पक्षाच्या पलीकडले राजकारणी
By
Unknown
/ in
beyond politics
Blog
परवाच निवडणुका झाल्या. सामान्य लोकांची प्रतिक्रिया होती... ते काय... सगळे राजकारणी सारखेच... असो. मी पण राजकारणापासून चार हात दूरच राहतो. पण मतदान मात्र डोळे उघडे ठेवूनच करतो. पण याच राजकाणातली काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत की मला कायमच भावली आहेत. अशाच काही पक्षाच्या पलीकडल्या व्यक्तिमत्त्वांसाठी ही पोस्ट.
राजीव गांधी:
अतिशय उमदे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व. पाहताच क्षणी वेड लागावे असे रुपडे. जेट पायलट असणारा हा तरुण मातृशोकानंतर देशाच्या हाकेला प्रतिसाद देऊन राजकारणात उतरला. माहिती आणि दूरसंचार क्रांतीचे जनक, तरुण भारताचा चेहरा उपग्रह या आणि अशा अनेक उपाधी यशस्वीरीत्या मिरवणारा आणि तेवढेच
यशस्वीपणे काम करणार नेता. इंदिराजींच्यानंतर पंजाबात फोफावलेल्या खलिस्तानवादी फुटीर चळवळीचा ज्युलिओ रिबेरोंच्या साथीने यशस्वीपणे बीमोड केला. उद्योगजगतातीम ’परमिट राज’ आणि बाबूगिरीचे वर्चस्व संपवून आधुनिक भारताची मुहुर्तमेढ राजीवजींनीच रोवली. भारतीय दूरसंचार, अणूकार्यक्रम त्यांच्याच कारकिर्दीत भराला आले. भारताला एक होऊ घातलेला महासत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. विजय भटकर, सॅम पित्रोडा असे हिरे शोधून त्यांच्या मदतीने भारताला एक नवा दृष्टिकोन मिळवून दिला. एक नवे स्वप्न दिले. आज आपण जे मोबाईल वापरतो ते त्याचेच फलित आहे. संगणक, दूरसंचार, खुली अर्थव्यवस्था, उच्चशिक्षणाच्या सुविधा ही आधुनिक भारताला राजीवजींमुळे दिसलेली स्वप्नं आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक यशस्वी मुत्सद्दी म्हणून त्यांना जग ओळखते. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांबरोबर तांत्रिक आणि आणि आर्थिक सहयोगातून त्यांनी एक उद्याचा भारत घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भारत एक महासता होण्याच्या पात्रतेचा आहे हा विश्वास त्यांनीच आपल्यात जागवला आणि त्या दिशेने पावलेही टाकायला शिकवले.
शरद पवार:
महाराष्ट्राचा खरा जनमान्य लोकनेता. जबर अभ्यास, विविध विषयांवर वाचन, सलग १८-१८ तास काम करण्याची क्षमता, गावागावातल्या काऱ्यकर्त्यांना नावानिशी ओळखणार नेता अही त्यांची ओळख. अगदी हेलिकॉप्टरने जाताना सुद्धा खाली दिसणाऱ्या गावात कुठला कार्यकर्ता राहतो, काय काम करतो, त्याच्या घरी कोणकोण असते, त्याचा किती ’वट’ आहे सगळी माहिती ’साहेबां’ना पाठ. तेवढीच जवळिकीने प्रत्येकाची विचारपूसपण करणार. शेतकरी कुटुंबातून येऊन विक्रमी वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते याच
कार्यक्षमतेवर. वस्तुनिष्ठ विकासाचे ’बारामती मॉडेल’ जगात प्रसिद्ध झाले ते शरद पवारांमुळेच. कॉंग्रेस, जनता पार्टी, पुलोद, पुन्हा कॉंग्रेस आणि आत सवतासुभा राष्ट्रवादी कॉंग्रेस असा भक्कम अनुभव गाठीशी असणारा नेता एके काळी पंतप्रधानपदाचा प्रबल दावेदार होता. पण उत्तर भारतीय नेत्यांच्या राजकारणामुळे ती संधी निसटली. मुख्यमंत्रीपदाचा सर्वात कठीण काळ होता तो मुंबई बॉंबस्फोटांचा. पण एवढा हादरा बसून, शेअर बाजारात स्फोट होऊनही पुढच्या दोनचार दिवसांत बाजाराच्या दारात स्वतः उभे राहून बाजार उघडणारा मुख्यमंत्री जगाने पाहिला. सर्व पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारा, कट्टर विरोधी पक्ष असूनही शिवसेनेच्या बाळासाहेबांना मित्र म्हणणारा हा नेता विरळाच.
प्रमोद महाजन:
शिक्षकाच्या पित्याच्या पोटी जन्माला आलेले हे भाग्यरत्न. जाणता नाट्यप्रेमी ही अजून एक ओळख. स्वत: इंग्रजीचे प्राध्यापक होते. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेला. संघाचा कट्टर कार्यकर्ता. याचबरोबर प्रमोदजी लॅपटॉप आणि मोबाईल वापरनारे एक 'टेक्नो सॅव्ही' नेते म्हणून पण प्रसिद्ध होते. राजीवजींनी रचलेल्या दूरसंचार क्रांतीच्या पायावर कुणी कळस चढवला असेल तर तो प्रमोद महाजनांनीच. आजची
भारताची जी सॉफ्टवेअरमधली झेप आहे त्याची ऊर्जा प्रमोदजी माहिती तंत्रज्ञान मंत्री असतानाच मिळाली होती. स्वस्त मोबाईल दरयुद्ध सुरु करुन सामान्य नागरिकांचा फायदा करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक अतिकुशल वक्ता. मी त्यांची भाषणं कित्येक तास ऐकत बसायचो, कारण उद्याच्या भारताचे चित्र त्यात रंगवलेले असायचे. भारताचा पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचा हा एक मराठी माणूस. स्वच्छ हिंदी, मराठी आणि तितकेच अस्खलित इंग्लिश वाणी घेऊन साक्षात सरस्वतीच त्या मुखात नांदत होती. महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे शिल्पकार म्हणून त्यांचा आब होता. चर्चेला बाळासाहेबांबरोबर बसले की युती तुतनार नाही याचीच खात्री असायची. युद्धनौका बुडेपर्यंत पराभव स्वीकारायचा नसतो हे त्यांचे लोकसभा निवडणूक गमावल्यानंतरचे उद़्गार साक्षात मृत्युशी तेरा दिवस झुंज देऊन खरे करुन दाखवले.
मनमोहन सिंग:
भारताचे सध्याचे पंतप्रधान. जगातील सर्वांत उच्चविद्याविभूषित पंतप्रधान. काळे किंवा ग्रे कलरचे जाकीट आणि निळी पगडी हीच ओळख. जन्मतःच कष्टपूर्वक हुशारीमुळे उच्च शैक्षणिक पात्रता धारण करुन, विविध विद्यापीठांची राजमान्यता मिळवून रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि नरसिंह रावांच्या पंतप्रधान काळात अर्थमंत्रीपद. अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत १९९१ मध्ये भारताला आर्थिक मंदीच्या
खाईतून वर काढून विकासाचा ८-९% जादुई दर गाठून दिला. यांच्याच साथीने नरसिंह रावांनी खुली अर्थव्यवस्था अंगीकारली. उद्योगांसाठी लायसन्स राज संपवून विदेशी भागीदाराची बीजे तेव्हाच रोवली गेली होती. आजची सुदृढ अर्थव्यवस्था हे त्याचेच फलित आहे. आजच्या त्यांचा पंतप्रधान कारकिर्दीतही त्यांची विदेश नीती, आर्थिक नीती झळाळून उठली आहे. अमेरिकेबरोबरचा अणुकरार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, रशियाबरोबरचे पूर्वापार संबंध, चीनबरोबर सामरिक भागीदारी अशी अनेक त्यांच्या यशस्वी विदेश नीतीची उदाहरणे आहेत.
खरंच जोपर्यंत अशे व्यक्तिमत्त्व राजकारनाच्या पटलावर चमकत राह्तील आपल्या राष्ट्राचे भवितव्या उज्ज्वल आहे याबद्दल तिळमात्र शंका नाही. कधीकधी राजीव-प्रमोदजींची उणीव जरूर जाणवते. आज ते असते तर भारत एक सुपरपॉवर असता का? पण असो... जोपर्यंत पवार आणि मनमोहन यांच्यासारखी माणसे राज्यशकट हाकत आहेत उत्तरोत्तर प्रगती होतच राहणार. अशी खूप मणसे आमच्या राष्ट्राला लाभोत.
जय हिंद!!!
आणखी काही करंट अफेअर्स:
सगळेच काळजीवाहू.
२६/११च्या वीरांना सॅल्युट...!!!

विचारपुर्वक लेख! या राजकारण्यांचा आदर वाटतो!
ReplyDeleteनोटः कदाचित संजय गांधी असते तरीही परिस्थितीत बदल जाणवला असता.
सहमत आहे भुंगा शी.. संजय गांधी हा माझा पण आवडता नेता आहे. शरद पवारांच्या बाबतित मत वेगळी आहेत माझी..:)
ReplyDeleteभुंगा, संजय गांधींबद्दलही बरेच लिहू शकतो. तो एक प्रस्थापितांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा नेता होता. प्रतिक्रियेबद्द्ल आभार.
ReplyDeleteमहेंद्रजी, प्रत्येकाची मतं वेगळी असु शकतात. या पोस्टमध्ये या लोकांचे मला भावणारे सद़्गुण शब्दबद्ध केले आहेत. याचा अर्थ असा नाही की तेवढेच ’गुण’ आहेत. अशी "Listed as, but not limited to" साईडनोट मनातल्या मनात वाचणे :-)
चांगला लेख! पण
ReplyDeleteशरद पवारांच्या बाबतित मत वेगळी आहेत माझी..:)
स्वप्निल
(Y)
ReplyDelete