घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक
च्यायला, (ही शिवी नाही हे जगजाहीर आहे आता. शंका असेल तर इथे वाचा)
सगळी दुनिया "A" म्हणाली की आम्ही "Z" म्हणणार. लोक "थर्टी फस्स" कुठे आणि कशी 'डोलवायची' याचा विचार करत होते आणि मी एक जानेवारीला भटकंती सीझन कसा जागा करायचा हे शोधत होतो. पण यंदा आमच्या तायडीचे 'वाजवायचे' असल्याने कामं पण चालू होणार होती. "फक्त याच वेळी जातो मग कामं करुच", "अर्ध्या दिवसात परत येतो" असे नेहमीप्रमाणे याही वेळी घरी पटवून बेत फिक्स केला. पण कुठे? ’कावळ्या’ किल्ला कसा आहे ते सौमित्राला विचारून घेतले. पण वरंधा घाटातली खिंड म्हणजे कावळ्या असे ऐकायला मिळाले. मग त्याने काही खाज जाणार नाही म्हणून जरा अजून स्पेशल किल्ल्याचा शोध लागला. तो म्हणजे ’घनगड’. मग शोधाशोध करुन एकमेव लिंक मिळाली. इतर लिंक्समध्ये तीच माहिती copy-paste केलेली. एक रॉक पॅच होता २० फूटांचा. म्हटले बास हेच तर पाहिजे होते आपल्याला. हर्क्युलस-वैभवला फोन केला. गडी एका न्यू इयर पार्टीत होता. त्याला एकच व्यसन आहे (नाही, नाही तीर्थप्राशन नाही)... हलणारी कोंबडी आणि बोकड दिसले की तो पिसाळतो. म्हणूनच एका पार्टीत गेला होता. रात्री अकरा वाजता ट्रेक फायनल झाला. म्हणजे लिटरली 11th hour ला. ट्वीट करुन टाकले. अजून एक तयार झाला- सचिन (शून्य). पण त्याचा प्रॉब्लेम होता की चार वाजता खूप लवकर होईल. म्हणून मग त्याला आख्खी १५ मिनिटे जास्त दिली :-)
सकाळी साडेतीनला सगळ्यांना फोन करुन उठवून दिले आणि मी परत थोडी झोप काढली (शेवटच्या १५ मिनटांचे सुख, दुसरे काय?). ब्रश करुन ’शंभो’ला सुट्टी देऊन गाडी चालू केली. कॅमेरा बॅग, दोरी आणि पाण्याची बाटली उचलली आणि वैभवला जंगली महाराजवर भेटलो. नळस्टॉपला अमृतेश्वरमध्ये चहा झाला (पहाटे साडेतीनपसून हमखास चहा मिळण्याचे ठिकाण). तिथे सगळे लोक रात्रीच्या तीर्थावर उतारा म्हणून चहा घ्यावा या उद्देशाने आलेले होते. तिथून चांदणी चौक. सचिनची वाट पाहता पाहता रस्त्याने नववर्षाची सरलेली रात्र झिंगत जाण्याची अनेक उदाहरणे दिसली. रात्री ’धारा’तीर्थी पडलेले वीर सकाळी आपापल्या घरची वाट चालू लागलेले होते. मग सचिन आला पण पेट्रोल नाही गाडीत अशी गूड न्यूज घेऊन. पंधरा मिनिटांत पेट्रोल पैदा करुन आम्ही निघालो मुळशीच्या दिशेने. शहरातून बाहेर पडताच थंडी मी म्हणायला लागली. कान पॅक करुन अशी काही गाडी बुंगवली म्हणता हर्क्युलसने की विचारता सोय नाही. टिपूर चांदणे पडले होते. त्याचा प्रकाश एवढा होता की हर्क्युलस मध्येच हेडलाईट बंद करुन त्या चांदण्यात गाडी चालवत होता. हाडं गोठवणारी थंडी, भरारलेला वारा आणि सत्तरच्या वेगाने उडनाऱ्या आमच्या गाड्या. काहीही करुन सुर्योदयापूर्वी गड गाठायचा होता. मुळशी जलाशय आणि ताम्हिणी गाव अंधारातच मागे सोडून आम्ही लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्याला वळालो. आता कोरसबारस मावळात प्रवेश केला होता. नेहमी आम्ही जिथे पडीक असतो तो ’सिक्रेट लेक’ मागे टाकून आम्ही भांबर्डे गावच्या रस्त्याला लागलो. एव्हाना तांबडे फुटले होते. गाडीखालचा रस्ता आता आपले रस्ता हे नाव सोडून ’मोटोक्रॉस ट्रॅक’ हे नाव धारण करू लागला होता. फक्त पसरलेली खडी आणि उखडलेले मोठे दगड... यालाच रस्ता म्हणायचे होते. नवरा-नवरी-भटजीला डावीकडे ठेवून आम्ही भांबर्डे गावात पोचलो. तिथे ’एकोले’ गावाची चौकशी केली. हेच ते घनगडाच्या पायथ्याचे गाव. गावात पोचलो तेव्हा चांगलेच उजाडले होते पण ढगांचे आच्छादन होते म्हणून सूर्यदर्शन घडले नव्हते. कदाचित निसर्ग पण आमच्या साथीला होता. सूर्यदर्शन आम्हांला गडमाथ्यावरुनच घडवायचे होते.
गावात चौकशी करुन गाड्या लावल्या. हेल्मेट्स एका काकांच्या घरात ठेवली. आणि त्या दोन घरांच्या मधून वरची वाट धरली. साडेसात वाजले होते. छान थंडगार वारा सुटला होता. तो बाधू नये म्हणून कान झाकले होते. दूरवर तेलबैलाची जुळी कातळभिंत आणि त्यामागे असणारी उगवतीची विरुद्ध दिशेची लाली मनाला भावली होती.
ती कॅमेराबद्ध करुन वर निघालो. पंधरा-वीस मिनिटांतच एका मंदिरापाशी पोचलो. "श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची" दर्शन घेऊन आम्ही मंदिराला डावी घालून वरच्या दिशेने निघालो. दहाच मिनिटांत एका दोन डोंगरांच्या बेचक्यात येऊन पोचलो. पलीकडचे विहंगम दृष्य दिस्त होते. विरळ धुक्याने भरलेली दरी आणि खाली कोकणाचा परिसर. वारा तर एवढा भर्राट होता की उभेही राहता येत नव्हते. खाली थोड्याच अंतरावर एक भलामोठे पाषाण एकावर एक रचून ठेवले आहेत असे निसर्गशिल्प दिसले. आणि या जादूगाराला सलाम केला. तिथून परत थोडे खाली उतरून उजवीकडची वाट दोन बुरुजांमध्ये असलेल्या दरवाजापाशी घेऊन जाते. तिथूनच थोडे वर चढून गेले की थोडीशी विसाव्यालायक मोकळी जागा आहे. समोर दोन गुहा आहेत.
येथून पुढे खरी चढाई सुरु होणार. विशेष नाही, फक्त एक २०-२५ फूटांचा कातळ आहे. वरती एक गुहा आहे. आधी वैभवने प्रयत्न केला. पण त्याला एके ठिकाणाहून पुढे जायला होल्ड्स मिळाली नाहीत. त्याच्या वजनासाठी तशीच मजबूत होल्ड्स पाहिजे होती. परिणामी तो परत खाली आला. मग मी सरसावलो. ५०-५२ किलोचाच देह, वजन ही एकमेव गोष्ट, जी मला फारच कमी मिळाली, पण त्यामुळे सरसर वर पोचलो. एक दगडात ठोकलेली रिंग होती, तिथे दोरी लावून खाली सोडली. सचिनने प्रयत्न सोडून दिले. वैभव वर आला. मग त्याच दोरीचा आधार घेऊन सातेक फूटांचा आडवा ट्रॅवर्स मारुन आम्ही सुरक्षित जागी पोचलो. तिथे एकावर एक अशा तीनचार गुहा होत्या. आता सोपी वाट होती. दहा मिनिटांमध्ये वरती पोचलो. वर दोनचार पाण्याची टाकी आणी जुन्या घरांची काही जोती आहेत. एक दोन बुरुजांचे अवशेषच काय ते सुस्थितीत म्हणता येतील. बाकी वारा मात्र मुबलक. पलीकडे कोकण, कोकणातल्या घाटवाटा, तेलबैला, सुधागड यांचे विहंगम दृश्य आहे.
आता निसर्ग पण प्रसन्न झाला आणि आम्हांस सूर्यदर्शन घडले. निळ्या बिछायतीवरुन पिसासारख्या ढगांच्या रजईआडून हलकेच सूर्य बाहेर आला आणि नववर्षाचा पहिला सुर्योदय आम्ही अनुभवला. मग टाकोटाक परतीचा मार्ग धरला आणि १५ मिनिटांतच खाली पायथ्याला उतरलो. सकाळी साडेनऊला संपणारा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच ट्रेक. रस्ता बदलण्यासाठी म्हणून लोणावळामार्गे परत येण्याचा निर्णय घेतला. ’रामकृष्ण’ मध्ये दाबून ब्रेकफास्ट केला आणि पुणे-मुंबई हायवे मार्गे पुण्यात पोचलो. येताना मंजिरीकडून मला या वर्षीचा सगळ्यात सुंदर न्यू इयर SMS मिळाला "जुन्या दिवसांची आठवण ठेवत आता नवीन कॅलेंडर टांगायचं, ’तूही सुखाच्या राशी घेऊन ये’ असं नवीन वर्षाला सांगायचं"... वा काकू, काय टायमिंग साधलंय...!!!
नववर्ष साजरे झाले आणि तो पण एका एकांत जागी, बेलाग कड्यावरुन वर गेल्यावर. सह्याद्रीच्या कुशीतल्या गडावरुन. आम्हां भटक्यांना यापेक्षा वेगळ्या न्यू इयर पार्टीचे काय अप्रूप असणार? अशी झिंग आणि नशा कुठल्या न्यू इयर पार्टीत कितीही पैसे फेकले तरी मिळेल काय? सगळी गात्रं उल्हसित झाली. नववर्षाची सुरुवात छान झाली. वर्षभरासाठी भर्राट रानवारा कानांत साठवून घेतला. आता आम्ही वर्षभर उधळूच कानांत वारा भरलेल्या वासरासारखे...
[पण एक झाले राव, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ’शंभो’ला दांडी. अरे बापरे... वर्ष असेच जाते की काय? डिओचा खप वाढणार यंदा बहुतेक :-) ]

Fact file:Name: Ghan-gad/Dhan-gadBase village: Ekole-Bhambarde, Tal- Mulashi-Maval Dist-Pune (actual fort is in Raigad district).Route: Pune-Pirangut-Mulashi-Tamhini-Pimpri-Bhambarde-Ekole OR Pune-Lonavala-INS Shivaji-Ambavane-Bhambarde-Ekole.Distance: around 100km from Pune.Tips: Avoid rainy season because of slippery rock patch. September to April.Stay: Not required. But can be done in Garjai temple on the way or in Ekole village. Caves not suitable coz of uneven flooring.
नववर्ष साजरे झाले आणि तो पण एका एकांत जागी, बेलाग कड्यावरुन वर गेल्यावर. सह्याद्रीच्या कुशीतल्या गडावरुन. आम्हां भटक्यांना यापेक्षा वेगळ्या न्यू इयर पार्टीचे काय अप्रूप असणार? अशी झिंग आणि नशा कुठल्या न्यू इयर पार्टीत कितीही पैसे फेकले तरी मिळेल काय? सगळी गात्रं उल्हसित झाली. नववर्षाची सुरुवात छान झाली. वर्षभरासाठी भर्राट रानवारा कानांत साठवून घेतला. आता आम्ही वर्षभर उधळूच कानांत वारा भरलेल्या वासरासारखे...
[पण एक झाले राव, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ’शंभो’ला दांडी. अरे बापरे... वर्ष असेच जाते की काय? डिओचा खप वाढणार यंदा बहुतेक :-) ]
आणखी काही ट्रेक्स:
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक
रायरेश्वराचे पठार आणि केंजळगड
ढाकोबाचा थ्रिलर
कळसूबाईचा नादखुळा ट्रेक
सही रे! सुरुवात झाली म्हणायची! काही म्हण, नविन वर्षाचं सर्वात चांगलं स्वागत तुम्ही लोकांनी केलं! घनगड, आमची आठवण टेरीबल होती!
ReplyDeleteवर्णन लय भारी. फोटो देखील मस्त. नविन वर्षाची सुरूवात एकदम झकास.
ReplyDeleteतुला नुतन वर्षाच्या शुभेच्छा. यंदा दोनाचे चार करून पुढल्या वर्षी जोड्याने सुर्यनारायणाच्या दर्शनाला जा म्हणजे बाकी लोकांना हालणारे कोंबडी बोकड एन्जॉय करता येतील. SMS मस्तच.
मी पण "प्लॅन के मुताबिक" स्कंधगिरीवरुन सूर्योदय पाहूनच नवं वर्षाची पहाट अनुभवली.
नवर्षाच स्वागत एकदम भन्नाट केलस रे!!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
ReplyDeleteअप्रतिम बेत होता रे... मी नक्की करेन पुढच्या वर्षी...
ReplyDeleteनविन वर्षाच्य शुभेच्छा...
खुप मस्त लिहिलंय, आनंद पण होत होता अन राग पण येत होता, म्हणलं साल्यांनी असं नविन वर्षाचं स्वागत केलं... अन मी तोंड न धुता चहा पिऊन.. ;) मजा करा, फोटो मस्त आलेत...
ReplyDeleteहलणारी कोंबडी आणि बोकड लई भारी रे :-)
ReplyDeleteलई भारी ट्रेक झाला..त्या उंच कातळामागून वरती आलेल्या सूर्याचे दर्शन अविस्मरणीय होते..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
सही रे मस्त लिहलयस, ट्रेक पण झकास होता, प्रवास खूप एन्जॉय केला. आपल्याला काही जमला नाही वर पर्यंत यायला :)
ReplyDeleteपुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा
निळ्या बिछायतीवरुन पिसासारख्या ढगांच्या रजईआडून हलकेच सूर्य बाहेर आला आणि नववर्षाचा पहिला सुर्योदय आम्ही अनुभवला.
ReplyDeleteAflatoon varnan ani Aflatoon plan... Sahi lekaho :)
चला तुमची सुरवात झाली नववर्षामध्ये :)
ReplyDeleteमस्त ट्रेक आणि फोटो
Khupach sundar varnan...navin varshachya hardik shubhechha!!!
ReplyDeleteVachtana Maja ali .. anek da tail bail chi ST pahili hoti .. aaj kalela kuthe ahe ;)
ReplyDeleteNavin varsha suru zalech have tase :)
Are vaibhav fakt halnari kombdi n bokad baghun n navin eakdae Gadget baghitle ki pan pisalto.. gadyla lay nad aahe aslya ghosti cha :)
ReplyDeleteसही रे ... वर्षाची सुरवात तर फक्कड़ झाली एकदम ... तैलबैला - घनगड़ मला सुद्धा बरीच वर्ष झाली करायचा आहे... तुझी लेखनशैली मस्तच आहे आणि 'फोटोगिरी'बद्दल बोलायला नकोच ... :)
ReplyDeletetruly gr8 start of the year!!! blog is really good...and photos absolute fantastic..
ReplyDelete