कोंबडी पळाली (गिळाली)...!!!
देवाने या प्राण्याला (की पक्ष्याला) जन्म देऊन अखिल मानवजातीवर अगणित उपकार केले आहेत. आणि हा जन्म अखिल मानवजातीसाठीच दिला आहे यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. तुम्हीच विचार करा की आता या कोंबडी नामक वस्तूचा दुसरा काही उपयोग आहे का? एवढी फुरसत काढून ब्रम्हांडातील सर्व उपयुक्त रस या अर्धा-पाऊण फूट परीघ असणार्या चालत्या-हलत्या-डुलत्या, क्वचित केव्हा तरी उडत्या या एवढ्याशा कंटेनरमध्ये सामावून सर्वांना महिन्यातून एकदा का होईना परवडणार्या किंमतीस उपलब्ध करुन देणे हे तो विश्वविधाताच करणे जाणो. आमची चालती बोलती स्वर्गस्थानं (म्हणजे आमची पोटं हो) या अचंबित करणार्या निर्मितीला दाद देण्यासाठीच बनली आहेत अशी आमची अढळ श्रद्धा आहे. एखादा या अभूतपूर्व वस्तूचा विविध संस्कार केलेला डेलिकेट तुकडा या स्वर्गाच्या द्वारावाटे जिव्हास्थानी रसनेला तृप्त करत, आम्हांला स्वर्गीय सुखाची अनुभूति प्रदान करत जेव्हा त्याच्या पूर्वनियोजित जागी देहरुपी स्वर्गात स्थिरावतो तेव्हा त्या परमेश्वराचे कष्ट सफल होत असतील. अशा वेळी दिलेली दाद म्हणजे शी-मराठी’वर ’नाचा’च्या रियालिटी शोमध्ये (सहनशक्ती) पिळू(का?)गावकरांनी दिलेल्या शंभराच्या नोटेपेक्षा तर अधिकच मौल्यवान असते.
काय? नमनालाच घडाभर तेल? कोण म्हणालं रे ते? बरं असो. तर मी बोलत होतो कोंबडी गिळाली वर. तसं तर अखिल खादाडी साम्राज्याचा जिव्हाळ्याचा विषय. पण अधिकारवाणीने लिहिणारे फार थोडे. पुण्यात काय खावे, कसे खावे कुठे खावे याची इथे ही यादी.
सुरुवात घरातूनच. ही अमृतमयी चीज खाण्याचे बाळकडू घरातूनच आम्हांला मिळाले. माझ्या वेळी नक्कीच आईला चिकन खावेसे वाटले असणार. किंवा मला वाटते सटवाईच्या पूजेलाच चिकन होते की काय कुणास ठाऊक. घरी जाऊन आईला विचारायला पाहिजे. पाटीवर पेन्सिल कशी धरावी याच्या आधीपासूनच लेगपीस कसा धरावा याचे संस्कार झाले असावेत. घरी आई जसा चिकन रस्सा बनवते तसा आजवर कुठेच खाल्ला नाही. कधीकधी चिकन फ्राय पण होतो. पण रश्शाची सर नाही त्याला. चिकन चपातीचे ताट वाढले की पुढे चपात्याच मोजत नाहीत आमच्या घरी! आमची तायडी स्वयंपाक शिकली तेव्हा मी घरी जरा भीतभीतच जेवायचो, पण एकदा हिरव्या मिरचीतले चिकन आलं टाकून असे काही बनवून खायला घातले की गेल्या महिन्यात तिचे लग्न होईपर्यंत प्रत्येक वेळी मी त्याचीच फर्माईश करायचो. म्हणजे एका दिवशी ते ग्रीन चिकन आणि मग आईच्या हातचा रसा मिळाला नाही म्हणून परत दुसर्या दिवशी चिकन. डबल गेम! त्यात गावरान कोंबडी मिळाली के काय मग, विचारायलाच नको. गावाला गेलो तरी माझे हे व्यसन ऐकून दुसरे काही करण्याच्या फंदात पडत नाही. तशीच आमची होणारी ’ही’पण ग्रेव्ही चिकन (आणि मासेपण) बनवण्यात एकदम माहिर. याला म्हणतात "made for each other"!
चिकन सलामी सॅंडविच मस्त मिळते लॉ-कॉलेज रोडवर. ’कोलाज’ नावचे हॉटेल कम स्नॅक बार आहे. कातिल चिकन सलामी सॅंडविच. त्याच एरियात थोडे डेक्कनकडे सरकलात की कमला नेहरु पार्कासमोर चिकन शोरमा अफलातून मिळतो. चिकन शोरमा बनवताना पहायला मिळणे हेही एक भाग्याचे लक्षण आहे. टंगून ठेवलेल्या स्टेकवर आडवे-उभे सुरे चालवून खाली चिकनचा किस पाडून त्यावर चीज-सॉस-मसाला संस्कार करुन एका रोटीच्या रोलमध्ये गुंडाळून हातात जे काही येते ते म्हणजे अमाप स्वर्गसुख. असाच चिकन शोरमा मुंबईत फिनिक्स मिलच्या आसपास मिळतो अशी माझ्या व्हेज मित्राची इन्फर्मेशन आहे (अशा बाबतीत व्हेज लोकांची माहिती खरी असते), पण गेल्या वेळी मुंबईला जाऊनही त्याचा लाभ घेणे माझ्या नशिबात नव्हते.
आणखी डेक्कनकडे आलात तर चौकातच ’गुडलक’ आपल्याला गुडलक विश करेल. तिथे चिकन कबाब, चिकन बेंगलोर स्टाईल आणि काही इराणी पद्धतीच्या चिकन रेसिपीज लाजवाब आहेत. त्याच रोडवर सबवे मध्ये चिकनची कुठलीही व्हरायटी खाल्ली तरी स्वर्ग. बोरावके’ज चिकन मध्ये पण जंबो साईझ तंदूर आणि बिर्याणी अफाट भारी. समोर मॅक्डीचे चिकन बर्गर आणि कोक म्हणजे एका वेळची भूक पूर्णपणे भागते. कँपमध्ये गेलात आणि बर्गर किंगला जाऊन जंबो चिकन बर्गर विथ कोल्ड कॉफी घेतले नाहीत तर मी म्हणेल काय झक मारायला गेला होतात का? मग साचापीर स्ट्रीटला दोराबजीची दम बिर्याणी, वाडिया कॉलेजच्या रोडवरचे ब्लू नाईल आणि तिथले बटर चिकन अविस्मरणीय.
हडपसरला मगरपट्ट्यात चिकन रोलचे एक दुकान आहे (नाव विसरलो). त्याच्याएवढ्या व्हरायटीचे चिकन रोल मी आजवर जगात कुठेच पाहिले नाहीत. तिथेच असलेल्या ’डेक्कन हार्वेस्ट’मध्ये चिकन चाट म्हणून चिकनचे छोटे छोटे पीसेस आणि आंबटसर चव असलेला चाट मसाला, कांदा असे काहीतरी अफलातून रसायन मिळते. ’बार्बेक्यू नेशन’ (कल्याणीनगर आणि बालेवाडीला सयाजी रुफटॉप) म्हणजे चिकन स्टार्टर्सची पंढरी. थोडे महागडे वाटणारे ’डिनर पॅकेज विथ अनलिमिटेड स्टार्टर्स’ आहे पण पुरेपूर पैसा वसूल. एक सो एक अशा काही व्हरायटीच तुमच्या टेबलावरच बार्बेक्यूमध्ये आणून लावतात की किती खाऊ आणि किती नको असे होते. पोट भरेल पण मन भरणार नाही.
तंदूर चिकन... अहाहा... कशाला नाव काढलंत राव? आता आज संध्याकाळी खावंच लागेल. तंदूर खाण्यासाठी नगर रस्त्याव्र वाघोलीजवळ पंजाब स्पाईस म्हणून एक हॉटेल आहे. एकदम बेश्ट. ज्युसी तंदूर कशाला म्हणतात ते तिथे गेल्यावर समजते. अजून एक स्पॉट म्हणजे येरवड्यात सादलबाबा दर्ग्याजवळ एक पत्र्याचे हॉटेल आहे. रविवारी दुपारी ट्रक भरुन माल आणतो आणि तो त्याच दिवशी संपतो अशी त्याची खासियत. फक्त तिथे बसून खाण्याची सोय तितकीशी चांगली नाही. पुण्यातून दिवेघाट चढून गेलात की ’गारवा’ म्हणून हॉटेल लागते, तेही असेच तंदूरसाठी आख्ख्या इंडियात वर्ल्ड फेमस. आपली चिकनची आवड पण अशीच आहे. आख्ख्या इंडियात वर्ल्ड फेमस...!!!
बास्सच आता! लई झाले वर्णन. मी जातोच आता यातल्या एखाद्या ठिकाणी. आपण आलात तर भेटूच तिकडे.

असेच अजून खात रहा: खा लेकहो खा...!!!
हा हा जबराट... विश्वविधात्याने बनवलेला हा गुणी पक्षी मी खात नसूनही पोस्ट आवडली..
ReplyDelete>>"अशा वेळी दिलेली दाद म्हणजे शी-मराठी’वर ’नाचा’च्या रियालिटी शोमध्ये (सहनशक्ती) पिळू(का?)गावकरांनी दिलेल्या शंभराच्या नोटेपेक्षा तर अधिकच मौल्यवान असते."
हे तर लय भारी... हा हा हा
ya phototalya kombadila maza
ReplyDeleteshi. sa. Namaskar !!!!!!
mi tila abhivadan karato.
शी-मराठी.. पिळू (का?)... कोंबडी गिळाली... लय भारी.. आमची बी २०ला एजिटेरियन पार्टी हाये!!! ;)
ReplyDeleteतंदूरी चिकन , अमुल बटर आणि रोटी हे माझं फेवरेट कॉम्बॊ आहे. चिकन रोलच्या समकक्ष प्रकार आहे हा. चिज पराठा आणी तंदूरी चिकन ट्राय करून पहा, पायनॅपल रायता सोबत - अप्रतिम कॉम्बीनेशन आहे हे..
ReplyDeleteपोस्ट एकदम टेस्टी :) आज खायला जावंच लागेल समोरच्या तारापंजाब मधे
lai bhari..lekh wachun tondala pani sutla..ata kuthetari javach lagel chicken khayla...
ReplyDelete’शी’ मराठी???? लय्य्य्य्य्य भारी.... बरे झाले हेच नाव फेमस झाले !!!
ReplyDelete’बार्बेक्यू’ चा उल्लेख करू नका रे सारखा.... आम्ही २ महिन्यातून एकदा तरी जातोच आणि पैसे वसूल होईल असे (म्हणजे जन्मोजन्मी उपाशी असल्यासारखे खातो - हादडतो)
बाकी तू वर्णन असे केले आहेस की माझ्यासारख्या व्हेजिटेरीयन माणसाच्या तोंडालापण पाणी सुटले :)
कोंबडीबद्दल काय बोलावे. अंड्याच्या रूपात जन्माआधी आणि मृत्यूनंतर विविध अवतारात समस्त अभक्ष्य भक्षकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा दुसरा जीव नाही.
ReplyDeleteChan lihilay..
ReplyDeleteKapila Kathi Kabab naahiye kaa tumachya list madhye???
तंदूरी चिकनचा फोटो पाहूनच खमंग वास आल्याची जाणीव झाली. फोटोची दृष्ट काढावी इतका छान फोटो आहे. कानशिलावर कडाकडा बोटं मोडून घेण्याचा मोह मला आवरत नाहीये. आता या तंदूरीपासून दूरी राखणं अशक्य आहे. येत्या रविवारीच तिला आपलंसं करून टाकीन म्हणते.
ReplyDeleteOff कर्वे रोड - नळ stop जवळ MahendaLe Garage शेजारी Abhishek non-veg मध्ये CHICKEN BAGDADI - खाऊन बघा - APRATIM - माझे अनेक मित्र मैत्रिणी आता पुणे सोडून PCMC मध्ये shift झालेत नोकरी निम्मित - पण महिन्यातून एकदा BAGDADI साठी येतात पुण्यात - आणि मी घासफूस खात बसतो बरोबर येणार सलाड - पण ते सुद्धा APRATIM असतं!!
ReplyDeleteOff कर्वे रोड - नळ stop जवळ MahendaLe Garage शेजारी Abhishek non-veg मध्ये CHICKEN BAGDADI - खाऊन बघा - APRATIM - माझे अनेक मित्र मैत्रिणी आता पुणे सोडून PCMC मध्ये shift झालेत नोकरी निम्मित - पण महिन्यातून एकदा BAGDADI साठी येतात पुण्यात - आणि मी घासफूस खात बसतो (बरोबर येणार सलाड) - पण ते सुद्धा APRATIM असतं!!
ReplyDeleteस्वर्ग कपाळ! एखादा पुढची अनेक जन्मे कोम्बडी झाला तरीही त्यला असेच वाटेल का? की तेव्हा इश्वराला शिव्या? कुकुट शेतातले ६० दिवसन्चे आयुश्य. वर्षातुन ६ जन्म भरपुर आयुश्ये मिळतिल अनुभवायला.
ReplyDeleteVachun maja aali, BTW "पुण्यातून दिवेघाट चढून गेलात की ’गारवा’ म्हणून हॉटेल लागते" , I think it is in Bopdev ghat?
ReplyDeleteआमच्या मुंबईला आलात तर रिगल सिनेमामागे बडे मियाची तंदुरी आणि चिकन टिक्का नक्की खा! :)
ReplyDelete