फोटो नॉस्टॅल्जिया
By
Unknown
/ in
photography
फोटो आणि त्यांच्या फाईल्सचा बॅकअप खूप दिवसांपासून राहिला होता. नवीन काही फोटो काढले नाहीत. म्हणून जुनी हार्डडिस्क चाळता चाळता सहज म्हणून जुने फोटो पाहत होतो. त्यात हे फोटो सापडले. जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला. कोडॅकचा फिल्म कॅमेरा. मॅन्युअल फिल्म फॉरवर्ड असलेला. कॉलेजला असताना शिवनेरी आणि माळशेजला ट्रिपला गेलो होतो. मित्र घरुन कॅमेरा घेऊन आला होता. Contri करुन त्यात रोल टाकला आणि कॅमेरा मी ताब्यात घेतला. आयुष्यातला पहिला फोटो तेव्हाच काढला. म्हणूनच तो कॅमेरा जरा स्पेशलच माझ्यासाठी. तेव्हापासूनचा आजवरचा सगळा फोटोगिरीचा प्रवास समोर तरळला. सह्याद्रीचे वेड पण तितकेच जुने.
आधी तो फिल्म कॅमेरा, मग याशिकाचा फिल्म कॅमेरा, नंतर कोडॅकचा एक ३ मेगापिक्सेलवाला डिजिटल हे सगळे उसने कॅमेरे. त्यानंतर मग एक फिल्म SLR गिफ्ट मिळाला. त्यावर थोडे हातपाय मारुन दोन वेळा अपग्रेड करत आजचा Canon EOS 40D. आता काही लेन्स (२-४) आणि प्रो क्वालिटीचा ट्रायपॉड घेऊन आता तरी फोटो सुधारतील अशी वाट पाहतोय. कधी जमेल काही माहीत नाही.
आधी तो फिल्म कॅमेरा, मग याशिकाचा फिल्म कॅमेरा, नंतर कोडॅकचा एक ३ मेगापिक्सेलवाला डिजिटल हे सगळे उसने कॅमेरे. त्यानंतर मग एक फिल्म SLR गिफ्ट मिळाला. त्यावर थोडे हातपाय मारुन दोन वेळा अपग्रेड करत आजचा Canon EOS 40D. आता काही लेन्स (२-४) आणि प्रो क्वालिटीचा ट्रायपॉड घेऊन आता तरी फोटो सुधारतील अशी वाट पाहतोय. कधी जमेल काही माहीत नाही.
आयला.. पंकज, तो पहिला फोटो मस्त आहे रे... अरे इतके मस्त फोटो काढतो आहेस. पुढे ही काढशील.. अजून.. अजून चांगले... तथास्तु..
ReplyDeleteमी सर्वात आधी कोडक क्रोमा आणि मग SLR - भाड्याचा ;) आता सध्या निकोन P-80 वर बसलोय बघुया मला कोणी D-SLR गिफ्ट देतो का ... ही ही ..
पंकज मलाही पहिलाच फोटो जास्त आवडला.:)
ReplyDeleteपहिला फोटो.. मस्त आलाय..
ReplyDeleteLife madhe kadhlela pahilach photo bhari hota .. now i know how you manage to shoot great landscapes ;)
ReplyDelete~Prashant
पंकज मस्तच आहेत रे फोटो...इथला उन्हाचा कडाका पहाता फोटोतूनही हिरवळ दिसली की छान वाटते.....
ReplyDeleteमस्तच आहेत फोटोज. आणि तुझं कॅलेंडरपण सही. असेच अजून फोटो काढत रहा आणि ब्लॉगवर पोस्ट करत रहा! जुने फोटो बघताना इतकी मस्त उजळणी होते त्याच्याशी निगडीत आठवणींची ...
ReplyDeleteGreat journey
ReplyDeleteसुंदर फोटोज आहेत...
ReplyDelete'प्रो क्वालिटीचा ट्रायपॉड घेऊन आता तरी फोटो सुधारतील अशी वाट पाहतोय'
ReplyDeleteकाय पण ,
एवढे झक्कास फोटो काढतोस कि मी सजेस्ट करेन तू एक online सह्याद्री कॅलेंडर काढ तुझ्या फोटोंचा,
बरीच दुर्ग,किल्ले आणि सह्याद्री शी संबंधित फोटो प्रदर्शनं पहिली पण तुझ्यैतके High क्लास (दुसरा शब्द नाई सुचला) फोटो कुठेच नव्हते.
खरच ज्याचा जीव सह्याद्रीशी जडलाय तोच हि कला दाखवू शकतो.