रायरेश्वराचे पठार आणि केंजळगड
गुरुवारी गणपती विसर्जनची सुट्टी होती. छानपैकी आमच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणूकीचे फोटो काढले दुपारी. नेहमीप्रमाणे शिवगर्जना, गरवारे, रमणबाग, स्वरुप-वर्धिनी यांच्या ढोलताशाने टिपिकल एम् एच 12 मिरवणूक गाजवली. अर्थात त्याला संयमी झालर होती. गुलालाचा वापर टाळून सगळ्यांनी एक आदर्श घालून दिला. दुसरा दिवस राजा घेऊन पेंडिंग कामे उरकून घेतली. विशेष म्हणजे एवढे दिवस 30,000 किमी साथ देणारे बाइकचे टायर बदलले. शनिवार पण एकदम फॅमिली-फॅमिली खेळण्यात गेला. चार दिवस सलग सुट्टी मिळूनही कुठेच भटकंती नाही याची हे काही खपत नव्हते. मग रात्री अकरा वाजता 2-4 लोकांना SMS करून रायरेश्वर आणि केंजळगडाचा प्लान फिक्स झाला.
दुहेरी हेतू होता. रायरेश्वरच्या पठारावर या दिवसांमध्ये रानफुलांचा सोहळा सुरू होतो (सातार्याच्या कास पठाराला होतो तसाच). त्याचे पण फोटो मिळणार अशी अपेक्षा होती. रायरेश्वरचे पठार हे पाचगणीच्या टेबललँड पेक्षा मोठे आहे. 11 किमी लांबीचे आणि दीड किमी रुंद असे पठार हे सह्याद्रीचे एक आकर्षण आहे. केंजळगडाचे ताशीव कातळकडे पण आमच्या सारख्या वेड्यांना कायम खुणावत असतात. ऐन वेळी सांगून पण आणखी दोन लोक (भूषण आणि वैभव) तयार झाले. सकाळी लवकर म्हणजे साडेसहाला गडी आणि गाडी तयार झाले. ठरलेल्या ठिकाणी कात्रजच्या बोगद्याच्या पल्याड जमलो आणि भोरच्या दिशेने निघालो. निसरड्या रस्त्यावर पण गाडी व्यवस्थित चालली होती. बदललेले टायर मस्त काम देत होते. वळणावर कॉन्फिडेंट टर्न्स बसत होते. मागे बसलेला भूषणपण म्हणाला टायर झकास आहेत. माझी मीच पाठ थोपटून घेतली.
भोरला आमचे नेहमीचे मिसळ केंद्र श्रीराम हॉटेल अजूनही उघडले नव्हते. सकाळी साडेसातला कोण उघडणार आमच्यासाठी? पण मग स्टॅंडच्या उजव्या हाताला एक टुकार हॉटेल उघडे दिसले. तिथेच खाऊन घेतले. चहा मारला, पुढच्या ट्रेक साठी वडापाव पॅक करून घेतले आणि पुढे आंबेघरच्या रस्त्याने निघालो. आंबेघरला एक रस्ता वरंधा घाटाकडे जातो आणि एक अंबवडे गावाकडे. अंबवडेच्या दिशेने निघालो. वातावरण मस्त आल्हाददायक होते. एके ठिकाणी सुगरण पक्ष्याची खूपशी घरटी दिसली. अर्धवट विणलेली. नर पक्षी अर्धे घरटे विणून मादीला ते पाहायला बोलावतो. मादीला पसंत पडले तरच पुढे संसार सुरू होतो. आपण माणसे नाही का possession न मिळालेला फ्लॅट होणार्या जोडीदाराला दाखवून इंप्रेस करायचा प्रयत्न करतो. खूप मस्त फोटो मिळाले. नर एकेका मादीला बोलावून घरटे दाखवत होते. भारीच उडाणटप्पू वाटले मला ते :=).
तिथून पुढे निघालो आणि अंबवडे, टिटेघर करत कोर्ले गावात पोचलो. अंबवडे गावात एक झुलता पूल (suspension bridge) आहे, औंध संस्थानने बांधलेला. एकदा पाहावा असा आहे. कोर्ले गावात गाडी लावली की लगेच आपण एका कच्च्या रस्त्याने आपण चढाई सुरू करतो. रस्ता सरळ असला तरी दमवणारा आहे. मागच्या वेळी एकदा आलो होतो तेव्हा गाडी घेऊन वर जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. वाटेत काही धबधबे पाहत, त्यांचे एक्सट्रा फ्रेश पाणी पिलात की सगळी चढाई सोप्पी वाटते. हाच रस्ता एका खिंडीत येतो जिथे दुसर्या बाजूच्या (वाईची बाजू) दरीतून आणखी एक गाडी रस्ता येऊन मिळतो. तिथूनच एक पायवाट वर पठारावर जाते. थोडे चालून गेलात की रायरेश्वराच्या शिड्या दृष्टीस पडणार. पंधरा मिनिटांत आपण शिडीला भिडतो. या सगळ्या शिड्या अंगावर येणार्या आहेत. नवखा गडी इथे गारद होण्याची शक्यता जास्त. लोखंडी शिड्या कस काढतात. वाटेत काही रानफुलांचे ट्रेलर दर्शन होते. एकदा हा टप्प पार केला की आपण डाइरेक्ट स्वर्गात पोचल्याचा भास होतो. सगळीकडे कर्दळीच्या जातीची पांढरी फुले आणि काही जांभळी फुले नजरेस पडतात. सगळीकडे चांदण्या धरणीवर उतरल्याचा भास होत होता. मध्येच अवखळ निर्झर आणि फुलांचे गलिचे दृष्टीस पडत होते. काही संथ तलाव असे की जणू देवांचा स्विमिंग पूलच...!!! एक मळालेली पायवाट पकडून आम्ही पुढे निघालो. सगळे पठार फिरणे तर अशक्यच होते. तरी पण महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली त्या ऐतिहासिक शिवमंदिरापर्यंत जायचे होते. धूक्यातून वाट काढत तिथपर्यंत पोचलो. त्या शिवलिगाच्या दर्शनाने भरून पावलो. जिथे महाराजांनी शपथ घेतली त्या मंदिरात आम्ही प्रत्यक्ष आहोत ही जाणीव अंगावर शहारे आणत होती. सध्या या मंदिराची व्यवस्था जंगम कुटुंबाकडे आहे. वर तिथे त्यांची एक वाडी पण आहे. साधारण पंधरा एक उंबरा असेल.
तिथेच एका जंगम काकांकडे चहा घेतला आणि परत फिरलो. त्याच्या माहितीनुसार वर राहण्याची आणि खाण्याची सोय होते. मोठा ग्रूप असेल तर आगाऊ ऑर्डर द्यावी. खाली कॉंटॅक्ट डीटेल्स देत आहे. उतरून येताना समोरून पुण्याचा एक मोठा चाळीस लोकांचा ग्रूप दिसला. रायरेश्वरला यायला अशा ग्रूपची गरज लागावी याचे आम्हाला हसू येत होते. उतरून आम्ही केंजळगडाच्या दिशेन वाटचाल सुरू केली. सुरवातीला वाटले की डोंगराच्या सोंडेवरुन सरळ माथ्यावर जाता येईल. पण पुढे गेल्यावर एका गुरख्याने सांगितले रस्ता नाही. म्हणून मग पुन्हा कच्च्या गाडी रस्त्याने चालू लागलो. अंतर चालून एका पायवाटेने गर्द रानात शिरलो. निबीड अंधाऱ्या अरण्यातून चालत एका मंदिरापाशी येवून थांबलो. पुढे रस्ताच दिसत नव्हता. थोड्या अंतरावर ५-७ घरांची वस्ती दिसली. तिथे जरा चौकशी केली तर त्या ताईंनी मोघम उत्तर देउन रस्ता दखवला, जो आम्हाला दिसलाच नाही. शेवटी आम्हीच रस्ता शोधायचे ठरवले आणि पायवाटेचा मागोवा घेत पुढे सरकलो. पायवाट अशी रुळलेली नव्हती, आणि एके ठिकाणी तिला फाट फुटला. केंजळगडाचा कडा उजव्या हाताला दिसत होता म्हणून आम्ही "Right is the right way" असे मानून उजवी वाट केली. पुढे काही चढून गेल्यावर वाटच गायब झली. कुठेच दिसेना. सगळीकडे माजलेले गवत आणि झुडपांची जाळी. त्यात कहर म्हणजे पायाखाली निसरडा चिखल. कमरेइतक्या उंच झुडुपांमधून आम्ही चाललो होतो. हातात मोठी काठी घेऊन आम्ही गवत झोडत चाललो होतो. हेतू हा की काही किडूक-मिडूक असेल तर आधी दिसावे अथवा पळून तरी जावे. एवढे वर आलो होतो की परत जाणेही शक्य नव्हते. त्यातच हाफ टीशर्ट्मुळे अंगाल कसल्याशा वेलीचा स्पर्श झाला आणि खूप खाजू लगले. अशक्य आग होऊ लागली. मग मात्र आम्ही jackets चढवले. साधारण तासभर चिखलातून आणि कमरे एवढ्या गवतातून चालल्यावर डावीकडे दूरवर एक वाट दिसली. पण तिथेपर्यंत जयचे म्हणजे एक दिव्य होते. अति निसरडा उतार चूक करण्यासाठी चान्स देत नव्हता. कसेबसे त्या वाटेला लागलो. आणि वर कड्याच्या सुरवातीच्या पठारावर पोचलो. त्या कड्याला traverse मारुन दगडी पायऱ्यांशी आलो. पायऱ्या पण शेवाळल्या होत्या. पाय सटकत होते. पण एकदाचे वर पोचलो. वरती माथ्यावर एक open to sky मंदिर आहे. जुना चुन्याचा घाणा आणि एक पक्क्या बांधकामाची पडकी कोठारासारखी वास्तू. तिथून पुढे चालत गेलो की एक तलाव आहे. पण पाणी पिण्यायोग्य नाही. तशीच पायवाट पुढे कड्याच्या टोकाकडे जाते. आणि इथे केंजळगडाची फेरी संपते. पलीकडे धोम धरण, कमलगड आणि वाई खोरे पाहुन घेतले आणि बरोबर आणलेले खाऊन घेतले. पेपरच्या बातम्या उमटलेले थंड वडापाव पण पंचपक्वान्न वाटत होते. स्वीट डिश म्हणून पुठ्ठ्याची बिस्किटे (Marie) खाल्ली. वैभवने "म्यानतुनि उसळे..." गाणे ऐकवून दिल खुश करुन टाकले आणि आम्ही परतीची उतराई सुरु केली.
चिखल असल्यामुळे ती सर्वात कठीन गोष्ट होती. एक वेळ चढणे परवडले, पण निसरडा उतार जीव खातो. त्यात वैभव तर अर्धा डझन वेळा पाय सटकुन पडला आणि चिखलाने पूर्ण माखून गेला. आम्ही प्रत्येक वेळी तो पडला की पाय घसरणे आणि तोंड काळे होणे अशी कोटी करुन दात काढत होतो. कोर्ले गावापर्यंतचा रस्ता संपता संपत नव्हता. अतिशय दमछाक करणारा पावसळ्यातला ट्रेक पूर्ण करुन आम्ही पुण्याची वाट धरली, एका नवीन भटकंतीचा विचार मनात घोळवत...
परत येताना मनात एक वाक्य घोळत होते... रायरेश्वराच्या मंदिरात वाचलेले... "मागे फक्त पाऊलखुणा ठेवून जा!!!"

Fact file:Name: Raireshwar, KenjalgadTable land measuring larger than Panchgani.Base village: Korle, Tal-Bhor, Dist-Pune.Route: Pune-KhedShivapur-Bhor-Ambeghar-Titeghar-Ambavade-KorleDistance: around 80-80 from Pune.Tips: Avoid rainy season because slippery mud. September end and October start is the best time to visit to witness the floral coronation of Sahyadri.Stay: Can be done in Raireshwar temple atop or in Raireshwar wadi.Surrounding: Dhom dam, Wai, Varandha Ghat, Kamalgad, Pandavgad.Contact Details for meal @ Raireshwar:Gopal Jangam: 9822887057/9370795278
sahich re... marathit waachun khoop khoop chaan waatale !
ReplyDeletetujhi bhatakanti paahun/waachun punyaat nasalyachi khant waadhat jaate.
Thanks for sharing all these experiences :)
~ Samyak.
Bharich!! nusta blog vachunach akkhka Rayreshwar dolya samor ubha thakla... such a nice narration, and stunning snaps... keep it up!
ReplyDeleteVangaal Bolnaar Nahi....Vachun Lai-ch zaak vatal...Mast Haay....
ReplyDeleteमित्रा खुपच छान!!! शेवट तर अती उत्तम!!!! येत्या रविवारी जाउन येईल म्हणतो!!!! माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद!!
ReplyDeleteto ardha dozon nahi 2 dozon vela padla ahe ... :)
ReplyDelete@पंकज,
ReplyDeleteजय भटकेश्वर!
मस्त लेख लिहिलाय, भावा.... सुट्टीचा चांगलाच सदुपयोग केलायस.... फोटो जरा जास्त टाकत जा ना.. पिकासा किंवा फ्लिकर वर टाकले तरी चालतील...! पण जे फोटो आहेत ते मात्र अल्टीच आहेत.. तुझ्या फोटोगिरी वर तर आपण जाम खुश आहोत...!
रायरेश्वरच्या आठवणी जाग्या केल्यास.... आमचा ट्रेकही मस्त झाला होता... मात्र पायवाटेने पुर्ण राउंड मारायच्या ऐवजी आम्ही मधुनच वर चढलो आणि सोपा ट्रेक अवघड करुन टाकला होता. रायरेश्वर, खरंच स्वर्गाची अनुभुती देणारा आहे.. आता स्वर्ग पाहिलाय कुणी, पण ठामपणे सांगावे वाटते - यापेक्षा सुंदर नसावाच.
शिवाय केंजळगडचा बुलेट ट्रेकही भन्नाट झाला होता. तो वरती बोर्ड आहे ना, तिथंपर्यंत मी बुलेट चढवली होती... हा हा..! आणि हो - या बुलेट ट्रेक ची स्टोरी "रॉयल इनफिल्ड" च्या वेबसाइट ला सबमिट केली होती. त्यांनी ती प्रकाशित केली आणि मला "रॉयल इनफिल्ड" टी शर्टही मिळाला!! त्यामुळे केंजळगड चा ट्रेक खास महत्वाचा!
"मागे फक्त पाऊलखुणा ठेवून जा!!!" - अगदी खरं - मार्मिक!
@भुंगा,
ReplyDeleteकिमान बेसिक पातळी असलेलेच फोटो टाकत असतो रे. एका ट्रेकमध्ये फार तर ४-५ असे फोटो मिळतात. पुढल्या वेळेपासून जास्त मिळवण्याचा प्रयत्न करीन नक्की...
chan lihitos..khup awadla..
ReplyDeleteani "possession na milalela flat honarya jodidarala...."
sahich .. ha ha :D
namaskar, post wachun amchya raireshwar camping chi athvan zali.. tumhi kelela prayatn amhi purNatvas nela hota.. mhanjech raireshwar chya shidya suru hotat tya aadhi ji ek mokli jaaga ahe tithparyant amhi amchya bikes nelya hotya :)
ReplyDelete