Coastal Prowl-Preview
परवाच कोकणात बाईक ट्रिप (Coastal Prowl) मारून आलो. सविस्तर ब्लॉग पोस्ट लिहायला वेळ लागणार आहे. पण लोकांची उत्सुकता मला सारखी पिंग करतेय... म्हणून ही एक फोटो लिंक्स असलेली पोस्ट टाकतोय.
ट्रिपचे काही ठळक मुद्दे:
एकानेही हेल्मेटचा नियम मोडला नाही. १४ लोक आणि १४ हेल्मेट्स होते.
कोकणात खूप पाऊस पडतो हे लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते. या चार दिवसात तो पाऊस प्रत्यक्ष जगलो.
फोंडा घाट उतरून कोकणात प्रवेश करताच तुफानी पावसाने आमचे स्वागत केले "येवा, कोकण आपलाच असा...!!!"
त्यामुळे आमचे फोनचे बिल वाढले. घरी सारखे अपडेट्स द्यावे लागत होते.
कोकणातले रस्ते खरंच फार भारी आहेत. फार कमी वेळा स्पीड ६० च्या खाली आणावा लागला. कॉंप्युटरवर गेम खेळल्यासारखे वाटत होते.
ट्रिपमध्ये कायम एक बकरा बरोबर असावा. आणि वेळोवेळी त्याची ’मारता’ येते. आमच्या बकऱ्याचे नाव नंतर तुम्हीच ओळखा, सगळ्या पोस्ट्स वाचून झाल्या की.
आमच्या बाईक्सनी कधीच जास्त त्रास दिला नाही. फक्त एक वेळा पंक्चर म्हणजे अगदी नगण्य.
माझ्या बाईकचे घरापासून घरापर्यंत रनिंग ८८८ किमी. प्लस त्यात पुणे-कोल्हापूरचे बसने केलेले २५० किमी असे साधारण साडेअकराशे किमी रनिंग झाले.
माझे अंजनवेलच्या गोपाळगडनंतर ५० किल्ले पूर्ण झाले.
आता आमचा नकाशात मुंबईच्या खाली दिसणारा सगळा कोकण पाहून झालाय. पण पब्लिकला पुढच्या ट्रिपचे वेध आतापासूनच लागलेत.
कोकणात कीडेखाऊ (non-veg) लोकांची चंगळ होते. आणि घासफूस पब्लिकचे हाल.
फोटोची लिंक:
http://picasaweb.google.co.in/coastalprowl2009/PankajUnlimited
कधीपासून तुझ्या पोस्टची वाट बघतोय ... फोटो तर लई झ्याक आहेतच ... पण पोस्ट येऊ दे की लवकर ... :)
ReplyDeleteहां, फोटो तर भारी आहेतच... आता डेली रीपोर्टच्या पोस्ट टाका लवकर!
ReplyDeleteNice photography.
ReplyDeleteLaii bhariiii pics aahet raoooo
ReplyDeleteवा! अपेक्षेप्रमाणे जोरदार ट्रिप झालेली दिसतेय... फोटोज पण छान आलेत... आता लवकर ’ब्लॉग पोस्ट’ कर... ’कान्ट वेट’ :)
ReplyDeleteरत्नागिरीच्या "किल्ला (रत्नदुर्ग)" गावात माझे बालपण गेले. आज तिथले आणि आजूबाजूच्या परिसरातले फोटो पाहून भरून आलं. पुढच्या आठवड्यात चाललो आहे. मस्त मासे आणि हाणणार जाऊन.
ReplyDeleteबाकी तुमची फोटोग्राफी एकदम मस्त. सगळे फोटो आवडले.
khupach changle.
ReplyDelete