मोहरीचे पठार आणि लिंगाणा दर्शन
एकदा जेवायच्या आधी एखादी गरमागरम भजी तोंडात टाकली तर पुढे वाट पाहवेल का? तसेच काहीसे झाले. ट्रेकचा आणि भटकंतीचा मुख्य सीझन पाऊस पडल्यावरच सुरु करणार आहे. पण मागल्या आठवड्यात मुळशी-ताम्हिणीत केलेल्या कँपिंगमुळे आता पाऊस पडेपर्यंत वाट पाहवत नव्हते. मग काय बझ्झवरही "कुठे भटकंती करावी बरे वीकेंडला? काही तरी वेगळी जागा पाहिजे. मागच्या वीकेंडला जसे सिक्रेट लेकला जाऊन राहिलो तशी काही तरी" असे टाकून भावनेला वाट करुन दिली. त्यावर "घरीच थांब..काहीतरी वेगळी जागा म्हणून.." अशी टिप्पण्णीही आली होती. शुक्रवार रात्रीपर्यंत तरी काहीच ठरले नाही. पण काहीच झाले नाही तर रविवारी ताम्हिणीची प्लस व्हॅली उतरायचे मनाशी पक्के केले होते. अशातच रात्री साडेदहा वाजता ध्रुव ऊर्फ धुरड्याचा फोन आला, "काय रे, काही आहे का?". झाले मग प्लॅन सरासर मनात तयार झाला. बोराट्याची नाळ जिथे सुरु होते ते मोहरीचे पठार - लिंगाणा दर्शन. नवख्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो की या ट्रेकच्या जागा आहेत. घाटाचे शेवटचे टोक, पुढे कडा ओलांडला की एकदम कोकणातच पोचतो आपण.
अनेक ट्रेकर्स रायगडला या वाटेने जातात. झाले ध्रुवला तसा मेसेज टाकला. त्याचा रिप्लाय आला नाही म्हणून मग कॉल केला (किती घाई, जरा दम धरवत नाही). दुस~या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त तिथून काढायचे नक्की केले. म्हणजे ऐकीव/वाचीव माहितीवर तर्क लावून पोचायला दीड तास, आणि पठारावर पोचायला दीड तास असा हिशोब लावून साडेचारला निघायचे नक्की केले. सध्या तरी धुरड्या आणि मी, दोघेच नक्की होतो.
सकाळी महापालिकेचा कर भरणे, वाणसामान आणणे, बँकेत जाऊन काही कागदी घोडे नाचवणे, अशी क्षुद्रातिक्षुद्र कामे उरकून घेतली. सुहासला फोन करुन आऊटडोअरसाठी आलेल्या खास बुटांच्या ब्रँडची माहिती दिली आणि ते दुपारी जाऊन विकत घेतले. तोवर श्रीकांतपण यायला तयार झाला. शेवटी तीनजण जाणार हे नक्की झाले. कडक उन्हात बाईक दामटत ध्रुवच्या घरी पोचलो. तिथे बाईक लावली. माझी कॅमेरा बॅटरी चार्ज नव्हती ती तिथे चार्जिंगला लावली. त्याच्या स्कॉर्पिओमध्ये सामान टाकले. श्रीकांतने खाण्यासाठी मॅगी आणि ध्रुवच्या घरुन डब्यातून सूप पावडर घेतले. तंबू आणि इतर गोष्टी लोड केल्या. आणि निघालो. कात्रजवरुन नवीन हायवेला लागलो. पाचसात किमी गेल्यावर बॅटरी आठवली. मग काय मनातल्या मनात लई शिव्या दिल्या असतील मला या दोघांनी. पण इलाज नव्हता. पुन्हा निघालो.
रस्त्यात जाताना गप्पाटप्पा चालल्या होत्या. पूर्वीचे भटकंतीचे अनुभव गिरवायला सुरुवात झाली. धुरड्याचे लग्न झालेले आणि माझे होऊ घातलेले. श्रीकांतला विचारले तर म्हणे "दूरदूर पर्यंत संबंधच नाही". झाले हे कार्टं दरवेळी काही ना काही बोलून जाते आणि बाकीच्यांना तेवढेच निमित्त. आता सा~या ट्रेकमध्ये एकच डायलॉग "दूरदूर पर्यंत संबंधच नाही".
नसरापूर ओलांडून तोरण्याच्या रस्त्याने पुढे निघालो. बराच वेळ झाला. आता सूर्यास्त मोहरीच्या पठारावअरुन मिळणार नव्हता. म्हणून घाई करुन उपयोग नव्हता. राजगडाच्या समोरुन जाताना नेढे दिसले आणि पूर्वी केलेल्या राजगड ट्रेकच्या आठवणी जाग्या केल्या. नेहमीचे उद्गारही काढून झाले "गडांचा राज, राजांचा गड, राजगड!!" तोरणा जवळ आला तसा सूर्यास्त होऊ लागला होता. आकाश ढगांविना तसे निरसच होते आणि फोटो काढण्यासाठी उंचावर जावे लागले असते म्हणून तसेच पुढे गेलो. तोरणा पायथ्याला वेल्ह्यात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. वेल्हा हे तालुक्याचे गाव. प्रत्येक ग्रामीण तालुक्याच्या गावाला एक शाप असतो. तो म्हणजे दारुचा. तिथेही असे काही 'हवेतले' 'धारा'तीर्थी वीर दिसले. गावात रस्ता विचारून पुढे मार्गस्थ झालो. आता अजून एक गोष्ट आठवली. काडीपेटी. सगळेच आणायला विसरलो होतो. आता? रस्त्यात जाणारी एक मोटारसायकल थांबवून विचारले दुकान कुठे आहे? आणि माचिस कुठे मिळेल? पुढे पासरी गावात मिळेल असे उत्तर आले. आणि एक तिरकस कटाक्षही. माचिस विचारल्यावर अजून काय होणार? :-) पासरीच्या रस्त्याला लागलो. अतिशय निबीड अरण्यातून जाणारा रस्ता होता. जीवेघेणी वळणे. गाडी चालवतोय की गेम खेळतोय असे वाटत होते. थोडीही चूक सुधारायला संधी मिळणार नव्हती. जरा लक्ष इकडे-तिकडे की "आठ बाय चार, आणि फोटोला हार" (आठ बाय चार हे मयताला स्मशानात मिळणा~या जागेचे माप). डावीकडे अगदी डोक्यावर तोरण्याची बुधला माची आकाशात घुसली होती. दाट जंगलामुळे रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. कानंद खिंड ओलांडून पुढे आलो आणि समोर सह्याद्रीच्या विराट रुपाचे दर्शन घडले. पश्चिमेला मावळतीचे रंग पसरले होते. डावीकडे खाली दरी धुक्याने दाटली होती. मध्येच एखाद्या वाडीतून निघालेली धुराची वलयं घरधनीणीने केलेल्या गरमागरम भाकरीची आणि उकळणा~या कढणाची साक्ष देत होती. एखादा किलोमीटर पुढे आलो असेल तर समोर आता फक्त एक दरी आणि समोर सह्याद्रीची एक रांग आणि त्यावर मावळत्या चंद्राची कोर. मग फोटोगिरी तर व्हायलाच पाहिजे.
अर्धा तास तिथे घालवला. एक एसटी आम्हांला पास झाली. आणि मिट्ट काळोख झाल्यावर तिच्यामागे पुढे निघालो. हेतू हा की अंधारात तिच्या रस्त्याशी असणा~या ओळखीचा आम्हांला फायदा व्हावा आणि आम्ही तिच्यामागे सुरक्षितपणे गाडी चालवावी. पण ड्रायव्हर काका भलतेच वाहतूक सौजन्यशील हो! मागून स्कॉर्पिओ येते म्हटल्यावर त्यांनी एसटी साईडला घेऊन आम्हांस पुढे जायची खूण केली. पाचच मिनिटांत पासरीला पोचलो. तिथे कोप~यावर दुकान होते. काडीपेटी घेतली. चहाची चौकशी केली तर बिनदुधाचा मिळेल असे उत्तर आले. अग तो बेत रद्द केला.
मागून ती एसटी आली आणि त्यातून एक भाऊ पत्नी आणि एका पाचसात वर्षाच्या पोरासह उतरले. नाक्यावर कुणाशी तरी बोलत होते हारपुड गाडी चुकली आणि आता वरोती गावापर्यंत सहा किलोमीटर पायी जावे लआगेल अथवा दुस~या एखाद्या गाडीची वाट पहावी लागेल. आम्ही त्याच रस्त्याने जाणार होतो, म्हणून म्हणालो, "मग चला आमच्याबरोबर". सामान गाडीत ठेवले. गप्पा मारत मारत निघालो. दीपक कुमकर नाव त्यांचे. कुणाच्या तरी लग्नासाठी गावी आले होते. त्यांनी माहिती दिली की हारपुडला कुठे रहायची सोय होईल आणि कोण मदत करेल. शिवाय आडबाजूला असणा~या या गावांमध्ये सॅटेलाईट फोन आहे हेही त्यांनीच सांगितले. मोहरीचे पठार, तिथे पाण्याची सोय आदी महत्त्वाची माहिती मिळाली. वरोतीला त्यांना सोडले तर चहा पिण्याचा आग्रह झाला. चहा हवाच होता आम्हांला. गावची माणसे किती साधी असतात? तीनचार किलोमीटरच्या लिफ्टसाठी तुमचे उपकार झाले, देवासारखे भेटलात असे अनेकदा ऐकवले. त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि हारपुडच्या रस्त्याला लागलो. रस्ता अतिशय खराब आणि दरीच्या बाजूने वळणांचा होता. अगदी "आठ बाय चार सिच्युएशन"! वॅगन आर न आणता स्कॉर्पिओ आणली हा शहाणपणा होता हे लक्षात यायला लागले.
रात्री साडेआठला हारपुडला पोचलो. गाव सामसूम झाला होता. मुक्कामी एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर झोपायची तयारी करत होते. आम्ही सामान उतरवत असताना एकदोन पोरेसोरे जमा झाली. एक जरा वयस्कर काका दिसले,परसूकाका. त्यांना सोबत येण्यासाठी विचारले. ते तयार झाले. घरी जाऊन सांगून देऊन आले. आम्ही आमचे सामान पाठीवर लादले. कॅमेरा बॅगा, जेवणाचे सामान, तंबू, प्रत्येकी दोनेक लिटर पाणी, वैयक्तिक सामान, अवजड ट्रायपॉड असा जामानिमा बराच जड झाला होता. पण इलाजही नव्हता. हारपुडच्या पुढे दरीतून पायवाट होती. पहिल्या शंभर पावलांतच बरे झाले माहीतगार माणूस सोबत घेतला असे वाटायला लागले. मिट्ट काळोख. चंद्रकोर केव्हाच मावळलेली. डोळ्यांत हत्ती घुसायला लागला तरी दिसायचा नाही अशा परिस्थितीत टॉर्चच्या प्रकाशात वाटचाल सुरु केली. एक दरी उतरलो. आणि चढ लागला. झाले. सगळी मस्ती जिरायला लागली. धाप लागली. एका ठिकाणी ऐन उन्हाळ्यात झ~याचे थंडगार पाणी प्यायला मिळाले. खूप बरे वाटले. वा~याच्या दिशेला आडवा पर्वत पसरला असल्याने हवा लागत नव्हती. चढाईमुळे धाप लागत होती, त्यात प्रत्येकी कमीत कमी दहा किलोचे ओझे. आलटून पालटून तंबूची बॅग एकेकाच्या हातात. अंगातून नुसते पाण्याचे पाट वाहत होते. सगळे कपडे पावसात भिजल्यासारखे भिजले. व्हायचा तो परिणाम झाला. माझ्या पायात क्रँप, बोटावर बोट चढले. दहा मिनिटे त्यात गेली. पण तसाच पुढे झालो. आणि पुढचा पर्वत चढून उतरलो. शेवटचा तिसरा डोंगर कस काढणारा होता. अगदी जीवावर आले होते. पण मोहरीच्या पठाराला भेटायला जीव तेवढाच उत्सुक होता. प्रत्येक पंधरा मिनिटाने बसून दम टाकावा लागत होता. कसाबसा वर आलो. आणि अंधारात लिंगाण्याने दुरुन आऊटलाईन दर्शन दिले. मोहरीच्या वाडीतली सोलर पॅनलची लाईट दूरवर चमकली आणि आमचे डोळेही. मोबाईलला रेंज आली. घरी फोन झाले आणि खुशाली कळवली.
आता शेवटला टप्पा. त्या पठारापर्यंत पोचायचे. जाताना वाडीतली कुत्री भुंकत होती. तीन तास ट्रेक करुन आम्ही पठारावर आलो. पाण्याची सोय होती. एक मोठी विहीर. एवढ्या उंचीवर क्रेनचे साहित्य डोक्यावर आणून ही विहीर खोदली आहे. विहीर आणि पाणी पाहून डोळेच विस्फारले. एवढ्या उन्हाळ्यातही विहीर अर्ध्याहून अधिक भरलेली होती. आता मुक्कामासाठी जागा शोधली आणि सरपण जमा केले. चूल करुन आग पेटवायचे काम श्रीकांत अण्णा करत होता, तोवर आम्ही तंबू उभारुन घेतला. सामान आत टाकले. पण आग पेतली नव्हती. शेवटी तिघांच्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने पेटली. पोटातही तशीच आग पेटली होती. आधी सूपसाठी आधण ठेवले. परसूकाकांनी आम्हाला पाण्याची कळशी आणून दिली आणि घोंगडी पांगरुन झोपले पण. रात्री साडेबारा वाजता एका प्लेटमध्ये तिघांनी चमच्यांनी सूप ओरपले. आता जरा बरे वाटू लागले. डोके चालायला लागले. मग ता~यांच्या फोटोसाठी ट्रायपॉडवर कॅमेरे सेट केले आणि स्वयंपाक करायला घेतला. तो करताना गोव~या वापरत होते. आणि गोवरीला=गौरीला पेटव अशी कोटी चालली होती. गप्पा रंगत होत्या. विनोदाला उधाण चढले होते. प्रत्येक जण कुठले सरपण कसे जळेल आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल यावर पीएचडी करुन आल्यासारखे भाष्य करत होता. रात्री दीडला मॅगी रटरटले आणि आम्ही तुटून पडलो. ते झाल्यावर कॅमेराकडे जरा पाहिले तर त्याचे काम चालू होते, पण दवामुळे पूर्ण भिजला होता. लेन्सवर पण दव जमा झाले होते. अक्षरश: ठिबकत होता. घाईघाईत तो तंबूत आणला आणि कोरडा केला. तंबूत आतूनही दव जमा झाले होते. तसेच आडवे झालो. एवढे थकलो होतो की पाठ टेकल्याबरोबर झोप लागली.
सकाळी झुंजूमुंजू झाले आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानी आला. डोळे उघडले तर तंबूचे दव अंगावर पडून आम्ही काहीसे ओले झालो होतो. ध्रुवने खिडकीतून बाहेर पाहिले तर पहिली प्रतिक्रिया होती, "पंक्या, बाहेर बघ जरा". अगदी दाट धुके आणि पूर्वरंग. स्वर्गात आल्याचा भास होत होता. क्षणार्धात कॅमेरा सरसावून बाहेर येईतो धुके गायब. निसर्गाची जादू, डोळ्यांनी अनुभवता आली, हेही नसे थोडके. आता उठून काल रात्री अंधारात हरवलेला लिंगाणा शोधू लागलो. दूरवर धुक्यात लिंगाण्याचा सुळका दिसत होता. आणि त्यामागे भटक्यांचे दैवत रायगड. राजांची राजधानी आणि शेवटची भूमी. डोळ्यांचे पारणे फिटले. आसपासचे काही फोटो काढले. जवळून दर्शन घेण्यासाठी रायलिंगीच्या पठारापर्यंत जाण्याची इच्छा होती पण आवरती घेतली. कारण ऊन चढायच्या आधी परत हारपुडला पोचायचे होते. सणासुदीचा अक्षयतृतीयेचा दिवस होता. घरची बोलणी नको म्हणून आवरते घेतले. तंबू खाली घेऊन गुंडाळून ठेवला. आणि सात वाजता परत निघालो. आता काल आम्ही कसल्या रस्त्याने आलो तो दिसत होते. सह्यकड्याचे विराट रुप आता छातीत श्वास भरुन पाहून घेतले. ढगांनी वेढलेला लिंगाणा निरोप देत होता. पुन्हा दोन टेकड्या चढउतार करुन शेवटची तिसरी कस लावत होती. मागून ढग सह्याद्रीचा अडथळा पार करुन देशावर ओसंडत
होते. पाठलाग करणा~या ट्विस्टरसारखे ते दृश्य होते. वाटचाल करताना कधीही चार पावले वाट वाकडी करुन बाजूला गेले की करवंदाच्या जाळ्याच जाळ्या होत्या. मनसोक्त तो रानमेवा पोटभर खाऊन घेतला. शेवटची चढण लागण्याआधी एका घळीतून एक ओढा वाहत होता, तिथे जरा फ्रेश झालो आणि हारपुडकडे वाटचाल केली. अर्ध्या तासातच गावात पोचलो. परसूकाकांच्या घरी चहा झाला. एकदम टिपीकल गावरान गुळचाट चहा मस्त लागत होता. चहाने जरा तरतरी आली आणि आम्ही गाडीत बसलो. पुन्हा खराब रस्त्याने वरोती, कानंद खिंड करत वेल्ह्याला आलो. मध्ये एकदा पुन्हा "करवंदी" ब्रेक झाला. वेल्ह्यात नाष्टा झाला. आणि पुण्याकडे कूच केले, पुन्हा एकदा नवीन अनुभव आयुष्याच्या गाठोड्यात बांधून...!!!
आता एवढ्यावर आम्ही थांबू का? आमचे समाधान झाले का? छे... "दूरदूर पर्यंत संबंधच नाही"...!!!

Fact file:
Name: Plateau of Mohari/Railingi (मोहरीचे पठार / रायलिंगीचे पठार)
Nearest motorable village: Harpud, Post-Singapur, Dist Raigad.
Route: Pune-KhedShivapur-Nasarapur-Velhe-Pasari-Varoti-Harpud
Distance: around 90-100km from Pune.
Tips: Avoid extreme seasons because heat, heavy rain and waterfalls. September end and October start is the best time to visit to witness the floral coronation of Sahyadri. Be prepared for a tough walk.
Stay: Can be done in open land of plateau or Moharichi wadi.
Surrounding: Raigad, Lingana, Torana.
Really Awesome trek... No words... Great photos...
ReplyDeleteU L T I M A T E
ReplyDeleteMitra khupach chan..mast maja aali asel yar..mi asto tar aankhi maja aali asati..aso parat kadhitari
ReplyDeleteझक्कास ट्रेक झालेला दिसतोय वाचून खूप मजा आली ....तर अनुभवतांना किती आली असेल.
ReplyDeleteAflatoon ........ Mastach.... aani Thanx :)
ReplyDeleteपंकज, मस्त लिहीलं आहेस. परत आपण मोहोरीच्या पठारावर बसुन लिंगाणा बघत आहोत अस वाटलं.
ReplyDeleteध्रुव
"घरीच थांब..काहीतरी वेगळी जागा म्हणून..".... Hahahaa
ReplyDeleteMast.... Nice photos as usual.... Gr8 Stuff !
Love the way you write ... Swatah trek kelyasarkha watal !
ReplyDeletePrashant
Kitti mast lihita ho tumhi...!!! khoopch sunder aani photos apratim...!!!
ReplyDeleteek aste trek la jane ani dusre aste tya che varnan karne. Hey varnan aase aahe ki me US madhe asun suddha mala Tornya chya paithya la basun Ulka Varshav pahayacha bhas hoto aahe. Dhurdya me jaltai tuzhya var.
ReplyDeleteGanesh
"घरीच थांब..काहीतरी वेगळी जागा म्हणून.." ...:)
ReplyDeleteनेहमीप्रमाणे झक्कास अनुभव....
मस्त... लिंगाणा जवळून बघायला हवा होतात तुम्ही... वेड लागतं...
ReplyDeleteMasta lihila ahes... maja aali vachatana.. :))
ReplyDeleteSahi ahe... Wachun asa waytla ki atach nighawa apan pan :)
ReplyDeleteKhoop Bhari...!!
ReplyDeleteatyant sundar varnan panakj! sahaj sopa ani sampoorna :) me ganesh chya commentshi sahamat ahe Pardeshat asunsudha he ashi varnane vachun manamadhe anek athavani tar yetatach pan tyachbarobar parat alo ki he sagala karanyachi umedsuddha jagrut hote! Lai Bhari lihila ahes..ya treck che sagle snaps kuthe pahayla milatil?
ReplyDeleteमीच तो जो तुला म्हणालो घरी थांब ...वेगळे काहीतरी....
ReplyDeleteहुजूर माफी असावी...जबरदस्त वरण नेहमीप्रमाणेच....अन फोटोच तर काय बोलायलाच नको.....
:)
पंकज, जाउन आलास का रे सांदण दरी आणी रतनगडला??
ReplyDeleteMitra...Jeena Isika Naam Hai!!!
ReplyDelete