२६/११ च्या वीरांना सॅल्युट...!!!
By
Unknown
आज एक वर्ष झालं...
हिजड्यांनी भ्याड हल्ला केला होता. @#$*मध्ये दम नव्हता म्हणून भर समुद्रात मच्छीमार बोटीचे अपहरण करुन गुपचुप आले आणि तीन दिवस थैमान घातले. मध्यमवर्गीय रेल्वे प्रवासी, महागड्या स्कोडाने फिरणारे श्रीमंत, रेल्वे स्टेशनवर झोपणारे गरीब, गस्तीवरचे पोलीस, अगदी प्रार्थनास्थळे आणि लहानगा ’मोशे’ काहीही मागे पुढे न पाहता अमानुष गोळीबार आणि ग्रेनेडचे हल्ले सुरु केले. एकच लक्ष होते सीएसटीच्या चाकरमान्यापासून ताज-ओबेरॉयमध्ये राहणाऱ्या देशी-परदेशी उच्चभ्रू वर्गापर्यंत दहशत पसरवणे. अगदी गुर्मीत, माज आला होता. नावात पाक असले तरी इरादे किती नापाक? अगदी मुक्काम ठोकण्याच्या तयारीनेच आले होते. पहिला हल्ला झाल्यावर कामा हॉस्पिटलला दाखल झालेले जखमी पण लक्ष केले. किती राक्षसीपणा.
पण आपले ढाणे वाघ होते की. तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे आणि अशोक कामठे यांच्या बरोबरच विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन असे आमचे वाघ चवताळून उठले. हेमंत करकरेंनी बुलेटप्रुफ जॅकेट घालून लढताना, साळसकरांनी आणि कामटेंनी प्राणांचीही पर्वा न करता या कुंडात देहरुपी कुडीची आहुती देताना काय विचार बरे केला असेल? माझ्या आईवर संकट आलंय आणि ते मलाच दूर केले पाहिजे असेच तर वाटले असणार ना?
एनएसजी आणि मार्कोसच्या शौर्याला तर तोड नाही. विश्वास नांगरे पाटलांच्या रुपाने मराठी वाघ काय चीज असते ते साऱ्या जगाने पाहिले. दोन साथीदारांसमोर एकच वाक्य टाकले, "मरायची यापेक्षा चांगली वेळ येणार नाही". त्या शब्दांनी समाधान मोरे आणि अंबादास पवार यांच्यात स्फुल्लिंग चेतले नाही तरच नवल. फक्त हातात एक सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन सगळा ताज पालथा घालताना आणि सैतानाशी मुकाबला करताना आम्ही स्वतः टीव्हीवर पाहिलंय. तुकाराम काकांनी कसाबवर झडप घातली म्हणून तर आज तो कायद्यापुढे फाशीची भीक मागत उभा आहे. जखमी साथीदाराला वाचवण्यासाठी स्वतः सैतानाशी दोन हात करणारा आणि "डू नॉट कम, आय विल हॅंडल देम" असे ठणकावून सांगणारा संदीपही लक्षात सदैव राहिल.
हेमंत करकरे
अशोक कामटे
मेजर संदीप उन्नीकृष्णन
विजय साळसकर
शशांक शिंदे
बापूसाहेब दुरुगडे
प्रकाश मोरे
तुकाराम ऒंबळे
अरुण चित्ते
अंबादास पवार
जयवंत पाटील
योगेश पाटील
विजय खांडेकर
एम. सी. चौधरी
राहुल शिंदे
मुकेश जाधव
या वीरांचा मुंबई आणि महाराष्ट्रच काय पण सगळा देश ऋणी राहील.
आणि हो त्या तिकडच्या जुल्मीस्तानला एकच सांगणे आहे, आमच्याच फेकलेल्या तुकड्यांवर तुमचा देश बनलाय. इकडे आमच्यात कितीही भांडणे असोत, पण जेव्हा आईवर संकट येते ना तेव्हा कुणाच्या बापाला भीत नाही आपण...!!! हिंमत असेल तर समोर येऊन लढून दाखवा.

मित्रा एकदम कडक शब्दात लिहिले आहेस... आपले काही मौल्यवान लोक शहीद झाले ह्याचेच दुखः...अशोक कामटे कोल्हापूरमध्ये असताना पोलीस ग्राउंडवर माझी आणि त्यांची भेट झाली, होती भेट कसली थडक झाली होती ते जोग्गिंग करत होते आणि मी फिल्डिंग..त्यावेळी त्यांनी हसून "Be Careful" म्हंटले होते अजूनही मला त्यांचा हसरा चेहरा आठवतो..विश्वास बसत नाही कि हि माणसे आपल्यात नाहीयेत...
ReplyDeleteपंकज आमच्या सगळ्यांच्या भावनाना तू शब्दरुपाने मांडलेले आहेस.राष्ट्र त्यांच्या शूर मुलांची सतत आठवण ठेवेल ज्यानी आपल्या प्राणाची पर्व न करता आपल्या मातृभूमी साठी आणि आपल्या सर्व भारतवासीयांसाठी बलिदान केले. आपण सर्व भारतीय कायम त्यांचे ऋणी रहु.जय हिंद !!!
ReplyDeleteखुपच ह्रदयस्पर्शी झालाय लेख. वाचतांना अंगावर काटा आला...
ReplyDeleteपरत सगळं चित्र ऊभं राहिलं.... आपल्या वीरांना माझीही श्रद्धांजली ..
ReplyDeleteमस्तंच रे . . . लई भारी . . . पाकिस्तान्यांशी आणि सगळ्या जगाशी लढताना सारा भारत एक आहे, मग आपापसात किती पण भांडणे असली तरी सार्या जगाविरुद्ध भारत एक आहे आणि राहणार.
ReplyDeleteजय हिंद - जय भारत
जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारेअधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!
ReplyDeleteनिशब्दच म्हणता येईल अशी अवस्था... मात्र मनाची सारी आग तुझ्या या पोस्ट मध्ये जाणवली. अगदी मनातलं लिहिलंस दोस्त!
ReplyDeleteएकदम कडक!
ReplyDeleteशहिदाना श्रद्धांजली, शूरांना प्रणाम!
Himmat nahi mhanun tar undir banun lapun vaar kartait....
ReplyDeleteJe shahid jhale te aplyat itke sadharan pane rahat hote ... ki janvat hi nahi ki hi lok ashi daivi shakti gheun hya jagaat ale hote...te gelya varach ti shakti disun yete.
Bhavpurna Shradhaanjali!
जय महाराष्ट्र!
ReplyDeleteब्रिटिश साम्राज्यवादियों ने भारत को कूड़ा घर बनाया। साम्राज्यवादी देशों ने सोमालिया में अपने वहां का कूड़ा डालना शुरू कर दिया जिससे पूरे देश में संक्रामक बीमारियाँ फ़ैल गयीं, जिससे काफ़ी लोग मरे। जैव विविधता भी नष्ट हो गई , पूरे देश में भुखमरी की स्तिथि में आज वहां के लोग समुद्री डाकू बन गए हैं।
ReplyDeleteउसी तरह लन्दन म्यूनिसिपिल कार्पोरेशन का उन्नीस कंटेनर कूड़ा दिल्ली के निकट दादरी में पकड़ा गया है । विकसित देश अपने यहाँ के इलेक्ट्रोनिक कचरे से लेकर अन्य कचरों को भारत में भेजकर इस देश को कूड़ा घर बना देना चाहते हैं और इस देश को सोमालिया जैसा कर देना चाहते हैं।
आज जरूरत इस बात की है कि साम्राज्यवादी शक्तियों का कदम कदम पर अगर मुंहतोड़ जवाब नही दिया जाएगा तो यह लोग अपने शैतानी हरकतों से हमारे देश को बरबाद कर देंगे ।
सुमन
loksangharsha.blogspot.com
आपला देश आणि नागरिकांचं जीवन सुरक्षित रहावं म्हणून आपल्या प्राणांचं ज्यांनी बलिदान केलं त्या सर्व विरांना माझी श्रद्धांजली व सलाम!
ReplyDeleteतुझ्या हृदयातील धगधग जाणवली मित्रा. हीच आग प्रत्येक भारतीयाच्या मनात धगधगत आहे. त्या हरामखोरांमधे हिम्मत असती तर समोर येऊन लढले असते. असे देवाच्या नावावर पोसलेले बळीचे बकरे पाठवले नसते. आजही त्यांच्यात हिम्मत असेल, तर या म्हणावं. इथल्या प्रत्येक भारतीयात तुम्हाला सैनिक दिसेल. याल पण परत जाणार नाही.
जय हिंद!