साद सागराची, सफर किनारपट्टीची: तिसरा आणि चौथा दिवस
पहाटेचे साडेचार वाजलेत आणि अलार्मने त्याचे काम चोख बजावले. पण वरुणराजाने त्याच्यापेक्षा जास्त चोख काम केलंय. रात्रीतून ढगांचा कडकडाट आणि विजांचा थयथयाट चालला होता. गणेशगुळेच्या बीचवर जाण्याचा केलेला प्लॅन तर शक्यच नाही आता. मधूनच विजेचा लोळ नभांगण चिरत, काळोख भेदत कुठे तरी भुईच्या कुशीत विसावत आहे. आणि आम्ही बाहेर पडण्याचा बेत रद्द केल्याने ही पावसाची श्रुतिका उबदार पांघरुणातून ऐकतोय. अर्धवट साखरझोप आणि अर्धवट जाग अशा संमिश्र स्थितीत अंगाचे कवळी करुन पडून राहताना असे वाटत होते की उठूच नये. पण आजचा पल्लादेखील बराच मोठा होता. रत्नदुर्ग पाहून आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड मार्गे वेळणेश्वर पोचायचे आहे. बाहेर उजाडले तसे आम्ही उबदार गाद्या सोडून बाहेर आलो. पाणी तापवलेले आहेच त्य कार्यालयाच्या केअरटेकरने.
मग सर्वजण फ्रेश झालेत आणि नेलपेंटवाल्या मॅडमची आजची शेड आहे ग्रीन !! योगायोग असा की माझ्या टीशर्टचा रंगही हिरवाच आहे !! नऊ वाजता आम्ही ते ठिकाण सोडले. पुन्हा एक
CP2- Day3 ग्रुप फोटो झाला आणि आम्ही शिवाजी चौकात एका उत्तम नाष्टा देणारया छटाक जागेत असलेल्या हॉटेलमध्ये पोचतोय। तिकडे सगळ्यांनी मिसळपाव, कटवडा, पुरीभजी, पोहे असा ’थोडासाच’ दोन-चारशेचे बिल होईल अस ब्रेकफास्ट केलाय. रत्नागिरी
स्टॅंडसमोरून आम्ही मिर्या बंदर रोडला लागणार आणि पुढे रत्नदुर्गला पोचणार. जास्त दूर नाही. २-३ किलोमीटर असेल. साढारण दहाला आम्ही रत्नदुर्गात प्रवेश केला. गाड्या सरळ किल्याच्या दरवाजापर्यंत जातात. किल्ल्यापेक्षा ही जागा भगवतीदेवीच्या मंदिरासाठे प्रसिद्ध आहे. तटावरून एक फेरी मारयला अर्धा पाऊण तास पुरतो. वरुन मिऱ्या बंदर आणि भगवती बंदराची जेटी फार छान दिसते आहे. दर्शन घेऊन आम्ही परत जायला निघतोय पण माझ्या अतिलाडक्या Canon 10-20 mmलेन्सची कॅप हरवली आहे. परत एक तटावरुन उलट फेरी झाली, पण नाही मिळाली. जरा मन खट्टू झाले, कारण ती कॅप म्हणजे लहान गोष्ट असली तरी उपयुक्त आहे, आणि ओरिगिनल घ्यायला स्वस्तही नाही. परत आलो तर आम्रपालीने तिने लपवून ठेवलेली ती कॅप हातात दिली. अशी चिडचिड झाली म्हणता पण अशी चेष्टा-मस्करी नेहमीच चालते ना ट्रिपमध्ये. चला आता मझा चेहरा हसरा तरी झालाय. पुढचा टप्पा म्हणजे गणपतीपुळे व्हाया परटावणे गाव.
रत्नागिरीवरुन निघून गणपतीपुळ्याच्या रस्त्याला आता आम्ही लागलो आहोत. एक रस्ता आहे तो म्हणजे सरळ सरळ रस्तावरचे बोर्ड फ़ॉलो करत जाणे. आणि दुसरा आहे तो परटावणे, आरे-वारे मार्गे समुद्रकिनाऱ्याला कवेत घेत जाणारा अत्यंत सुंदर रस्ता. साहजिकच आम्हाला तो दुसरा रस्ताच हवाय. थोडे पुढे आले की आरे-वारे पूल असा फलक दिसला की लहान असला तरी मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळावे. हाच रस्ता पुढे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूबाजूने गणपतीपुळ्याकडे जातो. खरंच ह रस्ता मी पाहिलेल्या सगळ्यात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. समुद्राच्या बाजूने टेकडीवरुन जाणारा वळणदार दुपदरी पण प्रशस्त रस्ता, डावीकडे सागराच्या बाजूला असणारे बॅरीकेड्स, खाली दिसणारा अथांग सागर असा सगळा माहोल आपण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये तर नाही न अशी शंका
घ्यायला लावतो. तिथे आता आम्हे बराच वेळ थांबलो आहे. भरपुर फोटो कढतोय. एका वळणावर प्रत्येक बाईकचा व्हिडिओ पण काढला. आता वेळेचे भान थेवून लवकरच गणपतीपुळे गाठले आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आतापर्यंतच्या सुरळीत प्रवासाबद्दल गणरायाचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासासाठी प्रार्थना केली. दुपार असल्याने बीचवर जाण्याचा प्रश्नच नाही. आणि तसाही गणपतीपुळेचा हा बीच खूप धोकादायक बीच आहे. गणपतीपुळ्यात जेवण उरकून घेतले. आम्ही मस्त मासे हाणतोय आणि तिकडे वेज मंडळींची पुन्हा थोडी कुरबुर झाली. आता त्याला काहीच इलाज नाही राव, कोकणात शुद्ध शाकाहारी (आयला, किती जड शब्द आहे, आपला ’घासफूस’ किती सोप्प) लोकांचे थोडे हालच होतात. इथून जयगडला जायाला मालगुंडवरून पुढे होता येईल. माल्गुंडला कवी केशवसुत स्मारक आहे ते पण इच्छुकांना पाहता येते. साडेतीनला गणपतीपुळे सोडले. अर्ध्या तासातच जयगड्दजवळची जिंदाल पॉवर प्लांटची धुराडी दिसू लागली आहेत. चारला जयगडला पोचलो. गड थोडा टेकडीच्या वरच्या बाजूला आहे. रस्ता चुकून आधी सरळ गावात गेलो. गाव लहानच होते पण एक मिनी-मुंबईच. सगळीकडे उत्तर भारतीय मजूर, जिंदालच्या प्लॅंटवर काम करणारे. चौकशी करता कळले की जयगडच्या खाडीवरुन पलीकडे तवसाळवरुन वेळणेश्वर आणि हेदवीकडे जायला लॉंच मिळू शकते. अन्यथा राई-भातगाव पुलावरून ६० किमीचा मोठा वळसा घालून जावे लागणार. सुदैवाने एक लॉंच होती. सात गाड्या आणि १४ जंगली माणसे असे मिळून साडेचारशेमध्ये सौदा ठरला. पण पुन्हा तीच मर्यादा, एका वेळी चारच बाईक्स नेता येणार. मग किल्ला पाहण्यास उत्सुक लोक मागे थांबले आणि काही लोक पुढे जातील. ते पुढे जाऊन वेळणेश्वर गाठून राहण्याची सोय पाहणार आहेत. गाड्या लॉंचमध्ये ठेवणेपण एक आव्हान आहे. सगळी जेटी शेवाळली आहे, प्रचंड निसरडे आहे. जयगड गावात आम्हाला तिथल्या वस्तीमुळे सोमालियाचा फ़ील येत होता. सर्वत्र प्लॅंट्वरचे मजूर, त्यंच्या तोंडातल्या विड्या, पानच्या पिचकाऱ्या, लहान लहान मासे विक्रेते, रेडिओ मोठ्याने लावुन ऐकणारे मजूर, चहाच्या टपऱ्या, लहान टेंपोंची गर्दी... एकदम सोमालिया!!
अर्धी टीम पुढे लॉंचने पाठवून आम्ही जयगड पहायला निघालो. हा किल्ला आजवर ट्रिपमध्ये पाहिलेला सगळ्यात चांगल्या स्थितीतला किल्ला. तो पाहून आम्ही परत जेट्टीवर आलो. लवकरच ती लॉंच परत आली. मॅंगी आम्हाला गाड्या चढवायला मदत म्हणून परत आला होता. आणि जयगडच्या बंदरावर एक ७-८ किलोची सुरमई पाहिल्याने चवताळला होता. ती घेऊनच जाऊ असा आग्रह होता त्याचा. पण तयार करुन कोण देणार म्हणून कसेबसे आम्ही त्याला गप्प केले. गाड्या चढवून आम्ही तयार झालोय पण तेव्ढ्यात पावसाचे जोरदार सर आली. पाऊस थांबल्याशिवाय लॉंच हलणार नाही असे मालकाने जाहीर केले आहे. मग आम्ही तिथेच एका गोदामात आडोसा शोधून थांबलो. बाहेर घंटासिंग आम्ही दिसत नाही म्हणून कावराबावरा झालय (तसा तो नेहमीच कावराबावरा असतो). पाऊस थांबला आणि आम्ही लॉंच मधून पैलतीरी निघालो. घंटासिंगला काही काम नाही, तो उगाच दीपच्या गाडीच्या इलेक्ट्रिक कंट्रोल्सशी खेळतोय. त्यावरुन त्याला आम्ही झापलाय. तवसाळला लॉंच पोचली, भावना तिथेच थांबली होती. बाकी मंडळी वेळणेश्वरला रवाना झालीत आणि त्यांनी रहायची सोय पण केली आहे. आम्ही गाड्या उतरवल्या आणि शेजारी एका घरात चहा ऑर्डर करुन ताजे झालो आणि मग बाईक्स वेळणेश्वरकडे पिदाडल्या. वाटेत दीपची गाडी अचानक जास्त रेस होत होती. Idling वाढलंय, म्हणून तो थांबला . मी त्याला चोक पहायला करायला सांगितले, तर तो चालू स्थितीत होता. घंटासिंगचे कीडे आहेत हे लक्षात यायला वेळ लागला नाही. दीपने एक सुंदरशी आशीर्वादपर शिवी हासडली लगेच आणि मी भावनाला एका कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने सोडून दे आणि विसरुन जा असे सुचवले :-)
वेळणेश्वरच्य रस्त्याने जाताना डावीकडे सागरात अतिसुंदर सूर्यास्त पहायला मिळाला. आकाशात पसरलेला तांबडा रंग, धूसर दिसणार सूर्य, त्या पार्श्वभूमीवर जयगडच्या प्लॅंटची धुराडी आणि टॉवर क्रेन्स. अवर्णनीय सोहळा एकदम. जणू आमचया ट्रिपचा हा कोकणातला शेवटचा सूर्यास्त आमच्या यशस्वी भटकंतीची पावतीच देत आहे.
आता अंधार पडत चाललाय. सावकाश बाईक्स चालवत आम्ही वेळणेश्वरला पोचतोय. तिथले कल्पतरु रिसॉर्ट एकदम समुद्राकडे तोंड करुन आहे. आल्यावर फ्रेश झालो. (पुन्हा एकदा) मासे खाल्ले. व्हेज लोकांना बटाट्याची भाजी खावी लागली. पुन्हा एकदा श्रीकांतला बर्थडे विशेस द्यायचे मनात आले.
रात्री किनाऱ्यावर छान शेकोटी केली आहे आणि आता सगळे आम्ही गप्पा झोडत बसलोय. हळूच घंटासिंगच्या कॅमेरा बॅग मधून मे एक लेन्स काढून घेतली. सगळे सामसूम झाल्यावर आम्ही झोपायला आलो आणि मग त्यच्या लक्षात आले. मग गेला परत बाहेर लेन्स शोधायला. थोडा वेळ शोधूनही सापडली नाही तर घेतले की झोपून. किती निष्काळजी माणूस आहे. मग आम्हीच त्याची लेन्स देऊन टाकली, कारण उद्या संध्याकाळी पाचला पुण्यात पोचायचे आहे. पॅटची साडेपाचला ट्रेन आहे. त्या आधी अंजनवेलचा गोपाळगड पण पहायचा आहे. म्हणून मग सगळ्यांना पाच वाजता निघायचे आहे असे सांगून पडी मारली.
आजचा प्रवास:
रत्नागिरी-रत्नदुर्ग: ३ किमी.
रत्नदुर्ग-आरेवारे-गणपती पुळे: ३५ किमी.
गणपतीपुळे-जयगड: ~३५ किमी.
जयगड-तवसाळ: लॉंचने ~३ किमी.
तवसाळ-हेदवी-वेळणेश्वर: ~२५ किमी।
खादाडी पॉइंट्स: रत्नागिरीचे टपरी हॉटेल (अफलातून टेस्ट आहे इथे)
गणपतीपुळेला जयगड रोडवर एक लहान हॉटेल (मासे मस्त मिळाले).
वेळणेश्वरला कल्पतरु रिसॉर्ट.
दिवस ४:
पहाटे चारलाच सगळ्यांना उठवून दिले. पटकन आवरुन बॅगा बांधल्या. आणि सात वाजता गुहागरमार्गे अंजनवेलला पोचतो आहोत. आज सकाळी सकाळी धुंवाधार पाऊस सुरु झालय. पावसाच्या सरी सुईसारख्या टोचत आहेत. गोपाळगडला जायला रत्नागिरी गॅस लि. (पूर्वीची एन्रॉन) च्या बाजूने रस्ता आहे. किल्ल्यात आता खूप झाडी वाढली आहे. पलीकडच्या बाजूने सागराचे विहंगम दृश्य दिसते. हा गोपाळगड मी पाहिलेला पन्नासावा किल्ला. म्हणजे माझ्या भटकंतीमधला एक मैलाचा दगड. आज एकदम खुश आहे आपण. अब तक पचास...!!! किल्ला पाहून काही फोटो काढले आणि परत फिरलो- पुण्याकडे.

साडेआठला एन्रॉनच्या गेटमध्ये ब्रेकफस्ट केला आणि मार्ग-ताम्हाणे, शृंगारतळी वरून चिपळूणला आलो. पुढे कोयनानगरचा नागमोडी घाट चढत पुन्हा ’घाटी’ झालो. कोयनानगरचे धरण पाहून पाटण, उंब्रज, सातारा मार्गे संध्याकाळी पुण्यात. पुण्यातही पावसाने पाठ सोडली नाही. आमच्यावर फार प्रेम असल्या सरखा तो कोसळतच होता. येताना साताऱ्यात कणसे ढाबा इथे चिकन हाणले, हे सांगणे न लगे.
आजचा प्रवास:
वेळणेश्वर-गुहागर-अंजनवेल: २६ किमी.
अंजनवेल-मार्गताम्हाणे-शृंगारतळी-चिपळूण-कोयनानगर-पाटण-उंब्रज-सातारा-पुणे: ~३०० किमी.
कणसे ढाबा सातारा.
मग सर्वजण फ्रेश झालेत आणि नेलपेंटवाल्या मॅडमची आजची शेड आहे ग्रीन !! योगायोग असा की माझ्या टीशर्टचा रंगही हिरवाच आहे !! नऊ वाजता आम्ही ते ठिकाण सोडले. पुन्हा एक
CP2- Day3 ग्रुप फोटो झाला आणि आम्ही शिवाजी चौकात एका उत्तम नाष्टा देणारया छटाक जागेत असलेल्या हॉटेलमध्ये पोचतोय। तिकडे सगळ्यांनी मिसळपाव, कटवडा, पुरीभजी, पोहे असा ’थोडासाच’ दोन-चारशेचे बिल होईल अस ब्रेकफास्ट केलाय. रत्नागिरी

रत्नागिरीवरुन निघून गणपतीपुळ्याच्या रस्त्याला आता आम्ही लागलो आहोत. एक रस्ता आहे तो म्हणजे सरळ सरळ रस्तावरचे बोर्ड फ़ॉलो करत जाणे. आणि दुसरा आहे तो परटावणे, आरे-वारे मार्गे समुद्रकिनाऱ्याला कवेत घेत जाणारा अत्यंत सुंदर रस्ता. साहजिकच आम्हाला तो दुसरा रस्ताच हवाय. थोडे पुढे आले की आरे-वारे पूल असा फलक दिसला की लहान असला तरी मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळावे. हाच रस्ता पुढे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूबाजूने गणपतीपुळ्याकडे जातो. खरंच ह रस्ता मी पाहिलेल्या सगळ्यात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. समुद्राच्या बाजूने टेकडीवरुन जाणारा वळणदार दुपदरी पण प्रशस्त रस्ता, डावीकडे सागराच्या बाजूला असणारे बॅरीकेड्स, खाली दिसणारा अथांग सागर असा सगळा माहोल आपण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये तर नाही न अशी शंका

अर्धी टीम पुढे लॉंचने पाठवून आम्ही जयगड पहायला निघालो. हा किल्ला आजवर ट्रिपमध्ये पाहिलेला सगळ्यात चांगल्या स्थितीतला किल्ला. तो पाहून आम्ही परत जेट्टीवर आलो. लवकरच ती लॉंच परत आली. मॅंगी आम्हाला गाड्या चढवायला मदत म्हणून परत आला होता. आणि जयगडच्या बंदरावर एक ७-८ किलोची सुरमई पाहिल्याने चवताळला होता. ती घेऊनच जाऊ असा आग्रह होता त्याचा. पण तयार करुन कोण देणार म्हणून कसेबसे आम्ही त्याला गप्प केले. गाड्या चढवून आम्ही तयार झालोय पण तेव्ढ्यात पावसाचे जोरदार सर आली. पाऊस थांबल्याशिवाय लॉंच हलणार नाही असे मालकाने जाहीर केले आहे. मग आम्ही तिथेच एका गोदामात आडोसा शोधून थांबलो. बाहेर घंटासिंग आम्ही दिसत नाही म्हणून कावराबावरा झालय (तसा तो नेहमीच कावराबावरा असतो). पाऊस थांबला आणि आम्ही लॉंच मधून पैलतीरी निघालो. घंटासिंगला काही काम नाही, तो उगाच दीपच्या गाडीच्या इलेक्ट्रिक कंट्रोल्सशी खेळतोय. त्यावरुन त्याला आम्ही झापलाय. तवसाळला लॉंच पोचली, भावना तिथेच थांबली होती. बाकी मंडळी वेळणेश्वरला रवाना झालीत आणि त्यांनी रहायची सोय पण केली आहे. आम्ही गाड्या उतरवल्या आणि शेजारी एका घरात चहा ऑर्डर करुन ताजे झालो आणि मग बाईक्स वेळणेश्वरकडे पिदाडल्या. वाटेत दीपची गाडी अचानक जास्त रेस होत होती. Idling वाढलंय, म्हणून तो थांबला . मी त्याला चोक पहायला करायला सांगितले, तर तो चालू स्थितीत होता. घंटासिंगचे कीडे आहेत हे लक्षात यायला वेळ लागला नाही. दीपने एक सुंदरशी आशीर्वादपर शिवी हासडली लगेच आणि मी भावनाला एका कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने सोडून दे आणि विसरुन जा असे सुचवले :-)
वेळणेश्वरच्य रस्त्याने जाताना डावीकडे सागरात अतिसुंदर सूर्यास्त पहायला मिळाला. आकाशात पसरलेला तांबडा रंग, धूसर दिसणार सूर्य, त्या पार्श्वभूमीवर जयगडच्या प्लॅंटची धुराडी आणि टॉवर क्रेन्स. अवर्णनीय सोहळा एकदम. जणू आमचया ट्रिपचा हा कोकणातला शेवटचा सूर्यास्त आमच्या यशस्वी भटकंतीची पावतीच देत आहे.
आता अंधार पडत चाललाय. सावकाश बाईक्स चालवत आम्ही वेळणेश्वरला पोचतोय. तिथले कल्पतरु रिसॉर्ट एकदम समुद्राकडे तोंड करुन आहे. आल्यावर फ्रेश झालो. (पुन्हा एकदा) मासे खाल्ले. व्हेज लोकांना बटाट्याची भाजी खावी लागली. पुन्हा एकदा श्रीकांतला बर्थडे विशेस द्यायचे मनात आले.
रात्री किनाऱ्यावर छान शेकोटी केली आहे आणि आता सगळे आम्ही गप्पा झोडत बसलोय. हळूच घंटासिंगच्या कॅमेरा बॅग मधून मे एक लेन्स काढून घेतली. सगळे सामसूम झाल्यावर आम्ही झोपायला आलो आणि मग त्यच्या लक्षात आले. मग गेला परत बाहेर लेन्स शोधायला. थोडा वेळ शोधूनही सापडली नाही तर घेतले की झोपून. किती निष्काळजी माणूस आहे. मग आम्हीच त्याची लेन्स देऊन टाकली, कारण उद्या संध्याकाळी पाचला पुण्यात पोचायचे आहे. पॅटची साडेपाचला ट्रेन आहे. त्या आधी अंजनवेलचा गोपाळगड पण पहायचा आहे. म्हणून मग सगळ्यांना पाच वाजता निघायचे आहे असे सांगून पडी मारली.
आजचा प्रवास:
रत्नागिरी-रत्नदुर्ग: ३ किमी.
रत्नदुर्ग-आरेवारे-गणपती पुळे: ३५ किमी.
गणपतीपुळे-जयगड: ~३५ किमी.
जयगड-तवसाळ: लॉंचने ~३ किमी.
तवसाळ-हेदवी-वेळणेश्वर: ~२५ किमी।
खादाडी पॉइंट्स: रत्नागिरीचे टपरी हॉटेल (अफलातून टेस्ट आहे इथे)
गणपतीपुळेला जयगड रोडवर एक लहान हॉटेल (मासे मस्त मिळाले).
वेळणेश्वरला कल्पतरु रिसॉर्ट.
दिवस ४:
पहाटे चारलाच सगळ्यांना उठवून दिले. पटकन आवरुन बॅगा बांधल्या. आणि सात वाजता गुहागरमार्गे अंजनवेलला पोचतो आहोत. आज सकाळी सकाळी धुंवाधार पाऊस सुरु झालय. पावसाच्या सरी सुईसारख्या टोचत आहेत. गोपाळगडला जायला रत्नागिरी गॅस लि. (पूर्वीची एन्रॉन) च्या बाजूने रस्ता आहे. किल्ल्यात आता खूप झाडी वाढली आहे. पलीकडच्या बाजूने सागराचे विहंगम दृश्य दिसते. हा गोपाळगड मी पाहिलेला पन्नासावा किल्ला. म्हणजे माझ्या भटकंतीमधला एक मैलाचा दगड. आज एकदम खुश आहे आपण. अब तक पचास...!!! किल्ला पाहून काही फोटो काढले आणि परत फिरलो- पुण्याकडे.

साडेआठला एन्रॉनच्या गेटमध्ये ब्रेकफस्ट केला आणि मार्ग-ताम्हाणे, शृंगारतळी वरून चिपळूणला आलो. पुढे कोयनानगरचा नागमोडी घाट चढत पुन्हा ’घाटी’ झालो. कोयनानगरचे धरण पाहून पाटण, उंब्रज, सातारा मार्गे संध्याकाळी पुण्यात. पुण्यातही पावसाने पाठ सोडली नाही. आमच्यावर फार प्रेम असल्या सरखा तो कोसळतच होता. येताना साताऱ्यात कणसे ढाबा इथे चिकन हाणले, हे सांगणे न लगे.
आजचा प्रवास:
वेळणेश्वर-गुहागर-अंजनवेल: २६ किमी.
अंजनवेल-मार्गताम्हाणे-शृंगारतळी-चिपळूण-कोयनानगर-पाटण-उंब्रज-सातारा-पुणे: ~३०० किमी.
कणसे ढाबा सातारा.
http://anukshre.wordpress.com
ReplyDeletemy blog
anuja