिसिंग असल्यासारखा वाटला. पट्टा, सज्जनगड, रोहिडा, विशाळगड, लिंगाणा, नळदुर्ग या किल्ल्यांच्या फोटोमध्ये असलेल्या डेप्थमुळे सुंदर त्रिमिती चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. हवाई छायाचित्रणाचा फायदा स्पष्टपणे दिसून येतो. पण हवाई दृश्याचीच बाब काही फोटोंमध्ये त्रिमिती घालवते आहे की काय असे वाटते. उदाहरणादाखल हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा आणि शिवनेरीचा पूर्ण पानभर असलेला फोटो. ज्यांनी कोकणकडा त्याच्या कडेवर पालथा झोपून खाली डोकावून पोटात खड्डा पडेपर्यंत पाहिलाय (किंवा शिवनेरी मागच्या बाजूने, चावंड-नाणेघाटाकडे रस्ता जातो त्या बाजूने पाहिलाय) त्यांना नक्कीच हा फोटो काही तरी मिसिंग असल्याची जाणीव करुन देतो. ठराविक फोटो एक्स्ट्रा शार्पनिंग आणि सॅच्युरेट केल्यासारखे वाटले (हा पर्सनल चॉईस असू शकतो). उदा. मुरुड-जंजिर्याचा डाव्या पानावरचा खालचा फोटो, रत्नागिरीच्या भगवती किल्ल्याचा फोटो. पण एकंदर हा विभाग सुंदर आणि माझा आवडता.
पवित्र देशा: महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांची घेतलेली हवाई दृश्ये. आजूबाजूच्या वस्ती आणि गर्दीमुळे फोटोग्राफर म्हणून अधिक काही करायला वाव होता असे मला वाटत नाही. त्यातल्या त्यात जेजुरी, आळंदी, ब्रह्मगिरी, गणपतीपुळे, टिटवाळा, सिद्धिविनायक, पॅगोडा, मुंबईचे गणपती विसर्जन ही छायाचित्रे आकर्षक आहेत.
दगडांच्या देशा: पाषाणपुष्प तयार करणार्या शिल्पकलेचं दर्शन. अजंठा-वेरुळ या महाराष्ट्राच्या पर्यटन मानबिंदूंचे विहंगम दर्शन घडवले आहे. नाणेघाटाच्या फोटोमध्ये सर्वात मोठ्या मुख्य गुहेचा फोटो नाही. उपगुहांचे आहेत. कदाचित हेलिकॉप्टर नेण्याची अडचण असावी. पण समोरच्या दरीतून फोटो घेता आला असता बहुधा. वासोट्याच्या नागेश्वर गुहेचे कंपोझिशन अफलातून.
जीवन रेषा: जीवनाला जोडणार्या नद्या आणि रस्ते. हा विभाग कसलेल्या फोटोग्राफरने काढलेला फोटोंचा आहे. अतिशय विचारपूर्वक बंदिस्त केलेल्या फ्रेम्स फोटोग्राफीच्या लीडिंग लाईन्सच्या आणि कंपोझिशन्सच्या नियमाची सुंदर उदाहरणे आहेत. इंद्रायणी, मुठा-पुणे, वैतरणा, एक्सप्रेस-वे, "वाट नागमोडी", जेजे फ्लायओव्हर आपापली बलस्थाने अचूक दर्शवतात. जेजे फ्लायओव्हरचे काम गर्दीतून वाहतुकीसाठी सुरळीत वाट काढणे हे आहे, आणि ते फोटोमधून अचूक दिसून येते. एक्स्प्रेस-वे पाहताना नजरही त्याच वेगाने फिरते.
मुंबा आईच्या देशा: खास मुंबईचे फोटो. पहिलाच फोटो कुलाब्याच्या दांडीचा. छायाप्रकाशाचा अचूक खेळ कॅमेरात बंदिस्त केलाय. भाऊचा धक्का आणि झोपडवस्तीचा फोटोचा दर्जाही अतिशय उत्तम.
अदभुत देशा: खरंच अद्भुत असे काही फोटो. दर्याकिनारी विसावणार्या होड्यांचे फोटो अतिशय सुरेख आहेत. तिन्ही फोटो Abstract या प्रकारात गणले जाऊ शकतात. चंद्रभागेच्या पात्रातले तबक लक्षवेधी आहे. एकंदर या विभागात सर्वच फोटो उच्च्प्रतीचे आहेत. उंचावरील कॅमेरा अँगलमुळे शेते, मिठागरे, खाचरं, लाटा यांचे सुंदर असे पॅटर्न्स फ्रेममध्ये बंदिस्त करता आले आहेत. सर्व वैभव दाखवूनही महाराष्ट्राच्या मातीशी एकरुप झालेले शेतकरी, लमाणतांडा, काही फोटोमध्ये दिसणारे लोकजीवन यांचे दर्शनही नजरेला सुखावते.
आणखी काय हवे?
’अद्भुत देशा’ या विभागात अधिक छायाचित्रे हवीत. विशेषतः महाराष्ट्राचे लोकजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी. ’प्रगतीच्या देशा’ असा एखादा विभाग हवा असे बरेचदा वाटून गेले. त्यात आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, जल आणि विद्युतप्रकल्प, रेल्वे प्रकल्प, शेअर बाजार (’मुंबा आईच्या देशा’ या विभागातही शेअर बाजाराचा फोटो नाही) असे काहीसे अंतर्भूत करता आले असते. कारण महाराष्ट्राला भूगोल, इतिहास यांबरोबरच स्वतःचे असे प्रगल्भ अर्थकारणही आहे.
काय खटकले?
वर लिहिल्याप्रमाणे काही (पण अगदी मोजक्याच) फोटोंची ट्रीटेमेंट.
चुकून उद्धव ठाकरेंनी वाचले तर पुढच्या आवृतीच्या वेळी या सूचनांचा विचार जरुर होईल आणि पुस्तक अधिकाधिक सुंदर होईल अशी भाबडी आशा आहे :-) पण माझे तर ठरले, इथून पुढे कुणालाही भेट म्हणून हेच पुस्तक द्यायचे.

विशेष सूचना: हे अवलोकन फक्त एक भटकंती आणि दुर्गप्रेमी म्हणून लिहिले आहे. त्यात माझ्या मर्यादित फोटोग्राफीच्या ज्ञानाची मदत झाली. सर्व राजकीय विचार आणि वैयक्तिक निष्ठा बाजूला ठेवूनच हे वाचावे ही माफक अपेक्षा.
प्रामाणिक "रिव्ह्यु" म्हणता येईल असं लिहिलंयस.
ReplyDeleteउद्धव साहेब वाचतीलच तोपर्यंत पुढच्या "महाराष्ट्र देशा - २" मध्ये मुखपॄष्ठावर "राजांच्या गडाचा" फोटो असेल असं गृहीत धरुन चालु!
uddhav Thakarenparyant phochavayachi vyavastha karu ka?
ReplyDeleteभुंगा,आपले आधीच ठरले होते रिव्ह्यू लिहायचे. शिवाय तुझी पोस्ट आली, मग काय काढला लिहून.
ReplyDeleteविनायक, करु का काय विचारतोस? अरे माझे भाग्य असेल. लव्कर कर.
Lavkarat lavkar prayatn karato
ReplyDeleteBhari ahe he pustak .. Majhyakade pun aahe ..
ReplyDeleteUdhhav is a great photographer !
~Prashant
Hi Pankaj
ReplyDeleteI am awaiting the GIFT from you...
Luv
Abhay
पुस्तक झक्कासच आहे! वादच नाहिये! मला सुद्धा अथक परिश्रमानं मिळालं हे! १०० रुपये किम्मत ठेवून खुप खुप मोठं काम झालयं. यामुळे अख्खा महाराष्ट्र घराघरात गेल्या वाचून रहाणार नाही! पुस्तकातले फोटो, ले-आऊट, मांडणी, फॉण्ट्स, सुले़खन (कृष्ण्कांत ठाकूर) सगळंच मस्स्त आहे!
ReplyDeleteमला खटकलेली फक्त एकच गोष्ट... मुखपृष्ठावर केलेलं फोटोशॉप मधलं एडिटींग.. बघता क्षणीच खूप वाईट वाटलं... लोणार सरोवरात ढग अक्षरश: चिकटवले आहेत. मुखपृष्ठावरून वाटलं की आत पण असंच काहीतरी विचित्र बघायला मिळेल की काय! पण नाही.. तस्सं नाय झालं. आणि मजा आली.
पण मुखपृष्ठावर रायगड असावा असं उगाच वाटलं. पण रायगडाचा तसा मुखपृष्ठावर येईल असा फोटो आत नाहीये. त्यामुळे मला विचारशील तर मी सांगेन, तोरणा चा फोटो टाका.. तो मुखपृष्ठासाठी साजेसा आहे! एक्दम भारदस्त वाटतोय तो!
attach ABC madhun pustak ghevun alo....sagali kade shodhun zalyavar paus hota mhanun eka chotya dukanat thambalyanantar tithech milale...:)....khupach mast photo ahet....to shetkaryacha photo tar gr8ch...pratekakade aava asa theva
ReplyDeleteघेतोय आज विकत . पाठवलंय प्युनला आणायला. :)
ReplyDeleteमि वेबसाइट वर हे फोटोस पहिलेयत. तू लिहिल्याप्रमाणे काही ठिकाणी sharpness आणि saturation खटकत. पण एकुणच compositions सुन्दर आहेत... तुझी समीक्षा ही मुद्देसुद आहे
ReplyDeleteकुठे मिळेल हे पुस्तक? मला पण हवंय...
ReplyDeleteपण मित्रा पंकज, तू जे काही लिहीतोस ना तेच इतकं सुंदर असतं की मूळ विषय तर नंतर बघू, आत्ता पंकजच्या लेखनाचा आस्वाद घेऊ असं होतं.. आयला मला एक गोष्ट कळत नाही.. पण तू आमच्यासारखा इंजिनीयर, त्यात पुण्याच्या उपनगरात राहणारा.. मग तुझं मराठी इतकं चांगल कसं काय रे??
पंकज, तू एका महान छायाचित्रकाराबरोबरच एक अतिशय सिद्धहस्त लेखक आहेस. तुझ्या लिखाणाला तोड नाही रे मित्रा !!!!!!!!!
ReplyDeleteमी स्वतःला फार भाग्यवान समजतो की असे प्रतिभावान मान्यवर आम्हाला ’मित्र’ म्हणतात.
भाऊ रायगडी गेला होता त्यावेळी तो हे पुस्तक घेऊन आला
ReplyDeleteया पुस्तकालाबद्दल ऐकून होतो पाहण्याचा योग त्या दिवशी आहे
सर्व फोटो अप्रतिम आहेत त्यातही मुखपृष्ठ मस्तच
धन्यवाद विनायक, प्रशांत.
ReplyDeleteअभय, अरे, गिफ्ट तू द्यायला पाहिजे भाच्याला.
मंगू, सुलेखन खरंच सुंदर आहे. आणि मुखपृष्ठाबद्दलची टिपण्णी पटली.
अमोल, महेंद्रजी, योगेश, धन्यवाद.
विक्रांत, काहीतरीच काय? इंजिनियर असण्याचा, उपनगराचा आणि यथातथा मराठीचा काय संबंध?
विक्रम, सर्व फोटो अप्रतिम आहेत, काही अपवाद वगळले तर. आणि मुखपृष्ठाच्या फोटोचा दर्जा पुस्तकाला साजेसा नाही. वर मंगेशने म्हटल्याप्रमाणे खोटे ढग फोटोशॉपमध्ये चिकटवल्यासारखे दिसत आहेत.
Pankaj,
ReplyDeletekupacha chan lihale ahes.
Hi post vachun mi ABC madhe pustak shodhale, pan pustak out of stock ahe. Pustak punyat kothe milel kahi mahit ahe ka??
ani flickr cha album bahitala khupacha mast ahet photo. माझा सह्याद्री ha photo tar khupacha bhari ahe.
Ya photovar jo watermark takala ahe to kasa add kartat photo var??
Asecha chan chan photo kadhat raha!
Shubhecha!
Mast review lihilay, avadale mala.
ReplyDeleteSpast ani saral mat...
Ya pustkachi Kimmat kiti aahe?
फोटो छान आहेत, यात वाद नाही. १०० रुपयात भरपुर फोटो आहेत.
ReplyDeleteमात्र यात खुप सुधारणा शक्य आहेत. काही छायाचित्रे जमिनीवरुन चांगली आली असती.
apalimarathi.com var Uddhav thakarncha ek interview aahe ya pustakabaddal..Tyat tyani he photo kadhtana kaay challenges aale aani tyavar kashi maat keli yache surekh vivechan kele aahe..Jaroor paha. Baki mala he pustak baghnyachi vaat pahavi lagnaar..baghto kuna mitrakadoon magavata yete ka..Sajid,London
ReplyDeletekhupach excellant
ReplyDeleteuddhav yani sarvaana paravdel asha kimtin madhye 1 zabardast pustak dilya baddal dhanyavaad.
ReplyDeleteChaan hoti Post...
ReplyDeleteBy the way wachali ka mag Udhaw sahebaani hi Samiksha...