दृष्टिकोन २००९: दुसरा आणि तिसरा दिवस
दृष्टिकोन २००९’चा दुसरा दिवस सुरु झाला तोच मुळी धुवांधार पावसाने. त्यामुळे थोडी निराशा येऊ लागली होती. पण लवकरच आकाश मोकळे झाले आणि मी हॉलकडे कूच केले. आजचा दिवस फार वेगळा होता. बऱ्याच वर्तमानपत्रांनी प्रदर्शनाच्या बातम्या झळकावल्या होत्या. त्यामुळे आज उत्साह वाढला होता. आजवरच्या फोटोग्राफर्स॒पुणेच्या एकाही प्रदर्शनात झाले नाही अशी गोष्ट म्हणजे अनेक वर्कशॉप्स अरेंज केले होते. फोटोएडिटिंग सॉफ्टवेअर्स, टूल्स यावर ऋषी आणि सुहासने प्रकाश टाकला. दुपारी मस्तपैकी बिर्याणी चापली. आणि नंतर खूपच सुस्तावलो. दुपारी विशालचे वाइल्डलाईफ फोटोग्राफीचे एक आणि संध्याकाळी अन्वयचे मॅक्रो फोटोग्राफीचे इंटरेस्टिंग सेशन झाले. पब्लिक जाम खुश. शनिवारचे संध्याकाळ असल्यामुळे बरीच गर्दी झाली होती. एकेक फोटो विकत घेण्यासाठीही चौकशी केली जात होती. आज एक गमतीशीर गोष्ट घडली ती म्हणजे, आमचा मंगेश आज येणार होता. मी आणि सुहास त्याच्याशी अनेकदा ऑनलाईन बोललो असलो तरी प्रत्यक्ष कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे तो आला आणि आमच्या समोरुन चार वेळा गेला तरी आम्हांला समजले नाही. मी त्याला फोन केला तेव्हा मला समजले हा शेजारी बाहेर उभा असलेलाच मंगू आहे. म्हणजे आमचा विश्वासच बसत नव्हता की मंगेश एवढासा आहे (तसा मीही काही फार मोठा नाही). सुहासची हाय-हॅलो सोडून पहिली प्रतिक्रिया होती ’इइइइइ.... तु मंगेश आहेस? मग तु L साइजचा टीशर्ट का घेतलास?’
त्या रात्री पुन्हा एकदा भूषण नामक जादूची बैठक झाली.
तिसऱ्या दिवशी पाऊस उघडला होता. स्वच्छ वातावरण होते. सकाळे हॉलच्या वरच्या मजल्यावर कुठल्यातरी नेटवर्क मार्केटिंगवाल्या कंपनीचे (बकरे कापण्याचे) सेशन होते. दोनेकशे सुटाबुटात लोक हलाल व्हायला आलेले दिसत होते. आजचा दिवस मंगूच्या ऍडव्हान्स्ड फोटोशॉपच्या वर्क्शॉपने गाजवला. नंतर सुनील कपाडियांचे प्रिंटिंगवर सेशन झाले. हॉलमध्ये बऱ्याच मेंबर्सनी गर्दी केली होती. त्यामुळे एक आगळे संमेलन भरले होते. कौशल्याची देवाणघेवाण होत होती. विविध अनुभव आणि तंत्रे शेअर केली गेली. अखेर आमच्या प्रदर्शनाचा हेतू हाच तर असतो. संध्याकाळी पुन्हा पाऊसधारा बरसल्या. तशातच आम्ही बाहेर जाऊन चहा मारून (होय, मारूनच, पिऊन नाही) आलो. पाऊस असूनही अनपेक्षितपणे गर्दी वाढली होती. एकेका फोटोवर 'SOLD' चे टॅग लागत होते. आअठ वाजले तसे आम्हाला आवरा-आवरीचे वेध लागले. मनात नव्हते पण आवरावे तर लागणार होतेच.
रात्री ज्याच्यात्याच्या फ्रेम्स दिल्या. जे निष्कालजी मेंबर्स आले नव्हते, त्यांच्या फ्रेम्स आमच्यापैकीच काही लोकांच्या घरी ठेवल्या. ग्रुप फोटो झाला. भूषणने मैफिल जमवली.
मैं कोई ऐसा गीत गाऊ...
रात कली एक खाब में आयी...
शारद सुंदर चंदेरी राती...
अजीब दास्तान है ये...
खूप गाणी ऐकली. तरी मन भरत नव्हते.
मे महिन्यापासून पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले होते. आता जाग आली होती. ऑफिसातून धावपळ करत मीटला पोहोचणे, मग कॉफीचे घुटके घेत चर्चा झडणे, शनिवारी सकाळी ’वैशाली’ मध्ये वडा सांबार आणि डोसा हादडणे, बजेट तयार करणे, शेड्युल फिक्स करणे, रोज मेलबॉक्स एक्झिबिशन इमेल्सने फुल असणे, मग रात्री जागून केलेल्या चर्चा, चॅटवर होअणारे डिस्कशन, भटकंतीला ब्रेक देऊन केलेल्या मीट्स, किरणच्या घरी शेवटच्या आठवड्यात केलेल्या प्रिंट्स, फ्रेमवाल्याच्या मागे केलेली धावपळ, टीशर्टच्या डिझाइनवरुन होणारे मतभेद, व्हेंडर्सचा फॉलोअप घेणे, एकमेकांवर केले जाणारे जोक्स, एकत्र खाल्लेले पिझ्झा, टपरीवर मारले जाणारे चहा, एकेमेकांना दिली जाणारी टोपणनावे (पप्पा गुप्ते, सुहास तात्या, स्वाती आत्या, हर्क्युलस वैभव, जादूगार भूषण.... यातले उद्यापासून काहीच नसणार का?
खरंच... साथ रहे ना रहे हम... याद आएंगे ये पल...

परत तेच हा दुखी शेवट नको रे कसं तरी होते.. ते तीन दिवस विसरतच नाहीत, दिवसभरात शंभर वेळा फोटो पाहिले पण मन भरत नाहीये..भूषणची गिटार एकतोय आता..ते ३ दिवस परत जगता येतील का?
ReplyDeleteसॉलीड होतं रे. फोटो पाहिल्यानंतर हे वाचल्यामुळे आणखी छान वाटलं वाचताना. तू स्वत: तिथे होतास त्यामुळे सगळं संपल्यानंतरची रिकामेपणाची भावना तुला आली आहे. पण पुन्हा असा आणखी एक सोहळा जगण्यासाठी लाग पुन्हा भटकंतीला आणि बंद कर तुझ्या कॅमे-यात काही बोलके क्षण.
ReplyDelete