Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

भटकंती-२००९: मागे वळून पाहताना...

By Unknown
/ in Bhatkanti Unlimited Blog epilogue 2009
15 comments
हा हा म्हणता २००९ सरले. कित्येक बऱ्या वाईट गोष्टी घडल्या. काही तर अशा की जन्मभर लक्षात राह्तील अशा. कित्येक नवीन अनुभव, नवीन ट्रेक, नवीन फोटोशूट्स, बाईक सफरी, काही तरी शिकवणारे अनुभव (काही तर कायमचा धडा देणारे पण).


या वर्षी सुरुवातीलाच ठरवले होते की एवढा महागडा कॅमेरा अपग्रेड आहे तर किमान पातळीवर तरी फोटोग्राफीचा दर्जा उंचावला पाहिजे. थर्टी फस्सची रात्र जागवून न्यू इयर सेलिब्रेट करणारातला मी नाही. उलट त्या दिवशी वेळेवर झोपून नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यात काही औरच मजा आहे. हा शिरस्ता गेली काही वर्षं मी पालतोय. बरेच वेळा ट्रेकची आखणीच १ जानेवारीला धरुन झाली होती. पण यंदा घरीच होतो. १ जानेवारीला काही मित्रांबरोबरची संध्याकाळची कॉफी तेवढी झाली. पण त्याने काही भटकंतीचा माज (आणि खाज) काही जात नाही. म्हणून मग ३ जानेवारीला सौमित्रबरोबर एक मस्त बाईक ट्रेल टाकला.




पुणे-मुळशी-सहारा सिटी-लोणावळा-भाजे लेणी असा कार्यक्रम घेतला. कडाक्याच्या थंडीत, प्रसंगी गाडीच्या सायलेन्सरवर हात शेकत सूर्योदयाच्या आधी बाईक चालवण्यातले थ्रिल अनुभवले. तेव्हाच माझी एक लेन्स लेण्यांतल्या जमिनीवर आदळून जवळ-जवळ माझे प्राण कंठाशी आणून राहिली.  हा जवळपास २००किमीचा ट्रेल सौमित्रासाठी पण थ्रिलिंग अनुभव होता. लोणावळ्यातून निघून पाऊण तासात पुणे गाठले होते त्या वेळी (त्यानंतर तो पुन्हा माझ्याबरोबर बाईकवर ट्रेलला आला नाही ही गोष्ट वेगळी).




जानेवारीमध्येच काही पक्षी निरीक्षणास्तव पानशेत आणि सिंहगड व्हॅलीला काही ट्रिप झाल्या. मग अनपेक्षितपणे दक्षिण गोव्याची ट्रिप ठरली. आधी गोव्याला कित्येकदा गेलेलो असलो तरी ही ट्रिप म्हणजे खऱ्याखुऱ्या पोर्तुगीज दक्षिण गोव्याची सफर होती. तीन दिवस निवांत आणि अगदी "आऊट ऑफ दि बॉक्स" ठिकाणांची भटकंती झाली. तिकडेच खेकड्याचे किंवा देवमाशाचे आंबटतिख, कालामारी आणी होममेड व्हिनेगार टाकून केलेला माशांचा रेषाद मसाला या स्वर्गीय पाककृतींचा शोध लागला.





खरा आणि authentic गोवा कशाला म्हणतात ते या ट्रिपमध्येच समजले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपला हॅप्पी बड्डे असतो (तुमच्या शाळेत खाऊ त्याचाच मिळत होता). त्त्यानंतरच्या वीकेंडला पुन्हा मुळशीमध्ये एक ट्रिप मारली (कुठेच जात नाही तेव्हा मला घरचे मुळशीमध्ये शोधायला येतात, तिकडेच पडीक असतो).

फेब्रुवारी महिन्यात महाबळेश्वरची पण एक वारी घडली. नाही म्हणायला पुणे जिल्ह्यात देवघर धरण परिसरात गेलो होतो. त्याला निमित्त होते माझी नवीन लेन्स. नुकतीच घेतलेली Canon 10-22mm घेऊन देवघरला काही फोटो काढले होते. लेन्स अगदीच सॉल्लीड आहे ही. मी स्वतःच मला दिलेले हे वाढदिवसाचे गिफ्ट बरं का!!



आता वेध लागले होते स्टारट्रेलचा फोटो घेण्याचे. बरीच खटपट करुन शटर रिलीज केबल मिळवली आणि फोटोसाठी इंटरेस्टिंग जागेचा शोध सुरु केला. रायगड सोडून दुसरे ठिकाण असणे शक्यच नव्हते. मग काय केले कूच. तिथे टकमक टोकावर घालवलेली रात्र, ऐकलेली आरडी, आशा, गुलजारची गाणी, सुखद गारठा... अहाहा.. स्वर्ग काय यापेक्षा वेगळा असतो का? आणि असला तरी पाहिजे कुणाला तो?




एव्हाना जोरदार ब्लॉगिंग चालू झाले होते. आणि फोटोगिरी पण. भुलेश्वरला जाऊन दोन वेळा तो शिल्प-खजिना पाहून आलो. सुट्ट्या शिल्लक होत्या म्हणून बंगळूर, मैसूर, उटीला चक्क एकटाच जाऊन आलो. एप्रिल हा सातारा जिल्ह्यासाठी राखीव होता बहुधा. वाई-मेणवलीला फोटोग्राफर्स‌@पुणेचा शूट झाला आणि लाईट चांगला मिळाला नाही म्हणून मी परत काही मित्रांना घेऊन दुसऱ्या दिवशी परत गेलो.मेच्या उन्हाळ्यात विशेष
भटकंती झाली नाही. पण हरिश्चंद्रगडाची खूप दिवस रखडलेली वारी मात्र घडली. सकाळी लवकर उठून कवडी, खराडी-मुंढवा पूल, EON IT Park, वीर धरण असे काही शूट मात्र चालूच होते. जूनच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पानशेत आणि दुसऱ्या दिवशी दिवेआगार अशी छान ट्रिप झाली. पावसाळ्याच्या आधी जूनमध्ये मच्छीमार बांधव बोटी समुद्रातून बाहेर काढून किनाऱ्यावर लावून ठेवतात. त्याचे काही भरडखोलच्या किनाऱ्यावर सुंदर फोटो मिळाले.

जुलैला मात्र ट्रेक सीझन फुल फॉर्मात आणायचे नक्की केले होते. सुरुवात झाली खंडाळा-लोणावळा-मुळशी अशा एका लॉंग ड्राईव्हने. सगळीकडे हिरवी वनराई, दाट धुके आणि असंख्य धबधब्यांच्या साक्षीने झालेला तो ड्राईव्ह स्वर्गाची अनुभूती देणारा ठरला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ट्रेकचा फील येण्यासाठी सिंहगड, राजगड, तोरणा अशी एक दुर्ग-दूर-दर्शन भ्रमंती झाली.

मग काय जी काही गाडी सुटली आमची.. मग मिळतील ते सवंगडी घेऊन जुलै-ऑगस्टमध्ये पुरंदर-वज्रगड, तुंग, दाऱ्या घाट आणि बाळूगड, ढाकोबा आणि दुर्ग किल्ला असे एकेक किल्ले सर करत गेलो. पण दोन ट्रेकचे



नेहमी स्वप्न पाहिले होते मी.. ते म्हणजे महाराष्ट्रातले अत्युच्च शिखर कळसूबाई आणि राजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर. अशाच एका मस्तीत कळसूबाईचा नादखुळा ट्रेक झाला आणि पाठोपाठ रायरेश्वर-केंजळगड पण. दरम्यान ऑफिसमधली एक जवळची मैत्रीण resign करुन मुंबईला गेली, तेव्हा फार रिकामे-रिकामे वाटले होते. नंतर समजले की तेव्हाची ब्लॉगपोस्ट "आजूबाजूच्या रित्या खुर्च्या" वाचून तिच्या नवऱ्यालाही वाटले की उगाच आपण तिला मुंबईला शिफ्ट केले. तिनेही ती पोस्ट कौतुकाने घरच्या सगळ्यांना प्रिंट काढून दाखवली (माझी इंटरनेटच्या बाहेर गेलेली ती एकमेव पोस्ट असावी बहुधा).

सप्टेंबर उजाडला तोच काही विचित्र भटकंतीच्या आयडिया घेऊन. एका बाजूला फोटोग्राफर्स@पुणेच्या प्रदर्शनाची तयारी जोरात सुरु केली होती. एकदा मुळशीला फक्त धबधबे आणि वाहत्या पाण्याचे फोटो काढून आलो. पुन्हा एकदा पाबे घाटात जाऊन भटकून आलो. पण एक जबरी ट्रेक हवा होता. तो कंड शमवला पदरगडावर. तब्बल अकरा तासांचा तो भैसटलेला ट्रेक म्हणजे मी केलेला आजवरचा जरा ’स्पेशल’च होता.




सप्टेंबरच्या शेवटी वेध लागले ते किनारपट्टीच्या बाईक सफरीचे. मग पुढाकार घेऊन जोरदार प्लॅन आखणी करुन १४ जणांच्या साथीने एकूण ११५०किमीचा अविस्मरणीय "Coastal Prowl" मारला. त्याच ट्रिपमध्ये माझे किल्ल्यांचे अर्धशतक पूर्ण झाले. एकट्या ऑक्टोबरमध्ये मुळशी-ताम्हिणीत लपलेल्या स्वर्गीय तलावाकडे चार ट्रिपा झाल्या. अशी सुंदर जागा सगळ्या जगात कुठे सापडली नव्हती मला.

दरम्यान फोटोग्राफर्स@पुणेच्या प्रदर्शनाला जोरदार प्रतिसाद मिळाला.  तीनही दिवस पुणेकरांनी फोटोग्राफ्सना भरभरुन दाद दिली. आणि आम्ही केलेल्या कामाचे चीज झालेले पाहून एक वेगळे समाधान पण मिळाले.

असेच काही फोटो शूट्स होत राहिले आणि डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा कोकण वारी घडली. यावेळी मात्र अतिशय

वेगळी. एकदम निवांत, कुठेच कसली घाई नाही, चार दिवसांत फक्त वेंगुर्ला आणि आसपासचे काही बीच आणि कोकणी लोकजीवन अनुभवले. आजवर कधीच न पाहिलेला कोकण अनुभवता आला. माडबन आणि निळ्या समुद्राची गाज सर्वांगात साठवून घेतले. एक नवी ऊर्जा मिळाली अशीच भटकंती पुढील वर्षीही करायला.

सरते वर्ष माझ्यासाठी खूप काही देणारे ठरले. मी उत्साहाने ब्लॉगिंग करायला लागलो. खूप भटकंती घडली. आयुष्यात बरेच काही शिकवणारे प्रसंग घडले. किल्ल्यांचे अर्धशतक पूर्ण झाले. काही जबाबदाऱ्या पार पाडण्याची स्वप्नं पाहिली होती. ती आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. खूप काही शिकायला मिळाले. नवीन मित्र लाभले. जुन्यांचे प्रेम वृद्धिंगत झाले. एकंदरीत मी सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देतो आहे.

सगळी नावं इथे लिहिणे अवघड आहे. म्हणूनच २००९ मध्ये माझ्या सुख-दु:खात साथ देणाऱ्या, फोटोशूट्स आणि ट्रिप्समध्ये बरोबर असणाऱ्या, नियमितपणे भेट देऊन ब्लॉग वाचणाऱ्या, स्तुती (आणि निंदाही) करणाऱ्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...!!!



हेही वाचा:
Epilogue-2008

Related Posts

15 comments:

  1. Anand29 December 2009 at 10:47

    खुपंच सुरेख वर्ष गेलं यार(चालेल?) तुझं...
    नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा... फोटोगिरी अप्रतीम आहे...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. भुंगा29 December 2009 at 11:16

    पुर्ण वर्षाचे सार एकाच पोस्टात टाकलेस.. एकंदरीत तुझ्या वर्षभराचा आराखडा मिळाला.
    फोटो सॉलिड आहेत'च!

    नविन वर्ष याहीपेक्षा सुखात जावो .. अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. विक्रम एक शांत वादळ29 December 2009 at 20:28

    पक्का भटक्या आहेस बाबा
    एवढ भटकन एका वर्षात मलातरी कदापि शक्य होणार नाही

    फोटोबद्दल तर बोलायलाच नको मस्तच असतात ते
    यावर्षीप्रमाणे पुढील वर्षीही भटकत रहा याच शुभेच्छा :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Tushar Phatak29 December 2009 at 21:11

    Keep it up . . . Bhau . . . Tusssi Gr8 Ho

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. अनिकेत29 December 2009 at 22:37

    मस्त रे. तुझे फोटो बघुन प्रेरणा घ्यावी का स्वतःचा जळफळाट करुन घ्यावा हेच कळत नाही. फ़्लिकर बघुन आनंदही मिळतो आणि चिडचिडही होते.

    बर तुझे फोटो कुठले परदेश्यातले असते तर म्हणले असते त्यात काय एवढं माझे पण अस्सेच येतील तिथलं सगळचं छान असतं. पण नाही नं. तु म्हणजे आपले मुळशी बाजुचे फोटो काढतोस जिथे हजार वेळा जाऊन पण असे फोटो आणि अशी ठिकाणं आम्हाला सापडली नाहीत :-(

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. सिद्धार्थ29 December 2009 at 23:15

    खूप सही. यंदा मी देखील ३१ डिसेंबरच्या रात्री ट्रेकला जातोय. रात्री ४ तासाचा ट्रेक करून पहाटे स्कंधगिरी वरुन नवीन वर्षाच्या उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायचा प्लान आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. GanesH30 December 2009 at 00:53

    Pankaj,
    2009 khoop ch chan enjoy kelele aahes...
    tuzi photography tar uttam aahech pan lihatohi khoop chan..
    Asech chan..chan photo kadat n lihit ja..
    navin varshyacha khoop khoop shubheccha

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. कांचन कराई30 December 2009 at 05:40

    तुला फोटो काढण्याची उत्तम दृष्टी लाभली आहे. असेच सुंदर फोटो काढून आम्हाला त्या दृश्याचं अंतरंग दाखवत रहा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. विशाल तेलंग्रे30 December 2009 at 10:08

    मी खुप मोठी कमेण्ट लिहीली होती, पण हे पेज(कमेण्टसाठी नविन उघडते ते, पॉप-अप असेल कदाचित, कारण मी फ्लॉक युज करत होतो, अन मला त्याची सवय नाही, त्याने लिहित असतांना मध्येच ब्लॉगरच्या होमपेजला रिडायरेक्ट केले...)असो, मी काय लिहित होतो, मला कळत नव्हतं, कमेण्ट नुसती वाढली होती बिनकामाची... बापरे ही बी वाढत चाल्ली वाट्टं... पंक्या, तुला नवं वर्ष यावर्षापेक्षाही मजेत जावो अन तुझ्या अजुन अश्या रम्य ट्रेकांद्वारे आम्हाला असं स्वर्गात असल्यासारखं नयनसुख पुढल्या वर्षीही मिळो, ही सदिच्छा... एनि वे, यु आर रिएली अ व्हेरी व्हेरी ग्रेट फोटोग्राफर व्हू जस्ट शुट ओन्लि सच अ मुमेन्ट्स व्हिच नेव्हर विल हॅपेन अगेन... ;)

    - विशल्या!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. sarika30 December 2009 at 20:28

    Some of your photographs
    are awesome!!
    Have a great year ahed...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Ram30 December 2009 at 21:47

    Good one :).

    Wish you a very successful new year.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Amit30 December 2009 at 22:49

    Mitra... Time for Drushtikon 2010 is closing ... :D

    Exciting year hota ha! I am sure you enjoyed every moment of the trips. (Mulshi_isnt_a_trip) :)

    Happy 2010!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. Devendra Shridhar30 December 2009 at 22:54

    whaa pabkya
    kaay baat hai
    masta blog
    here is wishing u happy new year

    masta ahe blog post

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. Pankaj - भटकंती Unlimited30 December 2009 at 22:57

    धन्यवाद आनंद, भुंगा, विक्रम, तुषार, अनिकेत (चिडचिड करु नकोस, तुझे पण ओजसचे फोटो भारी आहेत), सिद्धार्थ,गणेश, कांचन , विशल्या, सारिका, राम.

    Thanks Amit.
    Yup Mulashi isn't a trip. We just start to stroll from homes in the morning and after few kms of drive we land up there.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. रोहन चौधरी ...5 January 2010 at 17:49

    सोलिड भटकंती ... सोलिड फोटोगिरी आणि त्यावरील सोलिड लिखाण ... असे तुझे सोलिड २००९ होते. मज्जा आणलीस मित्रा... २०१० मध्ये असाच लिहिता हो ... :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1