दृष्टिकोन २००९: पहिला दिवस.
शेवटी 'दि डे' म्हणतात तो दिवस उगवला. प्रदर्शन उद्यावर आलंय आणि मी ऑफिसमध्ये कीबोर्ड खाजवतोय. तिकडून फोनवर फोन चाललेत. पत्रकार, मिडिया, फोटोग्राफर्स॒@पुणेची कोअर टीम एकेकाचे फोन चालू आहेत. रेडिओ सिटीवर आमच्या जाहिराती सुरु झाल्यात. चैतन्यने हॉलची वाईट स्थिती ऐकवून टेन्शन दिलंय. खरं तर आज माझे पण कामात लक्ष लागत नाहीये. कसे लागणार? गेले ४ महिन्यांपासून सुरु केलेली मेहनत उद्या खरे रंग दाखवणार. गेला आठवडाभर तर रोज गाडी १००किमी धावत होती. सुहास, किरण, मी, स्वाती, सौमित्र, अमित, चैतन्य, ऋषी असे सगळे किरणच्या घरी प्रिंट्स कढत होतो. किरणची बायको राधिका आणि पिटुकला अर्जुन यांनी आम्हांला कसे सहन केले ते त्यांनाच माहीत.
पाणी अगदी नाकातोंडाशी आल्यावर पेपर शोधण्यासाठी केलेली धावपळ आणि कुरियरचे पुण्यातले सुहासने पालथे घातलेले गोडाऊन. अजुनही सगळे आठवतंय. जसा लॉट प्रिंट होतील तसा फ्रेमिंगला टाकतोय. आता सगळ्याचे फळ उद्या दिसू लागणार. ऑफिसमधून कलटी मारुन आठ वाजता मी हॉलवर पोचलो. बरीच मंडळी जमली होती. फ्रेमवाल्याने तीन फ्रेमच घोळ घातलाय. लास्ट मिनिट त्या रि-प्रिंट मारुन उद्या सकाळी लवकर फ्रेम करुन आणायच्या आहेत. भूक लागली होती. ध्रुवने आणलेले वडापावने आधार दिला. अभिरने पण खास क्रीमरोल आणले होते. हॉल स्वच्छ करुन फ्रेम्स टांगायचे काम सुरु केले. रात्री दोन वाजता घरी पोचलो.
सकाळी नवीन फोटोग्राफर्स॒@पुणेचा स्पेशल टीशर्ट घालून हॉलवर पोचलो. सकाळीच कांचन(मोगरा फुलला)चा शुभेच्छा फोन झाला. बरं वाटलं. विद्या महामंडळच्या मूकबधिर मुलांच्या आणि प्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकरांच्या हस्ते उद़घाटन झाले. शब्दांद्वारे व्यक्त करता न येणारा त्या मुलांचा आनंद त्यांच्या डोळ्यांतून आम्हांला जाणवत होता. दुपार कशी झाली ते समजलेही नाही. काही पत्रकार पण येऊन गेले. आता भूक लागली होती तरीही खायला कुणी आणले नव्हते. दरम्यान अजिंक्यने एवढी झाडे आणून लावली की झाडांचेच प्रदर्शन वाटू लागले होते. त्या कुंड्या उचलून जास्तच भूक लागली. साईड बाय साईड आम्ही हॉलमध्ये फोटोची माहिती देणारे कागद लावून घेतले.
संध्याकाळी गर्दी हळूहळू जमू लागली. पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद. रेडिओच्या जाहिरातीचा परिणाम असावा. काही फोटो विकत घेण्यासाठीही प्रेक्षक रस दाखवू लागले. पटकन एक ताजा ताजा फोटो अपलोड केला आणि दिवस संपायची वाट पाहत बसलो. मध्ये मध्ये काही तरी टाईमपास म्हणून चॉकलेटचे हप्ते चालू होते. स्वातीतर जो येईल त्याला चॉकलेट खऊ घालत होती. सुहासचा रेडिओवर लाईव्ह फीड झाला.
एवढा एक्साईट झाला होता की उड्या मारायचाच बाकी होता. जशी जशी वेळ संपत आली तशी आम्हांला घरी जाऊन गादीवर अंग टाकायचे वेध लागले.
ऑन डिमांड भूषणने घरुन गिटार आणले आणि आमच्या दिलाच्या अशा काही तारा छेडल्या की अंगावर रोमांच उभे राहिले. दिवसाचा शेवट कसला सुंदर केला त्याने... अजूनही कानात तो झंकार घुमतोय.
सुरुवात झाली एका इंग्लिश गाण्याने...
भंवरे का गुंजन...
डूबा डूबा रहता हूँ...
कुछ तो लोग कहेंगे...
ओ सनम.. मोहब्बत की कसम...
ये शाम मस्तानी... मदहोश किये जाय...
खरंच ये शाम मस्तानी... मदहोश किये जाय...
ये तो ट्रेलर है मेरे दोस्तों... पिक्चर अभी बाकी है...!!!

सही मित्रा, फार कष्ट घेतलेस तू. आम्हाला तुझे कष्ट Internet Explorer वर पण दिसून आले... :-) सगळं आटोपलं की मस्त "पुरेपूर कोल्हापूर"मध्ये श्रम परिहार करून टाक...
ReplyDeleteअरे वा! मस्तच सुरूवात झालेली दिसतेय. मी मिस केलं खरं पण तू लिही याबद्दल सगळं. वाचून आनंद मिळेल.
ReplyDeleteमस्त रे मस्त एकदम.वाचून मन भरून आलं.!
ReplyDeleteशाब्बास पोरानो आणि पोरीनो!
छान वाटलं वाचुन, पण मला एकही ’ट्रॅक’ ऐकता आला नाही. :(
ReplyDeleteहो, खरंय! ट्रॅक ऐकू येत नाहीयेत.
ReplyDelete